Skip to main content

विधानसभा निवडणूक 2018 निकाल (मप्र,राजस्थान, छग, मिझोरम, तेलंगणा)

लेखक महासंग्राम यांनी मंगळवार, 11/12/2018 12:16 या दिवशी प्रकाशित केले.
सर्वशक्तिशाली औटघटकेच्या मतदार राजास्नी रामराम, सध्या लोकसभेची सेमीफायनल समजल्या जाणाऱ्या मध्यप्रदेश ,राजस्थान, छत्तीसगढ, मिझोरम, तेलंगणा या राज्यांचे निवडणूक निकाल हाती येत आहेत. सध्यच्या कलानुसार काँग्रेसने मध्यप्रदेश ,राजस्थान, छत्तीसगढ हि ०३ भाजपशासित राज्ये जवळजवळ हिसकावून घेतली जाण्याची शक्यता आहे. बाकी ठिकाणी पण पानिपत झाल्यात जमा आहे.
  • ०३ महत्वाची पूर्ण बहुमत असलेली राज्य निसटून जाण्यामागे कारणं काय असू शकतील ?
  • याचा येणाऱ्या लोकसभा निवडणुकीवर परिणाम होईल का ? कि नेहमी प्रमाणे दुसऱ्याच मुद्द्याद्वारें लोकसभा लढवली जाईल ?
  • या विजयामुळे संजीवनी मिळेलेली काँग्रेस या यशाचा भविष्यात कश्याप्रकारे लाभ घेऊ शकेल ?

वाचने 71337
प्रतिक्रिया 136

प्रतिक्रिया

In reply to by सुबोध खरे

>>>काही ठोस पुरावा वगैरे...? पूर्वी पैकीच्या पैकी निवडून येत होते आता ते येत नाही हाच ठोस पुरावा . पूर्वी फक्त EVM होते आता + vvpat आहे. गटार त्यातून गॅस, हवा, धुर, फेकाफेकी ती आदरणीय फेक सम्राट आणि त्यांच्या भक्तांकडे, त्यांना कितीही पुरावे दिले तरी ते सर्व माहिती आहे असे समजून दुर्लक्ष करतात किंवा त्यांना काहीच समजून घ्यायचं नसतं तेव्हा....फेकू हटाव देश बचाव हा नारा लोकांनी लावलेला दिसतो. कोणत्याही पक्षाच्या नेतृत्वाला, पक्षाला नावं ठेवायची, जनमानसात प्रतिमा हनन करून त्या पक्षाला नेस्तनाबूत करायचा पांचटपना राजकारणात आणला, आणि तोच प्रयत्न आता अंगलट आलाय. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

तुमच्या मताशी सहमत, 2014 साली सत्तेबाहेर राहूनही मोदिन्नि इव्हिएम हॅक करविलि. मला यूपीए सरकारची मात्र दया येते, एव्हढे भ्रष्टाचार करताना बिचर्यान्च्या ध्यानातच आले नाही की इव्हिएम हॅक करुन अख्खया जन्माचि पोटापाण्याची सोय करता येइल.... अशुद्ध्लेखनाबद्धल क्षमस्व

आमचा जो काही मोडका तोडका अभ्यास आहे त्यावरून भाजपाच्या पराभवाची कारणे(पराभव दारूण नाही पण पराभव झाला आहे): १) गुजरात मॉडेलची /विकासाची चर्चाच नव्हती. २)भाजपा नेते "काँग्रेस्वाले वाईट' हेच सांगण्यात मग्न होते. ३) खचलेल्या अर्थव्यवस्थेवरून ल़क्ष वळवण्यासाठी "गोरक्षण्/राम मंदीर' हे मुद्दे पुढे केले. ४) सरकारवर टीका केली की तुम्ही अर्बन नक्षल किंवा प्रेस्टित्युट किंवा पाकिस्तानी.. तुम्ही भारतीय असूच शकत नाही. अशी मांडणी भाजपावाल्यानी सुरू केली. ५) जवळपास फसलेले निशचलीकरण्/जी.एस.टी.ची नीट न झालेली अंमलबजावणी, त्यामुळे कावलेला गरीब वर्ग्/व्यापारी वर्ग..

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

माईच म्हणतात म्हणजेच खरं असेल तरी वरील खरे सरांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यावर भाष्य येईल याबद्दल शंका आहे. सामान्य सदस्य नाखु बिनसुपारीवाला

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

दस्तरखुद्द माई म्हणतायेत म्हणल्यावर असू शकेल तसं. बरं तुमचे हे आले का विलेक्शन ड्युटी हुन, त्यांचे पण मत जाणून घ्यावयास आवडेल.

मिपा व मायबोलीवरील, भाजपविरोधी धुरंधरांनी केलेल्या (घणाघाती, तडफ, टोले व इतर जे काही भारी भारी शब्द असतिल ते वापरुन) हल्ल्यांनी बेजार झालेल्या भाजपच्या नेत्यांना, लोकांनी निवडणुकीत सातवे आसमान दाखवले, धुळ चारली, पटकले वगैरे वगैरे. २०१९ मधे होणार्‍या निवडणुकांमधे, भाजपला सग़ळ्या मिळुन ४० जागाही मिळणार नाहीत.

इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे हॅक झाली आहेत म्हणणाऱ्यांची आता काय मते आहेत हे जाणून घेणे मनोरंजक ठरावे. असे रोखठोक प्रश्न कोणी विचारतं का कधी ? खरे साहेब ईव्हीएम यंत्रे हिवाळ्यात म्हणजे किंचीत थंडीच्या वातावरणात सुद्धा हॅक करता येत नाहीत, हे आपणास ठावुक नाही याबद्दल मला आश्चर्य वाटले

ईव्हीएम हॅकचा प्रचार हा अट्टल दर्जाचा रडेपणा होता. सध्या भाजपच्या पराभवाची कारणे भाजपेयींचा टोकाचा अहंकार, सत्तेचा अमरपट्टा मिळाल्यासारखी वर्तणुक, शेतीच्या प्रश्नावर निश्चित धोरण न आखणे, जनतेच्या जिव्हाळ्याचे मुद्दे जसे रोजगार, शिक्षण, आरोग्य यावर न बोलता कांग्रेसकी ६० सालकी सरकार, नेहरू, पटेल, मंदिर असल्या फालतू मुद्द्यांवर केंद्रीत केलेला नकारात्मक प्रचार ही असावीत असे वाटते. मप्रमध्ये शिवराजसिंहांची लोकप्रियता भाजपला तारून नेत आहे असे आता तरी दिसत आहे. पण काँग्रेसने जोरदार मुसंडी मारलीये हे खरं. जिथे सत्ता येईल तिथे काँग्रेसने युवा नेत्यांना संधी द्यावी.

ईव्हीएम हॅकचा प्रचार हा अट्टल दर्जाचा रडेपणा होता. ह्या निवडणुकांसाठी VVPAT मशीन वापरली असल्यामुळे आता शंका घेता येणार नाही. तेलंगणातील काँग्रेसने VVPAT मोजणीची नि. आयोगाकडे विनंती केली आहे.

In reply to by मार्मिक गोडसे

जर EVM हॅक करता येते म्हणजे असा आरोप होता की मतदार बटन एका पक्षाच्या समोरचं दाबतो पण मत दुसऱ्या पक्षाला जातं. तर मतदाराने कुठलं बटन दाबलंय हे बघून त्याप्रमाणे प्रिंट कमांड का देता येणार नाही? बाकी बॅकएन्ड ला मत कोणालाही ट्रान्सफर करता येईल. नाही का? फक्त मतदान यंत्र हॅक करता येतं पण प्रिंटर नाही असं काही आहे का? सुशिक्षित लोक पण असे उल्लू बनतात म्हणजे अवघड आहे.

In reply to by ट्रेड मार्क

अपवादात्मक स्थितीत त्या पावत्या घेऊन मतमोजणी करायची मागणी करता येते म्हणतात. तेलंगणात काँग्रेस टी मागणी करत होते असे ऐकलंय

मागील काही वर्ष्यात, भाजपाला भारतभर मिळालेल्या विजयाचे श्रेय हे निव्वळ मोदीजींच्या दैदिप्यमान नेतृत्वाचेचं निःसंशय ... परंतु या ३ राज्यातील (आणि गुजरात धरता ४) भाजपाची पीछेहाट, हि फक्त आणि फक्त स्थानिक नेतृत्वाचा नाकर्तेपणा....

In reply to by mrcoolguynice

मोदींना पितृत्वाचा अनुभव नाही किंवा ... त्यामुळे पितृत्व घेणे त्यांना आवडत नसावे. ते 'शिल्पकार' आहेत,विजयाचे किंवा पराभवाचे. परंतू राजनाथ सिंह पराभवाचे श्रेय मोदींना द्यायला तयार नाहीत.

भाजपचा निकाल लागल्यामुळे मोदी जरासे पिछाडीवर गेलेले असले तरी त्यात एक महाप्रचंड फायदा लपला आहे. या निकालांमुळे पप्पूची वाटाघाटमूल्य वाढेल. त्यामुळे लोकसभेसाठी मोदींना त्याचा फायदा आहे. -गा.पै.

भाजपचा निकाल लागल्यामुळे मोदी जरासे पिछाडीवर गेलेले असले तरी त्यात एक महाप्रचंड फायदा लपला आहे. या निकालांमुळे पप्पूची वाटाघाटमूल्य वाढेल. त्यामुळे लोकसभेसाठी मोदींना त्याचा फायदा आहे. -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

थाम्बा, एव्हढ्यातच लपलेले महाप्रचंड फ़ायदे मोजु नक़ा.... कदाचित नोटबंदीच्या फ़ायदयाप्रमाणे, ईथेही भरपूर फ़ायदे , येणारया दिवसात /महिन्यात , धुरिण /चाणक्य (मिपावरिल) दाखवुन देतीलच. थोड़ धिर धरा....

In reply to by गामा पैलवान

खरे तर या विषयावर बोलायची देखील गरज नाही.. ही लिंक बघा https://www.quora.com/Is-BJP-winning-Rajasthan-elections/answer/Prateek… खरे तर या निवडणुका काँग्रेसने अगोदरच जिंकलेल्या होत्या. फक्त त्यांच्या स्टार कॅम्पेनर तो सोपा पेपर त्यांच्यासाठी अवघड केला इतकेच.

In reply to by गामा पैलवान

ही पण एक थिअरी वाचा. वरील ब्लॉग मधूनच कॉपीपेस्ट केलेला काही भाग - दहाबारा राज्यात भाजपाची सत्ता आहे आणि भाजपाचे मुख्यमंत्री आहेत, असे त्या पक्षाचे प्रवक्ते अगत्याने नेहमी सांगत होते. त्यातले तीन मुख्यमंत्री आता कमी झाले आहेत. पण हे तीन मुख्यमंत्री नेमके मोदींचे समकालीन व मोदीपुर्व राजकारणात प्रस्थापित झालेले नेते असावेत, हा योगायोग मानता येईल काय? नरेंद्र मोदी पंतप्रधान पदाचे उमेदवार झाले, तेव्हा त्यांना तुल्यबळ म्हणून शिवराजसिंग चौहान यांना का पुढे केले नाही? असे सवाल राजदीप सरदेसाई बरखा दत्त हे जाणते पत्रकार भाजपाला विचारत होते. आज तसेच तीन मुख्यमंत्री एका फ़टक्यात बाद झाले आहेत. जे कधीही मोदींना आव्हान होऊ शकणारे व ज्येष्ठ होते. मग याला कारस्थान का म्हणायचे नाही? मोदी-शहा जोडगोळीने मतदानातून या तिघांचा परस्पर काटा काढलेला नाही काय? म्हणजे तसे काही पुरावे देता येणार नाहीत. पण कारस्थानाचे पुरावे सहसा मिळत नाहीत की मागे कोणी ठेवत नाही. ज्यांना अशा कारस्थानाच्या संकल्पनेने पछाडलेले असते, त्यांच्यासाठी हे तिघे ज्येष्ठ व मोदींचे समकालीन असल्याचे धागेदोरे पुरेसे नाहीत काय? त्यामुळे ठरवून दुकलीने त्यांना राजकारणातून संपवले, असा आरोप एव्हाना व्हायला हवा होता. कारण हे तिघेच मुख्यमंत्री असे आहेत, ज्यांना मोदींच्या राजवटीत बहूमत मिळवून देत शहा-मोदींनी मुख्यमंत्रीपदी बसवलेले नाही. अन्यथा उरलेले तमाम भाजपा मुख्यमंत्री मोदीपर्वातले आहेत. मग कायम जे लोक कायम अशा कारस्थाने व कटांचा वास काढण्यासाठीच आपल्या नाकाचा वापर करीत हुंगत बसलेले असतात, यापैकी कोणी अजून यातल्या कारस्थान वा कटाचा गौप्यस्फ़ोट कशाला केलेला नाही? अडवाणी, मुरलीमनोहर जोशी अशा ज्येष्ठांना त्याच दुकलीने वाटेतून बाजूला केले आणि आता आपल्या समकालीन नेते मुख्यमंत्र्यांनाही संपवले; हा परिस्थितीजन्य पुरावाच नाही काय? अजून कोणी त्यावर जनहित याचिका करण्याविषयी बोलला कसा नाही? असे असू शकेल?

"मोदीजींचे पंतप्रधानपदी विराजमान होणे" ही घटना, (१५+ वर्षे मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीच्या) शिवराज सिंह व रमण सिंह , यांच्यासाठी अपशकुनी/पनौती ठरली काय ? फलज्योतिष्याच्या दृष्टीने कोणी काही अभ्यासू प्रतिक्रिया देऊ शकेल काय ? पत्रिकेत काही दोष असेल, (शिवराज सिंह व रमण सिंह यांच्यासाठी) तर नारायण-नागबळी सारख्या विधीने ते दूर करता येण्यासंबंधी दृष्टीनेसुद्धा कोणी काही अभ्यासू प्रतिक्रिया देऊ शकेल काय ?

सद्यस्थितीत लागू होणारी काही वाक्ये :- १. जगात केवळ दोन प्रकारची माणसे असतात: मोदीविरोधक आणि मोदीसमर्थक. बाकी कुणी सापडल्यास बाद धरावे. २. या दोन्ही प्रकारच्या माणसांसाठी कोणीही माणूस परपक्षात असणे म्हणजे अक्षम्य गुन्हा असतो. या गुन्ह्याच्या खालोखाल महत्त्वाचे म्हणजे देशद्रोह, खून, बलात्कार, वगैरे.. वरील दोन मुद्यांचा परिणाम इतर गोष्टींवर होणे स्वाभाविकच.. ३. मोदीविरोधकः देशासमोरच्या सर्व अडचणी [आर्थिक, सामाजिक, संरक्षण, भौतिक, पारलौकीक, खेळ, क्रिकेट, घरचा अस्वच्छ संडास, सासू-सुनेची भांडणे..इत्यादी अनेक ] निकालात लागण्यासाठी मोदींना दूर केले पाहिजे. मोदीसमर्थकः देशासमोरच्या सर्व अडचणी [आर्थिक, सामाजिक, संरक्षण, भौतिक, पारलौकीक, खेळ, क्रिकेट, घरचा अस्वच्छ संडास, सासू-सुनेची भांडणे..इत्यादी अनेक ] मोदी निकालात काढू शकतात. ४. मोदीविरोधक: "मोदींचा" पराभव होण्याचे मूळ कारण १२५ कोटी भारतीयांपैकी १७७३ लोकांना आपले कार्य त्यांनी समजावून सांगितले नाही. मोदीसमर्थकः "मोदी" व्यतिरिक्त सगळ्यांचा पराभव होण्याचे मूळ कारण "मोदींचा" पराभव झालेला नाही. ५. मोदीसमर्थकः जगात दोनच काळ आहेतः मोदीपूर्व काळ आणि मोदीकाळ. मोदीविरोधकः जगात एकच काळ होणार आहे. मोदींचा काळ. ६. मोदीविरोधकः मोदींनी कोणतेही काम केलेले नाही. जे केलेले दिसते ते मोदीपूर्वकालीन आहे असे धरून चालावे. [हे चित भी मेरी.. पट भी मेरी.. च्या चालीवर वाचावे.] मोदीसमर्थकः मोदींनीच काम केलेले आहे. जे केलेले दिसते ते मोदीकालीन आहे असे धरून चालावे. [हे चित भी मेरी.. पट भी मेरी.. च्या चालीवर वाचावे.] . . . . . ५१. मोदीसमर्थकः बाळा लौकर ढुंगण धुवून घे. मोदी जिंकले नाहीत तर धुण्यासाठी देखील पाणी मिळणार नाही. मोदीविरोधकः अर्धवट माहिती आहे ही. व्हॉट्स अ‍ॅप वर मॅसेज फिरतोय, मोदी पाणीपट्टी वाढवणार. मोदी जिंकलेत तर धुण्यासाठी देखील पाणी मिळणार नाही.

In reply to by उत्खनक

अशीच काही स्थिती गेल्या ४.५ वर्षात माध्यमानी व सर्वानी बनवली होती. खरे तर अमेरिकन अध्यक्षिय निवडणूकीच्या स्टाईलप्रमाणे येथेही असाच प्रकार चालु झाला होता. "मोदी की राहूल" अशी चर्चा सारखी चालू होती. अशी चर्चा करणे म्हण्जे पक्षांतील ईतर सर्व सदस्यांना दुय्यम लेखणे असे आमचे मत. सुदैवाने मतदाराने बुनियादी मुद्द्यांवरून मतदान केलेले दिसते.

सध्या आपण कॉंगेरसी नाही आणि भाजपेयी हि नाही तेंव्हा आपण कसे समतोल( सेक्युलर सर्वसमावेशक पुरोगामी इ इ) आहोत हे दाखवणे हि फॅशन झाली आहे. म्हणजे भाजप जिंकले तरी आम्ही काँग्रेस विरोधी म्हणून हाळी मारता येते आणि भाजप हरले तरी आम्ही मोदी भक्त नाहीच म्हणून आम्हीच हुशार म्हणवता येतंय. फॅशन हि काळाप्रमाणे बदलेलच पण "समतोल" असणं कसं "इन थिंग/ अपमार्केट" आहे हेही दाखवता येतं. "पडत्या समभागात" आम्ही पैसे "गुंतवत नाही" म्हणून मिरवता हि येतं. बाकी चालू द्या.

In reply to by सुबोध खरे

समतोल सांभाळणे हीच तर आपली खासियत होती. "तुम्ही अमेरिकेबरोबर आहात , नाहीतर तुम्ही दहशतवादी" अशी जॉर्ज डब्ल्यु बूशी विभागणी येथे कधीच लोकप्रिय नव्हती.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

समतोल "असणे" आणि त्याचा टेम्भा "मिरवणे"(इतरांना तुच्छ लेखून) यात फरक आहे माईसाहेब. आजकाल पॉलिटिकली करेक्ट असणे हे पण महत्त्वाचे झाले आहे.

In reply to by सुबोध खरे

हे वाचून.. काही नावं लगेच डोळ्यांपुढे तरळून गेलीत.. पण ते काये की पॉलिटिकली करेक्ट राहण्याच्या सवयीमुळे त्यांची नावं उद्धृत करू नये म्हणतो! ;-)

In reply to by मार्मिक गोडसे

ते तेवढं दावणीवरून एक शंका आली. दावणी दृश्य वा अदृश्य यावरून मोदीसमर्थक क मोदीविरोधक ठरू शकेल काय? ;-)

भाजपा सत्तेत आली की समर्थक काही प्लान्स राबवण्याची घाई उडवून देतात हे कारण आहे. माइसाहेबांच्या ह्यांनी योग्य प्रतिसाद दिला आहे.

बर झाले भाजप ला ब्रेक लागला , खूपच हेकेखोरपणा चालला होता भाजपवाल्यांचा . जर या राज्यात भाजप यशश्वी झाली असती तर सगळ्यात पहिले इंधनदर वाढले असते .

मा.मोदीसरकारचा माज उतरणे गरजेचं होतं. काही भक्तलोक सूर्य चन्द्र असेपर्यन्त सत्ता अबाधित राहील असे समजत होते, भक्तहो, इथे लोकशाही आहे, लोकांना जे वाटतं तेच ते करतात. ही जनता आहे, लै बेक्कार. लोकशाही ज़िंदाबाद....! -दिलीप बिरुटे

In reply to by आजानुकर्ण

खूप आनंद झाला. खास लॉगिन करुन प्रतिसाद देतोय. भाजपाचा पराभव का झाला ते इथलेच काही - हरल्यावर आता मतदारांचीच लायकी काढणारे - प्रतिसाद वाचून लगेच लक्षात येते. किती माज! शेवटी मुस्काटात बसली!! आता तरी जागे व्हा. बाकी काय म्हणता प्रा. डॉ. साहेब.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

या देशात लोकशाही आहे. म्हणूनच निवडणूका होत आहेत. मोदींना "लोकां"नी हुकूमशहा ठरवून टाकले आहे त्याला कोण काय करणार? निवडणुकात हार जीत होतच राहणार त्यात विशेष काय? हरल्यावर इलेक्ट्रॉनिक मतदार यंत्रे हॅक झाली आहेत हा रडीचा डाव खेळणे काँग्रेस केंव्हा सोडेल ते पाहणे मनोरंजक ठरेल. https://www.republicworld.com/election-news/telangana-elections-news/st…

In reply to by सुबोध खरे

3 राज्यात काटावरचा विजय मिळवून देखील राहुल गांधीनी EVM बाबत शंका घेणे सोडले नाही. .... बाकी विरोधक EVM संदर्भात पुर्वीसारखे या वेळस गाफिल राहिले नाहीत. सतत पाठपुरावा करत राहिल्या मुळे निवडणूक आयोगाला आणखी खबरदारीने निपक्ष निवडणूका घेणे भाग पडले आहे असे दिसत आहे. .... राहुल गांधींनी विसर्जित होणार्या राज्य सरकारनाचे केलेल्या कामाचे कौतूक करुन आभार मानले आहे. 2014 नंतर बर्याच चांगल्या गोष्टी शिकले आहेत, असे त्यांचे म्हणणे आहे. असो.. बघू पुढे काय दिवे लावतात ते...! ... आणखी महत्वाचं 'फेकोबा'चा माज मोडला ते खुप चांगले झाले.

आता राहुल गान्धी दहा दिवसात शेतकर्याना कर्जमाफी करतात का हे पहायला हवे. भाजपाच्या या पराभवाचे एक कारण मोदीन्चा अहम्कार. इतर कारणे राम मन्दिर, हिन्दुत्ववाद, सन्घाची लुडबुड, शरान्ची नावे बदलण्याचा उपद्व्याप.

In reply to by दिगोचि

आताच मध्यप्रदेशातील एका शेतकर्‍याशी बोलणे झाले. त्याला विचारले, का लोकांनी काँग्रेस ला मते दिली? तो म्हणाला - दोन लाखांसाठी. दहा दिवसात कर्ज माफ होणार आहे.

In reply to by बोका

हायला हे तर ते 'अच्छे दिन आयेंगे' च्या वरची हाइट झाली. पण यात किमान आकडा तरी माहित आहे. अच्छे दिन मधे ती सोय नव्हती. (15 लाख तर जुंमला होता हे तर दस्तुरखुद प्रदेश अध्यक्षानी मागेच डिक्लर केले होते)

In reply to by विशुमित

बाकी काई का असेना गरीबी हटाव, कॉंग्रेस हटाव, इंदिरा हटाव, दलदल हटाव, अबकी बार असल्या अजेंड्यापेक्षा "अच्छे दिन आयेंगे" सारख्या सर्वसमावेशक, मल्टीयुज आणि मोस्ट पोकळ घोषणेसाठी सगळ्या पक्षांनी आणि जनतेने पण मोदीकाकांचे आभारी असले पाहिजे. उद्या कोणीही अगदी राहुल गांधी सुध्दा हिच ट्यागलाईन वापरुन जनतेला अश्वारोहण करायला तयार करणार हे निश्चित. कसले अच्छे, काय अच्छे, किती अच्छे, कधी अच्छे हे ज्येचं तेनं ठरवून घ्यायचं.

In reply to by विशुमित

एक त्रिकाल अबाधित सत्य -- "अच्छे दिन" कधी ही येत नाहीत. याचे कारण एकदा "अच्छे दिन" आले कि त्याचे नावीन्य संपून जाते आणि तो "हक्क" होतो. कितीही काही दिले तरी श्रमिक वर्गाची पिळवणूक हे पालुपद संपत नाही. जेंव्हा तुम्ही तुमच्या मोलकरणीचा पगार ८०० चा १००० करता तेंव्हा पुढच्या महिन्यात तुमची नोकरी गेली तरी तो पगार परत ८०० रुपये होत नाही. किंवा या वर्षी तुम्ही बोनस दिलात कि पुढच्या वर्षी पगार भरपूर वाढवला तरी बोनस हा द्यावाच लागतो कारण तो हक्क झालेला असतो. याप्रमाणेच सरकारने जन्म दरिद्री माणसाला फुकट घर दिले, फुकट गॅस सिलिंडर दिला किंवा शौचालयासाठी सबसिडी दिली कि पुढच्या वेळेस तो त्याचा हक्क होतो आणि जो कोणी अधिक देण्याचे, कर्जमाफीचे आश्वासन देतो तोच माणूस जास्त चांगला ठरतो. माझ्या मुलाला मी हि गोष्ट समजावताना एकच सांगितलॆ कि उद्या तू व्यवसाय सुरु करशील तेंव्हा हि फार महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची कि उत्तम काम केले तर कर्मचाऱ्याला २०० रुपये पगारवाढ न देता एकदम घसघशीत १००० रुपये बक्षीस द्यायचे. कारण पुढच्या ६ महिन्यात पगारवाढ हा हक्क होऊन जातो आणि कर्मचाऱ्याला त्यात काय एवढे मी हुशार म्हणून पगारवाढ दिली असे वाटू लागते. पण १००० रुपये बक्षीस हे चांगल्या कामाचा मोबदला असतो आणि त्याने परत चांगले काम केले "तर आणि तरच" तुम्ही त्याला देणे लागता. ता. क.- याचा राजकारणाशी संबंध नाही.

In reply to by सुबोध खरे

मोदी सरकार शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणार?, पराभवानंतर ऐतिहासिक निर्णय घेण्याची शक्यता... राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडसह पाच राज्यातील अपयशामुळे हादरलेल्या मोदी सरकारकडून शेतकरी कर्जमाफीचा ऐतिहासिक निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. पंतप्रधान मोदी हे तब्बल ४ लाख कोटींच्या कर्जमाफीचा निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे.

In reply to by सुबोध खरे

दहशतवादी हल्ले ह्याचे अत्यंत दुर्दैवी उदाहरण ठरू नयेत. गेल्या चार वर्षांत दहशतवाद्यांचे हल्ले, बाँबस्फोट ह्यांचे प्रमाण प्रचंड कमी झाले आहे. हा मुद्दा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दुर्लक्षित करण्यासारखा नाही.

In reply to by सुबोध खरे

मिपावरिल ( माझ्या सहित ) खोट्या आइडी च्या दुनियेत फक्त ' खरे ' सारखे खरे खुप कमी आहेत ,जे मुखवटे घालून वैयक्तिक हल्ले करत नाहीत .

खूप आनंद झाला. खास लॉगिन करुन प्रतिसाद देतोय. भाजपाचा पराभव का झाला ते इथलेच काही - हरल्यावर आता मतदारांचीच लायकी काढणारे - प्रतिसाद वाचून लगेच लक्षात येते. किती माज! शेवटी मुस्काटात बसली!! आता तरी जागे व्हा. बाकी काय म्हणता प्रा. डॉ. साहेब.

‘काय करू नये, हे मोदींकडून शिकलो’ अशी अाहे. बाकी कोणी काही का म्हणेना, रागा थोडेफार शिकत अाहेत.

In reply to by स्वधर्म

रागा'ने निवडणूक निकालानंतरची दिलेली प्रतिक्रिया बर्यापैकी सयंत होती. ही खरी आपली भारतीय परंपरा आहे. विजयाने जास्त हवेत उडू नये. .... अहंकारचा वारा न लागो राजसा... हा वारा लागला की जनतेने आपली ताकद दाखवलीच म्हणून समजा.

मतिमंद का फेकू अशा द्विधा मनःस्थितित सापडलेल्या मतदारानीं शेवटी सध्यातरी मतिमंदा च्या पारड्यात थोड़े जास्तच वजन टाकले आहे !!!! पण काँ .च्या इतर नेत्यासारखे या मतिमंद मध्ये धडाडी , कर्तबगारी , वाक्चातुर्य , नियंत्रण व नेतृत्व कौशल्य ,आणि उच्च बुद्धिमत्ता नसल्यामुळे येड्या गबाळ्याला मुलगी दिलेल्या बापा सारखी अवस्था मतदारांची होणार . महाराष्ट्रातील भाजपा चे विद्यामान खासदार , आमदार , नगरसेवक आणि गाव शहरातील भाजप कार्यकारणी मंडळ , सतत जनसंपर्क असणारे कार्यकर्ते आणि मिपासारख्या संस्थाळावरील स्वयंघोषित महात्मा मंडळीनीं अहंकार , जातिद्वेष बाजूला ठेवून सामान्य जनतेशी नाळ जोडण्याचा प्रयत्न नाही केला तर अशाच निकालाची महाराष्ट्रात पुनरावृत्ति होईल हे नक्की .

तीन राज्यात काँग्रेस निवडून आल्याबद्दल काँग्रेसचे अभिनंदन. भाजपाला हरवल्याची भावना एवढी तीव्र आहे की सात पूर्वोत्तर राज्यातले मिझोरम नावाचे सत्ता असलेले एकमेव राज्य काँग्रेसने गमावल्याचे दुःख फारसे टोचत नसावे.राजस्थानात भाजपचा पराभव होईल ह्याचा अंदाज खुद्द भाजपलाही नसावा असे म्हणणे धार्ष्ट्याचे ठरेल.मध्य प्रदेशात निम्म्याच्या जवळपास जागा मिळवल्याने ह्या पराभवाला दारुण म्हणता येऊ नये. काही महिन्यानंतर होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी ह्या विजयाचा कितपत फायदा होईल ते आत्ताच सांगता येणार नाही. महागठबंधनमध्ये काँग्रेसचा क्षीण असलेला आवाज आता आत्मविश्वासपूर्ण होईल. पण पडद्यामागे काँग्रेस आणि मायावती ह्यांमध्ये काय बोलणी झाली आहेत ह्यावर बरेच काही अवलंबून आहे.मध्य प्रदेशात मायावतींच्या पाठिंब्यावर काँग्रेस सरकार स्थापन करणार असल्याच्या बातम्या आहेत. बहेनजी ह्याची किंमत पुरेपूर वसूल करतील.त्यामुळे बाकीचे सहभागी पक्ष साशंक राहतील. तसेच आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला पाठिंबा देणार नाही असे मायावती जाहीर करून बसल्या असल्या तरी स्वतःचीच विधाने गिळणे त्यांना कठीण नाही. चार महिन्यातच चित्र स्पष्ट होईल. ह्या विजयाचे श्रेय रागाला देण्याची चढाओढ आता सुरु होईल.जर ते खरंच बदलले असले, तर ह्या विजयाचा फायदा उचलण्यात काही अडचण येऊ नये. पण हुरळून जाऊन गाफील राहिले तर ते भाजपाला हवेच आहे.संसदेत कितीही राफेल राफेल आरडाओरडा केला, तरी फारसा काही प्रभाव पडेल असे वाटत नाही.तसंपण सर्वोच्च न्यायालयात खटला चालू आहेच.राफेल कराराबाबत सर्वोच्च न्यायालयाने देशहिताचा निर्णय दिला तर भाजप त्याचा फायदा घेईल.मधल्या काळात जर मल्ल्याला परत आणण्यात यश मिळाले, तर मोदींनी त्याला पळून जायला मदत केली हे बालंट परस्पर निकाली निघेल.आगामी चार महिन्यात मोदी काय खेळी करणार आहेत हे प्रत्यक्ष अनुभवल्याखेरीच चित्र स्पष्ट होणार नाही. लोकसभा आणि विधानसभा ह्या निवडणुकींमध्ये महदंतर आहे. भाजपने आतातरी सावध होऊन पुढची पावले टाकायला हवीत.महागठबंधनचे नेतेपद काँग्रेसकडे, पर्यायाने राहुल गांधींकडे यावे ह्यासाठी काँग्रेसच काय भाजप पण पडद्याआडून प्रयत्न करण्याची शक्यता आहे.घराणेशाही हा भाजपच्या प्रचारातील एक मुद्दा आहे, त्याला ते सहाय्यकारकच ठरेल.ह्या तीन राज्यात जी आश्वासने काँग्रेस ने दिली होती, ती ते किती पूर्ण करू शकतात हा महत्वाचा मुद्दा ठरू शकतो.मोदी सरकारबद्दल नाराजी असल्याने काँग्रेसला निवडून दिले अशी भावना असेल तर काँग्रेस आश्वासने पूर्ण करू शकला नाही तर मतदार गोंधळात पडेल आणि गोंधळात असलेल्या, कुंपणावर बसलेल्या मतदारांना आपल्याकडे वळवण्यात भाजप माहीर आहे. भाजपने प्रचारात विकासाचा मुद्दा सोडला होता हे खरे आहे आणि पराभवात त्याचा वाटा नक्कीच आहे. पण काँग्रेसच्या बाजूनेसुद्धा विकास हा मुद्दा फारसा लावून धरण्यात आला नव्हता असे मला वाटते.मोदी सरकारच्या चुका, जनतेबद्दलची नाराजी आणि मोदींवर केलेले आरोप ह्यांचा फायदा काँग्रेसने उचलला असला तरी तेच मुद्दे परत लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात वापरता येणार नाहीत.राफेलचा एकमेव मुद्दा मध्यला काळात जर निकालात निघाला तर वैयक्तिक आरोप करण्यावर मर्यादा येईल. आंतरराष्ट्रीय राजकारण, शेजारी राष्ट्रांशी संबंध, बेरोजगारी हे मुद्दे मला नीट हाताळता येऊ शकतील असा विश्वास रागांच्या बोलण्यातून आणि देहबोलीतून प्रगट झाला तर काँग्रेसला मतदारांच्या एका वर्गावर(मध्यमवर्गीय, लहान व्यावसायिक, व्हाईट कॉलर जॉब करणारे इ.) प्रभाव पाडता येईल.ते कितपत शक्य आहे ह्याची शंकाच आहे. सर्व मते वैयक्तिक.

विरोधी पक्षांनी एक चतुर खेळी खेळायला सुरवात केली आहे. मुद्दामुन जिथे तिथे गडकरींना हाईलाईट करणे मोदींऐवजी. राजतिलक कि करो तैयारी,आ रहे है नितीन गडकरी वगैरे मेसेज कायप्पावर फिरायला सुरवात झाली आहे. आतापर्यंत मोदींना पंतप्रधान पदासाठीचा एक स्थिर उमेदवार म्हणुन जाहीरात करणे हा भाजपचा एक प्लस पॉईंट होता पण इथेही मोदींना पक्षांतर्गतच प्रतिस्पर्धी लादुन भाजपची अवस्था बाकीच्या पक्षांसारखी करायचा डाव असु शकतो. येणारे चार महीने रा.गांनी जर व्यवस्थितपणे हाताळले तर परिस्थिती पूर्ण विरूध्द होऊ शकते मह्णजे विरोधी पक्षांकडे एक प्रमुख दावेदार आहे पंप्र पदासाठीचा व भाजपात संदिग्धता आहे ह्या अर्थाने. कुटील राजकारणी डावपेचांचा कस आता लागेल. काँग्रेसने जर ह्या निवडणुकीत आश्वासन दिल्याप्रमाणे एखादी दुसरी प्रमुख मागणी जशी शेतकरी कर्जमाफी अंशतः जरी मान्य केली तर भाजपची अवस्था ह्या राज्यांतही अजुन बिकट होऊन जाईल. २०१४ पूर्वी मोदींच्या बाबतीत विरोधी पक्षांनी केलेली नकारात्मक जाहीरात मोदींनाच फळभूत ठरली.आता ही गोष्ट रा.गांबाबत होऊ लागली आहे. जितक्यावेळा म्हणुन पप्पू म्हणुन आता हेटाळणी होईल तेव्हा तेव्हा त्यांची आपसूकच प्रसिध्दी होत राहील.

In reply to by कानडाऊ योगेशु

उत्तर प्रदेश नवनिर्माण सेना ही मनसेची उत्तर प्रदेशातली शाखा असेल काय ? बाकी भाजपात अंतर्गत बंडाळी असल्याचे चित्र निर्माण झाले तर भाजपला २०१९ खूप जड जाईल इतके नक्की.