नक्कीच काहीतरी चुकतय आज
कशान हे मन वेड दुखतय आज?
कधीच्या सुचलेल्या दोनच ओळी
पिंगा घालतात भलत्याच वेळी
अनावर रात्री चांदण्याची खेळी
सृजनाच सुख सुद्धा खुपतय आज!
मनातल गाणही ओठांवर नाही
सुरांच गाव कुठे दूरवर राही
उजाड माळ का वाट माझी पाही?
आभाळही पापण्यांत झुकतय आज!
उदास झाडांची गळतात पानं
निस्तेज चंद्राच वितळून जाणं
धुक, जस दुखणं जुनं-पुराणं
उफाळून पुन्हा का सलतय आज?
Taxonomy upgrade extras
| लेखनविषय: |
|---|
वाचने
4116
प्रतिक्रिया
14
मिसळपाव
प्रतिक्रिया
आईऽऽऽगं..
सुंदर कविता...
हेच
In reply to सुंदर कविता... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
+१
In reply to सुंदर कविता... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मस्त...
वा क्रांतीताई!
एकदम
In reply to वा क्रांतीताई! by चतुरंग
असेच म्हणतो
In reply to वा क्रांतीताई! by चतुरंग
सृजनाच सुख
कशान हे मन वेड दुखतय आज?
असेच म्हणतो.
In reply to कशान हे मन वेड दुखतय आज? by मनीषा
वा! मस्त!
आज
सुरेख