ताज्या दमाचे गायक!

चतुरंग's picture
चतुरंग in जनातलं, मनातलं
31 Jan 2008 - 11:08 pm

यू-ट्यूबवर मध्यंतरी राहुल देशपांडेचे "बगळ्यांची माळ फुले" ऐकायला मिळाले. फारच सुंदर वाटले. पं.वसंतराव देशपांड्यांचा (भाईकाकांच्या भाषेत "वसंत खाँ!") हा नातू.
डोळे मिटून ऐकले तर वसंतरावांच्या आवाजातली झार राहुलच्या आवाजातही सहीसही कळते! देवाचे देणे - आपण फक्त ऐकणे!!

चतुरंग

कलासंगीतआस्वाद

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

31 Jan 2008 - 11:36 pm | विसोबा खेचर

रंगराव,

राहूल हा खरंच एक गुणी गायक आहे. मला त्याचे गायन अतिशय आवडते.

साधारणपणे वर्ष-दीड वर्षांपूर्वी मी राहूलवर एक लेख लिहिला होता. तो मनोगतावर प्रसिद्ध झाला होता. आता हा लेख आपल्याला इथे वाचता येईल..

राहूललादेखील हा लेख खूप आवडला होता.

असो, राहूलकडून मला खूप खूप अपे़क्षा आहेत. मी साधारणपणे वर्षदीड वर्षापूर्वी राहूलचे गाणे ऐकून हा लेख लिहिला होता. त्यानंतर परवाच दूरदर्शनवर ई मराठीवर राहूलचे गाणे ऐकण्याचा योग आला. आणि मला सांगायला अत्यंत आनंद वाटतो की राहूलचे गाणे दिवसेंदिवस अधिक समृद्ध होत आहे, चतुरस्र होत आहे. एक श्रोता म्हणून माझे हे मत मी या निमित्ताने येथे नोंदवत आहे.

माझ्या मते एखाद्याचे गाणे किंवा त्याची गायकी आणि त्यातला मजकूर (कंटेन्ट) यात काळानुरूप अशीच प्रगती दिसली पाहिजे, तरच ती व्यक्ति एक उत्तम गवई होऊ शकते आणि खूप काळ लोकांना अधिकाधिक उत्तम व दर्जेदार गाणे ऐकवू शकते. साध्या भाषेत सांगायचे तर परिपक्व गायक होण्यासाठी याच गोष्टीची नितांत आवश्यकता असते.

राहूलमध्ये मला ही प्रगती दिसते आहे आणि म्हणूनच मला त्याच्याकडून खूप अपेक्षा आहेत. असामान्य प्रतिभा असलेल्या त्याच्या आजोबांचा आशीर्वाद तर त्याला आहेच परंतु त्याचसोबत आमच्यासारख्या रसिक श्रोत्यांच्या शुभेच्छाही त्याच्या पाठीशी आहेत!

मिसळपाव परिवारातर्फे मी राहूलचे अभिष्टचिंतन करतो आणि त्याला त्याच्या गान-कारर्किर्दीकरता अनेकोत्तम शुभेच्छा देतो...

अवांतर - बरं का रंगराव, मिसळपाववरील सदर चर्चेचा दुवा मी राहूलला विरोपाने कळवत आहे! :)

आपला,
(गाण्यातला) तात्या.

प्राजु's picture

1 Feb 2008 - 12:54 am | प्राजु

इप्रसारणवर मध्यंतरी त्याची मुलाखत झाली होति. मी अगदि नीट ऐकली. खूप गुणी गायक आहे तो.
भरपूर यश त्याला मिळो हिच प्रार्थना.

- प्राजु