Skip to main content

अनफेअर चेस !

लेखक संजय क्षीरसागर यांनी मंगळवार, 21/04/2020 12:18 या दिवशी प्रकाशित केले.
या वर्षीच्या बुद्धिबळ स्पर्धेत काहीही करून त्याला हरवायचंच असं सर्वांनी ठरवलं. बुद्धिबळ त्याच्यासाठी फक्त तर्काचा खेळ होता, इज्जतीचा नाही. प्रतिस्पर्ध्याच्या सुरेख चालीला सुद्धा तो दाद द्यायचा. त्याच्या चाली निर्विवाद होत कारण फोकस कायम प्रश्नावर असे, स्वतःवर नाही. सामन्यात दहाव्या चालीनंतर प्रतिस्पर्धी एक मोहरा गमावून बसला आणि सतराव्या चालीनंतर इतकी कोंडी झाली की डाव हरण्याकडे झुकू लागला. अचानक चेसक्लॉक बंद पडलं ! पंचांनी सामना रद्द केला. निर्वाणीच्या क्षणी करायची ही खेळी पूर्वनियोजित होती, हे फक्त त्याच्या लक्षात आलं. तीन वर्षांनी पुन्हा स्पर्धा ठरली. तो आला, त्यानं चेसक्लॉककडे पाहिलं. तीन वर्षापूर्वीचा बोर्ड जसाचातसा मांडला ........ आणि शांतपणे आठरावी चाल केली. बोर्डच्या बाहेर, पंचाना शह बसला !
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 8908
प्रतिक्रिया 23

प्रतिक्रिया

मस्त

In reply to by ज्योति अळवणी

ही कथा शशक स्पर्धेसाठी नाही !

त्याच्या चाली निर्विवाद होत कारण फोकस कायम प्रश्नावर असे, स्वतःवर नाही. >> पंचलाईन !

In reply to by Cuty

हे कायम परिस्थितीवर अवलंबून आहे, पण त्यात न अडकता तो सोडवायचा प्रयत्न करणं हे कौशल्य आहे. जे चेसमध्ये तेच जीवनात; त्यामुळे या अँगलनं चेस खेळणारी व्यक्ती प्रगल्भ होत जाते. प्रत्येक हार ही प्रतिस्पर्ध्याकडून काही तरी शिकायची संधी आहे; त्याच्या बुद्धीमत्तेला दाद देण्याचा अवसर आहे. आपलं कौशल्य वाढवत नेण्याची ती संधी आहे. कथेचं म्हणाल तर पंच लाईन सगळ्यात शेवटी आहे !




In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

शशक आहे ! मिपा आणि शशकाच्या धोरणाविरूध्द नसतांनाही ती स्पर्धेसाठी अस्विकृत केली गेली आहे.

In reply to by OBAMA80

संपादक मंडळानं कथा अस्विकृत केली आहे. जर या कथेला, विजयी कथेपेक्षा जास्त प्रतिसाद मिळाले तर त्याचा अर्थ काय होईल असा विचार मनात येतो !

नाव कळल्यावर स्पर्धेत घेणार नाहीत. ----- मला वाटतं रामे / विमे यापैकी एकाने बुद्धिबळावर अशीच एक कथा लिहिली आहे. -------- बाकी वजीर,घोडे,,उंट यापेक्षाही प्यादी,राजा (क्वीन)

In reply to by कंजूस

आता कथा स्पर्थेत नाही आणि कथेलाही स्पर्धा नाही ! शेवटी अभिव्यक्ती हा एक विचार आहे, तो जनमानसात पोहोचला की झालं !

+1 संदर्भासह कथा स्पष्ट‌ समजली. एवढंच म्हणतो, नर का क्या बडा? समय बडा बलवान. भिलन‌ लुटी गोपीया, वही अर्जुन वही बाण.

In reply to by भीमराव

हम समयसे पार है, समय तो एक आभास, जज्बा है तो उफलेगा, जुनूं कर देगा मात |