Skip to main content

(सहज चोळले..)

लेखक ज्ञानेश... यांनी मंगळवार, 18/08/2009 13:40 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा: प्राजुताईंची सुंदर कविता- "सहज चाळले" -------------------------------- सहज चोळले मी पाठीला जाता जाता क्षणात सगळ्या आठवल्या बसलेल्या लाथा.. :( किती राहिलो अवतीभवती तुझ्या तरीही, मनासारख्या झाल्या नाही कधीच बाता =(( मच्छर भलते.. म्हणून मी रात्री जागवल्या अफवा झाल्या जागरणाच्या मला पाहता! (|: लोकांच्या डोळ्यात कितीदा येत राहिले.. कळवळणे, अवघडणे माझे उठता-बसता :B 'स्पर्श' तुझ्या भावाचा अजुनी दुखतो आहे अजुनही 'कळ' उठते आहे तो आठवता.. : डोळ्यांमध्ये दाटून आली अशी आसवे.. लोक टाळती 'डोळे आले' म्हणता म्हणता @) अधुनमधुन मी सासरकडच्या गावी जातो.. अन वेड्यागत रुसून बसतो 'गाडी'करता! >:) किती पसारा आवरण्याचा सोस तुला हा? धांदल माझी होते ना तो करता करता ! ;) -ज्ञानेश. -------------------------------------
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 3162
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

(सहज चोळले..) प्रेषक ज्ञानेश... ( मंगळ, 08/18/2009 - 13:40) . कविता | भयानक
खरंच ,.... नाव फक्त भयानक आहे कवितेचं !! आत मधे मात्र बसलेल्या लाथा ? =)) जगदंब ... जगदंब .... - ( तत्वज्ञानेश..) टारेश्वर

मी बरोब्बर "सहज चोळले" असे वाचले, म्हटले काय तरी इण्टरेष्टिंग आहे.. पण छ्या विडंबण निघालं ! --(आंबट) कढीपत्ता

साबण चोळले पाठीला...... अशी काहीतरी रचना असती तर भारी वाटलं असतं

स्माईलींचा सुरेख उपयोग केला आहे.!!!!