माकडा माकडा हुप

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जे न देखे रवी...
3 Oct 2009 - 5:29 am

माकडा माकडा हुप

माकडा माकडा हुप
तुझ्या शेंडीला पावशेर तुप

तुप जाय चाटीत
चिंचा दे पाटीत

चिंचा आहेत लांबट
तोंड झाले आंबट

आपण दोघ बागेत फिरू
मग मला दे पेरू

पेरू आहे गोड मोठा
अरे पळ पळ, आला माळीदादाचा सोटा

-पाषाणभेद

कविताबालगीत

प्रतिक्रिया

अनामिक's picture

3 Oct 2009 - 8:53 am | अनामिक

ही ही... मजेदार आहे...
लहान असताना बरेच वेळा कॉलनीमधे माकडांची टोळी येत असे, तेव्हा आम्ही भावंडं/मित्र "माकडा माकडा हुप, तुझ्या शेपटीला तुप, खाशील तर खा, नाहीतर बोंबलत जा" असं काहीसं म्हणायचो त्याची आठवण झाली.

-अनामिक

विसोबा खेचर's picture

3 Oct 2009 - 9:03 am | विसोबा खेचर

माकडा माकडा हुप
तुझ्या शेंडीला पावशेर तुप

ही कविता फार पूर्वीपासून ऐकतो आहे.

कृपया हे वाचा!

तात्या.

पाषाणभेद's picture

3 Oct 2009 - 9:43 am | पाषाणभेद

ही कविता मी स्व:ता केलेली आहे. यातील पहीले कडवे हे खरच इतर कुठच्या 'कवितेतील' आहे की परंपरेने म्हणत आलेले बोल आहेत माहीत नाहीत.

मला तर ते परंपरेने लक्षात असलेले व एका पिढीकडून दुसर्‍या पिढीकडे जाणारे बोल वाटतात.

कुणाला या 'कवितेबाबत' बाबत अधीक माहिती असेल तर ते सांगा. मला त्या कविचा उल्लेख करण्यास काही अडचण नाही.
-----------------------------------
- पासानभेद बांकेबिहारी
(बडे बाबू,
तहसिल कार्यालय,
गुडगूडी, ता. रामनगर, जि. पस्चिम चंपारन, बिहार)