मायकेल जॅक्सन गेला

पक्या's picture
पक्या in जनातलं, मनातलं
26 Jun 2009 - 6:48 am

आत्ताच (गुरुवार दुपार ) समजले की पॉप संगीताचा बादशाह समजला जाणारा मायकेल जॅक्सन गेला. राहत्या घरीच श्वास बंद पडून त्याचे निधन झाले.

http://news.yahoo.com/s/ap/us_obit_michael_jackson

समाजबातमी

प्रतिक्रिया

छोटा डॉन's picture

26 Jun 2009 - 8:21 am | छोटा डॉन

- पॉप संगीत सामान्य जनतेपर्यंत घराघरात पोहचवणारा मायकल जॅक्सन
- थ्रीलर, बॅड, डेंजरस ह्या यशाची उच्चतम पातळी गाठणार्‍या पॉप अल्बमसचा निर्माता आणि सर्वेसर्वा मायकल जॅक्सन
- संगीत क्षेत्रातील महत्वाचे असे ग्रॅमी अ‍ॅवॉर्ड तब्बल १३ वेळा जिंकणारा मायकल जॅक्सन
- डान्सच्या स्टेप्समध्ये गुरुत्वाकर्षचे सर्व नियम विसरायला लावणारा मायकल जॅक्सन
- आपल्या चेहर्‍याच्या १७ वेळा शत्रकिया करवुन लुक बदलवणारा मायकल जॅक्सन
- गुड आणि बॅड अशा दोन्ही पब्लिसिटी लिलया कॅश करणारा मायकल जॅक्सन

आज फक्त उरला आहे आठवणीत ...
पॉप संगीताच्या बादशहाला आमची आदरांजली ..!!!

------
छोटा डॉन
एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे.
आता आमचा "लेखन न करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... ;)

भाग्यश्री's picture

26 Jun 2009 - 8:52 am | भाग्यश्री

सहमत.
फार वाईट वाटतंय! :(
सगळं लहानपण गेलं त्याची गाणी ऐकण्यात ! तो नाहीये हेच अविश्वसनिय वाटतंय.. गॉन टू सून खरंच!!

आणि वाईट याचे की गेले काही वर्ष गाणी सोडून भलत्याच कारणासाठी प्रसिद्ध झाला.. :(

http://www.bhagyashree.co.cc/

दिपाली पाटिल's picture

26 Jun 2009 - 11:34 am | दिपाली पाटिल

आणि वाईट याचे की गेले काही वर्ष गाणी सोडून भलत्याच कारणासाठी प्रसिद्ध झाला..
आता World Tour ला जाणार होता जुलै'०९ - मार्च '१०, ५० देशांमध्ये, ५० प्रोग्रॅम्स पण होणार होते आत्ता सगळ्यांचं च खुप नुकसान होणार.

दिपाली :)

टारझन's picture

26 Jun 2009 - 10:48 pm | टारझन

मायकल ने वारल्यावरंही अंमळ करमणूक केलीये :)
प्रतिसाद वाचून मजा आली !! अशी मजा पुरवण्यास (कळत नकळत) कारणिभूत ठरलेल्या मायकल ला वर शांती मिळो !!

मायकलचा मुनवॉक फार म्हणजे फारंच अप्रतिम होता .. त्याला नाचताना पहाणं हा एक निखळ आनंद असे !!

बाकी ते शात्रीय संगीत लावलं की आम्ही फ्रेश असलो तरी झोप येते ... आणि झोप आलेली असेल तर ती उडते

-

पक्या's picture

26 Jun 2009 - 10:24 am | पक्या

डॉनराव , यथार्थ वर्णन केलयं आपण.
व्यक्तिगत आयुष्यात तो कसाही असला तरी पॉप संगीतातला बादशाह होता. त्याच्यासारखा तोच; दुसरा होणे नाही.

>>आज फक्त उरला आहे आठवणीत ... पॉप संगीताच्या बादशहाला आमची आदरांजली ..!!!
माझीही आदरांजली

विसोबा खेचर's picture

26 Jun 2009 - 9:00 am | विसोबा खेचर

बरं झालं! पिडा गेली..!

लहान मुलामुलींशी लैंगिक चाळे करायचा साला! एक विकृत इसम गेला, फार छान झालं! :)

तात्या.

दशानन's picture

26 Jun 2009 - 9:04 am | दशानन

वाईट वाटले !

* माणूस कसा ही असो पण त्याला मृत्य प्राप्त झाल्यावर असा प्रतिसाद... फार छान झालं खटकले.. !

थोडेसं नवीन !

हेरंब's picture

26 Jun 2009 - 2:34 pm | हेरंब

तात्यांशी सहमत,
कुठलाही विकृत माणूस मेला की मला आनंद होतो. जगातली एक घाण गेली असेच वाटते.

टारझन's picture

27 Jun 2009 - 3:14 am | टारझन

मायकल जॅक्सन .... द चाचा णेहरू

मायकल ला लहान मुले आवडायची म्हणे .. नेहरूजींप्रमाणे !!
कमाल आहे ना ?

संदीप चित्रे's picture

26 Jun 2009 - 9:09 am | संदीप चित्रे

एक काळ अक्षरशः मायकेल जॅक्सनचा होता. 'बीट इट' आणि 'ब्लॅक अँड व्हाईट' ही गाणी तर कधीच विसरणं शक्य नाही. ईश्वर त्याच्या आत्म्यास शांती देवो.

श्रीयुत संतोष जोशी's picture

26 Jun 2009 - 9:48 am | श्रीयुत संतोष जोशी

राजेंशी पूर्णपणे सहमत.
तात्या तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती.

काहीही झालं तरी मायकेल हा एकमेव होता. त्याच्या आत्म्यास शांती लाभो हीच प्रार्थना.
त्याची गाणी तोच लिहायचा ; संगीतही तोच द्यायचा ; आणी सादरही करायचा.

जरा त्याचं " Heal The World "
ऐका म्हणजे समजेल मायकेल हा काय होता ते ?

हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.

भाग्यश्री's picture

26 Jun 2009 - 9:54 am | भाग्यश्री

सहमत..
माणूस मेल्यावर छान झाले असे लिहीणे म्हणजे .. जाऊदे शब्दच नाहीत.. प्रचंड संताप आला!!
आणि दुसरी गंमतीची गोष्ट ही की हे असल्या प्रतिसादांची खात्रीच होती! ज्यांना शिव्या घालायच्यात त्यांनी कृपया इथे घालू नयेत, नवीन धागा करून करा तो गोंधळ! (असं मला तरी वाटतं!) :(

http://www.bhagyashree.co.cc/

कालिन्दि मुधोळ्कर's picture

26 Jun 2009 - 10:45 am | कालिन्दि मुधोळ्कर

+१

'वी आर द वर्ल्ड' हे ही अविस्मरणीय. [http://www.youtube.com/watch?v=WmxT21uFRwM]

वेताळ's picture

26 Jun 2009 - 10:00 am | वेताळ

पॉपचा बादशहा असा एकाकी त्याच्या चाहत्याना सोडुन गेला ही खुपच दु:खद घटना आहे.
त्याच्या मृत्युची बातमी वाचुन डोळ्याच्या कडा आपोआप ओल्या झाल्या. आमचे कॉलेजचे दिवस त्याची गाणी एकणे व नवे नवे अल्बम जमा करणेतच गेले.पण काही लोक त्याच्या संगीतातील योगदाना बद्दलचर्चा करण्यापेक्षा त्याच्या व्यक्तीगत आयुष्यावर टिका करण्यात धन्यता मानतात, हे खरोखर चुक आहे. मायकेल खरोखर्च पॉप संगीतातील देव होता.
ईश्वर त्याच्या मृतात्म्यास शांती देवो हिच एक इच्छा व्यक्त करतो.

वेताळ

विसोबा खेचर's picture

26 Jun 2009 - 10:14 am | विसोबा खेचर

मी माझं व्यक्तिगत मत दिलं आहे. बाकी चालू द्या..!

हा धागा मायकेल संबंधी आहे, माझ्या त्याच्याविषयीच्या मताविषयी नाही! आणि मीदेखील माझं त्याच्याविषयीचं व्यक्तिगत मत दिलं आहे. मिपाकरांनीही तेच करावं. माझ्या त्याच्याविषयीच्या मताबद्दल न लिहिता, त्याच्याविषयीच्या मताबद्दल लिहावं ही विनंती!

मायकेल जॅ‍क्सन नावाचा कुणी एक इसम खूप् महान वगैरे होता असं काही मिपाकरांचं म्हणणं आहे. मला त्यांच्या मताबद्दल आदर आहे!

तात्या.

भाग्यश्री's picture

26 Jun 2009 - 10:19 am | भाग्यश्री

त्या इसमाबद्दल कोणी बोलत नाहीये इथे त्या इसमाच्या गाण्याविषयी, पॉप संगीताविषयीच मतं नोंदवणे चालू आहे..
तो पर्सनली कसा होता हे खरं कोणालाच माहीत नाहीये त्यामुळे सगळे संगीताविषयीच बोलणार! मागे मुकुल शिवपुत्रंविषयी तुमची मतं ऐकली होती.. ती इथे जुळत नाहीयेत! कलाकाराची कला पाहावी इत्यादी!
असो.. तुमची बर्‍याच बाबतीतली प्रिज्युडाईस्ड मतं माहीतीच आहेत.. यापुढे नो कमेंट्स!

http://www.bhagyashree.co.cc/

विसोबा खेचर's picture

26 Jun 2009 - 10:52 am | विसोबा खेचर

तुमची बर्‍याच बाबतीतली प्रिज्युडाईस्ड मतं माहीतीच आहेत.. यापुढे नो कमेंट्स!

ते अधिक बरं होईल..!

तात्या.

विसोबा खेचर's picture

26 Jun 2009 - 11:02 am | विसोबा खेचर

त्यामुळे सगळे संगीताविषयीच बोलणार!

तो जे काही करतो/करायचा त्याला संगीत म्हणतात ही माहिती माझ्याकरता नवी आहे! ;)

असो,

तात्या.

छोटा डॉन's picture

26 Jun 2009 - 11:33 am | छोटा डॉन

>>तो जे काही करतो/करायचा त्याला संगीत म्हणतात ही माहिती माझ्याकरता नवी आहे!
संगीत म्हणजे काय ?
त्याची "योग्य आणि जगमान्य " अशी व्याख्या काय आहे ?

त्याच कसं आहे तात्या की जगातल्या बर्‍याच गोष्टी जर "योग्य चष्यातुन " पाहिल्या तर बरोबर समजतात.
तुम्हाला आवडत/पसंत नसेल म्हणुन (सरसकट) पाश्चात्य/पॉप संगीताला वाईट बोलण्यात काय हाशील ?

दुसर्‍या साईडने ती लोकं तेच म्हणु शकतात, शास्त्रिय संगीत म्हणजे काय तर एका स्टेजवर ४ लोकं उगाच ताना घेत गळा फाडतात असे कोणी जर विदेशी म्हणाला तर तुम्ही काय म्हणाल ?
कारण त्याच्या चष्यातुन संगीत म्हणजे लाईटच्या झगमगाटात, वाद्यांच्या कल्लोळात, आरडाओरडा व बेफाट नाचत सादर केलेल कार्यक्रम. बरोबर ?

शेवटी अपना अपना नजरियाँ, पण एखादी गोष्ट आपल्या नजरियाँत बसतच नसेल तर ती "अस्तित्वातच/ऑथेंटिक नाही" म्हणण्याला मी योग्य म्हणणार नाही ....

खरेतर प्रतिसाद द्यायचाच नव्हता.
पण मायकल जॅक्सनच्या निमीत्ताने तुम्ही एकंदर "पॉप संगीतावरच" प्रश्नचिन्ह उभे केलेत म्हणुन लिहले.
असो.
------
( पॉप म्युसिक *ट्ट न कळणारा परंतु मायलक जॅक्सनचा चाहता) छोटा डॉन
एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे.
आता आमचा "लेखन न करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... ;)

विसोबा खेचर's picture

26 Jun 2009 - 11:45 am | विसोबा खेचर

संगीत म्हणजे काय ?

मला माहीत नाही..!

तुम्हाला आवडत/पसंत नसेल म्हणुन (सरसकट) पाश्चात्य/पॉप संगीताला वाईट बोलण्यात काय हाशील ?

मी कुठे वाईट म्हटलंय?

दुसर्‍या साईडने ती लोकं तेच म्हणु शकतात, शास्त्रिय संगीत म्हणजे काय तर एका स्टेजवर ४ लोकं उगाच ताना घेत गळा फाडतात असे कोणी जर विदेशी म्हणाला तर तुम्ही काय म्हणाल ?

त्याने म्हणावं की! ते त्याचं मत असेल...!

कारण त्याच्या चष्यातुन संगीत म्हणजे लाईटच्या झगमगाटात, वाद्यांच्या कल्लोळात, आरडाओरडा व बेफाट नाचत सादर केलेल कार्यक्रम. बरोबर ?

काय म्हणालात? वाद्यांचा कल्लेळ? आरडाओरडा??

बरं बरं! ;)

व बेफाट नाचत सादर केलेल कार्यक्रम.

काय म्हणालात? बेफाट नाचत? हो, दिपकरावांच्या प्रतिसादाखाली आपण पाहिला बुवा तो नाच! खरंच बेफाट! :)

असो,

मायकेलला माझीही श्रद्धांजली!
(खास लोकाग्रहात्सव!) ;)

तात्या.

छोटा डॉन's picture

26 Jun 2009 - 12:12 pm | छोटा डॉन

काय म्हणालात? वाद्यांचा कल्लेळ? आरडाओरडा??
बरं बरं!
काय म्हणालात? बेफाट नाचत? हो, दिपकरावांच्या प्रतिसादाखाली आपण पाहिला बुवा तो नाच! खरंच बेफाट!

छे छे, ते "तसे" आहेच असे नाही.
उगाच पटकन समजावे म्हणुन तसे लिहले आहे, बाकी त्या आरडाओरडीत आणि वाद्यांच्या कल्लोळात सुद्धा एक "ताल, लय" असते बरं का तात्या ...

बाकी आपण डान्स पाहिला व त्याखाली माझा प्रतिसादात डान्सच्या प्रकाराचेही स्पष्टीकरणही मे दिले आहेच ;)

मायकेलला माझीही श्रद्धांजली!
(खास लोकाग्रहात्सव!)

=))
हा हा हा, "खास लोकाग्रहास्तव" हे पाहुन गंमत वाटली.
असो, धन्यवाद ...

( आता खास पोटाग्रहास्तव मी इथेच थांबतो आणि पॉप गाणी ऐकत जेवुन येतो, डान्सचे नाव नका काढु, भरल्या पोटाने फार अवघड असते बॉ ;) )

------
छोटा डॉन
एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे.
आता आमचा "लेखन न करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... ;)

विसोबा खेचर's picture

26 Jun 2009 - 12:40 pm | विसोबा खेचर

बाकी त्या आरडाओरडीत आणि वाद्यांच्या कल्लोळात सुद्धा एक "ताल, लय" असते बरं का तात्या ...

काय सांगता? असेल असेल..! :)

बाकी आम्हाला काय कळतंय म्हणा तालातलं आणि लयीतलं!

आम्ही अजून आमच्या थिरखवाखासाहेबांकडून त्रितालतले कायदे, गती, रेले, आणि त्यांच्या एकापेक्षा देखण्या बंदिशींमधली 'लय' समजून घ्यायचा प्रयत्न करत आहोत..! आणि ती समजण्याकरता हा जन्म पुरेल असं वाटत नाही!

अस्सल, लयदार, रियाजी तबला..!

असो... लयीबद्दलची चर्चा चालू द्या...!

तात्या.

कालिन्दि मुधोळ्कर's picture

26 Jun 2009 - 12:58 pm | कालिन्दि मुधोळ्कर

हा धागा मायकेलच्या संगीताबद्द्ल आहे असावा आपणच लिहीलं होतं ना?

कारण नसताना वितंड-वाद (न) करण्याबाबत बाबूजी-गदिमा-मंगेश्कर-जोशी-सावरकर-आशा काळे-पु.ल. वगेरेंनी काही म्हणून ठेवले आहे काय? मग मुद्दे पट्ण्याच्या शक्यता खूप वाढतील...

भाग्यश्री's picture

26 Jun 2009 - 1:06 pm | भाग्यश्री

कालिंदी त्यांनी लिहीले असले तरी.. इट्स ऑफ नो युझ!
जॅक्सनच्या गाण्यांची चर्चा आपण ऑफलाईनच करूया.. इथे सावळा गोंधळच होणार!

काय करणार.. काही साईट्स ना (फक्त) रोमन अक्षरांचे वावडे असते तर काहींना बर्‍याच विषयांचेच !
ज्यांना ज्या गोष्टीत रस आहे ती लोकं येऊन बोलतायत, ज्यांना रस नाही ते नाक न खुपसता शांत बसले तर बिघडत नाही! पण होत नाहीये तसं.. सो वी बेटर टेक धिस ऑफलाईन..

http://www.bhagyashree.co.cc/

विसोबा खेचर's picture

26 Jun 2009 - 1:34 pm | विसोबा खेचर

सो वी बेटर टेक धिस ऑफलाईन..

लाख मोलाची बात..!

आणि एक,

काय करणार.. काही साईट्स ना (फक्त) रोमन अक्षरांचे वावडे असते तर काहींना बर्‍याच विषयांचेच !

मिपाला कुठल्या विषयांचे वावडे आहे आणि कुठल्या नाही, हे वेळोवेळी सांगितले गेले आहे. मायकेल जॅक्सन हा विषय मिपाला वर्ज्य नाही. त्या संबंधात हा धागा आणि त्यावरील चर्चा येथे सुरू ठेवली गेलेली आहे. मायकेलच्या सर्व समर्थकांच्या, प्रेमींच्या, स्तुतिपाठकांच्या कुठल्याही प्रतिसदाला डावलले गेलेले नाही. असे असताना मुद्दामून मिपाला कोणत्या विषयांचे वावडे आहे इत्यादी विषय काढायचे प्रयोजन कळले नाही..

मिपा हे आहे हे असं आहे, ज्यांना आवडेल रुचेल ते येतील. इतरांकरता बाहेर जायचा दरवाजा सत्ताड खुला आहे!

चपला घालायच्या अन् चालू पडायचं!

कळावे,

तात्या अभ्यंकर.

भाग्यश्री's picture

26 Jun 2009 - 1:37 pm | भाग्यश्री

कळले तुमचे मत.. विचार करते त्यावर !

http://www.bhagyashree.co.cc/

विसोबा खेचर's picture

26 Jun 2009 - 1:44 pm | विसोबा खेचर

धन्यवाद..

भाग्यश्री's picture

26 Jun 2009 - 1:14 pm | भाग्यश्री

.

सहज's picture

26 Jun 2009 - 10:16 am | सहज

गेले काही दशके जगभरच्या तरुणाईला आपल्या संगीताने भारावुन टाकणार्‍या किंग ऑफ पॉपला श्रद्धांजली.

घाटावरचे भट's picture

26 Jun 2009 - 10:32 am | घाटावरचे भट

या महान कलाकाराला श्रद्धांजली.

नितिन थत्ते's picture

26 Jun 2009 - 10:40 am | नितिन थत्ते

एका पिढीवर राज्य केलं हे खरंच.

(मायकेल जॅक्सनचे एकही गाणे न ऐकलेला) खराटा

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

26 Jun 2009 - 10:53 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>(मायकेल जॅक्सनचे एकही गाणे न ऐकलेला) खराटा

खरं आहे ! मीही कधीच मायकेल जॅक्सनची गाणी ऐकली नाहीत.
मात्र त्याच्याविषयीच्या चर्चा / बातम्या खूप वाचल्या आहेत.

पॉप संगीताचा ज्याला बादशाह समजले जात होते, असा मायकेल जॅक्सन गेला
महान कलाकाराला माझीही श्रद्धांजली !

-दिलीप बिरुटे

विसोबा खेचर's picture

26 Jun 2009 - 11:31 am | विसोबा खेचर

मीही कधीच मायकेल जॅक्सनची गाणी ऐकली नाहीत.

:)

तात्या.

त्याच 'You are not alone' नक्की ऐका.

विसोबा खेचर's picture

26 Jun 2009 - 10:56 am | विसोबा खेचर

(मायकेल जॅक्सनचे एकही गाणे न ऐकलेला)

:)

सचीन जी's picture

26 Jun 2009 - 11:01 am | सचीन जी

त्याचे स्टेज शो पण भव्य असायचे. लेझर्स, फायर वर्क्स आणि तांत्रिक करामतींनी परिपुर्ण ! त्याच्या थ्रिलर या गाण्याचा विडिओ तर अफलातुन आहे!
माझी श्रद्धांजली !

दिपक's picture

26 Jun 2009 - 11:06 am | दिपक

पॉप संगीताचा बादशहा मायकेल जॅक्सनला
माझीही श्रद्धांजली !


विसोबा खेचर's picture

26 Jun 2009 - 11:35 am | विसोबा खेचर

दिपकराव,

तुमच्या प्रतिसादाखालील तो नाचणारा थोर इसम मध्येच उजव्या जांघेपाशी खाजवल्यासारखं काहीसं करत आहे. हा कुठला नृत्यप्रकार ते कळेल का? :)

तात्या.

छोटा डॉन's picture

26 Jun 2009 - 11:59 am | छोटा डॉन

नाचणारा थोर इसम मध्येच उजव्या जांघेपाशी खाजवल्यासारखं काहीसं करत आहे. हा कुठला नृत्यप्रकार ते कळेल का?

तात्या, वरचा थोर इसम जे काही डान्सचे प्रकार दाखवत आहे ते अ‍ॅक्युचली वेस्टर्न डान्सचे क्लब मिक्स का असेच तत्सम काहितरी आहे ...

ह्यानिमीत्ताने मला आठवतात तेवढे वेस्टर्न डान्सेस इथे लिहतो ...
१. फोक डान्स : लोकनॄत्य
२. बॉलरुम डान्स : पार्टीमध्ये केला जाणारा डान्स
३. हिप हॉप डान्सिंग : आपल्याकडे गणपतीत करतात तसाच ढिंगचॅक्क पण थोडासा सोफॅस्टिकॅटेड प्रकार आहे
४. सांबा डान्स : ब्राझिलीयन डान्स, अंगप्रत्यांग वापरुन हा करतात
५. बेली डान्स : कमरेची जास्तीत जास्त हालचाल करुन हा करतात
६. आयरिश डान्स : एका र्‍हिदममध्ये हात-पाय आणि डोके ह्यांची हालचाल
७. टँगो डान्स : बॉलरुमचाच पण थोडासा जलदगतीचा डान्स
८. रुम्भा / मॅम्बो डान्स : लॅटिन डान्सचे प्रसिद्ध प्रकार
९. साल्सा : बहुतेक सगळ्यांना माहित आहेच, जोदीने करण्याचा फारच उत्तम प्रकार ...
१०. स्विंग डान्स : जोडीने शारिरीक कसरती करत केलेला डान्स
( ऑलेंपिक मध्ये हे असते फक्त ह्याला सिन्क्रोनाईझ्ड डान्सिंग म्हणतात )
११. डिस्को डान्स : मिथुनचे चित्रपट पहाणे
१२. स्ट्रीट डान्स : समुहनॄत्य
१३. मेक्सिकन वेव डान्स : हा एखाद्या सामन्याच्यावेळी हाताचा वापर करुन करतात. उदा : फुटबॉल वगैरे ...
१४. बॅले : सुरावटींच्या तालावर केलेला अत्यंत प्रेक्षणीय प्रकार
१५. अ‍ॅक्रो डान्स : कसरतपटुंचा डान्स
१६. फ्री स्टाईल : वरच्या कुठल्याही २ किंवा अधिक डान्सचे कॉम्बिनेशन ...

वरचा थोर माणुस ह्यातल्याच काही स्टेप्स मिक्स करुन वापरत आहे ...
ठिक आहे ?
आम्हाला महितीची देवाणघेवाण करताना नेहमीच आनंद होतो ;)

------
( वेस्टर्न डान्सचे व्यवस्थित शिक्षण घेतलेला डान्सर आणि सविस्तर माहितीदाता) छोटा डॉन
एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे.
आता आमचा "लेखन न करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... ;)

विसोबा खेचर's picture

26 Jun 2009 - 12:06 pm | विसोबा खेचर

तात्या, वरचा थोर इसम जे काही डान्सचे प्रकार दाखवत आहे ते अ‍ॅक्युचली वेस्टर्न डान्सचे क्लब मिक्स का असेच तत्सम काहितरी आहे ...

धन्यवाद. विवक्षित ठिकाणी खाजवणे हा प्रकार पाश्चात्य नृत्याच्या क्लब मिक्स प्रकारात मोडतो ही नवीन माहिती मिळाली..! :)

तात्या.

मराठी_माणूस's picture

26 Jun 2009 - 12:18 pm | मराठी_माणूस

=)) =)) =))

छोटा डॉन's picture

26 Jun 2009 - 12:23 pm | छोटा डॉन

विवक्षित ठिकाणी खाजवणे हा प्रकार पाश्चात्य नृत्याच्या क्लब मिक्स प्रकारात मोडतो ही नवीन माहिती मिळाली..!

=)) =))
तात्यांबरोबर प्रश्नोत्तरे म्हणजे एक वेगळीच मज्जा ;)

असो, आपल्याला माहितीचा उपयोग झाला व थोडीशी नवी माहिती कळली हे पाहुन माझ्या "दिर्घ प्रतिसादाचे" सार्थ झाले ...
धन्यवाद ..!!!
आता मी निश्चिंत मनाने ............ जेवायला जातो ;)

बाकी एक वैधानीक इशारा :
उपरोक्त दिलेया कोणत्याही डान्सच्या प्रकाराचे व त्याच्या "कोणत्याही स्टेप्सचे" तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाशिवाय व व्यवस्थित प्रशिक्षणाशिवाय कॄपया घरी, बाहेर अथवा कुठेही आणि कसेही प्रयोग करु नयेत ही आग्रहाची विनंती...
कारण अपुर्ण ज्ञानाने केलेल्या "स्टेप्स" तुमचे प्रचंड शारिरीक आणि मानसीक नुकसान करु शकतात अशी चेतावणी आम्ही देतो ;)

( पळा बाबा आता, लै झाले ) ;)

------
( डान्स ट्रेनर ) छोटा डॉन
एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे.
आता आमचा "लेखन न करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... ;)

ब्रिटिश टिंग्या's picture

26 Jun 2009 - 12:50 pm | ब्रिटिश टिंग्या

डान्या....लै लै हुच्च!
बर्‍याच दिसांनी वर्जिनल डान्या बघायला मिळाला... ;)

llपुण्याचे पेशवेll's picture

26 Jun 2009 - 7:14 pm | llपुण्याचे पेशवेll

प्र १ : ब्रेक डान्स म्हणजे काय?
प्र २ : मायकल जॅक्सन करत असे त्याला ब्रेक डान्स म्हणत असत, हे खरे आहे?
प्र ३ : मायकलच्या एखाद्या झक्कास नाचयुक्त गाण्याचा दुवा देऊ शकाल?

पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984

नीधप's picture

27 Jun 2009 - 1:38 pm | नीधप

स्लाइड विसरलास का?

- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

प्रसाद लेले's picture

26 Jun 2009 - 11:34 am | प्रसाद लेले

एकमेवाड्वितिय ! बाद्शाहा गेला.
माझी श्रद्धांजली !

इथे मिपावर संगीत म्हन्जे फक्त फड्के,मगेशकर्,जोशि हेच आहे.
वरिल सर्व महान आहेतच पण म्हनुन बकि कलाकाराना कमि लेखु नये,ते पण मेल्यवर .

लेले

भाग्यश्री's picture

26 Jun 2009 - 11:46 am | भाग्यश्री

=))
सो व्हेरी ट्रु !!

http://www.bhagyashree.co.cc/

विसोबा खेचर's picture

26 Jun 2009 - 11:50 am | विसोबा खेचर

इथे मिपावर संगीत म्हन्जे फक्त फड्के,मगेशकर्,जोशि हेच आहे.

मिपा आहे हे असं आहे!

तात्या.

हेरंब's picture

26 Jun 2009 - 2:38 pm | हेरंब

मी पुन्हा तात्यांना माझा पाठिंबा जाहीर करतो.

परिकथेतील राजकुमार's picture

26 Jun 2009 - 11:57 am | परिकथेतील राजकुमार

जो मेला तो नक्की मायकल जॅक्सन होता का ? ह्या संदर्भात काही पुरावे / तयार केलेले पुरावे पी. डी. एफ. फाईलच्या माध्यमातुन मिळाले होते की खर्‍या मायकल जॅक्सनला जाउन बरीच वर्षे लोटली आहेत.

उच्छुकांसाठी फाईल डाउनलोडला ठेवली आहे, डाउनलोड करुन तुमची प्रतिक्रीया जरुर द्यावी.

मायकल जॅक्सन

º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

नितिन थत्ते's picture

26 Jun 2009 - 12:19 pm | नितिन थत्ते

>>>कारण त्याच्या चष्यातुन संगीत म्हणजे लाईटच्या झगमगाटात, वाद्यांच्या कल्लोळात, आरडाओरडा व बेफाट नाचत सादर केलेल कार्यक्रम.

संगीतात काही सबस्टन्स नसला की असे चाळे करून लोकांची करमणूक करावी लागते असे माझा एक मित्र म्हणायचा.

>>तो जे काही करतो/करायचा त्याला संगीत म्हणतात ही माहिती माझ्याकरता नवी आहे!

तात्यांशी सहमत.
तात्या जाउ द्या. पूर्वी हिंदी चित्रपटसंगीतालाही शास्त्रीयवाले थिल्लरपणाच समजत.

खराटा
(रंग माझा वेगळा)

Nile's picture

26 Jun 2009 - 12:35 pm | Nile

M.J. च्या चाहत्यांनी अन त्याची माहीती नसणार्‍यांनीही हे वाचायला हरकत नाही.
http://www.telegraph.co.uk/culture/music/michael-jackson/5644319/Michael...

कोणी काहीही म्हणो, अनेक लोकांना आपल्यासंगीताने भुरळ पाडणारा M.J. त्यांच्या साठी महान होताच.

मला भावलेल्या moonwalker ला माझी आदरांजली!

चिरोटा's picture

26 Jun 2009 - 12:43 pm | चिरोटा

जॅकसन १३ वर्षापुर्वी आला होता.(http://www.shivudyogsena.org/origin.htm) शिव उद्द्योगसेनेने आयोजित केलेल्या त्याच्या कार्यक्रमासाठी.ईतर ठिकाणी होते तशीच प्रचंड गर्दी झाली होती त्या कार्यक्रमाला.
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न

पर्नल नेने मराठे's picture

27 Jun 2009 - 10:35 am | पर्नल नेने मराठे

होय, सोनाली बेन्द्रे ने त्याला ओवाळले होते, न मग बाळासाहेब त्याला भेट्ले होते. :D
चुचु

त्या आठवणीचे छायाचित्र... :-)

योगी९००'s picture

27 Jun 2009 - 9:57 pm | योगी९००

या फोटोत सुद्धा त्याची करंगळी वर आहे.

या फोटोनंतर बहुतेक त्याने बाळासाहेबांना करंगळी दाखवून त्यांचे बाथरूम वापरायची परवानगी मागितली असेल.

आधिक माहितीसाठी आजचा सामना अग्रलेख वाचा. http://www.saamana.com/

मायकेल जॅक्सनला भावपुर्ण आदरांजली.

खादाडमाऊ

विनायक प्रभू's picture

26 Jun 2009 - 12:47 pm | विनायक प्रभू

दोन महिन्याने ' गर्भ सल्ला आणि सेवा' वाल्यांची चलती झाली.

सहज's picture

26 Jun 2009 - 12:55 pm | सहज

गेली कित्येक वर्षे नवरात्रीनंतर होते म्हणतात तशी का हो?

--------------------------------
धार्मीक उत्सव कार्यक्रम एकीकडे....... मायकेल जॅक्सनचा कार्यक्रम दुसरीकडे...... चलती मात्र.... :-)

विनायक प्रभू's picture

26 Jun 2009 - 12:57 pm | विनायक प्रभू

तर

नाना बेरके's picture

26 Jun 2009 - 1:00 pm | नाना बेरके

मायकेल जॅकसन गेला
कां गेली ?. . . कां गेलं ?

"गर्दी खेचणारी माणसं थोर असतात " इति पांडुरंग सांगवीकर.
म्हणून मी ही म्हणतो " अरेरे ! थोर माणूस गेला".

बिपिन कार्यकर्ते's picture

26 Jun 2009 - 1:15 pm | बिपिन कार्यकर्ते

मायकेल जॅक्सन नावाच्या प्रकरणाशी ओळख झाली तेव्हा अगदी नुकताच कॉलेजमधे जायला लागलो असेन. मला वाटते, ते 'बीट इट' गाणे असावे. त्यावेळी आजच्यासारखी म्युझिकचॅनेल्स वगैरे नव्हती. आणि संगीत हे ऐकायचं असतं, त्यात बघण्यासारखं कसं काय असू शकेल असं वाटायचं (नाही म्हणजे भीमसेनजींची गातानाची अदाकारी प्रेक्षणिय असायची, किंवा त्यावेळी लोक परवीन सुलतानाची गाणी बघायला जायचे हे ही ऐकून माहिती होते.) पण एकदा मेट्रो चॅनेलवर (त्यावेळी हे दूर्दर्शनवर नुकतेच चालू झाले होते.) बीट इट बघितले. काही तरी चमत्कृतीपूर्ण वाटले. पण तेवढेच. गाणे आवडले पण अगदी खूप किंवा भयानक आवडले असे नव्हे. नंतर ब्लॅक ऑर व्हाईट, वी आर द वर्ल्ड वगैरे आलं. गाणी बरी आहेत असे वाटायचे. पण पाश्चात्य पॉप संगितात सूर, आवाज वगैरे श्राव्य गोष्टींपेक्षा नाच, चमत्कृती वगैरे दृष्य गोष्टींना जास्त महत्व आहे असे वाटायचे आणि अजूनही वाटते. माझा कल श्राव्याकडे जास्त असल्याने मला कधीही ते फारसे भुरळ घालू शकले नाही. पण तरीही त्यात एक वेगळीच जादू आहे आणि त्यामुळेच लोक ते आवडीने ऐकतात हे मान्य केलेच पाहिजे.

कलेची खरंतर व्याख्या कशी करणार? मग कोणती कला चांगली आणि कोणती वाईट हे ठरवणं तर पुढची गोष्ट. कला आणि तिच्यापासून मिळणार्‍या आनंदाची व्याख्या हे पूर्णपणे व्यक्तिसापेक्ष आहे. माझ्यामते कलेचा आस्वाद हा मुख्यतः हृदयाने घ्यायचा असतो. त्यामुळे प्रत्येकाचा काही उपजत ओढा असतो. माझा या कलाप्रकाराकडे नव्हता फारसा म्हणून नाही आवडले. पण त्यामुळे मला त्या कलाप्रकाराला कमी लेखणे बरोबर नाही वाटत. मला नाही कळत किंवा मला नाही भावत एवढे मात्र म्हणेन. पण त्याबरोबरच नवीन येणारी गाणी पूर्वग्रह न बाळगता ऐकायचा प्रयत्न करतो. आणि त्या मुळेच ब्रायन अ‍ॅडम्सचे 'एव्हरिथिंग आय डू' हे गाणे अतिशय परिणाम करून गेले आणि आजही हे गाणे ऐकणे ही माझ्या करता एक उच्च अनुभूती आहे. तसेच काही दिवसांपूर्वी धनंजय यांनी मोत्झार्टच्या रेक्वेमचे रसग्रहण इथे दिले होते. वास्तविक पाश्चात्य अभिजात संगीत फारसे ऐकले नाहीये पण जे काही ऐकले आहे त्यातले बरेचसे परिणामकारक ठरले आहे. पण धनंजयच्या रसग्रहणाबरोबर ते रेक्वेम ऐकले आणि खूपच परिणाम करून गेले.

एक ऐकलेला किस्सा. माझी एक मैत्रिण परदेशात शिकत असताना भीमसेनजींचे गाणे ऐकत होती तेव्हा तिच्या एका युरोपिय मित्राने 'हे काय बेकार ऐकते आहेस? हे काय संगीत आहे का?' असे (प्रामाणिकपणे) विचारले होते.

असो, बरेच विषयांतर झाले.

करोडो रसिकांवर गारूड करणारा एक कलावंत गेला. त्या कलाप्रकाराची ही मोठीच हानी आहे. किंग ऑफ पॉपला सलाम. त्याचे चाहते आणि टीकाकारही त्याला कधीही विसरणार नाहीत. "लव्ह हिम, हेट हिम बट यू कान्ट इग्नोर हिम"... कलाकाराला अजून काय पाहिजे असते हो?

बिपिन कार्यकर्ते

मनिष's picture

26 Jun 2009 - 1:40 pm | मनिष

मायकेल जॅक्सन नावाच्या प्रकरणाशी ओळख झाली तेव्हा अगदी नुकताच कॉलेजमधे जायला लागलो असेन. मला वाटते, ते 'बीट इट' गाणे असावे. त्यावेळी आजच्यासारखी म्युझिकचॅनेल्स वगैरे नव्हती. आणि संगीत हे ऐकायचं असतं, त्यात बघण्यासारखं कसं काय असू शकेल असं वाटायचं (नाही म्हणजे भीमसेनजींची गातानाची अदाकारी प्रेक्षणिय असायची, किंवा त्यावेळी लोक परवीन सुलतानाची गाणी बघायला जायचे हे ही ऐकून माहिती होते.) पण एकदा मेट्रो चॅनेलवर (त्यावेळी हे दूर्दर्शनवर नुकतेच चालू झाले होते.) बीट इट बघितले. काही तरी चमत्कृतीपूर्ण वाटले. पण तेवढेच. गाणे आवडले पण अगदी खूप किंवा भयानक आवडले असे नव्हे. नंतर ब्लॅक ऑर व्हाईट, वी आर द वर्ल्ड वगैरे आलं. गाणी बरी आहेत असे वाटायचे. पण पाश्चात्य पॉप संगितात सूर, आवाज वगैरे श्राव्य गोष्टींपेक्षा नाच, चमत्कृती वगैरे दृष्य गोष्टींना जास्त महत्व आहे असे वाटायचे आणि अजूनही वाटते. माझा कल श्राव्याकडे जास्त असल्याने मला कधीही ते फारसे भुरळ घालू शकले नाही. पण तरीही त्यात एक वेगळीच जादू आहे आणि त्यामुळेच लोक ते आवडीने ऐकतात हे मान्य केलेच पाहिजे.

कलेची खरंतर व्याख्या कशी करणार? मग कोणती कला चांगली आणि कोणती वाईट हे ठरवणं तर पुढची गोष्ट. कला आणि तिच्यापासून मिळणार्‍या आनंदाची व्याख्या हे पूर्णपणे व्यक्तिसापेक्ष आहे. माझ्यामते कलेचा आस्वाद हा मुख्यतः हृदयाने घ्यायचा असतो. त्यामुळे प्रत्येकाचा काही उपजत ओढा असतो. माझा या कलाप्रकाराकडे नव्हता फारसा म्हणून नाही आवडले. पण त्यामुळे मला त्या कलाप्रकाराला कमी लेखणे बरोबर नाही वाटत. मला नाही कळत किंवा मला नाही भावत एवढे मात्र म्हणेन. पण त्याबरोबरच नवीन येणारी गाणी पूर्वग्रह न बाळगता ऐकायचा प्रयत्न करतो. आणि त्या मुळेच ब्रायन अ‍ॅडम्सचे 'एव्हरिथिंग आय डू' हे गाणे अतिशय परिणाम करून गेले आणि आजही हे गाणे ऐकणे ही माझ्या करता एक उच्च अनुभूती आहे. तसेच काही दिवसांपूर्वी धनंजय यांनी मोत्झार्टच्या रेक्वेमचे रसग्रहण इथे दिले होते. वास्तविक पाश्चात्य अभिजात संगीत फारसे ऐकले नाहीये पण जे काही ऐकले आहे त्यातले बरेचसे परिणामकारक ठरले आहे. पण धनंजयच्या रसग्रहणाबरोबर ते रेक्वेम ऐकले आणि खूपच परिणाम करून गेले.

एक ऐकलेला किस्सा. माझी एक मैत्रिण परदेशात शिकत असताना भीमसेनजींचे गाणे ऐकत होती तेव्हा तिच्या एका युरोपिय मित्राने 'हे काय बेकार ऐकते आहेस? हे काय संगीत आहे का?' असे (प्रामाणिकपणे) विचारले होते.

बिकादादा....लाख मोलाची बात! बोल्ड केलेल्या ओळींमधल्या समजूतदारपणासाठी तुम्हाला सलाम! :)

यशोधरा's picture

26 Jun 2009 - 1:45 pm | यशोधरा

बिपिनदा, अगदी खरं आहे. तुम्हाला अनुमोदन.

नीधप's picture

26 Jun 2009 - 2:15 pm | नीधप

टिनेजर असताना पहिल्यांदा त्याचं थ्रिलर आणि बीट इट ऐकलं. काहीतरी वेगळंच ऐकलं एवढं कळलं होतं. आवडलं होतं पण मी कधी पिच्छा नाही पुरवला. मग कॉलेजच्या वयात 'ब्लॅक ऑर व्हाइट' ची ओळख झाली. तेही आवडलं होतं तरी मी अनेकांसारखी पंखी झाले नाही.
असं असलं तरी जी काय थोडीफार गाणी माहीती आहेत त्यासाठी त्याला सलाम ठोकल्याशिवाय रहावत नाही.
THE KING IS DEAD!
LONG LIVE THE KING!!
We will miss you!

तुमच्या वरच्या पोस्टमधल्या संमजसपणासाठी तुम्हालाही सलाम.
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

नंदन's picture

26 Jun 2009 - 2:19 pm | नंदन

मुद्देसूद आणि संतुलित प्रतिक्रिया. शेवटी 'जी जी उगवे चांदणी, तिच्यापरीने देखणी' हे खरं.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

दिपक's picture

26 Jun 2009 - 2:47 pm | दिपक

असेच म्हणतो.

Take it Higher--Larry Greene :)

llपुण्याचे पेशवेll's picture

26 Jun 2009 - 7:22 pm | llपुण्याचे पेशवेll

>>'जी जी उगवे चांदणी, तिच्यापरीने देखणी'
लाखमोलाची बात.. मायकल मला आवडणारा नव्हता आणि मी त्याची गाणी ऐकत ऐकत मोठा झालो नाही त्यामुळं त्याचे कौतुक मला नाही पण तरीही एका पिढीवर त्याने राज्य केले आहे हे मान्य केले पाहीजे. मायकलच्या आत्म्याला सद्गती लाभो.

पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984

मस्त कलंदर's picture

26 Jun 2009 - 6:55 pm | मस्त कलंदर

कलेची खरंतर व्याख्या कशी करणार? मग कोणती कला चांगली आणि कोणती वाईट हे ठरवणं तर पुढची गोष्ट. कला आणि तिच्यापासून मिळणार्‍या आनंदाची व्याख्या हे पूर्णपणे व्यक्तिसापेक्ष आहे. माझ्यामते कलेचा आस्वाद हा मुख्यतः हृदयाने घ्यायचा असतो.

अगदी संयत नि छान प्रतिसाद दिलात बिका!!!

मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

लव्ह हिम, हेट हिम बट यू कान्ट इग्नोर हिम
हेच म्हणतो....
- गणा मास्तर
भोकरवाडी (बुद्रुक)

दिपाली पाटिल's picture

26 Jun 2009 - 1:34 pm | दिपाली पाटिल

तुम्ही जे लिहिलंय अगदी तस्संच वाटतं मला...
"लव्ह हिम, हेट हिम बट यू कान्ट इग्नोर हिम" .. .हेच खरं .
त्याच्या बद्दल काहीही चांगली-वाईट मतं असली तरी त्याच्या पुढ्च्या सगळ्या कार्यक्रमांची सगळी टिकिटं "SOLD OUT" होते, हे ही तितकं च खरं.

दिपाली :)

Dhananjay Borgaonkar's picture

26 Jun 2009 - 1:41 pm | Dhananjay Borgaonkar

व्यक्तिगत तो कसा का असेना पण त्याने जगाला भुरळ घातली हे खर.

बाकी त्याचा आता वरती चित्रगुप्ता बरोबर हिशेब चालु असेलच...

सचीन जी's picture

26 Jun 2009 - 2:00 pm | सचीन जी

एकुणच मायकलच्या निमित्ताने पाश्चात्य संगीत आणि नृत्याच्या नावाने तोंडसुख घेण्याच्या हा प्रयत्न अत्यंत निंदनिय आहे.

सुनील's picture

26 Jun 2009 - 2:53 pm | सुनील

मायकल जॅक्सनला श्रद्धांजली.

बिकादांचा प्रतिसाद आवडला.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

नितिन थत्ते's picture

26 Jun 2009 - 4:45 pm | नितिन थत्ते

बिपिनचा प्रतिसाद उत्तम.

खराटा
(रंग माझा वेगळा)

नाना बेरके's picture

26 Jun 2009 - 6:33 pm | नाना बेरके

व्यक्तिगत तो कसा का असेना पण त्याने जगाला भुरळ घातली हे खर.

बाकी त्याचा आता वरती चित्रगुप्ता बरोबर हिशेब चालु असेलच...

खरंच, त्याचा आता वरती चित्रगुप्ता बरोबर कुठला हिशेब चालु असेल बरं ? :?

शुभान्कर's picture

26 Jun 2009 - 7:23 pm | शुभान्कर

मायकेल जॅक्सन गेला. वाईट झालं. कुठलीही व्यक्ति गेली की आनंद होण्याएवढा दगड अजुन तरी झालेलो नाही.

जॅक्सनच्या गाण्यांचा नाद १८/१९ व्या वर्षी मलाही लागला होता. पण एक दिवस प्रभा अत्रे यांचा मारु बिहाग आणि किशोरी ताईंचा भूप्/बागेश्री एकला आणि सगळच बदललं, ती आवड २० एक वर्षानंतरही तशीच आहे.

आजही george michael चे careless whisper मला आवडते. पण भारतीय अभिजात संगीताची मोहीनी आणि पात्रता ह्या सर्वांहून खूप मोठी आहे.वाईट ह्या गोष्टीचं वाटतं की अली अकबर खान गेल्याचं दु:ख आपल्या भारतीयांना झालेलं दिसलं नाही. george harrison (beatles) , yehudi menuhin ह्या सारख्यांना ह्यांचे महत्व कळ्ले, पण मूठ्भर भारतीय सन्गीत रसिक सोडून जास्त कोणालाही उस्तादजींची माहीती नाही.भारतीय media ने हीत्यांच्या जाण्याची अगदी छोटी बातमी दिली. मिसळपाव वर मी चालु केलेल्या दुव्यालाही मर्यादीत प्रतिसाद मिळाला, हे पाहुन दु:ख झाले.

micahel jackson आवडणं वाईट निश्चित नाही. पण भारतीय अभिजात संगीत सर्वोत्तम असं अख्ख जग मान्य करीत असताना, आपल्याच देशात त्त्याला किंमत मिळत नाही हे बघुन वाईट वाटते. असो.

मायकेल जॅक्सनला विनम्र आदरांजलि.

यशोधरा's picture

26 Jun 2009 - 7:33 pm | यशोधरा

शुभान्कर, उस्तादजी गेल्याचेही अतिशय दु:ख झालेच. केवळ धाग्याला प्रतिसाद मिळाले नाहीत म्हणजे दु:ख झाले नसावे, असे कसे काय म्हणता येईल?

रेवती's picture

26 Jun 2009 - 7:45 pm | रेवती

यशोधराशी सहमत.
कोणी व्यक्ती निवर्तल्याबद्दल जेवढं वाटायचं तेवढं वाईट जरूर वाटलं, उस्तादजींच्या वेळेस व मायकेलच्या वेळेसही.......पण मला कुठल्याच संगितातलं काहीही कळत नसल्यामुळे दोन्हीवर प्रतिसाद दिलेले नाहीत. बर्‍याच जणांनी प्रतिसादांमध्ये अमकं गाणं आवडलं, तमकी कलाकृती आवडली असं सांगितलय्.......मला दोन्ही वेळेस तसं काही शेअर करता येणार नाहीये/नव्हतं मग उगाच कुठंतरी वादाला कारणीभूत व्हायला नको म्हणून अश्या ठिकाणी प्रतिसाद देणं टाळलं. वर आलेले काही प्रतिसाद बघता जे केलं ते योग्यच असंही वाटलं.
ज्याची त्याची आवड असते.......आपल्या इंटरेस्टचे धागे आले की आपण जरूर प्रतिक्रिया देतच असतो.

रेवती

परिकथेतील राजकुमार's picture

26 Jun 2009 - 8:01 pm | परिकथेतील राजकुमार

micahel jackson आवडणं वाईट निश्चित नाही. पण भारतीय अभिजात संगीत सर्वोत्तम असं अख्ख जग मान्य करीत असताना, आपल्याच देशात त्त्याला किंमत मिळत नाही हे बघुन वाईट वाटते. असो.

अर्थच कळाला नाही ह्याचा. मायकल जॅक्सन शपथ !
आता तुम्ही जे अभिजात संगित म्हणता ते एखाद्याला नसेल आवडत, पण तो भारतीय आहे आणी ते जगाने गौरवले आहे म्हणुन त्यानी आवड नसताना ऐकत बसायचे का ?

उद्या प्रदिप कुमारचा अभिनय अभिजात आहे, असे जगात कोणी म्हणाले की तुम्ही जेंव्हा कधी बघाल तेंव्हा आयुष्यात फक्त त्याचाच सिनेमा बघाल का ? माणसाच्या आवडी निवडी भिन्न असतात. तुम्हाला एखादी गोष्ट आवडते आणी भले अगदी जगालाही आवडते म्हणुन आम्ही पण ती उगाचच आवडुन घ्यायची का ?

लोकांच्या आवडी निवडी फाट्यावर मारुन स्वतःची आवड जोपासणारा
º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

खरा डॉन's picture

26 Jun 2009 - 9:09 pm | खरा डॉन

लहान मुलांशी लैंगीक चाळे करणारी व्यक्ती गेली म्हणून मला काहीच फरक पडला नाही. ना आनंद ना दू:ख...!

पण त्या निमित्ताने त्यावर स्तुती सुमने उधळणार्‍यांची चाललेली धावपळ पाहून अंमळ मौज वाटली आणि कीवही आली...!

असो...

तात्याची प्रतिक्रिया मात्र आवडली. जे काही असेल ते रोख ठोक. साला पटो वा ना पटो पण खणखणीत मत. पाश्चात्य संगीतातले *ट समजत नसताना उगीचच चांदणी देखणी असले काहीतरी गुळमुळीत लिहून कुंपणावर बसण्यापेक्षा तात्याचा सडेतोड पवित्रा भावला!

खरा डॉन

मराठी_माणूस's picture

26 Jun 2009 - 10:52 pm | मराठी_माणूस

त्या निमित्ताने त्यावर स्तुती सुमने उधळणार्‍यांची चाललेली धावपळ पाहून अंमळ मौज वाटली आणि कीवही आली...!

बरोबर , कारण त्या लहान मुलात ह्या कौतुक करणार्‍यांचे कोणी निकटवर्तीय असते तर त्यांच्या प्रतीक्रिया अशाच असत्या का ?

लिखाळ's picture

26 Jun 2009 - 9:20 pm | लिखाळ

मायकेल जॅक्सन गेला का? बर बर ! बराच प्रसिद्ध होता.
स्वगत : कधी सवडिने त्याचे एखादे गाणे पाहायला हवे.

-- लिखाळ.
या प्रतिसादासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत !!! - लिखाळ जोशी :)

लोकरंजन करणारी प्रतिभा आणि खाजगी आयुष्याचे धिंडवडे, असे कित्येक वल्लींच्या बाबतीत झालेले आपल्याला दिसते.

नवटंकीवाले, तमासगीर वगैरे, कलाकारांच्या लैंगिक नैतिकतेबद्दल आपल्याला फार वाईट गोष्टी ऐकायला मिळतात. आणि कित्येकदा त्या कथांमध्ये तथ्यसुद्धा असते.

त्यामुळे मायकेल जॅकसनचा विषय निघताना कोणी त्याच्या कला-सादरीकरणाकडे अधिक लक्ष देईल, तर कोणाच्या मनात त्याच्यावरील लैंगिक आरोपांविषयी घृणायुक्त आठवण येईल. हे अपेक्षित आहे.

गाण्याबरोबर साग्रसंगीत बसवलेले (कोरिओग्राफी केलेले) नृत्य, निर्मितीच्या दृष्टीने झकपक चित्रीकरण, या सर्वांचा मिलाफ करून सादरीकरण करणारा असा मायकेल जॅकसन हा प्रथमच कलाकार होता. असे त्याच्याविषयीच्या रेडियोवरील मृत्युवृत्तांतामध्ये मी आज ऐकले. मायकेल जॅकसन याची गाणी मी फारशी ऐकलेली किंवा बघितलेली नाहीत. मागच्या वर्षीच "थ्रिलर" बघण्याचा योग आला. तेवढ्या झलकीवरून मला रेडियोवरील ही माहिती पटण्यासारखी वाटते.

बाकी कमरेवर आणि जांघेसमोर हात ठेवायची नृत्यमुद्रा मायकेल जॅकसनची वैशिष्ट्यपूर्ण असली, तरी अशा प्रकारच्या नृत्यमुद्रा कित्येक लोकनृत्याच्या शैलींमध्ये (त्यांच्या प्रादेशिक वैशिष्ट्यासह) दिसतात. काही लोकनृत्यशैलींमध्ये नर्तकी आपले थान डोळ्यात भरावेत अशा पद्धतीने हलवतात. अशा काही शैली भारतातसुद्धा दिसतात. उत्तान आणि लैंगिक हावभाव असलेली नृत्ये तेवढ्यासाठी म्हणून हेय नव्हेत, असे मला वाटते.

नृत्य आणि संगीत यांचा मिलाफ करणे यातून श्राव्य किंवा दृश्य कलास्वादाचे नुकसान होत नाही. नृत्त-गान-वाद्य मिळून नाट्य प्रस्तुत करण्याची पद्धत भरतमुनीच्या नाट्यशास्त्राच्या आधीपासून अभिजात आहे. यांच्यापैकी काही अभिजात नृत्य-गान-नाट्ये आपल्याला आजही प्रचलित दिसतात. लोककलांमध्येसुद्धा असा मिलाफ होतो. मायकेल जॅकसनने नृत्य-गान-कथा यांचे एकत्र सादरीकरण केले म्हणजे काही त्याने शुद्ध गाण्यात (किंवा शुद्ध नृत्यात) भेसळ मिळवली, असे म्हणणे इतिहासाच्या दृष्टीने ठीक नव्हे.

संयुक्त सादरीकरणाचा कलाप्रकार जुना आहे. त्यासाठी त्याचा निकष लावावा. (उत्तम संगीत नाटक बसवायचे तर त्यातील नट बैठकीच्या गायकाइतका तयारीचा नसेल. पण सगळे नट मिळून नक्कल आणि गाणे किती सफाईने मिसळतात, दिग्दर्शन आणि निर्मिती किती सफाईने होते, त्यातून प्रेक्षकाचा कलात्मक अनुभव जन्माला येतो.) तोच प्रकार संगीत-चित्रफितींच्याबाबतीत.

मायकेल जॅकसन या वादग्रस्त व्यक्तीने फार मोठ्या प्रमाणात लोकरंजन केले आणि कल्पक कलानिर्मिती केली. त्याच्या अचानक मृत्यूनंतर हे सर्व विचार मनात येत आहेत.

पक्या's picture

27 Jun 2009 - 8:49 am | पक्या

धनंजयजी , उत्तम प्रतिसाद. तात्या कुठे गेले आता?

>>मायकेल जॅकसन या वादग्रस्त व्यक्तीने फार मोठ्या प्रमाणात लोकरंजन केले आणि कल्पक कलानिर्मिती केली.
एकदम सही बोललात.

>>'बाकी कमरेवर आणि जांघेसमोर हात ठेवायची नृत्यमुद्रा मायकेल जॅकसनची वैशिष्ट्यपूर्ण असली, तरी अशा प्रकारच्या नृत्यमुद्रा कित्येक लोकनृत्याच्या शैलींमध्ये (त्यांच्या प्रादेशिक वैशिष्ट्यासह) दिसतात. काही लोकनृत्यशैलींमध्ये नर्तकी आपले थान डोळ्यात भरावेत अशा पद्धतीने हलवतात. अशा काही शैली भारतातसुद्धा दिसतात. उत्तान आणि लैंगिक हावभाव असलेली नृत्ये तेवढ्यासाठी म्हणून हेय नव्हेत, असे मला वाटते'.

मराठी सिनेमातील तमाशा किंवा लावणी नृत्यांमध्ये अशा नृत्यमुद्रा पाहिलेल्या आहेत. तमाशाच्या सुरवातीला पुर्ण चेहरा झाकेल एवढा डोक्यावर पदर घेवून पाठमोर्‍या अवस्थेत स्टेज वर येउन काष्ट्याच्या नऊवारी साडीत पिछाडी हलवत नाचायचे ... हे एखाद्याला अश्लिल वाटू शकते तर दुसर्‍याला त्यात कला दिसेल.

नुसत्या अमेरिकन जनतेलाच नाही तर जगभरच्या लोकांना नृत्य संगीताने भुरळ पाडणारा हा कलाकार नक्कीच साधारण नव्हता. त्याच्या डान्स चा थरार एकदा आवर्जून बघावाच.

बिकांचाही प्रतिसाद आवडला.

http://beta.esakal.com/2009/06/27001939/editorial--story-of-michael-ja.html

खालिद's picture

27 Jun 2009 - 3:19 am | खालिद

एका ओळीच्या धाग्याला चक्क ८० प्रतिक्रिया?

आहात कुठे? :)

अवांतरः - रेस्ट इन पीस माईक!!!

शाहरुख's picture

27 Jun 2009 - 3:19 am | शाहरुख

मला न येणारी कोणतीही गोष्ट करणारा माणूस माझ्यासाठी महान..

माझ्या गाण्यांची ध्वनीमुद्रिका ६५ दशलक्ष लोक विकत घेणार नाहीत..त्यामुळे मायकलला माझा सलाम !!!

वेलदोडा's picture

27 Jun 2009 - 7:45 am | वेलदोडा

मायकेल जॅक्सन च्या कलेला सलाम आणि त्याच्यातील कलाकाराला माझी आदरांजली.

>>एका ओळीच्या धाग्याला चक्क ८० प्रतिक्रिया?
माझी ८३ वी प्रतिक्रिया.
वर बिकांनी म्हटल्याप्रमाणे "लव्ह हिम, हेट हिम बट यू कान्ट इग्नोर हिम"... हेच यावरून दिसून येते. अगदी तात्यांनाही त्याला इग्नोर करता आले नाही.

सुचेल तसं's picture

27 Jun 2009 - 10:21 am | सुचेल तसं

http://beta.esakal.com/2009/06/26235619/editorial-michael-jackson.html

सकाळमधला हा लेख त्याची दुर्दैवी कहाणी सांगतो.

अफाट लोकप्रियता लाभलेल्या मायकेल जॅक्सन नावाच्या कलाकाराला श्रद्धांजली.

मायकेल वर जे काही आरोप केले आहेत ते अमेरिकन न्यायालयाने फेटाळले आहेत.त्यामुळे इथे त्याला त्याबद्दल दोषी धरणे चुकीचे आहे.बिकाची व धंनजयाची संतुलित प्रतिक्रिया खुप आवडली.
तो कसा नाचतो किंवा काय खाजवतो अशी टिका योग्य वाटत नाही.

"लव्ह हिम, हेट हिम बट यू कान्ट इग्नोर हिम"...
सत्यवचन
खर तर त्याच्या जवळ वावरणार्‍या लोकांनी त्याला नोटा छापण्याचे मशीन करुन टाकले होते.त्याच्यावर आरोप करुन मुलांच्या पालकाना अल्पावधीत खुप प्रसिध्दी व पैसा मिळत असे.त्यासाठी त्याच्यावर कित्येक खोटे आरोप केले गेले.तो खरच इतका वाईट असता तर लोकानी व लहान मुलांनी त्याच्यावर इतके प्रेम केले नसते.यावरुन परवा आलेल्या एका बातमीचा इथे उल्लेख करावा वाटतो.
भोपाळ चे जिल्हापरिषद मुख्याधिकारी असणार्‍या मराठी आए एस अधिकारी श्री पाटिल ह्याच्यावर त्याच्या सहकारी अधिकार्‍याने लैगिंक सतावणुकीचा आरोप केला आहे. हे पाटील पंढरपुरचे,गरीब शेतकरी कुंटूबातुन शिक्षण घेवुन आएएस झाले आहेत.त्यानी त्या सहकार्‍याचा शैक्षणीक पोषन आहार योजनेतील भ्रष्टाचार उघडकिस आणला म्हणुन त्याने ते आरोप केले आहेत. म्हणुन पाटील दोषी ठरतात का?
त्यामुळे जे काही घडले त्याबद्दल व्यवस्थित माहिती न घेता आरोप करणे चुकीचे आहे.
भारतिय कलाकाराशी तुलना करता त्याची लोकप्रियता सर्वा जगात खुपच जास्त आहे.आपल्या शास्त्रिय संगीतापेक्षा त्याचे संगीत जगात जास्त एकले वा बघितले जाते हे तुम्ही मान्य केलेच पाहिजे. म्हणुनच हा सामान्य लोकात प्रिय असणारा कलावंत महानच असला पाहिजे. त्याला विन्रम श्रध्दाजंली.
वेताळ

हुप्प्या's picture

30 Jun 2009 - 8:29 am | हुप्प्या

मायकेल जॅक्सन हा एक शापित प्रतिभावंत होता. म्युझिक व्हिडियो हा प्रकार त्याने निर्माण केला आणि प्रचंड यशस्वी केला. गाणी लिहिणे, म्हणणे, संगीत, नाच हे करताना तो अगदी उस्ताद असे. मन लावून, अगदी परफेक्ट होईपर्यंत पुन्हा पुन्हा घोटून घेणे वगैरे बाबतीत तो कधीच कमी पडला नाही. त्याला लहानपणापासून पाश्चात्य संगीताची खूप जाण होती. त्याच्या बापाने अती महत्त्वाकांक्षेपायी पाचही पोरांना हाताशी धरुन संगीताचे कार्यक्रम करणारी टीम बनवली. त्या सर्वांमधे मायकेलच सगळ्यात उजवा होता. परंतु हा बाप अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि खुनशी होता. त्याने सगळ्या भावंडांचा जबरदस्त छळ केला. शिस्तीच्या नावाखाली मारहाण, मुलांना घाबरवणे असले प्रकार रोजचे होते. पट्ट्याने फोडून काढणे वगैरे प्रकार त्याच्या बापाने एका मुलाखतीत जाहीरपणे मान्य केले आहेत. मायकेलचे बालपण शाळेत वा मित्रांबरोबर न जाता रेकॉर्डिंग स्टुडियोतच गेले. त्यामुळे मोठे झाल्यावर तो बालपण जगत होता. प्रचंड घर होते त्याच्या आवारात एक अम्युझमेंट पार्क बनवले होते. अर्थातच ह्या अत्याचारामुळे ह्या प्रतिभावान माणसाचे मानसिक संतुलन बिघडले होते. एका चुणचुणीत दिसणार्‍या काळ्या मुलाने आपला अवतार गेल्या २०-३० वर्षात इतका बीभत्स केला होता की त्याची टवाळी, चेष्टा रोजचीच होती. पुरुष का स्त्री, गोरा का काळा, नाक खरे का खोटे हे सांगता येणार नाही असा दिसत होता. त्यात लहानमुलांवर अत्याचार केल्याचे आरोप. सिद्ध झाले नसले तरी सगळे आरोप खोटेच होते असे छातीठोकपणे मी तरी म्हणणार नाही.
इतका यशस्वी, श्रीमंत, प्रतिभावंत कलावंत असा स्वतःला नष्ट करताना बघणे हे मला तरी अत्यंत क्लेषकारक वाटले. ५० हे काही मरण्याचे वय नाही.
पुन्हा असा कलावंत होणे नाही.