मुलाचा हट्टीपणा

सुरज भोसले's picture
सुरज भोसले in काथ्याकूट
25 Dec 2018 - 4:47 pm
गाभा: 

माझा मुलगा वय ११ वर्षे 6th Standard. शाळेत जायला रोज त्रास देतो, बऱ्याच वेळा शाळेत जातच नाही व अभ्यास करतच नाही. आम्ही विचारून झालं, त्याच्या शाळेच्या Principal Madem नी व क्लास टीचर नी पण विचारल कोणालाही काहीच सांगत नाही.
आत्ता पर्यत तीन मनोसोपचार तज्ञाची treatment घेतली. पण कुणाच्याच treatment चा काहीच परिणाम झाला नाही. तो हुशार आहे पण आभ्यास करण्याचा व लिहिण्याचा कंटाळा. परीक्षेत मार्क कमीच आहेत. आठवी पर्यंत पास होत जाईल, पण पुढे त्याचे नुकसान होईल.
आता त्याला कोणती treatment द्यावी ते समजत नाही.

प्रतिक्रिया

>>बऱ्याच वेळा शाळेत जातच नाही व अभ्यास करतच नाही. >>

शाळा खरोखरच कंटाळवाण्या होत आहेत. घरी राहून खेळतो काय?
" दहावीपर्यंत कसंतरी जा मग तुला हॅाटेल म्यानिजमेंटला पाठवतो तुझ्या आवडीच्या असं काही प्रामिस केल्यावर तो त्याची खरी आवड सांगेल.

Treatment म्हणजे तुम्हला त्यात काही समुपदेशन etc घेतल का? हा काही मानसिक आरोग्याशी निगडित प्रश्न आहे असं वाटत नाही. हा प्रश्न समुपदेशनाने सुटेल असं वाटतं. Child स्पेशिअलिस्ट हि असतात या क्षेत्रात. त्यात मूलं आणि पालक या दोघांच्याठी संवाद घडवून आणला जातो असं ऐकलंय.
बऱ्याचदा मुलांना टिपिकल शाळा आवडत नाहीत. त्यांना शिकवण्याची पद्धत वेगळी असते. दुर्दैवाने आपल्याकडे या बाजूने विचार केला जात नाही त्यामुळे मूल हुशार असूनही त्याला शाळा व अभ्यासात रस वाटत नाही. तुम्ही या बाजूचा विचार केला आहे का?
माझ्या पाहण्यात असा मुलगा आला आहे. माझ्या कॉलेज मधील सरांचा मुलगा सर दुसऱ्या राज्यात शिकवत होते तेथे निसर्गात मुक्त शिक्षण देणारी शाळा होती. त्याला ती आवडत असे. नंतर पुण्यात आल्यावर त्याला एकही टिपिकल शाळा आवडेना. तो दुसरीत तिसरीत असेल. आई देखील प्रोफेसर असल्याने तिला त्याचा प्रॉब्लेम कळला. तिने सरळ त्याला शाळेतून काढून घरी शिकवायला सुरुवात केली. ती म्हणाली मला कि त्याला आम्ही त्याची आधीची होती तशी शाळा मिळाली तरच शाळेत पाठवणार नाहीतर घरी शिकवणार.

विंजिनेर's picture

25 Dec 2018 - 8:22 pm | विंजिनेर

कुठल्या शहरात? पुणे किंवा सोलापूरमध्ये असाल तर ज्ञानप्रबोधिनीचा विचार करा

श्वेता२४'s picture

25 Dec 2018 - 10:36 pm | श्वेता२४

सहमत

मास्टरमाईन्ड's picture

26 Dec 2018 - 12:45 am | मास्टरमाईन्ड

जसे की शाळेच्या बस मध्ये?
किंवा मोठी मुलं दादागिरी किंवा "इतर" काही करतात / करण्याचा प्रयत्न करतात?
तुम्ही किंवा त्याची आई यापैकी जो कोणी त्याच्या जवळचा असेल त्यानं एखाद् दुसरा दिवस संपूर्ण त्याच्या बरोबर घालवून (त्याच्या आवडीच्या गोष्टी जसे की एखादा सिनेमा वगैरे पाहणे / Shopping वगैरे करणे / किंवा त्याला टी व्ही आवडत असेल तर तो संपूर्ण दिवस पाहू देणे) वगैरे करता करता हळूच बोलता बोलता काढायचा प्रयत्न करा.
तुम्ही आणि त्याची आई दोघेही त्याच्याशी नेहमी फक्त अभ्यासाच्या बाबतीतच बोलता का?
त्याला इतर काही छंद वगैरे आहेत का जसे की चित्रकला / ओरिगामी / संगीत (गिटार , तबला वगैरे)
शाळेत / शाळेच्या बसमध्ये "Sexual harassment" शी संबंधीत काही आहे का? याची माहिती काढा.
नक्की कुठल्या प्रसंगापासून असं वागायला लागलाय? की सुरुवातीपासुनच त्याला शाळा आवडत नाही?
माफ करा अती प्रश्न विचारतोय पण लहान मुलांशी संबंधीत problem मी जरा जास्तच सिरियसली घेतो.

समीरसूर's picture

26 Dec 2018 - 10:50 am | समीरसूर

हा पर्याय बरोबर वाटतो...

मित्रांना काही सांगतो का हे ही बघणे फायद्याचे ठरू शकेल. किंवा समुपदेशनदेखील फायद्याचे ठरू शकेल. खूप कुशलतापूर्वक ही मंडळी मुलांच्या मनातले काढून घेतात.

अर्धवटराव's picture

26 Dec 2018 - 8:59 am | अर्धवटराव

मुख्य प्रॉब्लेम हाच आहे कि मुलगा आपलं मन मोकळं करत नाहि. त्याला नक्की काय प्रॉब्लेम आहे हे त्याचं त्यालाच जर कळत नसेल तर समस्या आणखी गंभीर आहे. अगदी प्रेमप्रकरण देखील असु शकतं. कुठलीतरी नावड नडतेय त्याला असं वाटतं. शालेय अभ्यासक्रमात पाठांतर, हस्तलिखाण इ. अत्यंत कंटाळवाणं वाटु शकतं मुलांना. गणितासारखे समजुन घ्यायचे विषय देखील एकदा का मनातुन उतरले कि परत गोडी लागणं अवघड. त्याचा प्रॉब्लेम शाळा, अभ्यास, शाळेतलं वातावरण..काहिही असु शकतं.

एक काम करा. तुम्ही मुलासोबत रोज ३० मिनीट अभ्यास करा. त्याच्या आवडीच्या विषयापासुन सुरुवात करा. परिक्षार्थी दृष्टीकोन अजीबात बाजुला ठेवा. एखादं कॉमीक्स, कार्टुन सिरीयल, सहलीबद्दल डिस्कशन करावं तसं करा. काहि दिवसांनी घोडं कुठे अडतेय नक्की उमगेल.

सुरज भोसले's picture

26 Dec 2018 - 3:53 pm | सुरज भोसले

कंजूस, घरी राहून फक्त TV बघतो, व कंटाळा आला कि मित्रा कडे खेळायला जातो. ५ वी ला त्याला फक्त २०% मार्क आहेत. आठवी पर्यत पास होत जाईल, दहावी पर्यत कसा पोहोचेल. त्याला बर्याच वेळा विचारल पण तो काहीच बोलत नाही.

श्वेता२४, पहिले दोन डॉक्टर त्याच्याशी फार बोलले नाहीत. तिसरे डॉक्टर त्याच्याशी बोलायचे व homeopathy ची औषधे द्यायचे. त्यांनी दिलेल्या सूचनांचा व औषधाचा चार महिन्यात काहीच परिणाम दिसला नाही. तिन्ही डॉक्टर पुण्यातले प्रसिद्ध डॉक्टर आहेत.
मास्टरमाईन्ड,
शाळेत त्याला मुल मारायची असे तो म्हणाला म्हणून त्याच्या PRINCIPAL MADEM ला जाऊन भेटलो. PRINCIPAL MADEM नि त्याला सांगितल कि मुलांनी मारल कि मला सांगायला ये.
त्याची आई त्याच्या जवळची आहे. सुट्टी किंवा इतर वेळी फक्त TV पहातो किंवा mobile वर खेळत आसतो. आम्ही त्याच्याशी बऱ्याच गोष्टी बोलतो. आभ्यास सोडून तो सगळ्या गोष्टी बोलतो. त्याला छंद काही नाहीत.
शाळेत / शाळेच्या बसमध्ये "Sexual harassment" बद्दल पण त्याच्याशी बोललो पण तो काही बोलत नाही. तसे काही नसावे असे आम्हाला वाटते. डॉक्टरांनी पण त्याला हे विचारले होते.
मागच्या वर्षी तो शाळेत जायला त्रास देत नव्हता (अभ्यास करत नव्हताच) या वर्षी शाळेत जायला व आभ्यास करायला ही त्रास देत आहे.

अर्धवटराव

आम्ही दोघही त्याचा आभ्यास घ्यायला बसतो पण पण तो बाहेर खेळायला जातो किंवा झोपतो.

मास्टरमाईन्ड's picture

26 Dec 2018 - 10:42 pm | मास्टरमाईन्ड

असा वागतोय?
म्हणजे अभ्यास नकोसा वगैरे?

शाळेत त्याला मुल मारायची असे तो म्हणाला म्हणून त्याच्या PRINCIPAL MADEM ला जाऊन भेटलो. PRINCIPAL MADEM नि त्याला सांगितल कि मुलांनी मारल कि मला सांगायला ये.

तो म्हणाला म्हणुन मुलं मारतच असतील असं नाही. दुसरं असं काहीही चिडवत असतील जे त्याला आई वडिलांना सांगायला लाज वाटत असेल.
माझा मुलगा पण आता ६वीत आहे. गेल्या वर्षी माझ्या मुलाला बस मधल्या मुलांनी एका मुलीवरून चिडवलं आणि तो ते मला सांगायला घाबरत होता
त्याच्या आई कडून मला हे समजल्यावर मी एक दोन दिवसांनी त्याला विचारलं "आम्ही शाळेत असतानां खूप मस्ती करायचो, कुणालाही काहीही चिडवायचो, त्याबद्दल शिक्षकांचा मार पण खाल्लाय. तुम्ही असं काही करत नाही का? " वगैरे बर्याच प्रयत्नांमधून शेवटी त्यानं मला सांगितलं पण तेही सांगताना त्याला रडायला येत होतं. मी त्याला धीर देण्याचा प्रयत्न केला आणि म्हणालो "रडू नकोस. आम्ही तुझे आई बाबा तुझे Best Friends आहोत. जे चिडवतात त्यांना तू जेवढा रडशील / घाबरशील तेवढा जास्त आनंद होईल. आणि तुला वाईट वाटलं तर आम्हाला पण वाईट वाटेल. जर तू काहीही केलं नसशील तर ते तुला का चिडवतात?" वगैरे वगैरे.
Finally आम्ही त्याला हे पटवून देण्यात (बहुतेक) यशस्वी झालोय की तू आमच्याशी (त्यातल्या त्यात बापाशी) आगावूपणा च्या गोष्टी share करू शकतोस (कारण त्याच्या आईला जास्तीचा आगावूपणा आवडत नाही :) आणि बापाला आगावूपणाशिवाय दुसरं काही जमत नाही)
महत्त्वाचं म्हणजे घरातलं वातावरण जर कुठल्याही कारणानं Tense असेल आणि मूल sensitive असेल तर त्याच्यावर परिणाम होतो. आणि अशा अवस्थेत मूल घाबरून राहतं . मी एक दोन वेळेस त्याच्या बस मधल्या senior मुला मुलींना धमकी पण दिलीय कि त्याला त्रास दिलात तर तुमच्या तीर्थरुपांना contact करण्यात येईल वगैरे.
मी वापरलेले उपाय फक्त माहिती खातर सांगितलेत तुमच्याकडे जी परिस्थिती असेल त्याप्रमाणे तुम्ही तुमचे उपाय define करून वापरणे उत्तम.

कारण माझ्या aggressive उपायाबद्दल माझ्या पत्नीचं फारसं चांगलं मत नव्हतं पण result अपेक्षित आल्यानं फारसा विरोध झाला नाही इतकंच .
आणि महत्त्वाचं म्हणजे मी ७ ते १० दिवसात केलेले उपाय इथं ३ / ४ ओळीत लिहिलेत कारण मला लिहायचा जाम कंटाळा आहे.
तुम्हाला याचा काहीही उपयोग झाला तर मला आनंदच आहे
basic rule मुलाशी / मुलीशी शक्य तेवढी मैत्री ठेवा (आपल्या शिस्त आणि संस्कार यांच्या कल्पनांपलीकडे जाऊन ) म्हणजे त्याला / तिला आवडणारा TV Program त्याच्या / तिच्या सोबत बघा , त्याबद्दल discuss करा आणि मुलाला खात्री वाटू द्या कि तुम्हीच त्याचे / तिचे best friend आहात

विनिता००२'s picture

26 Dec 2018 - 5:05 pm | विनिता००२

त्याला बराच प्रॉब्लेम आहे असे मला वाटतेय. हॅरीसमेंटबद्दल तो असा पटकन बोलणार नाहीच. खूप शांतपणे, पेशन्स ठेवून मनातले काढायला हवे.

प्रयत्न करा, नक्कीच सगळे ठिक होईल :)

राजाभाउ's picture

26 Dec 2018 - 6:29 pm | राजाभाउ

माझ्या एका नातेवाईकाच्या मुलाचाही शाळेत जायला आवडत नव्हते रोज शाळेत जायचे म्हणजे धिगाणा असायचा, त्या मुलाच्या शाळेतूनही त्याच्या बद्दल अभ्यास करत नाही, लक्ष नसते वगैरे तक्रारी होत्या. त्याला त्यांनी अपरंपरागत (unconventional) शाळेत पाठवले तेव्हा पासून तो मुलगा आता छन शाळेत जातो , एकदम खुश आहे तो.माझया मते ४/५ वर्षे झाली ह्या गोष्टीला. पुण्यामध्ये ग्राममंगल शाळा आहे (http://grammangal.org/about-grammangal) तिथं जाऊन या, मुलाला पण घेऊन जा. तिथं एक सर होते (नाव विसरलो मी त्यांचं प्रसाद काहीतरी होतं) ते खूप छान समजावून सांगतात (पालकाना :) )
रच्यकन हि काही शाळेत न जाणाऱ्या मुलांची शाळा असं काही नाहीये हां, त्यांच्या साईट वर माहिती मिळेल

त्याला मुळाक्षरे, १ ते १०० अंक, ए बीसी डी एवढे तरी बेसिक येते का? तोडकं मोडकं तरी वाचतायेते का? तेच येत नसेल तर शाळेत शिकवलेले काहीच कळणार नाही. शिक्षक बरोबर असल्याच मुलांना पकडून हे सांग ते सांग करतात. मगमुलं शाळेत जायलाच नको म्हणतात'. एवढे बेसिक येत नसेल तरपुस्तकं शाळेतली माळ्यावर टाका. शाळा एक वर्षभर तरी निदान बंद करा. अंकलिपी आणा. सर्व काम धाम सोडून (आई करू शकते) शाळेसारखे बेसिक शिकवा. थोडी जरी प्रगती झाली तरी वारेमाप कौतुक करा. मारायचे अजिबात नाही. जेंव्हा तुम्हाला वाटेल ह्याला पहिली दुसरीचे नीट येतंय तेंव्हा मग अजून थोड पुढचे शिकवा. प्रायव्हेट शिक्षक लावा. जेंव्हा आत्मविश्वास वाटेल कि आता ह्याला नित बेसिक येतंय तेंव्हा अजून थोडे अवघड शिकवायचाप्रयत्न करा. त्यात बाकीचे काहीच शिकवायचे नाही. सायन्स, सामाजिक शास्त्र असले काहीच शिकवत बसू नका तूर्तास. नीट लिहिता वाचता आले कि वरच्या गरम मंगल सारख्या शाळेत घाला.

मी माझ्या मुलीच्या बाबतीत म्याथ साठी (ती आठवीत असताना) ४ थी पासूनची पुस्तके घेतली आणि एक एक स्टेप पुढे शिकवत आणले. अगोदर मी एकटीच शिकवायचे, सोडवायचे. ती फक्त बघत बसायची. नंतर नंतर तो सोडवायला लागली मी बघत बसायला लागले.

ज्ञानप्रबोधिनी मला वाटते घेणार नाही, ती शाळा मुलांचा आय क्यू बघूनच बहुतेक शाळेत अडमिशन देते.

मुक्त विहारि's picture

27 Dec 2018 - 4:17 am | मुक्त विहारि

पण एक वैयक्तिक अनुभव, डोंबिवलीला डॉ. अद्वैत पाध्ये, म्हणून एक उत्तम मानसोपचार तज्ञ आहेत. माझ्या मुलाला, तो पहिलीत किंवा दुसरीत असतांना हाच प्रॉब्लेम झाला होता.पण डॉ. अद्वैत पाध्ये, ह्यांनी अरिशय उत्तम मदत केली.एका धाग्यात ह्या गोष्टीचा उल्लेख केला होता. https://www.misalpav.com/node/22109

डोंबिवलीला येणार असाल तर, कधीही सांगा, राहण्याची, खाण्याची सोय माझ्या घरी नक्कीच होईल.

डॉ.च्या भेटीची वेळ ठरवण्यासाठी पत्ता आणि फोन नंबर असलेली लिंक खाली देत आहे...

https://www.justdial.com/Mumbai/Manas-Psychological-Health-Centre-Nursin...

अर्धवटराव's picture

27 Dec 2018 - 6:47 am | अर्धवटराव

याला म्हणतात मिपाचे ऋणानुबंध.

राजाभाउ's picture

27 Dec 2018 - 10:00 am | राजाभाउ

खरच !!!

श्वेता२४'s picture

27 Dec 2018 - 11:29 am | श्वेता२४

तुम्ही तुमच्या मुलाला दिलेली ट्रीटमेंट ही समुपदेशनापेक्षा औषधोपचाराच्या मार्गाने जाणारी होती. आणि तुमचा प्रश्न हा औषधोपचाराने नव्हे तर समुपदेशनाने सुटणारा प्रश्न आहे. तो शाळेत का जात नाही याची कारणे त्याला बोलता करुनच जाणून घएता येईल पुण्यात डॉ. सीमा दरोडे या क्षेत्रात काम करतात. माझ्या एका नातेवाईकांनी त्यांचे समुपदेशन अनुभवले आहे. पण ही घटना फार वर्षापूर्वी. मिपावर कोणी त्याचा अनुभव घेतला असल्यास सांगावे. तसेच काही मुलांच्या समजून घेण्याच्या पद्धतीत फरक असतो. वर्गात एखादा विषय शिकविण्याची एकच पद्धत असते. तुमच्या मुलाला कदाचित त्या पद्धतीने शिकवलेले कळत नसेल. याबाबतही मार्गदर्शन करणारे लोक किंवा संस्था शिक्षण क्षेत्रात आहेत. पण प्रथम समुपदेशनाने त्याचा नेमका प्रश्न समजून घ्यावा लागेल असेच वाटते.

सुरज भोसले's picture

27 Dec 2018 - 2:44 pm | सुरज भोसले

मास्टरमाईन्ड,
मुल त्याला चिडवावतात (मुलीवरून नाही).
आम्ही त्याला सांगितल कि आमच्या शाळेतली मुल आम्हाला आम्ही शाळेत असताना आम्हालाही चिडवायची, आम्ही हसण्यावारी न्यायचो किंवा आम्हीही त्यांना चिडवायचो. मुलाला आत्ता ज्या डॉक्टरांकडे नेत होतो त्यांनीहि त्याला सांगितल होत कि त्याच्या (मुलाच्या) भोवती कवच आहे असे समज त्यामुळे मुलांनी चिडवललेले शब्द त्यांचे त्यांना परत जातील.

विनिता००२
त्याला बरेच प्रॉब्लेम आहेत पण आम्ही किंवा मनोसोपचार तज्ञ ही त्याच्या मनातून काढू शकले नाही याच दुख आहे. रोजच्या त्याच्या त्रासामुळे आमचा पेशन्स कमी होत चालला आहे.

राजाभाउ
मी नक्कीच त्या शाळेत जाऊन बघेन.

जेडी
तो व्यवस्थित वाचू व लिहू शकतो. पण लिहिण्याचा कंटाळा. ज्ञानप्रबोधिनीची त्याने Admission ची परीक्षा दिली होती पण त्याच्या मित्राने सांगितले कि त्याने पेपर कोराच ठेवला होता, काहीच लिहिले नाही. आत्ता पण शाळेच्या परीक्षेला पेपर मध्ये तो फक्त प्रश्न लिहितो, उत्तर लिहित नाही, उत्तर येत असून पण.

मुक्त विहारि
आम्ही त्या डॉक्टरांशी contact कसा करणार आम्ही पुण्यात राहतो. हे खरतर सांगायला नको वाटतंय कि मुलाला tritment देणारे तिन्ही डॉक्टरांचे पत्ते मीच बघितले, हे मी काही फार मोठ काम केल नाही, आमच्या मुलाचं बर व्हाव हीच इच्छा होती. आत्ता पर्यंत ७०,००० रुपये खर्च झाले. प्रत्येक वेळी माझ्या मिसेस ची पैश्यावरुन कटकट. तीन डॉक्टरांच्या tritment चा एवढा खर्च झाला तरी तो सुधारे पर्यंत पैसे खर्च करावेच लागणार त्यामुळे पुढ काय करायचं ते समजत नाही

श्वेता२४
पहिल्या दोन डॉक्टरांनी फक्त समुपदेशनच केले, औषधे दिली नाहीत. तिसऱ्या डॉक्टरांनी समुपदेशन व औषधे अशी tritment दिली.

रोजच्या त्याच्या त्रासामुळे आमचा पेशन्स कमी होत चालला आहे.

प्रत्येक वेळी माझ्या मिसेस ची पैश्यावरुन कटकट.

जी कांही लाईन ऑफ ट्रीटमेंट सुरू आहे / यापूर्वी सुरू होती यावर तुमचे दोघांचे एकमत आहे ना..?

....यावर तुमचे दोघांचे एकमत आहे ना..?

हे खूपच महत्वाचे....

सुरुवातीला डॉ.पाध्ये, ह्यांच्याकडे जायला, आमच्या माता-पित्यांचा कडाडून विरोध होता, तर बायको साशंक होती.पण मग "डॉन मधल्या डायलॉगला अनुसरून....चलो ये भी काम कर के, देख लेते है..." असे म्हणून ती पण आली...महिन्या- दोन महिन्यातच मुलाच्या वागण्यातील फरक ओळखून, आजकाल ती माझ्या प्रत्येक निर्णयाला पाठिंबाच देते...

असो,

नवरा-बायकोत, मतभेद असतील तर, मुलांच्या संगोपनांत अडथळेच जास्त.असे निरिक्षण....

अहो, फोन नंबर दिला आहे की...

तुम्ही फक्त त्यांच्या आणि तुमच्या भेटीची वेळ ठरवा.

बाकी, तुमच्या रहाण्याची-जेवणाची-तुम्हाला डॉ.कडे घेवून जाण्याची व्यवस्था आमच्याकडे.आई-वडील एकटेच असतात.त्यामुळे तुमची अडचण होणार नाही.

========

"आत्ता पर्यंत ७०,००० रुपये खर्च झाले. प्रत्येक वेळी माझ्या मिसेस ची पैश्यावरुन कटकट. तीन डॉक्टरांच्या treatment चा एवढा खर्च झाला. तरी तो सुधारे पर्यंत पैसे खर्च करावेच लागणार. त्यामुळे पुढ काय करायचं? ते समजत नाही."

जे तुम्हाला आणि मला समजत नाही ते डॉ.ना नक्कीच समजते.

आणि

इथे पैशाचा प्रश्र्न शक्यतो आणू नका.मनातील मळभ जितक्या लवकर जाईल तितके उत्तम.....कारण एका ठराविक मर्यादे पलिकडे हा "मळभाचा आजार" गेला की मग रोग बरा होणे कठीण जात असावे....

=======
जाता-जाता, डॉ.पाध्ये माझे बाल-मित्र जरूर आहेत, पण त्यांचे आणि माझे आर्थिक संबंध नाहीत.माझ्या मुलाच्या भयगंडाला, त्यांनी दूर केले इतपतच त्यांचा आणि माझा व्यावहारिक संबंध.

सस्नेह's picture

27 Dec 2018 - 4:30 pm | सस्नेह

सध्या वय वर्षे ६ ते १६ मधील ६०-७० टक्के मुलांमध्ये काही ना काही मानसिक समस्या दिसताहेत. आजूबाजूला सहज पहिले तरी अशी ५-१० मुले सापडतात. आईवडिलांना या समस्या सोडवणे बिकट होऊ लागले आहे. याची कारणे माझ्या मते
१. एकच मूल असल्याने भावंडांची उणीव. त्यामुळे सख्ख्या समवयस्काशी संवाद होऊ शकत नाही.
२. त्रिकोणी कुटुंब. टाईट शेड्युलमुळे नातेवाईकांकडे किंवा नातेवाईकांचे आपल्याकडे येणे-जाणे शक्य होत नाही. परिणामी मुलांना स्वत:शी सूर जुळणारी कौटुंबिक व्यक्ती भावनिक आधारासाठी मिळत नाही. उदा. आजी, आजोबा, मावसा, मावशी इ.
३. सामाजिक अ‍ॅक्टिव्हिटि मध्ये सहभाग जवळजवळ शून्य. उत्सव समारंभ हे पूर्वी भेटीगाठी आणि मनमोकळ्या बोलण्यासाठी इउत्तम संधी असत. आता सेल्फी आणि हाय-हेलो एवढेच त्याचे स्वरूप राहिले आहे.
४. अभ्यास आणि जेवण-खाणे खेळणे सोडून इतर काही कला-छंद, भटकणे निरीक्षण इ. साठी मुलांपाशी वेळच राहिला नाही.
या सगळ्यातून मुलांच्या विश्वाला अनेकविध परिमाणे मिळतात आणि व्यक्तिमत्वाला हरहुन्नरी पैलू लाभतात, ज्यामुळे मानसिक आरोग्य आणि खंबीर मानसिक बैठक होण्यास मदत होते. याच्या सहाय्याने मुळे ताण-तणावांना तोंड देण्यास शिकतात. स्वत:चा मार्ग स्वत: शोधण्यास शिकतात. ताण-तणाव जिथल्या तिथे सोडून आनंदी कसे राहावे हे शिकतात. छोट्या छोट्या गोष्टीतील आनंद घेण्यास शिकतात.
माझाही एकच मुलगा आहे. त्याची नाळ नातेवाईकांशी जुळून राहावी, त्याच्या भावविश्वाला अनेक परिमाणे, अनेक आधार असावेत, अनेक जवळच्या व्यक्तींशी संवाद होऊन त्यातून त्याची मानसिक बैठक घट्ट व्हावी म्हणून मी शहरात न जाता छोट्या गावात राहिले. अर्थात बदलीच्या नोकरीमुळे ते शक्य झाले.
नातेवाईकांकडे येणे-जाणे ठेवले. मतभेद होते तिथेही संबंध अगदीच न तोडता औपचारिक का होईना गोडीने व्यवहारापुरते संबंध ठेवले. त्याचा फायदा माझ्या मुलाला नक्कीच झाला. मानसिक समस्या उद्भवल्या, नाही असे नाही. पण एखाद-दुसऱ्या संवादी सत्रातून त्या लगेच क्लिअर झाल्या. मुख्य म्हणजे माझ्या आर्थिक, सामाजिक आणि कौटुंबिक मर्यादा यांची मी त्याला वेळोवेळी सौम्य शब्दातून जाणीव करून देत गेले. त्यामुळे हट्टीपणा जवळजवळ नाहीच. एकदाच तो दहावीत असताना त्याला २ लाख फी असलेल्या अ‍ॅकॅडमीत जायचे होते. तेव्हा मी म्हटले की दहावीत ७५ टक्केपेक्षा जास्त मिळाले तर आपण तिथे अ‍ॅडमिशन घेऊ, नाहीतर इतर मुळे फास्ट आणि तू स्लो असे होईल. तेव्हा त्याने ७६ टक्के गुण मिळवून माझा शब्द राखला.
आज तो वीस वर्षाचा आहे आणि त्याच्या व माझ्यामध्ये उत्तम सुसंवाद आहे. प्रसंगी आम्ही एकमेकांना सॉरी म्हणण्यात कमीपणा समजत नाही.
धागालेखकाच्या समस्येवर समुपदेशन तर आहेच, शिवाय मला वाटते एखाद्या सख्ख्या नातेवाईकांकडे (आत्या, मावशी, आजी) मुलाला एखादे वर्ष शाळेसाठी ठेवणे शक्य असल्यास तसे करावे. वातावरण बदलही होईल आणि तणाव निरसनही.

मुक्त विहारि's picture

27 Dec 2018 - 5:51 pm | मुक्त विहारि

प्रत्येक वाक्याशी सहमत...

विनिता००२'s picture

27 Dec 2018 - 5:32 pm | विनिता००२

मला वाटते एखाद्या सख्ख्या नातेवाईकांकडे (आत्या, मावशी, आजी) मुलाला एखादे वर्ष शाळेसाठी ठेवणे शक्य असल्यास तसे करावे. वातावरण बदलही होईल आणि तणाव निरसनही. >> सहमत :)

बऱ्याच वेळा शाळेत जातच नाही व अभ्यास करतच नाही. 

शाळेत ज्या दिवशी जायचे नाकारतो, त्या दिवशी तुम्ही किंवा तुमची पत्नी काय करता?

मालविका's picture

27 Dec 2018 - 8:17 pm | मालविका

धाग्यावर लक्ष ठेवून आहे. खूप चांगली चांगली मते वाचायला मिळत आहेत . मलाही पुढे मागे उपयोगी होतील

आपण मुलाला नीट निरखून बघा .. खास करून सुट्टीच्या दिवशी तो काय काय बघतो दूरदर्शनवर ते .. जर तो शिंच्यान किंवा अल्ट्रा बी सारखे बघत असेल तर कदाचित हा बिघाड होऊ शकतो .. शिंच्यान हि अशी मालिका आहे कि त्यापात्रात मुले कधीकधी अडकून पडतात आणि त्याप्रमाणे वागू लागतात . माझ्या घरीही हाच थोडा फार प्रकार आहे. पण शाळेत जात नाही असे काही नाही . शाळेत जातात पण फक्त शरीराने , माझी बायको ते शाळेतून आल्यावर , इतरांच्या आयांकडून शाळेत काय काय शिकवले ते फोनवरून गोळा करत असते .
मला दुसरे कार्यक्रम बघण्याचा हक्कच नाही त्यामुळे मला दूरदर्शनवर शिंच्यान किंवा अल्ट्रा बी असे कार्यक्रम बघावे लागतात . ते बघून बघून आता तोंडपाठ झाले आहेत . आणि मुलेही त्यांच्याप्रमाणेच वागतात घरी . कधीकधी शिंच्यांन मुळेच आयडिया मिळते आणि त्याप्रमाणे निर्णय घेतो .

मास्टरमाईन्ड's picture

27 Dec 2018 - 9:04 pm | मास्टरमाईन्ड

शिंच्यान किंवा अल्ट्रा बी

भंगार कार्यक्रम

सुबोध खरे's picture

28 Dec 2018 - 10:06 am | सुबोध खरे

शिन चॅन हि मालिका केवळ "कार्टून" आहे म्हणून भारतात "मुलांना" दाखवली जाते. ती मुळात व्यंगात्मक मालिका जपानी भाषेत प्रौढांसाठी आहे असे माझ्या पुतणी ने सांगितले ( जी जपानी भाषेची उच्च पातळी शिकली आहे).
त्यात असणारी मुले जितकी आगाऊपणाने बोलतात तशी आपली मुले बोलली तर त्यांचे कौतुक करण्या ऐवजी कानाखाली आवाज काढायला पाहीजे अशी स्थिती आहे. ( मी ती मालिका फारशी पाहीलेली नाही तेंव्हा माझे मत एकांगी असू शकते)

घरी कुणीच टीव्ही बघु नका. प्रोब्लेम जास्त व्हायच्या आधी टीव्ही विकुन टाका. ईंटरनेटही फक्त मोठ्या माणसांनी कामापुरते वापरा. प्रचंड वेळ वाचेल. पैसाही वाचेल. मनोरंजनासाठी घरघुती कींवा मैदानी खेळ खेळा. वाचलेल्या पैशांतुन चांगली पुस्तके आणुन वाचा. हळुहळु गोडी लागेल.

(फुकटचा सल्ला, पटला तर वापरा, नाहीतर दुर्लक्ष करा)

मुक्त विहारि's picture

28 Dec 2018 - 9:57 am | मुक्त विहारि

प्रचंड सहमत....

पण जर बघायचाच असेल तर, पाकशास्त्र शिकवणारे किंवा नॅशनल जियोग्राफी किंवा डिस्कव्हरी , हा उत्तम पर्याय आहे.

कुमार वयापर्यंत, एकदा का मुलांना काय वाईट आणि काय चांगले हे समजले की, पुढे मुलांची मानसिक वाढ खूपच चांगली होते...हा स्वानुभव आहे....शालेय शिक्षणाला मी कधीच महत्व दिले नाही.पाण्यात पडलेला बेडूक आणि शाळेत जाणारी मुले सहज लिहायला-वाचायला शिकतात...आणि एकदा का वाचन जमले की, त्यांचे ते शिक्षण घेऊ शकतात....

स्वशिक्षणच हवे....असे माझे मत.

नेत्रेश's picture

28 Dec 2018 - 2:49 am | नेत्रेश

मुलगा शाळेत न जाता घरी केवळ बसुन कींवा झोपुन रहाण्याची शक्यता कमी वाटते म्हणुन विचारतो, मुलगा घरी बसुन काय करतो? त्याला शाळेपेक्षा जास्त ईंटरेस्टींग पर्याय घरी आहेत का? जसे की टीव्ही, पीसी, व्हीडीओ गेम्स, ईंटरनेट, मोबाईल, टॅबलेट, खेळणी, ईत्यादी? कींवा ईतर काही - जसेकी काही व्यसन? (मुलगा ११ वर्षांचा आहे हे माहीत आहे, पण या वयात मुले चोरुन व्यसने करु शकतात). ज्या दीवशी शाळेत जात नाही त्या दीवशी, संपुर्ण दीवस हे सर्व ईंटरेस्टींग पर्याय बंद करुन पाहीले का?

कीतपत परीणाम होईल हे माहीत नाही, पण बाहेरचे एकुणएक सर्व खाणे बंद करुन केवळ घरी बनवलेले साधे सात्विक जेवण व नाष्टा काही महीने घरातील सर्वांनी करावे. सुरवातीला जड जाउ शकते, पण कोणतेही नुकसान नक्कीच होणार नाही. झाला तर चांगलाच परीणाम होईल.

सुरज भोसले's picture

28 Dec 2018 - 3:30 pm | सुरज भोसले

मोदक,
जी लाईन ऑफ ट्रीटमेंट चालू होती ते तिन्ही डॉक्टर मीच बघितले, मिसेस ची प्रत्येक वेळी हीच कटकट याचा काहीही उपयोग होणार नाही.

मुक्त विहारि
फोन नंबर चा प्रश्न नाही. तुम्ही राहण्याची पण सोय करणार आहातच पण डॉक्टरांची फी च्या वेळी कटकट होणार

स्नेहांकिता,
बर्याचश्या गोष्टी आम्हाला लागू पडतात. एकुलता एक असल्यामुळे लाड खूप केले त्याचा आत्ता त्रास होत आहे.

विनिता००२
त्याला त्याच्या मावशी कडे ठेवणार होतो पण त्यांच्या घरातली परिस्थिती चांगली नाही.

यशोधरा,
तो रोजच शाळेत जायला तयार नसतो. रोज त्याच्या शाळेत न जाण्यामुळे घरात सकाळी ६.०० वाजता कटकट चालू असते. घरी कोणी नसत व आम्ही पाठवतो म्हणून तो शाळेत जातो. शाळेतून त्याच्या आजी कडे जातो. शाळेत जाऊन तो नुसताच बसतो. वह्या कोऱ्याच असतात. सकाळी मी त्याच शाळेच दप्तर भरून देतो ते दुसऱ्या दिवशीही तसच असत. आम्ही काही विचरल तरी त्याच्याकडे काही उत्तर नसत. त्याचे क्लास teacher म्हणाले तो वर्गात असतो पण त्याच लक्ष दुसऱ्या ठिकाणीच असत.

खिलजि
तो बर्याच वेळा तो Doremon बघतो किंवा You tube वर Victor म्हणून गेम बघत बसतो
नेत्रेश
घरी कुणीच टीव्ही बघु नका किंवा ठराविक वेळेत बघा - हे जर झालं तर कदाचित आमच्या घरचा प्रॉब्लेम कमी होईल. मिसेस तिची हिंदी वेब सिरीज रोज ३ ते ४ तास mobile वर बघते, तिला सगळ्या प्रकारे समजावून सांगितल तरी त्यामुळे मुलगा पण बघतो मिसेस ने सांगितल मुलाच्या Tension मुळे ती वेब सिरीज बघत बसते.

मुक्त विहारि
त्याला सांगितल कि त्याच्या अभ्यासाच किंवा Discovery you tube किंवा कॉम्पुटर वर बघ, थोडा वेळ तो हे बघतो नंतर गेम खेळण चालू होत.

नेत्रेश
मुलगा शाळेत न जाता घरी जेंव्हा बसतो तेंव्हा TV व कंटाळा आला कि मित्रा कडे खेळायला जातो. आजी कडे असतो तेंव्हा दिवसभर TV बघणे, आजीने कितीही सांगितल तरी TV बघण कमी करत नाही

मुक्त विहारि's picture

28 Dec 2018 - 6:46 pm | मुक्त विहारि

ओके...

नेत्रेश's picture

28 Dec 2018 - 10:29 pm | नेत्रेश

पुढील २ महीने करण्या साठी काही उपाय सचवतो आहे, पटले तर पहा.

सगळ्यात महत्वाचे - तुमचा मुलगा हा केवळ तुमची आणी मिसेसची जबाबदारी आहे, बाकी घरातील कुणाचीही नाही, हे स्वतः व मिसेस मनापासुन समजुन घ्या. त्यासाठी आधी तुम्ही स्वतः १ महीना पुर्ण, व नंतर मिसेस १ महीना पुर्ण, नोकरी कींवा व्यवसायातुन सुट्टी घेउन केवळ मुलासाठी वेळ काढा.

१. घरातील स्क्रीन असलेली प्रत्येक वस्तु (टीव्ही, पीसी, मोबाईल, व्हीडीओ गेम) घराच्या बाहेर काढा.
- टीव्ही विकुन टाका, मित्राकडे ठेवायला द्या, कींवा दान करा. अगदी १ लाख रुपयांचा असला तरी.
- पीसी व लॅपटॉपचा पासवर्ड बदला व तो घरातील कुणालाही सांगु नका. २ महीने बंद ठेवा.
- स्क्रीन असलेला मोबाईल लॉकर मध्ये टाकुन साधा, स्क्रीन नसलेला मोबाईल आणा. (साधारण २००० रुपयांत मीळतो)
- स्क्रीन बंदी ही घरातील सर्वांसाठी आहे, फक्त मुलासाठी नाही. तुम्ही, मिसेस, व घरातील कुणीही कसली ही स्क्रीन पुर्ण २ महीने पहायची नाही. घरी नेहमी येणारे कुणी असतील तर त्यांना स्क्रीन्बंदीची पुर्ण व स्प्ष्ट कल्पना द्या. २ महीने घरी कोणीही पाहुणा व मित्र बोलाउ नका, व तुम्ही स्वतःही जिथे स्क्रीन दीसण्याची शक्यता आहे तीथे कुणाकडे जाउ नका.

२. शाळेनंतर / अथवा शाळेत गेला नाही तर, वा सुट्टीच्या दीवशी रोज ६ ते ८ तास स्वतः वेगवेगळे विषय घरी शीकवा. आधी कुणीतरी सांगितल्या प्रमाणे, मुलाला जेवढे येते, त्या लेवल पासुन सुरवात करुन घरी स्वतः मुलाला शिकवायला सुरवात करा. सुरवातीला दोघांनाही खुप जड जाईल, पण मुलाला समजले पाहीजे की लक्ष देउन शीकण्या शीवाय बाकी काहीही उपाय नाही. शळेत काय शिकवले हे मुलाकडुन रोज वदउन घ्या. १ तास तेच प्रश्न वोचारावे लागले तरी चालतील. पण हळुहळु ३ ते ४ दीवसात मुलाकडुन थोडी थोडी मोठी व डीटेल उत्तरे मिळतील.

३. या २ महीन्यात स्वतः व मुलाला मनोरंजनासाठी केवळ पुस्तकांचे वाचन हा एकच पर्याय ठेवा. मुलगा शाळेत गेला तर त्या वेळात तुम्ही कींवा घरातील कुणी ही वरील नियमांचे अजिबात ऊल्लंघन करु नका. कुणालाही घरी बोलाउ नका अथवा भेटायला जाउ नका. मुलाला त्याच्या मित्राकडे किंवा नातेवाईकांकडे, जीथे स्क्रीन दीसण्याची थोडी तरी शक्यता आहे त्या ठीकाणी जाणे संपुर्ण वर्ज्य करा.

४. या दीवसात मुलाला व घरातील कुणालाही कोणतीही चैनीची वस्तु अथवा सेवा (हॉटेलींग, टुरींग, व्हेकेशन, ईत्यादी) संपुर्ण वर्ज्य ठेवा. रोज, सुट्टीच्या दीवशी ही, घरातील प्रत्यकाने ६ वाजता उठुन तयार व्हायचे. रात्री लवकर झोपायचे. - कारण त्याची सकाळी लवकर घाळा असते, व ही सवय लागणे अत्यंत महत्वाचे आहे.

मुलाला ५ मिनीटांसाठीसुध्दा त्याच्या आजीकडे अथवा बाकी कुणाकडे ही सांभाळायला देउ नका. तुम्ही व मिसेसनी सुट्टी फक्त मुलासाठी काढली आहे, व बाकी कुठलेही काम मुलापेक्षा जास्त महत्वाचे नाहे हे लक्षात ठेवा. या सगळ्याचा उद्येश केवळ मुलावर, व त्याच्या प्रगतीवर पुर्ण लक्ष केंद्रीत करणे ईतकाच आहे. मुलाला सर्वांचे पुर्ण अटेंशन संपुर्ण वेळ मिळाले की मुलाचीही खात्री होईल की आपल्यापेक्षा पालकांसाठी जास्त महत्वाचे काहीही नाही. अगदी त्यांचा नोकरी/धंदा कीवा स्क्रीन टाइम सुद्धा. ही गोष्ट तोंडी सांगुन कधीच पटणार नाही, केवळ आचरणात आणुनच पटवावी लागेल.

तसेच चांगल्या सवई घरातील सर्वांनी अंगी बाणवणे महत्वाचे आहे. या २ महीन्यांत घरातील बाकीच्यांचे स्क्रीनचे व्यसन सुटायला मदत होईल व सर्वांचीच काहीना काही प्रगती होईल.

पटले तर काहीही सबबी (स्वतःला) न सांगता आचरणात आणा. नाही पटले तर सोडुन द्या :)

अर्धवटराव's picture

28 Dec 2018 - 11:48 pm | अर्धवटराव

पण मला उपाय पटले :) . जर इतर कोणि असली समस्या सांगितली तर तुमचा प्रतिसाद त्याला/तिला फॉर्वड करणार :)
धन्यवाद.

मुक्त विहारि's picture

29 Dec 2018 - 10:27 am | मुक्त विहारि

+१

उत्तम पोस्ट. बेस्ट उपाय आहेत.

विनिता००२'s picture

28 Dec 2018 - 3:42 pm | विनिता००२

तुमच्या सर्व पोस्ट वाचल्या. त्यावरुन असे वाटते की तुम्हांला प्रॉब्लेम काय आहे तो माहित आहे. पण त्यावर उपाय काय करावा तेच कळत नाहीये.
मुलावर घरातल्या वातावरणाचा नकारात्मक परीणाम होतो आहे का?

माफ करा पण प्रॉब्लेमचे मूळ शोधून ते नष्ट करावे लागते.

सुरज भोसले's picture

28 Dec 2018 - 4:45 pm | सुरज भोसले

विनिता००२
मुलाचा प्रॉब्लेम म्हणजे शाळेत न जाणं, Tution ला न जाणं, आभ्यास न करण फक्त त्रास देण न TV बघण. सामान्य मुल (फक्त पास होणारी) जितका आभ्यास करतात तेवढाही तो करत नाही तेवढा तरी त्याने करावा आशी अपेक्षा आहे. हट्टी पणा मुलांमध्ये असतोच.

तुम्ही मदत मागताय हे उत्तम करताय, पण मिसेस ना पण समुपदेशनाची गरज आहे का अ से वाटले.
एकूणात लक्षात आलेले प्रोब्लेम:
१. एकुलता एक
२. लाड
३. टीवी
४. मुलांकडून हो णारा त्रास.
५. घ रातली सपोर्ट सि स्टिम.
६. आडनिडे वय
७. शाळेतले पॉसिबल बुलिंग

तुम्ही करत नसाल असे म्हणत नाहिये, पण ह्या परिस्थितीत बा की सगळे बाजूला ठेवून मुलाकडे लक्ष दे ण्याची गरज आहे असे वाटते.
ग्रामंगल उत्तम आहे, माझा अनुभव वैय क्तिक आहे - पण घरातले आणि शाळेतले वातावरण मॅच होत नसे/ घरातून सपोर्ट नसेल तर सेम प्रॉब्लेम (थेरपी नंतर राहिलेला) होत रहाणार. + हा प्रॉब्लेम घरातूनही ओरिजिनेट होतोय का असे वाटले. (प्लीज गैरसमज नको, मी जजमेंटल होत नाहिये.)
पण मुलगा बघत असूनहे आई ४ तास सिरि य ल्स बघते हे मला अलार्मिंग वाट ले.

तसच शाळेतल्या बुलिंग ची भीती बसली आहे का? ते संपले नसल्यास हताश वातत आहे क

तुम्हाला ह्यपरिस्थितेतून चांगल्या प्रकारे बाहेर पडण्याकरता शुभे च्छा!
मायबोलीवर असलेली मितान मिपावर पण आहे का? ती चाईल्ड सायकॉलॉजिस्ट आहे. कम्पॅश नेट आहे.

तुम्ही मदत मागताय हे उत्तम करताय, पण मिसेस ना पण समुपदेशनाची गरज आहे का अ से वाटले.
एकूणात लक्षात आलेले प्रोब्लेम:
१. एकुलता एक
२. लाड
३. टीवी
४. मुलांकडून हो णारा त्रास.
५. घ रातली सपोर्ट सि स्टिम.
६. आडनिडे वय
७. शाळेतले पॉसिबल बुलिंग

तुम्ही करत नसाल असे म्हणत नाहिये, पण ह्या परिस्थितीत बा की सगळे बाजूला ठेवून मुलाकडे लक्ष दे ण्याची गरज आहे असे वाटते.
ग्रामंगल उत्तम आहे, माझा अनुभव वैय क्तिक आहे - पण घरातले आणि शाळेतले वातावरण मॅच होत नसे/ घरातून सपोर्ट नसेल तर सेम प्रॉब्लेम (थेरपी नंतर राहिलेला) होत रहाणार. + हा प्रॉब्लेम घरातूनही ओरिजिनेट होतोय का असे वाटले. (प्लीज गैरसमज नको, मी जजमेंटल होत नाहिये.)
पण मुलगा बघत असूनहे आई ४ तास सिरि य ल्स बघते हे मला अलार्मिंग वाट ले.

तसच शाळेतल्या बुलिंग ची भीती बसली आहे का? ते संपले नसल्यास हताश वातत आहे क

तुम्हाला ह्यपरिस्थितेतून चांगल्या प्रकारे बाहेर पडण्याकरता शुभे च्छा!
मायबोलीवर असलेली मितान मिपावर पण आहे का? ती चाईल्ड सायकॉलॉजिस्ट आहे. कम्पॅश नेट आहे.

मला प्रॉब्लेम कळाला आहे . मी आधीच्या पोस्टमध्ये डोरेमॉनचे नाव टाकायचे राहून गेले होते .. तो डोरेमॉनच हे सर्व करत आहे .. तुम्ही त्याला नीट समजावून सांगा कि डोरेमॉन वगैरे सर्व थोतांड आहे . तुला खरंच डोरेमॉन बनवायचा असेल तर तुला त्यासाठी अभ्यास करावा लागेल भरपूर वाचावं लागेल आणि लिहावंसुद्धा लागेल .. तो नोमिता तसे वागतो कारण त्याच्याकडे डोरेमॉन आहे आणि तो त्याने भरपूर अभ्यास करून मिळवला आहे . तुसुध्दा अभ्यास कर मग तुलापण डोरेमॉन मिळेल आणि मग वाग तू तुला पाहिजे तसा ..

सुरज भोसले's picture

28 Dec 2018 - 5:15 pm | सुरज भोसले

खिलजि
आम्ही हे त्याला बर्याच वेळा समजावून सांगितल कि cartoon खोट असत पण कितीही सांगितल तरी त्याला ते पटत नाही.

श्वेता२४'s picture

28 Dec 2018 - 5:50 pm | श्वेता२४

म्ही मदत मागताय हे उत्तम करताय, पण मिसेस ना पण समुपदेशनाची गरज आहे

माफ करा पण एकंदरीतच तुमच्या घरात टिव्ही, मोबाईल नको तितका जास्त वापरला जातोय असं वाटतं. दिवसातले 3-4 तास वेबसिरीज किंवा मालिका पाहण्यासाठी मिळू शकतात आणि त्याचं मुलाच्या नावावर तिकीट फाडून समर्थन केलं जातंय हे अजिबात पटणार नाहीय. मला वाटतंय एकूणच मुलाला वाढवताना जे पोषक वातावरण लागतं त्याचा काही प्रमाणात का होईना अभाव दिसतोय. उशिरा का होईना पण तुम्हाला याची जाणीव झाली आहे हे उत्तम आहे. पण एकूणच यापुढे संपूर्ण कुटुंबालाच काही नियम व नियंत्रण स्वतासाठी घालून घ्यावे लागतील असं वाटतंय. तुमच्या संपूर्ण कुटुंबालाच समुपदेशनाची गरज आहे व त्यातूनच पुढचा कृती आराखडा आखावा असं सूचवेन.
मी नववीत असल्यापासून घरात टिव्ही बघत नाही. (त्याआधीही घरात केवळ दूरदर्शन वाहिनी असल्यामुळे ठराविक वेळेला ठराविक कार्यक्रम पाहिलेत) त्यावेळी आमच्या गल्लीतले बरेचजण बसून आमच्या घरात टिव्ही पाहत. त्याचा इतका त्रास होई की मी व माझी बहीण लवकर 9 वाजता झोपून रात्री 3 वाजता उठायचो. व अभ्यास करुन 6.30 ला पहाटे पुन्हा झोपायचो व अगदी शिकवणीच्या वेळेआधी अर्धा तास उठून आवरुन पळायचो. त्या त्रासामुळे जेव्हा घर विभक्त झाले तेव्हा अजिबात टिव्ही घ्यायचा नाही असं घरात निक्षून सांगितलं. आजही माझ्या किंवा बहिणीच्या घरी टिव्ही नाहीय .
याचे फायदे -
1) शांत वातावरणामुळे अभ्यासात लक्ष लागायचे
2) घरात एकमेकांशी बोलायला वेळ मिळायचा
3) आताही जो काही थओडाफार वेळ मिळतो तो आम्ही (मी, नवरा, मुलगा)एकमेकांसोबत घालवतो.
4) वाचनाची आवड निर्माण झाली.
5) अगदीच मोकळा वेळ असेल तेव्हा फोनवर मित्र मैत्रिणी व नातेवाईकांना फोन करुन विचारपूस करते.(या निमित्ताने सर्व बंध जपले जातात कारण आताशा कुणाकडे प्रत्यक्ष जाणे जमतेच असे नाही.) मुलालाही फोनवर माझ्या मित्रमैत्रिणी व त्यांच्या मुलांशी बोलायला लावते त्यामुळे नकळत तोदेखील आमच्या ग्रुपसोबत जोडला गेला आहे. असो.
सगळ्यांचे सर्व अनुभव व अभिप्राय लक्षात घेऊन तुम्ही यातून मार्ग काढाल व तुमचा प्रश्न सुटो याकरीता खूप मनापासून शुभेच्छा

११ वर्ष.म्हणजे अजून वय तसं लहानच आहे हो. त्यला प्रेमाने, मायेने सगळं समजावून सांगा. तद्न्यांचे समुपदेशनही सुरू असू द्या. होईल सगळं ठीक..

स्वामी समर्थ..

भोसलेसाहेब, तुम्हाला स्वतःला मुलासोबत किती क्वालिटी वेळ देता येईल ते पहा. त्याला कुठला छंद(टिव्ही, मोबाईल, कम्प्युटर वगळून) आहे ते पहा व त्याच्याबरोबर तुम्ही स्वतः त्या छंदासाठी वेळ द्या. एखाद्या खेळाच्या शिबिराला पाठवलेत तरी चालेल. मित्रांबरोबर खेळण्याची, स्पर्धेची झिंग अनुभवण्याची, महत्वाकांक्षेने झपाटून जाऊन एखादी गोष्ट करण्याची सवय लागण्यासाठी तुम्हाला अ‍ॅक्टिव्ह प्रयत्न करावे लागतील असे वाटते. त्याला शाळेत कुणी त्रास देते का हे पहा असे अनेकांनी सुचवलेच आहे. त्याव्यतिरिक्त मला वाटते, अभ्यास करणे मजेचेदेखिल असू शकते हे त्याला पटवणे फार आवश्यक आहे. शालेय विषयांचे नीट आकलन होत नसल्याने त्याचा शिक्षणातलाच रस गेलाय असे असेल तर थोडे अनौपचारिक पद्धतीचे शिक्षण कुठे मिळते ते पहा. शक्यतो प्रेमाने वागा त्याच्याशी, तुम्हाला त्रास व्हावा असे त्याला वाटत नसावे पण शिकण्यात काही मजा असू शकते हेच त्याला अजून कळले नाहीये.

अपश्चिम's picture

28 Dec 2018 - 7:02 pm | अपश्चिम

ठाण्यात IPH संस्था आहे. डॉ. आनंद नाड़कर्णी यांनी स्थापन केलेली, तिथे याचे निदान होण्यास मदत होईल. http://www.healthymind.org/

प्रमोद देर्देकर's picture

28 Dec 2018 - 7:29 pm | प्रमोद देर्देकर

सुरेश्जी नमस्कार ,
वर सगळ्यांनी वेगवेगळे उपाय सुचवले आहेत त्याच भडीमार एकदम एकाच वेळी मुलावर करू नका . त्याला मारू नका ओरडू नका.
नाही शिकला तर नाही शिकला. त्यात काय वाईट वाटून घेवून नका. कदचित त्यला पुढे काहीतरी वेगळं बनायचं असेल.

जर शक्य असेल तर टीवी पासून लक्ष दूर जाण्यासाठी घरात कुत्र्याचं किंवा मांजरा चे पिलू पाळा . एखादा पक्षी पोपट बुलबुल चिमणी किंवा मासे (fish tank) घेवून बघा.

आणि मलाही वाटतं तुमच्या मिसेसचे चुकत आहे. तुम्हाला सांगताना मुला समोर निगेटिव्ह बोलणं होत नाहीये ना तुमच्यात ते पहा.

बाकी त्यला बरं वाटावं म्हणून खूप साऱ्या शुभेच्छा.

आणि मुलाला बरं वाटलं की केलेले उपाय मिपा वर जरूर सांगा म्हणजे इतरांना उपयोगी पडेल .

सुरज भोसले's picture

29 Dec 2018 - 2:40 pm | सुरज भोसले

नेत्रेश
तुम्ही सांगितलेले उपाय कठीण आहेत, दोन महिन्यासाठी नाही पण एक महिन्यासाठी नक्कीच करून बघेन.

पुंबा
आत्ता पर्यंत वेळ देत होतोच, आता जास्ती वेळ देण्याचा नक्की प्रयत्न करीन. खेळासाठी पण त्याच नाव घातल होत, काही दिवस गेला नंतर मित्राने सांगितले म्हणून जाणं बंद केल.

प्रमोद देर्देकर
शिकला नाही तर तो काय प्रगती करणार, कारण खेळात पण त्याचा काही इंटरेस्ट दिसत नाही.
मिसेसचे नक्कीच चुकत आहे, हे मी तिला सगळ्या पद्धतीनी समजावून सांगितल

नेत्रेश's picture

1 Jan 2019 - 4:27 am | नेत्रेश

उपाय कठीण आहेत हे मान्य आहे, पण त्याचा नक्की उपयोग होईल.
करुन पाहीलेत की प्रगती कळवा.
All the best !

तुम्ही सांगितलेले उपाय कठीण आहेत, दोन महिन्यासाठी नाही पण एक महिन्यासाठी नक्कीच करून बघेन.

for real? मुलगा सुधारणार असेल तर दोन महिने सुद्धा तुम्ही देऊ शकत नाही? जरा odd वाटते आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

1 Jan 2019 - 7:29 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मुलगा सुधारणार असेल तर दोन महिने सुद्धा तुम्ही देऊ शकत नाही? जरा odd वाटते आहे.

मुलासाठी अनेकांनी उपाय सुचवले आहेत सल्ले दिले आहेत काही तरी सकारात्मक फॉलोअप घेऊन उपाययोजना करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अपडेट दिले पाहिजेत. भावनिक होऊन, कळवळा येऊन लोक उपाय सांगतात आणि आपण जमणार नै म्हणता तेव्हा मूळ विषयाबाबत नेमकं आपण गंभीर आहात की नाही असे वेगळे विषय डोक्यात यायला लागतात. क्षमस्व.

-दिलीप बिरुटे

-

अगदी खरे आहे. मुलासाठी दोन महिने सुद्धा एखादा उपाय करून पहायची तयारी नाही, असे कसे? माफ करा पण ही सत्य समस्या आहे ना?

हा मोठा प्रॉब्लेम दिसतोय. माफ करा पण मला असं वाटतं तुमच्या घराला आणि घरातल्या माणसांना कुठलीच शिस्त नाही असे दिसते आहे. मोबाईल आणि टीव्हीमुळे फक्त तुमच्या मुलाचंच नाही तर तुमच्या संपूर्ण कुटुंबाचं प्रचंड नुकसान होतंय. माझं तुम्हाला कळकळीचं सांगणं आहे की मोबाईलवर वाट्टेल तितका वेळ व्हिडीओज बघणं, व्हॉट्सॅपवर वेळ दवडणं, वेबसीरीज बघणं या सगळ्या अतिशय भयानक सवयी आहेत. मेंदूला सुन्न करणार्‍या अशा या सवयी आहेत. शिवाय या सवयींमुळे आपल्याला फायदा शून्य असतो. नुसता वेळ फुकट जातो आणि इतर महत्वाच्या बाबींकडे दुर्लक्ष होतं. मोबाईलवर खूप जास्त वेळ व्हिडीओज पाहिल्याने मेंदू शिणतो आणि त्याची क्षमता कमी होते. सगळ्यांनीच मोबाईलपासून थोडं लांबच राहिलं पाहिजे. त्यापेक्षा वाचन, पायी फिरणे, लोकांना प्रत्यक्ष भेटणे, गप्पा मारणे, नाटके बघणे, सहलींना जाणे, लिखाण करणे, एखादा छंद मनापासून जोपासणे (बागकाम, स्वयंपाक, सुतारकाम, चित्रकला, वाद्य, गायन, वगैरे) अशा मार्गांनी कौटुंबिक आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते. तुम्ही कुटुंबासहित मासिक सहली आयोजित करा. दर वीकेंडला सहलीला जायचं. मुलाला जरा थकू द्या. त्याला निसर्गाचा आनंद चाखू द्या. त्याला सहल आयोजनात सहभागी करून घ्या. नातेवाईकांकडे जा. त्यांना घरी बोलवा. जिथे भपका आहे (मॉल, महागडी हॉटेल्स) अशा ठिकाणी जाणं टाळा. तुमच्या आयुष्यातील योजनांबद्दल तुमच्या मुलाशी बोला. त्याला एक जबाबदार व्यक्ती म्हणून ट्रीट करा. अकरा वर्षाचा मुलगा खूप काही नवीन आयडियाज देऊ शकतो. त्याला घरातल्या लहान-मोठ्या निर्णयांमध्ये सहभागी करून घ्या. आपल्या मताला घरात किंमत आहे हे त्याला कळू द्या. घरात खेळीमेळीचे वातावरण ठेवा. मोबाईलला घरावर वर्चस्व गाजवू देऊ नका. नवीन चित्रपट, पुस्तक, नाटक, बातमी, शोध, वगैरे बद्दल मुलाशी चर्चा करा. अनेक मुद्द्यांवर मुलाशी चर्चा करता येतात. पैसे, गुंतवणूक, राजकारण, इतिहास, भूगोल, अनुभव असे बरेच विषय तुम्ही मुलासोबत बोलतांना घेऊ शकता. हे सगळं व्यवस्थितपणे करण्यासाठी तुम्हाला दोघांना तुमच्या सवयी बदलाव्या लागतील. मोबाईलचे व्यसन बंद करावे लागेल. रोजचा पेपर वाचावा लागेल. पुस्तकं वाचावी लागतील. नवीन अनुभव घ्यावे लागतील. अभ्यास करावा लागेल. घरात खूप मोकळं, खेळकर वातावरण ठेवावं लागेल. मुलाच्या भविष्यासाठी हे सगळं करणं म्हणजे फार नाही. हे नक्की करून बघा. समुपदेशक मदत करेल पण पहिली आणि सगळ्यात भरीव अशी मदत आई-वडील म्हणून तुम्हालाच करावी लागणार आहे. ती मदत बाहेरची कुठलीच व्यक्ती करू शकणार नाही. मुलगा तुमचा आहे. त्याचं आयुष्य वाया जायला नको ही काळजी जितकी तुम्हाला असणार तितकी ती इतर कुणालाच नसणार. शुभेच्छा! मला खात्री आहे सगळं नीटच होईल.

मुक्त विहारि's picture

1 Jan 2019 - 8:45 pm | मुक्त विहारि

मस्त प्रतिसाद

चित्रगुप्त's picture

1 Jan 2019 - 7:29 pm | चित्रगुप्त

@सूरज भोसले, माझ्या माहितीत एक अगदी अशीच केस आहे, त्याला पुण्यातल्या कोणत्यातरी वेगळ्या प्रकारच्या शाळेत घातल्यापासून तो खुष आहे, आणि प्रगती करतो आहे. तुम्ही पुण्यात असाल तर त्या शाळेचे नाव विचारून कळवू शकतो.
समीरसूर यांचा प्रतिसाद मननीय वाटला.

चित्रगुप्त's picture

1 Jan 2019 - 8:36 pm | चित्रगुप्त

मी माझा वरील प्रतिसाद लिहीला, तेंव्हा फक्त मूळ धागा आणि शेवटला समीरसूर यांचा प्रतिसाद वाचला होता. आता सर्व प्रतिसाद वाचले. सर्वांनीच अतिशय कळकळीने, आपुलकीने उत्तमोत्तम, मननीय सूचना केलेल्या आहेत. धागाकर्त्याने आणि त्यांच्या पत्नीने मनावर घेऊन त्या सर्व सूचना काटेकोरपणे पाळणे अगत्याचे आहे.
बाकी कमीअधिक प्रमाणात अनेक कुटुंबात या प्रकारच्या समस्यांचे प्रमाण वाढत चालले आहे ही बाब चिंतनीय आहे.

गामा पैलवान's picture

2 Jan 2019 - 11:51 pm | गामा पैलवान

सुरज भोसले,

समस्या दिसते एकीकडे, तर प्रत्यक्षात असते दुसरीकडे आणि उपाय करायचा असतो तो तिसरीकडे.

मला वाटतं की तुम्ही पतिपत्नींना समुपदेशनाची अधिक निकड आहे. हा निष्कर्ष कशावरनं काढला ते सांगतो.

तुमच्या मुलाला प्रश्नाचं उत्तर येत असतं, पण तो लिहित नाही. उलट उत्तराच्या जागी फक्त प्रश्नच लिहून येतो. याचा अर्थ त्याला इच्छा व/वा आत्मविश्वास नाही. मुलाला या क्षणी या दोन्हींपैकी काहीही देण्यास तुम्ही पतिपत्नी दुर्दैवाने असमर्थ आहात. किंवा मग कार्टूनमध्ये दाखवतात तशी काहीतरी जादू होऊन उत्तर आपोआप उमटेल अशी त्याची अपेक्षा आहे. ही अपेक्षा निरर्थक आहे. कार्टून खोटं आहे हे तुम्ही त्यास अनेकदा सांगूनही तो ऐकंत नाही. कारण की त्याला कार्टूनमध्ये एक प्रकारचा मानसिक आसरा लाभतो. इथे आसरा म्हणजे इंग्रजीत ज्याला refuge (https://www.dictionary.com/browse/refuge) म्हणतात तो. असा आसरा त्याचे आईबाप असायला हवा, कार्टून नव्हे.

त्यामुळे तुम्हांस अगोदर आपसांतले संबंध सुरळीत करावे लागतील. त्याकरिता एखादा वैवाहिक समुपदेशक प्रथम गाठा. त्याला तुमच्या मुलाच्या समस्येची पूर्ण कल्पना द्या. तसंच तुम्ही समुपदेशन कशासाठी घेताय याची तालिका (फॉर्म) भरून घेतली जाईल तिथेही मुलाच्या समस्येचा मुद्दा स्पष्टपणे लिहा. बऱ्याचदा संपूर्ण कुटुंबासाठी सामायिक समुपदेशक असतो. तसा कोणी भेटला तर उत्तमंच.

बघा पटतंय का. शुभास्ते पन्थान: सन्तु.

आ.न.,
-गा.पै.

लई भारी's picture

4 Jan 2019 - 4:33 pm | लई भारी

सगळ्यांनी म्हटल्याप्रमाणे डॉक्टर पेक्षा समुपदेशनाची गरज आहे. डॉक्टर खूप वेळ देऊ शकत नाहीत माझ्यामते.
माझ्या ओळखीच्या एक चांगल्या समुपदेशक आहेत ज्या लहान मुलांच्या स्पेशालिस्ट आहेत. हवा असल्यास व्यनि करा, डिटेल देतो. (वाकड मध्ये आहेत)
त्या कुटुंबाचेही समुपदेशन करतील गरज असल्यास. अगदी घरगुती संबंध आहेत, त्यामुळे खात्री देऊ शकतो.

सुरज भोसले's picture

5 Jan 2019 - 5:35 pm | सुरज भोसले

समीरसूर,
तुमचा प्रतिसाद योग्य आहे.
आमच्या घरातल्या लोकांना शिस्त नाही हे बरचस बोरोबर आहे. आमचं एकत्र कुटुंब असत तर घरात शिस्त असती. मिसेस ला सगळ्या पद्धतीने समजावून सांगितल पण तिचा TV किंवा mobile बघण कमी होत नाही. मी फारसा TV किंवा mobile बघत नाही. मी घरातली सगळीच कामे करतो. यात मला काही मोठेपणा वाटत नाही. मी घरातली काम करतो तेंव्हा मिसेस ने मुलाचा अभ्यास घ्यावा एवढीच अपेक्षा.

चित्रगुप्त
आम्ही पुण्यातच राहतो. शाळेच नाव नक्की कळवा.

नेत्रेश's picture

8 Jan 2019 - 8:33 am | नेत्रेश

ईथे बर्‍याचजणांनी बरेच उपाय सुचवले आहेत. पण ते सर्व करण्यासाठी तुम्हा दोघांचेही एकमत असणे आवश्यक आहे.
जर कुणी डॉक्टर कींवा कंसल्टंटने घरातील सर्वांना स्क्रीनटाईम कमी करायला सांगीतला तर कदाचित मिसेसना पटेल.

तुम्हाला व मुलाला शुभेच्छा !

मनिमौ's picture

6 Jan 2019 - 8:51 pm | मनिमौ

तुमचा प्राॅब्लेम आणी तो सोडवण्याची कळकळ दोन्ही पोचले.
मोबाईल वरचे व्हिडिओ है खरेच एक भयानक व्यसन आहे.
माझी मुलगी पण हळुहळु आहारी जात होती. ते वेळीच लक्षात आल्यावर मी आणी नवर्याने दोन्ही मोबाईलमधून यूट्यूब डिलिट केले. तसेच टाटा स्काय पण बंद पडले होते ते दुरूस्त करून घेतले नाही.
आता सकाळी शाळेत जाण्याआधी ती तिला हवा तसा वेळ घालवते ज्यात खाली खेळायला जाणे चित्र काढणे किंवा घरात खेळते.
संध्याकाळी मी किंवा तिचा बाबा घरी आल्यावर तिच्याबरोबर पुन्हा वेळ घालवतो.
जेवताना TV OR MOBILE बघणे घरी अलाऊड नाहीये.
मग ते आई बाबा आजी आजोबा कोणीही असोत.
सुरज जी मुलाबरोबर तुमही दोघांनी PLEASE वेळ घालवा.
त्यात अगदी अभ्यासाचच बोलल पाहिजे हेजरूरी नाही
अगदी घरात काय स्वयंपाक करावा हे सुध्दा विचारल तरी चालेल.
जमत असेल तर दोन चार दिवस तुभ्ही तिघे सहलीला जाऊन या.
तुमची काळजी लौकर दुर व्हावी हीच शुभेच्छा

यशवंत पाटील's picture

7 Jan 2019 - 12:45 pm | यशवंत पाटील

दादा, पोराची काळजी खरी हाये तुमची, पर त्या नादात चावडीवर बायकोवर कामुन टिका करताय राव ?
येक घोळ निसतरता निसतरता दुसराच घोळ तयार करून राहिलात ना दादा.. आवरा. काळजी घ्या हो दादा.

सुरज भोसले's picture

8 Jan 2019 - 1:20 pm | सुरज भोसले

मनिमौ
रविवारी सकाळी किंवा सुट्टी असेल त्यावेळी सकाळी त्याच्या बरोबर खेळायला जातो, आणि इतर वेळेस त्याच्याबरोबर वेळ घालवतो. दिवाळीच्या वेळीच ट्रीप ला जायला जमते कारण इतर वेळी जोडून सुट्टी मिळत नाही.

यशवंत पाटील
चावडीवर बायकोवर टीका करू नये हे मला समजत कि.

शाळेत त्याला मुल मारायची असे तो म्हणाला म्हणून त्याच्या PRINCIPAL MADEM ला जाऊन भेटलो. PRINCIPAL MADEM नि त्याला सांगितल कि मुलांनी मारल कि मला सांगायला ये. --

माझ्या मुलाच्या शाळेत ५वि कि ६वि च्या वर्गात झालेली केस आहे. एक ग्रुप वर्गातल्या एका मुलाला त्रास देत होते. त्याने घरी सांगितल्यावर आणि घरून शाळेत गेल्यावर त्याला "कुकूल बाळ" टाईप कॉमेंट मिळाल्या. हा ग्रुप त्याला मारत नव्हता कारण मारलं कि शिक्षकांना मध्ये पडायला लागतं, पण त्याला एक प्रकारे वाळीत टाकलं. त्या ग्रुप च्या धाकाने इतर मुलं पण त्याच्या बरोबर नीट वागत नव्हती. हा रोज मनातून खंतावत होता, हुशार असून शाळेत जावंस वाटत नव्हतं, नशिबाने पुढच्या वर्षी शाळाच बदलली आणि तो पण बदलला

मानसोपचार, समुपदेशन आणि तुमचं प्रेम, लक्ष त्याला मिळणं गरजेचं आहे. या वयातल्या मुलांना पालकांसमोर रडणं किंवा तक्रार करणं हळू हळू कमीपणाचं वाटायला सुरवात झालेली असती (किंवा होत असते) खासकरून मुलग्यांना. मला तरी वरची गोष्ट फार सिरीयस वाटली. कदाचित कुठल्यातरी खेळाला घालून बघा, इतर मित्र - मैत्रिणी मिळाले कि त्याला बरं वाटेल. वर कुणीतरी म्हटल्याप्रमाणे तुम्ही तिघे ट्रिप ला जा, विकेंड ला मोकळ्यावर फिरायला जा, कदाचित जास्त बरं वाटेल.

सुरज भोसले's picture

11 Jan 2019 - 4:01 pm | सुरज भोसले

वीणा३
शाळेत किंवा SCHOOL VAN मध्ये कोणी त्रास देत का आणि शाळेत जाणे व अभ्यासा बद्दल त्याला बर्याच वेळा सगळ्या पद्धतीनी विचारून झालं, पण तो काही बोलत नाही
त्याला खेळण्याच्या क्लास ला घातले होते, काही दिवस गेला नंतर जाणे बंद केले. सुट्टीच्या दिवशी त्याच्या बरोबर खेळायला जातो, इतर दिवशी त्याची शाळा सकाळी असते त्यामुळे शक्य नसत.

"मिसेस ला सगळ्या पद्धतीने समजावून सांगितल पण तिचा TV किंवा mobile बघण कमी होत नाही."
- TV आणी mobile बंद करणे याला पर्याय नाही. एकदम जमत नसेल तर ट्प्या-टप्याने कमी करण्याचा प्रयत्न करा.
- जसे की मुलगा घरी असताना TV लावायचा नाही. मुलासोबत mobile वर काहीही प्रोग्रम पहायचा नाही, ईत्यादी.
- नंतर केबल बंद करुन केवळ सुट्टीच्या दीवशी सिनेमागृहां मध्ये जाउन सीनेमा पहातचा, ईत्यादी.
- मुलगा लहान असतानाच TV आणी mobile चा अतीवापर आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करा.

TV आणी mobile च्या अतीरेकामुळे खुप कुटुंबांचे अगदी न भरुन येणारे नुकसान झालेले आहे. घरातली चांगली हुशार मुले आईच्या TV सिरीयल्सच्या वेडापाई,अभ्यास सोडुन TV समोर बसुन स्वतःचे नुकसान करुन घेताना पाहीली आहेत. आम्ही त्यांना कीत्येकदा समजाउन सांगुनही काही फरक पडला नाही, व शेवटी मुले १०वी / १२वी नापास झाली. त्यावरुन हे व्यसन कीती वाईट आहे याची मला कल्पना आहे.

सुरज भोसले's picture

1 Jul 2019 - 1:48 pm | सुरज भोसले

मागच्या वर्षीपण मुलाला खूप कमी मार्क मिळाले (२१%). मुलाने व मिसेस ने मोबाईल व T.V. कमी बघावा म्हणून मी बरेच प्रयत्न केले पण ते असफल झाले. एखादा समुपदेशकच दोघांचे मोबाईल व T.V. कमी बघण्याबद्दल व मुलाच्या प्रॉब्लेम बद्दल सांगू शकेल. पुण्यात कोणी समुपदेशक असल्यास कृपया सांगा

जॉनविक्क's picture

3 Jul 2019 - 5:41 pm | जॉनविक्क

हे नाही सोडता येत हे accept करा व पुन्हा इन्ट्रोस्पेक्ट करा की मुलाच्या स्वच्छनदिपणाचे नेमकं रहस्य काय.

सांप्रत स्थितीत त्याची मैत्री कोणत्या प्रकारच्या मुलांशी जास्त असते/जुळते. जर याचे उत्तर सर्वच असेल तर आपल्या मुलाची अवस्था फार एकटेपणाची आहे. त्याला विश्वास कोणावरही नाही म्हणून त्याचे स्वतःचे अस्तित्व जसे आहे तसे मान्य करणारे कोणीही सध्या आजूबाजूला नाही त्याचा हा एकटंपणा तोडायला हवा जो मुख्य प्रॉब्लेम आहे.

तसेच कबीर सिंग प्रमाणे इज ही अ रेबेल विदाऊट अ कॉज ऑर विथ कॉज... हे स्पष्ट झालेच पाहिजे. इफ ही इज अ रिबल विथ कॉज प्रयत्न करा की हे कारण दूर होईल. इफ नॉट घाबरू नका तुमच्या परीने प्रयत्न कौटुंबिक वातावरण खराब न करता चालू ठेवा एक दिवस त्याचा मार्ग तो स्वतः निवडेल फक्त त्याच्या आड येऊ नका आणि चुकीच्या गोष्टीच्या आहारी जाण्याची किंमत समजावा. तुमच्या हातात तेव्हढेच आहे.

सकृतदर्शनी बुलिंग पेक्षा त्याला कनेक्ट होणे जमत नाही असं अल्पमतीला वाटत आहे.

जॉनविक्क's picture

3 Jul 2019 - 5:45 pm | जॉनविक्क

आज पासून सकाळी अंघोळ बंद करा त्याची. फक्त हातपाय धुऊन शाळेत पाठवा. शाळेतून परतल्यावर अंघोळीची सवय लावा. हा प्रयत्न किमान करून पहाच_/\_

वर खूप अनुभवी लोकांनी सल्ले - प्रतिसाद दिले आहेत ... मला लहान मुलांचा काडीचाही अनुभव नाही ... तरी काहीतरी सांगावंसं वाटलं म्हणून सांगत आहे , पटलं तर पाहा नाहीतर सोडून द्या . हे मी वैयक्तिक अनुभवातून सांगत आहे असं समजा ... वर कोणीतरी मुलगा कार्टून मध्ये मानसिक आसरा घेत आहे , असं म्हटलं आहे ... ते जर खरं असेल आणि काहीतरी जादू होऊन सगळे प्रश्न एक दिवस सुटतील अशी आशा खोलवर त्याच्या मनात असेल तर तो ती उघड बोलून दाखवणार नाही ... कारण बोलून दाखवली तर सगळे हसतील किंवा असं काही नसतं हेच पटवण्याचा प्रयत्न करतील हे त्याला माहीत आहे ... मोठी शिकलीसवरलेली माणसंसुद्धा जेव्हा त्यांच्यापुढचे प्रश्न त्यांच्या कपॅसिटी बाहेरचे असतात तेव्हा देवाची भक्ती कोणी ना कोणी सांगितलेले उपाय , तोडगे यांच्या नादाला लागतात ... त्याचा तात्काळ परिणाम दिसो वा न दिसो , कारण त्यात त्यांना एक मानसिक आसरा / आधार मिळत असतो ..... पण ते करत असताना त्यांची व्यवहारिक बुद्धी त्यांना आपला पोटापाण्याचा उद्योग सोडून दिवसाचे 8 - 9 तास देवपूजा करू देत नाही ... मनाला माहीत असतं आपले प्रश्न सोडवायचे तर हातपाय हलवायलाच हवेत , सगळं आपोआप होणार नाही . ही विवेकबुद्धी वर्षानुवर्षाच्या आयुष्याच्या अनुभवातून आलेली असते .

प्रत्येक अकरा - बारा वर्षाच्या मुलाकडे ही विवेकबुद्धी असू नाही , शिवाय लहान वयात कल्पनाशक्ती / मनाची एखाद्या गोष्टीवर श्रद्धा किंवा विश्वास ठेवण्याची क्षमता जबरदस्त असते... जी पुढे वयानुसार कडू गोड अनुभवांनी ठिसूळ होत जाते प्रत्येक माणसातच ... पण ही सध्या ठिसूळ न झालेली , स्ट्रॉंग असलेली विश्वासाची क्षमता आणि त्याला न पेलवणारे प्रश्न यांचं कॉम्बिनेशन झालं असेल तर त्याने एखाद्या काल्पनिक गोष्टीत आधार शोधला तर त्याला दोष देणं बरोबर नाही .

त्याला काल्पनिक जगातून वास्तवाच्या जगात आणण्यासाठी त्याने कार्टूनचा आधार सोडणं गरजेचं आहे ... स्क्रिनचं व्यसन एक वर्षात सुटलेलं नाही असं तुम्ही म्हटलं आहे ... टीव्ही - कार्टून हा जर मुलाचा कोपिंग मेकॅनिजम बनला असेल ( म्हणजे मन त्यात गुंतवून ठेवायचं जेणेकरुन शाळा , अभ्यास , परीक्षा असले टेन्शन देणारे विषय मनाजवळ फिरकणारच नाहीत ) तर तो अचानक पूर्ण बंद करणं मला वैयक्तिकरित्या चुकीचं वाटतं .... त्याचे उलट वाईट परिणाम होतील असं मला वाटतं ... क्षुल्लक कारणावरून मुलांनी भलताच निर्णय घेतल्याच्या दुर्दैवी बातम्या आपण वर्तमानपत्रातून वाचतो आजकाल ... शिवाय तुम्ही म्हटल्याप्रमाणे टीव्ही बंद करण्यासारखी परिस्थिती सध्या नाहीच आहे तुमच्या घरी ...

तेव्हा त्याच्या स्क्रिनच्या आवडीचाच उपयोग करून त्याला हळूहळू कार्टून आणि जादूच्या जगातून बाहेर काढण्याचा प्रयत्न उपयोगी ठरेल . त्याला कार्टून ऐवजी खऱ्या माणसांच्या मालिका - चित्रपट पहायची आवड लावा ... सुरुवातीला चटकन लक्ष आकर्षित करून घेणारे लहान व्हिडीओ दाखवा ... तुम्ही त्याच्याबरोबर बसून बघा , एकट्याने पाहण्यापेक्षा दोघांनी मिळून पाहण्यात खूप आनंद मिळेल त्याला ..... एकट्याला लावून दिलं तर तो बोअर होऊन बंद करण्याची किंवा कार्टून लावण्याची शक्यता अधिक .

तारे जमीं पर , चक दे इंडिया , दंगल , ओएमजी ओह माय गॉड यासारखे चित्रपट दोघांनी मिळून पहा , टीव्हीवर आणून लावणं शक्य असेल तर किंवा मोबाईलवर ... सुपर 30 येतो आहे तो दोघांनी किंवा तुम्ही , पत्नी आणि मुलाने थिएटर मध्ये जाऊन बघा , काहीतरी किंचित तरी परिणाम होईल मुलाच्या मनावर ... युट्यूब वर असंख्य शॉर्ट फिल्म्स आहेत त्यातल्या त्याला समजतील आवडतील अशा दर्जेदार निवडून त्याच्यासोबत बघा .... आपल्या जुन्या मिथिओलॉजिकल मालिका रामानंद सागरचा श्रीकृष्ण , देवों के देव महादेव युट्युब / हॉटस्टारवर आहेत ... त्यांची गोडी लागते का पाहा ... देवों के देव महादेवचे 1 - 2 एपिसोड हॉटस्टार वर दोघांनी मिळून बघा , आवडतात का त्याला ... त्याला फॅन्टसीची आवड आहे , त्यामुळे कार्टून बाहेरच्या मालिकांची सुरुवात फॅन्टसी निगडित जेनर मधून केली तर कदाचित उपयोग होईल ... पण पूर्ण फॅन्टसी नको असं वाटतं - हॅरी पॉटर / जादूची पेन्सिल वगैरे नको .... मालगुडी डेज , पृथ्वीराज चौहान ( हॉटस्टार ) , जोधा अकबर ( ऐतिहासिक ज्ञानाच्या दृष्टीने शून्य उपयोग पण कौटुंबिक कलह वगैरे नसलेली लहान मुलांनाही आवडेल अशी वाटते ) , बा बहू और बेबी ( हलकीफुलकी आहे ) राजा शिवछत्रपती , दिल दोस्ती दुनियादारी यासारख्या मालिकांचे सुरुवातीचे काही एपिसोड दोघांनी मिळून बघा ... त्याला जी आवडेल ती पुढे पाहू द्या ... मॅचेस आवडत असतील तर पहा ... इंग्रजी संवाद समजत असतील तर फॅमिलीने बघता येण्यासारखे , लहान मुलांना आवडतील असे चांगले इंग्रजी चित्रपट , मालिका मिळून पाहा . त्यामुळे हळूहळू कार्टून्स मधला रस निघून जाईल ..

आधी छोटी छोटी आणि मग जरा मोठी पुस्तकं आणून वाचनाची गोडी लावण्याचा प्रयत्न करा , फास्टर फेणे , गोट्या , कॉमिक्स वगैरे .. शिवाय वर अनेकांनी सांगितल्याप्रमाणे त्याला बाहेर फिरायला नेणं , त्याच्याशी गप्पा - त्याच्याबरोबर जास्त वेळ घालवणं हे सुद्धा महत्वाचं आहे ...

कदाचित कार्टून्स बघून जादू होण्याची त्याची अपेक्षा नसेलही ... पण त्याला न पेलवणाऱ्या गोष्टी टाळण्यासाठी तो टीव्ही , गेम , मोबाईल यांची मदत घेतो आहे ही तरी खरी गोष्ट आहे .

न पेलवण्यासारखे असे काय प्रश्न पडलेत 11 वर्षाच्या मुलाला असं म्हणू नका ... तुम्हाला क्षुल्लक वाटणाऱ्या गोष्टी त्याच्या दृष्टीने खूप मोठ्या असू शकतात .... तो इतर मुलांसोबत जाऊन खेळतो आहे म्हणालात ती खूप चांगली गोष्ट आहे , त्याचा इतर मुलांमध्ये वावरण्याचा आत्मविश्वास शाबूत आहे ... म्हणजे प्रॉब्लेम फक्त शाळेशी निगडित आहे ... वर्गात जे शिकवत आहेत ते बरोबरच्या सगळ्यांना समजत आहे फक्त आपल्यालाच समजत नाही ही खूप वेदनादायी गोष्ट असू शकते काही मुलांसाठी .. ते तुम्हाला नाही समजणार , त्या भूमिकेतून ज्यांना जावं लागत आहे त्यांनाच समजेल . तो शाळेत जायला नाही म्हणतो यात नवल काहीच नाही ... ( दहावीत चांगले % पडले म्हणून सगळ्यांबरोबर मीही सायन्सला प्रवेश घेतला , पुढे 2 वर्षांनी सायन्स सोडून कला शाखा निवडली .. दहावीत मला गणितात 150 पैकी 139 गुण पडले होते पण 11 वी आणि 12 वीत आमच्या गणिताच्या शिक्षकांनी शिकवलेलं एकही अक्षर / आकडा माझ्या डोक्यात शिरला नाही , कुणालाच त्यांनी शिकवलेलं कळत नव्हतं , काही मुलं दुसऱ्या एका शिक्षकांकडे 11 वीत क्लासला जाऊ लागली , मी 11 वीत गेले नाही आणि बारावीत " इतकं बेसिक म्हणजे 11 वीचं तुला कसं येत नाही " असा अपमान तिथे होईल सगळ्यांसमोर ... म्हणून 12 वीतही गेले नाही ... सुदैवाने काही प्रकरणं सोपी होती , त्यांचा अभ्यास आपला आपण करून पासिंग पुरते मार्क मिळवता आले . फिजिक्सच्या वर्गात 70 % भाग डोक्यावरून जायचा आणि लॅबोरेटरी मधल्या प्रॅक्टीकल मध्ये तर 100 % , आपल्याला काही समजत नाही आहे याच्यापेक्षा टॉर्चर माझ्यासाठी दुसरं कुठलं नव्हतं . दोन वर्षं म्हणजे शुद्ध नरकवास ठरली असती पण केमिस्ट्री , बायोलॉजी , इंग्रजी , आयटी सारखे विषय बऱ्यापैकी सोपे होते म्हणून निभाव लागला नाहीतर मीपण रोज सकाळी उठून मला कॉलेजला जायचं नाही असा सिन केला असता . )

अभ्यासातलं सगळं समजतं आहे पण मुद्दामून अभ्यास करायचा , फक्त मजामस्तीच करायची अशी भूमिका कुठलंही मुल घेत नाही.. अभ्यास / विषय नीट समजत असतील तर आपोआपच अभ्यासाची गोडी लागते ... तो सहावीत / सातवीत आहे ... तुम्ही सांगितलंत त्याला लिहिता वाचता नीट येतं ... गणित - इंग्रजी हे विषय कसे आहेत ? उत्तर येत असून लिहीत नाही याचा अर्थ त्याचा कॉन्फिडन्स गेला असण्याची शक्यता आहे .. पहिली ते सातवी पर्यंतची गणिताची पुस्तकं आणून पहिलीच्या पुस्तकापासून सुरुवात करून पाहा .... प्रत्येक व्याख्या / गणित त्याला नीट कळलं आहे याची खात्री करून घ्या , नसेल तर ते सोपं करून शिकवा ... सोप्यापासून सुरुवात करा . जर चौथीतलं एखादं गणित आलं नाही तर रागावू नका , एवढं कसं येत नाही हे तर चौथीचं आहे अशी भाषा वापरू नका ... एक एक गणित , थोडं थोडं इंग्रजी व्याकरण जसं जसं त्याला जमत जाईल तसा तसा त्याचा कॉन्फिडन्स वाढत जाईल ... शिकवताना त्याला समजलं की कौतुकाचा सूर असू दे ... छोट्या छोट्या प्रगतीने आपल्या वडिलांना आनंद होत आहे हे त्याला स्पष्ट कळू दे तुमच्या चेहऱ्यावरून ....

तुम्ही शिकवलेलं जर त्याला समजत नसेल ( प्रोफेशनल शिक्षकाचं शिकवणं अधिक चांगलं असू शकतं ) आणि तुम्हाला आर्थिकदृष्ट्या शक्य असेल तर त्याला एकट्यालाच घरी येऊन शिकवणारा / शिकवणारी प्रायव्हेट ट्यूटर ठेवा , ट्यूटरला सगळा प्रॉब्लेम समजावून सांगून बेसिक पासून शिकवून बेसिक पक्के करून घ्यायला सांगा , गणित , इंग्रजी या विषयांचे . एकट्याचाच क्लास असल्याने बेसिक शिकून घेताना इतर मुलांसमोर त्याला संकोच - लाज वाटणार नाही .. शिवाय परक्या शिक्षकासमोर खेळायला जातो किंवा झोप येते यासारखी कारणंही देता येणार नाहीत ... तुमच्या घरात शिकवत असल्यामुळे मुलगा भावनिकदृष्टया कम्फर्टेबल असेल . क्लास घेणारा शिक्षक / शिक्षिका शक्यतो पंचवीस ते तिशीच्या वयातील , हसत - खेळत शिकवणारा प्रसन्न व्यक्तिमत्त्वाचा पण त्याचबरोबर आवश्यक तेवढा कडक असलेला , सबबी टाळाटाळ चालवून न घेणारा शिक्षक असेल तर उत्तम ..

जास्त प्रौढ , कडक शिक्षकाचं मुलावर दडपण येतं , अशा शिक्षकाला प्रश्न - शंका विचारायला तो धजावणार नाही . शिक्षक मिळू शकत नसल्यास तुमच्या जवळच्या परिचयातील - विश्वासातील एखादा हुशार कॉलेज विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी एखादा तास त्याला बेसिक गणित - इंग्रजी शिकवण्यास मिळाला तर पाहा...

त्याचं मिडीयम इंग्रजी असेल तर ते त्याला जड जात नाही ना याची खात्री करून घेतलीत का ? वाचता येणं वेगळं आणि 8 - 10 ओळींच इंग्रजी उत्तर लक्षात ठेवून लिहिणं वेगळं ... त्याच्या शालेय पुस्तकांपैकी इतिहास / भूगोल विषयाचं मराठी मिडीयम मधलं शालेय पुस्तक आणि गाईड खरेदी करून आणा आणि एक धडा वाचून दाखवून , त्याच्याकडून वाचून घेऊन मग त्या धड्यावरची 2 - 3 मध्यम लांबीची प्रश्नोत्तरं गाईड मध्ये बघून एका वहीत लिहून घ्या त्याच्याकडून आणि त्यातलंच एखादं 4 - 5 तासांनी न बघता दुसऱ्या वहीत लिहायचं ... 2 किंवा 3 च प्रश्न वाचायचे आहेत तेव्हा कोरं अजिबात ठेवायचं नाही , जे येतं ते लिहायचं असं बजावून सांगायचं .... असं 4 - 6 दिवस केल्यावर मराठी आणि इंग्रजी मिडीयम मधल्या त्याच्या ग्रहणक्षमतेत काही फरक वाटतो का हे तुम्हाला आणि त्यालाही समजेल ....

तसं जर असेल आणि पूर्ण मराठी हा पर्याय स्वीकारायचा नसेल तर सेमी इंग्लिश हा पर्याय असतो , विज्ञान आणि गणित हे विषय फक्त इंग्रजीत बाकी इतिहास , भूगोल मराठीत ... त्यामुळे त्याच्यावरचा ताण कमी होईल कदाचित ... पण पहिली ते आताच्या इयत्तेपर्यंतचं गणित आणि भाषा व्याकरण कच्चं असेल तर ते पक्कं करणं ही सगळ्यात महत्त्वाची प्रायोरिटी असली पाहिजे .

सकाळी उठायला त्रास होतो याचं कारण रात्री तो खूप वेळ जागा असतो हे तर नाही ना ? मोबाईल रात्री दहा नंतर हातातून काढून घ्यावा ... तेवढा तरी तुमचा धाक असलाच पाहिजे ... पत्नीला मोबाईलला पासवर्ड घालायला सांगा .... मुलगा लहान आहे तरी तो युट्यूब वर काय बघतो याकडे लक्ष ठेवा ... देखरेखीशिवाय मोबाईलचा मुक्त वापर असू नये .... युट्युब हिस्ट्री वेळोवेळी चेक करा .... "तसलं" काही सापडलं तर खडसावा ... 8 - 15 दिवस मोबाईल मिळणार नाही म्हणून सांगा .

पत्नी तर गेम्स खेळत नाही ना .. मग दोघांच्या मोबाईलमधले गेम काढून टाका .. हुशार मोबाईलवाल्याकडे जाऊन मोबाईलची स्पेस कशानेतरी भरून टाका , हिडन ऍप्स वगैरे , जेणेकरून गेम परत इन्स्टॉल करता येणार नाहीत .... दुसऱ्या ऑनलाइन साईटवर गेम खेळत असेल तर गेम साईट मधून तुमच्या बँकेच्या खात्याचा पासवर्ड मिळवतात आणि अशी काही जणांची खाती पूर्ण रिकामी झाली , मग चवकशी केल्यावर कळलं की ते अमुक गेम खेळत होते ऑनलाइन असं काहीतरी लॉजिकल रचून त्याला पटेल खरं वाटेल असं सांगा .... चांगल्या गोष्टीसाठी खोटं बोलण्यात काही वाईट नसतं ...

मुलाच्या मोबाईल वापरायच्या वेळेवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करा .. सांगून ऐकणं कठीण आहे ... रात्री लवकर झोपायचा नियम करा , सगळ्यांनाच झोपायला उशीर होत असेल तर मुलाला एकट्याला तरी लवकर 8 वाजता जेवायला घालून दहा वाजेपर्यंत झोपवणं शक्य होतं का पाहा , वेगळी खोली असेल तर सोपं होईल . नवीन डॉक्टरांनी सांगितलं आहे म्हणून सांगितलं की त्या सक्तीला आधार येईल त्याच्या नजरेत ... नाईलाजाने का होईना मान्य करावं लागेल ... सुरुवातीला कठीण जाईल पण थोडे प्रयत्न केले तर जेवण आणि झोपायची वेळ थोडी अलीकडे आणणं शक्य आहे ... दिवसा तो झोपतो याचा अर्थ रात्री त्याची झोप पूर्ण होत नाही , 12 वाजता झोपून 6 ला उठून शाळेच्या तयारीला लागावं ही अपेक्षा सगळ्याच मुलांना पूर्ण करता येऊ शकेल असं नाही ..... त्यातही शाळेत शिकवलेलं कळत असेल तर मुलं जातात उठून आवडीने ... पण शाळेत शिकवलेलं काही धड समजत नाही , शरीराची झोप पूर्ण झालेली नाही ... तशात उठून , जबरदस्तीने पाठवतात , तिथे जाऊन ते टॉर्चर सहन करायचं .... त्याची चिडचिड होणं साहजिकच आहे ...

शाळेतून काहीच फायदा होत नसेल आणि होम ट्यूटरिंगने फरक पडतो आहे हे लक्षात आलं तर शाळेत विनंती करून शाळेत न जाता सरळ वार्षिक परीक्षेला बसण्याची मुभा मागून घ्यावी .. आणि शाळेत पाठवण्याऐवजी 3 - 4 तास घरी येऊन शिकवणारा शिक्षक शोधावा ... पण त्याआधी मुलाकडून त्या क्लासमध्ये तक्रार न करता अभ्यास करण्याची , रोजचा अभ्यास त्या त्या दिवशीच करण्याची , समजत नसेल ते क्लास घेणाऱ्या व्यक्तीला किंवा तुम्हाला विचारून समजून घ्यायचंच आणि ठरवून दिलेल्या वेळीच खेळायला जाणे यासारख्या गोष्टी कबूल करून घ्याव्यात ... एका कागदावर लिहून सही घ्यावी नाहीतर सगळ्यांना हळूहळू सोयीस्कर विसर पडतो .... अमुक कालावधीने उदाहरणार्थ 2 महिन्यांनी क्लासच्या सर किंवा मॅडमनी शिकवलेल्या बेसिक नॉलेज वर तुझी परीक्षा घेतली जाईल आणि त्यात नापास झालास तर परत शाळेत जावं लागेल असं कबुल करून घ्यावं .

रात्री 11 पर्यंत झोपून सकाळी 7 - 8 वाजता उठून झोप व्यवस्थित पूर्ण झाली , आंघोळ - नित्यकर्म सावकाश आटोपली की सकाळी 2 तास, संध्याकाळी 2 - 2.30 तास असा क्लास , मधला वेळ वाचन , ठराविक टीव्ही / युट्युब कार्यक्रम ... जे काही त्याला आवडतं ते .... दिवसाची झोप नाही .. असा दिनक्रम केला तर त्याच्यावरचा शाळेचा ताण जाऊन शिकण्यासाठी त्याच्या मनाची अधिक तयारी होईल असं मला वैयक्तिकरित्या वाटतं ... पण मी काही तज्ज्ञ नाही ...

चांगल्या समुपदेशकांचा सल्ला घेण्याची गरज आहेच ... काही कमी जास्त बोलून गेले असेन तर माफ करा .

सांगोपांग विचार करून दिलेला हा प्रतिसाद आवडला. फार चांगल्या सूचना केल्या आहेत.
धागालेखकास व पाल्यास ही समस्या सोडवण्यात यश मिळो हीच शुभेच्छा.

विनिता००२'s picture

4 Jul 2019 - 1:20 pm | विनिता००२

खूप विचारपूर्वक लिहील आहे निशापरी :)

सुरज भोसले's picture

9 Jul 2019 - 1:33 pm | सुरज भोसले

निशापरी छान सल्ला दिला आहे. होमटयूटर बहुतेक ठेवावाच लागेल. आत्ता त्याला एका ठिकाणी ट्युशन ला पाठवतो आहोत. बऱ्याच वेळा तो ट्युशन बुडवतो. तो दुपारी आजी कडे असतो, तीच ऐकत नाही सारखा टीव्ही बघत असतो.
(पत्नी तर गेम्स खेळत नाही ना .. ) पत्नी मोबईल वर गेम्स खेळात नाही पण सिरीयल बघत बसते. मी घरातली काम करतो. मिसेस नि एक तास मोबाइल बघून एक तास भर त्याचा अभ्यास घ्यावा. पण तीच मोबाइल बघणं कमी होत नाही, व तो टीव्ही किंवा मोबाइल बघत बसतो
चांगला समुपदेशकच दोघांचं मोबाईल व टीव्ही च व्यसन कमी करू शकेल. आत्ता पर्यत तीन मनोसोपचार तज्ञाची treatment घेतली. पण कुणाच्याच treatment चा काहीच परिणाम झाला नाही. तो हुशार आहे पण आभ्यास करण्याचा व लिहिण्याचा कंटाळा. आजून कोणी समुपदेशक पुण्यात असतील तर कृपया सांगा.

यशोधरा's picture

9 Jul 2019 - 4:19 pm | यशोधरा

तुम्हांला लोकांनी ह्या धाग्यामध्ये समुपदेशक सुचवले होते की. त्यांच्यापैकी कोणाला काँटॅक्ट केलेत का? नेत्रेश ह्यांनी अनेक उत्तम उपाय सुचवले होते, त्यापैकी काही केलेत का?

हे अपडेट्स धाग्यावर द्याल का? अजूनही आपल्याला समुपदेशक मिळाले नाहीत का? तीन मानसोपचार तज्ज्ञ बदलले म्हणजे कोणतीच उपाय योजना आपण धड करत नाही आहात, असे काहीसे म्हणावेसे वाटते. उपचारांचा परिणाम होत नाही, हे कसे ठरवता? त्यातील तज्ज्ञ व्यक्ती हे ठामपणे म्हणून शकेल ना?

घरातील टीव्ही काही काळ तरी बंद का करीत नाही? पाल्याची व बायकोची ह्या व्यसनाबद्दल तुम्हाला खरेच काळजी असेल तर हे कितीसे कठीण असेल? केबलवाल्याला पुढील महिन्यापासून टीव्ही च्यानल बंद करायला सांगा.

जॉनविक्क's picture

10 Jul 2019 - 2:43 am | जॉनविक्क
  1. पी हळद आणि हो गोरी असे मानसोपंचाराच्या बाबतीत अजिबात होत नाही.
  2. आपल्या केसमधे समुपदेशन न्हवे औषधाची गरज आहे(Go to psychiatrist not psychologist) असे सकृत दर्शनी ठामपणे वाटते
  3. हे उपचार नेमके निदान व पुढील ट्रीटमेंटची दिशा ठरवायला किमान 5 महिने तरी घेतात तो पर्यंत साधारण मोठ्या शहरात पर सेशन/विसीट ₹५०० असा सरासरी तपासणी खर्च असतो
  4. औषध खर्च वेगळा परंतु तो महिन्याला ₹500 एव्हडाही होत नाही अर्थात औषधे आणि त्यांचे अर्थकारण हा विषयच गहन असल्यानं याबाबत डॉक्टरच काय ते योग्य बोलतील
  5. वरील मुद्दे लक्षात घेता सहज समजेल कि हे उपचार खर्चिक नसले तरी प्रचंड पेशन्स चे काम आहे, आणि बहुतेक पेशन्ट इथेच हार मानून उपचार मधेच सोडून देऊन अजून निराश होतात तसे होता कामा नये
  6. कोणत्याही शारीरिक आजारपणात पेशण्ट कधी एकदा हा त्रास थांबतोय दूर होतोय याचीच आतुरतेने वाट बघत असतो प्रयत्न करत असतो परंतु मनाच्या आजारपणात बरेचदा नेमके याच्या उलट असते, पेशन्ट डिनायल मोड मधे असतो ज्यामध्ये आपण वर्तनाने आजारी आहोत चुकत आहोत हेच त्याला मान्य होत नसते परिणामी आपल्यात काही बदल अपेक्षित आहेत हेच अमान्य असल्याने शारीरिक रोगाप्रमाणे मानसोपचारहि आपल्याला आवश्यक आहेत हेच गांभीर्याने घेतले जात नाहीत मान्य केले जात नाही मग रोगमुक्ती तर दूरच पण ब्लेम गेम मात्र नक्कीच सुरु होतो आणि आपणहि तो सध्या करत आहात
  7. परंतु असे करू नये, आपल्या कृती हया आपल्या इच्छा नियंत्रित करत नसून आपल्या इच्छा या शरीरातील (मेंदूतील) कार्यप्रणालीशी बांधील व अंकित असून त्यानुसार आपली कृती होते हे वास्तव चटकन मान्य करणे उमजून घेणे हा यावरील रामबाण
  8. आणि आपले वर्तन हे फक्त आपले ज्ञान, अनुभव व संस्काराचा भाग नसून मेंदूच्या संपूर्ण अंकित असलेल्या गुंतागुंतीच्या कार्यप्रणालीचा परिपाक आहे जो औषधांनी नियंत्रित होणे हे एक साधे सोपे व तर्कशुद्ध वास्तव आहे जे आपल्याच अहंकारात झाकोळले जाते व फार मोठ्या नुकसानास कारणीभूत ठरते

बाकी जर कोणी नाहीच मिळाले तर मला व्यनि करा असे नमूद करून जाहिरात टाळतो. मी या विषयातील तज्ञ अजिबात नाही.

जॉनविक्क's picture

10 Jul 2019 - 2:58 am | जॉनविक्क

आणि हो सकृतदर्शनी मुलाला हट्टीपणा त्याच्या दोन्ही अथवा एका पालकांकडून मिळालाय असेही आपले लेख वाचून स्पष्टपणे वाटते तेंव्हा तेंव्हा यात काही अनैसर्गिक आहे असे अजिबात वाटून घेऊन नका ती आपल्याच स्वभाव, अनुभव व संस्काराची पुढील आवृत्ती आहे. योग्य व्यक्ती त्याच्यात हे नियंत्रित कसे करायचे हे नक्कीच उतरवू शकतील निश्चीन्त व्हा.

सुरज भोसले's picture

10 Jul 2019 - 4:32 pm | सुरज भोसले

यशोधरा, सगळ्यांनी यौग्य सल्ले दिले आहेत. मी घरातील टीव्ही व मोबाईल बंद करण्याचे बरेच प्रयत्न केले पण ते असफल झाले (टीव्ही ठराविक वेळीच लावायचा, सुट्टीच्या दिवशी फिरायला जायचे किंवा सिनेमाला जायचे असे करत होतो, पण त्याचा फारसा उपयोग झाला नाही)
बऱ्याच जणांनी समुपदशेक सांगितले ते मुंबई किंवा ठाणे येथील होते.
केबलवाल्याला पुढील महिन्यापासून टीव्ही च्यानल बंद करायला सांगा .... डिश किंवा टीव्ही चॅनेल बंद करता येतील पण मोबाईलच काय करणार?

जॉनविक्क, पहिले दोन डॉक्टर डॉक्टर मुलाशी फक्त २ मिनिटे बोलायचे व औषधे द्यायचे, डॉक्टरांनी मुलाशी जास्त वेळ वेळ बोलायला पाहिजे असे आम्हाला वाटते (फी ५००/-रुपये), एक- दोन महिन्यातच मुलगा डॉक्टरांकडे यायला टाळायला लागला.
तिसरे डॉक्टर मुलाशी बोलायचे, चार महिने त्यांची ट्रीटमेंट घेतली, पण चार महिन्यात १% पण त्यात फरक दिसला नाही (डॉक्टरांची फी १५००/- पंधरा दिवसांसाठी व औषधाचे ३५००/- पंधरा दिवसांसाठी, १०,००० एक महिन्यासाठी ) मुलात थोडाजरी फरक दिसला असता तरी काहीही करून आम्ही हि ट्रीटमेंट continue केली असती

गवि's picture

10 Jul 2019 - 4:47 pm | गवि

केबलवाल्याला पुढील महिन्यापासून टीव्ही च्यानल बंद करायला सांगा .... डिश किंवा टीव्ही चॅनेल बंद करता येतील पण मोबाईलच काय करणार?

क्षमस्व, पण अशा प्रश्नांमुळे काही स्ट्रिक्ट ऍक्शन घेण्याची तुमची तयारी (इच्छा) आहे की नाही असा मुळात प्रश्न पडतो. "पण मोबाईलचं काय?" हे ठीक, पण निदान ती केबलतरी निग्रहाने बंद केली का? एकेक करुन स्टेप्स घेता येणार नाहीत का?

आणि 10,000 हा खर्चही मला पटत नाही. जर कोणी नाहीच मिळाले तर मला व्यनि करा, शक्य असेल तर मला 10k वाल्या डॉक्टरचे रोगनिदान अथवा प्रिसक्रिप्शन देखील व्यनी करावे.

माझ्या माहिती बाबत मी आश्वस्थ आहेच, आणि आपली हरकत नसेल तर मी स्वतः सुद्धा डॉक्टरांसोबत उपस्थित असेन. आपण योग्य तो निर्णय घ्यावा.

टीव्ही ठराविक वेळीच लावायचा,

घरात टीव्ही ठेवूच नका. विकून टाका.
मोबाईल बेसिक वापरा, वापरायला द्या. ज्यात गेम्स वगैरे खेळता येतील असा वापरू नका, वापरायला देऊ नका.

खरंच रिझल्ट हवे असतील तर हे उपाय करायला हरकत नसावी.

जॉनविक्क's picture

10 Jul 2019 - 5:13 pm | जॉनविक्क

असा किती लोकांचा विदा आपल्याकडे आहे ज्यांची मुले वरील उपायांनी सुधारली ?

कदाचित एकही नाही, विशेषतः असे जे टीव्ही आणि मोबाईल मुळे अजिबात बिघडले न्हवते, मग आपण वरील कारणेच रूट कॉज आहेत हे कसे ठाम मानता ?

असेच जगायचे असेल तर गुहेतच रहायला जाणे जास्त श्रेयस्कर. टीव्ही मोबाईल कमी करणे वेगळं आणि प्रतिबंधित करणे वेगळं. जेवण प्रतिबंधित करून किती लोकांना भूक लागले बंद झाले ?

यशोधरा's picture

10 Jul 2019 - 5:45 pm | यशोधरा

हा एकच उपाय आहे हे नी कुठे म्हटले आहे, ते दाखवा.
पण अगदी प्रथमपासून ह्या धाग्यावर मुलगा व बायको टीव्ही बघत बसतात, मोबाईल वर गेम्स खेळत बसतात इत्यादि लिहिले आहे. त्यासाठी हा एक उपाय करण्यासारखा आहे. टीव्ही आणि मोबाईल हे जर distraction होत असेल, तर ते मार्गातून हतवणे ह्या गृहस्थांच्या हातातले आहे ना? त्याने काही अपाय तर होणार नाही ना? म्हणजे मला तरी वाटते की त्यात काही अपाय नसावा, तुम्हांला वाटत असल्यास व त्यामुळे होणारा अपाय माहीत असल्यास कल्पना नाही.

यशोधरा's picture

10 Jul 2019 - 5:49 pm | यशोधरा

नी= मी*

आणि टीव्ही+ मोबाईल हेच रूट कॉज आहेत असेही मी म्हटले नाहीये. जे मी लिहिले नाही, ते माझ्या नावावर खपवू नये. हे नक्की म्हणेन की हे अनेक कॉजेसपैकी एक नक्कीच आहेत.

जॉनविक्क's picture

10 Jul 2019 - 7:54 pm | जॉनविक्क

फक्त धोनीखेळाला नाही म्हणून किवीं विरुद्ध भारत हरला अशी ओरड मलाही पटत नाही

सुरज भोसले's picture

11 Jul 2019 - 11:27 am | सुरज भोसले

जॉनविक्क, त्या डॉक्टरांचं क्लीनिक पुण्यात आपटे रोड वर आहे (त्या डॉक्टरांचं नाव येथे देऊ शकत नाही), ते पुण्यातले प्रसिद्ध डॉक्टर आहेत. त्यांच्या Fee व औषधाच्या खर्चाचा तपशील वरती दिलेला आहेच. ते डॉक्टर मुलाशी व आमच्याशी बोलायचे व त्यांच्याकडचीच औषधं देत होते त्यामुळे प्रिसक्रिप्शन दिलंच नाही. त्या डॉक्टरांकडे आम्ही नोव्हेंबर २०१८ मध्ये शेवटचे गेलो होतो
विदा किंवा व्यनि म्हणजे काय?

श्वेता२४'s picture

11 Jul 2019 - 12:00 pm | श्वेता२४

व्यनि म्हणजे व्यक्तिगत निरोप

सुरज भोसले's picture

11 Jul 2019 - 4:48 pm | सुरज भोसले

जॉनविक्क, व्हिडिओ नक्की बघीन