जादुगार!

ऋषिकेश's picture
ऋषिकेश in जनातलं, मनातलं
27 Aug 2009 - 11:29 pm

सन १९२८!
अ‍ॅम्स्टरडॅम ऑलिंपिक मधे हॉकीचे सामने चालु झाले होते.... ऑलिंपिकमधे हॉकी नुकतेच समाविष्ट झालेले... लोकांचा उत्साह शिगेला पोहोचलेला.... भारताचा पहिला सामना ऑस्ट्रीयाबरोबर.... पहिला सामना भारताने थेट ६-० असा जिंकला.... त्यानंतर भारताने अखंड झंजावात चालु ठेवला.... दुसर्‍याच दिवशी बेल्जियमला ९-० ने हरविले.... दोनच दिवसआंनी डेन्मार्कला ५-० ने मात दिली आणि सेमी फायनलला पोहोचला.
सेमी-फायनलला स्विस खेळाडूंना ६-० असा चोप देऊन भारतीय फायनलला पोचले. घरच्या पटांगणावर खेळणार्‍या नेदरलँडला भारताने ३-० ने हरवले व आपले पहिले सुवर्णपदक जिंकले.

एकही गोल विरुद्ध न जाऊ देणार्‍या रिचर्ड अ‍ॅलन या गोलरक्षकाबरोबरच एक नाव त्रिखंडात चर्चिले जाऊ लागले ते म्हणजे या ५ मॅचेसमधे १४ गोल करणार्‍या मेजर ध्यानसिंगचे. भारतात त्याच्या कोचने त्याला ध्यान-चंद म्हटले व तेच नाव लोकमानसांतही रुजले. एका वृत्तपत्राने लिहिले होते "This is not a game of hockey, but magic. DhyanChand is in fact the magician of hockey"

ध्यानचंद

हा हॉकीचा जादूगार त्याची जादु अशीच दाखवत राहिला. पुढच्या लॉस अँजेलिसच्या ऑलिंपिक मधील फायनलला तर भारताने अमेरिकेला २४-१ अश्या विश्वविक्रमी फरकाने हरविले. त्या सीझनच्या ३३८ भारतीय गोल्सपैकी या जादूगाराचे गोल्स होते १३३!!!

हे असं सारं वाचलं की त्या वेळच्या अभिमानाने ओतप्रोत भरलेल्या क्षणांचा विचार करूनच अंगावर रोमांच उभे रहातात, तर ते क्षण जगणार्‍यांना कसे वाटले असेल!

अश्या ह्या जादूगाराचा (उद्या) २९ ऑगस्ट हा जन्मदिवस! हाच दिवस भारतीय क्रीडा दिन म्हणूनही पाळाला जातो. ह्या हॉकीच्या जादुगाराला- ध्यानचंदला- मनःपूर्वक प्रणाम!

भारताच्या क्रिडा धोरणावर टिका आपण नेहेमीच करतो.. यंदा मिसळपाववर यानिमित्ताने भारतीय क्रिडाक्षेत्रातील फक्त उत्तमोत्तम (विविध खेळांतील) अभिमानास्पद अश्याच आठवणी जागवून ह्या जादूगाराला मानवंदना देऊयात असा प्रस्ताव मांडतो.

क्रीडा

प्रतिक्रिया

बिपिन कार्यकर्ते's picture

27 Aug 2009 - 11:53 pm | बिपिन कार्यकर्ते

प्रस्तावाला अनुमोदन देतो. बाकी सांगण्यासारख्या आठवणी वगैरे माहित नाहीत. त्यामुळे इतरांकडून ऐकायला उत्सुक आहे.

बिपिन कार्यकर्ते

प्राजु's picture

28 Aug 2009 - 12:06 am | प्राजु

१००% सहमत आहे.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

28 Aug 2009 - 12:19 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

या महान जादूगाराबद्दल मलाही माहिती नाही. पण ऋषीचा लेख वाचून खरोखर अंगावर रोमांच उभे राहिले.

अदिती

कपिल काळे's picture

28 Aug 2009 - 2:35 pm | कपिल काळे

ध्यानचंदांबद्दल एक धडा होता. हिंदीच्या पुस्तकात. तेव्हा आम्ही हॉकी खेळायचो( हाफ बॅक)

ध्यानचंदांच्या हॉकीस्टीकची तपासणी केली गेली होती म्हणे. त्यांनी स्टीकला काही चिकट गोंद लावले आहे का? चेंडू स्टीकपासून दूर जायचाच नाही. फारश्या क्लीप वगैरे नाही मिळत पण ज्या एक दोन डीडी स्पोर्टस्वर बघितल्यात त्यातून त्यांच्या स्टीकखालून चेंडून कोणी काढून घेतल्याचे दिसत नाही.

भारतीयशैलीची हॉकी हा शब्द ज्यांनी रुढ केला ते ध्यानचंद.

खूद्द हिटलरने ज्यांच्या कौशल्याची खास दखल घेतली ते ध्यानचंद!

१९३६ च्या बर्लिन ऑलिंपिक्सची अंतिम फेरी हिटलरच्या उपस्थितीत पार पडली. त्यानंतर हिटलरचे ध्यनचंदांना आपल्याजव्ळ बोलावून घेत त्यांच्या खेळाची खास प्रशंसा केली. जर्मन आर्मीमध्ये मानाची नोकरी सुद्धा देउ केली.

ध्यानचंदांचा करिश्मा असा विलक्षण होता की त्यांचा मुलगा अशोककुमार १९७२ च्या म्युनिच ऑलिम्पिक्समध्ये खेळला , तेव्हा एक गलितगात्र वृद्ध त्याला येउन भेटला ( स्ट्रेचरवरती- मैदानात) ध्यानचंदांचा मुलाला भेटण्यासाठी केलेला हा अटटाहास!

पुढे अ‍ॅस्ट्रोटर्फ येउन भारतीयशैलीची वाट लागली. भारत ऑलिम्पिक्स हॉकीला क्वालिफाय झाला तरी कसलं भारी वाटू लागलं.
ध्यानचंदांबद्द्ल अधिक इथे वाचा.

धमाल मुलगा's picture

28 Aug 2009 - 12:42 am | धमाल मुलगा

मेजरसाबनी भारतीय हॉकीला जे काही सोनेरी काळ अनुभवायला दिला त्याला तोडच नाही!!
अथक परिश्रम, जिद्द आणी चिकाटी असलेल्या ह्या जादुगाराला मुजरा!!

जाताजाता:ध्यानचंदांनाही मिळावी तितकी प्रसिध्दी मिळाली नाही.
आजच्या काळातही हॉकीची अवहेलना तशीच चालु असलेली पाहुन फार वाईट वाटतं.

असाच एक गुणी खेळाडु विरेन रस्किन्हा..डिफेन्स लाईनवर दिलीप तिर्की मिड फिल्डर म्हणुन उभा राहिला की हा पठ्ठा हाफ बॅकवर भित्ताडासारखा तटून उभा असायचा. ह्याला ओलांडुन चेंडू अ‍ॅड्रियन डिसुझापर्यंत नेता नेता प्रतिस्पर्ध्यांच्या तोंडाला फेस यायचा!
गेल्या दोन वर्षांखाली हॉकी महासंघाच्या मनमानीपायी ह्या अव्वल हिर्‍यानं निवृत्ती जाहीर करुन टाकली आणि मार्केटींग करत फिरतोय आता :(

हल्ली हल्लीच्यांमध्ये तुषार खांडेकरही चांगला गडी आहे. लेफ्ट विंगरवर ड्रॅग फ्लिक करुन प्रतिस्पर्धी संघाला चकवण्याचं कौशल्य तर के व ळ अ प्र ति म!!!

असो, मेजरसाबच्या उल्लेखानं बर्‍याच आठवणी जाग्या केल्या..धन्यवाद रे ॠष्या :)

संदीप चित्रे's picture

28 Aug 2009 - 2:40 am | संदीप चित्रे

नावाचा एक धडा हिंदीच्या पुस्तकात होता त्या आठवणी जाग्या झाल्या. धन्स रे ऋषी.

माझ्या लहानपणी टी.व्हीवर हॉकी बघताना झफर इक्बाल खूप आवडायचा..

धम्या,
तुला एकंदर हॉकीची बरीच आवड आणि माहिती आहे असं दिसतंय.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

28 Aug 2009 - 12:23 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>नावाचा एक धडा हिंदीच्या पुस्तकात होता त्या आठवणी जाग्या झाल्या.

हॉकी का जादूगर असे धड्याचे नाव होत का ?

-दिलीप बिरुटे

सहज's picture

28 Aug 2009 - 12:25 pm | सहज

तेच आठवले.

चांगला समयोचित लेख!

हर्षद आनंदी's picture

28 Aug 2009 - 2:41 am | हर्षद आनंदी

झाले बहु - होतील बहु - परी यासम हा

या दिग्गजाची माहीती विकी फोटु सकट देतो.

या महानतम खेळाडुस कोटी कोटी प्रणाम !!

दुर्दैवाने त्यांचा वारसा चालविणारे बोटावर मोजायचे म्हटले तरी एका हाताची बोटेच खुप होतील. बघु उद्या एखादे चॅनेल यांची दखल घेऊन एखादा कार्यक्रम करेल अशी आशा

ऋषिकेशा, फार सुंदर काम केले..... जियो!

स्वाती दिनेश's picture

28 Aug 2009 - 12:02 pm | स्वाती दिनेश

मेजर ध्यानचंदांचा खेळ पाहून हिटलर खूप प्रभावित झाला होता असे ऐकले आहे. एवढेच नव्हे तर त्यांच्या नावाचा रस्ता म्युनशन (म्युनिक) शहरात आहे असेही ऐकले आहे. तेथे जाऊन तो रस्ता पाहण्याची इच्छा आहे.
स्वाती

घाशीराम कोतवाल १.२'s picture

28 Aug 2009 - 12:50 pm | घाशीराम कोतवाल १.२

रस्त्याबद्दल माहित नाहि पण सुवर्णपदक देताना हिटलर ने त्यांना विचारले तु भारतिय सैन्यात कोण आहेस तेव्हा ध्यानचंद साधे सैनिक होते हिटलर त्यांना म्हणाला जर तु जर्मनीकडुन खेळलास तर तु ईकडे कर्नल होशील म्हणुन कारण हिटलर त्यांच्या खेळाने खुपच प्रभावित झाला होता

**************************************************************
"मराठी संकेतस्थळ चालावे ही तो तमाम मराठी वाचकांची इच्छा"
सौजन्य अदिती

अमोल केळकर's picture

28 Aug 2009 - 12:26 pm | अमोल केळकर

नवीन माहिती बद्दल धन्यवाद,
असेच नवनवीन जादुगारांची माहिती मिळू दे
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

आशिष सुर्वे's picture

28 Aug 2009 - 1:38 pm | आशिष सुर्वे

खरा जादुगार!

हॅटस् ऑफ
-
कोकणी फणस

''आयुष्य ही देवाच्या हातची मिसळच जणू.. सुख-दु:खाची!''

ऋषिकेश's picture

28 Aug 2009 - 1:40 pm | ऋषिकेश

हा प्रतिसाद फक्त खुलाशासाठी की आठवणी ध्यानचंदच्या / हॉकीच्या असल्या पाहिजेत असे नाहि तर भारतीय खेळाडूंच्या कोणत्याही खेळातील अभिमानास्पद कामगिरीचा धांदोळा घेतलात तर या निमित्ताने एक चांगले संकलन तयार होईल असे वाटते

-ऋषिकेश

झकासराव's picture

28 Aug 2009 - 1:45 pm | झकासराव

हिंदीत धडा होता तेवढीच ह्यांच्याविषयी माहिती.
पण हे हॉकीच्या सुवर्णकाळातील महान खेळाडु आहेत हे निश्चितच.
त्या धड्यात वाचलेला किस्सा देखील आठवतोय.
त्यावेळी प्रतिस्पर्धी संघाना म्हणे वाटायच की ह्यांच्या स्टिक मध्ये काहितरी वेगळ आहे. कारण बॉल नेहमी त्यांच्या स्टिकलाच चिकटुन राहतो. :)
फोटो प्रथमच पाहिला मी.
धन्यवाद माहिती आणि फोटोबद्दल. :)

ऋषिकेश's picture

29 Aug 2009 - 9:06 am | ऋषिकेश

सर्व वाचकांचे प्रतिक्रीयांबद्दल आभार.
आज भारतीय क्रीडा दिन. त्यानिमित्त तमाम मिपाकरांना हार्दिक शुभेच्छा

जातजाता: या दिवशी दिल्या जणार्‍या खेल पुरस्कारांच्या ट्रॉफ्या बदलल्या आहेत. ऑस्करच्या धर्तीवर म्हणे त्यांना अधिक चकचकीत/गुळगुळीत केले आहे. ट्रॉफ्यांचे फोटो मिळाले तर टाकतोच

ऋषिकेश
------------------
सकाळचे ९ वाजून ०३ मिनीटे झालेली आहेत. चला आता ऐकूया एक सुमधूर गीत "चक देऽऽ चक दे इंडीयाऽऽ...."

सुनील's picture

29 Aug 2009 - 12:19 pm | सुनील

समयोचित लेख.

क्रिकेट ह्या एकमेव खेळाने देशाचे क्रीडाविश्व इतके व्यापून टाकले आहे की, हॉकी हा भारताचा राष्ट्रीय खेळदेखिल झाकोळून गेला आहे. अन्य खेळांची तर गोष्टच सोडा. अशावेळी ह्य जादूगाराची आठवण करून देणे खूप आवडले.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

विसोबा खेचर's picture

31 Aug 2009 - 9:44 am | विसोबा खेचर

यंदा मिसळपाववर यानिमित्ताने भारतीय क्रिडाक्षेत्रातील फक्त उत्तमोत्तम (विविध खेळांतील) अभिमानास्पद अश्याच आठवणी जागवून ह्या जादूगाराला मानवंदना देऊयात असा प्रस्ताव मांडतो.

माझे अनुमोदन...

तात्या.