फुकटात विनासायास वेटलॉस

शाम भागवत's picture
शाम भागवत in काथ्याकूट
3 Jul 2018 - 12:39 pm
गाभा: 

वाढलेला पोटाचा घेर व वाढलेले वजन, सोबतीला कोलेस्टेरॉल सापडल्यामुळे नशिबी आलेल्या गोळ्या आणि आता या आयुष्यभर घ्यावयाच्या आहेत अस डॉ. नि सांगितल्यावर मनाला बसलेला हबका. काही जणांचा वाढलेला रक्तदाब व त्यावरच्या गोळ्या , मधुमेह पूर्व स्थिती लक्षात आल्यावर उडालेली घाबरगुंडी तर मधुमेह झाल्याचे निदान झाल्यावर घरातल्या सर्वांच्या चेहऱ्यावर अवतरलेली काळजी. आणि या सगळ्यातून हे खा व हे खाऊ नका ची भली मोठी यादी. शिवाय गुडगेदुखी, ऍसिडिटी , .. , .., .. असच बरच काही यांच्यासाठी हे लिहितोय.

ह्या सगळ्या त्रासातून कस मुक्त व्हायच?, एक पैसा जास्त खर्च न करता हे कस साधायच? श्रीमंत असो की गरीब दोघांनाही जमू शकेल,तसेच स्त्री पुरूषात अजिबात भेदभाव न करता दोघांनाही एकच पद्धत कशी वापरता येईल, तसेच त्यामागे विज्ञानाचा भक्कम पाठिंबा असला पाहिजे. वगैरे वगैरे .......
थोडक्यात आखूड शिंगी, बहुदुधी, गरीब, दूध काढताना लाथा न मारणाऱ्या बहुगुणी गायीबद्दल हे लिहितोय.

कै. डॉ.श्रीकांत जिचकार एक अवलिया माणूस. एमबीबीएस, एमडी झाल्यावर आयपीएस त्यानंतर चक्क आयएएस. पण चारच महिन्यात नोकरीचा राजीनामा देऊन आमदार, मग मंत्री, राज्यसभेचे खासदार. या माणसाने प्रगती तरी किती वेगाने करावी? पण हे सगळं ४९ वर्षांच्या आयुष्यात साधायच म्हणजे एवढा वेग हवाच की हो!

घरातल्या ग्रंथालयात बावन्न हजार पुस्तक. विद्वत्ता दाखविण्यासाठी जाहिरात म्हणून नक्कीच जमवलेली नसणार. उलट सगळी वाचलेली असण्याची शक्यता जास्त. कारण ४२ विद्यापीठातून मिळवलेल्या २० पदव्या. बहुतेक सगळ्या प्रथम श्रेणीतून मिळालेल्या. २८ सुवर्णपदक मिळवलेला माणूस हा. नक्कीच पुस्तके वाचलेली असणार.

तर असा हा माणूस. भरपूर परदेश वाऱ्या केलेला असूनही त्याची भारताशी जुळलेली नाळ तुटली नव्हती. साधारण अशी माणसे थोडीशी भारतीय संस्कृतीशी फटकून वागतात. पण इथेही आपल्याला आश्चर्याचा धक्का बसतो. भारतीय संस्कृती व प्राचीन इतिहास, तत्त्वज्ञान व संस्कृत यात एमए केलेय. हे मी आपल वानगीदाखल सांगतोय कारण तस पाहिल तर त्यांनी १० विषयात एमए केलेय. इतकच काय मानाची डी. लिट. पदवी मिळालीय त्यांना संस्कृतामध्ये.

तर सांगायच म्हणजे अशा माणसाने १९९७ साली एक नवीन विचार भारताला दिला. त्यावेळी ते राज्यसभेचे सभासद होते. पुणे महानगर पालिकेत मा. शशिकांत सुतार नावाच एक मोठ्ठ प्रस्थ होत. त्यांनी बालगंधर्व रंगमंदिरात जिचकारांना भाषणासाठी बोलावल. त्यासाठी सगळी व्यवस्था जातीने केली. आपोआपच बरेच मान्यवरांनी रंगमंदिर भरून गेल.

त्यांनी सांगितल की, "शरीरात तयार होणारे अतिरिक्त इन्शूलीन बऱ्याच रोगांचे कारण आहे." स्थूलता, त्यातून मधुमेह, वाढलेला रक्तदाब, त्यातून मग अंजोग्राफीची तपासणी, त्यात नक्की काहीतरी सापडतच. मग अंजोप्लास्टी. सगळाच प्रकार खर्चिक. पण मरणाची भीती वाटायला लागली की माणूस करतो खर्च. त्याला वाटतं की झाल सगळ करून. आता काही आपल्याला होणार नाही. पण कसच काय. पाच सहा वर्षात आणखी खर्चिक बायपाससाठी हॉस्पिटलची वारी ठरलेली.

मग यावर सोपा उपाय काय? दिवसातून फक्त दोनदाच जेवा. काहीही खा. भूक भागेपर्यंत कितीही खा. तूप लोणी बिनधास्त खा. मांसाहारही चालेल. फक्त हे जेवण ५५ मिनिटांत संपवले पाहिजे. आणि दिवसातून ४५ मिनिटे भरभर चालण्याचा व्यायाम केला पाहिजे. महागड्या जिम नको की, आहारतज्ञांना पैसे द्यायला नको. दवाखान्याची पायरी चढायची कधी वेळही येणार नाही. किती सोपे आहे ना? पण अवघड बाब पुढे आहे. ते पुढे सांगतात की, "दोन जेवणामध्ये काहीही खाऊ नका." याकाळात तोंड उघडायचे ते फक्त बोलण्यासाठी किंवा पाणी पिण्यासाठी. बस्स. औषधांच्या याद्या विसरून जा. हे खा व हे खाऊ नका याची प्रत्येक डॉक्टर व आहारतज्ञांप्रमाणे बदलणारी यादी व त्यातून उडणारे गोंधळ संपवून टाका.

सगळ वैज्ञानिक नियमावर आधारलेले भाषण. समोर अनेक मान्यवर बसलेले. त्यामुळे बऱ्याच वेळेस अशी भाषणे इंग्रजीत चालतात आणि जिचकार तर इंग्लिश लिटरेचर मध्येपण एमए केलेले. पण तरीही हा विचार सर्वसामान्य माणसाला कळला पाहिजे यासाठी हे भाषण त्यांनी मराठीतून दिले आहे. समोर नुसते मान्यवर नाही तर पुण्याचे मान्यवर बसणार आहेत म्हणून त्यांनी अनेक इंग्रजी संज्ञांना पूरक मराठी संज्ञा शोधून काढल्या होत्या व त्या संज्ञा पाठ करून मगच ते व्याख्यान द्यायला आले होते. (या मराठीतील संज्ञा शोधणे व पाठ करणे हे कामही त्यांना सोपेच गेलेले असणार. कारण ते महाराष्ट्राच्या विश्वकोश निर्मिती मंडळाचे सभासद होते!!!) एखाद्या माणसाला बेंबीच्या देठापासून कळकळ असते म्हणजे काय हे समजून घ्यायचे असेल तर त्यासाठीही हे व्याख्यान ऐकायला हरकत नाही.

आपल्या या कार्याचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी "नागपूर फिटनेस मुव्हमेंट" आणि "पुणे फिटनेस मुव्हमेंट" अशा दोन संस्था सुरू केल्या. पण त्या काळात फेसबुक किंवा व्हॉटऍपस वगैरे काहीच नव्हत. नाहीतर याचा प्रसार फार वेगाने झाला असता. मनोगत, मायबोली किंवा मिसळपाव सारखा एखादा संकेतस्थळ तयार करता अल्लाही असत कदाचित. पण वाचणार कोण? इंटरनेट फार महाग होत त्यावेळेस. टाटा कंपनीच्या व्हीसएनएल ला वर्षाकाठी पाच सहा हजार भरल्यावर कनेक्शन मिळायच. शिवाय घरात फोन असला पाहिजे ही पूर्वअट. आणि नेट वापराला सुरवात झाली की दर मिनिटाला एक टेलीफोनचा कॉल एवढे पैसे टेलिफोनच्या बिलात यायचे तो खर्च वेगळाच. नेट वापरणे हे सामान्यांच्या कुवती बाहेरची गोष्ट होती. अपवाद फक्त आयटी मधल्या लोकांचा!

तरीपण राज्यसभेच्या सदस्याला बऱ्याच सोयी सुविधा असतात. ओळख पाळख असते. त्यामुळे प्रसाराचे काम चालू होते. पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच होते. दोनच वर्षांनी म्हणजे १९९९ साली झालेल्या लोकसभेच्या निवडणूकीसाठी काँग्रेसकडून त्यांना तिकिट मिळाल पण फक्त ३०००+ मतांनी पडले. इतकेच नव्हे तर राज्यातले आणि त्याचबरोबर केंद्रातले काँग्रेसचे सरकार पडले. प्रसारावर फारच मर्यादा आल्या.सर्वात मोठे दुर्दैव म्हणजे २००४ साली जेव्हा कॉग्रेसचे सरकार राज्यात व केंद्रात आले त्यानंतर दोनच आठवड्यात त्यांचा अपघाती मृत्यू झाला. मला वाटते या नवीन विचारांचे फक्त बी लावायचे काम नियतीने त्यांच्यावर सोपवले होते.

त्यांचा या भाषणाचा एक ऑडिओ यूट्यूबवर होता. पण दोन तास तीन मिनिटांचा ऑडिओ म्हटल्यावर बरेच जण तो उघडून सुद्धा बघत नसत. आणि यदाकदाचित कोणी उघडलाच तर बरेच जण पहिले प्रास्ताविक संपेपर्यंतही कळ काढू शकत नसत. त्यामुळे मूळ भाषण सुरू होण्याआधीच तो बंद केला जायचा. एवढा वेळ असल काही ऐकायला तो थोडाच वपू किंवा पुल चा व्हिडिओ होता की व्यायाम/प्रवास करताना ऐकायचा गाण्याचा अल्बम होता? ही राजकारणी लोक ही अशीच. समोर माइक आला की यांना वेळेच भानच राहत नाही. अशी कॉमेंटपण कोणीतरी केली असेल असा मला दाट संशय आहे.

बरीच वर्षे निघून गेली. जिचकारांनी लावलेले बी रूजण्यासाठी अनुकूलतेची वाट पाहत युट्युबवर पडून होत. ही अनुकुलता लाभणे फार अवघड होत. त्याला वेळ लागणार हे त्या बियाणाला माहीत होत. आणि सहा वर्षापूर्वी ते एकाच्या हृदयात रूजल. हा माणूस एमबीबीएस, एमडी होता. पण रोग पाहून औषध देणारा नव्हता. तर रोग होऊच नये यासाठी काय करता येईल यातला तज्ञ होता. प्रामाणिक होता. पैशासाठी काम करणारा नव्हता. समाजाच्या भल्यासाठी काम करण्याची इच्छा असणारा असा होता. मुख्य म्हणजे माहिती वाचून चर्चा करणारा नव्हता तर त्यासाठी स्वतःवर प्रयोग करायला तयार असणारा व त्यासाठी स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करायला तयार असणारा होता. नियतीने अगदी अचूकरीत्या लातूरच्या डॉ. जगन्नाथ दीक्षित यांची निवड केली होती.

डॉ. दीक्षित सध्या ते लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विभाग प्रमुख आहेत व गेली सत्तावीस वर्षे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अध्यापन करत आहेत. "स्थूलत्व निवारण आणि मधुमेह प्रतिबंध" या विषयावर त्यांनी संशोधन केले.यात त्यांनी प्रथम स्वतःवर प्रयोग केले. नातेवाइकांवर प्रयोग केले. जवळच्या मित्रांवर प्रयोग केले. या सगळ्याच्या व्यवस्थित नोंदी ठेवल्या. मग मात्र त्यांनी लातूर व औरंगाबाद येथील हजारो लोकांवर प्रयोग केले. वैज्ञानिक नियतकालिकात प्रबंध लिहिण्यासाठी या प्रयोगाचे योग्य दस्तावेजीकरण केले व अनेक प्रबंध प्रकाशीतही केलेले आहेत.

पण प्रसारासाठी नुसते प्रबंध लिहून भागत नाही यासाठी त्यांनी व्याख्याने द्यायला सुरवात केली. पुण्याच्याच बालगंधर्व रंगमंदिरात कै. डॉ. श्रीकांत जिचकारांच्या स्मृतीला अभिवादन करून सुरवात झालेले त्यांचे व्याख्यान ऐकण्यासाठी खाली लिंक देत आहे. हेही व्याख्यान खूप मोठे आहे. पहिले प्रास्ताविक ३० मिनिटे चालते. त्यामुळे व्याख्यानासाठी आतुर झालेले बरेच जण कंटाळून पहिल्या काही मिनिटांनंतर व्याख्यान बंद करून टाकतात. हे प्रास्ताविक पाहू नये म्हणून मी हे सांगत नाहीये. तर थोडा धीर धरावा असे सुचवत आहे. या प्रास्ताविकातूनही तुम्हाला काही मुद्दे मिळू शकतात.

२०० च्या वर व्हॉटऍपस ग्रुप स्थापन करून व फेसबुकच्या माध्यमातून ही चळवळ अठ्ठावीस हजार माणसांपर्यंत पोहोचली आहे. अनेक देशातील माणसे यात आहेत. पण हे सगळे सांभाळणे आता अवघड होत चाललेय. कार्यकर्त्या डॉक्टरांना यासाठी वेळ देणे अवघड होत चाललेय. यासाठी आता एक वेबसाईटच उघडायचे प्रयत्न चालू आहेत. तस झाल की एकाच ठिकाणी सगळी माहिती एकत्रित होईल. वेळ वाचेल. एक कोटी लोकांपर्यंत लोकांपर्यंत पोहोचायचे उद्दिष्ट समोर ठेवून आता काम सुरू होणार आहे.

खर म्हणजे ह्या व्याख्यानाचा सारांश देण्याचा माझा विचार होता. पण मी मुद्दामहून तस करत नाहीये. कारण तस केले तर लोक मूल व्याख्यान न ऐकताच चर्चा करायला सुरवात करतात. हे व्याख्यान ऐकल्यावर फारशा शंका उरत नाहीत. शिवाय त्यांनी काही फोन नंबरही दिलेले आहेत. त्यावर तुम्ही व्हॉटऍपवर प्रश्न किंवा शंका विचारू शकता.

डॉ. दीक्षित यांच्या व्याख्यानाची लिंक खाली देत आहे. दोन तास सलग वेळ काढता येईल अशी वेळ निवडून निवांतपणे पहा.
https://www.youtube.com/watch?v=edKaI5gxaNQ

ही डॉ. दीक्षित यांची फेसबुक पेजची लिंक आहे. त्यात लाभार्थींची नावे, अनुभव व मोबाईल नंबर दिले आहेत.हे तुम्ही केव्हाही पाहू शकता! https://www.facebook.com/weightlosseffortlessly/

डॉ. जिचकार यांनी याच व्याख्यानात बी पेरण्याचे काम केले. हा ऑडिओ आहे. दोन तास सलग वेळ काढता येईल अशी वेळ निवडून निवांतपणे पहा.
https://www.youtube.com/watch?v=8-kw3hGUwW4

मी स्वतः या विषयातला तज्ञ नाही. पण या संकेतस्थळावर या विषयातले बरेच तज्ञ असल्याने साधक बाधक चर्चा होऊन हा विषय आणखी स्पष्ट होईल याहेतूने हे लेखन केले आहे.

एक महत्त्वाची सूचना :
ज्यांना मधुमेह आहे अशांनी HbA1c आणि fasting insuline या दोन तपासण्या करून त्याचे अहवाल डॉ. दीक्षित यांना पाठवावेत. या दोन तपासण्या म्हणजे रक्तातल्या शर्करेचे प्रमाण दाखवणाऱ्या तपासण्या नव्हेत. त्यानंतर त्यांच्याच सल्ल्यानेच पुढील आहारयोजना सुरू करावी. परस्पर आहारयोजना सुरु करू नये.

--------------------------------------------------------------
(श्री. शाम भागवत यांचा खालील एक प्रतिसाद लेखात समाविष्ट केला आहे.)

एकदाच ऐकून भाषणातले सगळे मुद्दे लक्षात राहणे शक्य नसते. परत दोन तास देणे कंटाळवाणे होऊ शकते किंवा नंतर बघू अस म्हणत लांबणीवर पडते.

यासाठी एक लिंक देत आहे. तो VDO आहे. डॉ. दिक्षीतांनीच सारांश रुपात सगळे सांगितले आहे. नुसते ऐकूनही उजळणी करता येऊ शकेल. तसेच डॉक्टरांनी बरेच तक्ते बनवलेले असून त्यातले दोन महत्वाचे दाखवले जातात. त्यांचे screenshot घेऊन ठेवल्यास सर्व संदर्भ अगदी हाताशी राहू शकतील. कोणालाही थोडक्यात सांगायचे असल्यास खूप उपयोगाला येतात.

तुम्हाला आलेल्या अडचणीमुळे मला हे सुचले म्हणून तुम्हालाच धन्यवाद व शुभेच्छा.

https://youtu.be/99iQOs-u_HU

प्रतिक्रिया

छिद्रान्वेषी नजरेने या विषयावर नवीन काळात काय जेन्युईन मतप्रवाह आहेत ते अनेक दिवस शोधल्यावर थोडे थोडे अनेकदा खाणे या पद्धतीमध्ये दोन वेळा पूर्ण जेवण घेण्याच्या पद्धतीपेक्षा विशेष फायदा नसावा असं दिसून येतं आहे. उलट दोन वेळा व्यवस्थित (आचरट प्रमाणात नव्हे) खाणं जमल्यास ते जास्त फायदेशीर असल्याचे निष्कर्ष मिळताना दिसतात. म्हणजे हा शास्त्रीय मार्ग आहे आणि फॅड डाएट नव्हे असं नक्की म्हणता येईल. दोनदाच खाण्याच्या अन्य काही उजव्या बाजू परत नोंदवण्याचा प्रयत्न करेन.

मुख्य पटणेबल मुद्दा म्हणजे "अनेकदा थोडं थोडं" या प्रकारात प्रत्येक वेळी थोडंसंच जास्त जास्त खाल्लं जातं आणि एकूण दिवसात कॅलरीची बेरीज फारच वाढू शकते.

स्वतः कोणतंही सर्टिफिकेट किंवा निवाडा देण्याचा हक्क किंवा ज्ञान नसूनही तूर्तास "वेलकम" मधल्या आरडीएक्सच्या स्टाईलमध्ये म्हणायचं तर "डॉ. दीक्षितजी और ऋजुताजी के बीच डॉक्टरसाब का पलडा अभी बहुत भारी है.." :-)

आपल्या सहभागाने खूप बरे वाटले.
_/\_

सुबोध खरे's picture

20 Jul 2018 - 9:42 am | सुबोध खरे

आपला मुद्दा एकदम मान्य आहे. कारण थोडंसं याची व्याख्या कुठेच नाही.
उदा. माझ्याकडे सोनोग्राफी साठी आलेल्या एका स्त्रीला मी विचारले कि आपण संध्याकाळी काय खाल्लं आहे. त्यावर त्या म्हणाल्या काहीच नाही. त्यांचे पित्ताशय आकुंचन पावलेले होते( रिकाम्या पोटी पित्ताशय आकुंचन पावणे हि पित्ताशयात रोग असण्याची लक्षणे आहेत) म्हणून मी परत विचारले, " काहीच नाही? चहा पण नाही?"
त्यावर त्या म्हणाल्या चहा घेतला आणि त्याबरोबर दोन बिस्कीटे खाल्ली पण ती "मारी"ची होती. मी विचारले अजून काय खाल्ले तर त्यांचे यजमान त्यांना म्हणाले कि ढोकळ्याचे तीन तुकडे खाल्लेस ना?
तात्पर्य -- थोडंसं हे फारच सापेक्ष आहे. त्यामुळे आम्ही काहीच खात नाही पासून आम्ही अगदी थोडंसंच खातो पर्यंत दवे करणाऱ्यांचे वजन कमी होतच नाही.
यामुळे डॉ दीक्षितांची दोनच वेळेस जेवण घेण्याची उपचारपद्धती हि यशस्वी होण्याची शक्यता जास्त आहे असे मला वाटते.

प्रकाश घाटपांडे's picture

20 Jul 2018 - 9:17 am | प्रकाश घाटपांडे

एक ऐकलेला सोपा डाएट
पोटाचे चार भाग करा. दोन भाग अन्न खा एक भाग पाण्यासाठी ठेवा व एक भाग वायु साठी ठेवा. संपला डाएट

प्रकाश घाटपांडे's picture

20 Jul 2018 - 9:22 am | प्रकाश घाटपांडे

चार समान भाग बर का!!

सुबोध खरे's picture

20 Jul 2018 - 9:23 am | सुबोध खरे

घाटपांडे साहेब
तिथेच तर गोची आहे.
लोक एक भाग वायूचा ठेवतात.
मग ढेकर देतात आणि वायू काढून टाकतात.
आणि मग तो भाग परत अन्नाने भरतात.

ओम शतानन्द's picture

18 Aug 2018 - 10:42 am | ओम शतानन्द

एक ऐकलेला सोपा डाएट
पोटाचे चार भाग करा. दोन भाग अन्न खा एक भाग पाण्यासाठी ठेवा व एक भाग वायु साठी ठेवा. संपला डाएट

मुळात प्रत्येकाने आपल्या पोटाचा/जठराचा volume आकारमान किती आहे ते आधी शोधायला हवे.
मग त्याचा पाव भाग किती व त्याप्रमाणे दोन * पाव भाग अन्न volume/ आकारमान निश्चित करता येईल .
दुसरे एक म्हणजे यात वजनाचे आणि पदार्थाच्या पोषणमूल्याचे काही स्पष्टीकरण नाही ,

मी वाचलेल्या एका प्लॅन मध्ये वजनकाट्याला फार महत्व दिले होते.
म्हणजे तुमच्या स्वतःच्या वजनाला नाही तर तुम्ही जे काही खाता त्याच्या वजनाला.
प्रत्येक गोष्ट मोजून मापून आणि काटेकोरपणे वजन करून खायचा सल्ला दिला होता.

किचन वेईन्ग स्केल आणावे लागेल म्हणून तो प्लॅन मी रद्द केले होता.
काही रेस्तरॉं मध्ये वजनावर अन्न विकतात तेथे मात्र हा डाएट पालन पाळता येईल. :)

या बद्दल काही मोजमाप उपलब्ध आहे का?
म्हणजे तुमचे वजन इतके किलो असेल तर दररोज तुम्ही इतके ग्रॅम अन्न खाऊ शकता अश्या पद्धतीचे.

चित्रगुप्त's picture

19 Aug 2018 - 11:27 pm | चित्रगुप्त

....या बद्दल काही मोजमाप उपलब्ध आहे का? ....
वजन वगैरेंच्या भानगडीत न पडता एक सोपा नियम पाळला तर गरजेपेक्षा जास्त खाणे सहज बंद होऊ शकते.... तो नियम म्हणजे काहीही खाताना ते जोवर छान लागत आहे, अजून खावेसे वाटते आहे, तेंव्हाच खाणे बंद करणे. कुणी एका ९४ वर्षे वयाच्या कोणत्यातरी देशाच्या अध्यक्षाने सांगितलेले थोड्याच दिवसांपूर्वी वाचनात आले, तेंव्हापासून हे पाळणे बर्यापैकी जमत आहे, त्यातून जास्त खाणे बंद झाले, आणि खाण्याचा आनंदही प्रकर्षाने जाणवू लागला आहे.
अर्थात ‘किती’ याबरोबरच ‘काय’ खावे, हेही फार महत्वाचे आहे. ज्यातून विविध खनिजे, सर्व जीवनसत्वे पुरेशी मिळतील असा आहार घेण्याने भूक कमी लागते आणि आपोआपच कमी (आवश्यक तेवढेच) खाल्ले जाते.

सुबोध खरे's picture

20 Aug 2018 - 8:35 pm | सुबोध खरे

@ चामुंडराय
तुमचे वजन इतके किलो असेल तर दररोज तुम्ही इतके ग्रॅम अन्न खाऊ शकता अश्या पद्धतीचे.

अन्नातील वजनापेक्षा कॅलरी हा जास्त महत्त्वाचा भाग ठरतो.
तूप घेतले तर १०० ग्राम तुपात ९०० कॅलरी होतात.
तेच १०० ग्राम पेरू खाल्ले तर फक्त ६८ कॅलरी होतात.
१०० ग्राम काकडी खाल्ली तर १५( पंधरा फक्त) कॅलरी होतात आणि टोमॅटो मध्ये १८ कॅलरी होतात.
६० ग्रॅमच्या समोशात ३१० कॅलरी होतात.
१०० ग्राम जिलेबीत ३०० कॅलरी होतात.

चामुंडराय's picture

21 Aug 2018 - 12:32 am | चामुंडराय

ओके, आता आलं लक्षात, त्या डाएट प्लॅन मध्ये प्रत्येक खाद्य पदार्थ वजन करा आणि इतक्याच वजनाचा खा का सांगत होते ते.

म्हणजे अप्रत्यक्षरीत्या तुमचा कॅलरी इन टेक प्रमाणित करायचा हेतू होता तर !
परंतु हा प्लॅन किती सस्टेनेबल आहे हा प्रश्नच आहे. प्रत्येक वेळी वजन करून कोण खाणार?

त्या ऐवजी दोन्ही हातांच्या तळव्याने ओंजळ करा आणि त्यात मावेल तेव्हढेच अन्न खा हा बहुधा सेलेब्रिटी आहार-ताईंचा सल्ला बरा वाटतो आहे.

सुबोध खरे's picture

21 Aug 2018 - 9:32 am | सुबोध खरे

दोन्ही हातांच्या तळव्याने ओंजळ करा आणि त्यात मावेल तेव्हढेच अन्न

एवढा सोपं नसतं. ओन्जळ भरुन बासुंदी रोज खाऊन पहा वजन कमी होतं कि वाढतं?

असं वर्तमानपत्रात दिलेलं "आहाराचं गणित" त्याच वर्तमानपत्रात दिलेल्या राशि भविष्याइतकंच भंपक असतं.

आणि हे ते लिहिणार्यांनाही माहित असतं.( आहारही आणि भविष्य हि).

आपला कोणताही निर्णय हा नीट अभ्यासानेच आणि तज्ञ माणसाच्या मदतीने घ्यायचा असतो. मग तो आहाराबद्दल असो किंवा आपला घामाचा पैसे गुंतवणुकीबद्दल असो

सुबोध खरे's picture

21 Aug 2018 - 9:34 am | सुबोध खरे

सेलेब्रिटी आहार-ताईं
पूर्वी तूप अजिबात खाऊ नका सांगत असत
आता भरपूर तूप खा सांगतात.
त्यावर किती विश्वास ठेवायचा हा एक प्रश्नच आहे.

अनिरुद्ध.वैद्य's picture

29 Aug 2018 - 8:26 am | अनिरुद्ध.वैद्य

२००८ कि ९ मध्ये त्येंच पुस्तक आलेलं
त्यात तरी तुप नका खाऊ वाचलेलं आठवतं नाही.

मला वाटतं सेलेब्रिटी आहार-तैं ना असे म्हणायचे असावे कि तुम्ही तुमचा नेहमीचा चौरस आहार ओंजळीभर घ्या, म्हणजे क्वालिटी नाही तर क्वांटिटी कमी करा.
अन्यथा एकच खाद्य पदार्थ ओंजळी भर खाल्ला तर दुष्परिणाम / कुपोषण होईल यात शंका नसावी.

"हाफ पोर्शन डबल टाइम" हा आणखी एक त्यांचा प्रसिद्ध मंत्र आहे.

बाकी कोणताही निर्णय तज्ञ व्यक्ती कडून सुबोध घेऊन विचारपूर्वक घ्यावा हे तुमचे मत अगदी खरे आहे. :)

सुबोध खरे's picture

20 Aug 2018 - 8:23 pm | सुबोध खरे

@ ओम शतानन्द

सामान्य माणसाच्या जठराचा आकार रिकाम्या पोटी साधारण २०० मिली असतो आणि हाच पोट भरून खाल्ल्यावर ८०० मिली ते १ लिटर पर्यंत होऊ शकतो.

लठ्ठ माणसांच्या जठराचा आकार १६०० ते २००० मिली होतो. यामुळेच अशा माणसांना भरपूर खाल्ल्याशिवाय पोट भरल्याची संवेदना होत नाही.

आपल्या पोटाचा आकार ८०० मिली ते १ लिटर आहे हे गृहीत धरल्यास आपण एका वेळेस जास्तीत जास्त ४०० ते ५०० मिली खाणे आवश्यक आहे. हे म्हणजे जास्तीत जास्त दीड पॅकेट मॅगी इतके होईल ( १०० ग्राम कोरडे मॅगी + १५०-२०० ग्राम/ मिली पाणी).

दुर्दैवाने जठराची क्षमता हि मिलिलिटर मध्ये मोजता येते. कॅलरी किंवा ग्राम मध्ये नाही.

आपण जर पाव किलो तूप प्यायला तर त्याच्या २२५० कॅलरी होतील जे सामान्य माणसाच्या दिवसभराच्या कॅलरीच्या गरजेपेक्षा जास्त होईल. एवढे करूनही आपले पोट ( सुरुवातीला तरी) रिकामे असल्याचेच आपल्याला भासेल.

सुदैवाने आपले शरीर कोणत्याही स्थितीला पटकन जुळवून घेत असल्याने लठ्ठ माणसांनी जर खरीखर्च मिताहार केला तर एक महिन्यात त्यांच्या जठराची क्षमता ३६% पर्यंत कमी होऊ शकते. https://www.ncbi.nlm.nih.gov/pubmed/8561056?itool=EntrezSystem2.PEntrez....

दुर्दैवाने बहुसंख्य लोक असा मिताहार धरसोड तर्हेने करतात यामुळे लठ्ठ पण सहजासहजी कमी होत नाही.

सुबोध खरे's picture

20 Jul 2018 - 10:14 am | सुबोध खरे

डॉ दीक्षितांचा व्हिडीओ मी परत पाहिला. त्याबद्दल मी वाचले आहे आणि वाचतो आहे.
त्यांचा मूळ उपक्रम अतिशय स्तुत्य आहे.
भारतात लठ्ठपणा मोठ्या प्रमाणावर वाढत चालला आहे. शारीरिक श्रमांची गरज कमी झाली आहे आणि त्याबरोबर रुचकर अन्नाची उपलब्धता आणि परवडणारे दर यामुळे अति खाणे यामुळे हि स्थिती येत आहे.

डॉ दीक्षितांचा सल्ला बहुसंख्य लोक "करून तर बघू" या उद्देशाने ऐकत आहेत. बहुसंख्य लोकांना त्यातील "फुकटात वेट लॉस" हे जास्त भावणारे वाक्य आहे. कारण बहुसंख्य लोकांनी( त्यांच्या चे पु वर प्रतिसाद देणार्यांनी) अंजली मुखर्जी, VLCC, तळवलकर यांच्याकडे आपले "पूर्वजन्मीचे देणे" दिलेले आहे किंवा मधुमेहाच्या औषधावर त्यांचा खर्च चालू आहे. तेंव्हा स्वस्त ते मस्त आणि फुकट ते पौष्टिक या उक्तीप्रमाणे "करून तर बघू" हा विचार आहे.

जर आपण हा सल्ला शिस्तशीर पणे कमीत कमी सहा महिने पाळला तर त्याचे चांगले परिणाम नक्कीच दिसून येतील.(म्हणजे ९० किलोचा माणूस ९-१० किलोने वजन कमी करेल) परंतु आपण हा सल्ला "सोडून दिला" आणि परत भरपूर खायला सुरुवात केली तर एक वर्षाने आपली स्थिती मूळपदावर येईल याबद्दल मला शंका नाही.
डॉ. दीक्षित यांचा सल्ला/ उपचारपद्धती हि श्रावणात पोथी वाचली आता वर्षभर पाप करायची मोकळीक मिळाली असे समजणाऱ्या लोकांनी करूच नये कारण त्यांना अपयश येण्याची मला १०० % खात्री आहे. चार महिन्यात १० % वजन कमी होईलच(
हि उपचार पद्धती नसून जीवन पद्धती आहे हे जे समजून घेतील त्यांना यश येण्याची शक्यता भरपूर आहे.
कारण दोन म्हणजे दोनच वेळेस खाणे आवश्यक आहे. आपण आता तिसऱ्यांदा खातो, मग चौथ्यांदा खाल्ले तरी चालेल असे केले तर अपयश हमखास.
तात्पर्य -- डॉ दीक्षितांची उपचार पद्धती हि जे लोक जीवन पद्धती बनवतील( आयुष्यभर दोनच वेळेस जेवणे) त्यांना यश नक्की येईल.

LOOSING WEIGHT IS SO EASY
I HAVE DONE IT SO MANY TIMES.

अमर विश्वास's picture

20 Jul 2018 - 10:49 am | अमर विश्वास

डॉक्टर साहेब

तुमचा प्रतिसाद पूर्णपणे पटला ....
LOOSING WEIGHT IS SO EASY
I HAVE DONE IT SO MANY TIMES.

हे माझ्या बाबतीत ही झाले आहे .... काही वेळा फॅड डाएट्स मागे पण लागलो आहे ...
पण आता इतक्या वर्षांनी डाएट ही जीवन पद्धती म्हणून स्वीकारली पाहिजे हे पटते

डॉक्टर दिक्षतांचे भाषण मी ऐकले आहे तसेच संदर्भात बरेच वाचन व विचार केला आहे ...
यानंतरच या पद्धतीचा अवलंब करण्याचा निर्णय घेतला आहे .

याची कारणे (माझ्यापुरती)

१. सकाळी व्यायाम करून आल्यावर मला भूक लागते .... तसेच न्याहरी (ब्रेकफास्ट) केल्याशिवाय बाहेर पडणे मला पटत नाही
२. कामाच्या स्वरूपामुळे रात्रीचे जेवण ८.३० च्या आधी घेणे शक्य नाही. म्हणजे सकाळी ८.३० ला न्याहारी केल्यावर १२ तास उपाशी राहावे लागेल ... ते शक्य नाही
३. साधारणतः दर ४-५ तासांच्या अंतराने आपले पोट (जठर ) रिकामे होते व भूक लागते ... ती मारणे मला योग्य वाटत नाही
४. माझा माझ्यावर कंट्रोल आहे .... सकाळी काही खाल्ले नाही .. फक्त थोडा चहा - मारी - ढोकळा ..... असे होत नाही :)

या सर्व कारणांमुळे मी वर लिहिल्याप्रमाणे क्लीन डाएट चा मार्ग अवलंबतो आहे ...

जाताजाता ... ज्यांना ऍसिडिटी चा त्रास आहे त्यांनी डॉ दीक्षितांचे डाएट फॉलो करण्यापूर्वी नक्की विचार करावा ...

साबु's picture

20 Jul 2018 - 5:36 pm | साबु

आमच्याइथे सध्या herbalife च्या वजन कमी करण्याच्या प्रोटीन पावडर आणि बाकीचे products जोरात चालू आहेत.
निरनिराळे health clubs चालू आहेत. काही लोकांमध्ये फरक पण पडलाय पण त्याच्यात सातत्य ठेवण्यासाठी products विकत घ्यावे लागतात आणि ते महाग आहेत. पण मग ते परवडाव म्हणून त्याचा business करा अस सांगितलं जात. herbalife ची RnD पण खूप चांगली आहे. long टर्म मध्ये या products चा कितपत दुष्परिणाम होईल त्याची काही कल्पना नाही.

अमर विश्वास's picture

20 Jul 2018 - 6:23 pm | अमर विश्वास

प्रोटीन पावडर वापरून वेट लॉस ? ते कसे काय होते बुवा ?

अशा सर्व प्रॉडक्ट्स पासून दूर रहा

सुबोध खरे's picture

20 Jul 2018 - 6:44 pm | सुबोध खरे

हि उत्पादने "त्यांनी सांगितल्याप्रमाणे" तुम्ही घेतली तर वजन कमी होते. परंतु हि उत्पादने त्याच्या उत्पादनखर्चाच्या किती तरी पटीने महाग असतात.

https://www.amazon.in/Herbalife-Weight-Loss-Package-Pack/dp/B01FLRQZ7I

कारण त्यांची उत्पादने हि जेवणा "ऐवजी" घ्यायची असतात आणि तुमच्या वजन उंची प्रमाणे ती "योजलेली" असतात.

परंतु हि उत्पादने वर्षभर किंवा त्यानंतरहि घ्यावी लागतात. इतके सातत्य साधारण कोणाही ग्राहकात नसते. आणि आपण हि उत्पादने बंद करून आपल्या मूळ अति आहाराकडे गेलात कि वजन परत "येरे माझ्या मागल्या" प्रमाणे मूळपदावर येते.

पण मधल्या काळात वजन थोडे कमी झाल्याने आपले वजन फार वाढले आहे हि जी आंतरिक टोचणी (GUILT) असते ती कमी होते. यातच अशा अनेक उत्पादनांचे/ कार्यक्रमांचे यश सामावलेले आहे.

कोणत्याही वजन कमी करण्याच्या उपचाराच्या रथाची दोन चाके असे सर्वात महत्त्वाचे दोन भाग मिताहार आणि सातत्य.

यातील एक चाक जरी काम करेनासे झाले तरी रथ जागीच उभा राहतो.

साबु's picture

20 Jul 2018 - 7:02 pm | साबु

हि उत्पादने "त्यांनी सांगितल्याप्रमाणे" तुम्ही घेतली तर वजन कमी होते. परंतु हि उत्पादने त्याच्या उत्पादनखर्चाच्या किती तरी पटीने महाग असतात.

https://www.amazon.in/Herbalife-Weight-Loss-Package-Pack/dp/B01FLRQZ7I

कारण त्यांची उत्पादने हि जेवणा "ऐवजी" घ्यायची असतात आणि तुमच्या वजन उंची प्रमाणे ती "योजलेली" असतात.

परंतु हि उत्पादने वर्षभर किंवा त्यानंतरहि घ्यावी लागतात. इतके सातत्य साधारण कोणाही ग्राहकात नसते. आणि आपण हि उत्पादने बंद करून आपल्या मूळ अति आहाराकडे गेलात कि वजन परत "येरे माझ्या मागल्या" प्रमाणे मूळपदावर येते. ->+१

खटपट्या's picture

24 Jul 2018 - 12:24 pm | खटपट्या

WHEY प्रोटीन बद्दल आपले काय म्हणणे आहे? शरीर सौष्ठव करणारे हे प्रोटीन घेतात. याच्या फायदे किंवा दुष्परीणामांबद्द्ल सांगू शकाल का?

सुबोध खरे's picture

24 Jul 2018 - 6:48 pm | सुबोध खरे

कोबालामिन (ब-१२) : एक अनोखे व्हिटॅमिन

या धाग्यावर मी लिहिलेला प्रतिसाद "जसाच्या तसा" येथे टाकत आहे

मी अ‍ॅक्टीव्हली जिम करत होतो तेव्हा व्हे प्रोटीन रेकमेन्ड केले होते जिम ट्रेनर ने

व्हे प्रोटीन हे साध्या दुधापेक्षाकिंवा कोणत्याही प्रथिन युक्त अन्न पदार्थापेक्षा जास्त चांगले आहे या विधानाला कोणताही शास्त्रीय पुरावा मला तरी आढळलेला नाही.
(आमच्या बायकोला तिच्या जिमच्या इन्स्ट्रक्टर ने ५०० रुपयाला चुना लावला ते पाहून माझे डोके ठणकले होते म्हणून मी बऱयापैकी वाचन केले होते)

कारण मुळात कोणतेच प्रथिन हे तसेच्या तसे शरीरात शोषले जात नाही. त्याचे मूळ अमायनो ऍसिड मध्ये पचन होणे आवश्यक आहे. व्हे प्रथिन पचायला हलके आहे असेही नाही.

मग सर्वत्र जिम मध्ये व्हे प्रोटीन घ्या हा आग्रह का होतो याचा विचार करा.

व्हे प्रोटीन हे चीज तयार करताना बाकी राहिलेल्या टाकाऊ द्रव पदार्थात (WASTE PRODUCT) असलेले प्रथिन आहे. Whey protein is a mixture of globular proteins isolated from whey, the liquid material created as a by-product of cheese production.

कचऱ्यातून कला निर्माण करणाऱ्या बहुराष्ट्रीय कंपन्यांनी लोकांना मूर्ख बनवण्यासाठी शोधून काढलेला हि एक क्लृप्ति आहे. आणि हे असे प्रथिन दोन हजार ते चार हजार रुपये किलोने विकले जाते आणि हे फक्त जिम मध्ये किंवा त्याचे साहित्य विकणाऱ्या दुकानातच मिळते. कोणताही डॉक्टर आपल्याला हे घ्या म्हणून सांगताना आढळत नाही.
दुनिया झुकती है झुकाने वाला चाहिये

In 2010 a panel of the European Food Safety Authority examined health claims made for whey protein. For the following claims either no references were provided on the claimed effect, or the provided studies did not test the claims or reported conflicting results:

the claims

Increase in satiety leading to a reduction in energy intake
Contribution to the maintenance or achievement of a normal body weight
Growth or maintenance of muscle mass
Increase in lean body mass during energy restriction and resistance training
Reduction of body fat mass during energy restriction and resistance training
Increase in muscle strength
Increase in endurance capacity during the subsequent exercise bout after strenuous exercise
Skeletal muscle tissue repair
Faster recovery from muscle fatigue after exercise.

On the basis of the data presented, the 2010 panel concluded that a cause and effect relationship between the consumption of whey protein and these claims had not been established.

साधे चणे खाल्ले तरी १०० रुपयात ३८० ग्राम प्रथिने मिळतात(१९ टक्के प्रथिने आणि साधारण ५० रुपये किलो).

आणि व्हे प्रोटीन मध्ये तुम्ही १५०० रुपये मोजता ते सुद्धा टाकाऊ पदार्थातून निर्माण केलेले.

खटपट्या's picture

26 Jul 2018 - 6:31 pm | खटपट्या

ओके, सविस्तर माहीतीसाठी धन्यवाद. हा प्रतिसाद जीम इन्सस्ट्रक्टर ला दाखवतो. असंही त्यांचं शिक्षण यथातथाच असतं... पाहुया.

रंगासेठ's picture

21 Sep 2018 - 8:42 pm | रंगासेठ

धन्यवाद डॉ साहेब. :-) मी पण जीमच्या नादात आणि स्नायूंच्या विकासासाठी व्हे प्रोटीन घेतोय, ते पण "इम्पोर्टेड गोल्ड स्टँडर्ड"! पण जेव्हा शेंगदाण्यातून मिळणार्‍या प्रोटीनची माहिती कळाली तेव्हा हा प्रश्न पडलाच की खरच व्हे ची गरज आहे का?

सुबोध खरे's picture

20 Jul 2018 - 5:58 pm | सुबोध खरे

मलम कंपनी आहे.
थुका लावून घ्या आणि लावा

पिलीयन रायडर's picture

24 Jul 2018 - 9:05 pm | पिलीयन रायडर

प्रतिसादाला लाईक करण्याची सोय हवी होती. खरे काकांचे किती तरी प्रतिसाद लाईक करावेत असे आहेत. मस्त चर्चा चालू आहे.

शाम भागवत's picture

24 Jul 2018 - 11:36 pm | शाम भागवत

अगदी अगदी.
खूप शिकायला मिळतय.

तेही फुकटात विनसायास.
:)

लई भारी's picture

25 Jul 2018 - 3:49 pm | लई भारी

_/\_

स्वधर्म's picture

6 Aug 2018 - 2:10 pm | स्वधर्म

भागवत साहेब. तुमचा धागा यशस्वी झाला अाहे. मी दोन वेळा जेवायला सुरुवात करून ३ अाठवडे झालेत. काही त्रास जाणवत नाहीए. बरं वाटतंय. पण रक्ताच्या कोणत्याच चाचण्या केल्या नाहीत. तर यात काही धोका असू शकतो का? डायबेटीस किंवा लठ्ठपणा नसेल, किंवा बाकी अारोग्याचा काही अाढळून अालेला प्रश्न नसेल, तर हा प्लॅन सुरू करण्यापूर्वी रक्ताच्या चाचण्या करणे खरंच गरजेचं अाहे का? आधीच धन्यवाद.

जिचकरांचे मूळ भाषण काल ऐकले. त्यात रक्ताच्या चाचण्या केल्याशिवाय हे सुरू करू नये असे सांगितल्याचे अाठवत नाही. उलट त्यांनी नाॅर्मल लोकांसाठी पण हे योग्यच असल्याचे सांगितले अाहे. पण दीक्षित यांच्या व्हिडीअोमध्ये मात्र चाचणीवर बराच भर दिलेला अाहे. म्हणून विचारतोय.

शाम भागवत's picture

6 Aug 2018 - 3:43 pm | शाम भागवत

साधारणतः निरोगी माणसे स्वतःहून ही आहारशैली स्विकारत नाहीत. कोणालाही जिभेवरचे बंधन नको असते. कोणतातरी त्रास व्हायला लागला की मगच उपायांची शोधाशोध सुरू होते असे माझे मत आहे.

डॉ. दिक्षीतांनीही त्यांचे स्वतःचे "वाढते वजन" यावर उपाय म्हणूनच संशोधन सुरू केलेले आहे. त्यावेळी प्रचलीत असलेले वजन कमी करायचे प्रयोग स्वतःवर सुरू केलेले आहेत. ते प्रयोग फसल्यावर आणखी शोधाशोध करताना, त्यातूनच त्याना डॉ. जिचकारांचा ऑडिओ सापडलेला आहे. त्यांनी जे संशोधन केले त्याचे विषय ही स्थूलत्व व मधुमेह हेच आहेत. त्यामुळे त्या संबंधातील लोक या आहारशैलीकडे आकृष्ट होणार असतील तर सावधानता म्हणून ते रक्त तपासणी करायला सांगत असावेत असे माझे मत आहे. एखादा निरोगी माणूस या आहारशैलीचे फायदे लक्षात घेऊन ती अवलंबायला लागेल हे त्यांनी गृहित धरलेले नसावे.

मात्र डॉ. जिचकार अतिरिक्त इन्सूलीन सर्व रोगांचे कारण आहे असे मत प्रतिपादन करतात व हे अतिरिक्त इन्सूलीन निर्माण होऊ नये यासाठी सर्वांना काळजी घ्यायला सांगतात. त्यांचा भर आहे निरामय व दिर्घायुष्य यावर. मला वाटते यात आपोआपच निरोगी माणूस येतो. दोन्ही व्हीडिओ मधे हा महत्वाचा फरक आहे अशी माझी समजूत आहे. यासाठीच मी या लेखात जिचकार यांना महत्व दिलेले आहे.

"ऐशी अक्षरे" मधे डॉ. जिचकार यांना या लेखात उगीचच घुसडले आहे असाही एक संदेश आला होता. पण तेथील प्रतिसादांचे स्वरूप पहाता मी तिथे जास्त थांबलो नाही.

तुम्हाला काहीच होत नसेल आणि या ३ आठवड्यानंतरही काही होत नसेल तर तपासण्याची जरूरी नसावी असे वाटते. तुमचा ३ आठवड्यांच्या अगोदरचा संपूर्ण दिवसातला आहार व आत्ताचा संपूर्ण दिवसाचा आहार हा सारखाच असेल तर तुम्ही काहीच वेगळे करत नाही आहात असेच मला वाटते. मग तपासण्या कशासाठी करायच्या?

मी माझे मत मांडले आहे. कृपया तज्ञांनी त्यांचे मत मांडले तर फार बरे होईल.

स्वधर्म's picture

6 Aug 2018 - 5:44 pm | स्वधर्म

लगेच उत्तर दिल्याबद्दल. मी तूर्त तरी ते सुरूच ठेवणार अाहे. नंतर रक्तदान करता अाले (डिसेंबर) अाणि काही त्रास झाला नाही, तर हे मला धार्जिण अाहे असे मानायला हरकत नाही.
अाणखी एक उल्लेखनिय गोष्ट म्हणजे तुंम्ही धाग्यावर अगदी व्यवस्थित प्रतिसाद देत अाहात. धागा काढून गायब झाला नाहीत.

शाम भागवत's picture

6 Aug 2018 - 8:20 pm | शाम भागवत

:)))

सुबोध खरे's picture

7 Aug 2018 - 12:19 pm | सुबोध खरे

दिवसात दोन वेळा जेवण्यामुळे नुकसान काहीही होणार नाही. जगात कित्येक लोक असे आहेत ज्यांना एकवेळ सुद्धा धड पोट भरेल असे जेवण मिळत नाही. तेंव्हा आपण निर्धास्त असावे. डायबेटीस किंवा लठ्ठपणा नसेल, किंवा बाकी अारोग्याचा काही अाढळून अालेला प्रश्न नसेल, तर हा प्लॅन सुरू करण्यापूर्वी रक्ताच्या चाचण्या करणे अजिबात आवश्यक नाही

बाकी --आपले वय चाळीशीच्या पेक्षा जास्त असेल तर आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने रक्त चाचण्या करायच्या असतील तर करा.

शाम भागवत's picture

7 Aug 2018 - 12:47 pm | शाम भागवत

तुमचा मला नेहमीच आधार वाटत आलेला आहे. धन्यवाद.
_/\_

स्वधर्म's picture

7 Aug 2018 - 11:38 pm | स्वधर्म

तीन वेळा खाण्याची अापली परिस्थितीच नसली असती तर? किंवा कधी दिवसातले एखादे जेवण मिळालेच नाही तर टिकाव धरता अाला पाहिजेच, असा विचार केला होता. कधी कधी कडक भूक लागूनही उपाशी राहिलो, तर त्यामुळे मधुमेहाच्या जवळ जाणार नाही ना असे वाटले, म्हणून विचारले. तुंम्ही धीर दिला.

चामुंडराय's picture

18 Mar 2019 - 2:16 am | चामुंडराय

@ स्वधर्म : दीक्षित डाएट सुरु करून आता तुम्हाला साधारणतः आठ महिने झाले आहेत. रिझल्ट्स काय आहेत हे जाणून घ्यायची उत्सुकता आहे.

प्रकाश घाटपांडे's picture

7 Aug 2018 - 9:51 am | प्रकाश घाटपांडे

हा धागा वाचणार्‍यांनी डॉ सुबोध खरे यांचे काटा वजनाचा ही मालिका जरुर वाचावी

शाम भागवत's picture

7 Aug 2018 - 10:49 am | शाम भागवत

हा शेवटचा ९वा भाग आहे.
पहिला भाग येथे आहे.

शाम भागवत's picture

7 Aug 2018 - 10:48 am | शाम भागवत

हा शेवटचा भाग आहे.
पहिला भाग येथे आहे.

मला तरी खूप फायदा जाणवला - मी स्वतः एप्रिल २०१८ पासून फॉलो करतोय
वजन ४.५ किलो ने कमी झालय ३ महिन्यात ७५ ते ७०.५ आणी ढेरी ३७ ईंच वरुन ३५ ईंच झालीये :-)

एच बी ए १ सी ६.९ वरुन ५.७ झालाय सध्या.

स्वतः डॉ. दिक्षीतांशी व्हाट्स अ‍ॅप वर चर्चा पण केलीये ऑलरेडी.

कृत्रिम साखर एक वर्षा पूर्वीच बंद केलीये.

शाम भागवत's picture

8 Aug 2018 - 1:44 pm | शाम भागवत

व्वा!! व्वा!! व्वा!!
आता अनुभवाचे बोल ऐकायला मिळायला लागल्यावर तर या धाग्याची दिवाळीच सुरू होणार आहे.
येणारे अनुभव शेअर करत रहा.
_/\_

माझे वडील फक्त सकाळी १० आणि संध्याकाळी ५ वाजता जेवत असत. (जेवणात भाकरी/पोळी, भात, भाजी, वरण, कोशिंबीर, चटणी, ताक आणि सणावारी गोड असायचे — विशेष म्हणजे आई अगदी ताजा स्वयंपाक १० आणि ५ वाजता करून गरमागरम वाढायची ). याशिवाय ते कधीही काहीही खात नसत. ८०+ वयातही त्यांची प्रकृती उत्तम होती. लठ्ठपणा अजिबात नव्हता, चष्मा लागला नव्हता (वाचन भरपूर करत तरिही) कोणतीही व्याधी नव्हती. कुठेही जायचे ते पायी किंवा सायकलीने. आमचे औषधाचे दुकान असूनही स्वतः कधीच औषध घ्यायचे नाहीत. मृत्युसमयी एक मिनीटही अंथरुणावर नव्हते. फिरायला म्हणून बाहेर निघताना जरा थकल्यासारखे वाटले म्हणून खुर्चीवर बसले आणि तिथेच प्राण गेला.
मला पुष्कळ वर्षांपासून त्यांच्यासारखी आहाराची सवय लावून घेण्याची इच्छा आहे. दिक्षितांचे विडियॉ मी पूर्वीच बघितलेले आहेत. हा लेख आणि प्रतिसाद वाचून वाटू लागले आहे की ती वेळ आता आलेली आहे. मला दिवसभर काही ना का काही खात रहाण्याची सवय लागलेली आहे. (अनेक वर्षांपासून दिवसभर घरी असण्याचा परिणाम, त्यातून ऋजुताबाईंची पुस्तके वाचलेली)
मी हा प्रकार सुरू केल्यावर त्याबद्दल लिहीनच.

शाम भागवत's picture

8 Aug 2018 - 7:38 pm | शाम भागवत

दिवसातून दोनदाच खाण्याची जिवनशैली डॉ. दिक्षीत २०१२ पासून पाळत आहेत. म्हणजे त्याला अंदाजे ५-६ वर्षे झाली असतील .

पण तुमचे वडील ती जिवनशैली त्यांच्यापेक्षाही जास्त काळ अंगीकारत होते हे लक्षात येतय. तसेच या जिवनशैलीमुळे त्यांना झालेले फायदेपण तुम्ही लिहिलेले असल्याने, या धाग्याचा वाचकवर्ग आता आणखी विश्वासाने ही जिवनपध्दती स्विकारण्याचा विचार करायला लागेल.
धन्यवाद.
_/\_

माझ्या वडिलांचा जन्म १८९६ चा आणि मृत्यु १९७८ चा. मला जरा कळू लागल्यापासून म्हणजे साधारणतः १९५७ पासून मी त्यांना दोनदाच जेवताना बघितलेले आहे, कदाचित त्यापूर्वी अनेक वर्षे त्यांना ही सवय असावी. त्यांचे बालपण फारच विपरित परिस्थितीत गेलेले होते, त्यातून ही सवय लागली किंवा कसे हे ठाऊक नाही.

तुमच्या वडिलांच्या स्मृतीला _/\_

परिस्थिती का जाणीवपूर्वक घेतलेला निर्णय हे सांगणे खरोखरच अवघड आहे.
शिवाजी महाराज दिवसातून (दुपारी) एकदाच जेवत असत, अस काहीस बाबासाहेब पुरंदरे म्हणाल्याचे अंधूकस आठवतय.
असो.

चित्रगुप्त's picture

8 Aug 2018 - 6:47 pm | चित्रगुप्त

फक्त दहा आणि पाच वाजता जेवण्याची सवय लावून घेऊन ती उर्वरित आयुष्यात कायम ठेवणे माझ्यासाठी इतके सोपे नाही, कारण मुळात अनेकदा खाण्याची सवय तर लागलेली आहेच, आणि वडिलांना जसे आई नियमाने गरम ताजे अन्न करून वाढायची, तशी शक्यता जवळजवळ नाहीच. फारतर त्या त्या वेळी घरात जे उपलब्ध असेल ते खाणे, हेच होऊ शकते.
पहिली पायरी म्हणून मी आजपासून दिवसभरात काय काय, किती खाल्ले, याची लेखी नोंद करणे सुरू करत आहे. पाच - सहा दिवसांच्या नोंदी बघून मग काय करायला हवे आणि काय करता येईल, हे स्पष्ट होईलसे वाटते.

शाम भागवत's picture

8 Aug 2018 - 7:00 pm | शाम भागवत

चित्रगुप्त साहेब तुम्ही तुमच्या वडिलांचे आशिर्वाद घेऊन या धाग्यावर आलेला पाहून फार छान वाटले. २-३ वर्षापूर्वी तुमच्या धाग्याची "शरीरशुद्धी, सपाट पोट, योग्य वजन आणि संपूर्ण आरोग्य मी कसे मिळवले?" वाचनखूण साठवली होती. त्याची आठवण आली.

तुम्हाला तुमचे वडीलच स्फूर्ती देणार असल्याने तुम्हाला यश मिळणारच याची मला खात्री आहे.
_/\_

II श्रीमंत पेशवे II's picture

10 Aug 2018 - 4:34 pm | II श्रीमंत पेशवे II

मी कायप्पा वर काही दिवसांपूर्वी डॉक्टर दिक्षितांचा उपाय असलेली पोस्ट वाचली होती , ति खरच आहे का ते पडताळण्यासाठी यु टूब वर त्यांचा संपूर्ण व्हीडीओ पहिला.
मला पटलं आणि शुक्रवारी २० सप्टेंबर१८ च्या दिवशी घरी पोचल्यावर , बायकोला अगोदरच सांगितले मला चहा नकोय ....तिने पुन्हा विचारले ....मी पुन्हा सांगितलं ,आणि माझा प्रयोग सुरु झाला शनिवारी,+ रविवार सुटी असल्याने आपण स्वतःला कंट्रोल करू शकतो का हे तपासायच होत. ते दोन दिवस मला घरच्यांच्या टोचण्या ....बडबड ....वेड लागलय तुम्हाला वगैरे सहन करत काढावे लागले पण मी माझ्या प्रयोगावर ठाम होतो . डॉक्टर जिचकर आणि दीक्षितांच मत मला तंतोतंत खर करायचं होत हे मी मनात पक्क ठेवलं
दुसऱ्या दिवशी सकाळी घरातून निघताना पत्नी ने नाश्ता समोर आणला ...तिला म्हटल ...सकाळी सकाळी वाद नको मला माझ्या वाटचा नाश्ता एका डब्यात दे मी जेवणाच्या वेळेस खाईन. पण तिची बडबड चालूच होती ...मी स्वतःच तो एका डब्यात घेतला आणि घराबाहेर पडलो .....
सोमवार चा दिवस माझ्या खूप लक्षात राहील ....आपण रोज काय काय खात होतो या वेळेत त्याची खरी यादी त्या दिवशी मिळाली
शुक्रवारी ऑफिस मधून निघताना वजन केलं होतं ते होत ७६ किलो
दीक्षित सरांच्या म्हणण्या नुसार उंची - १०० = अपेक्षित वजन ( उंची १६५ सेमी म्हणजे १६५ - १०० = ६५ ) म्हणजे माझ वजन ६५ किलो असायला हवं पण ते ७६ म्हणजे तब्बल ११ किलो नि जास्त आहे ..........
मला माझ टार्गेट सापडलं होत ११ किलो कमी करायचं आहे आणि मी खूप सिरिअस होऊन हा प्रयोग ३ महिने तरी करायचा हा उद्देश ठेवून सुरु केला ....
सोमवारी नाश्ता न केल्याने जरा कासावीस झालो होतो घशाला कोरड पडत होती ....पाणी पीत होतो ...... मधेच मनात यायचं कि चल जे डब्यात आहे ते संपवून आजच जेवण झालं अस घोषित करूया .....पण मग निट विचार केल्यावर कळल कि आपल्याला आज आता भूक लागली आणि वेळ आहे म्हणून जेवू शकतोय ... रोज असं शक्य नाही
मग दुसरा नियम आठवला ......भुकेची वेळ शोधा .... आणि त्या वेळेस पोटभर जेवा ......मी ति ऑफिस च्या वेळेस जुळवायचा प्रयत्न करत होतो .....पहिल्या दिवशी मी न राहून ११.४५ ला जेवलो ...नंतर च्या दिवशी १० मिनिटे थांबून १२ च्या दरम्यान जेवलो आणि ४ दिवसात १ वाजेपर्यंत पोचलो
गुरुवार पर्यंत दुपारची वेळ पक्की झाली ...आता घरी पोचल्यावर बायको मुद्दामून काही खायला करू का .... बिस्कीट तरी घ्या ....नको इतकि आगत्य करीत होती
मुलं मुद्दामून माझ्यासमोर काहीतरी खात येत होती पण त्या सगळ्यावर कटाक्षाने दुर्लक्ष करत होतो..

तिसरा नियम आठवला - चहा - चहा पिवू शकता पण विना दुध आणि विना साखर पहिल्या दिवशी घरी वेगळा करायला सांगितला तर कडाडून विरोधाला सामना करावा लागला ... म्हटल अस कसं चालेल चहा तर हवाय ...विनंती करून साखर घालायच्या अगोदर कपभर बाजूला काढण्यात आला ...... तो अतिशय कडू लागला .... दोन घोट पिऊन ओतून दिला .......मग ग्रीन टी बग्स आणल्या आणि सकाळचा प्रश्न निकालात निघाला.

१० दिवसानंतर माझा मी चहा करून प्यायला लागलो .....आज २० दिवस झाले आहेत

माझ वजन - कधी एकदा काट्यावर उभा राहतोय असं झालं होत ......वजन केलं आणि मला आश्चर्य चकित व्हायला झालं माझ वजन २० दिवसात २ किलो कमी झालं आहे .

पावसामुळे सकाळी चालायला जमत नाहीये पण मी खूप प्रेरित झालोय आणि मला याच वेगानी जर वजन कमी झालं तर याच वर्षी माझ टार्गेट पूर्ण करता येईल याची खात्री वाटली .

मित्रानो एक आठवडा खूप त्रास झाला
मी माझ्या बागेत एक प्लास्टिक ची पिशवी आणि एक रिकामा डबा ठेवतो .... कुणी काही खायला दिल तर मी ते डब्यात न लाजता ठेऊ लागलोय ....जेवताना ते अगोदर खातो आणि मग पुढच जेवण

मला पटलय आणि मी तुम्हाला हि हा प्रयोग करायचा आग्रह करेन

आनन्दा's picture

10 Aug 2018 - 6:12 pm | आनन्दा

विना दूध असे दीक्षितांनी सांगितलेले नाहीये.
एका कपाला पाव कप दूध असे प्रमान चलेल त्यांच्या मते.
मी तरी तसा चहा दिवसातून ३ वेळा पितो, आणि दोन्ही वेळच्या जेवणानंतर मस्तपैकी साखर घालून कॉफी. तसेही जेवण २०-२५ मिनिटात संपते, त्यामुळे छानपैकी बायकोबरोबर गप्पा मारत १५ मिनिटे कॉफीपानाचा कार्यक्रम होतो.

पिवळा डांबिस's picture

15 Aug 2018 - 3:53 am | पिवळा डांबिस

छानपैकी बायकोबरोबर

भाग्यवान हो तुम्ही!!
:)

मराठी कथालेखक's picture

10 Aug 2018 - 6:32 pm | मराठी कथालेखक

मी माझ्या बागेत एक प्लास्टिक ची पिशवी आणि एक रिकामा डबा ठेवतो

पाच हजार रु दंड :)

II श्रीमंत पेशवे II's picture

14 Aug 2018 - 10:28 am | II श्रीमंत पेशवे II

पण ५० मायक्रोन च्या वरील जाडीची ठेवतो

II श्रीमंत पेशवे II's picture

20 Aug 2018 - 5:55 pm | II श्रीमंत पेशवे II

मला २० जुलै असे लिहायचे होते चूकीन शुक्रवारी २० सप्टेंबर१८ असे लिहले गेले

अभ्या..'s picture

20 Aug 2018 - 6:04 pm | अभ्या..

नाही सांगत हो कुणी त्या पथकाला तुमचे नांव. उगी कशाला घाबरताय? ;)
आणि भेटलेच तर सांगा बिनधास्त बायोडिग्रेडेबल प्लास्टिकची पिशवी आहे म्हणून. त्यांना तरी कुठे फरक कळतोय अजुन साध्या आणि बायोडिग्रेडेबल प्लास्टिकमधला. ;)
नसल्यास ५१ मायक्रॉनची आहे म्हनून सांगा. ते मोजायचे टूल नसते त्यांच्याकडे. जरी कमी भरले तरी वापरुन झिजली म्हणायची. ;)

शाम भागवत's picture

20 Aug 2018 - 7:18 pm | शाम भागवत

मला २० जुलै असे लिहायचे होते चूकीन शुक्रवारी २० सप्टेंबर१८ असे लिहले गेले

आम्ही सगळ्यांनी ते समजून घेतले होते.
:)

सिरुसेरि's picture

10 Aug 2018 - 4:57 pm | सिरुसेरि

खुप माहितीपुर्ण लेखन आणी तज्ञ मिपाकरांच्या उपयुक्त प्रतिक्रिया .

चित्रगुप्त's picture

10 Aug 2018 - 6:12 pm | चित्रगुप्त

काल आणि परवा मी केलेल्या नोंदीवरून एक गोष्ट लक्षात येते आहे की आपण आवश्यकतेपेक्षा जास्त खात आहोत. आधी त्यावर लगाम घातला पाहिजे. सध्यातरी एकदम एका झटक्यात दोनदाच जेवणाची सवय लावणे मला जमेलसे वाटत नाहिये.

आनन्दा's picture

11 Aug 2018 - 9:04 am | आनन्दा

काका सहज जमेल.. फक्त ८ दिवस८गरज पडेल तेव्हा झोपायची तयारी ठेवा. (तुम्हाला डायबेटिस नाहीये हे गृहीत धर्तोय)
मला ४ तास काही खल्ले नाही की गरगरायला लागायचं. ४-५ दिवस त्रास झाला.
पण हे गरगरल्याशिवाय चरबी वितळायचा मॅकेनिझम सुरु होत नाही.. वर्षानुवर्षे शरीराला चरबी वितळवायची सवयच नसते. ती लागताना थोडासा त्रास होणारच.

सुदैवाने माझी रक्तशर्करा, रक्तदाब आणि कोलेस्टरादि अन्य घटक सामान्य आहेत. "नॉर्मलपण देगा देवा" म्हणण्याची वेळ आलेली नाही वा येऊ दिलेली नाही.

>>> फक्त ८ दिवस८गरज पडेल तेव्हा झोपायची तयारी ठेवा. >>>

झोप कशामुळे येते म्हणे?

II श्रीमंत पेशवे II's picture

14 Aug 2018 - 10:26 am | II श्रीमंत पेशवे II

अगदी बरोबर ......
फक्त असीडीक फील होत असेल तर थोडा वेगळा विचार करावा लागेल
सुरुवातीला दोन दिवस जरा जाणवत पोटात काहीतरी गडबड चालू आहे .......डब डब ल्या सारख वाटतं ....पण कोमट पाणी / नॉर्मल पाणी पिऊन ते थांबतं ....

आनन्दा म्हणतायत त्या प्रमाणे भूक लागली आहे पण पोटात काही येत नाही असं म्हटल्यावर ...चरबी....तीच काम करायला सुरुवात करते

शाम भागवत's picture

11 Aug 2018 - 10:32 am | शाम भागवत

आपण जास्त खात असल्याची तुम्ही जाहीर कबुली देताय म्हणजे तुम्ही निम्मी लढाई जिंकली अस म्हणायला हरकत नाही. :))

उपदेशांचे डोस पाजून मुलांवर संस्कार करता येतीलच असे नाहीत. पण प्रत्यक्ष आचरणाद्वारे वडिलांचे मुलांवर होणारे संस्कार जास्त दृढ असतात व असे संस्कार इतके नकळत होतात की, मुलाला तसे काही झाल्याचे जाणवतही नाही. पण या संस्कारांचा आपल्या अंतर्मनात खूप मोठा ठसा उमटलेला असतो. या संस्कारांचा अप्रत्यक्ष परिणाम म्हणून जिभेवर ताबा मिळवण्याची तुमची धडपड सुरू आहे असे मला वाटते. इतकेच नव्हे तर, "शरीरशुद्धी, सपाट पोट, योग्य वजन आणि संपूर्ण आरोग्य" या धाग्याचा जन्म यातूनच झाला आहे अशीच माझी समजूत आहे.

तुमचे वय लक्षात घेता जस जमेल तसे सुरवात करा. जर अ‍ॅसिडिटीचा त्रास व्हायला लागला तर मात्र डॉ. दिक्षीतांच्या ऐवजी डॉ. जिचकारांच्या व्हिडिओमधे सांगितलेले लो कार्बोहैड्रेट पदार्थांचा म्हणजे काकडी, टरबूज वगैरेचा पर्याय वापरून त्यावर मात करता येऊ शकेल असा माझा तर्क आहे. अर्थात हा तर्क असल्याने या वाक्यावर डॉ. सुबोध खरे काय म्हणतात हे पाहायला पाहिजे.

सुबोध खरे's picture

11 Aug 2018 - 11:57 am | सुबोध खरे

आहार मध्ये (satiety) म्हणजे समाधान हा एक मोठा घटक आहे. बर्याच लोकाना ताक भात/ दही भात/ आमटी भात खाल्ल्याशिवाय पोट भरल्यासारखे वाटतच नाही. यात एक मानसिकतेचा भाग आहे आणि दुसरे पोट "भरल्याचा" भाग आहे. तसेच काही लोक त्यांच्या गरजेपेक्षा जास्त खात राहतात याचे कारण त्यांच्या जठराचा आकार अति खाउन खाऊन त्यांनी वाढवून ठेवलेला असतो त्यामुळे बरीच मात्र खाल्ल्या शिवाय त्यांना पोट भरल्यासारखे वाटतच नाही. हि स्थिती एका फटक्यात दूर होत नाही. यासाठी बरेच दिवस प्रयत्न करून आपला आहार "कमी" करावा लागतो. तोपर्यंत पोट भरल्याची संवेदना येण्यासाठी नुसते फुगून येणारे पदार्थ उदा. कुरमुरे खावेत. दोन मुठी कुरमुरे खाऊन दोन ग्लास थंडीनं पाणी पिऊन पाहा. छान पोट भरल्याची संवेदना येते.
काकडी किंवा कलिंगड हे "असेच" पदार्थ आहेत कि त्यात ९५ % पाणी आहे. शिवाय हे पदार्थ आपल्याला एका वेळेस भरपूर खाता येतात म्हणजेच एका बैठकीत आपण २००-२५० ग्राम सहज खाऊ शकतो. आणि ज्यात( १०० ग्राम) मध्ये आपल्याला फार तर १५ -२० कॅलरी मिळतात.( तुलनेसाठी एक १०० ग्रॅमच्या मोठ्या सामोशात आपल्याला ६०० कॅलरी मिळतात) म्हणजेच दोन जेवणे सोडून मधल्या काळात असे पदार्थ (समोसा नव्हे) खाल्ले तर पोट रिकामे असल्याची संवेदना होणार नाही. शिवाय हे पदार्थ थोडेसे अल्कलाईन असल्याने ज्यांना आम्लपित्ताचा त्रास आहे त्यांना याचा नक्की फायदा होऊ शकतो. बरेच लोक आम्लपित्त आणि भूक यात गल्लत करतात आणि त्यामुळे गरजेपेक्षा जास्त खात राहतात.
काही पदार्थ जे सहज मधल्या वेळेस खाता येतील
काकडी /कलिंगड १०० ग्राम -१५ ते २० कॅलरी
खरबूज/ चिबूड १०० ग्राम --३४ कॅलरी
पेरू १०० ग्राम-६८ कॅलरी
आंबा १०० ग्राम ७५ कॅलरी
सफरचंद १०० ग्राम ५० कॅलरी
बाकी दोन जेवणांच्या मध्ये काहीही खायचे किंवा नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे

शाम भागवत's picture

11 Aug 2018 - 12:50 pm | शाम भागवत

_/\`_

शाम भागवत's picture

11 Aug 2018 - 5:36 pm | शाम भागवत

आहार मध्ये (satiety) म्हणजे समाधान हा एक मोठा घटक आहे.

या समाधानातील मानसिकतेच्या मुद्याबद्दल लिहितो आहे. बर्‍याच वर्षांपूर्वी मी माझ्यावर केलेल्या एका प्रयोगाचा हा अनुभव आहे. अर्थात ह्या पध्दतीबद्दल मी कुठे वाचले किंवा ऐकले ते आता आठवत नाहीये.

प्रत्येक घास ३२ वेळा चावावा हे आपण लहानपणापासून ऐकत आलेलो आहोत. कर्बोदकांचे पचन होण्यामधे तोंडातील लाळेचा वाटा खूप मोठा असतो. यास्तव शाकाहारी लोकांनी तर आवर्जून प्रत्येक घास ३२ वेळा चावायची सवय लावून घेतली पाहिजे. पण अशा पध्दतीने जेवणारे फारसे नसण्याचीच शक्यता असते. विशेषकरून भात तर फारच कमीवेळा चावला जातो.

आपण जेव्हा जेवताना पहिला घास तोंडात टाकतो तेव्हा आपला हात तात्काळ दुसरा घास तयार करण्याच्या प्रक्रियेला लागतो. हा नवीन घास हातात तयार झाल्यावर, आपल्याकडून आपल्या नकळत आपल्या तोंडातील घास संपण्याची वाट पाहिली जाते. याचा परिणाम म्हणून तोंडातला घास संपूर्ण चावला जाण्याअगोदरच गिळला जातो.

यावर उपाय म्हणून तोंडातला घास संपूर्णपणे गिळल्या गेल्याशिवाय आपल्या हाताला पुढच्या घासाची तयारी करू न देणे येवढेच करायचे असते.
माझ्या अनुभवावरून असे केले तर;
१. आपले लक्ष जेवणामधे पूर्णपणे आकर्षीत होते व हे आपल्याला जाणवते सुध्दा. इतकेच नव्हे तर या अगोदर आपल्या चावण्याकडे आपण इतके लक्ष कधीच दिले नव्हते हेही जाणवते.
२. जेवायला लागणारा वेळ काही मिनिटांनी वाढतो.
३. नेहमीपेक्षा आपण खूप कमी खातो तरीही पोट भरल्याची संवेदना स्पष्ट जाणवते व आपण जेवण थांबवतो.
४. प्रत्येक घास ३२ वेळा किंवा त्याहीपेक्षा जास्त वेळा चावला जातो. आणि हे आपोआप होते.
५. पिष्टमय पदार्थ चावत राहिल्यास त्याचे लाळेत पचन होऊन त्यातून शर्करा निर्माण झाल्याने शेवटी शेवटी तो घास गोड झाल्याचे पण जाणवू शकते. विशेषतः भाकरीच्या बाबतीत हे विशेषत्वाने जाणवते.
६. या प्रकाराची सवय नसल्याने काही काळाने आपल्या हातावर लक्ष ठेवत रहाणे कंटाळवाणे कदाचित त्रासदायकही वाटू शकते.

हा माझा अनुभव आहे. त्यामुळे तो वैयक्तिक आहे. मात्र या मागे काही शास्त्र असल्यास हाच अनुभव इतरांना येणे शक्य आहे असे वाटते. विशेषकरून जेवताना आवश्यकतेपेक्षा जास्त जेवणार्‍यांसाठी हा प्रयोग उपयुक्त ठरण्याची शक्यता वाटल्याने हे लिहीत आहे.

सुबोध खरे's picture

11 Aug 2018 - 9:50 pm | सुबोध खरे

प्रत्येक घास ३२ वेळा चावून खा.
आपल्या आयुर्वेदातील आहारशास्त्रात असे सांगितले आहे त्याला फार खोल अर्थ आहे. दुर्दैवाने त्याकडे दुर्लक्षच होत आले आहे.
मूळ आपण खातो कशासाठी? उदरभरण हा एक भाग झाला परंतु ते कदाचित २० % असेल बाकी फार मोठा भाग ८०% चवीसाठी असेच म्हणावे लागेल.

कर्करोग विभागात काम करताना मला एक जाणवलेली भयानक गोष्ट अशी आहे कि अन्न नलिकेचा कर्करोग असलेले रुग्ण ज्यांना खाणे अशक्य होते अशाना पोटाला( जठरापर्यंत) भोक पडून अन्न दिले जाते. या रुग्णांना चव हा एक महत्त्वाचा आनंद मिळत नाही. कारण पोटाच्या भोकातून तुम्ही काजू बर्फी आत टाका किंवा लाकडाचा भुसा काहीच फरक पडणार नाही. माझ्या मित्राच्या आईला असलेला जठराचा कर्करोग अन्ननलिकेपर्यंत पसरला होता. त्यामुळे तिला पाणी पण पिता येईनासे झाले होते. तेंव्हा तिला असेच पोटाला भोक पाडायचे ठरवले जात असताना तिने मला विचारले म्हणजे आता मला कधीच काही खाता येणार नाही का?

माझ्या पोटात खड्डा पडला आणि अंतःकरणात कालवाकालव झाली. ही गोष्ट मी माझ्या अन्नमार्गाचा तज्ज्ञ असणाऱ्या मित्राला सांगितली आणि त्याला गळच घातली कि काहीही करून तिला अन्न नलिकेत स्टेण्ट बसवून दे. त्याप्रमाणे त्याने हर प्रयत्नाने तो स्टेण्ट बसवून दिला. पुढे तीन महिने ती जगली तोपर्यंत ती लहान लहान घास का होईना पण तोंडाने चांगले अन्न समाधानाने खाऊ शकत होती.

विषयांतर सोडून मूळ विषयाकडे परत-- आपण बहुसंख्य लोक (ज्यांना जालावर हे वाचता येत आहे असे) खाण्यासाठी जगतो आहोत.
जगण्यासाठी खाण्याचे दिवस मागे पडले आहेत.

मग हे सुग्रास खाण्याचा आपण जास्तीत जास्त आनंद कसा घेता येईल याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. आपल्याला चव समजते म्हणजे काय तर जिभेवर पदार्थ ठेवला कि त्यातील स्वादाचे रेणू जिभेवरील संवेदकांमध्ये चेतना जागृत करतात आणि हे अन्न तोंडातून घशात उतरले कि आपल्याला चव समजणे बंद होते. मग जितका जास्त वेळ हा पदार्थ आपण जीभेवर ठेवू तितका वेळ आपल्याला चव मिळत राहील.
काही वेळाने हे संवेदक बधिर होतात आणि आपल्याला तितकी चव लागत नाही.म्हणून सुरुवातीला उत्तम लागणारा पदार्थ काही काळानंतर तितका चांगला लागत नाही. आपण थोडे थांबून परत चव घेतली तर तीच चव आपल्याला परत मिळू शकते.एकमार्गी गोड किंवा तिखट किंवा आंबट पदार्थ खात गेलात तर त्याची चव लागेनाशी होते. याच साठी आयुर्वेदात "षडरसयुक्त" जेवण खावे असा सल्ला दिला आहे. जेवणात चटण्या कोशिंबिरी तुरट आणि कडू पदार्थ खावे हा सल्ला याचसाठी दिला जातो.
एक घास बत्तीस वेळा चावून खा. आपल्या आहाराच्या तीन चतुर्थांशच खा. थोडे थोडे पण अनेक वेळेस खा हे सर्व सल्ले आपल्या पूर्वजांनी अनुभवातून मिळवलेले अनमोल ज्ञान होते.
पण आपण काय करतो गुलाबजाम अख्खा गटकतो. त्याने चव ८-१० सेकंदच मिळते. म्हणून मग तीच चव मिळवण्यासाठी आपल्याला अजून एक गुलाब जाम खावा लागतो आणि असे ५-६ गुलाबजाम खाल्ल्याशिवाय आपले समाधानच होत नाही.यामुळे आपण पोट भरतच राहतो.
यात आपले जठर ताणले जात राहते. नंतर नंतर जठर भरल्याची संवेदनाच नाहीशी होते आणि माणसे कितीही खाल्ले तरी पोट भरतच नाही/ समाधानच होत नाही या स्थितीत येतात. हि स्थिती बहुसंख्य लठ्ठ माणसांची असते.

बहुसंख्य लठ्ठ माणसे खातात तेंव्हा त्यांचा एक घास हा साधारण माणसाच्या दुप्पट असतो परंतु जसे डबल डेकर आणि सिंगल डेकर बस रस्त्यावर एकच क्षेत्रफळ व्यापतात तसे याना दुप्पट अन्न खाऊन तेवढीच चव मिळते.

पुढच्या वेळेस मिसळ खात असताना लहान घास नीट चावून खाऊन पहा. शिवाय केवळ एकाच तिखट चवी मुळे आपली जीभ तिखटाला बधिर झाल्याचे जाणवेल तेंव्हा मध्ये मध्ये ताक पिऊन पहा. मिसळीचा स्वाद दुप्पट होतो असे जाणवेल.
मी भयंकर तिखट मिसळ खाऊ शकतो म्हणणारी बहुसंख्य माणसे मोठे मोठे घास गिळत असल्याचे मला आढळले आहे. लोकांना मी किती तिखट खाऊ शकतो याची शेखी मिरवत सांगण्यापेक्षा मिसळीचा स्वाद घेणे मी पसंत करतो.

विषयांतर सोडून मूळ विषयाकडे परत
-- मग पाच सहा गुलाबजाम गटकण्या ऐवजी जर आपण एकाच गुलाबजामचे चार भाग करून एका वेळेस एकच तुकडा तोंडात टाकला आणि तो व्यवस्थित तोंडात घोळवून चावून खाल्ला ( शब्दशः बत्तीस ची गरज नाही) तर आपल्याला त्याच चवीचा आस्वाद जास्त वेळ घेता येतो.
सावकाश जेवा याचा अर्थही तोच असतो.

आपण चवीसाठी खातो याचा दुसरा भाग-- आपण कधीच नुसता भात किंवा नुसती भाकरी/ पोळी खात नाही कारण त्याला फारशी चव नसते पण तो उदर भरणाचा भाग आहे.
आपण नुसती मेथी मटर मलई किंवा चिकन टिक्का मसाला खाऊ शकतो. कारण चव आणि स्वाद याच पदार्थात आहे पोळी किंवा भातात नाही.
मग जेंव्हा तुम्ही लग्नाला पार्टीला जाता तेंव्हा प्लेट भरून भात किंवा पोळी कशासाठी खाता? बुफे मध्ये ९५% लोक आपली प्लेट भाज्या किंवा सामिष पदार्थांबरोंबर जिरा राईस तंदुरी रोटी सारख्या पदार्थानी भरून घेतात. हे केवळ पोट भरण्यासाठी असते.

गेली २८ वर्षे माझे वजन स्थिर असण्याचे हेच कारण आहे.( यात काहीही रहस्य नाही म्हणून मी वजन स्थिर असण्याचे रहस्य हा शब्द वापरत नाही)

माझे मित्र नातेवाईक माझी प्लेट पाहून म्हणतात कि अरे तू चिकन घेतोस, पनीर घेतोस, गुलाबजाम, खीर, बासुंदी पण घेतोस तरी तुझं वजन वाढत नाही आणि आम्ही पण तेच खातो पण आमचे वजन वाढते. माझे म्हणणे हेच असते कि माझ्या प्लेट मध्ये रोटी पण नाही आणि जिरा राईस पण नाही. मला पोट भरल्याची थोडीशी संवेदना अली कि मी एक ग्लास भरुन पाणी पितो म्हणजे पोट व्यवस्थित भरले जाते आणि अति खाणे आपोआप थांबते.

मी केवळ चवीसाठी खातो पोट ( फुटेस्तोवर)भरण्यासाठी नाही.

समाधान (satiety) याचा अर्थ हाच आहे.

चामुंडराय's picture

12 Aug 2018 - 7:34 pm | चामुंडराय

>>> एक घास बत्तीस वेळा चावून खा. आपल्या आहाराच्या तीन चतुर्थांशच खा. थोडे थोडे पण अनेक वेळेस खा हे सर्व सल्ले आपल्या पूर्वजांनी अनुभवातून मिळवलेले अनमोल ज्ञान होते. >>>

थोडे थोडे पण अनेक वेळेस खा हा सल्ला आपल्या पूर्वजांनी दिल्या बद्दल शंका वाटते. माझ्या मते हा सल्ला आधुनिक आहार शास्त्र देते.
माझ्या माहिती प्रमाणे आयुर्वेद दिवसातून फक्त दोन वेळीच जेवण्याचा सल्ला देते.

या वर अधिक स्पष्टीकरण मिळेल का?

II श्रीमंत पेशवे II's picture

14 Aug 2018 - 10:37 am | II श्रीमंत पेशवे II

पटले मनापासून पटले ......

चित्रगुप्त's picture

12 Aug 2018 - 10:31 pm | चित्रगुप्त

आपण जेव्हा जेवताना पहिला घास तोंडात टाकतो तेव्हा आपला हात तात्काळ दुसरा घास तयार करण्याच्या प्रक्रियेला लागतो. हा नवीन घास हातात तयार झाल्यावर, आपल्याकडून आपल्या नकळत आपल्या तोंडातील घास संपण्याची वाट पाहिली जाते. याचा परिणाम म्हणून तोंडातला घास संपूर्ण चावला जाण्याअगोदरच गिळला जातो.
यावर उपाय म्हणून तोंडातला घास संपूर्णपणे गिळल्या गेल्याशिवाय आपल्या हाताला पुढच्या घासाची तयारी करू न देणे येवढेच करायचे असते.

यासाठी मी एक मजेशीर प्रयोग करून बघितला. काल पोहे खाताना बशी टेबलावर ठेऊन एक घास घेतल्यावर चमचा त्यातच ठेऊन खुर्ची लांब सरकवून मी बसलो. तोंडातला घास नीट चावून लाळेत मिसळून गिळल्यावर मगच हात लांब करून चमचा उचलून पुढला घास घेतला. अर्थात हे संपूर्ण जेवण करताना कठीण पडेल, तरी अधून मधून करून बघायला हरकत नाही. एकदा त्यातील फायदे जाणवले, की मग नेहमीसाठी सवय लागू शकते.
डॉ. खरे यांनी सांगितल्याप्रमाणे मीही लग्नात वगैरे जेवताना मला आवडणारे गोड आणि दुसरा एकादा तिखट जिन्नस किंवा चटणी वगैरे खातो. पोळी भात घेतच नाही. अर्थात हल्ली असा प्रसंग वर्षातून एकादाच येतो.

चित्रगुप्त's picture

11 Aug 2018 - 8:10 pm | चित्रगुप्त

@ डॉ. सुबोध खरे: सविस्तर माहितीबद्दल आभार.
मला अधून मधून गोड खाल्याने समाधन लाभते त्यामुळे मी बहुतेकदा खजूर, गूळदाणे, अंजीर, केळे असे काहीतरी थोडेसे खात असतो. यात सर्वात जास्त आवडीची वस्तु म्हणजे खजूर.
.

मराठी कथालेखक's picture

11 Aug 2018 - 7:43 pm | मराठी कथालेखक

काल मी दिक्षितांचा व्हिडिओ पुर्ण पाहून संपवला. त्यानंतर त्यांच्या एका स्वयंसेविकेशी संपर्क साधला आणि त्यांना मला व्हॉट्स अ‍ॅप ग्रुप मध्ये सामाविष्ट करण्याची विनंती केली.
पण हे स्वयंसेवक HbA1c आणि fasting insuline याचे रिपोर्ट त्यांना पाठवल्याशिवाय कुणाला ग्रुपमध्ये घेत नाही. रिपोर्टचे फक्त आकडेच नाहीत तर त्यांना त्या रिपोर्टचा फोटो पाठवावा लागतो. त्याखेरिज ते डाएट प्लॅनबद्दल अधिक काही माहिती देत नाहीत वा इतर काहीच माहिती देत नाही.
यावरुन असे जाणवते की डॉ दिक्षितांना त्यांचे संशोधन एखाद्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या आणि महत्वाच्या व्यासपीठावर मान्यताप्राप्त करुन घ्यावयाचे आहे त्यासाठी लागणारा प्रचंड विदा , पुरावे गोळा करण्याकरिता त्यांचे स्वयंसेवक अशा रिपोर्टची सक्ती करतात.
अर्थात यात गैर काहीच नाही. आणि कदाचित ज्यांना मधूमेह आहे, किंवा त्याची काही लक्षणे दिसत असतील वा मधूमेह दृष्टीपथात असेल अशांना आधी रिपोर्ट घेवून मग हा डएट प्लॅन अंवलबणे योग्यच असावे. इतर लोकांकरिताही (म्हणजे ज्यांना मधूमेह अजिबात नाही) जर अल्पसा खर्च करुन त्यातून एका भारतीय संशोधकास मदत होत असेल तर अशी मदत करण्यास काही हरकत नसावी. फक्त "तुम्ही आम्हाला (विदा जमवण्यात) मदत करणार असाल तरच आम्ही तुम्हाला मदत करु" असा पवित्रा त्यांनी अगदी खुल्लमखुल्ला घ्यायला हरकत नव्हती असे वाटते. देवाण-घेवाण ही जगाची रीतच आहे.असो.
अर्थात ज्याला फक्त वजनच कमी करायचे आहे (माझ्यासारखा) आणि मधूमेह सध्या अजिबातच दृष्टिपथात नाही त्याने हे डाएट अंवलबण्याकरिता या ग्रुपमध्ये सामविष्ट व्हायलाच हवे असे काही नाही पण ग्रुपमध्ये सामावेष झाल्यावर छोट्यामोठ्या शंकांचे निराकरण सहज होवू शकेल. पण त्याकरिता थोडासा खर्च करावा लागेल.

जिचकरांच्या भाषणात मात्र असा कोणताच अंतस्थ हेतू जाणवला नाही. आणि एक भाषण म्हणूनही जिचकरांचे भाषण खूप साधेपणाचे आणि मनाला भिडणारे वाटले हे नमूद करावेसे वाटते.

रीपोर्टचा फोटो पाठविल्याशिवाय ते तुम्हाला ग्रुपमधे अ‍ॅड करत नाहीत याचे कारण फक्त विदा जमवणे हे नसावे.
जर तुम्हाला डायबेटीस असेल आणि तो त्यांना माहीत नसेल आणि तुम्ही ग्रुपवर सांगितलेले सल्ले किंवा आहार प्लान आमलात आणलात. आणि तुम्हाला काही त्रास झाला तरी या चळवळीची बदनामी होउ शकते. त्यांचा व्हाट्साप्प ग्रुप हा टाइमपास ग्रुप नक्कीच नसणार आणि त्यावर निट अभ्यास करुनच सल्ले मिळत असणार.
माझ्या मते ते समोरील व्यक्तीस त्यांच्या सल्ल्यामुळे काही अपाय होउ नये म्हणूनच रिपोर्ट मागत असावेत. विदासाठी नाही.

शाम भागवत's picture

13 Aug 2018 - 1:25 pm | शाम भागवत

अगदी असच लिहायच होत. बरे झाले तुम्ही लिहिले.

कोणी जर पुढे जाऊन डॉक्टरांवर निष्काळजीपणाचा आरोप लावून नुकसान भरपाईही मागू शकेल. कोणतेही डॉक्टर एवढी काळजी नक्कीच घेणार. विशेष करून ज्या माणसाबद्दल आपल्याला काहीही माहिती नाही त्याबाबत तर हल्लीच्या दिवसात काळजी घ्यायलाच पाहिजे.

मराठी कथालेखक's picture

13 Aug 2018 - 7:29 pm | मराठी कथालेखक

त्यांचा व्हाट्साप्प ग्रुप हा टाइमपास ग्रुप नक्कीच नसणार आणि त्यावर निट अभ्यास करुनच सल्ले मिळत असणार.

याबद्दल शंका नाहीच

माझ्या मते ते समोरील व्यक्तीस त्यांच्या सल्ल्यामुळे काही अपाय होउ नये म्हणूनच रिपोर्ट मागत असावेत. विदासाठी नाही.

ते काही काळाने कळेलच. अर्थात विदा आणि पुरावे जमवण्याकरिता जरी ते रिपोर्टस मागत असतील तरी त्यात गैर असं काहीच नाही असंच मला वाटतं. शिवाय वजन कमी करण्याकरिता इतर ठिकाणी बराच खर्च करायला माणसाची तयारी असते तर हा खर्च त्या मानाने कमीच असेल.

वेदांत's picture

12 Aug 2018 - 11:54 am | वेदांत
शाम भागवत's picture

12 Aug 2018 - 10:25 pm | शाम भागवत

वरील व्हिडिओ संदर्भात थोडेसे
६ ऑगस्ट २०१८ रोजी डॉ. दिक्षीतांनी पुण्यात दिलेल्या भाषणाचा हा व्हीडीओ आहे. वेळ ५५ः१९ मिनिटे

जागतीक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार, २०२० पर्यंत भारतात जास्तीत जास्त मधुमेही रूग्ण असणार आहेत.

निरनिराळे डाएट प्लॅन का फसतात? किंवा त्यामध्ये सातत्य का ठेवता येत नाही?
१. काही प्लॅनमध्ये काहीतरी करून उपाशी ठेवतात. पण हे आयुष्यभर करणे जमणे शक्यच नसते.
२. काहीमध्ये असे काही भन्नाट पदार्थ सुचवलेले असतात. नंतर नंतर हे पदार्थ खाणे जिकीरीचे वाटायला लागते.
३. काहींमध्ये सतत किंवा रोज मार्गदर्शन घ्यायला लावतात. त्यामुळे पुढे पुढे स्वातंत्र्यच गमावल्यासारखे वाटते.
४.काही इतके खर्चिक असतात की पैसे संपल्यावर तो डाएट प्लॅनपण संपुष्टात येतो.
५. प्रत्येक माणसाची एक प्रवृत्ती असते. काहीं प्लॅनमधे त्या प्रवृत्तीविरोधातले खायला लागते. पण असे कायम करत राहणे जमत नाही.

पण जर डाएट प्लॅन यशस्वी व्हायला पाहिजे असेल तर तो प्लॅन कसा असायला पाहिजे? किंवा डॉ. दिक्षीतांचा डाएट प्लॅन मध्ये सात्यत टिकवणे का शक्य होते?
१. पैसे लागणार नाहीत.
२. तज्ञाकडे जायला लागणार नाही.
३. मशीन विकत आणायला लागणार नाही.
४. कुठलाही पूरक आहार विकत आणायला लागणार नाही.
५. आयुष्यभर आनंदाने करता आले पाहिजे.
जास्त माहितीसाठी पहा ३०ः०८ ते ३२ः २४

जिवनशैली बदला.
डॉ. दिक्षीतांनी ७ राज्यातल्या २७ शहरातील १००० मधुमेहींचा अभ्यास केल्यावर, मधुमेहावरील सध्याच्या उपचार पद्धतीमध्ये काय बदल केला पाहिजे?
जास्त माहितीसाठी पहा ४४:३४ ते ४६ः२३

मधुमेहाबद्दल डॉक्टर लोकांना चुकीचे शिकवल गेलयं.
डॉक्टर लोकांना शिकवले गेलेय की मधुमेह हा बरा होणारा आजार नाही तर तो कायम वाढत जाणारा आहार आहे. रक्तातील साखर नियंत्रणात ठेवणे एवढेच आपल्या हातात आहे.
जास्त माहितीसाठी पहा ४६:२४ ते ४६ः५२

शाम भागवत's picture

13 Aug 2018 - 11:33 am | शाम भागवत

वेदांत,
तुम्हाला धन्यवाद द्यायचे राहिलेच.
:)

सर्व प्रथ्म श्री भागवत तसेच श्री खरे यांचेआभार,, आपण महत्वाची माहिती पुरवलीय. वर दिलेले डॉ. जिचकार -डॉ. दिक्षीत यांचे व्याख्यान एक्दम शिद्दत मध्ये ऐकले/पाहिले आहे. हा लेख माझ्यासाठी यासाठी महत्वाचा आहे कारण नकळतपणे वर दिलेला प्लॅन मी खुप आधी पासुन पाळत होतो. 'नकळतपणे' यासाठी म्हन्तोय कारण माझी कामची वेळ पाहता माझ्याकडुन आपसुप ते पाळले जायचे, अपवाद शनिवार- रवीवार व आधी मधी होणारा चहा पाण्याचा कार्यक्रम , शनिवार- रवीवार तर खादाडी ला उधाण यायचं , भसम्याचं शिरायचा अंगात :) सोमवार ते शुक्रवार जे कमवायचो ते विकेण्ड ला गमवायचो :)
कित्येक वेळा मनात प्रश्न यायचा की हे २ वेळ खाणे चांगले आहे की नाही? अर्थात याचा मला कधी त्रास नाही झाला. पण आजुबाजुला टप्प्याटप्प्यात खाणारे पाहिले की जरा प्रश्न पडायचा. यावर खुप वेळा कानावर पण यायचं '' किती कमी खातो/ जेवतो'' त्यावर माझं ठरलेलं उत्तर '' उगं कशाला खाउ''
२ वेळ खाणे चांगले आहे की नाही, यावर वरील व्याख्यानामुळं आता पडदा पडलाय. राहता राहीला विषय वजनाचा तर. डॉ. दिक्षीत यांनी अतिरिक्त वजन कसे शोधुन काढायचे त्या फॉर्मुल्या प्रमाणे ३ किलो जास्ती भरतयं. व्यायामाची आवड असल्याने आणी एकंदरीत वरील विषय बर्यापैकी अंगवळणी असल्यामुळं वजन कमी होइल यात शंका नाही. फक्त शनिवार- रवीवार वरच्या खादाडी वर काम करावे लागेल :)
डॉ. जिचकार -डॉ. दिक्षीत यांनी म्हट्ल्या प्रमाणे ही एक जिवनशैली आहे , जे पटतयं. आणी त्यावर आता काम सुरु केलय.
बाकी अजुन काही प्रश्न आहेत पण माझ्यामते त्याची उत्तरं आपण आपले शोधलेली कधीपण चांगले, शेती तशी मशागत च्या तत्त्वावर.

शाम भागवत's picture

14 Aug 2018 - 12:22 pm | शाम भागवत

'नकळतपणे' यासाठी म्हणतोय कारण माझी कामची वेळ पाहता माझ्याकडुन आपसुप ते पाळले जायचे

या तुमच्या वाक्यावरून हे आठवले.

माझ्या एका जवळच्या मित्राचा मुलगा आहे. घरात सगळेच खवय्ये. गोड पदार्थ म्हणजे घराचा जीव की प्राण. मधून मधून तोंडात टाकायला घरात बरेच पदार्थ तयार असायचे. त्यातून मुलाची आई सुग्रण. या मुलाने एम.एस्सी. व एक कोर्स केला व २४ व्या वर्षी नोकरीला लागला. तेव्हा त्याचे वजन ९० च्या पुढे गेलेले होते. व्यायामाचा अभाव व झोप खूप प्रिय. उंची ५'४" म्हणजे ६० किलो हे योग्य वजन. मुलगा सुस्वभावी. गोरापान व देखणा. त्यामुळे सगळ्यांना त्याच्या वाढत्या वजनाची काळजी वाटायची.

नोकरी सुरू झाली व त्याचे वजन कमी व्हायला लागले. सात महिन्यात १८ किलो वजन कमी झाले. डाएट करतो आहेस का? व्यायाम करतो आहेस का? अस आम्ही परिचीत विचारायचो. पण तो तसे काही करत नव्हता. वजन अजूनही १०-१२ किलो जास्तच असल्याने आम्हालाही काळजी वाटत नव्हती तर जे होतय ते चांगलेच होतय असेच वाटत राहिले होते.

मी जेव्हा माझ्या परिचितांना डॉ. दिक्षीतांच्या व्हिडिओबद्दल सांगायला सुरवात केली तेव्हा या मुलानेही तो आवर्जून पाहिला व लागलीच फोन करून तो मला भेटायला आला व म्हणाला,

"काका, डॉ. दिक्षीत जे म्हणताहेत ते खरे असले पाहिजे. मला वारंवार खायची सवय होती. भूकच लागायची हो. पण नोकरी सुरू झाली आणि मी आता फक्त ३ वेळाच खातोय. सकाळी नाश्ता दुपारी जेवण व रात्री घरी यायला इतका उशीर होतो की लागलीच जेवायलाच बसायला लागते. मी जर व्यायाम केला असता तर वजन आणखीनच कमी झाले असते. पण व्यायाम करायला वेळच नव्हता हो."

तुम्ही वापरलेल्या "नकळत" ह्या शब्दामुळे ही आठवण झाली. मला वाटत या १८ किलोच्या वजन घटीबद्दल मी कुठेतरी ओझरते लिहिलेय व त्याबद्दल मला सविस्तर लिहावयाचेही होते. पण ते राहून गेले होते.

तुम्हाला दोन वेळा खाण्याच्या जिवनशैलीमुळे निरामय व दीर्घायुष्य लाभो ही शुभेच्छा.

Ganesh.patole7@gmail.com's picture

15 Aug 2018 - 3:48 pm | Ganesh.patole7@...

वेटलॉस च्या नादात हिमोग्लोबिन कमी होऊन ऍनिमिया होतो.

शाम भागवत's picture

15 Aug 2018 - 11:52 pm | शाम भागवत

जर एखाद्याचे वजन त्याच्या उंचीप्रमाणे ६० किलो हे योग्य असेल व वेटलॉसच्या नादात तो आपले वजन ६० पेक्षाही कमी करायला लागला तर ते चक्क कुपोषणच म्हणायला लागेल. आणि कुपोषणात तर ऍनिमिया पेक्षाही जास्त गंभीर परिस्थिती ओढवू शकेल.

पण ६० या योग्य वजनापेक्षा जास्त असलेले वजन जर तो कमी करायला लागला तर हिमोग्लोबिन कमी होऊन ऍनिमिया कसा होतो ते कळले नाही. जरा जास्त स्पष्ट केले तर बरे होईल.

वेटलॉस च्या नादात हिमोग्लोबिन कमी होऊन ऍनिमिया होतो.

याबद्दल अधिक स्पष्टिकरण देता येईल का? समजा एकाद्याचे वजन ९० किलो आहे, आणि त्याने योग्य आहाराने , व्यायामने ते ८० किलो केले, तर त्यामुळे हिमोग्लोबिन किती आणि नेमक्या कोणत्या प्रक्रियेमुळे कमी होइल ?

सुबोध खरे's picture

16 Aug 2018 - 9:59 am | सुबोध खरे

योग्य आहाराने
हा शब्द फार महत्त्वाचा आहे. कारण वजन जेंव्हा आपण कमी करता तेव्हा आहारातील फक्त कॅलरीच कमी करणे आवश्यक आहे प्रथिने जीवनसत्वे आणि खनिजे कमी झाली तर त्याचा शरीरावर दुष्परिणाम होण्याची शक्यता जास्त असते.

आहारात लोहाचे, बी आणि क जीवनसत्त्वाचे प्रमाण कमी झाले तर ऍनिमिया होऊ शकतो. डॉ कुमार यांच्या "जीवनसत्त्ववरील" लेखात याची उत्तम चर्चा केलेली आहे.

याच कारणासाठी आपण वजन कमी करताना आहार तज्ज्ञांकडून सल्ला घेणे आवश्यक आहे. हा सल्ला प्रत्येक व्यक्तीची प्रकृती राहणीमान आणि आहाराची पद्धत पाहून देणे आवश्यक आहे. या सल्ल्यात प्रथिने खनिजे आणि जीवनसत्त्वे कमी न होता केवळ कर्बोदके आणि चरबीचे प्रमाण कमी कसे करता येईल याचा विचार असतो.

( मी जालावर सल्ला देत नाही याचे हे महत्त्वाचे कारण आहे)

मराठी कथालेखक's picture

17 Aug 2018 - 11:44 am | मराठी कथालेखक

या संदर्भाने डॉ जिचकरांच्या भाषणातला एक मुद्दा पुन्हा आठवतो. त्यांनी मल्टि विटॅमिनच्या गोळ्या, अन्टी ऑक्सिडन्टच्या गोळ्या घेण्याचे सुचवले आहे (नक्की केव्हा , किती घ्यायच्यात त्याबद्दल काय सांगितले ते आता नेमके आठवत नाहीये)
मला मल्टि विटॅमिनच्या कॅप्सुल घेण्याची सवय बर्‍याच वर्षापासून आहे. माझ्या शरीराला या कॅप्सुलची गरज निर्माण झाली की मला तसे जाणवू लागते मग मी पाच-सात दिवस किंवा अधिक दिवस अशी कॅप्सुल घेतो. बहूधा मला थकवा जाणवू लागतो ..इतर काहीच कारण नसताना किंचीत कणकण जाणवते. माझे हिमोग्लोबीन अतिशय चांगले आहे मी नियमित रक्तदानही करतो , त्यामुळे मला फक्त काही विटॅमिन्सची कमतरता जाणवत असावी असे मला वाटते.
Matilda Forte ही माझी आवडती मल्टि विटॅमिन आहे. ती बर्‍यापैकी महाग आहे पण चांगले परिणाम मिळतात म्हणून मी तीच घेतो.

शाम भागवत's picture

16 Aug 2018 - 10:38 am | शाम भागवत

_/\_

मिपा वरील बरीच मंडळी हि आहार पद्धती पाळत आहेत असे दिसते आहे.
दिवसातून केवळ दोन वेळेसच जेवत असल्याने दंत आणि मौखिक आरोग्य (ओरल हायजिन) यात काही फरक जाणवत आहे का?

कृपया अनुभव सांगा.

खटपट्या's picture

22 Aug 2018 - 2:17 pm | खटपट्या

काहीच फरक जाणवत नाहीय. मी सकाळी एकदा आणि संध्याकाळी एकदा जेवतोय. दुपारी ताक पितोय. (शनिवार आणि रविवार जड जातय हे करणं कारण घरी असतो)
दातावर आणि अन्य मौखिक आरोग्यावर काय फरक अपेक्षीत आहे?

दिवसात किती वेळा जेवता त्याचा मौखिक आरोग्याशी काहीच संबंध नाही जर प्रत्येक खाण्यानंतर (विशेषतः चॉकलेट सारखे चिकट पदार्थ असतील तर) भरपूर पाण्याने खळखळून चूळ भरून तोंड साफ ठेवत असाल तर कितीहि वेळा खा काहीही फरक पडणार नाही.

खटपट्या's picture

22 Aug 2018 - 8:31 pm | खटपट्या

+१

चामुंडराय's picture

22 Aug 2018 - 11:44 pm | चामुंडराय

.

शाम भागवत's picture

22 Aug 2018 - 3:50 pm | शाम भागवत

डॉ. दिक्षीतांच्या आहारपध्दतीचे अनुसरण केल्यावर ७ महिन्यांनी झालेले फायदे
मायबोलीवर "मोहन की मीरा" यांनी त्यांचा अनुभव लिहिलाय. त्या अनुभवांचा सारांश, त्यांच्याच शब्दात

  • आज मी 82 ला पोचले आहे 96 वरून. साधारण 7 महिन्यात.
  • अजूनही काही फायदे झाले
  • 1. इंच लॉस खूप आहे
  • 2. गुडघा दुखायचा बंद झाला
  • 3. थायरॉईड जानेवारी त 5 होते ( 0.50) ची गोळी घेऊन, ते आता 3 आहे, गोळी न घेता.
  • 4. मासीक पाळी अती वेळेवर येते , जी गेल्या 35 वर्षात कधीच आली नव्हती. ( इतर डाएट मध्ये असतानाही हे कधी झाले नव्हते) जे माझ्या दृष्टीने जादू समान आहे.
  • पाळीच्या वेळचा त्रास शून्य झाला
  • आता h1bc 3 आहे, 2017 मध्ये 4.6 होते. Fasting शुगर 82 आहे आणि pp 95. म्हणजे आता मी शुगरच्या सगळ्या धोक्यातून बाहेर आले.

अधिक माहितीसाठी येथे टिचकी मारा.

सुबोध खरे's picture

22 Aug 2018 - 6:13 pm | सुबोध खरे

सातत्य हीच गोष्ट फार महत्त्वाची आहे.
बहुसंख्य लोक कोणताही आहार हा "काही दिवसांसाठीच" करतात यामुळे सुरुवातीला मिळणारे यश वाळू सारखे हातातून निसटून जाते.
डॉ दीक्षितांची पद्धत हि जीवन पद्धती बनवली तरच यश मिळेल .
चार सहा महिन्यांसाठी करून पाहू म्हणणाऱ्या लोकांपैकी बहुतांशी लोकांना वजन वाढण्याचा ये रे माझ्या मागल्या हा अनुभव यामुळेच येतो.

शाम भागवत's picture

22 Aug 2018 - 6:19 pm | शाम भागवत

_/\_

prajakta.y's picture

30 Aug 2018 - 11:28 am | prajakta.y

Ya padhatine diet kelyas kay kay tote (nuksan) hou shakata? Special cases jase ki Diabetic patient, Pregnant mahila, vishistha aajar aslele lok yatun vagalavet. Normal mansane he diet kelyas weightloss hoto pan kahi varshanni kahi dushparinam pan disu shaktat ka?

Marathi typing cha prayatn kela pan nit jamale nahiye, tyabaddal Kshmaswa..

सुबोध खरे's picture

30 Aug 2018 - 6:59 pm | सुबोध खरे

जगात असंख्य लोक असे आहेत कि ज्यांना दोन वेळचे जेवायला मिळत नाही.
तेंव्हा जर आपण दोन वेळेस(च) संतुलित आणि चौरस आहार घेत असाल तर त्याचा भविष्यात दुष्परिणाम होण्याची शक्यता जवळजवळ शून्य टक्के आहे.
उलट मिताहार आणि वजन प्रमाणात ठेवल्यास अति खाण्यामुळे आणि लठ्ठ पणामुळे होणारे आजार नक्की कमी होतील.

prajakta.y's picture

31 Aug 2018 - 11:11 am | prajakta.y

ध न्य वा द !

ओम शतानन्द's picture

31 Aug 2018 - 9:08 am | ओम शतानन्द

मी १३ ऑगस्ट पासून ही पद्धत स्विकारली आहे. १८ दिवस झाले.
सकाळी व संध्याकाळी फक्त बिनसाखरेचा चहा , दिवसभरात २ ते ३ कप चहा होतो. जेवणात काहीही बदल केलेला नाही . रोजच जेवणात काहीतरी गोड खातो. त्यानी ४५ मिनिटे चालायचे असे सांगितले आहे पण मला व्यायाम म्हणून चालायला आवडत असल्यामुळे रोज ८ ते १० किमी चालतो - सव्वा ते दीड तास लागतो.
पूर्वी सकाळी उठल्यावर चहा बरोबर बिस्किटे, नंतर नाश्ता, मग परत चहा , नाश्त्यानंतरही काहीतरी खाणे ( शेंगदाणे वगैरे) मग जेवण , दुपारी चहा , संध्याकाळी काही खाणे , रात्री जेवण ,दोन्ही वेळेस जेवणात काहीतरी गोड पदार्थ , कधीतरी आईस क्रीम असे दिवसातून अनेक वेळा खाणे होत असल्यामुळे ही पद्धत जमेल की नाही असे वाटत होते . पण ही पद्धत स्वीकारायला काहीही अडचण आली नाही. पहिले दोन दिवस नाश्ता म्हणून काकडी , खरबूज, गाजर , टोमाटो इ खाल्ले , पण नंतर ते ही खायची गरज वाटली नाही त्यामुळे आता फक्त चहावर काम भागते.
मला आलेले अनुभव
एनर्जी लेवल वाढली आहे ,
पोट हलके असल्याची आनंददायक भावना,
वजन सुमारे २ किलो कमी झाले आहे
शिफ्ट duty मुळे झोपायच्या वेळा अनियमित त्यामुळे कधी कधी असिडीटी व्हायची , बरेच दिवस झालेली नाही
ही पद्धत ३ महिने करून बघणार आहे . result बघून व शरीरावरील परिणाम दुष्परिणाम बघून पुढचे ठरवणार

सुबोध खरे's picture

31 Aug 2018 - 9:34 am | सुबोध खरे

ही पद्धत ३ महिने करून बघणार आहे

हाच बहुसंख्य लोकांचा दृष्टिकोन असतो. कोणत्याही गोष्टीचा पूर्ण फायदा मिळण्यासाठी सातत्य असणे आवश्यक आहे.

आपण आपल्या मुलाला तीन महिने क्लासला पाठवून पाहू असे म्हणता का? आणि जर मुलाला १५ दिवसात फायदा झाला असे आढळले किंवा मुलाला क्लास आवडला तर तीन महिन्यांनी सोडून देता का?

आपल्याला कायमचा फायदा हवा असेल तर हीच जीवन पद्धती करा असेच माझे सांगणे आहे.

कृपया हा प्रतिसाद वैयक्तिक घेऊ नये. हा सर्वच लोकांना सर्व काळासाठी आहे

result बघून व शरीरावरील परिणाम दुष्परिणाम बघून पुढचे ठरवणार
म्हणजे जर result चांगले असतील तर ही पद्धत कायम ठेवणार , आतापर्यंतच्या अनुभवावरून तरी हिच पद्धत कायम ठेवावी असे वाटते आहे.

डॉ. दिक्षितसरांचे व्याख्यान सार

दोनच वेळा जेवा अन् डायबिटीसला पळवा ।
अहो,दोनच वेळा जेवा अन् डायबिटीसला पळवा ।।ध्रु।।

चहामध्ये दूध अगदी थोडेसेच टाका।
डायबिटीस असेल तर ग्रीन टी, ब्लॅक टी, नारळ पाणी प्या।
दोनच वेळा जेवा अन् डायबिटीसला पळवा।१।

दोन जेवणामध्ये हवे तेवढे ताक प्या।
दही मात्र त्यासाठी घरचेच वापरा।।
दोनच वेळा जेवा अन् डायबिटीसला पळवा।२।

जेवताना आवडीचे सर्व काही खा।
अहो! पिझ्झा, बर्गर काय वडापाव सुद्धा खा।
हे मात्र सगळे जेवणाच्या ५५ मिनिटातच संपवा।
दोनच वेळा जेवा अन् डायबिटीसला पळवा।३।

दिवसातला पाऊण तास व्यायामाला द्या।
चाला, पळा, पोहा किंवा सायकल तरी चालावा।
दोनच वेळा जेवा अन् डायबिटीसला पळवा।४।

विनाखर्चिक, विनासायास वेटलॉस कसा होतो बघा।
पाच सात किलो वजन बघता बघता कमी करा।
दोनच वेळा जेवा अन् डायबिटीसला पळवा।५।

नियमितपणे 'एच बी ए 1 सी' करा ।
व फास्टिंग शुगर नव्हे 'फास्टिंग इन्शुलिन' टेस्ट करा।
दोनच वेळा जेवा अन् डायबिटीसला पळवा।६।

'दोनच वेळा जेवा' हा मंत्र जगाला द्या आणि
डायबिटीसला भारतातूनच नव्हे तर जगातून हद्दपार करा।
दोनच वेळा जेवा अन् डायबिटीसला पळवा।७।

दिक्षित सरांचे आभार मनापासून माना।
त्यांनी दिलेला हा मंत्र घरोघरी पोचवा।
दोनच वेळा जेवा अन् डायबिटीसला पळवा।।८।।

जुलै च्या ८ तारखेला दीक्षित सरांचा लेक्चर टिळक स्मारक मध्ये ऐकलं आणि दुसऱ्या दिवस पासून त्यांचा डाएट प्लॅन सुरु केला. त्यांचं व्याख्यान ऐकताना वारंवार ते आपलीच गोष्ट सांगत आहेत असं राहून राहून वाटत होत

माझ्या वजनाने शंभरी कधीच पार केलेली, पण त्यामुळे आलेले प्री - हायपरटेन्शन मुळे त्रास सुरु झालेले, घरात उगाच होणारी चीड चीड, रात्री झोप न लागणे, भरपूर व्यायाम केला तरीही न कमी होणारे वजन ह्यामुळे खरं तर एक नैराश्य आलेलं...त्यात स्वतःला खायची प्रचंड हौस आणि थोडा फार जमत असणारा स्वैपाक त्यामुळे जिभेवर ताबा असा न्हवताच ..सगळे डाएट, डॉक्टर वजन कमी करायचे सेंटर्स करून झालेले

आज दोन महिने होऊन गेलेत ....वजन १०० च्या खाली आलंय, आणि हे सगळं फक्त २ वेळ पाहिजे ते खाऊन..गेल्या दोन महिन्यात पिझ्झा, चिकन पासून ते २ वेळा भात, बर्गर, कॅन्टीन मधली तेलकट बिर्याणी हे सगळं खाऊन ...व्यायाम केल्यामुळे फरक जाणवतोय ..पोट आत गेलंय .....कुठेही थकवा नाही कि ऍसिडिटी चा त्रास नाही

पार्टी ला गेलो किंवा जेवायला बसलो कि मोबाईल वर ५० मिनिटाचा टाईमर लावतो .... त्या नंतर खाणे बंद .... ऑफिस मध्ये सकाळचा नाश्त्याचा डब्बा घेऊन जातो (साबुदाणा खिचडी कशी सोडायची हो! :-))...तो डब्बा देखील जेवणाच्या वेळेत खातो... अधे मध्ये हल्ली भूक लागत नाही...ग्रीन टी ची सवय आधी पासून होती त्यामुळे ते पिणे सुरु आहे ....

एकंदर चांगलं सुरु आहे...उत्साह वाढलायं, व्यायाम करायला मज्जा येते आहे... हे डाएट नसून लाईफ स्टाईल आहे, आणि मला पटलेले आहे, त्यामुळे ३ महिने किंवा ६ महिने करून पाहू पेक्षा, मी हे बहुदा आता कायम स्वरूपी अवलंबिन ....

ह्या मागे प्रुव्हन सायन्स आहे, आणि मला तरी खूपच फरक पडलाय...रात्री झोप शांत लागत आहे, बीपी चा त्रास जाणवत नाहीये..चिडचिड कमी झाली आहे

त्यामुळे, जय जग्गन्नाथ!

चामुंडराय's picture

6 Sep 2018 - 6:53 am | चामुंडराय

अभिनंदन शेफ केडी आणि पुढच्या वाटचालीकरता शुभेच्छा

शाम भागवत यांना अनेक धन्यवाद !
हा धागा वाचून कुतूहलाने मी डॉ. दीक्षित यांचे व्याख्यान युट्युबवर पाहिले. माझे वजन प्रमाणापेक्षा एक किलोसुद्धा जादा नाही. तरीही काही पचनविषयक प्रॉब्लेम्स होते. जडपणा, मंदपणा, डोकेदुखी, बीपी नसूनही अधेमधेच शूट होणे, हृदयाचे ठोके अनियमित होणे इ. त्रास होत होता. एक प्रयोग म्हणून गेले पंधरा दिवस डॉ. दीक्षित यांची आहारपद्धती वापरू लागले. आणि आश्चर्यकारक पॉझिटिव्ह रिझल्ट्स मिळाले !
१. अपचन, गॅसेस, वारंवार ढेकर इ. सर्व बंद झाले.
२. भूक असली तरी काही वेळा नावडती भाजी वागिरे असेल तर घशाखाली उतरत नसे. तसे आता होत नाही. ‘नावड’ हे प्रमाण कमी कमी होते आहे. कोणतेही अन्न गोड लागते आहे.
३. भूक अशी सणसणीत लागते की अन्नाचा कण न कण अप्रतिम रुचकर लागतो आहे. बोटे चाटून चाटून जेवावेसे वाटतेय.
४. पूर्वी जडपणा, अस्वस्थता, मरगळ वाटत असे, ते बंद होऊन दिवसभर फ्रेश आणि एनर्जेटिक अतिशय उत्साही वाटते.
५. माझे वजन आधीचेच प्रमाणात असल्यामुळे मी दुपारी म्हणजे दोन जेवणांच्या मध्ये एखादे फळ आणि संध्याकाळी एक कप कॉफी (कमी दूध कमी साखर) अशी घेते तरीही इतके चांगले रिझल्ट्स मिळाले आहेत.
६. मी सकाळी नऊला बाहेर पडते व संध्याकाळी सातला घरी येते. त्यामुळे मला दोन वेळचे डबे न्यावे लागत होते, ज्याचे ओझेही व्हायचे आणि दोन वेळचे काय बॉ न्यायचे आणि कधी ते बनवायचे हा रोजचा प्रश्न. तो मिटला. दुपारसाठी जाता जाता एखादे फळ नेणे सोयीस्कर पडते.
डॉ. दीक्षित यांना हजारो धन्यवाद __/\__

चित्रगुप्त's picture

11 Sep 2018 - 1:21 am | चित्रगुप्त

@ स्नेहांकिता:

मी सकाळी नऊला बाहेर पडते व संध्याकाळी सातला घरी येते.

तुम्ही किती किती वाजता जेवता, आणि काय काय ?

सस्नेह's picture

11 Sep 2018 - 7:34 am | सस्नेह

मी १० ला ऑफिस मधे पोचते. गेल्या गेल्या पोळी भाजी कोशिंबीर डबा खाऊन घेते.
दुपारी लंच टाईम मधे एखादं सफरचंद किंवा सीताफळ, केळ मिळेल ते फळ. मग साडेचारला कमी दुधाची कॉफी एक कप. संध्याकाळी साडेआठला पूर्ण जेवण.

पोळीऐवजी ज्वारी,बाजरी किंवा नाचणीची भाकरी खाउन बघा. खूप फरक पडेल.
गव्हाच्या पोळीमधे ग्लुटेन जास्त असते...

भाकरी केव्हाही पोळीपेक्षा चांगलीच !
बादवे, माझे वजन प्रमाणात असल्याने कमी करण्यची गरज भासत नाही.

सुबोध खरे's picture

19 Sep 2018 - 10:30 am | सुबोध खरे

भाकरी हि पोळीपेक्षा चांगली हा एक खोलवर रुजलेला गैरसमज आहे.

कोणतीही गोष्ट पारंपरिक म्हणून चांगली यातून तो आला आहे कि काही पारंपरिक वैद्यकशास्त्रानी तो मुद्दाम रुजवला आहे हे मला माहित नाही.
परंतु या बद्दल मी बरेच वाचन केले असता असे लक्षात आले कि आपण खातो तो गहू आणि ज्वारी यात गुणात्मक दृष्ट्या कोणताही फरक नाही आणि पोळी पेक्षा भाकरी चांगली या गृहीतकाला पुष्टी देणारा कोणताही पुरावा नाही.

गव्हाच्या आणि ज्वारीच्या ग्लायसेमिक इंडेक्स मध्ये फारसा फरक नाही तसेच दोन्हीच्या कॅलरी मुल्यातही फरक नाही. तेंव्हा भाकरी मधुमेही माणसांना चांगली हे सिद्ध करणारा कोणताही पुरावा नाही

आपण पोळी खातो ती काही मैद्याची नसते तर पूर्ण गहू दळूनच केलेली असते त्यामुळे आपण खातो ती पोळी हि खरं तर ज्वारीच्या भाकरी पेक्षा पोषणमूल्यात्मक दृष्टीने जास्त चांगली आहे.

हे मी मुद्दाम एवढ्यासाठी लिहीतो आहे कि बऱ्याच स्त्रियांना (विशेषतः नोकरी करणाऱ्या) आपण रोज भाकरी करू शकत नाही त्यामुळे आपण आपल्या कुटुंबाच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतो आहे असा न्यूनगंड असल्याचे जाणवले. आणि बऱ्याच पुरुषांना पोळी ऐवजी भाकरी खायची असते पण नोकरीवर भाकरी खाणे शक्य नसते. कारण पोळी सारखी ती काही तासांनी मऊ राहात नाही किंवा तिची घडी सुद्धा सहज करता येत नाही आणि ( डब्यात नेता येण्यासारख्या) कोरड्या भाज्यांबरोबर भाकरी फारच कोरडी होते.

ज्यांना पोळी आवडते किंवा सोयीची आहे त्यांनी मुद्दाम पोळी सोडून भाकरी खाण्याची अजिबात गरज नाही.

साध्या शब्दात असलेला एक लेख जिज्ञासूंसाठी पाठवत आहे.

Jowar is tasty, but wheat wins hands down when it comes to nutrition

https://www.thehindu.com/todays-paper/tp-features/tp-metroplus/chapati-v...

तेंव्हा भाकरी खायची तर चवीसाठी जरूर खा पण आपण भाकरी खातो आहोत म्हणजे आपण जास्त आरोग्यपूर्ण खातो आहोत हा गैरसमज सोडून द्या

साबु's picture

19 Sep 2018 - 6:07 pm | साबु

गहु विकत घेउन दळुन आणलेल पीठ चान्गले की विकतचे पीठ?

सस्नेह's picture

12 Oct 2018 - 3:10 pm | सस्नेह

विकतचा आटा याबद्दल इथे पहा
https://www.youtube.com/watch?v=zQWYUb2slKw

सस्नेह's picture

12 Oct 2018 - 3:13 pm | सस्नेह

डॉक्टर, मी भाकरी बंद करुन एक आठवडा पोळी खाउन पाहीली. तर पोट वाढल्यासारखं वाटलं.
भाकरीपेक्षा पोळीत ग्लुटेन जास्त असते का?

गहू आणि गहू वर्गीय तृणधान्ये( ओट राय बार्ली) यात ग्लूटेन हे प्रथिन असते.
ज्वारी बाजरी तांदूळ नाचणी यात ग्लूटेन अजिबातच नसते.
ज्यांना ग्लुटेनची ऍलर्जी आहे त्यांना ग्लूटेन मुळे वाता(गॅसेस)चा त्रास होऊ शकतो.
यामुळे पोट फुगल्यासारखे वाटू शकते. एका आठवड्यात पोट सुटण्याची शक्यता फारच कमी आहे.
आपल्याला वाताचा त्रास (इतर कारणांमुळे) होत आहे कि खरच ग्लुटेनची ऍलर्जी आहे हे पाहणे आवश्यक ठरेल. काकतालीय न्यायाने हे झालेले नाही हे तपासणे आवश्यक आहे. अन्यथा उगाचच ग्लूटेन ऍलर्जी म्हणून लोक गव्हाचे विविध रुचकर पदार्थ खायला मुकतात.
(भारतात साधारण १ % लोकांना हा त्रास असतो.)

मराठी_माणूस's picture

10 Oct 2018 - 4:35 pm | मराठी_माणूस

ज्वारी आणि गव्हा बद्दल जे समज/गैरसमज आहेत ते प्रयोगशाळेच्या ( पॄथःकरण करुन) माध्यमातुन दुर करणे शक्य आहे का नाही ?

बरेचसे गैरसमज हे केवळ वाचनाने दूर करता येतील.

आणि बहुतांश गोष्टी या अगोदरच प्रयोगशाळेत तपासून झालेल्या आहेत.

परंतु सत्य हे "जुनं ते सर्वच सोनं" आणि " जुनं ते सर्वच कालबाह्य" या दोन अर्धसत्यांच्या मध्ये आहे हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे.

खटपट्या's picture

19 Oct 2018 - 6:07 pm | खटपट्या

ओके आता कळाले.
मला ग्लुटेन ची अ‍ॅलर्जी आहे का ते चेक करुन घेतो. कोणत्या चाचण्या कराव्या लागतील? म्हणजे रक्ततपासाणी च्या ज्या लॅब असतात त्यांना काय सांगायचे?

सुबोध खरे's picture

19 Oct 2018 - 6:36 pm | सुबोध खरे

दुर्दैवाने ग्लुटेनची ऍलर्जी आहे कि नाही याचे साधे सरळ सोपे उत्तर नाही आणि सर्व रक्ततपासण्या १०० % खात्रीशीर नाहीत. त्यासाठी एन्डोस्कोपीकरावी लागते.

काही वेळेस सोपी चाचणी म्हणजे तुम्हाला नक्की काय त्रास होतो आहे तो पाहणे आणि लिहून ठेवणे. यानंतर ७ ते १० दिवस गव्हाचे सर्व पदार्थ संपूर्ण वर्ज्य करून पहा.
जर तुम्हाला होणाऱ्या त्रासातून पूर्ण सुटका झाली तर तुम्हाला ग्लुटेनची ऍलर्जी आहे असे समजून पुढच्या चाचण्या करता येतील आणि तुमच्या त्रासात ५० % सुद्धा फरक पडला नसेल तर हि ग्लुटेनची ऍलर्जी नाही असे समजून दुसरी कारणे शोधणे आवश्यक आहे.

खटपट्या's picture

26 Nov 2018 - 1:08 pm | खटपट्या

त्रास असा काहीच नाही. फक्त थोडा जरी आहार वाढवला तर पोट पुढे येते.
आता मी दिक्षितांचा अहार प्लान फॉलो करतच आहे. पण कधी दोन दिवस तीनवेळा जेवलो तर लगेच पोटाचा घेर वाढल्यासारखा वाटतो...मग मी व्यायाम वाढवून थोडा आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करतो...

सुबोध खरे's picture

26 Nov 2018 - 7:34 pm | सुबोध खरे

मोजण्याची पट्टी आणि वजनाचा काटा हे जास्त खात्रीशीर असतात.
))०!०((

शाम भागवत's picture

11 Sep 2018 - 7:29 pm | शाम भागवत

@स्नेहांकिता
माझे अनुभव ही तुमच्यासारखेच असल्याने मला माझे अनुभव लिहायला जरा आधार मिळाला आहे. धागा काढून झाल्यावर २ किंवा ३ महिन्यांनी तपशीलवार लिहावयाचा विचार आहे. (खर तर कच्चा मसुदा डोक्यात तयार आहे.)

तुमचा अनुभव वाचून अनेकींना स्फूर्ती मिळू शकेल. भारतीय स्त्रियांसाठी ही जिवनशैली एक वरदान ठरणार आहे. ही जीवनशैली जसजशी स्विकारली जाऊ शकेल त्याप्रमाणात त्याचे श्रम नक्की कमी होतील याबद्दल मी याअगोदर लिहिले होते पण काहिंना ते आवडले नव्हते. याबाबत मला कालच एक व्हॉटसअ‍ॅप मेसेज आलाय. तो एका स्त्री कडून आलाय. आज तो माझ्या बायकोला दाखवला. तिला तो आवडला व खरच काम कमी झालय अस तिचही मत आहे म्हणून येथे चिकटवतोय. अन्यथा धाडस करवत नव्हते.

दीक्षितांची कमाल

काय सांगू सखे दीक्षितांची कमाल
अन् पहिल्यांदाच कमी झाले बायकांचे हाल ||धृ||

दीक्षितांनी सांगितलं दोनच वेळा जेवा
भात अन् पोळ्या जरा कमीच खावा
लाटल्या पोळ्या मी चारच काल || १ ||
अन् पहिल्यांदाच कमी झाले बायकांचे हाल

प्रथिनं वाढवा दीक्षितांचा सल्ला
भाजीपाला उसळी सॅलड्वर हल्ला
कापिते मी फळं आता धरून ताल || २ ||
अन् पहिल्यांदाच कमी झाले बायकांचे हाल

येता-जाता नका भरू हो तोबरा
फसव्या भुकेला पाण्याचा उतारा
पाजिते मी पाणी करून दीक्षितांची ढाल || ३ ||
अन् पहिल्यांदाच कमी झाले बायकांचे हाल

पाऊण तास चाला दीक्षितांचा मंत्र
साडेचार किमी चे पाळा तुम्ही तंत्र
फिरायला लागले मी पांघरून शाल || ४ ||
अन् पहिल्यांदाच कमी झाले बायकांचे हाल

चहा नि कॉफी बाजूला सारा
ताकाचा पेला तुम्ही हळूच पुढे करा
पाहुण्यांना संत्री देते सोलून मी साल || ५ ||
अन् पहिल्यांदाच कमी झाले बायकांचे हाल

दीक्षितांची योजना सार्‍यांना कळवा
लठ्ठपणा, मधुमेह जगातनं पळवा
तुम्हालाही सांगते नाहीतर फसाल || ६ ||
अन् पहिल्यांदाच कमी झाले बायकांचे हाल

प्रज्ञा रामतीर्थकर
९ सप्टेंबर २०१८

@palambar
तुम्हाला झालेले फायदे जरूर लिहा. त्यामुळे इतरांनाही स्फूर्ती मिळते. तुमच्या सारखे अनुभव घेऊन लिहिणारे लोक इथे येतील अशी कल्पना करूनच तर हा
धागा काढला आहे.
_/\_

मी दोन महिने दिक्षीतांचे डाएट पाळते आहे, अतिशय
चांगले रिझल्ट आहेत,
डाॅ दिक्षीत इतक्या कळकळीने याचा प्रसार करत
आहेत. त्यांचे यूट्यूबवरची भाषणे नीट ऐकली
तर बर्‍याच शंका कमी होतील. त्यांची यावर
पुस्तके देखील आहेत.

शाम भागवत's picture

11 Sep 2018 - 7:34 pm | शाम भागवत

@palambar
तुम्हाला झालेले फायदे जरूर लिहा. त्यामुळे इतरांनाही स्फूर्ती मिळते. तुमच्या सारखे अनुभव घेऊन लिहिणारे लोक इथे येतील अशी कल्पना करूनच तर हा
धागा काढला आहे.
_/\_

अर्धवटराव's picture

11 Sep 2018 - 8:22 am | अर्धवटराव

एव्हढ्या मोठ्या प्रमाणात मिपाकरांचे एकमत झालेले बघुन डोळे पाणवले. हा दिवस दाखवल्याबद्द्ल दिक्षीत सरांचे आभार.

आपल्याला हा प्रकार झेपेल असं वाटत नाहि :(. दोनच वेळा खाणे ठीक आहे... पण ते ब्रेकफस्ट, लंच, संध्याकाळचे स्कॅक्स आणि डिनरपुर्वी कि नंतर हे प्रथम ठरवावं लागेल ;)

चष्मेबद्दूर's picture

13 Sep 2018 - 12:33 pm | चष्मेबद्दूर

मि पा वरची चर्चा आणि डॉक्टरांचे व्हिडिओ बघून मी सुद्धा या आहार आचाराला सुरवात केली त्याला जेमतेम दोन आठवडे झालेत. सगळ्यांप्रमाणेच मलासुद्धा अनेक शंका होत्या, तरीपण तसंच पुढे गेले.
एक छान उपयोग झालाय म्हणजे माझी ऍसिडिटी होण्याचं प्रमाण खूपच कमी झालंय. कडकडून भूक लागली आणि फक्त पाणी किंवा ताक प्यायलं तरी देखील पित्त होत नाहीये, छातीत जळजळ होत नाहीये, हा अनुभव खूपच छान आहे.
मी अजून माझ्या रक्त तपासण्या केल्या नाहीयेत, पुढल्या आठवड्यात करून त्यांच्या कायप्पा ला पाठवून देणार आहे. तत्तपूर्वी एक अजून सांगायचे आहे, प्रथिनांचे प्रमाण कमी झाले तर पाय दुखी किंवा अशक्तपणा, अशी लक्षणं दिसतात का?
४६ gms दर दिवशी असं प्रथिनांचे प्रमाण मला गुगलवर सापडलं. पण हे कसं आणि कशातून घ्यायचं याचं मार्गदर्शन डॉक्टरांच्या कायप्पा ग्रुप वर केलं जातं का? आणि दुसरं म्हणजे दिवसभरात लागणारी शक्ती म्हणजे उदा.ऑफिस ला जाणे, शिक्षक म्हणून काम करणे, या सगळ्यासाठी जी शक्ती लागते, ती या दोन वेळच्या आहारातून कशी भागवली जाते?( सध्या मी घरीच आहे, म्हणून मला हा प्रश्न पडलाय)
आपल्या पैकी कोणाला माझ्यासारखा अनुभव आला असेल तर त्यांनी काय उपाय केला?
( मला मधुमेह नाही. )

सुमेरिअन's picture

19 Sep 2018 - 12:37 am | सुमेरिअन

चार आठवडे झाले हा डाएट चालू करून. २.५ किलो वजन कमी झालं आहे. या डाएट चा सगळ्यात मोठा फायदा वाटलं तो म्हणजे पाळायला सोप्पं आहे.
१. ब्लॅक कॉफी घेतली तर चालते का या डाएट मध्ये? डॉ. दीक्षितांनी ताक, नारळ पाणी, ग्रीन टी चालेल असा सांगितलं आहे विडिओ मध्ये.
२. मी अमेरिकेला असतो. त्यामुळे कुठल्या व्याख्यानाला जाता आलं नाही. मला या डाएटच्या व्हाट्सअँप समूहामध्ये कसा ऍड होता येईल ते कोणी सांगू शकेल का?

सुबोध खरे's picture

19 Sep 2018 - 10:36 am | सुबोध खरे

ब्लॅक कॉफी घेतली तर चालते चिंता नाही

सुमेरिअन's picture

19 Sep 2018 - 9:58 pm | सुमेरिअन

धन्यवाद डॉक्टर साहेब!

ज्यांना कुणाला या अभियानाच्या व्हॉटसअ‍ॅप ग्रुप मधे सामील व्हायच असेल त्यांनी HbA1c आणि fasting insuline या दोन तपासण्या करून त्याचे अहवाल डॉ. दीक्षित यांना किंवा त्यांनी नेमलेल्या खालील व्यक्तिंना दिलेल्या फोन नंबरवर पाठवावेत.
या दोन रिपोर्ट शिवाय सभासदत्व मिळत नाही.
हे फोन नंबर विनासायास वेटलॉस आणि मधुमेह प्रतिबंध या पुस्तकाच्या १५ व्या आवृत्तीमधे पान क्रमांक १४० वर दिलेले आहेत.

क्र्मांक नाव शहर व्हॉटस अ‍ॅप क्रमांक
1 श्री. अरूण नावगे , मुंबई 8999406017
2 डॉ. वेदा नलावडे , पुणे 9545529255
3 डॉ. संतोष ढुमणे , पुणे 9890886727
4 डॉ. संगिता पंडित , पुणे 9822022416
5 श्री. संदीप सोनवणे , नाशिक 9422256450
6 श्री. अमोल भागवत , मुंबई 9757399529
7 श्री. ए जी चौधरी , ठाणे 9821862424
8 डॉ. अंजली दीक्षित , औरंगाबाद 9423779765
9 श्री. बाळासाहेब कदम , फलटण 9422033382
10 सौ. शर्मिला इनामदार , ठाणे 9769695940
11 डॉ. विमल डोळे , लातूर 9850056648
12 डॉ. नंदनवनकर , नांदेड 9823121986
13 डॉ. हेमंत अडीकणे , नागपूर 9420515123
14 श्री. अतुल कुलकर्णी , सोलापूर 9423067399
15 डॉ. शिल्पा तोतला , औरंगाबाद 9823281391
16 डॉ. सुजाता लाहोटी , औरंगाबाद 9325205455
17 अनिता बाहेकर , औरंगाबाद 9422211854
18 डॉ. आशिष चव्हाण , आंबेगाव, पुणे 9975051000
19 डॉ. सौ. सीमा दहाड , औरंगाबाद 8888849809
20 डॉ. राजेश दाते , दौंड 9422224298
21 डॉ. निकोसे , अमरावती 9422912614
22 श्री. दीपक कुलकर्णी , पुणे 9850217641
23 मुक्ता गाडगीळ , पुणे 9822171517
24 डॉ. गौतम शाह , धुळे 9881278698
25 डॉ. श्रीराम गोसावी , पालघर 9028381578
26 डॉ. गजानन जत्ती , सोलापूर 8237005707
27 डॉ. सुभाष जोशी , बीड 8275387063
28 डॉ. जयश्री कालानी , परभणी 9422925227
29 डॉ. राजकुमार कालानी , परभणी 9422176227
30 श्री. राजू अकोलकर , नागपूर 9096399222
31 डॉ. अर्चना बिर्ला , जळगाव 9226219302
32 सौ. वर्षा मालखरे , औरंगाबाद 9850184084
33 मनोज गोविंदवार , जळगाव 8237513242
34 डॉ. ए एन मस्के , सोलापूर 7030884546
35 डॉ. शैलेश नागपूरे , वर्धा 9503509430
36 सौ. शिल्पा उनकुले , पुणे 8975469006
37 डॉ. सुधीर चौधरी , औरंगाबाद 9822874194
38 डॉ. शालीनी , ओतूर पुणे 9975721202
39 डॉ. शर्मीली सूर्यवंशी , नांदेड 9325565009
40 श्री. शिवशंकर स्वामी , औरंगाबाद 9422210371
41 श्री. साकेत देशपांडे , बंगळूरू 9886843808
42 प्रा. प्रदीप पाटील , औराद शहाजानी 7588876455
43 सौ. रचना मालपाणी , लातूर 9422110282
44 श्री. उल्हास सावजी , औरंगाबाद 9049711106
45 सौ. वैशाली तोष्णीवाल , नगर 9657607268
46 श्री. रवी जगन्नाथन , ठाणे 9819576176
47 सौ. रेखा मुंदडा , धुळे 9422706111
48 डॉ. मनिषा चौरे , शिरूर 9270152610
49 डॉ. संध्या दळे , चेन्नई 9790799599

तसेच लेखात दिलेल्या लिंकमधील व्हीडीओमधे सांगितल्याप्रमाणे

effortlessjag@gmail.com येथे मेल करा.
किवा
डॉ. दिक्षीतांचा फोन नं. ९९२२९९४७७७ आहे. या नंबरवर व्हॉट अ‍ॅपवर तुमचा प्रश्न विचारा.
किंवा
त्यांचा इमेल drjvdixit@gmail.com येथे कळवा.

सुमेरिअन's picture

19 Sep 2018 - 10:00 pm | सुमेरिअन

धन्यवाद!

शाम भागवत's picture

19 Sep 2018 - 10:07 pm | शाम भागवत

मा. संपादकीयांनी लोकांच्या सोयीसाठी वरील माहिती गाभा मधे हलवली तरी माझी काही हरकत नाही.

पिलीयन रायडर's picture

19 Sep 2018 - 8:01 pm | पिलीयन रायडर

माझी आई हे बऱ्यापैकी करते आहे. सणवार असल्याने कधी तरी वेळ पाळल्या जात नाही. मला जाणवलेल्या गोष्टी
तिचं वजन 4 किलो ने कमी झालंय, जे नजरेला कळत आहे.
भूक ओव्हरॉल कमी झालीये, 2 दा खाल्लं की तिचं पोट नीट भरत आहे.
झोप गाढ लागतेय, लवकर झोपून जाते
पण मला तिची एनर्जी जरा कमी झालीये असं वाटलं. त्याहूनही मसल मास कमी झालं की काय असं तिच्या कडे बघून वाटलं. हात वगैरे जरा गळल्यासारखे वाटले. तिलाही थोडं थोडं असंच वाटतंय. ती चालायला जाते, पण अजून वेगळा काही व्यायाम करत नाहीये. अजून थोडे दिवस बघू काय होतंय.

माझ्या वडिलांना इन्शुलिन घ्यावं लागतं, त्यांना तरी त्यांच्या डॉकटरने हे डाएट करायला मनाई केली आहे.

आईंसाठी प्रथिनांसाठी काय करता?

पिलीयन रायडर's picture

20 Sep 2018 - 8:55 pm | पिलीयन रायडर

बहुदा ती काहीच करत नाहीये वेगळं. रोजचं जेवणच फक्त. त्यात डाळी, कोशिंबीर, उसळी वगैरे असतं तेच काय ते. पण मी तिला ह्यावर जरा नीट लक्ष द्यायला सांगेन.

@चष्मेबद्दूर , आहारातील प्रथिने वाढवा व कर्बोदके कमी
करा असे दीक्षित सांगतात, त्यासाठी पनीर, उसळी, सोया पनीर
फुटाणे इ. मी जेवणात आधी खाते. राजमा, हरबरे, छोले, उकडून त्यात कांदा,लिंबू,चाट मसाला इ घालून फार छान लागते. चीज सुध्दा खाऊ शकता. दुसरा तुमचा प्रश्न दिवसभरात शक्ति पुरते का? तर हो , सुरवातीला सवय होईपर्यंत त्रास होतो पण आठवड्यानंतर सर्व त्रास थांबतो. (हे दीक्षितांच्या ग्रूप मधे सांगितले आहे) पाणी पण मधे मधे प्यायले पाहिजे. प्रथिनांसाठी मी बदाम, सोयाबीन, जवस, शेंगदाणे, अक्रोड, तीळ, चीया सीड्स, फुटाणे , सुर्यफूल व लाल
भोपळा बी असे सर्व भाजून एकत्र पावडर करून ती रोज दोन चमचे घेते.

शाम भागवत's picture

19 Sep 2018 - 9:59 pm | शाम भागवत

माझ्या पण हेच मनात आले होते.
मोड आलेली धान्ये पचायला चांगली. त्यात जर काही दाणे मेथीचे असतील तर फारच उत्तम.

चष्मेबद्दूर's picture

20 Sep 2018 - 9:43 am | चष्मेबद्दूर

कडधान्ये खाऊन मला त्रास होतो, पोटात दुखणे वगैरे. ती वाफवून घेतली तरी मी जास्त नाही खाऊ शकत. प्रयोग करून झालेत.

मी रोज दिवसभरात 1 वाटी घट्ट डाळ, 2.५ चमचे (साधे) प्रोटीनेक्स पावडर दुधातून हे तर घेतोच पण जर नॉन व्हेज असेल तर ते यात additional होईल. असं असून सुद्धा मला थकवा येतोय. यात मी चालण्याचा व्यायाम करू शकत नाहीये.
असंच अजून कुणाला झालेलं दिसत नाहीये, मला प्रत्यक्ष डॉ नाच विचारावं लागेल.

शाम भागवत's picture

20 Sep 2018 - 11:09 am | शाम भागवत

डाॅ. ना भेटाच.
मला वाटतेय प्रथिनांचे प्रमाण जास्त होतय किंवा ती पचत नाहीयेत.
किंवा कार्बोहैड्रेट कमी पडताहेत.

काहीतरी चुकताय नक्की.
व्हाॅटसॲप ग्रुप मधे सामिल व्हा. दोन रिपोर्टस् अत्यावश्यक.

नेहमीच्या जेवणात खूप मोठा बदल केलाय का? मांसाहार करणाऱ्यांनी प्रोटिन्स आवर्जून वाढवण्याची जरूरी नसावी.

डाॅ खरे बघू काय म्हणतात ते.

शाम भागवत's picture

20 Sep 2018 - 11:28 am | शाम भागवत

तो पर्यंत हे वाचून बघा

https://www.livehindustan.com/news//article1-story-463763.html

चष्मेबद्दूर's picture

20 Sep 2018 - 12:34 pm | चष्मेबद्दूर

तुम्ही दिलेला लेख वाचला, त्याप्रमाणे मोजमाप करून बघते. मी एका वेळेला जास्त खाऊ शकत नाही, त्यामुळे देखील असं होत असावं.
सल्याबद्दल आभारी आहे.

मराठी कथालेखक's picture

20 Sep 2018 - 5:47 pm | मराठी कथालेखक

विटॅमिन्सची कमतरता झाली असेल .. मल्टीविटॅमिन्सच्या गोळ्या घेवून बघा. Matilda Forte चांगली आहे.
झालंच तर जेवणातून साखर एकदमच पुर्ण बंद करु नका. फळे खा.

II श्रीमंत पेशवे II's picture

20 Sep 2018 - 10:24 am | II श्रीमंत पेशवे II

मंडळी ,

प्रयोग चालू करून आज २ महिने पूर्ण झाले आहेत
माझे वजन ७६ वरून ६८ झाले आहे
पोटाचा घेर विलक्षण कमी झालाय ,सगळ्या विजारी सैल व्हायला लागल्या आहेत.
गणेशोत्सव छान पार पडला ........
मित्र मंडळी आणि शेजारी यांचेकडे बाप्पांचे दर्शन घ्यायला गेल्यावर अगोदर 2 मिनिटे विनासायास ची माहिती देऊन दिलेला प्रसाद डब्यात घेऊन आलो.
आणि विशेष म्हणजे मी चालू केलेला प्रयोग पाहून माझ्या समोर राहणारे काका वय ५५ वजन ८७ किलो यांना हि हा चालू करण्यास प्रवृत्त केले.
खूप समाधान वाटले.

शाम भागवत's picture

20 Sep 2018 - 11:10 am | शाम भागवत

लगे रहो.
:)
_/\_

चष्मेबद्दूर's picture

23 Sep 2018 - 5:25 pm | चष्मेबद्दूर

नावाची एक कॅप्सूल रोज घेतेय.
शिवाय भरपूर पाणी, पातळ ताक, साखर एकदम बंद नाही केली, जेवणात मोठे बदल नाही केले, फक्त वेळा पाळतेय,
असो.
ग्रुप मध्ये सामिल झाले की कळेल.

अर्धवटराव's picture

26 Sep 2018 - 5:58 pm | अर्धवटराव

रिकाम्यापोटी व्यावाम करु नये असे सगळे जिम इन्स्ट्रक्टर सांगतात... हे कितपत योग्य आहे? दोन वेळ जेवणारांना आपल्या व्यायामाबाबत खुप बदल करावे लागत असतील मग.

ऑ, मी तर ऐकलंय उपाशीपोटी केलेला व्यायाम हा जास्त परिणामकारक असतो. उपाशीपोटी जेव्हा इन्शुलिनची पातळी कमी असते तेव्हा ग्लुकॅगॉन सक्रिय असते आणि तेव्हा व्यायाम केला तर पहिल्यांदा ग्लुकोज नंतर ग्ल्याकोजेन आणि शेवटी चरबीच्या साठ्याला हात घातला जातो असे सांगतात. डॉ. जेसन फंग ची टू कम्पार्टमेंट्सची (फ्रिज आणि फ्रिजर) थेअरी देखील हेच सांगते. मग जिम इन्स्ट्रक्टर बरोबर कि डॉ. फंग?

मिपावरचे डॉ. खरे किंवा इतर मंडळी खरे काय ते सांगू शकतील.

माझीही शॅम्पेन's picture

8 Oct 2018 - 7:15 pm | माझीही शॅम्पेन

व्यायाम म्हणजे नक्की काय हे आधी स्पष्ट झालं तर डॉक लोक आणखी मार्गदर्शन करतील