सहज चाळले..

प्राजु's picture
प्राजु in जे न देखे रवी...
18 Aug 2009 - 9:03 am

सहज चाळले आठवणींना जाता जाता
क्षणांत सार्‍या भरून आल्या बघता बघता

किती राहिले अवती भवती तुझ्या तरीही
आतुर मन हे तुझ्याच एका नजरे करता

"स्वप्नं नको मज!" ..म्हणून रात्री मी जागवल्या
भास तुझे ना कधीच आले मला टाळता

जनांत नाही डोळा कधी आणले पाणी
मनांस झाल्या कितीक जखमा उठता बसता

स्पर्श तुझा तो जपून होता असा ठेवला
वादळ उठले उरांत माझ्या तो आठवता

डोळ्यांमध्ये दाटुन आली किती आसवे
दिले टाळूनी मीही त्यांना हसता हसता

अधुन मधुन मी आठवणींच्या गावी जाते
मन हे वेडे रुसून बसते मागे फिरता

किती पसारा करून जाती आठवणी या
धांदल माझी अशीच होते तो आवरता

- प्राजु

करुणकविता

प्रतिक्रिया

मदनबाण's picture

18 Aug 2009 - 9:11 am | मदनबाण

किती राहिले अवती भवती तुझ्या तरीही
आतुर मन हे तुझ्याच एका नजरे करता
मस्तच...

मदनबाण.....
चट्यागो चझीमा चवडतीआ चलिकामा चतीहो. :)
http://www.youtube.com/watch?v=z3z6limgwMo

दिपाली पाटिल's picture

18 Aug 2009 - 11:10 am | दिपाली पाटिल

छान कविता...

दिपाली :)

चकली's picture

18 Aug 2009 - 9:43 pm | चकली

+२
चकली
http://chakali.blogspot.com

अनिल हटेला's picture

18 Aug 2009 - 11:29 pm | अनिल हटेला

सुंदर कविता !! :-)

बैलोबा चायनीजकर !!!
I drink only days ,which starts from 'T'...
Tuesday
Thursday
Today ;-)

आशिष सुर्वे's picture

18 Aug 2009 - 9:16 am | आशिष सुर्वे

सुंदर काव्य प्राजु ताई!

-
कोकणी फणस

''आयुष्य ही देवाच्या हातची मिसळच जणू.. सुख-दु:खाची!''
''Me and my girlfriend broke off over religious differences. She thought she was God and I didn't...''

दशानन's picture

18 Aug 2009 - 9:25 am | दशानन

खुप सुंदर... कविता... प्राजु !
मस्त !

डोळ्यांमध्ये दाटुन आली किती आसवे
दिले टाळूनी मीही त्यांना हसता हसता

निशब्द !

***

तुझ सम नाही दुसरा ध्वज
तुझ सम नाही दुसरा देश
तुझ्यासाठीच जगणे हेच ध्येय
स्वप्न माझे अर्पावा तुझसाठी हा देह !

विशाल कुलकर्णी's picture

18 Aug 2009 - 9:34 am | विशाल कुलकर्णी

अप्रतिम ! :-)

सस्नेह
विशाल
*************************************************************

आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

राघव's picture

18 Aug 2009 - 10:40 am | राघव

भावना खूप संयत शब्दांत, छान व्यक्त केल्या आहेस. :)
संपूर्ण कविता आवडली. एकही दुसर्‍याहुन उणे कडवे नाही!

अधुन मधुन मी आठवणींच्या गावी जाते
मन हे वेडे रुसून बसते मागे फिरता

हे वाचून मी माझा मधली एक चारोळी आठवली -

आठवणींच्या गावी,
मी मनाला कधी पाठवत नाही.
जाताना ते खूश असतं,
येताना त्याला येववत नाही!

राघव
( आधीचे नाव - मुमुक्षु )

कुछ बात है की हस्ती मिटती नही हमारी..
सदियो रहा है दुश्मन दौर-ए-जमान हमारा!

बेसनलाडू's picture

18 Aug 2009 - 10:42 am | बेसनलाडू

फार छान कविता!
आवडली.
(स्मरणशील)बेसनलाडू

अरुण मनोहर's picture

18 Aug 2009 - 11:07 am | अरुण मनोहर

छान कविता.

अवलिया's picture

18 Aug 2009 - 11:09 am | अवलिया

सु...रे...ख ! :)

--अवलिया

अ-मोल's picture

18 Aug 2009 - 11:25 am | अ-मोल

"स्वप्नं नको मज!" ..म्हणून रात्री मी जागवल्या
भास तुझे ना कधीच आले मला टाळता

किती पसारा करून जाती आठवणी या
धांदल माझी अशीच होते तो आवरता

विशेष आवडले!

मिसळभोक्ता's picture

18 Aug 2009 - 11:55 am | मिसळभोक्ता

मी चुकून "सहज चळले" असे वाचले, म्हटले काय तरी इण्टरेष्टिंग आहे.. पण कविता निघाली.

-- मिसळभोक्ता

बिपिन कार्यकर्ते's picture

18 Aug 2009 - 11:59 am | बिपिन कार्यकर्ते

अधुन मधुन मी आठवणींच्या गावी जाते
मन हे वेडे रुसून बसते मागे फिरता

कविता सुंदर. या ओळी खूपच आवडल्या.

बिपिन कार्यकर्ते

श्रावण मोडक's picture

18 Aug 2009 - 1:08 pm | श्रावण मोडक

छा न !

शाल्मली's picture

18 Aug 2009 - 1:36 pm | शाल्मली

खास कविता!

"स्वप्नं नको मज!" ..म्हणून रात्री मी जागवल्या
भास तुझे ना कधीच आले मला टाळता
अधुन मधुन मी आठवणींच्या गावी जाते
मन हे वेडे रुसून बसते मागे फिरता

फारच सुंदर!

--शाल्मली.

ऋषिकेश's picture

18 Aug 2009 - 1:42 pm | ऋषिकेश

डोळ्यांमध्ये दाटुन आली किती आसवे
दिले टाळूनी मीही त्यांना हसता हसता

प्रत्येक ओळ मस्त वरील ओळी जास्त आवडल्या.
मस्त!

ऋषिकेश
------------------
दुपारचे १ वाजून ४० मिनीटे झालेली आहेत. चला आता ऐकूया एक सुमधूर गीत "हे भलते अवघड असते.. "

ज्ञानेश...'s picture

18 Aug 2009 - 1:43 pm | ज्ञानेश...

प्राजुताई, एकदम मस्त कविता!
माझा दुसरा प्रतिसादही नक्की वाचा-
http://www.misalpav.com/node/8995

"Great Power Comes With Great Responsibilities"

टारझन's picture

18 Aug 2009 - 1:47 pm | टारझन

अल्टी !!!!!!!!!!! नाजुक कविता :)

क्रान्ति's picture

18 Aug 2009 - 2:55 pm | क्रान्ति

अधुन मधुन मी आठवणींच्या गावी जाते
मन हे वेडे रुसून बसते मागे फिरता

किती पसारा करून जाती आठवणी या
धांदल माझी अशीच होते तो आवरता

वा! कमालीची अभिव्यक्ती!

क्रान्ति
दिव्यत्वाची जेथ प्रचीती | तेथे कर माझे जुळती
अग्निसखा
रूह की शायरी

लिखाळ's picture

18 Aug 2009 - 4:57 pm | लिखाळ

जनांत नाही डोळा कधीही आणले पाणी
मनांस झाल्या कितीक जखमा उठता बसता

कविता आवडली. हे कडवे एकदम छान :)

-- लिखाळ.
दहशतवाद-भौगोलिक-जैविक असे आपत्तीचे प्रकार बदलतात पण सरकारची निष्क्रियता, भोंगळपणा बदलत नाही.

अनामिक's picture

18 Aug 2009 - 5:20 pm | अनामिक

व्वा! खूप सुंदर कविता...

किती पसारा करून जाती आठवणी या
धांदल माझी अशीच होते तो आवरता

ह्या ओळी तर खूपच आवडल्या.

-अनामिक

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

18 Aug 2009 - 5:25 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

किती पसारा करून जाती आठवणी या
धांदल माझी अशीच होते तो आवरता

मलाही याच ओळी आवडल्या..!

-दिलीप बिरुटे

विसोबा खेचर's picture

22 Aug 2009 - 2:00 am | विसोबा खेचर

मलाही!

प्राजू, जियो..!

तात्या.

स्वाती२'s picture

18 Aug 2009 - 5:37 pm | स्वाती२

खूप सुंदर कविता!

प्रकाश घाटपांडे's picture

18 Aug 2009 - 6:50 pm | प्रकाश घाटपांडे

जनांत नाही डोळा कधीही आणले पाणी
मनांस झाल्या कितीक जखमा उठता बसता

डोळ्यांमध्ये दाटुन आली किती आसवे
दिले टाळूनी मीही त्यांना हसता हसता

जगायला शिकायला लावणार्‍या ओळी विशेष आवडल्या.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

चित्रा's picture

18 Aug 2009 - 8:58 pm | चित्रा

आवडली कविता.

प्रशांत उदय मनोहर's picture

18 Aug 2009 - 9:26 pm | प्रशांत उदय मनोहर

मस्त कविता.

एक सुचवावसं वाटतं

"जनांत नाही डोळा कधीही आणले पाणी" मध्ये मात्रांची थोडी गडबड होतेय. ती सुधारता आली तर आणखी मजा येईल. :)

आपला,
(मिपाकर) प्रशांत

प्राजु's picture

18 Aug 2009 - 9:29 pm | प्राजु

२ मात्रा जास्ती होताहेत.

करते दुरुस्त.
धन्यवाद प्रशांत. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

प्राजु's picture

19 Aug 2009 - 6:00 am | प्राजु

सर्वांचे मनापासून आभार. :)

- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

अविनाश ओगले's picture

19 Aug 2009 - 8:59 pm | अविनाश ओगले

"स्वप्नं नको मज!" ..म्हणून रात्री मी जागवल्या
भास तुझे ना कधीच आले मला टाळता

मस्त!
================================
"जनांत नाही डोळा कधीही आणले पाणी" मध्ये मात्रांची थोडी गडबड होतेय. ती सुधारता आली तर आणखी मजा येईल.
==
२ मात्रा जास्ती होताहेत.
करते दुरुस्त.
==

हे गणित कळले नाही.