जे न देखे रवी...
संभाव्याच्या अब्ज छटांतून
संभाव्याच्या अब्ज छटांतून
वर्तमान उजळतो कशाने?
कोण ठरविते? किंवा सारे,
यदृच्छयाच घडून जाते?
भूतभविष्यातील भासांचे
इंद्रजाल मायावी छेदून
काल-प्रवाहा स्तब्ध करोनी
ऐलपैल वर्तमान उरते
कालौघाची गाज अनाहत
चराचराला व्यापुनी उरते
"क्षण आत्ताचा क्षणजीवी नच"
क्षणोक्षणी वर्तमान म्हणते
मर्कट वंश
कपिकुळाला सांगणारा तोच माझा वंश आहे,
माझ्यातही थोडासा त्या मर्कटाचा अंश आहे
संथ पाण्या पाहूनि, मोहुनि जाई कुणी,
खडे त्यात फेकण्याची का मला ही खोड आहे?
विचित्र या शब्दातही , चिवित्र काही शोधतो मी,
शोधल्यावरी सापडे काही , हे मात्र गूढ आहे
माणसे ठेवती जपूनी धीर वा गंभीर चेहरे
मुखवटयांच्या खालती त्या एक मंद स्मित आहे
मुखवटे
खरे चेहरे झाकण्या चढवूनी खोटे मुखवटे
खरेच आहे भासवतात मग ते चेहरे खोटे ||१||
मनात कटूता असूनी वाहवा करती
हसूनी खोटे वार करती पाठीवरती ||२||
तोंडदेखला आदर देवूनी स्वागत होई
पाठ वळता निंदा करण्याची करती घाई ||३||
स्वार्थ साधण्या स्तूती करती तोंडभरूनी
कार्यभाग संपला, टिकेची झोड वदनी ||४||
माझे अन इतरांचे
माझेच दु:ख मोठे का?
इतरांचे दु:ख छोटे का?
हातातले गमावले सारे काही
त्यांनी तरी कमावले का?
पर्वतासम संकटे आली
हादरून मी गेलो, ते नाही का?
जे गेले ते माझे होते
इतरांचे काहीच नव्हते का?
मानले माझे माझे, केले माझे माझे
असेच असते इतरांचेही, नव्हे का?
शून्याशी गाठ
शून्यातून पाय फुटल्यासारखे
आकडा भराभर धावतात...
खुप खुप दमल्यावर
शुन्याच्या मागे सामावतात...
भोपळा भोपळा हिणवले
पहिल्यांदा हाच तर गिरवला...
डोळ्यांची भाषा झाली क्लिष्ट
जेव्हा शून्य नजरेने गोंधळ घातले...
कधी असंच पुढं आल्यावर
तो 'पूज्य' राहत नाही
कुठल्याशा वळणावर अचानक
शून्याशी गाठ सुटत नाही...
पिंपळपान
मी लिहावं, तू वाचावं.
मी बोलावं, तू ऐकावं.
मी भांडावं, तू रुसावं.
मी हसवावं, तू हसावं.
मी न बोलता जाणावं,
तू डोळ्यांतून सांगावं.
काळजाला स्पर्शणारं, तुझ्या वहीतलं,
मी एक, पिंपळपान व्हावं...
धत् तेरे की...
तसं म्हटलं तर त्यांची ती होती खरीखुरी डेट
पण तिच्या त्याच्या मनासारखी घडलीच नाही भेट..
सुट्टीचा दिवस होता,
Backdrop ला पाऊस होता.
Romantic होतं weather,
एकांताची हलकी चादर.
ती म्हणाली, खरंच येऊ? तो म्हणाला, yes plz, I'll wait....
पण... तिच्या त्याच्या मनासारखी घडलीच नाही भेट..
संस्कार
मुलांना संस्कार
पालकांचे कर्तव्य
पालकांवर संस्कार
मुलाचे कर्तव्य !!
वय वाढलं म्हणजे
अक्कल येतेच असं नाही
दर वेळी बचावाला
वकिल येतोच असे नाही
ब्राम्हणांविषयी बापाचे अपशब्द
नशिबाने विवेकी मुलगा उपलब्ध
मुलगा CM भूपेश 'बघेल'
बाप नंदकुमार ला जेल!!
मंदिराचा मालक देव, पुजारी केवळ नोकर (मध्यप्रदेश कोर्टाचा निर्णय)
मंदिराची मालमत्ता
तिथे देवाची सत्ता
विकायचा विचार
कसा करे नोकर
पुजारी केवळ सेवक
मालक असतो देवक
पुजा-याला नाही जमीननोंदी
कोर्टाने केले स्पष्ट तोंडी
वापरकर्ता या रकान्यातही
लिहिण्याची नाही गरज,
मध्यप्रदेश कोर्टाने पुजा-यांचा
अर्ज केला खारीज
प्रवास कसला? फरफट अवघी!
एक आर्त काव्य , सलील कुलकर्णी
( कवी माहित नाही बहुतेक संदीप खरे किंवा सुधीर मोघे )
https://www.youtube.com/watch?v=xyHtnZW0dNA
अजुन उजाडत नाही ग!
इम्पिरिकल डेटा
आले कुटीस मेटा
सारे ओबीसी नेता
हा इम्पिरिकल डेटा
कुणी देता का हो डेटा
आरक्षणाचा रेटा
वकिलांना जा भेटा
इलेक्शन ती येता
बांधू कुणाचा फेटा
75 वर्षात भरल्या तुंबड्या
जनतेस मात्र कुबड्या
बाता त्या बड्या बड्या
कोर्टात पडल्या उघड्या
जगण्याचे कित्येक मजला अर्थही कळाले
धन्य भाग देवा ऐसे प्रेम ही मिळाले
जगण्याचे कित्येक मजला अर्थ ही कळाले
वार्यावर उडणारा, मी केर, धूळ, माती
येता तू सांगाती दगडांचे झाले मोती.
परीस तो जाणू कैसा ,सांग काय केले
जगण्याचे कित्येक मजला अर्थ ही कळाले.
शाळा आणि "ती"
नावसुद्धा माहीत नसलेली रानफुलं फुलायची
त्या माळरानावर, जिथं ती शाळा होती.
त्या फुलांच्या ताटव्यांमधून पायवाट काढीत ती
चालत यायची.
स्वप्नचं जणू तरंगत येतंय हवेतून असं वाटायचं.
कानाखाली जाळ
काय निवडावं लोकांनी
बॅड कि वर्स ?
कसला लागला आहे हा
महाराष्ट्राला कर्स
कितवा स्वातंत्रदिन आहे
हे विसरणारा मुख्यमंत्री
कि कानाखाली वाजवण्याची
भाषा करणारा मंत्री
तिसरी लाट, अफगाणीस्थान झालं,
मिडीयाला चघळायला नवं हाडूक
कोरोना, रोजगारी,वाहतूक,सुरक्षा
सर्वच मूळविषय झाले गूडूप
(कळेना मला)
पेरणा संदीपभाउंची ही कविता http://misalpav.com/node/49141
(कळेना मला)
डोळ्या समोर तारे कसे चमकतात
हे तुमच्या तासाला पहिल्यांदा बसल्यावर...
...मला कळालं!
जीभ कशी अडखळते
हे तुम्ही पहिल्यांदा प्रश्र्न विचारल्यावर...
...मला कळालं!
कळेना मला
मनात मोर कसे नाचतात
हे तुला पहिल्यांदा पाहिल्यावर...
...मला कळालं!
जीभ कशी अडखळते
हे तुझ्याशी पहिल्यांदा बोलताना...
...मला कळालं!
हृदय कसे धडधडते
हे तुझा हात पहिल्यांदा हातात घेताना...
...मला कळालं!
पुन्हा भेटायचयं हे माहीत असूनही
तुझा निरोप घेताना, दरवेळी
डोळ्यातलं पाणी कस अडवावं
हे मात्र मला अजूनही कळालेलं नाही!
गावाचा पिंपळ आणि इतर क्षणिका
पिंपळाने सोडले
गावाच्या पाऱ्याला.
फ्लैट मध्ये आला
मनी प्लांट झाला.
(२)
वाळूचे मनोरे
वार्यात उडाले.
भग्न स्वप्नाची
अधुरी कहाणी.
(३)
कल्पनेला मिळेना
साथ शब्दांची.
कोरीच राहिली
वही कवितेची.
(४)
पुरोगामी प्रतिक्रिया पाहिल्यानंतर
विस्कळखाईत कोसळताना
रेणुबंध होतील खिळखिळे
खळकन् फुटतील ठाशीव साचे
हादरून जातील स्तंभही
तर्काच्या भक्कम इमल्यांचे
गाभ्यातून जर्जर पृथ्वीच्या
लाव्हारस येईल उधाणून
अगणित जीवांचा कोलाहल
उरेल भवतालाला कोंदून
विस्कळखाईत कोसळताना
असेच काही घडेल? किंवा,
विज्ञानाचे ज्ञात नियम मग
वागतील वेगळेच तेव्हा?
- ‹ previous
- 27 of 468
- next ›