आज

क्रान्ति's picture
क्रान्ति in जे न देखे रवी...
12 Mar 2009 - 10:58 pm

नक्कीच काहीतरी चुकतय आज
कशान हे मन वेड दुखतय आज?

कधीच्या सुचलेल्या दोनच ओळी
पिंगा घालतात भलत्याच वेळी
अनावर रात्री चांदण्याची खेळी
सृजनाच सुख सुद्धा खुपतय आज!

मनातल गाणही ओठांवर नाही
सुरांच गाव कुठे दूरवर राही
उजाड माळ का वाट माझी पाही?
आभाळही पापण्यांत झुकतय आज!

उदास झाडांची गळतात पानं
निस्तेज चंद्राच वितळून जाणं
धुक, जस दुखणं जुनं-पुराणं
उफाळून पुन्हा का सलतय आज?

कविताप्रकटन

प्रतिक्रिया

प्राजु's picture

12 Mar 2009 - 11:24 pm | प्राजु

फार फार फारच सुंदर...!
उजाड माळ का वाट माझी पाही?
आभाळही पापण्यांत झुकतय आज!

अप्रतिम..!
उदास झाडांची गळतात पानं
निस्तेज चंद्राच वितळून जाणं
धुक, जस दुखणं जुनं-पुराणं
उफाळून पुन्हा का सलतय आज?

जबरदस्त!!!!!!
हॅट्स ऑफ!
काय बाय सांगू? कसं गं सांगू... काही तरी होऊन गेलंय आज.. याची आठवण झाली.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

12 Mar 2009 - 11:27 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सर्वच ओळी आवडल्या !

अवलिया's picture

12 Mar 2009 - 11:32 pm | अवलिया

हेच बोल्तो

--अवलिया

शितल's picture

12 Mar 2009 - 11:40 pm | शितल

सहमत. :)

बिपिन कार्यकर्ते's picture

12 Mar 2009 - 11:36 pm | बिपिन कार्यकर्ते

क्रांतिबै, झक्कास लिहिता तुम्ही. मस्त.

कधीच्या सुचलेल्या दोनच ओळी
पिंगा घालतात भलत्याच वेळी

बिपिन कार्यकर्ते

चतुरंग's picture

12 Mar 2009 - 11:38 pm | चतुरंग

सुंदर कविता!

कधीच्या सुचलेल्या दोनच ओळी
पिंगा घालतात भलत्याच वेळी
अनावर रात्री चांदण्याची खेळी
सृजनाच सुख सुद्धा खुपतय आज!

क्या बात है!!
केव्हापासूनचं मनात पडलेलं कल्पनेचं बीज हे कोणत्यातरी बेसावध क्षणी असं कवितेच्या रुपानं उगवतं.
निर्मितीचं गुपितच एकप्रकारे सांगणार्‍या ह्या ओळी फार भावल्या!
तुमच्या साध्या शब्दातल्या कविता थेट भिडतात!! जियो!!!

चतुरंग

बिपिन कार्यकर्ते's picture

12 Mar 2009 - 11:42 pm | बिपिन कार्यकर्ते

एकदम करेक्ट रंगासेठ... खूपच भावल्या त्या ओळी.

बिपिन कार्यकर्ते

बेसनलाडू's picture

13 Mar 2009 - 1:31 am | बेसनलाडू

(सहमत)बेसनलाडू

जयवी's picture

13 Mar 2009 - 12:48 am | जयवी

सृजनाच सुख सुद्धा खुपतय आज ....... अगदी अगदी :)
आज काय बाई होतंय आमच्या क्रांतिला........;)

मनीषा's picture

13 Mar 2009 - 8:02 am | मनीषा

एकेक ओळ सुरेख ..
खूप छान कविता .. आवडली !

राघव's picture

13 Mar 2009 - 12:15 pm | राघव

खूप छान :)

राघव

प्रमोद देव's picture

13 Mar 2009 - 8:14 am | प्रमोद देव

:)

आम्ही कोणत्याही कंपूत नाही. कारण आमचा स्वतःचाच एक कंपू आहे. ;)

क्रान्ति's picture

13 Mar 2009 - 9:33 pm | क्रान्ति

आज खरच खूप छान वाटतय. इतक्या सगळ्या रसिक आणि गुणग्राही मित्रांक्डून माझ्या वेड्यावाकुड्या अक्षरांच इतक कौतुक होतय! माझे जुने दिवस परत आलेत! सगळ्यांना धन्यवाद देण्यापेक्षा या ॠणात रहाण मला जास्त आवडेल.
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}

शिवापा's picture

13 Mar 2009 - 9:48 pm | शिवापा

अप्रतिम! शामसे आंख मे नमीसी है आठवले.