अर्थक्षेत्र : टेक्निकल अनालिसिस : भाग - ०

ज्ञानव's picture
ज्ञानव in अर्थजगत
24 Jan 2019 - 10:23 am

लहानपणी, म्हणजे अगदी आजूबाजूचे भान आल्यापासून (समजायला लागल्यापासून म्हणण्यात काही हशील नाही कारण अजून फारसे काही समजतच नाही. विशेषतः लोकांचे वागणे.) ते अठरा एकोणीस वर्षाचा होईपर्यंत मी आईबरोबर भाजी आणायला बाजारात जात होतो. मार्केट किंवा बाजार ह्या संज्ञेशी झालेली हि पहिली ओळख होती. पण भाजी कशी घ्यावी हे शिकण्यासाठी मी आईचा हात धरून बाजारात प्रवेश केला नव्हता तर अचानक कधीतरी उसाचा रस पिण्यासाठी आई मला गुर्हाळात घेऊन जात असे. (परमोच्च आनंदाचा क्षण असायचा तो, कारण उसाचा रस आजतागायात माझा विक पॉइंट आहे पण आता आई नाही आणि मधुमेह आहे म्हणून रसाला सुट्टी.) हे बाजारात जाण्यामागचे माझे मूळ कारण होते. आज कार्यशाळेत येणारी मुले पाहतो तेव्हा त्यांना देखील भरपूर आणि झटपट पैसे ह्या उसाच्या रसाचे आकर्षण असल्याचे जाणवते. पण हा उसाचा रस केव्हा मिळेल ते माहित नसायचे त्यामुळे अनेक फेऱ्या वाया जात असत. कारण नेमका केव्हा आई उसाचा रस घेऊन देते ह्याचे गणित मांडता येईल इतके टोकाचे वैचारिक किंवा स्वार्थीपण आले नव्हते. कारण ते गणित मांडता आले असते तर मी नेमक्या दिवशीच आई बरोबर गेलो असतो.
बालमनावर आजूबाजूचे लोक संस्कार जास्त करतात तसे मला माझ्या आजूबाजूच्या लोकांनी जेव्हा पढवले कि अरे आई कोणत्या वारी किंवा किती दिवसांनी रस घेऊन देते ते शोधून काढ म्हणजे तुला कळेलच की आपल्याला उसाचा रस नेमका केव्हा मिळेल. सोप्पे आहे.
इथे अॅनालीसीसशी पहिली ओळख झाली. मग आईचे बिहेविअर अनालैझ करताना दमछाक झाली तरी आज आपल्याला उसाचा रस मिळेलच हे काही खात्रीपुर्वक सांगता येईना आणि मी तो नाद सोडून दिला.
जेव्हा आपण असे अनेक नाद सोडतो, ज्यात आपला स्वार्थ दडलेला असतो, तेव्हा नकळत आपण चिडचिडे होतो माझेही तसेच झाले. मी रोज येतो तरी आई कधीतरीच उसाचा रस पाजते तिला माझी कदर नाही टाईप विचार मनात येऊन मी आईच्याच चुका काढायला सुरुवात केली. पण ह्या लुटूपुटूच्या भांडणातूनच माझ्यापुरता का होईना मार्केट अॅनालिसिसचा जन्म झाला.
लांबच लांब पसरलेल्या भाजी मार्केटला संपूर्ण आणि सविस्तर (म्हणजे भाव विचारतच.) फेरी मारणे आणि मग ठराविक ठिकाणी भाजी घेणे हे आईचे ठरलेले बाजारहाट मॉडेल होते. मी आधी तिथूनच रडायला सुरुवात करत असे.
“सगळ्या भाजी मार्केटला फेरी मारायची काय गरज आहे?
जे तू नंतर घेणार ते इथे मार्केटमध्ये शिरल्या शिरल्याच तर मिळते आहे.” पण कालांतराने कळले कि तिची स्वतःची अशी पद्धत होती चूक कि बरोबर तो भाग वेगळा पण संपूर्ण मार्केटला फेरी मारून आज बाजार कसला आहे आणि कसा आहे ? कधी मटारच भरपूर दिसत असत, कधी टोमेटो भरपूर दिसत असत, कधी गाजर भरपूर आणि काही भाज्या मार्केटमधून गायब झालेल्या असत. तर काही नव्याने पुन्हा आलेल्या दिसत असत ह्यावरून ती मार्केटचा अंदाज घेऊन मग आपल्याला काय हवे आहे ते ठरवत असे. सिझनला स्वस्त म्हणून मिळणारे मटार घेताना रोजच्या जेवणात वाढायला लागणारी भाजी घेणे अपरिहार्य आहे हे लक्षात ठेवतानाच घरातल्या कुठल्या मेम्बरला काय आवडते ? कुणाला काय आवडत नाही ह्याचे भान आणि वडलांनी दिलेले मासिक बजेट ह्या सगळ्याचा ताळमेळ ती कसा घालत होती ? इतक्या सगळ्या आणि इतर अनेक प्रश्नांची उत्तरे हि अॅनालिसिस ह्या विषयाशी नकळत झालेली ओळख होती. पुढे पुढे मी स्वतः भाजी आणायला सुरुवात केली तेव्हा देखील असंख्य चुका करून ठेवत आलो आहे. वडलांना खुश करायला जेव्हा कारली आणली तेव्हा दुसर्या दिवशी सणाला कुणी कारली करते का ? आणि नंतर ती पिवळी पडून खराब होतात ह्यावर लेक्चर तर कधी फ्लॉवर आणला तर तो महागडा असल्याने बजेट बिघडवतो हा सूर लागायचा. थोडेफार कळून देखील मी तिच्यासारखी उत्तम बाजारहाट कधीच करू शकलो नाही. तसे का ह्याचे कारण ही कालांतराने मला कळत गेले आणि आज मी माझ्यापुरती तरी उत्तम बाजारहाट करतो. पण मुद्दा असा कि बाजाराशी लहान वयात नकळत जोडली गेलेली नाळ आणि त्याचा पुढे जाऊन केलेला अॅनालिसिस हि सवय वेगवेगळ्या (फटाक्यांपासून ते केमिकल्स,लॉजिस्टिक,फ्रुट्स, प्लास्टिक, स्टेशनरी, बिल्डींग मटेरियल, मेडीकल ईक्विपमेंट) मार्केट्स मधून सातत्याने भ्रमण केल्याने मला लागली. शेवटी शेअर बाजारात येऊन थांबलो आहे इथून पुढेही कुठेतरी जाईन ईश्वर जाणे. सतत समोर दिसणाऱ्या गोष्टींचा अॅनालिसिस करायची सवय लागण्याचा दुष्परिणाम आपण स्वतःचा अनालिसिस करत नाही असा होत असावा असे मला माझ्या उदाहरणावरून वाटते. कुठलेही मार्केट आपल्या आतून सुरु होते आणि आपल्या आतच संपते आपण ते बाहेर शोधतो असा अध्यात्मिक शोध हि कधीतरी फ्लॅश होतो.
हे सगळे इथे देण्यामागचे कारण टेक्निकल अनालिसिस वर जेव्हा आणि जसे वेळ मिळेल तसे खरडावे असे वाटते आहे. त्याची हि पूर्व पीठिका आहे.
बी एस इ सेन्सेक्स ५०० ते ८०० च्या रेंज मध्ये होता बहुतेक,१९८८ साल, नीटसे आठवत नाही पण हर्षद भाई मार्केट बाहेर फारसे प्रसिद्ध नव्हते तेव्हा कुणीतरी मला मार्केटमध्ये घेऊन गेले ते आज ३८००० ची पातळी मार्केटने गाठली आहे. प्रत्येक लाटेवर स्वार नवी मंडळी इथे आली काही बुडाली, काही तरली आणि काही शिकली उत्तम ट्रेडर झाली. पण जी ट्रेडर झाली ती मंडळी ट्रेडिंगच्या पॅशनने आली होती आणि म्हणूनच टिकली. पण सगळीकडे हात मारणारी आणि दुसऱ्यावर विसंबून ट्रेड करणारी मंडळी काही टिकली नाहीत. ती दोनतीन लाटां नंतर परत परत येत राहिली जात राहिली. पण मग त्यांना इतका तिरस्कार निर्माण झाला मार्केटबद्दल कि विचारायची सोय नाही. आपण आपलाच अनालिसिस केला नाही आणि मार्केटला दोष देत राहिलो तर ते कितपत योग्य आहे हा प्रश्न देखील त्यांना पडू नये ह्याचे आश्चर्य वाटत राहते.
मार्केट अॅनालीसिसचे असंख्य प्रकार असू शकतात पण सामन्यतः शेअर्सच्या किमतीतील चढ उतारांचे विश्लेषण म्हणजे टेक्निकल अॅनालिसिस असा संकुचित विचार केला जातो. मार्केट कायम पुढेच चालते असा अनुभव आहे पण पुढे चालताना ते दोन पावले मागे येते आणि चार पावले पुढे चालते जसे पंढरीच्या वारीत वारकरी हातात टाळ आणि मुखी विठूचा गजर करत दोन पावले पुढे चार पावले मागे चालतात अगदी तसेच. पण नवख्या माणसाने त्यात शिरायचे म्हंटले तर तो अडखळतो, बाहेर फेकला जातो आणि पुन्हा आत शिरून तो हि वारकरी होतो. त्याक्षणी त्याने केलेला त्या लयीचा अभ्यास हा पण टेक्निकल अॅनालिसिसच.
पण आपण शेअर मार्केट बद्दल बोलत असल्याने त्याच्या टेक्निकल अॅनालीसीसकडे वळूया. शेअर मार्केटमध्ये टेक्निकल अॅनालीसीसटेक्न म्हणजे रोजच्या भावात होणाऱ्या चढ उतारांचे केलेले विश्लेषण आणि त्या आधारे उद्याची त्या विशिष्ठ शेअरची किंवा निर्देशांकाची चाल कशी असेल ते शोधण्याचा केलेला प्रयत्न. एक लक्षात घ्या आपण चाल कशी असेल म्हणतो आहोत किंमत नाही. म्हणजे तो वारकरी दोन पावले मागे येतो आहे का चार पावले पुढे सरकतो आहे ते शोधण्याचा केलेला प्रयत्न. टेक्निकल अॅनालीसीस कुणाला सोपा आणि कुणाला कठीणत्तम वाटतो. पण ह्या टेक्निकल अॅनालीसीसचे अनेक भाग विभाग आहेत जे सर्वच कठीण नसतात आणि सगळेच वापरण्याची गरज नसते. आपल्या बुद्धीला झेपेल त्या विभागात मन रमवावे, दोस्ती करावी आणि आपली चाल मार्केटच्या चालीशी जुळवून घ्यावी.

प्रतिक्रिया

नजदीककुमार जवळकर's picture

24 Jan 2019 - 10:49 am | नजदीककुमार जवळकर

सहीच !! लिहत रहा !!

सॅगी's picture

24 Jan 2019 - 10:52 am | सॅगी

पुढील भागाच्या प्रतीक्षेत....

युयुत्सु's picture

24 Jan 2019 - 11:02 am | युयुत्सु

उत्तम!आवडले!

संग्राम's picture

24 Jan 2019 - 11:22 am | संग्राम

समजावून देण्याची पद्धत आवडली ...
पु.भा.प्र.

समीरसूर's picture

24 Jan 2019 - 11:27 am | समीरसूर

लेख उत्तमच लिहिला आहे....

भाजी आणणे हे काम कधीच आवडले नाही. किंबहुना काहीही विकत घेणे ही माझ्या दृष्टीने अत्यंत कंटाळवाणी अ‍ॅक्टिविटी असते. मी माझे कपडेदेखील २-३ वर्षांतून एकदा एकदम घेऊन टाकतो आणि ते ही जेमतेम अर्ध्या तासात. :-) अजूनही भाजी आणायची वेळ पडली तर मी सगळ्यात जवळच्या दुकानात जी दिसेल ती भाजी भरपूर प्रमाणात पटापट घेऊन ताबडतोब बाहेर पडतो. :-) शक्यतो भाजी, किराणा वगैरे मी टाळतोच. कुठल्याही प्रकारच्या अनिवार्य खरेदीसाठी मी सगळ्यात सोपे, कमी वेळ घेणारे पण चांगले असे पर्याय निवडतो. या प्रकारात अर्थातच पैसे जास्त जातात हा तोटा आहे हे मान्यच आहे.

कदाचित म्हणूनच शेअर्समध्ये माझं डोकं अजिबात चालत नाही...आणि त्याचं मला मनापासून दु:ख आहे. म्हणूनच मी त्या वाटेला अजून कधीच गेलेलो नाही. माझा वर दिलेला अप्रोच शेअर्ससाठी कुचकामी आहे. :-) वापरला तर माझं महिन्याभरात दिवाळं निघेल.

पण आपली विषय समजावून सांगण्याची हातोटी मस्त!

ज्ञानव's picture

24 Jan 2019 - 4:00 pm | ज्ञानव

भाग आहे. आईने कधी आग्रह केला नाही आणि मी कधी आळस. एरवी मी पण खरेदीत आळशीच आहे विशेषतः कपडे कारण मला अंघोळीला नेताना कुत्र्याची होते तशी माझी फरफट होते ह्याला कारण लक्षात घ्या उसाचा रस हे मुख्य उद्दिष्ट होते पण नकळत मार्केटशी संबंध येत गेला म्हणजे आपसूकच घडलेली घटना होती ती. आज वळून बघताना पुन्हा एकदा अध्यात्मिक कारण फ्लॅॅश होते की "आपण इथे (जन्माला ह्या अर्थाने) काही आपल्या मर्जीने आलो नाही." त्यामुळे आपसूक घडणाऱ्या घटना आयुष्याला दिशा देणाऱ्या असतात का आणि त्यालाच कलाटणी वगैरे म्हणतात का ? वगैरे ब्ला ब्ला ब्ला बरेच.

प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

दादा कोंडके's picture

24 Jan 2019 - 5:34 pm | दादा कोंडके

तो पींड माझाही नाही. पण हे कळलं हेही नसे थोडके. सगळ्याच गोष्टी आल्याच पाहिजेत असं नव्हे. शेअर्समधल्या (मराठी) लोकांची काही साम्यस्थळे असतात. त्यांचा थोडा अध्यात्मावर आणि ज्योतिषशास्त्रातली बरीच समज असते. माझ्यासारखी लोकं समोर जे आहे ते सगळच समजलं पाहिजे या अट्टाहासापोटी समजून घ्यायचा प्रयत्न करतात. ते जमत नाहीच. मग प्रयत्न सोडून देतात. उलट ही मंडळी, स्वतःची चौकट ठरवतात, तेव्हड्याच माहितीवर स्वतःला हवे असलेले निष्कर्श काढतात. इतर अनेक गोष्टी शेअर्स शिकण्यासाठी पहिल्यांदा त्या 'अनलर्न' करणं खूप आवश्यक आहे.

हा भाग छान. पुढील भागाच्या प्रतिक्षेत.

यशोधरा's picture

24 Jan 2019 - 11:42 am | यशोधरा

मस्त. दुसऱ्या धाग्यावरील ( विनाकारणच) शाब्दिक मारामारी पाहताना अशी लेखमाला कोणी लिहील तर समजून घ्यायला आवडेल, असे मनात आले होते. तुम्ही लिहायला सुरुवात केलीत, हे उत्तम झाले. धन्यवाद.

वाचते आहे. प्रत्येक पुढील भागामध्ये अगोदरच्या भागाचा दुवा जरूर द्यावा, अशी विनंती.

समीरसूर's picture

24 Jan 2019 - 12:24 pm | समीरसूर

आता इथे कशाला दुसर्‍या धाग्याचा उल्लेख? :-) काही संबंध आहे तरी का? आणि शाब्दिक मारामारीचे मूळ कारण काय हे एकदा तपासून बघणे इष्ट ठरेल बहुतेक. असो. हलकेच घ्या. :-) टाईमपास चालू आहे अशाच दृष्टिकोनातून बघा याच्याकडे. वैयक्तिक राग, आकस काहीही नाही. होपफुली, तुमचाही नसेल.

यशोधरा's picture

24 Jan 2019 - 12:31 pm | यशोधरा

नाही, हर एकाचे बोलणे मनावर घ्यायच्या लायकीचे नसते, हे मला माहीत आहे. काळजी नको. :)

समीरसूर's picture

24 Jan 2019 - 1:45 pm | समीरसूर

गुड. प्रत्येकाला हे तसे माहित असतेच म्हणा...तरीही सर्रास वाद होतात; तिरसट, अतार्किक, अव्यावहारिक, कुजकट प्रतिसाद दिले जातात हे एक आश्चर्यच आहे! :-) असो.

खिक! तुमच्याइतके चपखल कोणाला माहित असणार! असो.
चांगल्या धाग्यावर अवांतर पुरे.

खिक! या चांगल्या धाग्यावर अवांतर तुम्हीच सुरु केले. म्हणून तर तुमच्या प्रतिसादावर म्हणालो ना "इथे दुसर्‍या धाग्याचा काय संबंध?" :-) दुसर्‍या धाग्यावरही अवांतर कुणी सुरु केले हे तपासून पाहिल्यास बरे होईल. मग मी म्हणतो ते अधिक चपखल कुणाला माहित असणार हे आपसूकच कळेल. असो. चांगल्या धाग्यावर अवांतर पुरे.

टवाळ कार्टा's picture

24 Jan 2019 - 3:07 pm | टवाळ कार्टा

शाब्दिक मारामारी फक्त ठराविक धाग्यातलीच खुपते असे माझे एक ऍनालिसिस :)
असो, या धाग्यावर हा विषय इथेच थांबवूया....आणखी काही लिहायचे असेल तर त्या धाग्यावर लिहू

हाहाहाहाहा!

समीरसूर's picture

24 Jan 2019 - 3:39 pm | समीरसूर

तिकडे सोयीस्कर मौन आहे...नेहमीप्रमाणे! :-) फिर मजा कैसे आयेगा? ;-) धागा कोई भी हो, सुई चुभाना आना चाहिये...शेवटी हे तत्व महत्वाचे!

सोत्रि's picture

24 Jan 2019 - 1:57 pm | सोत्रि

ज्ञानव,

खुप अपेक्षा ठेवून आहे ह्या मालिकेवर. खंड न पाडता मालिका चालू राहू दे.

- (ट्रेडर) सोकाजी

टवाळ कार्टा's picture

24 Jan 2019 - 3:04 pm | टवाळ कार्टा

अप्रतिम लेखमाला असेल ही

ज्ञानोबाचे पैजार's picture

24 Jan 2019 - 3:24 pm | ज्ञानोबाचे पैजार

रच्याकने :- थोडा छिद्रांन्वेश...
पंढरीच्या वारीत वारकरी हातात टाळ आणि मुखी विठूचा गजर करत दोन पावले पुढे चार पावले मागे चालतात अगदी तसेच
.
.
.
हे
.
.
पंढरीच्या वारीत वारकरी हातात टाळ आणि मुखी विठूचा गजर करत दोन पावले मागे आणि चार पावले पुढे चालतात अगदी तसेच
.
.
.
असे हवे
पुभाप्र

पैजरबुवा,

ज्ञानव's picture

24 Jan 2019 - 3:52 pm | ज्ञानव

ज्ञानोबा माउली.
अक्षम्य चूक झाली मनापसून क्षमस्व.

राघव's picture

24 Jan 2019 - 3:49 pm | राघव

समजून घ्यायला उत्सुक आहे. :-)

ज्ञानव's picture

24 Jan 2019 - 4:08 pm | ज्ञानव

नजदीककुमार जवळकर, सागर गुरव, युयुत्सू, संग्राम, यशोधरा, टका आणि सोत्री सर्वाचे मनःपूर्वक आभार.

सगळे लेख वेळच्या वेळी लिहिण्याचा कसोशीने प्रयत्न करीनच. (इथे शंकराच्या पिंडीवर करंगळी कापून धरली आहे समजा)

टवाळ कार्टा's picture

24 Jan 2019 - 4:28 pm | टवाळ कार्टा

कोणाची करंगळी?

ज्ञानव's picture

24 Jan 2019 - 5:42 pm | ज्ञानव

टवाळाची रे!
तुला खरे काय ते ठाऊक आहेच.

युयुत्सु's picture

24 Jan 2019 - 6:27 pm | युयुत्सु

तुला खरे काय ते ठाऊक आहेच.

पन इण्टेण्डेड? :)

मराठी_माणूस's picture

24 Jan 2019 - 4:46 pm | मराठी_माणूस

छान सुरुवात.

वामन देशमुख's picture

24 Jan 2019 - 5:02 pm | वामन देशमुख

सुरुवात छान केलीय, पुभाप्र.

श्वेता२४'s picture

24 Jan 2019 - 5:14 pm | श्वेता२४

ही खूप दिवसांपासूनची इच्छा होती. मला वाटतं खूपजण ही माहिती मिळवण्याकरीता उत्सुक आहेत. त्यामुळे ही लेखमाला सुरु केल्याबद्दल आभार. पहिलाच भाग आवडला. पु.भा.प्र.

सरनौबत's picture

24 Jan 2019 - 5:51 pm | सरनौबत

किचकट विषय सोप्या भाषेत समजावून देण्याची लेखनशैली अतिशय आवडली. पुलेशु.

लेखमाला लिहायचा उत्तम निर्णय दादा, आम्हाला पण कळेल नव्याने काही गोष्टी.

शेअर मार्केटचा अभ्यास करायचा प्रयत्न केला होता पण नंतर लक्षात आले कि आपल्या स्वभावाला साजेश्या गोष्टी नाहीये उगाच कशाला अट्टहास म्हणून सध्याला माळ्यावर टाकलाय विषय.

हा पण भाजी खरेदीचा अनुभव मात्र लयी आहे देवा आणि अडचणीच्या काळात म्हणजे साधारण १० एक वर्षांपूर्वी ऑफिस वरून आल्यावर संध्याकाळी सिंहगड रोड ला रस्त्यावर पोत टाकून निवांत भाजी सुद्धा विकलीये.

असो तुमच्यामुळे जुने दिवस आठवले जास्ती अवांतर नाही करत.

ज्ञानव's picture

24 Jan 2019 - 6:41 pm | ज्ञानव

मी नाशिक ते मुंबई भाजी सप्लाय दिला होता पण APMC ने हाणून पाडला.

नवीन कायद्याने आता हे शक्य आहे का?

उगा काहितरीच's picture

24 Jan 2019 - 7:16 pm | उगा काहितरीच

वा ! मस्त !! सुरूवात तर छान झाली आहे. आता पुढील भाग पण ठराविक कालावधीने पण सातत्याने येऊ द्या. शेअर मार्केट बद्दल खूप कुतूहल आहे. काठावर उभं राहून बरंच निरीक्षण करून झाल्यावर जेमतेम टाच बुडेल अशा पाण्यात उतरलो आहे. तरीही खूप चाचपडतोय. काम , घर , वगैरे वगैरे सांभाळून तितकासा वेळ देणं शक्य होत नाहीये. खूप अभ्यास पाहिजे राव यासाठी. कितीही केला तरीही कमीच वाटतोय.

रच्याकने , शेअर मार्केटचाच अभ्यासक्रम असलेली पदवी, पदव्युत्तर शिक्षण आहे का ? नसेल तर अशा प्रकारचा पदवी अभ्यासक्रम चालू व्हावा हीच इच्छा !

तुषार काळभोर's picture

25 Jan 2019 - 7:42 am | तुषार काळभोर

एनएसईचा Security Analysis cha एक अकरा महिन्यांचा अभ्यासक्रम आहे.

अनिंद्य's picture

25 Jan 2019 - 11:21 am | अनिंद्य

@ ज्ञानव,

ह्या 'अर्थ'दिंडीचा वारकरी होईन म्हणतो.

पु भा प्र

शाम भागवत's picture

25 Jan 2019 - 12:12 pm | शाम भागवत

छानच झालीय सुरवात.
_/\_

दीपक११७७'s picture

25 Jan 2019 - 1:17 pm | दीपक११७७

एक गृहपाठ :..................ह्या मागचा तुमचा अॅनालीसीस काय ते प्रतिसादात द्यावे

May be पायगुणांमूळे

छान सुरुवात

Chandu's picture

27 Jan 2019 - 7:51 am | Chandu

बरीच वर्षे मार्केट मधे आहे.पण असे लक्षात आले आहे की टेक्निकल बाबीं पेक्षा सेंटीमेंट वर बाजार चालतो.आणी एकदा हे सर्व शिकायला गेलो तर ते पार डोक्यावरून गेलं.त्यामुळे या मालिके बद्दल खूप उत्सुकता आहे.तुम्ही curtain raiser तर खूप छान केलय.पू भा प्र

तुला आहे!
हेच गाणे आठवले.
भागभांडवल बाजाराबाबतचे गैरसमज दूर होतील अशी अपेक्षा.मध्येच जरा मुॅचुअल फंडावर पण चार आडाखे बांधता येईल असे उपयुक्त तोडगे सांगितले तर बरं होईल.
(तोडगे म्हणतोय, हमखास उपाय नव्हे)

मुॅचुअल पंढरीचा वारकरी पांढरपेशा मध्यमवर्गीय मिपाकर नाखु

स्थितप्रज्ञ's picture

29 Jan 2019 - 7:45 am | स्थितप्रज्ञ

पहिल्याच बॉलवर स्टेप आउट करून सिक्सर!