
साहित्य- ३,४ हिरव्या भोपळी मिरच्या, १ लहान लाल व १ लहान पिवळी भोपळी मिरची,१मध्यम कांदा, ५/६ हिरव्या मिरच्या, बोटभर आलं, ६/७ लसूण पाकळ्या, १चमचा आलं लसूण पेस्ट,१.५ ते २ टेबलस्पून सोया सॉस, १चहाचा चमचा मिरपूड,१.५ चहाचा चमचा कॉर्न फ्लोअर, १ चहाचा चमचा मैदा, मीठ,अजोनोमोटो,तेल, २५० ते ३०० ग्राम पनीर. घरी करायचे असल्यास १ लिटर दूधाचे पनिर
कृती-कांदा चौकोनी व बारीक चिरा,लाल,पिवळी सिमला मिरचीही बारीक चौकोनी चिरा.
हिरव्या सिमला मिरचीचे चौकोनी पण जरा मोठे तुकडे चिरा.
आलं, लसूण बारीक चिरा.
२ हिरव्या मिरच्या बारीक चिरा व ३ हिरव्या मिरच्या मध्ये फोडून लांब चिरा. अधिक तिखट हवे असल्यास एखाद दोन मिरच्या वाढवा.
पनीरचे लांबट तुकडे करुन घ्या. एका वाडग्यात कॉर्नफ्लोअर व मैदा एकत्र करा, त्यात चमचाभर मीठ व अर्धा चमचा अजिनोमोटो घाला. आललसूण पेस्ट घाला, पाणी घालून सरसरीत कालवा. ह्या मिश्रणात पनिरचे तुकडे बुडवा. तेल गरम करा आणि हे तुकडे तेलावर फ्राय करुन घ्या व बाजूला ठेवा. उरलेले मिश्रणही बाजूला ठेवा.
कांदा तेलावर परतून घ्या. त्यात लाल,पिवळी सिमला मिरची घाला व परता. आलेलसूण व बारीक चिरलेल्या मिरच्या घालून परता. हिरव्या सिमला मिरच्यांचे मोठे तुकडे घाला.एक वाफ येऊ द्या मग कॉर्नफ्लोअरचे मिश्रण घाला ,सोया सॉस आणि मिरपूड घाला. पाणी घालून सारखे करा व खळखळून उकळू द्या,चवीनुसार मीठ व अजिनोमोटो घाला. मध्ये फोडून लांबट चिरलेल्या हिरव्या मिरच्या घाला. सिमला मिरच्या शिजत आल्या की पनीरचे तळलेले तुकडे घाला. एक उकळी येऊ द्या.
जर ड्राय पनिर चिली हवे असेल तर ग्रेव्ही बनवू नका, पाणी घालू नका.
गरमागरम पनीरचिली
फ्राइड राइस बरोबर खा, :)