परब्रह्म

क्रान्ति's picture
क्रान्ति in जे न देखे रवी...
2 Jun 2009 - 8:07 pm

परब्रह्म विटेवरी | दोन्ही कर कटेवरी
वाट भक्ताची पाहतो | देव पुंडलिकादारी

संत जनाईच्या घरी | दळण कांडण करी
ओव्या गातो भक्तासंगे | भावाचा भुकेला हरी

देव एकनाथाघरी | कावडीने पाणी भरी
सांभाळितो चोखोबाची | गुरे सावळा मुरारी

तुक्याचे अभंग तारी | कान्होपात्रेला उद्धारी
निवृत्ति, सोपान, मुक्ता| ज्ञानियाचा हात धरी

दुमदुमली पंढरी | रिंगणात वारकरी
नित्यनेमाने चालते | आषाढी कार्तिकी वारी

संत मी ना वारकरी | आळविते तुला तरी
आस मुक्तीची घेऊन | आले देवा तुझ्या दारी

कविताप्रकटनसद्भावना

प्रतिक्रिया

अनामिक's picture

2 Jun 2009 - 8:25 pm | अनामिक

काय सुंदर छंद रचलाय तुम्ही...

संत मी ना वारकरी | आळवितो तुला तरी
आस मुक्तीची घेऊन | आलो देवा तुझ्या दारी

असेच म्हणावेसे वाटते.

-अनामिक

मदनबाण's picture

2 Jun 2009 - 8:28 pm | मदनबाण

व्वा.फारच सुंदर. ही कविता वाचुन हे गाणं आठवल मला...
http://www.youtube.com/watch?v=W3ZVmwquAdk

मदनबाण.....

I Was Born Intelligent,But Education Ruined Me.
Mark Twain.

नाना बेरके's picture

2 Jun 2009 - 8:33 pm | नाना बेरके

तुमी आमाला पंढरीला नेऊन आणलंत. छान. अभंगच जणू.

प्राजु's picture

2 Jun 2009 - 8:38 pm | प्राजु

सुरेख!! सुरेख!!!
अप्रतिम छंद!! :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

चन्द्रशेखर गोखले's picture

2 Jun 2009 - 11:23 pm | चन्द्रशेखर गोखले

भक्तिरसाने ओथंबलेले गीत !

ऋषिकेश's picture

3 Jun 2009 - 9:01 am | ऋषिकेश

सुंदर भक्तीमय कविता.. चालीत अगदी नीट म्हणता येतेय..

ऋषिकेश
------------------
बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे

मनीषा's picture

3 Jun 2009 - 9:29 am | मनीषा

सुरेख भक्तीरचना ..

जागु's picture

3 Jun 2009 - 1:09 pm | जागु

वा. प्रसन्न वाटल.

पाषाणभेद's picture

3 Jun 2009 - 1:22 pm | पाषाणभेद

मुल आणि कविता होईपर्यंत खाजगी असते आणि एकदा "झाल्यानंतर" ते सार्वजनीक होते.
- मराठी आणि बेळगाव, कारवार, अहवा, डांग, बर्‍हाणपूर, गोव्यासह संयुक्त महाराष्ट्र प्रेमी - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या ( -राजेंनी बहाल केलेले नाव)

मराठमोळा's picture

3 Jun 2009 - 1:36 pm | मराठमोळा

सुंदर रचना. चाल लावलीत का? :)

आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!

शाल्मली's picture

3 Jun 2009 - 2:46 pm | शाल्मली

सुंदर!
छान रचना आहे.

--शाल्मली.

अवलिया's picture

3 Jun 2009 - 4:51 pm | अवलिया

वा! अतिशय मस्त !!
:)

--अवलिया

राघव's picture

3 Jun 2009 - 11:43 pm | राघव

अतिशय सुंदर रचना!
हा अभंगच आहे.. खूप प्रसन्न वाटले वाचून.
असेच लिहीत रहा.

संत मी ना वारकरी | आळवितो तुला तरी
आस मुक्तीची घेऊन | आलो देवा तुझ्या दारी
... क्या बात है!

राघव

विसोबा खेचर's picture

9 Jun 2009 - 11:49 am | विसोबा खेचर

अतिशय प्रासादिक रचना...

(फ्यॅन) तात्या.