"माय"

विशाल कुलकर्णी's picture
विशाल कुलकर्णी in जे न देखे रवी...
3 Jun 2009 - 4:01 pm

कधीमधी उगाचच वाटत राहतं,
आपणही आभाळ व्हायला हवं होतं..
मायच्या फाटक्या नशीबावर,
फाटकं का होईना..
पांघरुण व्हायला हवं होतं.

पापणी होऊन अलगद,
तिच्या आसवांना झेलायला हवं होतं..
तिच्या आयुष्यातल्या अंधारावर,
चांदणी होवुन का होईना ..
भरपुर पाझरायला हवं होतं.

तिच्या सुरकुतलेल्या चेहर्‍यावर,
जाईच्या हातांनी गोंजारायला हवं होतं..
राहुन राहुन मन खंतावतंय,
एकदा का होईना तिच्या कुशीत शिरुन..
मनसोक्त रडायला हवं होतं.

विशाल.

कविता

प्रतिक्रिया

विनायक प्रभू's picture

3 Jun 2009 - 4:06 pm | विनायक प्रभू

कल्जि घेने

अवलिया's picture

3 Jun 2009 - 4:45 pm | अवलिया

विशाल..... !!!

--अवलिया

अनामिक's picture

3 Jun 2009 - 5:07 pm | अनामिक

केवढं हृदयस्पर्शी लिहिता तुम्ही. काय प्रतिक्रिया द्यावी? फक्तं एवढच म्हणतो की ज्यांच्यासाठी वेळ गेली नाहिये, त्यांनी नक्कीच शिकावे या कवितेतून.
सुंदर कविता!!

-अनामिक

बहुगुणी's picture

3 Jun 2009 - 5:33 pm | बहुगुणी

भिडली कविता ह्रदयाला. सुंदर!

दत्ता काळे's picture

3 Jun 2009 - 6:48 pm | दत्ता काळे

बहुगुणींशी सहमत.

पर्नल नेने मराठे's picture

3 Jun 2009 - 7:13 pm | पर्नल नेने मराठे

सुरेख्च!!!
चुचु

प्राजु's picture

3 Jun 2009 - 7:45 pm | प्राजु

शब्द नाहीत!!
:)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

मदनबाण's picture

3 Jun 2009 - 7:57 pm | मदनबाण

फारच सुंदर... :)

मदनबाण.....

I Was Born Intelligent,But Education Ruined Me.
Mark Twain.

क्रान्ति's picture

3 Jun 2009 - 11:21 pm | क्रान्ति

शब्द नाहीत खरच! कविता काळजाला भिडणे यालाच म्हणत असावेत!

क्रान्ति
ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम्
मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा
अग्निसखा