सारेगमप - महाराष्ट्राचा आवाज

शुभान्कर's picture
शुभान्कर in जनातलं, मनातलं
7 Apr 2009 - 6:38 pm

पुन्हा एकदा सारेगमप सुरु झाले आहे.
So called प्रोफेशनल गायक गात आहेत.

मला व्यक्तिशः कुणाचेच गाणे सफाईदार वाटत नाही.
खूप चांगल्या हौशी गायकांसारखे किंवा थोडे अधिक बरे/वाईट. तुम्हाला काय वाटते?

संगीतविचार

प्रतिक्रिया

चकली's picture

7 Apr 2009 - 6:41 pm | चकली

मलाही फार आवडला नाही. फक्त मध्ये नध्ये मंगेशकरांनी सांगितलेली माहिती आवडते. ते पण कधी कधी.

चकली
http://chakali.blogspot.com

भडकमकर मास्तर's picture

7 Apr 2009 - 6:44 pm | भडकमकर मास्तर

आत्ताशी सुर्वात जली हाये.
.....
उदेशचे पहिले गाने गेल्या आथव्द्यात ऐकले आनि पल्लवीने खुप कौतुक केले , तेव्हाच कल्ले की यांना थोदा अवधी द्यायला हवा...
आधीच का इतके कौतुक?
कंताला आला...

_____________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

बिपिन कार्यकर्ते's picture

7 Apr 2009 - 6:53 pm | बिपिन कार्यकर्ते

मि मास्त्रांसि सह्म्त अहे.

बिपिन कार्यकर्ते

रेवती's picture

7 Apr 2009 - 6:48 pm | रेवती

परिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे हे पर्व संपेपर्यंत खूप सुधारणा होईल असे वाटते आहे.
नवख्या मुलांपेक्षा थोडी अधिक माहिती असल्यामुले सुचना अमलात आणायला वेळ कमी लागेल अशी अपेक्षा करायला हरकत नाही.
संजीवनी भेलांडेने मात्र पहिल्या अठवड्यात निराशा केली. बघुया पुढे काय होतेय.

रेवती

टिउ's picture

7 Apr 2009 - 7:14 pm | टिउ

यावेळचे सगळे स्पर्धक 'आम्ही म्हणजे लई भारी' कॅटॅगरीतले वाटतात. अजुनपर्यन्त एकाचंही गाणं ऐकुन व्यावसायिक गायक/गायिका गातायेत असं वाटलं नाही. त्यातल्या त्यात अजित परब जरा बरा वाटला.

पण या सर्वांपेक्षा 'लिटिल चँप्स' कित्येक पटीने चांगले होते/आहेत असं वाटतं...

भाग्यश्री's picture

7 Apr 2009 - 10:33 pm | भाग्यश्री

सहमत !!
भेलांडे बाई पहील्या एलिमिनेट व्हाव्यात अशी देवाचरणी प्रार्थना!

चकली's picture

7 Apr 2009 - 11:05 pm | चकली
मराठी_माणूस's picture

8 Apr 2009 - 7:52 am | मराठी_माणूस

सहमत. काल त्यांच्या गाण्यात , गाणे कमी आणि हातवारे जास्त होते

उदय सप्रे's picture

8 Apr 2009 - 11:25 am | उदय सप्रे

भाग्यश्री ताई ,

तुमच्या मताशी एकदम सहमत आहे ! त्यांना बघून "संध्या" ची आठवन होते - इतके चित्रविचित्र चेहेरे करतात गाताना , ४ आने की मुर्गी और १२ आने का मसाला असे वाटते !

लिहून घ्या , यावेळी शेवटी :उदेश उमप जिंकणार ! काही ठरावीक कॅटेगरीतील लोकच जिंकून देण्याची पध्दत गेले ४ पर्व सुरू आहे : आधी अभिजीत कोसम्बी , मग ज्ञानेश्वर मेश्राम , मग कार्तिकी गायकवाड्.....काय चाललंय काय्?.....असो.

काल पुष्कर लेले यांचे गाणे खरोखरच अप्रतीम होते , काय वाटते तुम्हाला?

पंकज's picture

8 Apr 2009 - 12:46 pm | पंकज

काही ठरावीक कॅटेगरीतील लोकच जिंकून देण्याची पध्दत गेले ४ पर्व सुरू आहे : आधी अभिजीत कोसम्बी , मग ज्ञानेश्वर मेश्राम , मग कार्तिकी गायकवाड्.....काय चाललंय काय्?

त्रिवार सहमत.

घाशीराम कोतवाल १.२'s picture

8 Apr 2009 - 1:39 pm | घाशीराम कोतवाल १.२

मग ज्ञानेश्वर मेश्राम
तुमच्या माहिती करिता ज्ञानेश्वर मेश्राम पहिल्या पर्वात दुसर एलिमिनेशन होत त्याच उदय सप्रे साहेब
दुसर्या पर्वात वैशाली भैसने माड्ये जिंकली होति
**************************************************************
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??

मैत्र's picture

9 Apr 2009 - 10:02 am | मैत्र

ज्ञानेश्वर मेश्राम कधीच जिंकला नाही.
वैशाली भैसने माडेचा आवाज आणि तयारी ही आत्तापर्यंतच्या सर्व स्पर्धकांपेक्षा अतिशय चांगली आहे. तिला मिळालेले गुण आणि परीक्षकांचे अभिप्राय हा जबरदस्त होते
तिने पुढे जाऊन हिंदी सा रे ग म अगदी सहजपणे जिंकलं आहे. जर नशिब चांगलं असेल तर येत्या काही वर्षात शंकर महादेवन, अजय-अतुल किंवा इतर काही चांगल्या संगीतकारांकडून तिला नक्कीच संधी मिळेल. कार्तिकीच्या वेळी काही चर्चा नंतर झाली पण ती मुख्यतः झी ने निकालाचे तपशीलवार गुण देण्याचे टाळले म्हणून आणि प्रथमेश वा आर्याशी तुलना म्हणून. तो चोथा झालेला विषय आहे. पण तिचे गाणे उत्तमच होते आणि कितीही नाही म्हटले तरी पहिल्या दोन तीन चे तर नक्कीच होते.

पुष्कर लेले यांची पहिली तीन गाणी इतकी साधारण दर्जाची होती की बाहेर पडण्याची पहिली संधी मिळावी म्हणून प्रयत्न चालू आहेत की काय असे वाटले. त्यामुळे कालचे गाणे खूप चांगले वाटले. मूळ गाण्याशी तुलना करता ते उणेच होते पण कुमारांचे अवघड गाणे चांगले गायले असे म्हणता येईल.

उदेश उमप जिंकणार नाही अशी मला खात्री वाटते. तो जरी चांगला गात असला तरी हृषिकेश, अमृता, विभावरी, परब हे चांगले गातात आणि शेवटी यांच्यामध्ये चुरस होईल.

पण एकूणात लिट्ल चँप्स ची तयारी पाहता हे कसलेले गायक साधारण वाटले. मोठ्या स्पर्धा जिंकून आठ दहा वर्ष गाणं चालू आहे असं कोणाच्याही परफॉर्मन्स मधून वाटलं नाही.

फक्त संजीवनी च्या बाबतीत एकदम सहमत आहे. डोळे मिटून काय हातवारे करते, कसले तरी विचित्र चेहरे करते आणि ते गाण्यात आणि सुरात तर कुठेच दिसत नाही. त्यामुळे काल पुष्करने एक गाणे चांगले गायल्याबरोबर बाहेर पडण्याच्या स्पर्धेत तिने पुष्करला मागे टाकले.

विजुभाऊ's picture

11 May 2009 - 3:30 pm | विजुभाऊ

पण या सर्वांपेक्षा 'लिटिल चँप्स' कित्येक पटीने चांगले होते/आहेत असं वाटतं... १००००% सहमत

मराठी_माणूस's picture

11 May 2009 - 4:35 pm | मराठी_माणूस

दोन्हि वयोगट वेगवेगळे आहेत. दोघानी दिलेला आनंद वेगळा आहे, त्यांची तुलना होउ शकट नाही.

हरकाम्या's picture

7 Apr 2009 - 10:16 pm | हरकाम्या

मी अजुन एकही कार्यक्रम बघितलेला नाही......... हा .. हा ..हा

मिसळभोक्ता's picture

7 Apr 2009 - 10:20 pm | मिसळभोक्ता

पुष्कर जबरा गायला. (त्याच्यासारखा श्यामकल्याण गाऊन दाखवा म्हणावं वाडकरला, हगवण होईल.)

-- मिसळभोक्ता

मराठी_माणूस's picture

8 Apr 2009 - 7:53 am | मराठी_माणूस

तुम्ही गायलात तर काय होईल

जरा तारतम्य बाळगा , मोठ्या कलाकारा बद्दल लीहताना

निळु's picture

8 Apr 2009 - 9:06 pm | निळु

श्रीयुत मिसळभोक्ते यांचे दु:ख मी समजु शकतो.
श्रीमंत पुष्कर लेले जरा लालबुंदच झाले होते सुरेश वाडकरांनी त्यांच्या गाण्यातील त्रुटी सांगितल्यावर .केवळ भिकबाळी,पगडी,शेले पांघरुन पुण्याचे महागायक होता येते,संपुर्ण महाराष्ट्राचे नव्हे. मला उमजलेले वसंतराव /कुमार गंधर्व इ. करण्या अगोदर स्वतःला समजा. सुरेश वाडकर असे 'शामकल्याण' पचवुनच (हगवण न होता) आज मान्यवरांच्या खुर्चीत बसु शकले आहेत .

विसोबा खेचर's picture

8 Apr 2009 - 11:41 pm | विसोबा खेचर

सुरेश वाडकर असे 'शामकल्याण' पचवुनच (हगवण न होता) आज मान्यवरांच्या खुर्चीत बसु शकले आहेत .

असे म्हणता? फारच छान!

वाडकरांच्या एखाद्या शामकल्याणच्या अथवा यमनकल्याणच्या अथवा पुरियाकल्याणच्या ध्वनिमुद्रणाचा दुवा दिलात तरे बरे होईल..

आपला,
(वाडकरप्रेमी) तात्या.

मिसळभोक्ता's picture

12 Apr 2009 - 12:26 pm | मिसळभोक्ता

वाडकरांच्या एखाद्या शामकल्याणच्या अथवा यमनकल्याणच्या अथवा पुरियाकल्याणच्या ध्वनिमुद्रणाचा दुवा दिलात तरे बरे होईल..

अगदी बरोबर बोललात, तात्या !

वाडकरांच्या एकातरी बड्या खयालाची ध्वनीमुद्रिका दाखवा. त्यांची मिळत नसेल (मिळणार नाहीच) तर निदान हृदयनाथ मंगेशकरांची आणा.

वसंतरावांची आणि कुमारांची गाणी आजच्या घटकेला राहुल देशपांडे आणि पुष्कर लेले यांच्याइतकी चांगली कुणीही म्हणत नाही, हे सत्य आहे. अर्थात पुष्करचे शिक्षण विजय कोपरकर आणि विजय सरदेशमुख ह्यांच्या कडे झाल्यामुळे हे अर्थातच साहजिक आहे.

-- मिसळभोक्ता

अविनाशकुलकर्णी's picture

7 Apr 2009 - 10:57 pm | अविनाशकुलकर्णी

हा कार्यक्रम खुप साधारण आहे,..तो ह्रुदय नाथां मुळे सुसह्य होतो...मला ते इतके दिल खुलास व मार्मीक विनोदी असतिल असे नव्हते वाटले....
पल्लवि जोशी नुसति एकसुरी रटाळ बोलण्यात पटाईत आहे, ति थोड्याश्या वाकड्या नाकाच्या नाकपुड्या फुगवुन उगिच कसे वाटते?? माझे आवडते गाणे आहे...एकदा जोरदार टाळ्या होवुन जाउ द्या... वगैरे अगा‌उ पणे बोलते..तिला रजा द्यावि ...व त्या एवजी रामदास आठवले यांनि एकसुरात संचालन केले तरी चालेल..पण ह्या जोशी काकु नको..तिला लोकसभेत पाठवा...

रेवती's picture

7 Apr 2009 - 11:13 pm | रेवती

सहमत.
पल्लवी जोशीचं बोलणं कंटाळवाणं असतं.
तेच तेच प्रश्न विचारते सारखे.
गाणं झाल्यावर, आता कसं वाट्टय, माझं आवडतं......खूप खूप धन्यू, वगैरे.
स्पर्धकांना त्यांचे जुने अनुभव विचारतानाही खुबीने माहीती काढून घेणे नसते.
तीला काढून टाकले पाहीजे.
रेवती

विसोबा खेचर's picture

8 Apr 2009 - 11:43 pm | विसोबा खेचर

तीला काढून टाकले पाहीजे.

हेच म्हणीन!

तात्या.

सँडी's picture

9 Apr 2009 - 6:07 am | सँडी

तीला काढून टाकले पाहीजे.

अगदी! टिपिकल सर्दी आवाज आहे तिचा. त्यात तेच तेच रटाळ बोलणं.

-सँडी
एखादी गोष्ट विसरायला पण तिची आठवण ठेवावी लागते.

भाग्यश्री's picture

8 Apr 2009 - 12:52 am | भाग्यश्री

आता फार बोर झालीय ती.. बोलणं खरंच कंटाळवाणं झालंय..ड्रेसिंग सेन्सही इतका भयंकर वाईट होत चाललाय तिचा(तिच्या डिझाईनरचा!)
मागचं पर्व इतकं फेमस झालं त्याचा फायदा झी उठवून घेतंय.. पण तेच तेच पाहणं/ऐकणं..:( आता या पर्वानंतर १५-२०(का ३०) वर्षांच्या मुलांमधेही आहे एक पर्व.. म्हणजे किती ओव्हरडोस!

हृदयनाथ मंगेशकर बरेच पटाईत आहेत जोक्स/टोमणा मारण्यात / खिल्ली उडवण्यात! इथे लॉस एंजिलीसला प्रोग्रॅम झाला होता तेव्हा त्यांच्या गाण्यांपेक्षाही जास्त मजा त्यांच्या बोलण्याने आली होती... भरपूर हसवलं होतं! :)

आनंदयात्री's picture

8 Apr 2009 - 10:01 am | आनंदयात्री

>>सेन्सही इतका भयंकर वाईट होत चाललाय तिचा(तिच्या डिझाईनरचा!)

कालची साडी तशी बरी होती :D

-
आंद्या बोळे

तसे गायकांतले अन गायकीतले आम्हाला इतकेच कळते की एखाद्या आफ्रिकन माणसाला मराठी घरातला मुरांबा हा पदार्थ केवळ त्याच्या अफ्रिकन स्टाईलच्या नावामुळे जवळचा वाटावा :D

-
आंद्या बादरायण

विसोबा खेचर's picture

8 Apr 2009 - 6:46 am | विसोबा खेचर

मुलं तशी गुणी आहेत. सर्वांना शुभेच्छा!

तात्या.

मि माझी's picture

8 Apr 2009 - 7:38 am | मि माझी

स्पधेत उतरायच म्हणजे टेन्शन येणारच.. त्यातच आतापर्यंत कमावलेल नाव टिकवायच हे वेगळ टेन्शन.. गातील हळू हळू चांगल... सर्वांना शुभेच्छा!

जयवी's picture

8 Apr 2009 - 10:58 am | जयवी

कार्यक्रम मी पण बघतेय...... अजून मैफलीला रंग चढला नाहीये.

पण एक प्रश्न मला प्रचंड छळतोय.....तो म्हणजे..... कुठल्या बेसीस वर त्यांनी ह्या गायकांची निवड केली ? असे कितीतरी आणखी गुणी प्रोफेशनल गायक आहेत. मग हेच फक्त दहा निवडण्यामागे काय कारण असावं ?

उदय सप्रे's picture

8 Apr 2009 - 11:29 am | उदय सप्रे

साहेब,

असे प्रश्न नसतात हो विचारायचे ! जे जे होईल ते ते पहावे !

एकापेक्षा एक मधे नाही का , आधीच फेमस असलेले लोक घेवुन त्यांचीच स्तुती ....नवीन लोकान्ना चान्स देणेच महत्वाचे.....

परिकथेतील राजकुमार's picture

8 Apr 2009 - 12:56 pm | परिकथेतील राजकुमार

लोक सारेगमप का बघतात ? :?

©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी
एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

ढ's picture

8 Apr 2009 - 1:26 pm |

त्यांच्या घरी झी मराठी दिसते म्हणून!!!

घाशीराम कोतवाल १.२'s picture

8 Apr 2009 - 1:41 pm | घाशीराम कोतवाल १.२

=)) त्यांच्या घरी झी मराठी दिसते म्हणून!!!
=)) =))

**************************************************************
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??

अहो पण दिसल म्हनुण काही पण बघाव का....

जागु's picture

8 Apr 2009 - 2:58 pm | जागु

मलाही खास वाटत नाही.
लिटीलचँम्प ला जी गोडी होती ती ह्याला नाही.

मोहन's picture

8 Apr 2009 - 3:37 pm | मोहन

कोणत्याही निकषावर महाराष्ट्राचा आवाज वाटत नाही.
जमेची बाजू फक्त मान्यवर परिक्षक. आतापर्यंतच्य्या सगळ्यांपेक्षा भारी आहेत.
पल्लवीला रीटायर करुन प्रेक्षकाना यातनामुक्त करावे.
मोहन

अविनाशकुलकर्णी's picture

8 Apr 2009 - 9:17 pm | अविनाशकुलकर्णी

लिटीलचँम्प ला जी गोडी होती ती ह्याला नाही. [रिझल्ट एकला ना] सारी गोडी गेली..आता त्यांना एकवत नाहि..पैसे देवुन
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))

निळु's picture

8 Apr 2009 - 9:31 pm | निळु

शेवट महाराष्ट्राचा आजचा आवाज झी मराठीने निवडलेला (लादलेला) नसावा म्हणजे मिळवली

मला वाट्टे भाव गीतात - रानडे आणि बेला , क्लासिकल मधे - सावनी शेंडे, कुमार मुर्दुर (आता परत कानडी-मराठी वाद नकोत), राम देशपांडे.

मदनबाण's picture

9 Apr 2009 - 3:55 am | मदनबाण

त्या लहान मुलांपुढे (लिटीलचँम्प) यांचा आवाज एकदम फिका वाटला !!! /:)
मी तर आता बघत सुद्धा नाही...

मदनबाण.....

I Was Born Intelligent,But Education Ruined Me.
Mark Twain.

केदार_जपान's picture

9 Apr 2009 - 5:52 am | केदार_जपान

यांची गाणी ऐकल्यावर एक तर नक्की की, लिटिल चॅम्प्स चे कौतुक होत होते..ते काही अगदीच अनाठायी नव्हते...
आणि त्यात भरीस्-भर म्हणुन सर्व लोकानी लिट्ल चॅंम्प्स नी म्हणलेली गाणीच दोन्-तीन भागात सादर केली..त्यावरुन समजुन गेले.
की महाराष्ट्राने ज्यांचे भरभरुन कौतुक केले, ते खरोखर योग्य असेच होते..

बर्‍याच वेळेला वैशाली आणि अवधूत जेव्हा वरचा नी वगैरे द्यायचे तेव्हा अती वाटायचे त्यावेळी..पण आता मात्र बरोबर वाटते त्यांचे..

-केदार

सँडी's picture

9 Apr 2009 - 6:11 am | सँडी

सारेगमप ऐवजी आम्ही तर फक्त वैशालीलाच पहायचो बुवा.

-सँडी
एखादी गोष्ट विसरायला पण तिची आठवण ठेवावी लागते.

आनंदयात्री's picture

9 Apr 2009 - 9:40 am | आनंदयात्री

सहमत आहे !!

अनुप कोहळे's picture

11 Apr 2009 - 10:50 pm | अनुप कोहळे

सहमत!...पण, अवधूत सुद्धा कोपरखळ्या मारण्यात पटाईत होता.....

शुभान्कर's picture

5 May 2009 - 7:16 pm | शुभान्कर

आज लतादीदी सारेगमप मध्ये येणार आहेत. सर्व गायकांसाठी एक पर्वणी आणि आपल्याकडील सर्वोत्तम सादर करण्याची एक आगळी संधी आहे.

परिकथेतील राजकुमार's picture

5 May 2009 - 7:18 pm | परिकथेतील राजकुमार

देव लतादिदींचे रक्षण करो !
आमेन !!!!!!!!

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

काजुकतली's picture

5 May 2009 - 8:34 pm | काजुकतली

देवच आहे.... :) :)

मी हा कार्यक्रम फक्त हृदयनाथांसाठी पाहते.

पिवळा डांबिस's picture

6 May 2009 - 9:36 am | पिवळा डांबिस

मला फक्त त्या गायक-गायिकांतील विभावरी आपटे-जोशी हीच काय ती काही अव्वल वाटते....
बाकी सगळे सो-सो च (गणेशोत्सवातले गायक) वाटतात....

अ-मोल's picture

6 May 2009 - 5:53 pm | अ-मोल

लेले श्रेष्ठ की वाडकर-मंगेशकर कनिष्ठ या मुददयाबाबत गुददयावर येताना आपण एक गोष्ट ध्यानात घेवू या,
सारेगमप स्पर्धा ही सुगम संगीतासाठी आहे, त्यामुळे गाणारृयाचे परिक्षण त्याच निकषांवर केले जाते.
सुगम संगीतात सुरेश वाडकर व हदयनाथ मंगेशकर (स्पेलिंग चुकल्याबददल क्षमस्व) यांचे योगदान वादातीत आहे, त्यामुळे त्यांनी किती राग पचविले हा मुददा येथे गैरलागू वाटतो. :)

पुष्कर नि:संशय शास्त्रीय गायनात अव्वल आहे, याचा अर्थ सुगम गायनातही तो तसाच असावा असे नाही. प्रत्येक गायनप्रकाराचे काही निकष असतात, त्यात तो डावा पडला, तर एवढे हातघाईला येवू नये असे वाटते. :)
बाकी, लिटील चॅम्पसची सर यातल्या एकाही गायकाला नाही, हे मात्र खरे!

विशाल कुलकर्णी's picture

6 May 2009 - 6:15 pm | विशाल कुलकर्णी

<<पुष्कर जबरा गायला. (त्याच्यासारखा श्यामकल्याण गाऊन दाखवा म्हणावं वाडकरला, **वण होईल.)>>

पहीले तीन शब्द ठिक, कंसातलं नाही पटलं. अ-मोलशी सहमत.
आणि पुढे जावुन मिसळभोक्ते म्हणतात की नाहीतर हृदयनाथांची तरी ध्वनीफित आणुन दाखवा. वाईट वाटलं, एकाला चांगला म्हणताना दुसर्‍याला नावे ठेवावीच लागतात का? तेसुद्धा सुरेश वाडकर आणि पंडीत हृदयनाथ मंगेशकरांच्यासारख्या संगिताला वाहुन घेतलेल्या दिग्गजांबद्दल बोलताना?

जाहीर निषेध !!

सस्नेह
विशाल
*************************************************************
इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु....
कल्पनेतला "ताजमहाल" हिणकस ठरला !!! :-) :-)

शुभान्कर's picture

6 May 2009 - 7:31 pm | शुभान्कर

बहुतेक लोकांचा असा समज असतो, की अभिजात सन्गीत म्हणजे फक्त मुरक्या आणि जोरदार ताना घेणे. आणि जास्तीत जास्त राग येतात हे दर्शवणं. प्ररन्तु प्रथम सूर तर साधला पाहिजे ना? खरं गाणं आलापीत आहे.स्वर संवाद समजला पाहिजे.म्हणजे भाव आपोआप उमटेल.

पहिला षड्जच असा सुन्दर लागला पाहिजे, की गाण्यात भाव आणण्यासाठी वेगळ्या कुठल्याही गोष्टीची गरज राहू नये.कार्यक्रमातील कुठल्याही गायकाचा सूर पक्का नाही. मग तो श्याम कल्याण असो,नाहीतर बडबड गीत.

फक्त वसन्तराव, भीमसेन, कुमार, लता, आशा ह्यांची गाणी गाऊन मोठं कसं होता येईल? त्यासाठी डोळस रियाज पाहिजे. पंडितांची गाणी गायली म्हणजे ग्रेट असं नव्हे. ते पंडित का झाले ह्याचा विचार केला पाहिजे.

इथे मला किशोरीताईंच्या भूपातील ह्या बन्दिशीची आठवण होते.

प्रथम सुर साधे
जब होवत ग्यान
तब अलंकार कर दिखये ।

शड राग् छत्तीस रागिणी
तीन ग्राम बाईस श्रुती
कर दिखाये ॥

निळु's picture

6 May 2009 - 11:15 pm | निळु

१००% सहमत आहे.