अनफेअर चेस !

Primary tabs

संजय क्षीरसागर's picture
संजय क्षीरसागर in जनातलं, मनातलं
21 Apr 2020 - 12:18 pm

या वर्षीच्या बुद्धिबळ स्पर्धेत काहीही करून त्याला हरवायचंच असं सर्वांनी ठरवलं. बुद्धिबळ त्याच्यासाठी फक्त तर्काचा खेळ होता, इज्जतीचा नाही. प्रतिस्पर्ध्याच्या सुरेख चालीला सुद्धा तो दाद द्यायचा. त्याच्या चाली निर्विवाद होत कारण फोकस कायम प्रश्नावर असे, स्वतःवर नाही.

सामन्यात दहाव्या चालीनंतर प्रतिस्पर्धी एक मोहरा गमावून बसला आणि सतराव्या चालीनंतर इतकी कोंडी झाली की डाव हरण्याकडे झुकू लागला. अचानक चेसक्लॉक बंद पडलं ! पंचांनी सामना रद्द केला.

निर्वाणीच्या क्षणी करायची ही खेळी पूर्वनियोजित होती, हे फक्त त्याच्या लक्षात आलं.

तीन वर्षांनी पुन्हा स्पर्धा ठरली.

तो आला, त्यानं चेसक्लॉककडे पाहिलं. तीन वर्षापूर्वीचा बोर्ड जसाचातसा मांडला ........ आणि शांतपणे आठरावी चाल केली.

बोर्डच्या बाहेर, पंचाना शह बसला !

मुक्तकप्रकटन

प्रतिक्रिया

ज्योति अळवणी's picture

21 Apr 2020 - 12:24 pm | ज्योति अळवणी

मस्त

संजय क्षीरसागर's picture

21 Apr 2020 - 12:29 pm | संजय क्षीरसागर

ही कथा शशक स्पर्धेसाठी नाही !

Cuty's picture

21 Apr 2020 - 12:44 pm | Cuty

त्याच्या चाली निर्विवाद होत कारण फोकस कायम प्रश्नावर असे, स्वतःवर नाही. >> पंचलाईन !

संजय क्षीरसागर's picture

21 Apr 2020 - 1:34 pm | संजय क्षीरसागर

हे कायम परिस्थितीवर अवलंबून आहे, पण त्यात न अडकता तो सोडवायचा प्रयत्न करणं हे कौशल्य आहे. जे चेसमध्ये तेच जीवनात; त्यामुळे या अँगलनं चेस खेळणारी व्यक्ती प्रगल्भ होत जाते. प्रत्येक हार ही प्रतिस्पर्ध्याकडून काही तरी शिकायची संधी आहे; त्याच्या बुद्धीमत्तेला दाद देण्याचा अवसर आहे. आपलं कौशल्य वाढवत नेण्याची ती संधी आहे.

कथेचं म्हणाल तर पंच लाईन सगळ्यात शेवटी आहे !

मोदक's picture

21 Apr 2020 - 1:33 pm | मोदक

इथल्या दुष्ट लोकांनी तुमच्यावर तीन वर्षे लेखनसंन्यास लादलेला होता का..? ;)

उन्मेष दिक्षीत's picture

21 Apr 2020 - 3:18 pm | उन्मेष दिक्षीत
उन्मेष दिक्षीत's picture

21 Apr 2020 - 3:19 pm | उन्मेष दिक्षीत
उन्मेष दिक्षीत's picture

21 Apr 2020 - 3:20 pm | उन्मेष दिक्षीत
राघव's picture

21 Apr 2020 - 3:35 pm | राघव

आवडली!

Marathi_Mulgi's picture

21 Apr 2020 - 6:22 pm | Marathi_Mulgi

+१

शेखरमोघे's picture

21 Apr 2020 - 11:50 pm | शेखरमोघे

एकाच खेळीत शह आणि मात देखील !! छान !!

संजय क्षीरसागर's picture

22 Apr 2020 - 10:06 pm | संजय क्षीरसागर

अपेक्षाच नव्हती !

धन्यवाद !

कानडाऊ योगेशु's picture

22 Apr 2020 - 1:33 am | कानडाऊ योगेशु

बरेच काही सांगणारी पण "संक्षिप्त" अशी कथा. : )

सर, पूर्वीचं विसरून जावा आता.
तुमचे पुढील कसदार लिखाण वाचण्यास उत्सुक आहे.

संजय क्षीरसागर's picture

22 Apr 2020 - 10:20 pm | संजय क्षीरसागर

शशक आहे !

मिपा आणि शशकाच्या धोरणाविरूध्द नसतांनाही ती स्पर्धेसाठी अस्विकृत केली गेली आहे.

OBAMA80's picture

23 Apr 2020 - 6:54 am | OBAMA80

शशक ला टाका +१

संजय क्षीरसागर's picture

23 Apr 2020 - 7:55 am | संजय क्षीरसागर

संपादक मंडळानं कथा अस्विकृत केली आहे. जर या कथेला, विजयी कथेपेक्षा जास्त प्रतिसाद मिळाले तर त्याचा अर्थ काय होईल असा विचार मनात येतो !

नाव कळल्यावर स्पर्धेत घेणार नाहीत.
-----
मला वाटतं रामे / विमे यापैकी एकाने बुद्धिबळावर अशीच एक कथा लिहिली आहे.
--------
बाकी वजीर,घोडे,,उंट यापेक्षाही प्यादी,राजा (क्वीन)

संजय क्षीरसागर's picture

23 Apr 2020 - 9:15 am | संजय क्षीरसागर

आता कथा स्पर्थेत नाही आणि कथेलाही स्पर्धा नाही !

शेवटी अभिव्यक्ती हा एक विचार आहे, तो जनमानसात पोहोचला की झालं !

अवघडय ..
मडकं कच्चय अजून ...

भीमराव's picture

23 Apr 2020 - 10:20 am | भीमराव

+1

संदर्भासह कथा स्पष्ट‌ समजली.

एवढंच म्हणतो,

नर का क्या बडा? समय बडा बलवान.

भिलन‌ लुटी गोपीया, वही अर्जुन वही बाण.

संजय क्षीरसागर's picture

23 Apr 2020 - 12:14 pm | संजय क्षीरसागर

हम समयसे पार है, समय तो एक आभास,
जज्बा है तो उफलेगा, जुनूं कर देगा मात |

आयर्नमॅन's picture

21 May 2020 - 10:20 pm | आयर्नमॅन

पुनर्जन्म म्हटले जाते असे ऐकून आहे