शारदा बाई (भाग १)

जागु's picture
जागु in जनातलं, मनातलं
4 Apr 2009 - 12:57 pm

आदल्याच दिवशी मावशीने माझ्या सासूबाईंच्या सांगण्या नुसार आपल्या मुलाचे नाव विवाह मंडळात घालायचे म्हणून शारदा बाईंना फोन केला होता. तेंव्हा मुलाची सगळी माहीती मिळवुन तिने उद्या पैसे घेऊन नाव नोंदवायला या, माझ्या कडे १५-२० मुली आहेत ह्याला साजेश्या आणि १-२ उद्या दाखवते, संध्याकाळी ५ वाजता घरी या म्हणून फोन ठेवला होता.

ठक.. ठक.. आम्ही दारावरची कडी वाजवली. "कोण आलय आता तडमडायला ?" आतुन आवाज आला .
"आहो बाई आम्हाला तुम्ही फोन करुन बोलावल होतत मुलगी बघायला, आम्ही आलो आहोत" मावशी म्हणाली.

आतून दार अर्धवट उघणून एक सावळी, मध्यम शरीराची, चष्मा घातलेली, बाई डोकावत होती.

"एवढेजण कशाला आलात ? दोघींनीच आत या. मुलगी आत बसली आहे. घाबरून जाईल ती. बाकीच्यांनी खाली जाऊन थांबा."

मावशी खुप रिक्वेस्ट करत होती, "अहो बाई ह्यांना ही बघायची आहे मुलगी. माझ्यापेक्षा जास्त ह्यांना चांगल निरखता येईल तिला आणि ह्या माझ्या अगदी भरवश्याच्या आहेत. ही माझी मुलगी, आणि ह्या दोन माझ्या सुना म्हणजे बहिणीच्या सुना". ह्यांना आजकालच्या मुलींना पारखता येईल माझ्यापेक्षा.

मावशीची रिक्वेस्ट तिने मानली आणि म्हणाली, थांबा जरा ५ मिनिटे बाहेर उभे राहा. घरात ६ पाहूणे आहेत, त्यांचा आधी निकाल लावते, मग तुम्हाला घेते आत" आणि त्या बाईने परत दरवाजा बंद केला. आम्ही काय बाई आहे ही? ह्या अर्थाने एकमेकांकडे बघुन कुजबूज करू लागलो.

थोड्याच वेळात त्या बाईने दार उघडले आणि आम्हाला आत बोलावले. आणि हॉल मध्ये न बसवता थेट तिच्या बेडरुम मध्ये घेउन गेली. हॉल मध्ये एक जिन्स, टिशर्ट घातलेली मुलगी आणि एक म्हातारे गृहस्थ होते. दोघेही घरातल्यांच कपड्यात होते. म्हणजे ते पाहूणे नक्कीच नसणार. ही तिचि मुलगी आणि नवरा असल्याचे आम्ही मनात पटवून घेतले. आम्ही संभ्रमात पडलो, दारातून तर कोणीच बाहेर नाही गेल मग पाहूणे गेले कुठे ? बेडरूम मध्ये पण कोणीच नव्हते. किचन हॉलमधून बेडरुम मध्ये जाताना दिसले त्यात पण कोणीच नव्हते. गच्चीचा दरवाजा बंद होता. आतून कडीही लावलेली होती. खि़डकीतून गच्चीचा कठडाच दिसत होता. त्यामुळे ती गच्ची आहे हे ओळखता येत होत. ह्यांच्या ब्लॉक मध्ये भुयारी मार्ग वगैरे आहे की काय अस उगाचच माझ्या मनात शंका येऊ लागली. कारन ती बाई थोड्या वेळा पुर्वी म्हणाली होती की मुलगी आत बसली आहे. ती पण गायब होती.

बेडरुम मध्ये गेल्यावर त्या बाईने आम्हाला बसायला सांगितले आणि पाणी आणुन दिले आणि सरळ म्हणाली. पाणी घ्या. चहा, सरबत मागितलत तरी मिळणार नाही कारण ते मला रोज एवढ्या माणसांना द्यायला परवडत नाही.

तेवढ्यात तिच्या घरातला फोन वाजला. " काकू -काकू काय करतेस कारटे ? जरा धिर धर मी फोन करेन तुला १० मिनटांनी आणि तिने फोन धाडकन ठेवला.

हा, बोला आता, " ह्या कुठे राहतात ? " तिने मावशीला विचारले. मावशीने सांगितले आमच्याच शेजारी राहतात. "तुमच्या नवर्‍यांची नाव काय आणि काय काम करतात ? जावेने तिचा नवरा इंजिनियर असुन पोर्ट मध्ये आहे सांगितले आणि मी माझ्या नवर्‍याचे नाव त्याच्या प्रोफेशन सकट सांगितल्यावर ती अगदी स्मित करत म्हणाली अग बाई, त्या वकिलाची बायको का तू ? मला कधी पासुन तुला बघायच होत. मी संभ्रमातच पडले. हिचा आणि माझा काय संबंध ५ वर्षा पुर्वीच माझ लग्न झालय. मी कुठल्या विवाह मंडळात पण नाव नव्हत घातल. आणि माझ नाव कुठल्या क्षेत्रात लौकीकात पण नाही. बर हिला मी पहिलाच पाहतेय आणि हिच्याबद्दल मी कधी ऐकल पण नव्हत, मग हिला मला कशाला पाहायच होत ? मी आश्चर्याने विचारल का हो ? मला ओळखता तुम्ही ? कस काय ? ती हसत म्हणाली असच ग. तुमच्या एरीयातली सगळी स्थळ माझ्याच कडे नोंद करुन घ्यायला येतात. त्यांच्या बरोबर गप्पा मारता मारता निघतात विषय आणि तिने लगेच ती माझ्या जावेकडून बघून म्हणाली "ए, मला तुझ्या नवर्‍याला पण बघायचे आहे. आम्ही आवाकच झालो. आमचे चेहरे पाहुन "असच ग." म्हणाली. मी तुमच्या सगळ्या फॅमिलीला आता ओळखते, आता तुम्हाला बघितल, आता तुझा नवरा (जावेचा) बघायचा राहीला आहे. हिचा नवरा काय कधिही बघता येईल. नावाने मी ओळखते त्याला.
ती आमच्या सासुबाईंना आणि नणंदेला ओळखत होती हे आम्हाला माहीत होत, कारण आमच्या नणंदेच लग्न तिनेच जमवल होत. पण आमचा काहीच त्यात संबंध आला नव्हता. फक्त त्या दोघी नाव नोंदवायला गेल्या होत्या आणि नंतर फोनवरच त्यांचे संबंध आले होते.

मावशीने आता विषयाला हात घातला. "तुम्ही म्हणालात मुलगी आली आहे म्हणून."

"आहो आली नाही अजुन येणार आहे. तिचाच आत्ता हा फोन आला होता. पण म्हटल आधी तुम्हाला तिचा फोटो आणि माहीती द्यावी मग तिला बोलवावी, म्हणुन तिला मी थांबवल आहे. आता तुम्हाला अजुन एक प्रश्न पडेल मी मघाशी घरात ६ पाहूणे आहेत म्हणून पण सांगितले, त्यांना मी गच्चीत कोंडून ठेवल आहे." आम्ही एकमेकांकडे बघु लागलो. आमचे चेहरे बघताच ती म्हणाली " अहो ते माझे ६ कुत्रे आहेत. ते नेहमी घरातच असतात. जेंव्हा तुमच्या सारखी माणस येतात तेंव्हा त्यांना मी गच्चीत बांधून ठेवते आणि एक जरा पण भुंकायचे नाही ही ताकीद देते. बिचारे ऐकतात सगळ माझ, बघा येतोय एकाचा तरी भुंकण्याचा आवाज ?" खरच जराशी चुळबुळ पण ऐकायला येत नव्हती पण तिने सांगितल्यावर मात्र थोडा डेटॉल मिश्रीत कुत्र्यांचा वास घरात जाणवू लागला.

परत एक फोन आला, " कारट्या तुला सांगितल ना, संध्याकाळी ६ वाजता ये म्हणुन, परत फोन केलास तर घरात नाही घेणार. बरोब्बर ६ ला ये. आत्ता माझ्या कडे दुसरी पार्टी आली आहे, मला वेळ नाही तुझ्याशी बोलायला". फोन परत खाडकन ठेवला.

"हं तर काय बोलत होतो आपण ? हं पण मुलगा कुठे आहे तुमचा? लग्न तुम्हाला करायच आहे की मुलाला ?
"तो बाहेर गेलाय आम्हाला सोडून," न्यायला येईल परत.
"आहो मग जरा जाता जाता दाखवायचा ना काळा की गोरा, कुरूप की सुस्वरूप ते, म्हणजे मला मिळत्या जुळत्या मुली दाखवता येतात."
मावशीने लगेच त्याचा फोटो पुढे केला. " तो लाजरा आहे हो, आणि माझ्या आज्ञेत असतो. तुच मुलगी बघ. तुला आवडली तर मला बोलव सांगुन निघुन गेला".
"ते सगळ ठिक आहे हो, पण लग्न त्याला करायचे आहे आणि फोटो काय हल्ली काळ्याचा गोरा फोटो सहज करुन मिळतो. तो फोटो सारखाच आहे हे कशावरुन ? त्याला यायला पहिजे होत. ठिक आहे मी दाखवते तुम्हाला मुलीची माहीती आणि फोटो."

समाजप्रतिभा

प्रतिक्रिया

घाशीराम कोतवाल १.२'s picture

4 Apr 2009 - 1:01 pm | घाशीराम कोतवाल १.२

जागु
ह्या शारदाबाई भन्नाट आहेत सुटल्यात अगदी
आजुन येउ दे
पुलेशु

**************************************************************
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??

मराठमोळा's picture

4 Apr 2009 - 1:20 pm | मराठमोळा

गच्चीत कोंडलेले पाहुणे नक्की श्वानच होते की शारदाबाईंनी सुचवलेल्या स्थळाला नकार दिलेलं एखाद कुटुंब होतं ते पहायला पाहिजे होतं जागुतै.
शारदाबाई थोड्या डेंजर वाटतात म्हणुन.... असो.
लेख जमलाय चांगला. पुलेशु..

आपला मराठमोळा
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
-----------------------------
काले म्रुदुर्यॊ भवति काले भवति दारुण:!!
स: साध्नॊति परमश्रॆयम विघ्नांचाप्यधिष्टति!!

अनामिक's picture

4 Apr 2009 - 5:31 pm | अनामिक

मस्तं जमलाय पहिला भाग... पुढचा भाग लवकर येऊ द्या.

-अनामिक

क्रान्ति's picture

4 Apr 2009 - 5:33 pm | क्रान्ति

भलतंच प्रस्थ दिसतंय! पुढे काय, याची उत्सुकता आहे.
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}

यशोधरा's picture

4 Apr 2009 - 6:55 pm | यशोधरा

कडक दिसतायत शारदाबाई! लवकर लिही पुढे..

सँडी's picture

4 Apr 2009 - 7:55 pm | सँडी

हाहाहा!
मस्त लिहिलाय. उत्तुंग षटकारच म्हणेल.
"पुढे काय?" ही उत्सुकता निर्माण झाल्याने लेख झकास झालाय...पुढचा भाग लवकर टाका.

-सँडी
एखादी गोष्ट विसरायला पण त्याची आठवण ठेवावी लागते.

रेवती's picture

4 Apr 2009 - 10:18 pm | रेवती

जागु,
पुढचा भाग लवकर येऊदे.
वाट बघते आहे.
हा भाग छानच!

रेवती

मदनबाण's picture

5 Apr 2009 - 4:35 am | मदनबाण

हेच म्हणतो...

मदनबाण.....

I Was Born Intelligent,But Education Ruined Me.
Mark Twain.

अबोल's picture

5 Apr 2009 - 12:21 pm | अबोल

जागु बाइ ,या घरातुन लवकर निघा, नाहितर तुमचि पण रवानगि कुत्र्या॑बरोबर होइल

जागु's picture

6 Apr 2009 - 12:00 pm | जागु

कोतवाल, मराठमोळा,अनामिक्,क्रान्ती, यशोधरा, सँडी, रेवती,मदनबाण, अबोल तुमच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद. दुसरा भाग लवकरच टाकेन.

विंजिनेर's picture

6 Apr 2009 - 12:20 pm | विंजिनेर

वाचतो आहे.
सुचना: टंकलेखनाच्या काही किरकोळ चुका काढल्यातर लेख अजून वाचनीय होईल.

--
कळप-मनोवृत्तीचा सूक्ष्म अभ्यास करण्यात आम्ही गढलेलो असल्यामुळे कंपूबाजी करायला आमच्याकडे वेळ नाही

अल्पना's picture

6 Apr 2009 - 12:38 pm | अल्पना

छान

सुधीर कांदळकर's picture

6 Apr 2009 - 4:18 pm | सुधीर कांदळकर

बाई दिसतात ह्या. कुत्रा चावला नाहीं तरी चौदा इंजेक्शनें घ्यावीं लागतील.

व्यक्तिरेखा मस्त जमली आहे. पण 'जावेला' म्हणाल्या असे नातींवाचक शब्द आम्हांला पुरुषांना (अर्धी हाडे स्मशानांत गेलीं तेरी) कळत नाहींत. मेंदूच्या मुंग्या अजून आहेत. असो. झकास जमली व्यक्तिरेखा.

सुधीर कांदळकर.