काटा वजनाचा -१

सुबोध खरे's picture
सुबोध खरे in काथ्याकूट
31 Dec 2015 - 12:34 pm
गाभा: 

डॉक्टर आम्ही काहीही केले तरी आमचे वजन कमीच होत नाही.
पण आम्ही काही खातच नाही.
आम्ही इतके जिम मध्ये घाम गाळतो पण वजन काही हलत नाही.
वजनाचा काटाच बरोबर नाही
वजनाचा काटा पाहिला कि अंगावर काटा येतो
वजनाचा तक्ता चूक आहे किंवा
एवढं कमी वजन असणं कसं शक्य आहे ?
आम्ही हवा खाल्ली तरी जाडे होतो.
आम्ही तुपाचा वास जरी घेतला तरी तरी आमचे वजन वाढते.
आता फक्त उपास करणे बाकी आहे.
जरा तरी खात्या पित्या घरचे दिसायला नको का?
आता कशी तब्येत छान दिसते आहे पूर्वी तर लोक मला पाप्याचे पितर म्हणत असत.
माझे वजन बरोबर आहे फक्त उंचीच थोडी कमी आहे.
बाळंतपणात "जरा" जास्त खाल्लं तर वजन इतकं वाढलं ते आता काही केल्या कमी होत नाही.
दोन मुलं झाली आता काय ब्युटी कॉन्टेस्ट मध्ये भाग घ्यायचा आहे का ?
मी संतती नियमनाच्या गोळ्या घेतल्या त्यामुळे वजन वाढलं
मेनो पॉज नंतर वजन वाढतंच
पायाचं हाड मोडलं होतं त्यामुळे दीड महिना घरी बसलो होतो त्यामुळे वजन वाढलं
हि वाक्ये वेगवेगळ्या रागात लयीत आणी स्वरात ऐकायला येतात.
यातील सर्वात प्रामाणिक वाक्य म्हणजे डॉक्टर वजन कमी करायला हवं आहे हे कळत आहे पण ते वळत नाही. समोर इतके रुचकर पदार्थ येतात आणि मग मोह आवरत नाही.
खरं तर प्रत्येक वजनदार माणसाची हीच स्थिती आहे.
बहुसंख्य "वजनदार" लोकाना आपले वजन फार जास्त आहे आणी आपण ते कमी करावे असे वाटत नाही. यामुळे जवळ जवळ सर्वच वजनदार लोक आपण प्रत्यक्ष खात असलेल्या अन्नापेक्षा कमी अन्न खातो असा दावा करीत असतात. हे denial (नाकबूल) आहे. https://en.wikipedia.org/wiki/Denial
वस्तुस्थिती काय आहे ते पाहू या
आज जगात ९२ कोटी लोक भुकेलेले आहेत तर १५० कोटी लोक जाडे/ वजनदार आहेत.
जगभरात कुपोषणापेक्षा अतिपोषणामुळे तिप्पट लोक मृत्यू पावतात.
लठ्ठपणा हा रोग आता जागतिक स्तरावर मोठा प्रश्न बनला आहे. आणी यात फक्त श्रीमंत देशच नव्हे तर गरीब देश हि सापडले आहेत.
अगदी रस्त्यावर किंवा झोपड्यात राहणारे लोकही भरगच्च आणी पोट सुटलेले दिसतात.
दिल्ली किंवा मुंबईत उच्चभ्रू शाळांत ७० % मुले हि अतिवजनाची शिकार बनलेली आढळली आहेत.
वजनदार लोकांचे सरासरी आयुष्य ३ वर्षांनी कमी होते आणी लठ्ठ व्यक्तींचे आयुष्य १० वर्षांनी कमी होते.
जगातील १/३ लोक "वजनदार"( OVERWEIGHT) आहेत आणी १/१० लोक लठ्ठ (OBESE) आहेत.
शरीर वस्तुमान निर्देशांक (BODY MASS INDEX-BMI) हे आपले वजन मोजण्याचे जास्त चांगले परिमाण आहे.
यात माणसाचे वस्तुमान भागिले उंचीचा वर्ग (WT / HT x Ht). यात वस्तुमान( वजन) किलोग्राम मध्ये आणी उंची मीटर्स मध्ये मोजलेली हवी.
यात स्वस्थ माणूस -- BMI १९ ते २५ हवा
वजनदार माणूस BMI २५ ते ३०
आणी लठ्ठ BMI ३० पेक्षा जास्त.
याहून सोपे परिमाण म्हणजे आपल्या उंचीच्या तुलनेत आपले पोट (कंबर नव्हे) ५० टक्क्यापेक्षा कमी हवे. उदा. १७२ सेमी (पाच फुट आठ इंच) माणसाचे पोट ८६ सेमी (३३.८५ इंच) पेक्षा कमी हवे. हे पोट मोजण्याचे ठिकाण म्हणजे सरळ उभे राहिल्यावर पोटाचा जास्तीतजास्त घेर मोजणे.
उदा. १७२ सेमी (पाच फुट आठ इंच) माणसाचे वजन ५७ किलो ते ७४ किलो मध्ये असायला हवे. म्हणजे सरासरी वजन ६५ ते ६६ किलो वजनाच्या माणसाला ८-९ किलो जास्त वजनाची मुभा असते.( बहुसंख्य लोकांची हि तक्रार असते कि वजनाचा पल्ला(RANGE) फार कमी आहे. किंवा वजनाच्या तक्त्यात दाखवलेले प्रमाण वजन फारच कमी आहे.
http://halls.md/body-mass-index/av.htm
यात हा BMI मापक आहे. असा कोणताही मापक जालावऋण आपल्याला पाहता येईल
हि लेखमाला म्हणजे कोणताही स्वयंभू विचार नाही तर सध्या उपलब्ध असलेल्या वैद्यकीय माहितीचे सोप्या शब्दात भाषांतर करण्याचा प्रयत्न आहे. यात विविध वैद्यकीय पुस्तकांचा आधार घेतलेला आहे.उदा.harrison's principles of internal medicine.
तेंव्हा विदा किंवा दुवा उपलब्ध आहे पण लगेच मिळेल असे नाही( शोधावा लागेल).
रच्याकने-- बर्याच लोकांना वरीलपैकी एखादे विधान आपल्याबद्दलच लिहिले गेले असावे असे वाटू शकते
क्रमशः

प्रतिक्रिया

मन१'s picture

31 Dec 2015 - 12:49 pm | मन१

वाचतोय.
लेखाच्या सुरुवातीला नेहमीचे संवाद देण्याचा मिश्किलपणा आवडला.
ह्याबाबर्त माझे दोन पैसे :-
http://www.misalpav.com/node/32875
.
.
( अर्थात मला नेमकं काही सम्जत नाही वैद्यकातलं; पण बहुतेक काही काही गोष्टी मी सवयीने/चुकून/अजाणतेपणी बरोबर करत असेन ; असा अंदाज. )

.
.
पुभाप्र

सुबोध खरे's picture

31 Dec 2015 - 12:57 pm | सुबोध खरे

मनोबा
दुपारी १२ ४९ ला असा दुवा देणे हे पाप आहे. जेवणाच्या वेळेस असे विविध खाद्य पदार्थांच्या बद्दल चर्चा करणे अजिबात बरोबर नाही. लेख अगोदरही वाचला होताच.
भुकेने कासावीस आणी त्यात हे असं.
रच्याकने-- माझा BMI या निमित्ताने पाहिला तो २१. ८ आला. तेंव्हा आता काही तरी जोरदार खायला पाहिजे

यशोधरा's picture

31 Dec 2015 - 12:50 pm | यशोधरा

वाचते आहे.

झक्कास. जिव्हाळ्याचा विषय छेडलात. :)

मुक्त विहारि's picture

31 Dec 2015 - 12:55 pm | मुक्त विहारि

उन्हाळ्याच्या अखेरीस ते वाढते.

मग गणपतीच्या सुमारास ते थोडे आक्रसते.

पुढे दसरा-दिवाळीच्या युतीने ते परत वाढते.

आणि मग हिवाळ्यात पोटाच्या कक्षा रुंदावत जातात.

हिवाळा संपला की पोट परत आक्रसते आणि आंब्याचा सीझन सुरु झाला की परत वाढते.

थोडक्यात काय,

तर जीभेसाठी जगत असल्याने, थोडाफार भार पोटावर येतो.

काका हेच खर ब्रम्हवाक्य....!_/\_

दिपक.कुवेत's picture

1 Jan 2016 - 7:54 pm | दिपक.कुवेत

जल्ला ह्या जीभेवरच ताबा नाय तर पोट्/वजन कसं काय कमी होणार?? एनी वे छान धागा. होणार्‍या चर्चा वाचायला आणि त्यातले काही उपाय अमलात आणायला आवडतील.

नीलमोहर's picture

31 Dec 2015 - 12:57 pm | नीलमोहर

"वजनाचा काटा पाहिला कि अंगावर काटा येतो,
एवढं कमी वजन असणं कसं शक्य आहे ?
जरा तरी खात्या पित्या घरचे दिसायला नको का?"
- अगदी हेच :)

पूर्वी कमी वजनाबद्दल OCD होता म्हटले तरी चालेल, आता वजन कमी असले तरी फिटनेस वाढवण्यावर भर असतो.
या विषयावरील लेखाची खूप गरज होती, वजन वाढवू इच्छिणार्‍यांसाठीही काही लिहावे ही नम्र विनंती.
पुढील लेखाच्या प्रतीक्षेत..

सुबोध खरे's picture

31 Dec 2015 - 1:01 pm | सुबोध खरे

वजन वाढवू इच्छीणार्यांना मी एक साधा सल्ला देतो.
तळवलकर, VLCC, गोल्ड जिम सारख्या जिमच्या बाहेर सकाळी उभे राहा. त्यातून बाहेर येणाऱ्या सुदृढ लोकांना विचारा, "तुम्हाला आहार तज्ञाने "काय काय खाऊ नका" सांगितले आहे?
"ते सर्व दाबून खा"

नीलमोहर's picture

31 Dec 2015 - 2:51 pm | नीलमोहर

कितीही खाण्याने फरक पडत नाही,
वेट गेन साठी जिम वगैरे लावूनही उपयोग नाही, वजन तात्पुरते वाढेल परत जैसे थे.

इतर लोक आमच्या बारीक असण्यावर जळतात आणि असे जाड लोक पाहिले की आपण आहे तसेच बरे असं वाटतं,
तेवढंच समाधान :)

इतर लोक आमच्या बारीक असण्यावर जळतात आणि असे जाड लोक पाहिले की आपण आहे तसेच बरे असं वाटतं,
तेवढंच समाधान :) >>>

अगदी, अगदी.. शिवाय त्यांच्या जाड असण्याबद्दल आपण काही म्हणू शकत नाही, पण ते मात्र आपल्याला जेव्हा भेटतील तेव्हा "तू आता अजून किती बारीक होणार आहेस?" , "तू म्हणजे एखाद्याने किती बारीक असावे याचा नमुना आहे" असे काही म्हणून मोकळे होणार!

मला मात्र ट्रेडमील, सूर्यनमस्कार यांचा फायदा झाला थोडे वजन वाढवायला - BMI - १९ च्या वर आणायला.. पण एकंदरीत जास्त लोकांना वजन कमी करणेच अवघड जात असल्याने उगीच फार वाढवण्याचे कष्ट घेतले नाही :)

हे असं सगळं लिहिण्यापेक्षा काढा तुमचं ते पायताण आणि मारा आमच्या टाळक्यात! :)
च्यायला, पुढल्या भागात उपाय लिहा ना उपाय!!!!

मन१'s picture

31 Dec 2015 - 1:45 pm | मन१

लोल .

उपाय सांगतीलच ते पुढील धाग्यात.

तोवर होमवर्क, चित्रगुप्तांचा धागा :-

शरीरशुद्धी, सपाट पोट, योग्य वजन आणि संपूर्ण आरोग्य मी कसे मिळवले ?

सर्व डॉक्टरांना असा होमवर्क केलेले विद्यार्थी खुप खुप आवडतात . गूगल - विद्यार्थी आणि गूगल-ज्ञानी.

भरपूर वाचून वगैरे यायचं ; मग डाँ ना विचारत सुटायचं. तेवढाच डॉक्टर लोकांचा वेळही वेळ बरा जातो ;)
शिवाय जमल्यास त्यांनाच मार्गदर्शन करुन यायचं.
.
.
अवांतर :-
तो धागा शिरेसली चांगला आहे.

प्रचेतस's picture

31 Dec 2015 - 1:42 pm | प्रचेतस

पुभाप्र.

पहिली सगळी वाक्य म्हणण्याचे भाग्य आम्हास कधी लाभणार :D

सुबोध खरे's picture

31 Dec 2015 - 2:24 pm | सुबोध खरे

बारीक माणसाला सल्ला -- थांबू नका , खा!
जाड माणसाला सल्ला -- थांबा , खाउ नका!

कुंडलीत सप्तमात गुरू असेल तर वजनाचा काटा विकतही घेऊ नये ,असल्यास माळ्यावर टाकावा.

#पहिली सगळी वाक्य म्हणण्याचे भाग्य आम्हास कधी लाभणार :D"

--आलटून पालटून सकाळी पंजाबी समोसे,मेदुवडे( उडीद वडे),चीज सॅन्विज खाल्यावर सहा महिन्यात.

सुबोध खरे's picture

31 Dec 2015 - 2:22 pm | सुबोध खरे
मदनबाण's picture

31 Dec 2015 - 2:33 pm | मदनबाण

याहून सोपे परिमाण म्हणजे आपल्या उंचीच्या तुलनेत आपले पोट (कंबर नव्हे) ५० टक्क्यापेक्षा कमी हवे.
च्यामारी असं हाय काय ! आता माझ्या सुटलेल्या तंबोर्‍याला काय सांगावे ? ;)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- नटसम्राट... { असा नट होणे नाही ! }

कॅलरीज कॅलरीज कॅलरीज... असे अधुन मधुन मी माझ्या मनाला समजावत असतो... तरी सुद्धा परवा लग्नाला गेलो होतो तिथे चांगला ताव मारलाच, पण आईस्क्रीम खाताना जरा जास्तच हवरटपणा केला... आईस्क्रीम + अक्रोड हलवा + रबडी असे बाउल मधे कॉबिनेशन घेवुन आईस्क्रीमची चव चाखली ! :) घरी आल्यावर मग कॅलरी ने मनाला प्रश्न केला ! ते सुद्धा भरलेल्या पोटाच्या तंबोर्‍यावर कटाक्ष गेल्यावर !

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- नटसम्राट... { असा नट होणे नाही ! }

नंदन's picture

31 Dec 2015 - 2:40 pm | नंदन

>>>आता माझ्या सुटलेल्या तंबोर्‍याला काय सांगावे ? ;)
--- गवसणी घालायला हवी ;)

मदनबाण's picture

31 Dec 2015 - 2:43 pm | मदनबाण

हा.हा.हा... :) होय खरयं !

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- नटसम्राट... { असा नट होणे नाही ! }

पद्मावति's picture

31 Dec 2015 - 2:39 pm | पद्मावति

फारच छान लेख. लेख वाचून घरी माळ्यावर पडून असलेला वजनाचा काटा आता बाहेर काढलाय.

वजनाचा काटा पाहिला कि अंगावर काटा येतो

:( खरंय...

क्रमश: आहे ते आवडलं. पु. भा. प्र.

खुशि's picture

31 Mar 2016 - 6:27 pm | खुशि

झकास आहे लेख.

खुशि's picture

31 Mar 2016 - 6:29 pm | खुशि

झकास आहे लेख.

सस्नेह's picture

31 Dec 2015 - 2:53 pm | सस्नेह

BMI मोजताना

यात वस्तुमान( वजन) किलोग्राम मध्ये आणी उंची सेमी मध्ये मोजलेली हवी.

इथे उंची मीटर्समध्ये असे हवे आहे असे वाटते.

सुबोध खरे's picture

31 Dec 2015 - 2:59 pm | सुबोध खरे

हो उंची मीटर मध्येच हवी.इंच नाही म्हणून सेमी लिहिले आहे.
आय माय स्वारी.

सस्नेह's picture

31 Dec 2015 - 3:14 pm | सस्नेह

त्याप्रमाणे दुरुस्ती केली आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

31 Dec 2015 - 3:12 pm | डॉ सुहास म्हात्रे

ही उपयोगी लेखमाला होईल हे नक्की. खुसखुशीत शैलीत असल्याने लोकांच्या सहज पचनीही पडेल. मात्र लेख जास्त पचविल्याने (समजून उमजून व्यवहारात आणल्याने) वजन वाढणार नाही तर कमीच होईल ! ;) :)

एक छोटीशी सुचवणी :
BMI = Weight in Kilograms / ( Height in Meters x Height in Meters )

पुभाप्र.

नाखु's picture

31 Dec 2015 - 3:21 pm | नाखु

रुते कुणाला ची तीव्रतेने आठवण करून देणारा वाखु धागा.

स्वगत :नाखु लक्ष्य द्या "बाळश्याकडे"

अजया's picture

31 Dec 2015 - 4:38 pm | अजया

वाचते आहे.पुभाप्र.
लेखमालिका वाचून माझे वजन घटल्यास एक डोंबिवली कट्टा प्रायोजित करण्यात येईल ;)

आईग्ग! सगळ्यांच्या चिंतेचा विषय.
लेखमाला वाचत राहीन.

अरवीन्द नरहर जोशि.'s picture

31 Dec 2015 - 5:14 pm | अरवीन्द नरहर जोशि.

माहिती अति उत्तम आहे.

सर्वसाक्षी's picture

31 Dec 2015 - 5:44 pm | सर्वसाक्षी

पण गोड खाणे सोडणार नाही. रात्रीच्या जेवणात गोड नसेल तर मी चॉकलेट्स तरी खातोच खातो. तीही नसली तर क्रिम बिस्कीटे. अलिकडे नको त्या वयात वजन वाढत आहे, विरोधी पक्ष रोज पोटाकडे बोट दाखवतो.

कृपया पुढील भागात गोड खाउनही पोट कमी कसे करता येईल यावर उपाय सुचवा.

चतुरंग's picture

31 Dec 2015 - 5:45 pm | चतुरंग

सुरुवातीची वाक्ये मस्तच! ;)

(खुद के साथ बातां - रंगा, वजनाचा 'काटा' कसा काढावा बरे? ;) )

(जडशरीरभयकारी)रंगगोल

अभ्या..'s picture

31 Dec 2015 - 5:57 pm | अभ्या..

मापात हौ भौ आपण.
टेन्शन इल्ला :)

सस्नेह's picture

31 Dec 2015 - 6:41 pm | सस्नेह

दो के चार हूंदेत आणि दोन अगलतगल खेळूदेत मग बघू हां :)

अगलतगल ग्राऊंडवर घेऊन जाणारे चालायला लागले की. ;)

नाखु's picture

1 Jan 2016 - 8:59 am | नाखु

इद्रीक असल्यावर पोरं चळवळी असतील यात मला अज्याबात सौंशय नाही..

नुकतीच अभ्या मठीला भेट दिलेला.

थेट भेट वाला नाखु

सिरुसेरि's picture

31 Dec 2015 - 6:32 pm | सिरुसेरि

उपयुक्त माहिती . काहि माणसे खादाडही असतात आणि व्यायामही करीत नाहीत तरी ती बारीक असतात - याचे शास्त्रीय कारण काय असावे .

मागील जन्मी केलेली सत्कर्मे :P

उगा काहितरीच's picture

31 Dec 2015 - 7:36 pm | उगा काहितरीच

कुणी मला म्हटलं की बाबारे असा असा आहार घे शंभर वर्षे जगशील तर त्याला म्हणेल बाबाजी ४०% कमी करा पण खाण्यावर नियंत्रण , अवघड आहे .

रामपुरी's picture

1 Jan 2016 - 3:29 am | रामपुरी

डॉक्टरसाहेबांचा आणखी एक बहुमूल्य धागा...

रच्याकने, माझे वजन, उंची, पोट, BMI, रोजचा व्यायाम, आहार सगळं सगळं मापात आहे पण कोलेस्ट्रॉलचा आकडा ढगाला टेकलाय. आहार थोडा कमी करून आणि व्यायाम थोडा वाढवून वजन चार पाच किलो कमी केले. पण यापुढे काय करावे कळत नाही.

श्रीरंग_जोशी's picture

1 Jan 2016 - 4:35 am | श्रीरंग_जोशी

गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये वार्षिक चाचणीमध्ये माझे कोलेस्टेरॉल बरेच वाढल्याचे आढळले. तरी पण डॉक्टरांच्या मते औषधाच्या साहाय्याने कमी करण्याइतके वाढले नव्हते. डॉक्टरांनी आहारात सुधारणा व व्यायाम हे मार्ग सुचवले.

आयुष्यात प्रथमच गांभीर्याने असे उपाय करायची माझी वेळ होती. मी केलेले बदल-

  • साखरेचे सेवन अगदी अपवादात्मक परिस्थितीत करणे.
  • बेकरी प्रॉडक्टस व तळलेले पदार्थही महिन्या दोन महिन्यांतून एखादे वेळेस खाणे.
  • घरी अ‍ॅरोबिक्स व्यायाम करणे व हापिसात जमेल तेव्हा जिन्याने वर जाणे.

पहिल्या २० आठवड्यानंतर कॉलेस्टेरॉल तपासले तर १०% कमी झाले होते अन वजनही १० पाउंडांनी कमी झाले होते.

गेल्या आठवड्यात पुन्हा वार्षिक चाचण्या केल्या. कोलेस्टेरॉल गेल्या वर्षी पेक्षा २० टक्के कमी झाले आहे. वजन जे कमी झाले होते ते कायम राहिले. अजुनही कोलेस्टेरॉल नॉर्मल मर्यादेपेक्षा थोडेसे अधिक आहे पण डॉक्टरांच्या मते ती काळजीची बाब नाही.

वजन कमी झाल्याने मला अधिक एनर्जेटिक वाटू लागले अन हापिसातले वा घरातले काम करण्याचा स्टॅमिना वाढला.

या विषयाला हात लावण्यासाठी डॉ. खरे यांना धन्यवाद. पुढच्या भागाची उत्सुकता आहे.

रमेश आठवले's picture

1 Jan 2016 - 6:24 am | रमेश आठवले

भारतीय अनुवंशाच्या लोकांमध्ये Triglycerides नेहमी जास्त प्रमाणात मिळतात. याचे कारण काय,परिणाम काय व त्यावर उपाय काय ?

सुबोध खरे's picture

2 Jan 2016 - 7:36 pm | सुबोध खरे

http://timesofindia.indiatimes.com/city/mumbai/80-Indians-have-skewed-li...
हा अभ्यास २१ कोटी लोकांवर केलेला आहे. "चार" रुग्णांवरील स्वतःचे वैयक्तिक अनुभव नाहीत. शिवाय शहरी लोकांमध्येच असे रोग होतात हा दावा पण फोल ठरलेला आहे. महाराष्ट्रात ग्रामीण भागातील लोकांची परिस्थिती शहरातील लोकांइतकीच गंभीर आहे असे या अभ्यासात आढळून आले आहे.
गावात लोकाची जीवन पद्धती जास्त चांगली असते अन गावात माणसे "जास्त निरोगी असतात"असे म्हणणार्यांचे डोळे उघडतील असा हा अभ्यासाचा प्राथमिक निष्कर्ष आहे.
यावरील उपाय पुढच्या भागात येतीलच.

असेल तर तसे करु नका. वरणभातावर साजूक तूप घेत चला. शरीरातील चांगला मेद अतिशय कमी झाला तरी कोलेस्टेरॉल वाढते.

श्रीरंग_जोशी's picture

1 Jan 2016 - 9:23 am | श्रीरंग_जोशी

साजूक तूप माझ्या रोजच्या आहाराचा भाग नसले तरी अधून मधून खाल्ले जातेच.
माहितीसाठी धन्यवाद.

परंतु तसा सगळ्यांनीच लक्षात घ्यायला हरकत नाही. साजूक तूप हे योग्य प्रमाणात नियमित आहाराचा भाग बनवणे आवश्यक आहे. रक्तवाहिन्यांची लवचिकता, चांगल्या कोलेस्टेरॉलचे योग्य प्रमाण राखण्यासाठी शरीरात पुरेशा प्रमाणात वंगण असणे आवश्यक असते जे या तुपातून मिळते. अर्थातच योग्य आहार अणि व्यायाम याला पर्याय नाहीच. केवळ वजन नियंत्रणात आहे म्हणून तब्बेत चांगली असेलच आणि कोलेस्टेरॉल कमी असेलच असे नाही.

सुबोध खरे's picture

1 Jan 2016 - 8:15 pm | सुबोध खरे

रक्तवाहिन्यांची लवचिकता, चांगल्या कोलेस्टेरॉलचे योग्य प्रमाण राखण्यासाठी शरीरात पुरेशा प्रमाणात वंगण असणे आवश्यक असते जे या तुपातून मिळते
याला कोणता शास्त्राधार आहे? आमच्या एका नातेवाईकांना हृदय विकाराचा झटका आल्यावर पुण्यातील एका प्रथितयश वैद्यराजांनी तुमच्या कॉरोनरीमध्ये वंगण कमी झाले आहे रोज एक वाटी तूप प्या असा सल्ला दिला.
परिणाम-- एक वर्षातच त्यांना बायपासची शल्यक्रिया करण्याची पाळी आली.
शुद्ध तूप चवीपुरतेच घ्यावे.औषध म्हणून रोज घेणे हितकारक नाही ते वनस्पती( डालडा) पेक्षा चांगले असले तरी इतर वनस्पती तेलांपेक्षा( शेंगदाणा, तीळ, तांदूळाचे तूस या तेलांपेक्षा) जास्त चांगले नक्कीच नाही. अति सर्वत्र वर्जयेत.
उगाच जुन्या शास्त्रांचा आधार घेऊन आजच्या काळात वागणे महाग पडू शकते. १९७० च्या अगोदर( हरितक्रांती पूर्वी) भारतवर्षाच्या इतिहासात लोकांकडे मुबलक अन्न कधीच नव्हते. दुष्काळ हा भारत वर्षाच्या पाचवीला पुजलेला होता. तेंव्हा माणसे कुपोषणाने मरत. लठ्ठपणाने नव्हे. हि अतिसेवनाची साथ गेल्या ४०-५० वर्षातील आहे.
त्यावेळेसच्या "ऋणे कृत्वा घृतं पिबेत? सारख्या म्हणी त्या काळानुसार होत्या. तेंव्हा तसे वागणे बरोबर होते आता नाही.

चतुरंग's picture

1 Jan 2016 - 8:23 pm | चतुरंग

मी योग्य प्रमाणात म्हणतोय - वाटीभर तूप हे अयोग्यच.

तरीही तुमचे म्हणणे जास्त योग्य आहे कारण तुम्ही वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित आहात.
माझे विधान मी मागे घेतो.

(खजील)रंगा

सुबोध खरे's picture

1 Jan 2016 - 8:33 pm | सुबोध खरे

साहेब,
खजील व्हायची गरज नाही. वरण भातावर जरूर तूप घ्या
पण तुपात थबथबलेली घारी,मैसूरपाक, मोहनथाळ, जिलबी, मालपुवा ई. किती खायचं यावर नियंत्रण असावे एवढेच म्हणणे आहे.

सुबोध खरे's picture

1 Jan 2016 - 8:35 pm | सुबोध खरे

किंवा पुरणपोळीवर तूप जरूर घ्या.
पण तुपात भिजून तूप ओघळेल एवढे तूप पुरणपोळीवर घेणे कितपत योग्य आहे? आता स्पा किंवा नीलमोहर ती यांनी घेतले तर योग्य आहे.

चतुरंग's picture

1 Jan 2016 - 8:38 pm | चतुरंग

खरंय! :)

(पुरणपोळीप्रेमी)रंगा

रमेश आठवले's picture

1 Jan 2016 - 4:06 am | रमेश आठवले

काटा बोले ना काटा चाले ना
आम्ही खंत करू काही केल्या
खाली सरके ना

मोगा's picture

1 Jan 2016 - 3:00 pm | मोगा

१ वेळ poLeebhàji व एकवेळ्सॅलड खाउन , रोज चार किमी चालुनही ७२ किलोच आहे.

( औरंगजेब ) दद्दूचा फॉर्मुला वापरावा म्हणतोय.

१ वेळ जेवा
३ मैल चाला
५ वेळा अल्ला म्हणा
७ वेळा पाणी प्या
९ ० वर्षे जगा.

सुबोध खरे's picture

1 Jan 2016 - 6:10 pm | सुबोध खरे

उस्ताद मोगा जी
इथे पण सोयीचा बदल करून घेतला काय? ३ मैल चालणं आणि ७ वेळा पाणी ?
आलमगीराचं नुसतं नाव घ्यायचं?
१ वेळा "च" जेवायचं( दुपारी)
३ वेळा फक्त पाणी प्यायचं ( न्याहारी, दुपारचा नाश्ता आणि रात्रीच्या जेवणा ऐवजी)
५ वेळा नमाज पढायचा
७ मैल चालायचं
९० वर्षं जगायचं
असं आहे ते खरं

मोगा's picture

1 Jan 2016 - 6:17 pm | मोगा

मी दद्दूचा इतिहास वाचून सहज फॉर्मुला तयार केला होता...

तुमचा फॉर्मुला जास्ती सायंटिफिक वाटतो.

पैसा's picture

1 Jan 2016 - 6:28 pm | पैसा

मालिकेसाठी धन्यवाद डॉक! गेल्या वर्षी काही मैत्रिणींच्या मदतीने चालणे+एरोबिक्स सुरु केले. खाण्यात श्रीरंगाने सांगितले ते शक्य तेवढे अंमलात आणत आहे. पहिल्या ३ महिन्यात ५ किलो वजन कमी करता आले. आता ते शरीराला अतिरिक्त भार होणार नाही इतक्या लेव्हल ला आणणार आहे. या मालिकेचा त्यासाठी खूप उपयोग होईल.

पूर्वाविवेक's picture

5 Jan 2016 - 12:36 pm | पूर्वाविवेक

पैसाताई, मी सुद्धा 'गिरकी' ने दिलेल्या टिप्स वापरत आहे. रोज चालणेहि सुरु केले आहे. तू इथे उल्लेख केलेले 'खाण्यात श्रीरंगाने सांगितले' हे काय आहे? धागा असेल तर इथे द्यावा.
डॉक्टर साहेब, लेखाची सुरुवात छान झाली आहे. आता प्रत्यक्ष टिप्सच्या प्रतीक्षेत.

श्रीरंग_जोशी's picture

6 Jan 2016 - 2:35 am | श्रीरंग_जोशी

कृपया वरचा हा प्रतिसाद वाचावा...

पूर्वाविवेक's picture

6 Jan 2016 - 11:45 am | पूर्वाविवेक

धन्यवाद श्रीरंग

डॉक्टर, आहारनियमनाचा सारांश कुठेही इतका सुंदर दिला नसेल. आवडला.

आपली मालिकाही किती मोलाची असणार आहे, हे ह्या नमनाच्या लेखावरूनच स्पष्ट होत आहे.
आपली वर्णशैली नर्म विनोदी, खुसखुशित आणि सर्वत महत्त्वाचे म्हणजे अत्यंत यथातथ्य आहे.

मालिकेतील यापुढील परखड प्रबोधनाच्या प्रतीक्षेत अधीर आहे.

आनंदी गोपाळ's picture

2 Jan 2016 - 9:39 pm | आनंदी गोपाळ

BMI सोबत बॉडी फॅट इंडेक्सबद्दलही लिहिणार का?

सुबोध खरे's picture

3 Jan 2016 - 8:08 pm | सुबोध खरे

बॉडी फॅट इंडेक्स किंवा (Body adiposity index) : https://en.wikipedia.org/wiki/Body_adiposity_index
हे सकृतदर्शनी उत्तम असे परिमाण वाटले होते परंतु एक तर तो मोजणे हे फार कटकटी चे आहे आणी BMI इतके सोपे आणी सहज परत परत वापरण्यासारखे नाही.
शिवाय A detailed study published in 2012 concluded that estimates of body fat percentage based on BAI were not more accurate than those based on BMI, waist circumference, or hip circumference.
यास्तव आणखी जास्त गुंतागुंत न करण्यासाठी मी ते यात उधृत करणे टाळले आहे.

आनंदी गोपाळ's picture

5 Jan 2016 - 8:56 am | आनंदी गोपाळ

पण मग अर्नॉल्ड श्वार्झनेगरचीही बीएमआय चुकीची येईल. त्यामुळेच, सोबत फॅट इंडेक्स मोजणे गरजेचे आहे. ही इंडेक्स मोजताना शक्यतो स्किन फोल्ड थिकनेसवरून मोजलेल्या उत्तम. परंतु, मान, पोट, कंबर, नितंब, मांड्या, दंड, व मनगटाचा घेर मोजूनही बॉडी फॅट इंडेक्स वा परसेंटेज सहजपणे काढता येते.

तुम्ही दिलेल्या इंग्रजी वाक्यात फॅट परसेंटेज मोजणे हेच कमी अ‍ॅक्युरेट वा चुकीचे आहे, असे म्हटलेले नसून, "अ" प्रकाराने मोजलेली टक्केवारी "ब" प्रकारे मोजलेल्या प्रकारापेक्षा जास्त अ‍ॅक्युरेट नाही इतकेच म्हटलेले आहे. तेव्हा त्या इंग्रजी वाक्याचा संदर्भ लक्षात आलेला नाही.

आनंदी गोपाळ's picture

5 Jan 2016 - 9:03 am | आनंदी गोपाळ

उदाहरणादाखल सांगतो,

माझी उंची ५.११ फूट असून वजन ८२ आहे. यानुसार बीएमआय २५.१० म्हणजे ओबेसिटी दाखवणारी येईल.
पण फॅट इंडेक्स १७.०२ आहे. याचा अर्थ असा की मी वेट रिडक्शन करू जाता मसल मास लॉस करावा लागेल. हे करणे योग्य की अयोग्य?

यासाठी आपणास फॅट इंडेक्सबद्दल दोन वाक्ये लिहिण्याची विनंती केलेली होती.

धन्यवाद!

बाळ सप्रे's picture

5 Jan 2016 - 1:01 pm | बाळ सप्रे

BMI/ Fat index या दोन्ही मोजणीत एक गोष्ट समजत नाही ती म्हणजे स्नायू व हाडांच्या वजनाचे प्रमाण. त्याचे योग्य प्रमाण काय असावे?

सिरुसेरि's picture

4 Jan 2016 - 8:27 am | सिरुसेरि

धन्यवाद . काटा काळजात घुसला .

सिरुसेरि's picture

4 Jan 2016 - 8:28 am | सिरुसेरि

धन्यवाद उपयुक्त माहितीबद्दल . काटा काळजात घुसला .

आज काल बिन काट्याचे काटे असतात वजन मोजायला. डिजिटल.

वेल्लाभट's picture

4 Jan 2016 - 3:39 pm | वेल्लाभट

उत्तम! पुढील भागाच्या प्रतीक्षेत...
आवडीचा विषय. तुमची मांडणी मस्तच आहे..

आवडीचा विषय, वजन आटोक्यात आहे तरी पोटावर बिस्कीटं पडावीत अशी फारा दिवसांपासूनची इच्छा आहे. ;)