मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

दुबईची काळी बाजू!

हुप्प्या · · काथ्याकूट
काही दिवसापूर्वी मध्यपूर्वेतील कुठल्या तरी देशात वेठबिगार करायला भाग पडलेल्या कामगारावर लेख होता. आज तसाच एक लेख दुबईवर सापडला. वरकरणी चकचकीत आणि झगमगीत दिसणारा हा देश खरे तर गरीब कामगारांवर जुलूम, अत्याचार करुन बनवलेला आहे. ह्या कामगारांना बांगला देश, पाकिस्तान आणि भारत अशा देशातील गरीब लोकांची फसवणूक करुन भरती केले जाते. वाट्टेल ती आश्वासने आणि आकर्षणे दाखवून ते एकदा का दुबईत उतरले की मग त्यांना दाखवलेल्या स्वर्गाचा झपाट्याने नरक होताना दिसतो. आपला देश आणि तिथली गरीबी परवडली अशी त्यांची परवड होते. अगदी उच्चपदस्थ परदेशी लोकही ह्या झटक्यातून वाचत नाहीत असे दिसते. मात्र स्थानिक अरब लोक ऐषारामात जगत असतात. मंदी, बेकारी वगैरे वाईट गोष्टीची त्यांना कुठलीही झळ लागत नाही. दुबईत प्रचंड उधारी, कर्जे घेऊन मोठमोठ्या इमारती, अन्य चमकदार प्रकल्प सुरु केले पण त्यातले कित्येक बुडले आहेत. जागतिक मंदीची झळ ह्या सगळ्या प्रकल्पांना लागली आहे. आणि किंमत ही ह्या मजूरांना चुकवावी लागत आहे. http://www.independent.co.uk/voices/commentators/johann-hari/the-dark-side-of-dubai-1664368.html लेखाची लांबी मोठी आहे पण अस्वस्थ करणारा लेख आहे. निदान आपल्या ओळखीच्या कुणी ह्या सापळ्यात अडकू नये. खरे तर भारत सरकारने अशी फसवणूक केली जाऊ नये म्हणून काहीतरी केले पाहिजे. खोटी आश्वासने दिली असतील तर त्याविरुद्ध खटले भरले पाहिजेत.

वाचन 21706 प्रतिक्रिया 73