मुलाचा हट्टीपणा
In reply to इतर काही प्रोब्लेम आहे का? by मास्टरमाईन्ड
In reply to कंजूस, घरी राहून फक्त TV by सुरज भोसले
शाळेत त्याला मुल मारायची असे तो म्हणाला म्हणून त्याच्या PRINCIPAL MADEM ला जाऊन भेटलो. PRINCIPAL MADEM नि त्याला सांगितल कि मुलांनी मारल कि मला सांगायला ये.तो म्हणाला म्हणुन मुलं मारतच असतील असं नाही. दुसरं असं काहीही चिडवत असतील जे त्याला आई वडिलांना सांगायला लाज वाटत असेल. माझा मुलगा पण आता ६वीत आहे. गेल्या वर्षी माझ्या मुलाला बस मधल्या मुलांनी एका मुलीवरून चिडवलं आणि तो ते मला सांगायला घाबरत होता त्याच्या आई कडून मला हे समजल्यावर मी एक दोन दिवसांनी त्याला विचारलं "आम्ही शाळेत असतानां खूप मस्ती करायचो, कुणालाही काहीही चिडवायचो, त्याबद्दल शिक्षकांचा मार पण खाल्लाय. तुम्ही असं काही करत नाही का? " वगैरे बर्याच प्रयत्नांमधून शेवटी त्यानं मला सांगितलं पण तेही सांगताना त्याला रडायला येत होतं. मी त्याला धीर देण्याचा प्रयत्न केला आणि म्हणालो "रडू नकोस. आम्ही तुझे आई बाबा तुझे Best Friends आहोत. जे चिडवतात त्यांना तू जेवढा रडशील / घाबरशील तेवढा जास्त आनंद होईल. आणि तुला वाईट वाटलं तर आम्हाला पण वाईट वाटेल. जर तू काहीही केलं नसशील तर ते तुला का चिडवतात?" वगैरे वगैरे. Finally आम्ही त्याला हे पटवून देण्यात (बहुतेक) यशस्वी झालोय की तू आमच्याशी (त्यातल्या त्यात बापाशी) आगावूपणा च्या गोष्टी share करू शकतोस (कारण त्याच्या आईला जास्तीचा आगावूपणा आवडत नाही :) आणि बापाला आगावूपणाशिवाय दुसरं काही जमत नाही) महत्त्वाचं म्हणजे घरातलं वातावरण जर कुठल्याही कारणानं Tense असेल आणि मूल sensitive असेल तर त्याच्यावर परिणाम होतो. आणि अशा अवस्थेत मूल घाबरून राहतं . मी एक दोन वेळेस त्याच्या बस मधल्या senior मुला मुलींना धमकी पण दिलीय कि त्याला त्रास दिलात तर तुमच्या तीर्थरुपांना contact करण्यात येईल वगैरे. मी वापरलेले उपाय फक्त माहिती खातर सांगितलेत तुमच्याकडे जी परिस्थिती असेल त्याप्रमाणे तुम्ही तुमचे उपाय define करून वापरणे उत्तम. कारण माझ्या aggressive उपायाबद्दल माझ्या पत्नीचं फारसं चांगलं मत नव्हतं पण result अपेक्षित आल्यानं फारसा विरोध झाला नाही इतकंच . आणि महत्त्वाचं म्हणजे मी ७ ते १० दिवसात केलेले उपाय इथं ३ / ४ ओळीत लिहिलेत कारण मला लिहायचा जाम कंटाळा आहे. तुम्हाला याचा काहीही उपयोग झाला तर मला आनंदच आहे basic rule मुलाशी / मुलीशी शक्य तेवढी मैत्री ठेवा (आपल्या शिस्त आणि संस्कार यांच्या कल्पनांपलीकडे जाऊन ) म्हणजे त्याला / तिला आवडणारा TV Program त्याच्या / तिच्या सोबत बघा , त्याबद्दल discuss करा आणि मुलाला खात्री वाटू द्या कि तुम्हीच त्याचे / तिचे best friend आहात
In reply to मी काही मानसोपचार तज्ञ नाही... by मुक्त विहारि
In reply to भाई वाह !! by अर्धवटराव
In reply to मी काही मानसोपचार तज्ञ नाही... by मुक्त विहारि
In reply to मास्टरमाईन्ड, by सुरज भोसले
रोजच्या त्याच्या त्रासामुळे आमचा पेशन्स कमी होत चालला आहे.
प्रत्येक वेळी माझ्या मिसेस ची पैश्यावरुन कटकट.
जी कांही लाईन ऑफ ट्रीटमेंट सुरू आहे / यापूर्वी सुरू होती यावर तुमचे दोघांचे एकमत आहे ना..?In reply to रोजच्या त्याच्या त्रासामुळे by मोदक
In reply to मास्टरमाईन्ड, by सुरज भोसले
In reply to व्यापक समस्या आहे. by सस्नेह
बऱ्याच वेळा शाळेत जातच नाही व अभ्यास करतच नाही.शाळेत ज्या दिवशी जायचे नाकारतो, त्या दिवशी तुम्ही किंवा तुमची पत्नी काय करता?
In reply to आपण मुलाला नीट निरखून बघा .. by खिलजि
शिंच्यान किंवा अल्ट्रा बीभंगार कार्यक्रम
In reply to एकदम बरोबर by मास्टरमाईन्ड
In reply to आपण मुलाला नीट निरखून बघा .. by खिलजि
In reply to दूरदर्शन व केबल टीव्ही बंद का करत नाही? by नेत्रेश
In reply to मोदक, by सुरज भोसले
In reply to मोदक, by सुरज भोसले
In reply to उपाय by नेत्रेश
In reply to माझ्या घरी हा प्रॉब्लेम नाहि... by अर्धवटराव
In reply to उपाय by नेत्रेश
म्ही मदत मागताय हे उत्तम करताय, पण मिसेस ना पण समुपदेशनाची गरज आहे
माफ करा पण एकंदरीतच तुमच्या घरात टिव्ही, मोबाईल नको तितका जास्त वापरला जातोय असं वाटतं. दिवसातले 3-4 तास वेबसिरीज किंवा मालिका पाहण्यासाठी मिळू शकतात आणि त्याचं मुलाच्या नावावर तिकीट फाडून समर्थन केलं जातंय हे अजिबात पटणार नाहीय. मला वाटतंय एकूणच मुलाला वाढवताना जे पोषक वातावरण लागतं त्याचा काही प्रमाणात का होईना अभाव दिसतोय. उशिरा का होईना पण तुम्हाला याची जाणीव झाली आहे हे उत्तम आहे. पण एकूणच यापुढे संपूर्ण कुटुंबालाच काही नियम व नियंत्रण स्वतासाठी घालून घ्यावे लागतील असं वाटतंय. तुमच्या संपूर्ण कुटुंबालाच समुपदेशनाची गरज आहे व त्यातूनच पुढचा कृती आराखडा आखावा असं सूचवेन.
मी नववीत असल्यापासून घरात टिव्ही बघत नाही. (त्याआधीही घरात केवळ दूरदर्शन वाहिनी असल्यामुळे ठराविक वेळेला ठराविक कार्यक्रम पाहिलेत) त्यावेळी आमच्या गल्लीतले बरेचजण बसून आमच्या घरात टिव्ही पाहत. त्याचा इतका त्रास होई की मी व माझी बहीण लवकर 9 वाजता झोपून रात्री 3 वाजता उठायचो. व अभ्यास करुन 6.30 ला पहाटे पुन्हा झोपायचो व अगदी शिकवणीच्या वेळेआधी अर्धा तास उठून आवरुन पळायचो. त्या त्रासामुळे जेव्हा घर विभक्त झाले तेव्हा अजिबात टिव्ही घ्यायचा नाही असं घरात निक्षून सांगितलं. आजही माझ्या किंवा बहिणीच्या घरी टिव्ही नाहीय .
याचे फायदे -
1) शांत वातावरणामुळे अभ्यासात लक्ष लागायचे
2) घरात एकमेकांशी बोलायला वेळ मिळायचा
3) आताही जो काही थओडाफार वेळ मिळतो तो आम्ही (मी, नवरा, मुलगा)एकमेकांसोबत घालवतो.
4) वाचनाची आवड निर्माण झाली.
5) अगदीच मोकळा वेळ असेल तेव्हा फोनवर मित्र मैत्रिणी व नातेवाईकांना फोन करुन विचारपूस करते.(या निमित्ताने सर्व बंध जपले जातात कारण आताशा कुणाकडे प्रत्यक्ष जाणे जमतेच असे नाही.) मुलालाही फोनवर माझ्या मित्रमैत्रिणी व त्यांच्या मुलांशी बोलायला लावते त्यामुळे नकळत तोदेखील आमच्या ग्रुपसोबत जोडला गेला आहे. असो.
सगळ्यांचे सर्व अनुभव व अभिप्राय लक्षात घेऊन तुम्ही यातून मार्ग काढाल व तुमचा प्रश्न सुटो याकरीता खूप मनापासून शुभेच्छाIn reply to नेत्रेश by सुरज भोसले
In reply to नेत्रेश by सुरज भोसले
तुम्ही सांगितलेले उपाय कठीण आहेत, दोन महिन्यासाठी नाही पण एक महिन्यासाठी नक्कीच करून बघेन.for real? मुलगा सुधारणार असेल तर दोन महिने सुद्धा तुम्ही देऊ शकत नाही? जरा odd वाटते आहे.
In reply to तुम्ही सांगितलेले उपाय कठीण by यशोधरा
In reply to मला तर वाटते की... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to हे कराच...मुलाचं भविष्य जास्त महत्वाचं आहे... by समीरसूर
In reply to समीरसूर, by सुरज भोसले
In reply to मागच्या वर्षीपण मुलाला खूप by सुरज भोसले
In reply to ओके नो प्रोब्लेम. by जॉनविक्क
In reply to वर खूप अनुभवी लोकांनी सल्ले - by nishapari
In reply to वर खूप अनुभवी लोकांनी सल्ले - by nishapari
- पी हळद आणि हो गोरी असे मानसोपंचाराच्या बाबतीत अजिबात होत नाही.
- आपल्या केसमधे समुपदेशन न्हवे औषधाची गरज आहे(Go to psychiatrist not psychologist) असे सकृत दर्शनी ठामपणे वाटते
- हे उपचार नेमके निदान व पुढील ट्रीटमेंटची दिशा ठरवायला किमान 5 महिने तरी घेतात तो पर्यंत साधारण मोठ्या शहरात पर सेशन/विसीट ₹५०० असा सरासरी तपासणी खर्च असतो
- औषध खर्च वेगळा परंतु तो महिन्याला ₹500 एव्हडाही होत नाही अर्थात औषधे आणि त्यांचे अर्थकारण हा विषयच गहन असल्यानं याबाबत डॉक्टरच काय ते योग्य बोलतील
- वरील मुद्दे लक्षात घेता सहज समजेल कि हे उपचार खर्चिक नसले तरी प्रचंड पेशन्स चे काम आहे, आणि बहुतेक पेशन्ट इथेच हार मानून उपचार मधेच सोडून देऊन अजून निराश होतात तसे होता कामा नये
- कोणत्याही शारीरिक आजारपणात पेशण्ट कधी एकदा हा त्रास थांबतोय दूर होतोय याचीच आतुरतेने वाट बघत असतो प्रयत्न करत असतो परंतु मनाच्या आजारपणात बरेचदा नेमके याच्या उलट असते, पेशन्ट डिनायल मोड मधे असतो ज्यामध्ये आपण वर्तनाने आजारी आहोत चुकत आहोत हेच त्याला मान्य होत नसते परिणामी आपल्यात काही बदल अपेक्षित आहेत हेच अमान्य असल्याने शारीरिक रोगाप्रमाणे मानसोपचारहि आपल्याला आवश्यक आहेत हेच गांभीर्याने घेतले जात नाहीत मान्य केले जात नाही मग रोगमुक्ती तर दूरच पण ब्लेम गेम मात्र नक्कीच सुरु होतो आणि आपणहि तो सध्या करत आहात
- परंतु असे करू नये, आपल्या कृती हया आपल्या इच्छा नियंत्रित करत नसून आपल्या इच्छा या शरीरातील (मेंदूतील) कार्यप्रणालीशी बांधील व अंकित असून त्यानुसार आपली कृती होते हे वास्तव चटकन मान्य करणे उमजून घेणे हा यावरील रामबाण
- आणि आपले वर्तन हे फक्त आपले ज्ञान, अनुभव व संस्काराचा भाग नसून मेंदूच्या संपूर्ण अंकित असलेल्या गुंतागुंतीच्या कार्यप्रणालीचा परिपाक आहे जो औषधांनी नियंत्रित होणे हे एक साधे सोपे व तर्कशुद्ध वास्तव आहे जे आपल्याच अहंकारात झाकोळले जाते व फार मोठ्या नुकसानास कारणीभूत ठरते
In reply to पी हळद आणि हो गोरी by जॉनविक्क
In reply to यशोधरा, सगळ्यांनी यौग्य सल्ले by सुरज भोसले
केबलवाल्याला पुढील महिन्यापासून टीव्ही च्यानल बंद करायला सांगा .... डिश किंवा टीव्ही चॅनेल बंद करता येतील पण मोबाईलच काय करणार?क्षमस्व, पण अशा प्रश्नांमुळे काही स्ट्रिक्ट ऍक्शन घेण्याची तुमची तयारी (इच्छा) आहे की नाही असा मुळात प्रश्न पडतो. "पण मोबाईलचं काय?" हे ठीक, पण निदान ती केबलतरी निग्रहाने बंद केली का? एकेक करुन स्टेप्स घेता येणार नाहीत का?
In reply to यशोधरा, सगळ्यांनी यौग्य सल्ले by सुरज भोसले
In reply to यशोधरा, सगळ्यांनी यौग्य सल्ले by सुरज भोसले
टीव्ही ठराविक वेळीच लावायचा,घरात टीव्ही ठेवूच नका. विकून टाका. मोबाईल बेसिक वापरा, वापरायला द्या. ज्यात गेम्स वगैरे खेळता येतील असा वापरू नका, वापरायला देऊ नका. खरंच रिझल्ट हवे असतील तर हे उपाय करायला हरकत नसावी.
In reply to टीव्ही ठराविक वेळीच लावायचा, by यशोधरा
In reply to मला एक प्रश्न आहे by जॉनविक्क
In reply to हा एकच उपाय आहे हे नी कुठे by यशोधरा
>>बऱ्याच वेळा शाळेत जातच नाही