फिक्शन - मी त्याला चावलं

टारझन's picture
टारझन in जनातलं, मनातलं
26 Apr 2009 - 12:35 pm

सन ३१०२ :
मेचा कडक थंडीचा हिवाळा ,सगळी कडे बापे लोक .. आप्पाराव सोपानराव वाघमारे हॉस्पिटलचा परिसर, णर्सोबांची (मेल णर्स) धावपळ !! मॅटर्निटी वॉर्डचा परिसर .... मजला नंबर ४१०, रूम १२:

--------------------------------------------------------------------------------------------------------
ऍकिलोप्टस आपल्या पाचव्या डिलेव्हरीसाठी आला होता , अजुन एका डिलेव्हरी नंतर त्याची ओव्हर संपणार होती .
३ वर्षांपुर्वीच ऍकिलोप्टस आणि काळूराम ह्यांचा विवाह झाला होता... आनंदात दिवस जात होते आणि ऍकिलोप्टसची एकेक डिलेव्हरी होत होती .. सगळी सरळसोट गोरी पोरं ? (विज्ञानाने फारच प्रगती केली होती, शेकडो वर्षांपुर्वी एक्स क्रोमोझोम लुप्त झाल्यामुळे स्त्री जाती लुप्त झाल्या होत्या. आता गोरे पुरूष हे स्त्रीयांचं काम करू लागले, काळे पुरूष मात्र तसेच राहिले) ऍकिलोप्टस ची सासू जॉर्डन आणि बाबा हैबतराव हतबल झाले होते. गोरं पोरगं म्हणजे जिवाला घोर .. समाजाच्या काळ्या नजरा त्याच्यावर पडणार .. आता तर काजळ वगैरे लाऊनही फायदा नव्हता !! लावल्यास उलट जास्तंच नजर लागण्याचा धोका असायचा !! जॉर्डन आणि हैबत राव दुर्गादेवाकडे काळ्या मुलासाठी नवस बोलून आले होते .

------------------------------------------------------------------------------------------------------

दवाखान्यातले दाई, इतर रुग्ण आणि त्यांचे नातलग या सा-यांना नवल वाटत होतं, की या कारणासाठी सुद्धा कुणाला इतका आनंद होऊ शकतो! त्याच्या सासर-माहेरची सगळी मंडळी मात्र अगदी आनंदात होती. कारणही तसंच होतं, त्याला पहिलंवहिलं माणिकरत्न (काळं पोरगं) झालं होतं. त्याच्या सासरी माहेरी दोन्हीकडे गोर्‍या मुलांच प्रमाण जास्त होतं, काळं कलुटं हे एकटीच! त्यामुळेच अवघ्या दोन दिवसांचं ते इवलंसं गोंडस काळं काळं पिलू खूप कौतुकाचं होतं. त्याच्यासाठी काय करू आणि काय नको अशी चढाओढ सुरू होती सगळ्यांची! ऍकिलोप्टसलाही अगदी जग जिंकल्याचा आनंद झाला होता. पण ऍकिलोप्टस तसा अर्धा कॉमा मधेच गेला होता. त्याला सारखी स्वप्न पडायची. मधेच दचकून उठायचा. मिपावरील प्रसिद्ध "स्निग्धहस्त" लेखकांचे स्त्रीपर लेख वाचून त्याला तसलीच स्वप्न पडायची. त्या काळी स्त्रीयांवर होणारे अमाणूष अत्याचार , पुरूष समाजाने स्त्रीयांचा वारंवार केलेला (नजरेनेच हो) बलात्कार , त्यावरील लेख व कविता वाचून ऍकिलोप्टस कमालीचा उद्विग्न होत असे. असंच काहीसं हल्ली आपल्या बरोबर होतं नै ? ह्या विसाराने तो झोपेतल्या झोपेतच बेषूद्ध पडत असे. तरी बरं दिवसभर सासरेबुआ हैबतराव आणि रात्री आई जॅक्स दोघे चिमुरड्याची काळजी घेत, त्यामुळे त्याला निवांत आराम मिळत असे. तसा तो कोळसा चिमुरडा नुसतीच काळा आणि गोंडस नाही, तर हरा (ह्यात 'स' चा 'ग' करण्याची खुप इच्छा झालेली .. पण "स,ग"ळ्यांच्या आठवणीने लोकांच्या डोळ्यात पाणी येऊ नये आणि ते हिणकस होऊ नये म्हणून हात आवरता घेतला आहे, नोंद असावी) पण होतं. रडणं तर खूप कमी! कमी काय ? पोरगं पैदा झाल्याच्या तासाभरात रॉकेट सायंस शिकून मोकळं झालं होतं .. त्याला ऍकिलोप्टसच्या शेजारचा पामटॉप मिळाला होता , पटकन काळ्याने इंटरनेटवर सर्फिंग करायला सुरूवात केली !! रॉकेट सायंस , मिसाईल टेक्नोलॉजी वगैरे बालभारती शिकून झाल्यावर पोरगं झोपी गेलं , डॉ. मरेलियर त्याच्या साठी गृहपाठ मेल करत होते. असो .

--------------------------------------------------------------------------------------------------------

जेवण करून लौकरच तो झोपी गेला. आई पण चिमुरड्याला थोडा वेळ खेळवून झाल्यावर कुशीत घेऊन झोपला.
"डॉक्ट्..................र................" एक भयानक किंकाळी त्या दवाखान्याच्या भिंती चिरत गेली. भिंती अगदी बटरामधे चाकू फिरवावा तशा चिरल्या गेल्या ... त्यात काही टॉयलेट्स च्या पण भिंती चिरल्या गेल्याने लोकांना नको ते दर्शन झालं .. पण हॉस्पिटलातच टाके टाकायची सोय असल्याने चिरलेल्या भिंती पटकन शिवण्यात आल्या. मग कुठे पटापट सगळीकडचे दिवे लागले, सगळे खडबडून जागे झाले. पहाट फुटायला थोडाच वेळ होता. धावत पळत डॉक्टर आल्या. काय होतंय, काय चाललंय कुणालाच कळत नव्हतं. तो पण जागा झाला. आई कानोसा घेऊन बाहेर गेला. थोड्या वेळानं आई परत आला. त्यानं आईला विचारलं, "काय झालं रे आई? कोण किंचाळत होतं?" " काही नाही रे , रोजचंच काहीतरी चालू रहातं दवाखाना म्हटल्यावर! तू झोप निवांत की उठून बसतेस थोडा वेळ?" आईनं विचारलं, पण काहीतरी टाळलं हे तिच्या लक्षात आलं.
सगळं आवरून दुपारी आई घरी गेला आणि सासूबाई येऊन थांबले. त्यांचं जेवण झालं (आहो म्हणजे कॅप्सूल प्राशण हो) .. चिमुरडा अजुनही मस्त झोपला होता. सासूबाईंच्या बारशाच्या तयारीबद्दल गप्पा सुरू होत्या. नाव काय ठेवायचं, कुणी काय नावं सुचवली, काय काय आणायचं, याची इत्थंभूत माहिती त्या उत्साहानं देत होत्या, पण त्याचं लक्षच नव्हतं. वरवर तर तो हो ल हो करत होता, पण त्याच्या डोक्यातून ती किंकाळी अजून गेलीच नव्हती. "झोप आता जरा वेळ. ओल्या बाळंतिणीनं जास्त वेळ नाही बसू." सासूबाई बोलले. त्यानं पडत्या फळाची आज्ञा प्रमाण मानली. त्याला झोपलेली पाहून ते बाहेर गेले.
लादी पुसायला आलेला आबा स्वतःशीच बडबडत होता काही. त्यानं विचारलं, "कोण किंचाळत होतं रे पहाटे? काय झालं?"
"का बोलावं माय आता! कोन मेला मसन्या वानाचा काळा राकूस होता काय ठावं? तीन वर्साचं गोरं लेकरू बी ज्याला कमी पडलं!" बरंच काही बडबडत त्यानं लादी पुसली आणि बडबडतच ती निघूनही गेली. तो सुन्न! काय घडलं असेल, याचा थोडासा अंदाज तिला येत होता!
"डॉक्ट्..................र................"पुन्हा एक भयानक किंकाळी ! किचांळी इतका भयानक पाठलाग करत एकेकाच्या कानाचे पडते कापून आली .. बरेच लोकं काहि तासांसाठी बहिरे देखिल झाले. खूप आरडाओरडा, रडारड, गोंधळ. जणू काही दादर स्टेशनावर लोकल पकडायची घाई... काही समजत नव्हतं. खोलीत तो एकटाच. पिलू झोपलेलं. त्यानं खिडकीतून खाली पाहिलं, शववाहिकेत कुणीतरी डोकं बडवत, रडत ओरडत बसलेली, कदाचित त्या गोर्‍या मुलाची आई, हतबल आणि मूक झालेले त्याचे बाबा असावेत! स्ट्रेचरवरून पांढ-या चादरीखाली झाकलेलं कलेवर! मागे मागे जाणारे सुन्न नातेवाईक असतील कदाचित.
त्याला आठवलं तिचं आयुष्य. बालपणापासून आजतागायत आलेले सगळे विचित्र अनुभव भोवती पिंगा घालून नाचायला लागले भुताच्या सावल्यांसारखे.'वेताळा"सारखे, खविस-कवट्यांसारखे. ह्यांनी "डान्स इंडिया डान्स " मधे एक से एक बकवास डांन्स करून इंडियाच्या णाकात दम आणला होता. नकळत झाल्यासारखे वाटणारे सहेतुक घाणेरडे स्पर्श, कामूक नजरा, विचित्रशी अनाकलनीय भाषेतली वक्तव्ये, शिकवणीच्या काळे सरांनी काहीतरी केलं म्हणून आत्महत्या करणारा जोविन ! गोरं पोरगं असण्याचा शाप? नात्यांमध्येही वासनांची वारंवार येणारी प्रत्यंतरं, लग्नानंतर देखिल आपल्या मनाचा विचार न करता हवं तसं हवं तेव्हा हक्कानं लुबाडणारा नवरा! एक व्यक्ती म्हणून विचारात न घेतलं जाता केवळ एक गोरा म्हणून झालेली गणना!
"डॉक्ट्..................र................"ही किंकाळी होती त्याच्या सासूबाईंची आणि नुकत्याच घरून आलेल्या आईची! धावत धावत डॉक्टर आले, सगळा दवाखाना आता त्याच्या खोलीपुढे जमा झाला. एक क्षण काहीही न सुचलेल्या डॉक्टरनी त्याच्या मांडीवरची कपबशी उचलली. दोन दिवसांचं गोंडस पिलू निपचित पडलं होतं आपल्या जन्मदात्याच्या मांडीवर! तो शून्यात पहात गोठलेल्या नजरेनं! त्याला गदागदा हलवलं डॉक्टरांनी, तरी तो उठला नाही.. मग एक म्हशीचं इंजेक्शन खुपसलं तरी तो उठायला तयार नाही .. अरे बापरे !! हा कसला कोमा? पुर्णविरामात गेला की काय हा ? डॉक्टरने घेतला हातोडा आणि घातला त्याच्या डोक्याय .. अचानक झोपेतून जागं झाल्यासारखा तो बाळाकडे पहात निस्तेज आवाजात बोलला, "डॉक्टर, मी चावलं त्याला!" आणि तो कोसळली! आणि असा कोसळला .. जणू काही माळसेज घाटातली दरड !! ऍकिलोप्टस ला विचारा विचारांमधे आपलं पोरगं काय गुण उधळणार हे पाळण्यातच त्याचे पाय पाहिल्यावर दिसलं होतं ... गोरी मुलं वाचणार होती !!

विडंबनप्रकटन

प्रतिक्रिया

दशानन's picture

26 Apr 2009 - 12:46 pm | दशानन

=))

भयानक !!

जबरदस्त....

=))

थोडेसं नवीन !

विनायक प्रभू's picture

26 Apr 2009 - 12:55 pm | विनायक प्रभू

टारझना भयंकर आहेस तु.
पण तुझा संताप माझ्या लक्षात आला आहे.

जेन's picture

26 Apr 2009 - 12:56 pm | जेन

नेहमी प्रमाणे छानच लिहीतो त्यात काही नवल आही.....
पण खूप इंट्रेसटींग होता...
शेवटची गोष्ट फार करूण होती...
खूप आवड्ला,....

क्रान्ति's picture

26 Apr 2009 - 1:23 pm | क्रान्ति

जोरदार फिक्शन!
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
www.mauntujhe.blogspot.com

अवलिया's picture

26 Apr 2009 - 1:26 pm | अवलिया

भयानक रे !!

--अवलिया

प्रमोद देव's picture

26 Apr 2009 - 1:40 pm | प्रमोद देव

बकवास आहे.
टारूशेठ तुमच्याकडून इतक्या भिक्कार बॅटिंगची अपेक्षा नव्हती.

आम्ही कोणत्याही कंपूत नाही. कारण आमचा स्वतःचाच एक कंपू आहे. ;)

टारझन's picture

26 Apr 2009 - 1:55 pm | टारझन

चालायचंच सर ! .. तेंडुलकर पन कधी तरी शुन्यावर आउट होतोच की :)
आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार .. परफॉर्मन्स प्रेशर वाढला !! आणि शब्द ही आवडले ..

धन्यवाद काका

दशानन's picture

26 Apr 2009 - 4:17 pm | दशानन

छान !
मोकळेपणाने वरील खडूस प्रतिसाद घेतलास हे पाहून आनंद झाला ;)

* सगळेच सिध्दहस्त कसे काय होऊ शकतील बॉ ? सगळेच सिध्द हस्त झाले तर मग प्रतिसाद कोण लिहणार =))

थोडेसं नवीन !

काळा डॉन's picture

26 Apr 2009 - 6:55 pm | काळा डॉन

सगळेच सिध्दहस्त कसे काय होऊ शकतील बॉ ? सगळेच सिध्द हस्त झाले तर मग प्रतिसाद कोण लिहणार

सहमत!

अवांतर: राजेंचे नाव नव्हते वाटतं सिद्धहस्त लेखकात... हम्म्म!! ;)

टारझन's picture

26 Apr 2009 - 6:58 pm | टारझन

काय डॉणराव !! ९०% लोकं होती ना त्यात .. आता उरलेल्या १०% मधे तुम्ही , मी, राजेंसारखे लोक राहिले असतील "चुकून" त्यात हायलाईट करण्यासारखं काय ?

दशानन's picture

26 Apr 2009 - 7:00 pm | दशानन

दहावीपास कधी सिध्दहस्त होऊ शकतो का बॉस =))

पण माझ्यामुळे तुम्हाला ह्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म करवे लागले हे पाहून दुखः झाले :)

थोडेसं नवीन !

काळा डॉन's picture

26 Apr 2009 - 7:08 pm | काळा डॉन

अहो तसं काही नाही राजे! बहिणाबाई किती शाळा शिकल्या होत्या?

भ्यायलोय मी हे सगळे वाचुन.......डॉक्ट...................................................र
खविस,हडळ,मुंजा,गोस्ट,डेव्हिल,वेताळ

सिन्दरेला's picture

26 Apr 2009 - 9:21 pm | सिन्दरेला

शेकडो वर्षांपुर्वी एक्स क्रोमोझोम लुप्त झाल्यामुळे स्त्री जाती लुप्त झाल्या होत्या.

एक्स क्रोमोझोम हे स्त्री आनि पुरुष मध्ये असतात.
स्त्री मध्ये XX आनि पुरुषामध्ये XY असतात. जर एक्स क्रोमोझोम लुप्त झाले तर पुरुष पन लूप्त होतिल

टारझन's picture

26 Apr 2009 - 9:28 pm | टारझन

सिंदरेला जी .. विज्ञानाने प्रगती केली आहे !! काहीही होऊ शकतं .. सायंसची पुस्तकं आम्ही बी फाडलीत राव :)
YY क्रोमोझोम निघलेत हो भविश्यात .. समजुन घ्या .. .फिक्शन आहे

परिकथेतील राजकुमार's picture

27 Apr 2009 - 10:47 am | परिकथेतील राजकुमार

टार्फिक्शन आवडले ;)
टारोबा तुला लेका कृद्धहस्त लेखक अशी पदवी देणार आहे मी.

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

ऋचा's picture

27 Apr 2009 - 12:15 pm | ऋचा

लै भारी रे!!!!!!!!!

=)) =)) =))
"No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"

टारझन's picture

27 Apr 2009 - 8:11 pm | टारझन

सर्वांचे (वाचकांचे आणि प्रतिसाद्यांचे) मनापासून आभार!!

ऍडीजोशी's picture

27 Apr 2009 - 11:20 pm | ऍडीजोशी (not verified)

आयला साल्या टार्‍या, तू म्हणजे शॉट्ट्ट आहेस डोक्याला ~X( ~X( :O :O :)

लिखाळ's picture

27 Apr 2009 - 11:39 pm | लिखाळ

टार्‍या लै भारी रे ! तुला काय सुचेल सांगता येत नाही.. :)
-- लिखाळ.

विजुभाऊ's picture

4 May 2009 - 2:50 pm | विजुभाऊ

टारु या लिखाणाला हसरा प्रतिसाद

आज तेरी नजरों से नजरे मिलाने की इजाजत चाहता हुं
जीनेसे पहले मरने की इजाजत चाहत हुं.
ये मुमकीन नही के खामोंश चला जाऊं
तुम्हे अल्फाजों मे बसाने की इजाजत चाहता हुं........विजुभाऊ सातारवी