विधानसभा निवडणूक 2018 निकाल (मप्र,राजस्थान, छग, मिझोरम, तेलंगणा)

महासंग्राम's picture
महासंग्राम in राजकारण
11 Dec 2018 - 12:16 pm

सर्वशक्तिशाली औटघटकेच्या मतदार राजास्नी रामराम,

सध्या लोकसभेची सेमीफायनल समजल्या जाणाऱ्या मध्यप्रदेश ,राजस्थान, छत्तीसगढ, मिझोरम, तेलंगणा या राज्यांचे निवडणूक निकाल हाती येत आहेत. सध्यच्या कलानुसार काँग्रेसने मध्यप्रदेश ,राजस्थान, छत्तीसगढ हि ०३ भाजपशासित राज्ये जवळजवळ हिसकावून घेतली जाण्याची शक्यता आहे. बाकी ठिकाणी पण पानिपत झाल्यात जमा आहे.

  • ०३ महत्वाची पूर्ण बहुमत असलेली राज्य निसटून जाण्यामागे कारणं काय असू शकतील ?
  • याचा येणाऱ्या लोकसभा निवडणुकीवर परिणाम होईल का ? कि नेहमी प्रमाणे दुसऱ्याच मुद्द्याद्वारें लोकसभा लढवली जाईल ?
  • या विजयामुळे संजीवनी मिळेलेली काँग्रेस या यशाचा भविष्यात कश्याप्रकारे लाभ घेऊ शकेल ?

प्रतिक्रिया

इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे हॅक झाली आहेत म्हणणाऱ्यांची आता काय मते आहेत हे जाणून घेणे मनोरंजक ठरावे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

11 Dec 2018 - 11:23 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

वरिजनल मशीन्स होती यावेळी धन्यवाद.

-दिलीप बिरुटे

सुबोध खरे's picture

12 Dec 2018 - 9:41 am | सुबोध खरे

काही ठोस पुरावा वगैरे?
कि गॅस नेहमीसारखा?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

13 Dec 2018 - 5:19 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>काही ठोस पुरावा वगैरे...?

पूर्वी पैकीच्या पैकी निवडून येत होते आता ते येत नाही हाच ठोस पुरावा . पूर्वी फक्त EVM होते आता + vvpat आहे.

गटार त्यातून गॅस, हवा, धुर, फेकाफेकी ती आदरणीय फेक सम्राट आणि त्यांच्या भक्तांकडे, त्यांना कितीही पुरावे दिले तरी ते सर्व माहिती आहे असे समजून दुर्लक्ष करतात किंवा त्यांना काहीच समजून घ्यायचं नसतं तेव्हा....फेकू हटाव देश बचाव हा नारा लोकांनी लावलेला दिसतो.

कोणत्याही पक्षाच्या नेतृत्वाला, पक्षाला नावं ठेवायची, जनमानसात प्रतिमा हनन करून त्या पक्षाला नेस्तनाबूत करायचा पांचटपना राजकारणात आणला, आणि तोच प्रयत्न आता अंगलट आलाय.

-दिलीप बिरुटे

सुबोध खरे's picture

13 Dec 2018 - 5:55 pm | सुबोध खरे

वरिजनल मशीन्स होती

पूर्वी फक्त EVM होते आता + vvpat आहे.

नक्की काय ते ठरवा?

SHASHANKPARAB's picture

13 Dec 2018 - 8:23 pm | SHASHANKPARAB

तुमच्या मताशी सहमत, 2014 साली सत्तेबाहेर राहूनही मोदिन्नि इव्हिएम हॅक करविलि. मला यूपीए सरकारची मात्र दया येते, एव्हढे भ्रष्टाचार करताना बिचर्यान्च्या ध्यानातच आले नाही की इव्हिएम हॅक करुन अख्खया जन्माचि पोटापाण्याची सोय करता येइल....

अशुद्ध्लेखनाबद्धल क्षमस्व

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

11 Dec 2018 - 12:47 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

आमचा जो काही मोडका तोडका अभ्यास आहे त्यावरून भाजपाच्या पराभवाची कारणे(पराभव दारूण नाही पण पराभव झाला आहे):
१) गुजरात मॉडेलची /विकासाची चर्चाच नव्हती.
२)भाजपा नेते "काँग्रेस्वाले वाईट' हेच सांगण्यात मग्न होते.
३) खचलेल्या अर्थव्यवस्थेवरून ल़क्ष वळवण्यासाठी "गोरक्षण्/राम मंदीर' हे मुद्दे पुढे केले.
४) सरकारवर टीका केली की तुम्ही अर्बन नक्षल किंवा प्रेस्टित्युट किंवा पाकिस्तानी.. तुम्ही भारतीय असूच शकत नाही. अशी मांडणी भाजपावाल्यानी सुरू केली.
५) जवळपास फसलेले निशचलीकरण्/जी.एस.टी.ची नीट न झालेली अंमलबजावणी, त्यामुळे कावलेला गरीब वर्ग्/व्यापारी वर्ग..

नाखु's picture

11 Dec 2018 - 1:43 pm | नाखु

माईच म्हणतात म्हणजेच खरं असेल तरी वरील खरे सरांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यावर भाष्य येईल याबद्दल शंका आहे.

सामान्य सदस्य नाखु बिनसुपारीवाला

महासंग्राम's picture

11 Dec 2018 - 1:47 pm | महासंग्राम

दस्तरखुद्द माई म्हणतायेत म्हणल्यावर असू शकेल तसं. बरं तुमचे हे आले का विलेक्शन ड्युटी हुन, त्यांचे पण मत जाणून घ्यावयास आवडेल.

इरसाल's picture

11 Dec 2018 - 1:46 pm | इरसाल

मिपा व मायबोलीवरील, भाजपविरोधी धुरंधरांनी केलेल्या (घणाघाती, तडफ, टोले व इतर जे काही भारी भारी शब्द असतिल ते वापरुन) हल्ल्यांनी बेजार झालेल्या भाजपच्या नेत्यांना, लोकांनी निवडणुकीत सातवे आसमान दाखवले, धुळ चारली, पटकले वगैरे वगैरे.
२०१९ मधे होणार्‍या निवडणुकांमधे, भाजपला सग़ळ्या मिळुन ४० जागाही मिळणार नाहीत.

इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे हॅक झाली आहेत म्हणणाऱ्यांची आता काय मते आहेत हे जाणून घेणे मनोरंजक ठरावे.
असे रोखठोक प्रश्न कोणी विचारतं का कधी ?
खरे साहेब ईव्हीएम यंत्रे हिवाळ्यात म्हणजे किंचीत थंडीच्या वातावरणात सुद्धा हॅक करता येत नाहीत, हे आपणास ठावुक नाही याबद्दल मला आश्चर्य वाटले

ईव्हीएम हॅकचा प्रचार हा अट्टल दर्जाचा रडेपणा होता.
सध्या भाजपच्या पराभवाची कारणे भाजपेयींचा टोकाचा अहंकार, सत्तेचा अमरपट्टा मिळाल्यासारखी वर्तणुक, शेतीच्या प्रश्नावर निश्चित धोरण न आखणे, जनतेच्या जिव्हाळ्याचे मुद्दे जसे रोजगार, शिक्षण, आरोग्य यावर न बोलता कांग्रेसकी ६० सालकी सरकार, नेहरू, पटेल, मंदिर असल्या फालतू मुद्द्यांवर केंद्रीत केलेला नकारात्मक प्रचार ही असावीत असे वाटते.
मप्रमध्ये शिवराजसिंहांची लोकप्रियता भाजपला तारून नेत आहे असे आता तरी दिसत आहे. पण काँग्रेसने जोरदार मुसंडी मारलीये हे खरं. जिथे सत्ता येईल तिथे काँग्रेसने युवा नेत्यांना संधी द्यावी.

मार्मिक गोडसे's picture

11 Dec 2018 - 2:19 pm | मार्मिक गोडसे

ईव्हीएम हॅकचा प्रचार हा अट्टल दर्जाचा रडेपणा होता.

ह्या निवडणुकांसाठी VVPAT मशीन वापरली असल्यामुळे आता शंका घेता येणार नाही. तेलंगणातील काँग्रेसने VVPAT मोजणीची नि. आयोगाकडे विनंती केली आहे.

ट्रेड मार्क's picture

13 Dec 2018 - 5:13 am | ट्रेड मार्क

जर EVM हॅक करता येते म्हणजे असा आरोप होता की मतदार बटन एका पक्षाच्या समोरचं दाबतो पण मत दुसऱ्या पक्षाला जातं. तर मतदाराने कुठलं बटन दाबलंय हे बघून त्याप्रमाणे प्रिंट कमांड का देता येणार नाही? बाकी बॅकएन्ड ला मत कोणालाही ट्रान्सफर करता येईल. नाही का?

फक्त मतदान यंत्र हॅक करता येतं पण प्रिंटर नाही असं काही आहे का? सुशिक्षित लोक पण असे उल्लू बनतात म्हणजे अवघड आहे.

आनन्दा's picture

13 Dec 2018 - 6:28 am | आनन्दा

अपवादात्मक स्थितीत त्या पावत्या घेऊन मतमोजणी करायची मागणी करता येते म्हणतात.

तेलंगणात काँग्रेस टी मागणी करत होते असे ऐकलंय

मागील काही वर्ष्यात, भाजपाला भारतभर मिळालेल्या विजयाचे श्रेय हे निव्वळ मोदीजींच्या दैदिप्यमान नेतृत्वाचेचं निःसंशय ...
परंतु या ३ राज्यातील (आणि गुजरात धरता ४) भाजपाची पीछेहाट, हि फक्त आणि फक्त स्थानिक नेतृत्वाचा नाकर्तेपणा....

mrcoolguynice's picture

11 Dec 2018 - 2:39 pm | mrcoolguynice

"पप्पु पास मोदू नापास "... नेटकऱ्यांच्या प्रतिक्रियांचा ओघ ...

मार्मिक गोडसे's picture

13 Dec 2018 - 2:56 pm | मार्मिक गोडसे

मोदींना पितृत्वाचा अनुभव नाही किंवा ...
त्यामुळे पितृत्व घेणे त्यांना आवडत नसावे. ते 'शिल्पकार' आहेत,विजयाचे किंवा पराभवाचे. परंतू राजनाथ सिंह पराभवाचे श्रेय मोदींना द्यायला तयार नाहीत.

गामा पैलवान's picture

11 Dec 2018 - 2:51 pm | गामा पैलवान

भाजपचा निकाल लागल्यामुळे मोदी जरासे पिछाडीवर गेलेले असले तरी त्यात एक महाप्रचंड फायदा लपला आहे. या निकालांमुळे पप्पूची वाटाघाटमूल्य वाढेल. त्यामुळे लोकसभेसाठी मोदींना त्याचा फायदा आहे.

-गा.पै.

गामा पैलवान's picture

11 Dec 2018 - 2:52 pm | गामा पैलवान

भाजपचा निकाल लागल्यामुळे मोदी जरासे पिछाडीवर गेलेले असले तरी त्यात एक महाप्रचंड फायदा लपला आहे. या निकालांमुळे पप्पूची वाटाघाटमूल्य वाढेल. त्यामुळे लोकसभेसाठी मोदींना त्याचा फायदा आहे.

-गा.पै.

थाम्बा, एव्हढ्यातच लपलेले महाप्रचंड फ़ायदे मोजु नक़ा....
कदाचित नोटबंदीच्या फ़ायदयाप्रमाणे, ईथेही भरपूर फ़ायदे , येणारया दिवसात /महिन्यात , धुरिण /चाणक्य (मिपावरिल) दाखवुन देतीलच.
थोड़ धिर धरा....

आनन्दा's picture

11 Dec 2018 - 6:44 pm | आनन्दा

खरे तर या विषयावर बोलायची देखील गरज नाही.. ही लिंक बघा https://www.quora.com/Is-BJP-winning-Rajasthan-elections/answer/Prateek-...

खरे तर या निवडणुका काँग्रेसने अगोदरच जिंकलेल्या होत्या. फक्त त्यांच्या स्टार कॅम्पेनर तो सोपा पेपर त्यांच्यासाठी अवघड केला इतकेच.

ट्रेड मार्क's picture

13 Dec 2018 - 5:51 am | ट्रेड मार्क

ही पण एक थिअरी वाचा.

वरील ब्लॉग मधूनच कॉपीपेस्ट केलेला काही भाग -

दहाबारा राज्यात भाजपाची सत्ता आहे आणि भाजपाचे मुख्यमंत्री आहेत, असे त्या पक्षाचे प्रवक्ते अगत्याने नेहमी सांगत होते. त्यातले तीन मुख्यमंत्री आता कमी झाले आहेत. पण हे तीन मुख्यमंत्री नेमके मोदींचे समकालीन व मोदीपुर्व राजकारणात प्रस्थापित झालेले नेते असावेत, हा योगायोग मानता येईल काय? नरेंद्र मोदी पंतप्रधान पदाचे उमेदवार झाले, तेव्हा त्यांना तुल्यबळ म्हणून शिवराजसिंग चौहान यांना का पुढे केले नाही? असे सवाल राजदीप सरदेसाई बरखा दत्त हे जाणते पत्रकार भाजपाला विचारत होते. आज तसेच तीन मुख्यमंत्री एका फ़टक्यात बाद झाले आहेत. जे कधीही मोदींना आव्हान होऊ शकणारे व ज्येष्ठ होते. मग याला कारस्थान का म्हणायचे नाही? मोदी-शहा जोडगोळीने मतदानातून या तिघांचा परस्पर काटा काढलेला नाही काय? म्हणजे तसे काही पुरावे देता येणार नाहीत. पण कारस्थानाचे पुरावे सहसा मिळत नाहीत की मागे कोणी ठेवत नाही. ज्यांना अशा कारस्थानाच्या संकल्पनेने पछाडलेले असते, त्यांच्यासाठी हे तिघे ज्येष्ठ व मोदींचे समकालीन असल्याचे धागेदोरे पुरेसे नाहीत काय? त्यामुळे ठरवून दुकलीने त्यांना राजकारणातून संपवले, असा आरोप एव्हाना व्हायला हवा होता. कारण हे तिघेच मुख्यमंत्री असे आहेत, ज्यांना मोदींच्या राजवटीत बहूमत मिळवून देत शहा-मोदींनी मुख्यमंत्रीपदी बसवलेले नाही. अन्यथा उरलेले तमाम भाजपा मुख्यमंत्री मोदीपर्वातले आहेत. मग कायम जे लोक कायम अशा कारस्थाने व कटांचा वास काढण्यासाठीच आपल्या नाकाचा वापर करीत हुंगत बसलेले असतात, यापैकी कोणी अजून यातल्या कारस्थान वा कटाचा गौप्यस्फ़ोट कशाला केलेला नाही? अडवाणी, मुरलीमनोहर जोशी अशा ज्येष्ठांना त्याच दुकलीने वाटेतून बाजूला केले आणि आता आपल्या समकालीन नेते मुख्यमंत्र्यांनाही संपवले; हा परिस्थितीजन्य पुरावाच नाही काय? अजून कोणी त्यावर जनहित याचिका करण्याविषयी बोलला कसा नाही?

असे असू शकेल?

"मोदीजींचे पंतप्रधानपदी विराजमान होणे" ही घटना,
(१५+ वर्षे मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीच्या) शिवराज सिंह व रमण सिंह , यांच्यासाठी अपशकुनी/पनौती ठरली काय ?
फलज्योतिष्याच्या दृष्टीने कोणी काही अभ्यासू प्रतिक्रिया देऊ शकेल काय ?
पत्रिकेत काही दोष असेल, (शिवराज सिंह व रमण सिंह यांच्यासाठी) तर नारायण-नागबळी सारख्या विधीने ते दूर करता येण्यासंबंधी दृष्टीनेसुद्धा कोणी काही अभ्यासू प्रतिक्रिया देऊ शकेल काय ?

सद्यस्थितीत लागू होणारी काही वाक्ये :-
१. जगात केवळ दोन प्रकारची माणसे असतात: मोदीविरोधक आणि मोदीसमर्थक. बाकी कुणी सापडल्यास बाद धरावे.
२. या दोन्ही प्रकारच्या माणसांसाठी कोणीही माणूस परपक्षात असणे म्हणजे अक्षम्य गुन्हा असतो. या गुन्ह्याच्या खालोखाल महत्त्वाचे म्हणजे देशद्रोह, खून, बलात्कार, वगैरे..
वरील दोन मुद्यांचा परिणाम इतर गोष्टींवर होणे स्वाभाविकच..
३. मोदीविरोधकः देशासमोरच्या सर्व अडचणी [आर्थिक, सामाजिक, संरक्षण, भौतिक, पारलौकीक, खेळ, क्रिकेट, घरचा अस्वच्छ संडास, सासू-सुनेची भांडणे..इत्यादी अनेक ] निकालात लागण्यासाठी मोदींना दूर केले पाहिजे.
मोदीसमर्थकः देशासमोरच्या सर्व अडचणी [आर्थिक, सामाजिक, संरक्षण, भौतिक, पारलौकीक, खेळ, क्रिकेट, घरचा अस्वच्छ संडास, सासू-सुनेची भांडणे..इत्यादी अनेक ] मोदी निकालात काढू शकतात.
४. मोदीविरोधक: "मोदींचा" पराभव होण्याचे मूळ कारण १२५ कोटी भारतीयांपैकी १७७३ लोकांना आपले कार्य त्यांनी समजावून सांगितले नाही.
मोदीसमर्थकः "मोदी" व्यतिरिक्त सगळ्यांचा पराभव होण्याचे मूळ कारण "मोदींचा" पराभव झालेला नाही.
५. मोदीसमर्थकः जगात दोनच काळ आहेतः मोदीपूर्व काळ आणि मोदीकाळ.
मोदीविरोधकः जगात एकच काळ होणार आहे. मोदींचा काळ.
६. मोदीविरोधकः मोदींनी कोणतेही काम केलेले नाही. जे केलेले दिसते ते मोदीपूर्वकालीन आहे असे धरून चालावे. [हे चित भी मेरी.. पट भी मेरी.. च्या चालीवर वाचावे.]
मोदीसमर्थकः मोदींनीच काम केलेले आहे. जे केलेले दिसते ते मोदीकालीन आहे असे धरून चालावे. [हे चित भी मेरी.. पट भी मेरी.. च्या चालीवर वाचावे.]
.
.
.
.
.
५१. मोदीसमर्थकः बाळा लौकर ढुंगण धुवून घे. मोदी जिंकले नाहीत तर धुण्यासाठी देखील पाणी मिळणार नाही.
मोदीविरोधकः अर्धवट माहिती आहे ही. व्हॉट्स अ‍ॅप वर मॅसेज फिरतोय, मोदी पाणीपट्टी वाढवणार. मोदी जिंकलेत तर धुण्यासाठी देखील पाणी मिळणार नाही.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

11 Dec 2018 - 6:30 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

अशीच काही स्थिती गेल्या ४.५ वर्षात माध्यमानी व सर्वानी बनवली होती. खरे तर अमेरिकन अध्यक्षिय निवडणूकीच्या स्टाईलप्रमाणे येथेही असाच प्रकार चालु झाला होता. "मोदी की राहूल" अशी चर्चा सारखी चालू होती. अशी चर्चा करणे म्हण्जे पक्षांतील ईतर सर्व सदस्यांना दुय्यम लेखणे असे आमचे मत. सुदैवाने मतदाराने बुनियादी मुद्द्यांवरून मतदान केलेले दिसते.

सुबोध खरे's picture

11 Dec 2018 - 7:14 pm | सुबोध खरे

सध्या आपण कॉंगेरसी नाही आणि भाजपेयी हि नाही तेंव्हा आपण कसे समतोल( सेक्युलर सर्वसमावेशक पुरोगामी इ इ) आहोत हे दाखवणे हि फॅशन झाली आहे.

म्हणजे भाजप जिंकले तरी आम्ही काँग्रेस विरोधी म्हणून हाळी मारता येते आणि भाजप हरले तरी आम्ही मोदी भक्त नाहीच म्हणून आम्हीच हुशार म्हणवता येतंय.

फॅशन हि काळाप्रमाणे बदलेलच पण "समतोल" असणं कसं "इन थिंग/ अपमार्केट" आहे हेही दाखवता येतं.

"पडत्या समभागात" आम्ही पैसे "गुंतवत नाही" म्हणून मिरवता हि येतं.

बाकी चालू द्या.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

11 Dec 2018 - 8:03 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

समतोल सांभाळणे हीच तर आपली खासियत होती. "तुम्ही अमेरिकेबरोबर आहात , नाहीतर तुम्ही दहशतवादी" अशी जॉर्ज डब्ल्यु बूशी विभागणी येथे कधीच लोकप्रिय नव्हती.

सुबोध खरे's picture

11 Dec 2018 - 8:52 pm | सुबोध खरे

समतोल "असणे" आणि त्याचा टेम्भा "मिरवणे"(इतरांना तुच्छ लेखून) यात फरक आहे माईसाहेब.
आजकाल पॉलिटिकली करेक्ट असणे हे पण महत्त्वाचे झाले आहे.

उत्खनक's picture

11 Dec 2018 - 9:03 pm | उत्खनक

हे वाचून.. काही नावं लगेच डोळ्यांपुढे तरळून गेलीत..
पण ते काये की पॉलिटिकली करेक्ट राहण्याच्या सवयीमुळे त्यांची नावं उद्धृत करू नये म्हणतो! ;-)

मार्मिक गोडसे's picture

11 Dec 2018 - 7:42 pm | मार्मिक गोडसे

गुराढोरांचे ठीक आहे , परंतू एखादी व्यक्ती स्वतःला दावणीला का बांधून घेत असेल ?

ते तेवढं दावणीवरून एक शंका आली.

दावणी दृश्य वा अदृश्य यावरून मोदीसमर्थक क मोदीविरोधक ठरू शकेल काय? ;-)

मार्मिक गोडसे's picture

11 Dec 2018 - 8:38 pm | मार्मिक गोडसे

फक्त भक्तांकडे असे अद्भुत चष्मे आहेत.

उत्खनक's picture

11 Dec 2018 - 8:59 pm | उत्खनक

:-) जाऊं देत. कदाचित प्रश्न अंमळ अवघड असावा..!

भाजपा सत्तेत आली की समर्थक काही प्लान्स राबवण्याची घाई उडवून देतात हे कारण आहे.

माइसाहेबांच्या ह्यांनी योग्य प्रतिसाद दिला आहे.

बर झाले भाजप ला ब्रेक लागला , खूपच हेकेखोरपणा चालला होता भाजपवाल्यांचा . जर या राज्यात भाजप यशश्वी झाली असती तर सगळ्यात पहिले इंधनदर वाढले असते .

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

12 Dec 2018 - 7:20 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

मे २०१९ पर्यंत पेट्रोल्/डिझेल्/रेल्वेभाड/कोणताही कर वाढणार नाही असा ह्यांचा अंदाज.
.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

11 Dec 2018 - 11:28 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मा.मोदीसरकारचा माज उतरणे गरजेचं होतं. काही भक्तलोक सूर्य चन्द्र असेपर्यन्त सत्ता अबाधित राहील असे समजत होते, भक्तहो, इथे लोकशाही आहे, लोकांना जे वाटतं तेच ते करतात. ही जनता आहे, लै बेक्कार. लोकशाही ज़िंदाबाद....!

-दिलीप बिरुटे

मार्मिक गोडसे's picture

11 Dec 2018 - 11:47 pm | मार्मिक गोडसे

आज इनो डे आहे.

आजानुकर्ण's picture

12 Dec 2018 - 9:01 am | आजानुकर्ण
आजानुकर्ण's picture

12 Dec 2018 - 9:02 am | आजानुकर्ण
आजानुकर्ण's picture

12 Dec 2018 - 9:02 am | आजानुकर्ण
आजानुकर्ण's picture

12 Dec 2018 - 9:04 am | आजानुकर्ण

खूप आनंद झाला. खास लॉगिन करुन प्रतिसाद देतोय.

भाजपाचा पराभव का झाला ते इथलेच काही - हरल्यावर आता मतदारांचीच लायकी काढणारे - प्रतिसाद वाचून लगेच लक्षात येते. किती माज! शेवटी मुस्काटात बसली!! आता तरी जागे व्हा.

बाकी काय म्हणता प्रा. डॉ. साहेब.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

12 Dec 2018 - 10:57 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आजानुसेठ, रूटीन सुरु. प्रतिसाद पाहुन छान वाटलं येत चला.

-दिलीप बिरुटे

सुबोध खरे's picture

12 Dec 2018 - 9:50 am | सुबोध खरे

या देशात लोकशाही आहे.

म्हणूनच निवडणूका होत आहेत.

मोदींना "लोकां"नी हुकूमशहा ठरवून टाकले आहे त्याला कोण काय करणार?

निवडणुकात हार जीत होतच राहणार त्यात विशेष काय?

हरल्यावर इलेक्ट्रॉनिक मतदार यंत्रे हॅक झाली आहेत हा रडीचा डाव खेळणे काँग्रेस केंव्हा सोडेल ते पाहणे मनोरंजक ठरेल.

https://www.republicworld.com/election-news/telangana-elections-news/sta...

विशुमित's picture

12 Dec 2018 - 10:48 am | विशुमित

3 राज्यात काटावरचा विजय मिळवून देखील राहुल गांधीनी EVM बाबत शंका घेणे सोडले नाही.
....
बाकी विरोधक EVM संदर्भात पुर्वीसारखे या वेळस गाफिल राहिले नाहीत. सतत पाठपुरावा करत राहिल्या मुळे निवडणूक आयोगाला आणखी खबरदारीने निपक्ष निवडणूका घेणे भाग पडले आहे असे दिसत आहे.
....
राहुल गांधींनी विसर्जित होणार्या राज्य सरकारनाचे केलेल्या कामाचे कौतूक करुन आभार मानले आहे. 2014 नंतर बर्याच चांगल्या गोष्टी शिकले आहेत, असे त्यांचे म्हणणे आहे.
असो.. बघू पुढे काय दिवे लावतात ते...!
...
आणखी महत्वाचं 'फेकोबा'चा माज मोडला ते खुप चांगले झाले.

आता राहुल गान्धी दहा दिवसात शेतकर्याना कर्जमाफी करतात का हे पहायला हवे. भाजपाच्या या पराभवाचे एक कारण मोदीन्चा अहम्कार. इतर कारणे राम मन्दिर, हिन्दुत्ववाद, सन्घाची लुडबुड, शरान्ची नावे बदलण्याचा उपद्व्याप.

बोका's picture

12 Dec 2018 - 11:25 am | बोका

आताच मध्यप्रदेशातील एका शेतकर्‍याशी बोलणे झाले. त्याला विचारले, का लोकांनी काँग्रेस ला मते दिली?
तो म्हणाला - दोन लाखांसाठी. दहा दिवसात कर्ज माफ होणार आहे.