वाढलेला पोटाचा घेर व वाढलेले वजन, सोबतीला कोलेस्टेरॉल सापडल्यामुळे नशिबी आलेल्या गोळ्या आणि आता या आयुष्यभर घ्यावयाच्या आहेत अस डॉ. नि सांगितल्यावर मनाला बसलेला हबका. काही जणांचा वाढलेला रक्तदाब व त्यावरच्या गोळ्या , मधुमेह पूर्व स्थिती लक्षात आल्यावर उडालेली घाबरगुंडी तर मधुमेह झाल्याचे निदान झाल्यावर घरातल्या सर्वांच्या चेहऱ्यावर अवतरलेली काळजी. आणि या सगळ्यातून हे खा व हे खाऊ नका ची भली मोठी यादी. शिवाय गुडगेदुखी, ऍसिडिटी , .. , .., .. असच बरच काही यांच्यासाठी हे लिहितोय.
ह्या सगळ्या त्रासातून कस मुक्त व्हायच?, एक पैसा जास्त खर्च न करता हे कस साधायच? श्रीमंत असो की गरीब दोघांनाही जमू शकेल,तसेच स्त्री पुरूषात अजिबात भेदभाव न करता दोघांनाही एकच पद्धत कशी वापरता येईल, तसेच त्यामागे विज्ञानाचा भक्कम पाठिंबा असला पाहिजे. वगैरे वगैरे .......
थोडक्यात आखूड शिंगी, बहुदुधी, गरीब, दूध काढताना लाथा न मारणाऱ्या बहुगुणी गायीबद्दल हे लिहितोय.
कै. डॉ.श्रीकांत जिचकार एक अवलिया माणूस. एमबीबीएस, एमडी झाल्यावर आयपीएस त्यानंतर चक्क आयएएस. पण चारच महिन्यात नोकरीचा राजीनामा देऊन आमदार, मग मंत्री, राज्यसभेचे खासदार. या माणसाने प्रगती तरी किती वेगाने करावी? पण हे सगळं ४९ वर्षांच्या आयुष्यात साधायच म्हणजे एवढा वेग हवाच की हो!
घरातल्या ग्रंथालयात बावन्न हजार पुस्तक. विद्वत्ता दाखविण्यासाठी जाहिरात म्हणून नक्कीच जमवलेली नसणार. उलट सगळी वाचलेली असण्याची शक्यता जास्त. कारण ४२ विद्यापीठातून मिळवलेल्या २० पदव्या. बहुतेक सगळ्या प्रथम श्रेणीतून मिळालेल्या. २८ सुवर्णपदक मिळवलेला माणूस हा. नक्कीच पुस्तके वाचलेली असणार.
तर असा हा माणूस. भरपूर परदेश वाऱ्या केलेला असूनही त्याची भारताशी जुळलेली नाळ तुटली नव्हती. साधारण अशी माणसे थोडीशी भारतीय संस्कृतीशी फटकून वागतात. पण इथेही आपल्याला आश्चर्याचा धक्का बसतो. भारतीय संस्कृती व प्राचीन इतिहास, तत्त्वज्ञान व संस्कृत यात एमए केलेय. हे मी आपल वानगीदाखल सांगतोय कारण तस पाहिल तर त्यांनी १० विषयात एमए केलेय. इतकच काय मानाची डी. लिट. पदवी मिळालीय त्यांना संस्कृतामध्ये.
तर सांगायच म्हणजे अशा माणसाने १९९७ साली एक नवीन विचार भारताला दिला. त्यावेळी ते राज्यसभेचे सभासद होते. पुणे महानगर पालिकेत मा. शशिकांत सुतार नावाच एक मोठ्ठ प्रस्थ होत. त्यांनी बालगंधर्व रंगमंदिरात जिचकारांना भाषणासाठी बोलावल. त्यासाठी सगळी व्यवस्था जातीने केली. आपोआपच बरेच मान्यवरांनी रंगमंदिर भरून गेल.
त्यांनी सांगितल की, "शरीरात तयार होणारे अतिरिक्त इन्शूलीन बऱ्याच रोगांचे कारण आहे." स्थूलता, त्यातून मधुमेह, वाढलेला रक्तदाब, त्यातून मग अंजोग्राफीची तपासणी, त्यात नक्की काहीतरी सापडतच. मग अंजोप्लास्टी. सगळाच प्रकार खर्चिक. पण मरणाची भीती वाटायला लागली की माणूस करतो खर्च. त्याला वाटतं की झाल सगळ करून. आता काही आपल्याला होणार नाही. पण कसच काय. पाच सहा वर्षात आणखी खर्चिक बायपाससाठी हॉस्पिटलची वारी ठरलेली.
मग यावर सोपा उपाय काय? दिवसातून फक्त दोनदाच जेवा. काहीही खा. भूक भागेपर्यंत कितीही खा. तूप लोणी बिनधास्त खा. मांसाहारही चालेल. फक्त हे जेवण ५५ मिनिटांत संपवले पाहिजे. आणि दिवसातून ४५ मिनिटे भरभर चालण्याचा व्यायाम केला पाहिजे. महागड्या जिम नको की, आहारतज्ञांना पैसे द्यायला नको. दवाखान्याची पायरी चढायची कधी वेळही येणार नाही. किती सोपे आहे ना? पण अवघड बाब पुढे आहे. ते पुढे सांगतात की, "दोन जेवणामध्ये काहीही खाऊ नका." याकाळात तोंड उघडायचे ते फक्त बोलण्यासाठी किंवा पाणी पिण्यासाठी. बस्स. औषधांच्या याद्या विसरून जा. हे खा व हे खाऊ नका याची प्रत्येक डॉक्टर व आहारतज्ञांप्रमाणे बदलणारी यादी व त्यातून उडणारे गोंधळ संपवून टाका.
सगळ वैज्ञानिक नियमावर आधारलेले भाषण. समोर अनेक मान्यवर बसलेले. त्यामुळे बऱ्याच वेळेस अशी भाषणे इंग्रजीत चालतात आणि जिचकार तर इंग्लिश लिटरेचर मध्येपण एमए केलेले. पण तरीही हा विचार सर्वसामान्य माणसाला कळला पाहिजे यासाठी हे भाषण त्यांनी मराठीतून दिले आहे. समोर नुसते मान्यवर नाही तर पुण्याचे मान्यवर बसणार आहेत म्हणून त्यांनी अनेक इंग्रजी संज्ञांना पूरक मराठी संज्ञा शोधून काढल्या होत्या व त्या संज्ञा पाठ करून मगच ते व्याख्यान द्यायला आले होते. (या मराठीतील संज्ञा शोधणे व पाठ करणे हे कामही त्यांना सोपेच गेलेले असणार. कारण ते महाराष्ट्राच्या विश्वकोश निर्मिती मंडळाचे सभासद होते!!!) एखाद्या माणसाला बेंबीच्या देठापासून कळकळ असते म्हणजे काय हे समजून घ्यायचे असेल तर त्यासाठीही हे व्याख्यान ऐकायला हरकत नाही.
आपल्या या कार्याचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी "नागपूर फिटनेस मुव्हमेंट" आणि "पुणे फिटनेस मुव्हमेंट" अशा दोन संस्था सुरू केल्या. पण त्या काळात फेसबुक किंवा व्हॉटऍपस वगैरे काहीच नव्हत. नाहीतर याचा प्रसार फार वेगाने झाला असता. मनोगत, मायबोली किंवा मिसळपाव सारखा एखादा संकेतस्थळ तयार करता अल्लाही असत कदाचित. पण वाचणार कोण? इंटरनेट फार महाग होत त्यावेळेस. टाटा कंपनीच्या व्हीसएनएल ला वर्षाकाठी पाच सहा हजार भरल्यावर कनेक्शन मिळायच. शिवाय घरात फोन असला पाहिजे ही पूर्वअट. आणि नेट वापराला सुरवात झाली की दर मिनिटाला एक टेलीफोनचा कॉल एवढे पैसे टेलिफोनच्या बिलात यायचे तो खर्च वेगळाच. नेट वापरणे हे सामान्यांच्या कुवती बाहेरची गोष्ट होती. अपवाद फक्त आयटी मधल्या लोकांचा!
तरीपण राज्यसभेच्या सदस्याला बऱ्याच सोयी सुविधा असतात. ओळख पाळख असते. त्यामुळे प्रसाराचे काम चालू होते. पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच होते. दोनच वर्षांनी म्हणजे १९९९ साली झालेल्या लोकसभेच्या निवडणूकीसाठी काँग्रेसकडून त्यांना तिकिट मिळाल पण फक्त ३०००+ मतांनी पडले. इतकेच नव्हे तर राज्यातले आणि त्याचबरोबर केंद्रातले काँग्रेसचे सरकार पडले. प्रसारावर फारच मर्यादा आल्या.सर्वात मोठे दुर्दैव म्हणजे २००४ साली जेव्हा कॉग्रेसचे सरकार राज्यात व केंद्रात आले त्यानंतर दोनच आठवड्यात त्यांचा अपघाती मृत्यू झाला. मला वाटते या नवीन विचारांचे फक्त बी लावायचे काम नियतीने त्यांच्यावर सोपवले होते.
त्यांचा या भाषणाचा एक ऑडिओ यूट्यूबवर होता. पण दोन तास तीन मिनिटांचा ऑडिओ म्हटल्यावर बरेच जण तो उघडून सुद्धा बघत नसत. आणि यदाकदाचित कोणी उघडलाच तर बरेच जण पहिले प्रास्ताविक संपेपर्यंतही कळ काढू शकत नसत. त्यामुळे मूळ भाषण सुरू होण्याआधीच तो बंद केला जायचा. एवढा वेळ असल काही ऐकायला तो थोडाच वपू किंवा पुल चा व्हिडिओ होता की व्यायाम/प्रवास करताना ऐकायचा गाण्याचा अल्बम होता? ही राजकारणी लोक ही अशीच. समोर माइक आला की यांना वेळेच भानच राहत नाही. अशी कॉमेंटपण कोणीतरी केली असेल असा मला दाट संशय आहे.
बरीच वर्षे निघून गेली. जिचकारांनी लावलेले बी रूजण्यासाठी अनुकूलतेची वाट पाहत युट्युबवर पडून होत. ही अनुकुलता लाभणे फार अवघड होत. त्याला वेळ लागणार हे त्या बियाणाला माहीत होत. आणि सहा वर्षापूर्वी ते एकाच्या हृदयात रूजल. हा माणूस एमबीबीएस, एमडी होता. पण रोग पाहून औषध देणारा नव्हता. तर रोग होऊच नये यासाठी काय करता येईल यातला तज्ञ होता. प्रामाणिक होता. पैशासाठी काम करणारा नव्हता. समाजाच्या भल्यासाठी काम करण्याची इच्छा असणारा असा होता. मुख्य म्हणजे माहिती वाचून चर्चा करणारा नव्हता तर त्यासाठी स्वतःवर प्रयोग करायला तयार असणारा व त्यासाठी स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करायला तयार असणारा होता. नियतीने अगदी अचूकरीत्या लातूरच्या डॉ. जगन्नाथ दीक्षित यांची निवड केली होती.
डॉ. दीक्षित सध्या ते लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विभाग प्रमुख आहेत व गेली सत्तावीस वर्षे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अध्यापन करत आहेत. "स्थूलत्व निवारण आणि मधुमेह प्रतिबंध" या विषयावर त्यांनी संशोधन केले.यात त्यांनी प्रथम स्वतःवर प्रयोग केले. नातेवाइकांवर प्रयोग केले. जवळच्या मित्रांवर प्रयोग केले. या सगळ्याच्या व्यवस्थित नोंदी ठेवल्या. मग मात्र त्यांनी लातूर व औरंगाबाद येथील हजारो लोकांवर प्रयोग केले. वैज्ञानिक नियतकालिकात प्रबंध लिहिण्यासाठी या प्रयोगाचे योग्य दस्तावेजीकरण केले व अनेक प्रबंध प्रकाशीतही केलेले आहेत.
पण प्रसारासाठी नुसते प्रबंध लिहून भागत नाही यासाठी त्यांनी व्याख्याने द्यायला सुरवात केली. पुण्याच्याच बालगंधर्व रंगमंदिरात कै. डॉ. श्रीकांत जिचकारांच्या स्मृतीला अभिवादन करून सुरवात झालेले त्यांचे व्याख्यान ऐकण्यासाठी खाली लिंक देत आहे. हेही व्याख्यान खूप मोठे आहे. पहिले प्रास्ताविक ३० मिनिटे चालते. त्यामुळे व्याख्यानासाठी आतुर झालेले बरेच जण कंटाळून पहिल्या काही मिनिटांनंतर व्याख्यान बंद करून टाकतात. हे प्रास्ताविक पाहू नये म्हणून मी हे सांगत नाहीये. तर थोडा धीर धरावा असे सुचवत आहे. या प्रास्ताविकातूनही तुम्हाला काही मुद्दे मिळू शकतात.
२०० च्या वर व्हॉटऍपस ग्रुप स्थापन करून व फेसबुकच्या माध्यमातून ही चळवळ अठ्ठावीस हजार माणसांपर्यंत पोहोचली आहे. अनेक देशातील माणसे यात आहेत. पण हे सगळे सांभाळणे आता अवघड होत चाललेय. कार्यकर्त्या डॉक्टरांना यासाठी वेळ देणे अवघड होत चाललेय. यासाठी आता एक वेबसाईटच उघडायचे प्रयत्न चालू आहेत. तस झाल की एकाच ठिकाणी सगळी माहिती एकत्रित होईल. वेळ वाचेल. एक कोटी लोकांपर्यंत लोकांपर्यंत पोहोचायचे उद्दिष्ट समोर ठेवून आता काम सुरू होणार आहे.
खर म्हणजे ह्या व्याख्यानाचा सारांश देण्याचा माझा विचार होता. पण मी मुद्दामहून तस करत नाहीये. कारण तस केले तर लोक मूल व्याख्यान न ऐकताच चर्चा करायला सुरवात करतात. हे व्याख्यान ऐकल्यावर फारशा शंका उरत नाहीत. शिवाय त्यांनी काही फोन नंबरही दिलेले आहेत. त्यावर तुम्ही व्हॉटऍपवर प्रश्न किंवा शंका विचारू शकता.
डॉ. दीक्षित यांच्या व्याख्यानाची लिंक खाली देत आहे. दोन तास सलग वेळ काढता येईल अशी वेळ निवडून निवांतपणे पहा.
https://www.youtube.com/watch?v=edKaI5gxaNQ
ही डॉ. दीक्षित यांची फेसबुक पेजची लिंक आहे. त्यात लाभार्थींची नावे, अनुभव व मोबाईल नंबर दिले आहेत.हे तुम्ही केव्हाही पाहू शकता! https://www.facebook.com/weightlosseffortlessly/
डॉ. जिचकार यांनी याच व्याख्यानात बी पेरण्याचे काम केले. हा ऑडिओ आहे. दोन तास सलग वेळ काढता येईल अशी वेळ निवडून निवांतपणे पहा.
https://www.youtube.com/watch?v=8-kw3hGUwW4
मी स्वतः या विषयातला तज्ञ नाही. पण या संकेतस्थळावर या विषयातले बरेच तज्ञ असल्याने साधक बाधक चर्चा होऊन हा विषय आणखी स्पष्ट होईल याहेतूने हे लेखन केले आहे.
एक महत्त्वाची सूचना :
ज्यांना मधुमेह आहे अशांनी HbA1c आणि fasting insuline या दोन तपासण्या करून त्याचे अहवाल डॉ. दीक्षित यांना पाठवावेत. या दोन तपासण्या म्हणजे रक्तातल्या शर्करेचे प्रमाण दाखवणाऱ्या तपासण्या नव्हेत. त्यानंतर त्यांच्याच सल्ल्यानेच पुढील आहारयोजना सुरू करावी. परस्पर आहारयोजना सुरु करू नये.
--------------------------------------------------------------
(श्री. शाम भागवत यांचा खालील एक प्रतिसाद लेखात समाविष्ट केला आहे.)
एकदाच ऐकून भाषणातले सगळे मुद्दे लक्षात राहणे शक्य नसते. परत दोन तास देणे कंटाळवाणे होऊ शकते किंवा नंतर बघू अस म्हणत लांबणीवर पडते.
यासाठी एक लिंक देत आहे. तो VDO आहे. डॉ. दिक्षीतांनीच सारांश रुपात सगळे सांगितले आहे. नुसते ऐकूनही उजळणी करता येऊ शकेल. तसेच डॉक्टरांनी बरेच तक्ते बनवलेले असून त्यातले दोन महत्वाचे दाखवले जातात. त्यांचे screenshot घेऊन ठेवल्यास सर्व संदर्भ अगदी हाताशी राहू शकतील. कोणालाही थोडक्यात सांगायचे असल्यास खूप उपयोगाला येतात.
तुम्हाला आलेल्या अडचणीमुळे मला हे सुचले म्हणून तुम्हालाच धन्यवाद व शुभेच्छा.
https://youtu.be/99iQOs-u_HU
वाचने
164449
प्रतिक्रिया
313
मिसळपाव
प्रतिक्रिया
"नॉर्मलपण देगा देवा" म्हणण्याची वेळ
In reply to काका सहज जमेल.. फक्त ८ by आनन्दा
फक्त ८ दिवस८गरज पडेल तेव्हा झोपायची तयारी ठेवा.
In reply to काका सहज जमेल.. फक्त ८ by आनन्दा
बरोबर
In reply to काका सहज जमेल.. फक्त ८ by आनन्दा
आपण जास्त खात असल्याची तुम्ही
In reply to जास्त खाणे by चित्रगुप्त
आहार मध्ये (satiety) म्हणजे
In reply to आपण जास्त खात असल्याची तुम्ही by शाम भागवत
_/\`_
In reply to आहार मध्ये (satiety) म्हणजे by सुबोध खरे
आहार मध्ये (satiety) म्हणजे
In reply to आहार मध्ये (satiety) म्हणजे by सुबोध खरे
प्रत्येक घास ३२ वेळा चावून खा
In reply to आहार मध्ये (satiety) म्हणजे by शाम भागवत
थोडे थोडे पण अनेक वेळेस खा
In reply to प्रत्येक घास ३२ वेळा चावून खा by सुबोध खरे
एक नंबर
In reply to प्रत्येक घास ३२ वेळा चावून खा by सुबोध खरे
एक मजेशीर प्रयोग
In reply to आहार मध्ये (satiety) म्हणजे by शाम भागवत
स्माधानासाठी खाणे
In reply to आहार मध्ये (satiety) म्हणजे by सुबोध खरे
देवाण-घेवाण ...
रीपोर्टचा फोटो पाठविल्याशिवाय
In reply to देवाण-घेवाण ... by मराठी कथालेखक
अगदी असच लिहायच होत. बरे झाले
In reply to रीपोर्टचा फोटो पाठविल्याशिवाय by खटपट्या
त्यांचा व्हाट्साप्प ग्रुप हा
In reply to रीपोर्टचा फोटो पाठविल्याशिवाय by खटपट्या
https://youtu.be/Pm6neCIJbUE
वरील व्हिडिओ संदर्भात थोडेसे
In reply to https://youtu.be/Pm6neCIJbUE by वेदांत
वेदांत,
In reply to https://youtu.be/Pm6neCIJbUE by वेदांत
सर्व प्रथ्म श्री भागवत तसेच
'नकळतपणे' यासाठी म्हणतोय कारण
In reply to सर्व प्रथ्म श्री भागवत तसेच by विखि
वेटलॉस
जर एखाद्याचे वजन त्याच्या
In reply to वेटलॉस by Ganesh.patole7…
हिमोग्लोबिन विषयी स्पष्टीकरण द्यावे
योग्य आहाराने
In reply to हिमोग्लोबिन विषयी स्पष्टीकरण द्यावे by चित्रगुप्त
योग्य आहाराने
हा शब्द फार महत्त्वाचा आहे. कारण वजन जेंव्हा आपण कमी करता तेव्हा आहारातील फक्त कॅलरीच कमी करणे आवश्यक आहे प्रथिने जीवनसत्वे आणि खनिजे कमी झाली तर त्याचा शरीरावर दुष्परिणाम होण्याची शक्यता जास्त असते. आहारात लोहाचे, बी आणि क जीवनसत्त्वाचे प्रमाण कमी झाले तर ऍनिमिया होऊ शकतो. डॉ कुमार यांच्या "जीवनसत्त्ववरील" लेखात याची उत्तम चर्चा केलेली आहे. याच कारणासाठी आपण वजन कमी करताना आहार तज्ज्ञांकडून सल्ला घेणे आवश्यक आहे. हा सल्ला प्रत्येक व्यक्तीची प्रकृती राहणीमान आणि आहाराची पद्धत पाहून देणे आवश्यक आहे. या सल्ल्यात प्रथिने खनिजे आणि जीवनसत्त्वे कमी न होता केवळ कर्बोदके आणि चरबीचे प्रमाण कमी कसे करता येईल याचा विचार असतो. ( मी जालावर सल्ला देत नाही याचे हे महत्त्वाचे कारण आहे)या संदर्भाने डॉ जिचकरांच्या
In reply to योग्य आहाराने by सुबोध खरे
_/\_
दोन वेळेसच जेवल्याने दंत आणि मौखिक आरोग्य (ओरल हायजिन) सुधारणा ?
काहीच फरक जाणवत नाहीय. मी
In reply to दोन वेळेसच जेवल्याने दंत आणि मौखिक आरोग्य (ओरल हायजिन) सुधारणा ? by चामुंडराय
दिवसात किती वेळा जेवता त्याचा
In reply to काहीच फरक जाणवत नाहीय. मी by खटपट्या
+१
In reply to दिवसात किती वेळा जेवता त्याचा by सुबोध खरे
OK
In reply to दिवसात किती वेळा जेवता त्याचा by सुबोध खरे
डॉ. दिक्षीतांच्या
- आज मी 82 ला पोचले आहे 96 वरून. साधारण 7 महिन्यात.
- अजूनही काही फायदे झाले
- 1. इंच लॉस खूप आहे
- 2. गुडघा दुखायचा बंद झाला
- 3. थायरॉईड जानेवारी त 5 होते ( 0.50) ची गोळी घेऊन, ते आता 3 आहे, गोळी न घेता.
- 4. मासीक पाळी अती वेळेवर येते , जी गेल्या 35 वर्षात कधीच आली नव्हती. ( इतर डाएट मध्ये असतानाही हे कधी झाले नव्हते) जे माझ्या दृष्टीने जादू समान आहे.
- पाळीच्या वेळचा त्रास शून्य झाला
- आता h1bc 3 आहे, 2017 मध्ये 4.6 होते. Fasting शुगर 82 आहे आणि pp 95. म्हणजे आता मी शुगरच्या सगळ्या धोक्यातून बाहेर आले.
अधिक माहितीसाठी येथे टिचकी मारा.सातत्य
In reply to डॉ. दिक्षीतांच्या by शाम भागवत
सातत्य
हीच गोष्ट फार महत्त्वाची आहे. बहुसंख्य लोक कोणताही आहार हा "काही दिवसांसाठीच" करतात यामुळे सुरुवातीला मिळणारे यश वाळू सारखे हातातून निसटून जाते. डॉ दीक्षितांची पद्धत हि जीवन पद्धती बनवली तरच यश मिळेल . चार सहा महिन्यांसाठी करून पाहू म्हणणाऱ्या लोकांपैकी बहुतांशी लोकांना वजन वाढण्याचा ये रे माझ्या मागल्या हा अनुभव यामुळेच येतो._/\_
In reply to सातत्य by सुबोध खरे
Yatil dhoke..
जगात असंख्य लोक असे आहेत कि
In reply to Yatil dhoke.. by prajakta.y
ध न्य वा द !
In reply to जगात असंख्य लोक असे आहेत कि by सुबोध खरे
फुकटात विनासायास वेटलॉस
ही पद्धत ३ महिने करून बघणार
In reply to फुकटात विनासायास वेटलॉस by ओम शतानन्द
ही पद्धत ३ महिने करून बघणार आहे .
डॉ. दिक्षितसरांचे व्याख्यान सार - एक व्हाट्स-अप फॉरवर्ड
जुलै च्या ८ तारखेला दीक्षित
+१
In reply to जुलै च्या ८ तारखेला दीक्षित by केडी
शाम भागवत यांना अनेक धन्यवाद
केंव्हा जेवता ?
In reply to शाम भागवत यांना अनेक धन्यवाद by सस्नेह
मी १० ला ऑफिस मधे पोचते.
In reply to केंव्हा जेवता ? by चित्रगुप्त
पोळीऐवजी ज्वारी,बाजरी किंवा
In reply to मी १० ला ऑफिस मधे पोचते. by सस्नेह
भाकरी केव्हाही पोळीपेक्षा
In reply to पोळीऐवजी ज्वारी,बाजरी किंवा by खटपट्या
भाकरी हि पोळीपेक्षा चांगली हा
In reply to भाकरी केव्हाही पोळीपेक्षा by सस्नेह
भाकरी हि पोळीपेक्षा चांगली हा एक खोलवर रुजलेला गैरसमज आहे.
कोणतीही गोष्ट पारंपरिक म्हणून चांगली यातून तो आला आहे कि काही पारंपरिक वैद्यकशास्त्रानी तो मुद्दाम रुजवला आहे हे मला माहित नाही. परंतु या बद्दल मी बरेच वाचन केले असता असे लक्षात आले कि आपण खातो तोगहू आणि ज्वारी यात गुणात्मक दृष्ट्या कोणताही फरक नाही
आणि पोळी पेक्षा भाकरी चांगली या गृहीतकाला पुष्टी देणारा कोणताही पुरावा नाही. गव्हाच्या आणि ज्वारीच्या ग्लायसेमिक इंडेक्स मध्ये फारसा फरक नाही तसेच दोन्हीच्या कॅलरी मुल्यातही फरक नाही. तेंव्हा भाकरी मधुमेही माणसांना चांगली हे सिद्ध करणारा कोणताही पुरावा नाही आपण पोळी खातो ती काही मैद्याची नसते तर पूर्ण गहू दळूनच केलेली असते त्यामुळेआपण खातो ती पोळी हि खरं तर ज्वारीच्या भाकरी पेक्षा पोषणमूल्यात्मक दृष्टीने जास्त चांगली आहे.
हे मी मुद्दाम एवढ्यासाठी लिहीतो आहे कि बऱ्याच स्त्रियांना (विशेषतः नोकरी करणाऱ्या) आपण रोज भाकरी करू शकत नाही त्यामुळे आपण आपल्या कुटुंबाच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतो आहे असा न्यूनगंड असल्याचे जाणवले. आणि बऱ्याच पुरुषांना पोळी ऐवजी भाकरी खायची असते पण नोकरीवर भाकरी खाणे शक्य नसते. कारण पोळी सारखी ती काही तासांनी मऊ राहात नाही किंवा तिची घडी सुद्धा सहज करता येत नाही आणि ( डब्यात नेता येण्यासारख्या) कोरड्या भाज्यांबरोबर भाकरी फारच कोरडी होते. ज्यांना पोळी आवडते किंवा सोयीची आहे त्यांनी मुद्दाम पोळी सोडून भाकरी खाण्याची अजिबात गरज नाही. साध्या शब्दात असलेला एक लेख जिज्ञासूंसाठी पाठवत आहे. Jowar is tasty, but wheat wins hands down when it comes to nutrition https://www.thehindu.com/todays-paper/tp-features/tp-metroplus/chapati-… तेंव्हा भाकरी खायची तर चवीसाठी जरूर खा पण आपण भाकरी खातो आहोत म्हणजे आपण जास्त आरोग्यपूर्ण खातो आहोत हा गैरसमज सोडून द्याहुश्य....
In reply to भाकरी हि पोळीपेक्षा चांगली हा by सुबोध खरे
विकतचा आटा याबद्दल इथे
In reply to हुश्य.... by साबु
हेपण
In reply to विकतचा आटा याबद्दल इथे by सस्नेह
डॉक्टर, मी भाकरी बंद करुन एक
In reply to भाकरी हि पोळीपेक्षा चांगली हा by सुबोध खरे
गहू आणि गहू वर्गीय तृणधान्ये(
In reply to डॉक्टर, मी भाकरी बंद करुन एक by खटपट्या
ज्वारी आणि गव्हा बद्दल जे समज
In reply to गहू आणि गहू वर्गीय तृणधान्ये( by सुबोध खरे
बरेचसे गैरसमज हे केवळ वाचनाने
In reply to ज्वारी आणि गव्हा बद्दल जे समज by मराठी_माणूस
ओके आता कळाले.
In reply to गहू आणि गहू वर्गीय तृणधान्ये( by सुबोध खरे
दुर्दैवाने ग्लुटेनची ऍलर्जी
In reply to ओके आता कळाले. by खटपट्या
त्रास असा काहीच नाही. फक्त
In reply to दुर्दैवाने ग्लुटेनची ऍलर्जी by सुबोध खरे
मोजण्याची पट्टी आणि वजनाचा
In reply to त्रास असा काहीच नाही. फक्त by खटपट्या
@स्नेहांकिता
In reply to शाम भागवत यांना अनेक धन्यवाद by सस्नेह
मी दोन महिने दिक्षीतांचे डाएट
@palambar
In reply to मी दोन महिने दिक्षीतांचे डाएट by palambar
दिक्षीत सरांचे आभार.
माझा अनुभव
पाळायला सोप्पं आहे
ब्लॅक कॉफी घेतली तर चालते
In reply to पाळायला सोप्पं आहे by सुमेरिअन
धन्यवाद
In reply to ब्लॅक कॉफी घेतली तर चालते by सुबोध खरे
ज्यांना कुणाला या अभियानाच्या
In reply to पाळायला सोप्पं आहे by सुमेरिअन