आखाती देशांमधे नोकरी करण्यासंबंधाने माहिती मिळावी या हेतूने हा धागा काढला आहे.प्रामुख्याने अभियांत्रिकी क्षेत्रातल्या म्हणजे डिप्लोमा आणि डिग्री तसेच पोस्ट ग्रॅज्युएशन नंतर उपलब्ध असलेल्या नोकर्या आणि एकूणच तिथली सामाजिक परिस्थिती याबद्दल बर्याच गोष्टी ऐकायला,वाचायला मिळतात.पण यातील खर्या किती आणि अफवा किती याची वास्तव माहिती मिळावी विशेषत: आखाती देशांत नोकरी करणार्या,काही काळ नोकरी केलेल्या मिपाकरांकडून.शिक्षण नोकरी रोजगार इत्यादीसारख्या प्रश्नांची उत्तरे हो किंवा नाही अशी नसतात आणि हे व्यक्ती सापेक्ष आहे तरीही एकंदरित तिथल्या वातावरणाची कल्पना यावी आणि तिथे नोकरीनिमित्तानं जाऊ इच्छिणार्यांना निर्णय घेण्यास विश्वासार्ह संदर्भ मिळावेत ही अपेक्षा आहे.
खालील माहिती मिळावी.
१) आखाती देशांत अभियांत्रिकी क्षेत्रातल्या मुलांना (डिप्लोमा/डिग्री) त्याचप्रमाणे अन्य क्षेत्रातल्या मुलांना सध्या किती संधी उपलब्ध आहे? कोणत्या आखाती देशांमधे?
२) आखाती देशांमधील नोकर्यांसंबधी माहिती कुठे मिळेल?कृपया वेबलिंक्स किंवा खास या नोकर्यांसाठी असणारी काही नियकालिके असतील तर ते ही सांगावे.
४) काही आखाती देशांमधे शरिया कायदा लागू आहे तो कोणकोणत्या देशांमधे आहे? सर्व देशांमधे तो समान पध्दतीने लागू आहे का?
अशा 'शरियामय' देशांमधे सहकुटूंब राहणे सुरक्षित आहे का? परदेशी लोक विशेषत: आपणा भारतीयांनी तिथे राहताना कोणती सामाजिक बंधने आहेत?अशा देशांमधे नोकरी करताना सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणती काळजी घ्यावी?
या विषयावर आलेला हा २०१३ सालचा धागा वाचला.पण आज २०१८ मधे तशीच परिस्थिती आहे का? की काही बदल झालेत?
https://www.misalpav.com/node/24331
माहिती देणार्यांचे आधीच आभार!!!
प्रतिक्रिया
2 Jul 2018 - 10:00 pm | साहना
आमच्या कुटुंबातून २-३ लोक आखाती देशांत गेले आहेत. फक्त दूतावामार्फत गेलेले लोकच सहकुटुंब राहण्यास सहमत झाले. सौदी अरेबिया मध्ये सुद्धा हि मंडळी घरी वयीन वगैरे बनवायची आणि गणेशोत्सव वगैरे गुप्तपणे साजरी करायची.
इतर मंडळी बहुतेक वेळी १० वर्षे काम करून पैसे घेऊन परत आली आणि त्यांचे हार प्रकारचे शोषण सुद्धा करण्यात आले. (ह्यांना डिप्लोमा होता)
गोव्यांत आखाती देशांत नोकर्या देणार्या अनेक एजेन्सी आहेत. माझ्या मते इंटरनेटवर रिसर्च करण्यापेक्षा ह्या मंडळींशी संपर्क साधा
3 Jul 2018 - 12:24 am | अमरेंद्र बाहुबली
साहना ताई संपर्क कुणाकडे व कुठे करायचा?
3 Jul 2018 - 12:27 am | टवाळ कार्टा
शोषण होउनही १० वर्षे थांबले म्हणजे त्यांना "जास्त पैसे मिळवण्यासाठी शोषण चालवून घेउ" हे "कमी पैशात स्वतःच्या देशात विनाशोषण राहू" यापेक्शा जास्त चांगले वाटले ना....मग शोषण झाले अशी कुरकुर का करावी?
2 Jul 2018 - 10:58 pm | उपयोजक
गोव्यातल्या एजन्सीकडे संपर्क करतो.
3 Jul 2018 - 12:01 am | प्रसाद गोडबोले
आखात असे जनरलायझेशन करणे चुक आहे कारण तो काही एकसंध एक देश नाही. अनेक देश आहेत. सौदी , यु.ए.ई, कतार , कुवेत , बहारीन, ओमान , येमेन वगैरे वगैरे.
जवळपास प्रत्येक देशात स्वतंत्र संस्कृती आहे , स्वतंत्र विचारधारा आहे. काही कत्टर आहेत काही मवाळ आहेत. दुबईत तुम्हाला आरामात पोर्क अन दारु मिळु शकते , बहारीन तर प्रतिथायलंड आहे असे म्हणातात तर सौदीत रमादान दिवसामध्ये नुसतं पाणी पिताना जरी दिसलात तरी गाडीवर फटके देऊन डीपोर्ट करतात.
तस्मात आखात असे जनरलायझेशन करता येणार नाही .
आता तुमच्या प्रश्नांची उत्तरे :
१) अभियांत्रीकी वगैरे ब्लु कॉलर जॉबवाल्यांनी शक्यतो टाळावेच तिकडे जाणे. अतिषय सीनीयर लेव्हल चा जॉब असेल तर विचार करता येईल पण ज्युनियर लेव्हलचा जॉब नकोच. काही इम्प्लॉयर्स तुम्ही ज्युनियर लेव्हला जॉईन केल्याकेल्या तुमचा पासपोर्ट काढुन घेतात असे ऐकले आहे.
२) अभियांत्रिकीतील नोकर्या कोठे कळतील माहीत नाही . बॅन्किंग क्षेत्रातल्या नोकर्या मला मित्रांकडुनच कळतात. पण तुर्तास तरी तिकडे जाण्याचा विचार नाही.
३) शरिया बहुतेक सर्वच देशात कमी अधिक प्रमाणात लागु आहे. मी सौदीत स्वतः पाहिले आहे. बायकांना अयरपोर्ट वर आल्यापासुनच अबाया घालावा लागतो. पुरुषांना इतर सार्वजनिक नियम पाळावे लागतत. असेच कोणीतरी भारतीय पोरगा थ्री/ फोर्थ पॅन्ट घालुन मॉल मध्ये गेला होता तेव्हा त्याला तिथल्या पोलिसाने परत असे दिसल तर पाय तोडण्यात येतील्क असा सज्जड दम दिला होता ! आणि ते नुसते बोलुन दाखवत नाहीत तर करुन देखील दाखवतात. लपुनछपुन गणेशोत्सव अन वाईन वगिरे करताना साप्डलात तर मेला म्हणुनच सम्जा. इथे खरेच चुकीला माफी नाही !
बाकी मला स्वतःमात्र काहीच त्रास झाला नाही ( बहुतेक ह्याचे कारण आमची सलाफी/वहाबी विचारसरणीशी मिळती जुळती असणारी विचारसरणी हे असावे ! व्यवस्थित रमादान पाळलाय ! फुटभर दाढीदेखील वाढवली होती शिस्तीत ! नाद नाय करायचा ! हिंदीत तर इतके व्यवस्थित उर्दु मिक्स करायला शिकलो होतो कि तित्येक पाकिस्तानी मला "आप हमारे हमजंबां है , हमारे दोस्त है" असे म्हणायला लागले होते =)) )
तर तात्पर्य काय तर एक अनुभव म्हणुन आखातात जाय्चा विचार असेल तर जरुर जावा पण केवळ पैसा छापण्यासाठी जायचा विचार असेल तर लक्शात ठेवा की ती एक प्रकारची स्लेवरी आहे . इट्स नॉट् वर्थ द मनी !
एखाद्या जेंटलमनबारमध्ये थंडगार बियर पित , मादक अर्धनग्न नृत्यांगनेवर वॉशिङगटन काकांना उधळायचा आणि नंतर अमेरिकन चीजबर्गर विथ क्रिस्पी बेकन ऑन साईड खाण्याचा आनंद दिनार अन रियाल्स मध्ये मोजता येत नसतो !
आय टेल यु - नथिंग टेस्ट्स लाईक फ्रीडम ! नथिंग !!
3 Jul 2018 - 11:08 am | उपयोजक
आभार! खरंच खुप महत्वाची माहिती दिलीत!! :)
4 Jul 2018 - 3:10 pm | रुस्तुम
१. 2014 मध्ये पडलेल्या तेलाच्या भावांनी आखाती देशांना जमिनीवर आणलं. त्यातून localization चा वाढत दबाव आणि त्यानुसार केलेले नियम ह्या मुले अभियांत्रिकी
क्षेत्रात फार संधी नाहीत. जुनिअर लेवलला तर अजिबात नाहीत. (जुनिअर लेवलला स्थानिकांची भरती होते). आखातातला अनुभवाला काही किंमत नसते. फार काळ आखातात घालवल्यास भारतीय इंजिनीयरिन्ग कंपन्या परत घेताना विचार करतात (परत यायची मारामार).
२. अभियांत्रिकी नोकऱ्या बहुदा घीवाला किंवा अंबे इंटरनॅशनल मध्ये चौकशी करावी.
शरिया कायदा हा सौदी मध्ये लागू आहे. तरीही तिथे भारतीय सहकुटुंब नांदत आहेत. तिथे राहताना काळजी एवढीच घ्यायची की सगळे नियम पाळावेत आणि स्थानिकांच्या फार नदी लागू नये. बाकी यु.ए.ई, कतार , कुवेत , ओमान इथे फार शरियाचा बाऊ केला जात नाही आणि expats वर लादला ही जात नाही. बरेच लिबरल आहेत हे देश(कुवेतचा फार काही अनुभव नाही).
4 Jul 2018 - 10:36 pm | मंदार कात्रे
सिव्हिल / इलेक्ट्रिकल / मेकॅनिकल आणि इन्स्ट्रुमेन्टेशन इन्जिनियरिंग डिप्लोमा व डिग्री ला चांगली डिमान्ड असते . फक्त आखाती देशात काम करण्यापूर्वी तुमच्याकडे भारतातील २ ते ५ वर्षे अनुभव हवा .
मुंबईसह अन्य मुख्य शहरात अक्षरशः शेकडो एजन्ट्स आहेत जे आखाती जॉब्स देतात . ठराविक कमिशन घेऊन ते आखाती जॉब्स साठी इन्टर्व्ह्यू ची व्यवस्था करण्यापासून व्हिसा/ तिकिट सगळी व्यवस्था करतात . फक्त एजन्ट शोधताना तो भारत सरकार कडे रजिस्टर अस्ल्यचे तपासून घ्यावे .
Assignment Abroad Times म्हणून एक न्यूजपेपर आठवड्यातून दोनदा प्रसिद्ध होतो मुंबईतून . त्यात आखाती जॉब्स च्या जाहिराअती असतात
4 Jul 2018 - 10:40 pm | मंदार कात्रे
www.bayt.com www.naukrigulf.com www.monstergulf.com www.gulfjobs.com www.indeed.com www.timesjobs.com
4 Jul 2018 - 10:41 pm | मंदार कात्रे
+१००
5 Jul 2018 - 6:01 pm | सोमनाथ खांदवे
5 Jul 2018 - 6:02 pm | सोमनाथ खांदवे
एक नं प्रतिसाद दिलात मंदार साहेब , खास करून 'गाडीवर ' चा टीम्ब वगळून .
5 Jul 2018 - 6:33 pm | मंदार कात्रे
सोमनाथ जी हा प्रतिसाद मार्क्स अलेरियस यांचा आहे .
मी सन्दर्भ दिला ...
5 Jul 2018 - 9:22 pm | सोमनाथ खांदवे
खर्च की !!!
तवा मी नीट वाचल नसल , आणि काल वाचल्या पासून इचार करत व्हतो की रमजान मदी पाणी पिल्यावर चारचाकी ला का फटके मार्त्यात ?
मानल बुवा मार्कस भाऊ .
13 Jul 2018 - 3:30 pm | उपयोजक
धन्यवाद.चांगली माहिती!