जावे फेरोंच्या देशा - भाग ९ : कोम ओम्बो आणि इदफु

कोमल's picture
कोमल in भटकंती
19 Oct 2019 - 3:25 pm

भाग १ भाग २ भाग ३ भाग ४ भाग ५ भाग ६ भाग ७ भाग ८ भाग ९ भाग १० भाग ११ भाग १२ भाग १३ भाग १४

.anch {
border: none !important;
display: inline-block !important;
padding: 8px 16px !important;
vertical-align: middle !important;
overflow: hidden !important;
text-decoration: none !important;
color: #fff !important;
background-color: #2196F3 !important;
text-align: center !important;
cursor: pointer !important;
white-space: nowrap !important;
margin: 5px;
}
.anch-crr {
border: none !important;
display: inline-block !important;
padding: 8px 16px !important;
vertical-align: middle !important;
overflow: hidden !important;
text-decoration: none !important;
color: #000 !important;
background-color: #ccc !important;
text-align: center !important;
cursor: pointer !important;
white-space: nowrap !important;
margin: 5px;
}

२५ सप्टेंबर २०१८

ठरल्याप्रमाणे सकाळी ७ वाजता गाडी तयार होती. आम्ही नाश्त्याची पाकिटं घेतली आणि निघालो. गाडी चालक अहमद फारच अबोल असल्याने त्याच्या नावाव्यतिरिक्त बाकी काहीच कळू शकलं नाही. 

१० मिनिटात आस्वानच्या बाहेर पडलो आणि आस्वान-कोम ओम्बोच्या रस्त्याला लागलो. डाव्या हाताला निळीशार नील नदी आणि उजव्या हाताला वाळवंट, उघडे बोकडे डोंगर असा अजब नजारा होता. कुठे मध्ये नीलच्या किनारी उसाची शेती पण दिसत होती. छोटी छोटी गावे येत होती आणि मागे टाकली जात होती. दर काही किलोमीटरनंतर चेकपोस्ट यायचं, तिथे गाडीची कागदपत्रं आणि आमचे पासपोर्ट तपासले जायचे, 'हिंदी हिंदी'चा गजर व्हायचा आणि निघतांना टाटा, बाय साठी हात हलवले जायचे. 

सव्वा तासात आम्ही कोम ओम्बोच्या मंदिराच्या आवारात पोहोचलो. नुकतीच एक क्रूझ पण पोहोचली असल्याने तिकिटासाठी थोडी रांग होती. तिकिटे घेऊन आम्ही मंदिराच्या आवारात पोहोचलो. नील नदीने मारलेल्या एका लफ्फेदार वळणावर हे मंदिर उभे आहे. मंदिराच्या नदीकडील भागात डागडुजीचे काम सुरु असल्याने तो भाग बंद होता. आठवड्याभरापूर्वीच या मंदिराच्या आवारात टॉलेमी काळातील एक स्फिन्क्सची मूर्ती सापडल्याने उत्खनन विभागाचे लोक पण जास्त संख्येने होते.

मंदिराबद्दल सांगायच्या आधी थोडी राजवटीची पार्श्वभूमी सांगायला हवी. इ. स. पू. ३००० च्या आधी इजिप्त दोन भागांत विभागलेला होता, अप्पर इजिप्त आणि लोअर इजिप्त, दोन वेगळे देश असल्यासारखा. दोन्ही राज्यांचे वेगळे मुकुट होते, वेगळे फेरो हे भाग चालवायचे आणि त्यांच्यात युद्धे पण होत असत. हळू हळू परकीय आक्रमणांना तोंड देतांना जेव्हा त्यांची त्रेधा व्हायला लागली तेव्हा, दोन्ही सत्तांनी एकत्र राज्य करायचा विचार केला. असे म्हणतात नारमेर या फेरोने अप्पर आणि लोअर इजिप्तचं एकत्रीकरण केलं आणि तिथून पुढे फेरो हा "दोन भागांचा राजा" म्हणवला जाऊ लागला आणि फेरोंनी दोन्ही राज्यांचा एकत्रित मुकुट वापरायला सुरवात केली ज्याला स्चेन्ट (pschent) म्हटले जाऊ लागले. यानंतर सुरवातीच्या सहा राजवटी मिस्रची राजधानी मेम्फिस होती. पण सातव्या राजवटीपासून राज्याच्या कारभारात गोंधळ होऊ लागला. राज्यातील छोटे छोटे भाग बंड करू लागले. असे म्हणतात कि ७वी  राजवट अवघ्या ७० दिवस टिकली आणि त्यातही दरदिवशी नवीन फेरो. ८व्या आणि ९व्या राजवटीमध्ये परिस्थिती थोडी सुधारली पण तेवढ्या वेळात अप्पर इजिप्तमध्ये इंटेफ, त्याचा नातू मोंटूहोटेप यांनी सत्ता मिळवली आणि त्याच्या पासून ११वी राजवट सुरु झाली आणि पुन्हा एकदा संपूर्ण मिस्र एक झाला. राजधानी बनली थिब्स अर्थात सध्याची लक्सॉर. पुढे कित्येक वर्ष पुजाऱ्यांचं राजकारणातील अंमलाने थिब्स मिस्रची राजधानी होती. पुढे रोमन कालखंडात राजधानी अ‍ॅलेक्सझान्ड्रिया येथे हलवली गेली.  

5 Terre

स्चेन्ट (जालावरुन साभार)

 

नवीन राजवटीमध्ये बांधलेल्या कोम ओम्बो येथील मंदिराचा टॉलेमीच्या काळात पुनर्निर्माण करण्यात आला, पुढे रोमन कालखंडात त्यावर रोमन कलेची छटा पण दिली गेली. पण बाकी मंदिरांपेक्षा हे मंदिर वेगळं आहे कारण याचं दुहेरी बांधकाम. मंदिराचा दक्षिणेकडील (अप्पर इजिप्त) भाग हा प्रजननाचा देव सोबेक आणि उत्तरेकडील (लोअर इजिप्त) भाग हा आकाशाचा देव होरस याला समर्पित केला आहे. दोन्ही बाजूचे बांधकाम सिमेट्री मध्ये केलं आहे. प्रवेशद्वाराच्या कमानीवर असलेल्या रिलिफ्सचे रंग अजूनही दिसून येतात. मंदिरातील खांबांवर कमळाच्या पाकळ्यांचे काम केलेले आढळते. खांबांवरील आणि भिंतींवरील रिलीफ मधून फेरो सोबेक, होरस, हॅथोर इत्यादी देवांची पूजा करतांनाचे प्रसंग कोरलेले आहेत. काही ठिकाणी फेरोने अप्पर इजिप्तचा मुकुट घातला आहे, काही ठिकाणी लोअर इजिप्तचा बाकी वेळेस दोन्ही साम्राज्यांचा एकत्रित मुकुट. मंदिरातील आतील बाजूच्या भिंतींवर सुद्धा असेच प्रसंग दिसतात तर बाहेरील भिंतींवर कमळ आणि पपायरसची कलाकारी नील नदीचं अस्तित्व अधोरेखित करतात.

5 Terre

दुहेरी मंदिर

 

5 Terre

कमळाच्या पाकळ्यांची कारागिरी असलेले खांब

 

5 Terre

मंदिराच्या भिंतीवरील एक रिलिफ

 

सोबेक या देवाला मगरीचे शीर असते. त्यामुळे मगरींना पण इजिप्शियन संस्कृती मध्ये फार महत्व. फेरोंसोबत मगरीचंही ममीफिकेशन केलं जात असे. या मंदिराच्या आवारात हजारोंच्या संख्येने मगरीच्या ममीज सापडल्या, त्यांच्या शवपेट्या मंदिराच्या आवारात तर ममीज मंदिराशेजारील म्युसिअम मध्ये ठेवल्या आहेत. मंदिर आटोपून आम्ही म्युझिअमकडे मोर्चा वळवला. इथे काही फार गर्दी नसल्याने आरामात बघता आणि फोटो काढता आले. 

5 Terre

मंदिराच्या आवारातील शवपेट्या

 

5 Terre

ममिफाईड मगरींची एक झलक

 

मंदिरातील आणि म्युझियम मधील अधिक फोटोज्

सकाळी ९ वाजता कोम ओम्बोमधून निघालो आणि गाडीत बसल्यावर नाश्ता उरकून घेतला. दोन तासात इदफु मंदिराच्या आवारात गाडी आली. तिकीटे घेऊन मंदिर पाहायला सुरवात केली. 

हे मंदिरसुद्धा कोम ओम्बो सारखंच टॉलेमीच्या कालखंडात बांधले गेले. मात्र वर्षानुवर्षे वाळूखाली गाडले गेल्याने बाकी मंदिरांसारखी याची फारशी पडझड झाली नाही. होरस आणि हॅथोर यांना समर्पित केलेल्या या मंदिराचे आवार प्रशस्त आहे. भल्या मोठ्या पटांगणातून मंदिराचं भलं मोठं प्रवेशद्वार नजरेस पडतं. त्यावर "फेरोने आपल्या शत्रूला केसांनी पकडलं आहे आणि त्यावर वार करण्याच्या बेतात असून हि भेट तो होरसला देणार आहे" अशा अर्थाचं रिलीफ कोरलं आहे. इथून आत गेल्यावर अतिशय उंच खांबांवर तोललेला मंदिराचा दुसरा हिस्सा येतो. कमळाच्या पाकळ्यांची नक्षी असलेले हे खांब पायथ्याशी इतके रुंद आहेत कि त्याच्याभोवती एक घेर घालायला ५ जण मिळून त्याला कवटाळावं लागेल. इथल्या भिंतींवर आजही काही ठिकाणी आपल्याला तेव्हाचे रंग दिसतात. 

5 Terre

इदफु मंदिर प्रवेशद्वार

 

5 Terre

मोठाले खांब

 

5 Terre

इदफु मंदिर प्रवेशद्वार (मंदिराच्या आतून)

 

भिंतींवर जागोजागी फेरो देवतांना पूजतानांचे रिलिफ्स आहेतच पण त्याहून विशेष २ रंजक कथा इथले काही रिलिफ्स सांगतात. पहिली म्हणजे होरस आणि सेत या दोन देवतांमधील युद्धाची. होरसहा इसिस देवता आणि ओसायरिस देव यांचा मुलगा. सेत त्याचा काका. सेत सत्ता मिळवण्यासाठी ओसायरिसची हत्या करतो आणि याचा बदला होरस त्याला हरवून करतो आणि गादी वर बसतो. या कथेची सुद्धा विविध रूपे आहेत त्यातील हे एक. "Gods of Egypt" या हॉलिवूडपटात हीच कहाणी दाखवली आहे. 

5 Terre

मंदिरातील रिलिफ्स

 

5 Terre

मंदिरातील रिलिफ्स

 

दुसरी कथा होरस आणि हॅथोरची. यांच्या लग्नानंतर दरवर्षी हॅथोर आपल्या देन्देरा च्या मंदिरातून नील नदीमधून प्रवास करून होरसला भेटायला येते असा एक उत्सव त्याकाळी असायचा. हॅथोरच्या बोटी, त्या उत्सवाचे रिलिफ्स बाकी भिंतींवर आहेत. मंदिराच्या अंतर्भागात एक छोटीशी लाकडी बोट पण ठेवली आहे, ज्यात बसून हॅथोरची सोन्याची मूर्ती उत्सवासाठी देन्देरा वरून इदफु पर्यंत येत असे. हि लाकडी बोट खऱ्या बोटीची प्रतिकृती असून, खरी बोट पॅरिसच्या म्युसिअममध्ये ठेवली आहे. 

5 Terre

हॅथोर बोटीतून येत आहे याचे रिलिफ

 

5 Terre

मंदिरातील लाकडी बोट

 

सव्वा बाराच्या आसपास आम्ही इदफु वरून निघालो थेट लक्सॉर गाठायला. मुस्तफाच्या मते इस्नाचे मंदिर फार काही मोठे नव्हते, आणि तिकडे गेलो असतो तर उशीर पण झाला असता म्हणून ते वगळले. गाडी परत डावीकडे नील आणि उजवीकडे डोंगर यांच्या मधून जाऊ लागली. पण या डोंगरांवर काही भगदाडं दिसली. गाडीचालक अहमदला विचारलं तेव्हा कळालं की डोंगरात अजूनही लहान-मोठे ममी चेंबर सापडत आहेत. त्याचंच काम सुरु आहे तिथे. फेरोंच्या नसल्या तरी सरदार, सेनापती वगैरे अजूनही अशा थडग्यांमधून विश्रांती घेत आहेत. अजून किती रहस्य दडली आहेत या भूमीत?

5 Terre

डोंगरातील उत्खननाचे काम

 

ता.क.
१५ ऑक्टोबर २०१९
इजिप्तच्या पुरातत्व विभागाने एक ट्वीट केले ज्यात लक्सॉर जवळ २० पेक्षा जास्त बंद शवपेट्या सुस्थितीत सापडल्या आहेत.

तीन च्या सुमारास हॉटेल वर पोहोचलो. यावेळी पण नीलचा नजारा दिसेल अशी रूम घेतली होती. पण का कुणास ठाऊक आस्वानला नील जितकी आपली वाटली होती इथे तो आपलेपणा नाही जाणवला. लक्सॉर पर्यटकांच्या बाबतीत अगदी प्रोफेशनल आहे, आस्वान सारखा मोकळा ढाकळा स्वभाव नाही इथला. नीलपण तशीच बनली असेल का? 

असो. कडाडून भूक लागली होती आणि जेवण संपलं असल्याने रूम मध्येच एक कॉफी आणि काही कांद्याचे काप मागवले. ५ मिनिटात डिशमध्ये कांदा आला. रूममधल्या सुरीने स्लाइस्ड ओनिअन ला चॉप्ड ओनिअन बनवलं आणि भारतातून नेलेलं गणेश भेळेच पाकीट उघडलं. अहाहा, बाल्कनी मध्ये बसून नीलला न्याहाळत, कॉफी आणि भेळेची मजाच न्यारी वाटली. 

5 Terre

गणेश भेळ मिस्र मध्ये

 

दुसऱ्या दिवशी आम्हाला बलून राईड करायची होती, आणि लक्सॉरची ईस्ट बँक- वेस्ट बँक अशी दिवसभराची टूर पण करायची होती. बलून राईड साठी वईलला आणि टूर साठी इमादला फोन केला आणि दोन्ही गोष्टी बुक करून टाकल्या. संध्याकाळी टांगा घेऊन लक्सॉर गावातून एक चक्कर मारून आलो. दुसऱ्या दिवशी पहाटे ४:३० ला निघायचं होतं त्यामुळे लवकरचं ताणून दिली. 

क्रमश:

.polaroid {
width: 80%;
background-color: white;
box-shadow: 0 4px 8px 0 rgba(0, 0, 0, 0.2), 0 6px 20px 0 rgba(0, 0, 0, 0.19);
margin-bottom: 25px;
}

.container-p {
text-align: center;
}

प्रतिक्रिया

जेम्स वांड's picture

19 Oct 2019 - 5:22 pm | जेम्स वांड

गणेश भेळ इन इजिप्त हा हा हा हा हा

सुधीर कांदळकर's picture

19 Oct 2019 - 6:00 pm | सुधीर कांदळकर

भव्यता, अतिशय स्पष्ट आणि सुंदर प्रचि. विस्तीर्ण मोकळ्या जागेमुळे भव्यता प्रचिबद्ध करण्यात बाधा येत नाही असे दिसते. मुख्य म्हणजे बर्‍यापैकी अभ्यास केलेला दिसतोय. लिखाणही भारदस्त; भव्यतेला बाधा न आणणारे.


पण का कुणास ठाऊक आस्वानला नील जितकी आपली वाटली होती इथे तो आपलेपणा नाही जाणवला.

एक अनोखा अनुभव दिसतोय.
मगरींची गम्मत वाटली. छान आवडले. धन्यवाद.

यशोधरा's picture

19 Oct 2019 - 6:47 pm | यशोधरा

वाचतेय..

जॉनविक्क's picture

19 Oct 2019 - 7:06 pm | जॉनविक्क

पण ही तर राखलेली जागतिक पर्यटन स्थळेच आहेत, पण एकूणच इजिप्त असेच आहे, की भारताप्रमाणेच हायजीन ची बॉंब आहे लोकांमधेही आणि ठीकठिकाणी ही ?

ग्रामीण असो वा शहरी हायजीन बाबत भारत इजिप्तच्या तुलनेत कधीही अग्रेसर आहे.

प्रचेतस's picture

20 Oct 2019 - 9:01 am | प्रचेतस

जबरदस्त भाग. संकन रिलिफ्स जबरदस्त आहेत एकदम. मगरींच्या ममीज भारीच.

जालिम लोशन's picture

20 Oct 2019 - 2:30 pm | जालिम लोशन

नेहमी प्रमाणेच सुरेख.

बोलघेवडा's picture

24 Oct 2019 - 8:40 pm | बोलघेवडा

फेरो रामसेस ची ममी पॅरिस म्युझिअम मध्ये हलवण्यासाठी, 1974 मध्ये त्याच्या ममीचा चक्क पासपोर्ट तयार करण्यात आला होता. म्हणजे तो मेल्यानंतर 3000 वर्षांनी त्याचा पासपोर्ट तयार केला गेला. ऐकावे ते नवलच!!! हा फोटो बघाच.
[url=https://postimg.cc/ppnd19sy][img]https://i.postimg.cc/ppnd19sy/rea.jpg[/...

हो. या बद्दल वाचले होते.
नवलच खरं!

बोलघेवडा's picture

24 Oct 2019 - 8:42 pm | बोलघेवडा

rea

जागेवर जाण्या अगोदर तिथला इतिहास वाचून जायचा का?

माझ्यामते तरी जावे. अगदी सखोल नाही तरी थोडी माहिती असावी.
तेवढाच टूर मध्ये भाव पण वधारतो आपला ;)

प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार.