मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

जादुगार!

ऋषिकेश · · जनातलं, मनातलं
सन १९२८! अ‍ॅम्स्टरडॅम ऑलिंपिक मधे हॉकीचे सामने चालु झाले होते.... ऑलिंपिकमधे हॉकी नुकतेच समाविष्ट झालेले... लोकांचा उत्साह शिगेला पोहोचलेला.... भारताचा पहिला सामना ऑस्ट्रीयाबरोबर.... पहिला सामना भारताने थेट ६-० असा जिंकला.... त्यानंतर भारताने अखंड झंजावात चालु ठेवला.... दुसर्‍याच दिवशी बेल्जियमला ९-० ने हरविले.... दोनच दिवसआंनी डेन्मार्कला ५-० ने मात दिली आणि सेमी फायनलला पोहोचला. सेमी-फायनलला स्विस खेळाडूंना ६-० असा चोप देऊन भारतीय फायनलला पोचले. घरच्या पटांगणावर खेळणार्‍या नेदरलँडला भारताने ३-० ने हरवले व आपले पहिले सुवर्णपदक जिंकले. एकही गोल विरुद्ध न जाऊ देणार्‍या रिचर्ड अ‍ॅलन या गोलरक्षकाबरोबरच एक नाव त्रिखंडात चर्चिले जाऊ लागले ते म्हणजे या ५ मॅचेसमधे १४ गोल करणार्‍या मेजर ध्यानसिंगचे. भारतात त्याच्या कोचने त्याला ध्यान-चंद म्हटले व तेच नाव लोकमानसांतही रुजले. एका वृत्तपत्राने लिहिले होते "This is not a game of hockey, but magic. DhyanChand is in fact the magician of hockey" Image removed. हा हॉकीचा जादूगार त्याची जादु अशीच दाखवत राहिला. पुढच्या लॉस अँजेलिसच्या ऑलिंपिक मधील फायनलला तर भारताने अमेरिकेला २४-१ अश्या विश्वविक्रमी फरकाने हरविले. त्या सीझनच्या ३३८ भारतीय गोल्सपैकी या जादूगाराचे गोल्स होते १३३!!! हे असं सारं वाचलं की त्या वेळच्या अभिमानाने ओतप्रोत भरलेल्या क्षणांचा विचार करूनच अंगावर रोमांच उभे रहातात, तर ते क्षण जगणार्‍यांना कसे वाटले असेल! अश्या ह्या जादूगाराचा (उद्या) २९ ऑगस्ट हा जन्मदिवस! हाच दिवस भारतीय क्रीडा दिन म्हणूनही पाळाला जातो. ह्या हॉकीच्या जादुगाराला- ध्यानचंदला- मनःपूर्वक प्रणाम! भारताच्या क्रिडा धोरणावर टिका आपण नेहेमीच करतो.. यंदा मिसळपाववर यानिमित्ताने भारतीय क्रिडाक्षेत्रातील फक्त उत्तमोत्तम (विविध खेळांतील) अभिमानास्पद अश्याच आठवणी जागवून ह्या जादूगाराला मानवंदना देऊयात असा प्रस्ताव मांडतो.

वाचन 4155 प्रतिक्रिया 18