मिसळभक्तां साठी

आज दिसेना द्रव ही नयनी
(अनुवाद. कवी..गुलझार)
अशीच संध्या आली असता
अशीच ती जाईल बहूदा
आज दिसे ना कुणी एखादा
अशीच परतूनी जाईल बहूदा
अशीच संध्या आली असता
अशीच ती जाईल बहूदा
आज दिसले नाही अश्रु
आज दिसेना द्रव ही नयनी
आज ही अशीच रिक्त रजनी
होऊनी रिक्त जाईल बहुदा
अशीच संध्या आली असता
अशीच ती जाईल बहूदा
अंधारलेली ही रात्र कुणी
प्राप्त होऊनी दूर करेना
आज दूरावा न झाल्याने
उद्या फिरूनी ती येईल ना
अशीच संध्या आली असता
अशीच ती जाईल बहूदा
हा अनुवाद लिहून झाल्यावर मला कवीवर्य मंगेश पाडगांवकरांचं ते बोलगाणं सुचलं,आणि त्यात काहीसा फरक करून लिहावं असं वाटलं.अर्थात श्री.पाडगांवकरांची क्षमा मागून.
जशी गाय जवळ आली की वासरूं लुचूं लागतं
तसं
आपण विचार करूं लागलो की आपल्याला अनुवाद सुचूं लागतो.
अनुवाद आपण मिपावर लिहूं शकतो
अनुवाद आपण आपल्या ब्लॉगवर लिहूं शकतो.
मिपावर लिहलं म्हणून कुणी मोठं नसतं
ब्लॉगवर लिहलं म्हणून कुणी छोटं नसतं
एक गोष्ट नक्की असते तिन्हीकाळ पक्की असते
आपला अनुवाद आपल्याला पटला पाहिजे
आणि त्यावर प्रेम करीत आपण तो रेखाटला पाहिजे.
अनुवाद असा असला पाहिजे म्हणून आपल्यावर कुणाचं बंधन नसतं
अनुवाद तसा असला पाहिजे म्हणूनही आपल्यावर कुणाचं बंधन नसतं
कुठलीही कविता आपल्याला वाचता ये्ते
त्याचा अनुवाद आपल्याला केव्हाही करता येतो
एकटं एकटं चालताना विचार करता येतो
कागद पेन्सिल घेऊन बसून विचार करता येतो.
जेव्हा आपला मुड लागतो
अनुवाद आपणच सुचूं लागतो
एक गोष्ट नक्की असते तिन्हीकाळ पक्की असते
आपला अनुवाद आपल्याला पटला पाहिजे
आणि त्यावर प्रेम करीत आपण तो रेखाटला पाहिजे
तुमचं आणि आमचं मन जुळतं
तेव्हा दोघानाही अनुवाद कळतो
माझा अनुवाद मग तुम्ही वाचूं लागता
आणि माझ्याच आनंदात तुम्ही वाटेकरी होता.
कधी अनुवाद दिठीचा कधी तो मिठीचा
कधी अनुवाद एकाचा कधी तो एकमेकाचा
अनुवाद हा अनुवादाचं मोल असतं
अनुवादा पुढे बाकी सगळं फोल असतं
फुटपट्टी घेऊन अनुवाद मापता येत नाही
द्वेष करून अनुवादाला शापता येत नाही
अनुवाद चमचम चांदीचा हिरव्या हिरव्या फांदीचा
तो झुळझूळ वार्याचा ट्विंकल ट्विंकल तार्याचा
एक गोष्ट नक्की असते तिन्हीकाळ पक्की असते
आपला अनुवाद आपल्याला पटला पाहिजे
आणि त्यावर प्रेम करीत आपण तो रेखाटला पाहिजे
श्रीकृष्ण सामंत



भुमिका कळली
आपली अनुवादामागील भुमिका कळली. ही भुमिका अनोख्या पद्धतीने व्यक्त केलेलेही आवडले.
खाली थोडा खट्याळपणा केला आहे. फक्त एकच शब्द सगळीकडे बदलण्याचे (त्या अनुषंगाने क्रियापदे वगैरे) स्वातंत्र्य घेतले आहे. (कृहघे)
-------------------
जशी गाय जवळ आली की वासरूं लुचूं लागतं
तसं
आपण विचार करूं लागलो की आपल्याला खाज सुचूं लागते.
खाज आपण मिपावर लिहूं शकतो
खाज आपण आपल्या ब्लॉगवर लिहूं शकतो.
मिपावर लिहलं म्हणून कुणी मोठं नसतं
ब्लॉगवर लिहलं म्हणून कुणी छोटं नसतं
एक गोष्ट नक्की असते तिन्हीकाळ पक्की असते
आपली खाज आपल्याला पटली पाहिजे
आणि तिच्यावर प्रेम करीत आपण ती रेखाटली पाहिजे.
खाज अशी असली पाहिजे म्हणून आपल्यावर कुणाचं बंधन नसतं
खाज तशी असली पाहिजे म्हणूनही आपल्यावर कुणाचं बंधन नसतं
कुठलीही कविता आपल्याला वाचता ये्ते
त्याची खाज आपल्याला केव्हाही काढता येते
एकटं एकटं चालताना विचार करता येतो
कागद पेन्सिल घेऊन बसून विचार करता येतो.
जेव्हा आपला मुड लागतो
खाज आपणच सुचूं लागते
एक गोष्ट नक्की असते तिन्हीकाळ पक्की असते
आपली खाज आपल्याला पटली पाहिजे
आणि त्यावर प्रेम करीत आपण ती रेखाटली पाहिजे
तुमचं आणि आमचं मन जुळतं
तेव्हा दोघानाही खाज कळते
माझी खाज मग तुम्ही वाचूं लागता
आणि माझ्याच आनंदात तुम्ही वाटेकरी होता.
कधी खाज दिठीची कधी ती मिठीची
कधी खाज एकाची कधी ती एकमेकाची
खाज हे खाजेचं मोल असतं
खाजे पुढे बाकी सगळं फोल असतं
फुटपट्टी घेऊन खाज मापता येत नाही
द्वेष करून खाजेला शापता येत नाही
खाज चमचम चांदीची हिरव्या हिरव्या फांदीची
ती झुळझूळ वार्याचा ट्विंकल ट्विंकल तार्याची
एक गोष्ट नक्की असते तिन्हीकाळ पक्की असते
आपली खाज आपल्याला पटली पाहिजे
आणि तिच्यावर प्रेम करीत आपण ती रेखाटली पाहिजे
-----------------------------------
A 'No' uttered from the deepest conviction is better than a 'Yes' merely uttered to please, or worse, to avoid trouble.
-महात्मा गांधी
हॅहॅहॅ
खाजवणे ही 'प्रतिक्षिप्त' क्रिया आहे 'विक्षिप्त' नाही. त्याची गणना अपुर्णांकात करावी लागते. आम्ही खाजवण्याला प्रतिक्षिप्त क्रिया का म्हणतो? हेल्मेट घालुन गाडी चालवताना डोक्याला खाज आली कि आपण नकळत हेल्मेटला खाजवतो. ही गोष्ट बघणार्याला सकृतदर्शनी विक्षिप्त वाटली तरी ती प्रतिक्षिप्त क्रिया आहे हे त्याच्या नंतर लक्षात येते.. खाज मोजण्याचे एकक आज उपलब्ध नाही त्यामुळे त्याची तीव्रता ही गुणोत्तरात वा तुलनात्मक करावी लागते. खाज ही नैसर्गिक असुन ती 'भागली' नाही तर 'गुणीले' होते. आमच्या मते ज्याला 'खाज' कधीच आली नाही असा माणुस नाही. मात्र खाजेची वर्गवारी अनेक प्रकारे होते. ते विशद करणे अस्थानी होईल.'खाना खजाना' याचा खाण्याची खाज असा अर्थ आम्ही आमच्या पुरता काढला आहे. काही लोक त्याला 'कंड'ही म्हणतात. पण 'खाज' याशब्दात जो 'अर्थ' वा 'अनर्थ' आहे तो 'कंड शब्दात नाही. खिजवणे हा शब्द खाजवणे या शब्दातुनच व्युत्पत्त झाला असावा अशी आमची व्युत्पत्तीशास्त्रातली ज्ञानी खाज सांगते. 'वैचारिक खाज' व 'वैचारिक भुक' यात बृहदांतर आहे. 'आ बैल मुझे मार 'हे खाजेतुन नीर्माण होते. ज्यांना खाज येत नाही त्यांना खाजखुजली नावाच्या वनस्पतीच्या पानांची भुकटी लावली असता त्यांनाही खाज नीर्माण होते. मग कंडशमनासाठी वैद्यांच औषध घ्यावे लागते. काही प्रसंगात मात्र खाज तर आली आहे पण खाजवता तर येत नाही अशावेळी कंडशमना पेक्षा कंडदमनच करावे लागते.
खाजवताना नीट काळजी घेतली पाहिजे अन्यथा त्वचेची धपली पडते.जखम निर्माण होते. हे रक्त 'धमनी'तुन आलेले शुद्ध रक्त नसते ते 'नीला'तुन आलेले अशुद्ध रक्त असते हे शाळेत शिकलेल्या शरीर शास्त्राच्या रक्ताभिसरण दाखवलेल्या चित्रातुन स्पष्ट होते. मनगटावर आलेल्या धमनीला 'नाडी' म्हणतात हे आपल्याला ठाउक आहेच. याचा 'विल्याष्टिक'शी संबंध नाही हेही आपण जाणता. त्यामुळे काळजीचे कारण नाही.
अवांतर- हे आमच्या टंकनी ला आलेल्या खाजेतुन टंकले आहे. काही लोक याला नीर क्षीर विवेक ढळल्याचे लक्षण मानतात हे आम्हास ठाउक आहे.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
मस्त!
एकदम आवडली. एका ठिकाणी अजून एक वेगळी ओळ सुचली:
तुमचं आणि आमचं मन जुळतं
तेव्हा दोघानाही खाज कळते
आणि मग एकमेकांची पाठ खाजवत
चर्चा साद-प्रतिसादात रमते...
हम्म.
हम्म. सामंतकाका छान लिहीलं आहे.
बाकी 'जालीय विरजणकार' कुठे गेलं?
पुण्याचे पेशवे
"फाटके होते खिसे अन नोटही नव्हती खरी
पण उगवत्या चांदण्यावर मालकी वाटायची " -अरुण म्हात्रे
त्यांचे
त्यांचे दही संपले म्हणे....
********
छान कविता आहे, आवडली, सामंत काका तुम्ही कविताच करत जा, खुप खुप खुप छान लिहता तुम्ही
आलो !
आमच्याकडे खूप दही शिल्लक आहे भौ अजून. पण विरजणासाठी दुधावर साय तर धरू दे.
सामंत आजोबा,
काय लिहू ? शब्दच संपले.
-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
हे बरोबर आहे!
बरीचशी पातेली दूध तापवून तयार असलं की कसं पटापट आलं चमचा चमचा दही टाकून विरजण लावलं की मोकळे! दर पातेल्याला एक फेरी म्हणजे परवडत नाय हो!
चतुरंग
सामंतकाका.
सामंतकाका. मस्त.... आवडले !
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
कधी अनुवाद
मस्त!
सामंतकाका
छान प्रकटन. नेहमी स्वान्तसुखाय लिहावे म्हणतात आणि ते तुम्ही करता याचे कौतुक वाटते. इतर काय म्हणतील याचा विचार न केल्याने तुम्ही बरेच काही करू शकला असावात.
अवांतर -
तुमच्या कवितेतील ट्विंकल ट्विंकल वरून हे आठवले.
http://www.youtube.com/watch?v=DssSpNqbc64
सबका भला
चित्रा,
खरं आहे आपलं म्हणणं.
“आम्ही काव्याचे काव्याचे
काव्यकरी रे!
लिहूं काव्य,स्मरूं शब्द
मनी प्रेम प्रेम रे!”
हे असं आहे आमचं.आम्ही मनात आलं की लिहितो.आणि मनात म्हणतो,
"पढने वालेका भला
और
न पढने वालेका भी भला"
youtube च्या url बद्दल आभार.ऐकून मजा वाटली.
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभार.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com
हॅ हॅ हॅ...
हॅ हॅ हॅ... मी शीर्षक 'मिसळभोक्तां साठी' असं वाचलं.
+१
मी देखील.
वर कर्क, प्रकाशकाकांचे प्रतिसाद जास्त चांगले वाटले.