(काहीच्या) काही चारोळ्या

आपला अभिजित's picture
आपला अभिजित in जे न देखे रवी...
6 Feb 2008 - 4:30 pm

१. सोबत कुणी असेल,
तर सिनेमा पहायला अर्थ आहे
एकट्यानेच पाहायचा असेल,
तर अंधारही `व्यर्थ' आहे!

२. गावाबाहेर आडोशाला
एक पडका वाडा आहे
तिथेच भरलेला माझ्या
तारुण्यातल्या पापांचा घडा आहे

३. आपण भेटायचो ते झाड आत
माझ्यासारखंच ताडमाड वाढलंय
तिथेच माझ्या मुलानं
माडीचं दुकान काढलंय!

४. बायकोच्या पाचव्या बाळंतपणाला
मी तिच्याजवळ नव्हतो
कारण तेव्हा वाढत्या लोकसंख्येवर
मी भाषण झोडत होतो...

५. मी तुझ्याकडे यायला निघते
पण तुझ्यापर्यंत पोचत नाही
वाटेत २-४ मित्र भेटल्यावर
त्यांनाही सोडवत नाही.

६. बोन्साय केलेल्या झाडालाही
एकदा पालवी फुटली
त्यालाही कळेना,
ही `वाढायची' जिद्द कुठली?

७. भर दुपारी
बाहुली
बाहुल्यालाच
चावली

----------------

चारोळ्याविरंगुळा

प्रतिक्रिया

शरुबाबा's picture

6 Feb 2008 - 4:41 pm | शरुबाबा

वाह वाह बहोत खुब
शरद

धमाल मुलगा's picture

6 Feb 2008 - 4:52 pm | धमाल मुलगा

४. बायकोच्या पाचव्या बाळंतपणाला
मी तिच्याजवळ नव्हतो
कारण तेव्हा वाढत्या लोकसंख्येवर
मी भाषण झोडत होतो...

हा: हा: हा: एकदम "ढि॑च्याक" आहे हे!

६. बोन्साय केलेल्या झाडालाही
एकदा पालवी फुटली
त्यालाही कळेना,
ही `वाढायची' जिद्द कुठली?

वा !

७. भर दुपारी
बाहुली
बाहुल्यालाच
चावली

हे काय झेपल॑ नाय बॉ. सा॑गता का जsssरा इस्कटून ???

रम्या's picture

6 Feb 2008 - 5:10 pm | रम्या

"हा: हा: हा: एकदम "ढि॑च्याक" आहे हे!"

मला हे वाक्य आवडलं :) एकदम "रापचिक" आहे हे! :)

विसोबा खेचर's picture

6 Feb 2008 - 5:18 pm | विसोबा खेचर

२. गावाबाहेर आडोशाला
एक पडका वाडा आहे
तिथेच भरलेला माझ्या
तारुण्यातल्या पापांचा घडा आहे

७. भर दुपारी
बाहुली
बाहुल्यालाच
चावली

अभिजितकाका, या दोन चारोळ्या मस्त! अजूनही येऊ द्या.. :)

तात्या.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

6 Feb 2008 - 5:35 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अभिजीत,
अनुक्रमे सहाही चारोळ्या मस्त आहेत, सातवी समजेना राव !!!

स्वाती राजेश's picture

6 Feb 2008 - 5:59 pm | स्वाती राजेश

मजा आली चारोळ्या वाचून.
अशाच आणखी कधी?
लवकरच ....
वाट पाहात आहोत.

चंपक's picture

6 Feb 2008 - 7:24 pm | चंपक

आपल्या अभिजितच्या
मस्त सात चारोळ्या
सहा कळ्ल्या
सातवी कळेचिना,कळेचिना!

----------------- चंपक

प्राजु's picture

6 Feb 2008 - 8:08 pm | प्राजु

आवडल्या...
आणखी ही लिहा ना..

ऋषिकेश's picture

6 Feb 2008 - 9:24 pm | ऋषिकेश

मी माझा मधील चारोळ्यांचे विडंबन आवडले

-ऋषिकेश

आपला अभिजित's picture

7 Feb 2008 - 8:45 am | आपला अभिजित

आधीच्या चारोळ्या मी कॉलेजात असताना केलेल्या आहेत. सुमारे ९६-९७ साली.
सातवी काल टाइप करत असताना अचानक सुचली.

भर दुपारी
सावली
वडाखाली
धावली

ही चारोळी माहितेय ना?
त्याचंच हे विडंबन.
फार अर्थ-बिर्थ शोधत बसू नका.

-अभिजित.

आपला अभिजित's picture

7 Feb 2008 - 8:52 am | आपला अभिजित

८. ठाऊक असतं, तुझं येणं अशक्य आहे
तरी मन पॉइंटवर जाणं सोडत नाही
तुला शोधताना मग नजर
एकही `पाखरू' सोडत नाही..

९. मरताना वाटलं,
आयुष्य नुसतंच वाहून गेलं
करायचंय, करायचंय म्हणताना
लग्न करायचंच राहून गेलं....

१०. ज्या दिवशी तू माझा
अलगद हात धरलास
खरं सांग, त्या दिवशी
गालाला कोणता `पेन-बाम' चोळलास?

११. मी बुडताना गाव माझा
डोळे भरून पाहिला होता
`दिवाळी' साजरी करायला अख्खा गाव
किनार्‍यावर उभा राहिला होता....

१२. तू जळत असताना
मी तुझ्याभोवती ओंजळ धरली
तू जळालीस नि माझी ओंजळ
विम्याच्या पैशाने भरली...
----------------------