पनीर चिली

स्वाती दिनेश's picture
स्वाती दिनेश in पाककृती
28 Jun 2009 - 10:26 pm

साहित्य- ३,४ हिरव्या भोपळी मिरच्या, १ लहान लाल व १ लहान पिवळी भोपळी मिरची,१मध्यम कांदा, ५/६ हिरव्या मिरच्या, बोटभर आलं, ६/७ लसूण पाकळ्या, १चमचा आलं लसूण पेस्ट,१.५ ते २ टेबलस्पून सोया सॉस, १चहाचा चमचा मिरपूड,१.५ चहाचा चमचा कॉर्न फ्लोअर, १ चहाचा चमचा मैदा, मीठ,अजोनोमोटो,तेल, २५० ते ३०० ग्राम पनीर. घरी करायचे असल्यास १ लिटर दूधाचे पनिर

कृती-कांदा चौकोनी व बारीक चिरा,लाल,पिवळी सिमला मिरचीही बारीक चौकोनी चिरा.
हिरव्या सिमला मिरचीचे चौकोनी पण जरा मोठे तुकडे चिरा.
आलं, लसूण बारीक चिरा.
२ हिरव्या मिरच्या बारीक चिरा व ३ हिरव्या मिरच्या मध्ये फोडून लांब चिरा. अधिक तिखट हवे असल्यास एखाद दोन मिरच्या वाढवा.
पनीरचे लांबट तुकडे करुन घ्या. एका वाडग्यात कॉर्नफ्लोअर व मैदा एकत्र करा, त्यात चमचाभर मीठ व अर्धा चमचा अजिनोमोटो घाला. आललसूण पेस्ट घाला, पाणी घालून सरसरीत कालवा. ह्या मिश्रणात पनिरचे तुकडे बुडवा. तेल गरम करा आणि हे तुकडे तेलावर फ्राय करुन घ्या व बाजूला ठेवा. उरलेले मिश्रणही बाजूला ठेवा.

कांदा तेलावर परतून घ्या. त्यात लाल,पिवळी सिमला मिरची घाला व परता. आलेलसूण व बारीक चिरलेल्या मिरच्या घालून परता. हिरव्या सिमला मिरच्यांचे मोठे तुकडे घाला.एक वाफ येऊ द्या मग कॉर्नफ्लोअरचे मिश्रण घाला ,सोया सॉस आणि मिरपूड घाला. पाणी घालून सारखे करा व खळखळून उकळू द्या,चवीनुसार मीठ व अजिनोमोटो घाला. मध्ये फोडून लांबट चिरलेल्या हिरव्या मिरच्या घाला. सिमला मिरच्या शिजत आल्या की पनीरचे तळलेले तुकडे घाला. एक उकळी येऊ द्या.
जर ड्राय पनिर चिली हवे असेल तर ग्रेव्ही बनवू नका, पाणी घालू नका.
गरमागरम पनीरचिली फ्राइड राइस बरोबर खा, :)

प्रतिक्रिया

बिपिन कार्यकर्ते's picture

28 Jun 2009 - 10:31 pm | बिपिन कार्यकर्ते

भ्यां!!!!!!!!!!!!!!!!!!!

बिपिन कार्यकर्ते

ऋषिकेश's picture

28 Jun 2009 - 10:32 pm | ऋषिकेश

खल्लास! फोटुमधून पनीरचा तुकडा एकदम उचलून घ्यावासा वाटतोय

(स्वातीताईच्या रेशिपी "बघणारा") ऋषिकेश
------------------
बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे

पक्या's picture

28 Jun 2009 - 11:22 pm | पक्या

पनीर चिली मध्ये फोटोत दिसतोय एवढा पातळ रस्सा नसतो.
ह्या रेसिपि मधील ढोबळ्या मिरच्या शिजून खूप मऊ झाल्या तर पूर्ण पदार्थाची वाट लागते. मिरच्यांचे तुकडे खाताना क्रंची लागले पाहिजेत.(तुम्ही पाणी घालून खळखळ उकळू द्या , आणि नंतर परत शेवटी एक उकळी येऊ द्या असे लिहीले आहे त्यावरून सांगतोय.)

टारझन's picture

28 Jun 2009 - 11:38 pm | टारझन

णा !! पसंद णही आयो स्वाती ताई !! चायनिज पदार्थ थोडे लालसर असतात का ?

चकली's picture

28 Jun 2009 - 11:50 pm | चकली

पनीर चिली मला ड्राय आवडते. आणि मी थोडी टोमॅटो पेस्ट वापरते.

चकली
http://chakali.blogspot.com

यशोधरा's picture

29 Jun 2009 - 12:13 am | यशोधरा

आता पुढच्या वेळी भारतात आलीस की सांग गं स्वातीताई, तुझ्याकडे मुक्कामालाच येते बघ! ;)

रेवती's picture

29 Jun 2009 - 5:29 am | रेवती

अरे वा!
वेगळाच प्रकार दिसतोय!
मी कधी ही भाजी केली नाहीये.
एकदा ड्राय लाल रंगाचा पदार्थ चाखला तो खूप तिखट केला होता.
हे तसे तिखट नसावे. फ्राइड राईस जरा इकडे पार्सल कर. प्लेटचा फोटू रंगसंगतीमुळे छान वाटतोय!

रेवती

सहज's picture

29 Jun 2009 - 6:54 am | सहज

सिमला मिरची तितकीशी खास आवडत नाही :-( पनीर मात्र भारीच. :-)

अजुन एखादी भाजी + सिमला मिरचीचे कदाचित बारीक उभे काप केले तर ...

अजिनोमोटो [की एम. एस. जी.] याबद्दल आपले काय मत आहे? पिडाकाका, मिपावरील डॉक्टरमंडळी आपण काय सांगु शकाल?

विंजिनेर's picture

29 Jun 2009 - 1:06 pm | विंजिनेर

अजिनोमोटो शक्यतो टाळावे.
सतत खाण्यात आल्यास हमखास हृदयविकार/चढा-रक्तदाब मागे लागेल. (रेडी-टु-इट पदार्थ ह्याच साठी टाळावे)

बाकी पनीर (अस्सल देशी) + सोया सॉस (अस्स्ल चिनी/जपानी) हे काँबिनेशन वाचून अंमळ मौज वाटली. असो. ज्याची त्याची आवड..
आपल्याला कसुरी मेथी+आलं+लसूण वापरून केलेली पंजाबी पनीर चिलीच आवडते(त्याला आम्ही पनीर कडाई म्हणतो बुवा).

----
कळप-मनोवृत्तीचा सूक्ष्म अभ्यास करण्यात आम्ही गढलेलो असल्यामुळे कंपूबाजी करायला आमच्याकडे वेळ नाही

विसोबा खेचर's picture

29 Jun 2009 - 7:58 am | विसोबा खेचर

हम्म! तसेही आम्ही चायनीजचे फारसे प्रेमी नाही. क्वचितच खातो.

स्वाती, प्रामाणिक मत द्यायचं तर फोटू इतका खास वाटला नाही. त्यापेक्षा बागडूने टाकलेला फोटू जास्त आवडला.

तात्या.

चित्रादेव's picture

29 Jun 2009 - 8:43 am | चित्रादेव

पनीर चिली एकदम टॅन्जी कोरडी अशी असते. बागडूंच्या फोटोतली पनीर चिली दिसते तशी.
:) पाणी टाकतच नाही.

दिपाली पाटिल's picture

29 Jun 2009 - 12:56 pm | दिपाली पाटिल

मी कधी केली नाहिये आणि खाल्ली पण नाहिये त्यामुळे तुमची डिश मला तरि छान च वाटतेय आणि ज्याची त्याची श्टाईल असते...:)

दिपाली :)

शाल्मली's picture

29 Jun 2009 - 1:29 pm | शाल्मली

मी पण आत्तापर्यंत पनीर चिली ड्रायच खाल्ले होते. ग्रेव्ही वाले पहिल्यांदाच बघत आहे.
या भाजीत सोया सॉस आणि अजिनोमोटो घालतात हे पण माझ्यासाठी नवीनच होते. :)

--शाल्मली.

मदनबाण's picture

29 Jun 2009 - 8:33 pm | मदनबाण

पनीर का कोई भी पदार्थ हो, अपुनको तो सिर्फ हादणेसे मतलब !!! :)
छान फोटो.:)

(चाऊ माऊ पनीर खाऊ)
मदनबाण.....

Success is never permanent, and failure is never final.
Mike Ditka

स्वाती दिनेश's picture

30 Jun 2009 - 11:16 am | स्वाती दिनेश

पक्या, तुम्ही म्हणता तसे ग्रेव्हीचा रस पातळ नसतो पण रस लगेच आलतो म्हणून मी थोडा जास्त ठेवते, खाईपर्यंत रस आळतो. राइसबरोबरचे पनीरचिली पहा,त्यात रस आळला आहे. मिरच्या थोड्या कचवट असल्या तर जास्त मजा येईल. अगदी बरोबर.त्यामुळे त्या तशा ठेवता येऊ शकतील. जास्त वेळ शिजू द्यायचे नाही.
बागडू, तुम्ही ड्रायचिली पनिरचा फोटो दिला आहे,त्यातील सगळ्याच भाज्यांचे मोठे तुकडे केलेले आहेत, जेव्हा ग्रेव्ही हवी तेव्हा लाल,पिवळी सिमला मिरची आणि कांदा मी बारीक चिरुन घेतला आहे. व हिरव्या सिमला मिरच्यांचे फक्त मोठे तुकडे घेतलेत,तसेच तंदूर वा तत्सम रंग घातलेला नाही त्यामुळे तुम्ही म्हणता तसा मादक रंग आलेला नाही,:)
विंजिनेर, अजिमोमोटो शक्यतो टाळावेच पण कधीतरी खायला हरकत नसावी. कडाइ पनिर म्हणजे टिपिकल पंजाबी तर हे चिली पनिर म्हणजे फ्युजन डिश आहे म्हणून तर पनिर आणि सोया सॉस, कॉर्नप्लोअरचे काँबिनेशन आहे,:)
सर्वांना मनापासून धन्यवाद.
स्वाती

मसक्कली's picture

6 Jul 2009 - 4:36 pm | मसक्कली

त्या पनिर चिलि ऐवजि फ्राइड राइस लै भरि दिसत आहे..... ;)