(नजरा!!)

घाटावरचे भट's picture
घाटावरचे भट in जे न देखे रवी...
29 Apr 2009 - 8:16 am

प्रेरणा - प्राजुतैंची नजरा ही कविता.
डिसक्लेमर - प्रस्तुत कवीची(?) अर्थातच तेवढी लायकी नसल्याने विडंबन करतेवेळी वृत्त / छंद यांच्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करण्यात आलेले आहे.

असतात ओळखीच्या ज्या ज्या समोर नजरा
महिना अखेर येता डसतात त्याच नजरा

रीती-रिवाज कसले, अन मित्रही कुठोनी
चुकवीत हिंडताना त्यांच्याच आज नजरा

बिनधास्त हिंडण्याचे नाहीत दिन गड्या रे
बुरखाच त्या कदाचित चुकवू शकेल नजरा

सध्या बरी घरातच वस्त्रे ती सर्व भारी
त्यांच्यात पाहिले तर धरतील आज नजरा

ती फाय फाय फाय गेली कधीच हातुन
हाती टिकू न देती साधी बिडीही नजरा

देणेकर्‍यांस साल्या टाळू तरी कसा मी
जिकडे पहाल तिकडे असतात त्याच नजरा

बाजार तर कधीचा मजसाठी बंद झाला
आता उधार नाही म्हणतात आज नजरा

नाजूक मंद खुळखुळ हातात चिल्लरांची
ऐकून हासती मज त्या रोजच्याच नजरा

स्वत:स वाचवाया किती कष्ट वेचतो मी
'तंगडीच तोडतो रे' म्हणती कितीक नजरा

होऊन सर्व काही निर्लज्ज रे कसा तू?
भटू सांग मज जरासे म्हणती मलाच नजरा...

- भटोबा

कविताविडंबनविरंगुळा

प्रतिक्रिया

विनायक प्रभू's picture

29 Apr 2009 - 8:29 am | विनायक प्रभू

आला लेख,
आली कविता की लगेच कंस मामा हजर.
रंगा सेठ क्लासेस जोरात.

टारझन's picture

29 Apr 2009 - 9:04 am | टारझन

ओये भटेश ... हे काय लेका ... एकदम सुटेश ?
=)) भारी यार :)
थोडं हिणकस बणवता आलं असतं ... पण असो :)

चन्द्रशेखर गोखले's picture

29 Apr 2009 - 9:29 am | चन्द्रशेखर गोखले

विडंबन छान ! परंतू विडंबना मुळे , मूळ कवितेत गंभिर पणे मांडलेले विचार वाचक विसरुन जातो.. त्यामुळे काही चांगल्या
कवितांचे विडंबन होउ नये असे वाटते.. असो हा माझा वैयक्तिक विचार आहे .. राग नसावा..!!

श्रावण मोडक's picture

29 Apr 2009 - 10:04 am | श्रावण मोडक

विडंबन...!!! :)

अमोल केळकर's picture

29 Apr 2009 - 11:04 am | अमोल केळकर

नजरफेक जबरा !
--------------------------------------------------
छोट्या दोस्तांसाठी गंमत गाणी इथे वाचा

बेसनलाडू's picture

29 Apr 2009 - 11:39 am | बेसनलाडू

स्वत:स वाचवाया किती कष्ट वेचतो मी
'तंगडीच तोडतो रे' म्हणती कितीक नजरा

भारी!
(नजरबंद)बेसनलाडू

अवलिया's picture

29 Apr 2009 - 11:45 am | अवलिया

वा! मस्त !!
आवडले !!

--अवलिया

नंदन's picture

29 Apr 2009 - 11:59 am | नंदन
llपुण्याचे पेशवेll's picture

29 Apr 2009 - 3:04 pm | llपुण्याचे पेशवेll

विडंबन? छान कविता. भटाने घेतलेला उधारीचा आधार परिणामकारक ठरतो. या उधारीचा संबंध थोडा एखाद्या शेतकर्‍याच्या कर्जाशी किंवा तत्सम सामाजिक प्रश्नाशी जोडला असता तर खरोखर ही देखील मूळ कवितेसारखी परिणामकारक सामाजिक कविता ठरली असती.
असो कविता छान, आवडली.

(सामाजिक)
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984

कपिल काळे's picture

29 Apr 2009 - 5:59 pm | कपिल काळे

आवडले विडंबन.

इंजि ला असताना काही मित्र जे महिन्याच्या सुरुवातीस ओल्ड मंक आणि गोल्ड्फ्लेक (पॉकेट्मनीत हेच परवडायचं)प्यायचे ते महिनाअखेरिस देशी आणि तीस छाप बीडी वर यायचे.ती आठवण झाली.

आनंदयात्री's picture

29 Apr 2009 - 6:05 pm | आनंदयात्री

मस्त रे भटो .. परिस्थितीचे अगदी ज्वाज्वल्य चित्रण झाले आहे.
बाय द वे तु इथे कवी नाहीस तर विडंबक आहे .. हे असेच !!

>>डिसक्लेमर - प्रस्तुत कवीची(?) अर्थातच तेवढी लायकी नसल्याने विडंबन करतेवेळी वृत्त / छंद यांच्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करण्यात आलेले आहे.

बरे झाले प्राजुताई कवयत्रि आहे .. नायतर डिस्क्लेमर महागात पडला असता :D

ऋषिकेश's picture

29 Apr 2009 - 9:58 pm | ऋषिकेश

हा हा हा.. विडंबन लै भारी!

ऋषिकेश

लिखाळ's picture

29 Apr 2009 - 10:29 pm | लिखाळ

मस्त :) मजेदार.. आवडले !
-- लिखाळ.

चतुरंग's picture

29 Apr 2009 - 10:41 pm | चतुरंग

नजरबंदी आवडली! ;)

चतुरंग

पिवळा डांबिस's picture

30 Apr 2009 - 4:36 am | पिवळा डांबिस

कविता मस्त आहे, कवितेचा विषयही वेगळा आहे..
जियो...

सध्या बरी घरातच वस्त्रे ती सर्व भारी
त्यांच्यात पाहिले तर धरतील आज नजरा
आणि
असतात ओळखीच्या ज्या ज्या समोर नजरा
महिना अखेर येता डसतात त्याच नजरा
हे विशेष आवडलं....
वा, वा!! टकीला अजून बोलते आहे!!!! ;)