मिसळभक्तां साठी

श्रीकृष्ण सामंत's picture
श्रीकृष्ण सामंत in जे न देखे रवी...
7 Oct 2009 - 8:12 am

आज दिसेना द्रव ही नयनी
(अनुवाद. कवी..गुलझार)

अशीच संध्या आली असता
अशीच ती जाईल बहूदा
आज दिसे ना कुणी एखादा
अशीच परतूनी जाईल बहूदा
अशीच संध्या आली असता
अशीच ती जाईल बहूदा

आज दिसले नाही अश्रु
आज दिसेना द्रव ही नयनी
आज ही अशीच रिक्त रजनी
होऊनी रिक्त जाईल बहुदा
अशीच संध्या आली असता
अशीच ती जाईल बहूदा

अंधारलेली ही रात्र कुणी
प्राप्त होऊनी दूर करेना
आज दूरावा न झाल्याने
उद्या फिरूनी ती येईल ना
अशीच संध्या आली असता
अशीच ती जाईल बहूदा

हा अनुवाद लिहून झाल्यावर मला कवीवर्य मंगेश पाडगांवकरांचं ते बोलगाणं सुचलं,आणि त्यात काहीसा फरक करून लिहावं असं वाटलं.अर्थात श्री.पाडगांवकरांची क्षमा मागून.

जशी गाय जवळ आली की वासरूं लुचूं लागतं
तसं
आपण विचार करूं लागलो की आपल्याला अनुवाद सुचूं लागतो.
अनुवाद आपण मिपावर लिहूं शकतो
अनुवाद आपण आपल्या ब्लॉगवर लिहूं शकतो.
मिपावर लिहलं म्हणून कुणी मोठं नसतं
ब्लॉगवर लिहलं म्हणून कुणी छोटं नसतं

एक गोष्ट नक्की असते तिन्हीकाळ पक्की असते
आपला अनुवाद आपल्याला पटला पाहिजे
आणि त्यावर प्रेम करीत आपण तो रेखाटला पाहिजे.

अनुवाद असा असला पाहिजे म्हणून आपल्यावर कुणाचं बंधन नसतं
अनुवाद तसा असला पाहिजे म्हणूनही आपल्यावर कुणाचं बंधन नसतं
कुठलीही कविता आपल्याला वाचता ये्ते
त्याचा अनुवाद आपल्याला केव्हाही करता येतो
एकटं एकटं चालताना विचार करता येतो
कागद पेन्सिल घेऊन बसून विचार करता येतो.
जेव्हा आपला मुड लागतो
अनुवाद आपणच सुचूं लागतो

एक गोष्ट नक्की असते तिन्हीकाळ पक्की असते
आपला अनुवाद आपल्याला पटला पाहिजे
आणि त्यावर प्रेम करीत आपण तो रेखाटला पाहिजे

तुमचं आणि आमचं मन जुळतं
तेव्हा दोघानाही अनुवाद कळतो
माझा अनुवाद मग तुम्ही वाचूं लागता
आणि माझ्याच आनंदात तुम्ही वाटेकरी होता.

कधी अनुवाद दिठीचा कधी तो मिठीचा
कधी अनुवाद एकाचा कधी तो एकमेकाचा
अनुवाद हा अनुवादाचं मोल असतं
अनुवादा पुढे बाकी सगळं फोल असतं

फुटपट्टी घेऊन अनुवाद मापता येत नाही
द्वेष करून अनुवादाला शापता येत नाही
अनुवाद चमचम चांदीचा हिरव्या हिरव्या फांदीचा
तो झुळझूळ वार्‍याचा ट्विंकल ट्विंकल तार्‍याचा

एक गोष्ट नक्की असते तिन्हीकाळ पक्की असते
आपला अनुवाद आपल्याला पटला पाहिजे
आणि त्यावर प्रेम करीत आपण तो रेखाटला पाहिजे

श्रीकृष्ण सामंत

शृंगारकविता

प्रतिक्रिया

llपुण्याचे पेशवेll's picture

7 Oct 2009 - 9:15 am | llपुण्याचे पेशवेll

हम्म. सामंतकाका छान लिहीलं आहे.
बाकी 'जालीय विरजणकार' कुठे गेलं?
पुण्याचे पेशवे

दशानन's picture

7 Oct 2009 - 9:24 am | दशानन

त्यांचे दही संपले म्हणे....

;)

********

छान कविता आहे, आवडली, सामंत काका तुम्ही कविताच करत जा, खुप खुप खुप छान लिहता तुम्ही :)

मिसळभोक्ता's picture

7 Oct 2009 - 9:29 pm | मिसळभोक्ता

आमच्याकडे खूप दही शिल्लक आहे भौ अजून. पण विरजणासाठी दुधावर साय तर धरू दे.

सामंत आजोबा,

काय लिहू ? शब्दच संपले.

-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

चतुरंग's picture

7 Oct 2009 - 11:46 pm | चतुरंग

बरीचशी पातेली दूध तापवून तयार असलं की कसं पटापट आलं चमचा चमचा दही टाकून विरजण लावलं की मोकळे! दर पातेल्याला एक फेरी म्हणजे परवडत नाय हो! ;)

चतुरंग

विशाल कुलकर्णी's picture

7 Oct 2009 - 9:39 am | विशाल कुलकर्णी

सामंतकाका. मस्त.... आवडले !

सस्नेह
विशाल
*************************************************************

आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

विसोबा खेचर's picture

7 Oct 2009 - 9:47 am | विसोबा खेचर

कधी अनुवाद दिठीचा कधी तो मिठीचा
कधी अनुवाद एकाचा कधी तो एकमेकाचा
अनुवाद हा अनुवादाचं मोल असतं
अनुवादा पुढे बाकी सगळं फोल असतं

फुटपट्टी घेऊन अनुवाद मापता येत नाही
द्वेष करून अनुवादाला शापता येत नाही

मस्त! :)

चित्रा's picture

8 Oct 2009 - 2:03 am | चित्रा

छान प्रकटन. नेहमी स्वान्तसुखाय लिहावे म्हणतात आणि ते तुम्ही करता याचे कौतुक वाटते. इतर काय म्हणतील याचा विचार न केल्याने तुम्ही बरेच काही करू शकला असावात.

अवांतर -
तुमच्या कवितेतील ट्विंकल ट्विंकल वरून हे आठवले. :)
http://www.youtube.com/watch?v=DssSpNqbc64

श्रीकृष्ण सामंत's picture

8 Oct 2009 - 6:05 am | श्रीकृष्ण सामंत

चित्रा,
खरं आहे आपलं म्हणणं.

“आम्ही काव्याचे काव्याचे
काव्यकरी रे!
लिहूं काव्य,स्मरूं शब्द
मनी प्रेम प्रेम रे!”

हे असं आहे आमचं.आम्ही मनात आलं की लिहितो.आणि मनात म्हणतो,

"पढने वालेका भला
और
न पढने वालेका भी भला"

youtube च्या url बद्दल आभार.ऐकून मजा वाटली.
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभार.

www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

घाटावरचे भट's picture

8 Oct 2009 - 2:09 am | घाटावरचे भट

हॅ हॅ हॅ... मी शीर्षक 'मिसळभोक्तां साठी' असं वाचलं. ;)

सहज's picture

8 Oct 2009 - 6:23 am | सहज

मी देखील.

वर कर्क, प्रकाशकाकांचे प्रतिसाद जास्त चांगले वाटले.