वर्तमानात राहाण्याचा फायदा.

श्रीकृष्ण सामंत's picture
श्रीकृष्ण सामंत in जनातलं, मनातलं
27 Mar 2009 - 9:44 am

"अलीकडे मी प्रश्न विचारायच्या प्रयत्नात असतो.उत्तर देण्याचा प्रयत्न करीत नाही.असं करणं मला सोपं जातं असं मुळीच नाही.माझ्याकडे बरीच उत्तरं आहेत.परंतु,माझं मलाच
आवाक्यांत ठेवावं लागतं."

किशोर पाटलाचा भाऊ एव्हड्या तरूण वयात आत्महत्या करील असं वाटलं नव्हतं.मी किशोर पाटलाला योगायोगानेच एकदा ठाण्याला गेलो होतो तेव्हा भेटलो.गोविंदराव सामंतांच्या घरी ते एम.एच हायस्कूल मधून निवृत्त झाले म्हणून निरोपाची पार्टी होती. गोविंदराव माझ्या पत्नीच्या मावशीचे यजमान.त्यांचे अनेक विद्दार्थी ह्या पार्टीला आले होते. किशोर पाटलाची माझी जूनी ओळख होती.पण मुंबईतल्या दगदगीच्या आयुष्यात कुठली भेट व्हायची.अशाच काही प्रसंगातून योगायोग आला तरच.मी त्याच्या भावाचा विषय काढला नाही.मला त्या पार्टीत त्याला निरूस करायचं नव्हतं. पण माझी आणि त्याच्या भावाची चांगलीच गट्टी होती ते किशोरला माहित होतं.

म्हणूनच तो म्हणाला,
सहा वर्षापूर्वी माझा धाकटा भाऊ,जो माझा खरा मित्र होता, आणि आमच्या अगदी जवळच्या नात्यातला उरलेला सदस्य होता त्याने आपल्या जीवनाचा शेवट केला होता. यापूर्वी कधीही मला असा अनुभव जाणवला नाही किंवा त्यानंतर सुद्धा असा अनुभव जाणवून पण माझा विश्वास बसण्यासारखा हा मला अनुभवाचा प्रचंड धक्का होता.
तोपर्यंत,जीवन नेहमी माझ्या बाजूला सरकायचं.माझं मन हे काय झालं याचा आढावा घेण्यात हरवून जायचं,किंवा भविष्यात काय होईल यासाठी अपेक्षीत राह्यचं.माझं वर्तमान,
भविष्यात आणि भूतकाळात गायब झाल्यासारखं भासलं.जे जीवन आपण उपभोगतो ते मुळातच आंखूड असतं.ते जीवन जेव्हडं आपण हरवून बसतो तेव्हडं ते कमीच होत जातं.

मी माझ्याशीच प्रतिज्ञा केली की माझ्या भावाचा मृत्युचा सन्मान करायाचा झाल्यास मला माझ्या जीवनात वर्तमानातच राहावं लागणार.मला दिसून आलं की नवं जग माझ्या समोर
खुललं गेलं आहे.जे जीवन विस्ताराने समृद्ध होतं.ते व्यापक होतं आणि उजाडही होतं. चिंतन करण्याची,पर्वा करण्याची, दूरदर्शितेची आणि क्रियाशिलतेची माझी संभवता वाढली. जे बोलायचं तेच निशःब्द राहिलं.

वर्तमानात राहणं सोपं नाही.एखाद्दा चांगल्या दिवशी मी एक दोन टक्के जागरूत राहायचो. उरल्यावेळात मी प्रतिक्रिया द्दायचो.बहुदा त्या प्रतिक्रिया प्रत्यक्षपणे विचारपूर्ण नसायच्या.
त्या केवळ प्रतिसादात्मक असायच्या.
अलीकडे मी प्रश्न विचारायच्या प्रयत्नात असतो.उत्तर देण्याचा प्रयत्न करीत नाही.असं करणं मला सोपं जातं असं मुळीच नाही.माझ्याकडे बरीच उत्तरं आहेत.परंतु,माझं मलाच
आवाक्यांत ठेवावं लागतं.

प्रतिक्रिया न देण्यात जास्त परिश्रम लागतात.आणि जेव्हडं म्हणून मी असं करायला जायचो तेव्हडं मला मीच जास्त आकांक्षा करतोय असं वाटायचं.
मला दिसून यायचं की माझं स्वतःचं मनच माझी सीमा असायची.ज्या काही मनात कुठल्याही गोष्टीच्या संभवता यायच्या त्या आपल्या आवाक्याबाहेर आहेत अशी मी समजूत
करून घ्यायचो.त्यांची आशा करणं शक्यतेच्या पलिकडचं आहे आणि त्यावर विश्वास ठेवणं विक्षिप्त वाटायचं.पण जर का त्या घडवून आणण्य़ाच्या आपल्या क्षमतेवर विश्वासच ठेवला नाही तर त्या कधीच घडणार नाहित हे नक्की.

माझ्या लक्षात आलं की जे मी वर्तमानात राहाण्याचं मनात ठरवलं होतं-म्हणजेच जे आजूबाजूला होत आहे त्याच्यावर केंद्रित राहणं-ते पायाभूत होतं.
माझ्या भावाची आठवण येऊन मी नेहमीच रडत असतो.अनेक गोष्टी मधली ही एकच गोष्ट की ज्या साठी मी माझे डोळे अश्रूनी भिजवत असतो.त्याच्या बरोबर राहून मी अनेक संध्या
घालवल्या कारण मी त्याच्याबरोबर वर्तमानात नव्हतो. त्या घालवलेल्या संध्या मला पुन्हा कधीच मिळणार नाहीत.
एक ना एक मार्गाने तो वर्तमानात पूर्ण हजर असायचा.त्याला दुसरा कसलाच मार्ग माहित नसावा. आता मला माझं जीवन जे कमी झालं त्याहून आणखी कमी करायचं नाही.वर्तमानात राहून,
जागरूत राहून,अवगत करून आणि डोळे उघडे ठेवून राहिल्याने मला वाटतं मी माझ्या भावाचा सन्मान करीत राहीन.रोजच अगदी थोडा का होईना."

किशोर पाटलाला मी "स्टिम-आऊट" होऊं दिलं.मला माहित होतं की त्याचं जे वर्तमानात राहण्याचं मन होतं ते माझ्याकडे त्याला उघड करायचं होतं. प्रसंग जरी थोडा वेगळा असला
तरी.
त्याचं सर्व सांगून झाल्यावर मीच त्याला म्हणालो,
"किशोर,खरोखरंच तुझी विचारसरणी मला आवडली.मुख्य म्हणजे तू म्हणतोस ते,
"जे जीवन आपण उपभोगतो ते मुळातच आंखूड असतं.ते जीवन जेव्हडं आपण हरवून बसतो तेव्हडं ते कमीच होत जातं."
सामंतसरांच्या पार्टीची मजा मिळालीच त्याउप्पर तुझ्याकडून जो संदेश मिळाला तो लाख मोलाचा ठरला."
किशोर पाटिल खूष झालेला पाहून मला ही आनंद मिळणं उघडच होतं.

श्रीकृष्ण सामंत

कथालेख

प्रतिक्रिया

अजय भागवत's picture

27 Mar 2009 - 7:27 pm | अजय भागवत

लेखातला नायक वास्तवात आहे की नाही हे माहित नसल्याने मी ह्याकडे एक लेखन म्हणुन पाहतोय व त्यानुसार माझ्या प्रतिक्रिया देतोय.

अलीकडे मी प्रश्न विचारायच्या प्रयत्नात असतो.उत्तर देण्याचा प्रयत्न करीत नाही.असं करणं मला सोपं जातं असं मुळीच नाही.माझ्याकडे बरीच उत्तरं आहेत.परंतु,माझं मलाच आवाक्यांत ठेवावं लागतं.

प्रतिक्रिया न देण्यात जास्त परिश्रम लागतात.

वरील विचार आवडले

माझ्या लक्षात आलं की जे मी वर्तमानात राहाण्याचं मनात ठरवलं होतं-म्हणजेच जे आजूबाजूला होत आहे त्याच्यावर केंद्रित राहणं-ते पायाभूत होतं.
वर्तमानात राहून, जागरूत राहून,अवगत करून आणि डोळे उघडे ठेवून राहिल्याने मला वाटतं मी माझ्या भावाचा सन्मान करीत राहीन.रोजच अगदी थोडा का होईना.

वरील विचार मला थोडेसे एक्सपांड करावेसे वाटल्यामुळे मी हे लिहितोय. मी वर म्हणाल्याप्रमाणे ह्या लिखाणाकडे एक लेखन म्हणुन पाहतोय त्यामुळे. मी फार मोठा विचार मांडतोय असा अजिबात आव आणत नाहिये पण जे मनात आले ते लिहितोय.

मला वाटते की, नुसते वर्तमानात राहुन फारसा फरक पडत नाही (आणि हेच कदाचित लेखातल्या नायकाला सुचवायचे असेल). [मुळात वर्तमानकाळ अस्तित्वातच नसतो. असतो तो भूतकाळ व भविष्यकाळ. शास्त्रीय दृष्टीकोनातून पाहिले तरी पृथ्वी स्वतः भोवती फिरते (अंदाजे ३ लाख किमी रोज- परिघानुसार) व सूर्याभोवती चक्कर मारते. ही गती सतत आहे व आपण रोज कित्येक लाख किमी फ़्री राईड घेतो]
तरीसुद्धा वर्तमानकाळ आहे असे मानल्यास, आपल्याभोवती ज्या घटना घडत असतात त्या आपण निर्माण करतो अथवा ईतर मानव, सजीव, निसर्गाने निर्माण केलेल्या असतात. त्या घटना आपण ज्या गाळण्यांमधून पाहुन त्याचा काय अर्थ लावतो ते सगळ्यात महत्वाचे असते असे मला वाटते.

"किल्लारीला भूकंप झाला" ही घटना सामान्य नागरीक, नेते, स्वयंसेवी संघटनेचे कार्यकर्ते, प्रसाशन हे वेगळ्या-वेगळ्या "नजरेने (गाळण्या)" पाहतात. एखादा चोर तर तेथे "चला मातीच्या ढिगाऱ्याखाली काहितरी सापडेल" अशा विचारने जातो.

आपल्या भोवती एखादी घटना घडते ती आपण "पाहतो" (वेगवेगळ्या सेन्सरी ऒर्गन्सचा वापर करुन); त्याला आपण एक "अर्थ" देतो (वाईट, चांगला, अलिप्त). हा दिलेला अर्थ आपण कसा देतो ह्याला फार महत्व आहे. तिच घटना दुसऱ्याने पाहुन त्या व्यक्तिने त्याला काय अर्थ दिला आहे तो पुर्णपणे वेगळा असायची शक्यता असते. आपण जो अर्थ लावतो त्याचा भला-बुरा परिणाम आपल्यावर होतो त्यामुळेच आपण त्याघटनेला दिलेल्या अर्थाची निवड आपण काळजीपुर्वक करणे आवश्यक असते.

ह्याचे दुसरे उदाहरण- "ओबामा निवडुन आला"- मी जर ओबामाचा चाहता असेल तर मला ते आवडेल, नसेल तर नाही. हे चांगले की वाईट हे मी ठरवतोय पण ते माझ्यापुरते आहे. त्याचा ओबामाला काहीही फरक पडणार नसतो- तो व त्याची सिस्टीम आहे त्याच पद्धतीने कार्यरत राहणार असते.

कदाचित लेखातल्या नायकाला म्हणायचे असेल की, मी आता घटनांना योग्य असा अर्थ योग्य ती गाळणी वापरुन देतो आहे व त्यामुळे मला हे जग नव्या रुपात दिसते आहे; असे मला वाटले म्हणून हे विचार मांडायचे धाडस केले.

श्रीकृष्ण सामंत's picture

27 Mar 2009 - 9:44 pm | श्रीकृष्ण सामंत

हलो अजय,
आपली अभ्यासपूर्वक आणि समतोलाने विचार करून लिहिलेली प्रतिक्रिया मला आवडली.
"मुळात वर्तमानकाळ अस्तित्वातच नसतो."
खोलवर विचार केल्यावर वर्तमानाबद्दलचा आपला विचार अगदी बरोबर आहे.
खरं म्हणजे वर्तमान घडता घडताच ते भुतकाळात जातं.
म्हणूनच किशोर म्हणतो,
"माझं वर्तमान, भूतकाळात गायब झाल्यासारखं भासलं."
आणि म्हणतो,
"माझं मन हे काय झालं याचा आढावा घेण्यात हरवून जायचं,किंवा भविष्यात काय होईल यासाठी अपेक्षीत राह्यचं."
आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार.

www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

अजय भागवत's picture

27 Mar 2009 - 10:42 pm | अजय भागवत

प्रतिक्रिये बाबत धनंजयचा हात धरु नाही शकणार.
तुमच्या लेखाचे नाव क्याची होते व त्यामुळे मी दुवा उघडला. त्यानंतर काही विचार आवडले. ह्यासगळ्याने एक विचार सुरु झाला जो मी उतरवत गेलो...इतकेच.

कळस's picture

27 Mar 2009 - 9:22 pm | कळस

मुळात वर्तमानकाळ अस्तित्वातच नसतो. असतो तो भूतकाळ व भविष्यकाळ.

काही समजले नाही. माझ्या समजुतीच्या एकदम विरुध्ध. अधिक खुलसा केल्यास बरे होइल.

कळस

थोड फार जाणूनही शून्य उमगल्यामुळे अहंकाराचा कळस !!

अजय भागवत's picture

27 Mar 2009 - 9:52 pm | अजय भागवत

मुळात वर्तमानकाळ अस्तित्वातच नसतो. असतो तो भूतकाळ व भविष्यकाळ

ह्यामागे भुमिका इतकीच आहे की, वर्तमानकाळ खूपच क्षणीक असतो- आताचा क्षण हाच वर्तमानकाळ. पुढच्याच क्षणी आपण भविष्यात जातो. एक म्हणायची पद्धत म्हणून आपण "पुढच्या १० मिनिटांनी, ३० मिनिटांनी, उद्या, परवा, पुढच्या आठवद्यात, महिन्यात..." अशा "जराशा" नंतर येणार्या काळाला भविष्यकाळ मानतो. पण हाच काळ आपण अजुन कमी-कमी करत गेलो तर पुढचा क्षणसुद्धा भविष्यकाळच असतो.

अजय भागवत's picture

27 Mar 2009 - 9:55 pm | अजय भागवत

अर्थात, माझ्या प्रतिक्रियेचा "मुळात वर्तमानकाळ अस्तित्वातच नसतो. असतो तो भूतकाळ व भविष्यकाळ" हा केंद्रबिंदू नाही. मी ही आपल्या नेहमीच्या समजुतीला धरुनच पुढचे लेखन केले आहे.

यशोधरा's picture

27 Mar 2009 - 9:23 pm | यशोधरा

छान लिहिलेत सामंतकाका.

कळस's picture

28 Mar 2009 - 8:09 am | कळस

कळस
छान लेख व सुंदर प्रतिक्रिया..... विचार करायला लावणारा...

प्रकाश घाटपांडे's picture

28 Mar 2009 - 11:41 am | प्रकाश घाटपांडे

मनोजवम मारुत तुल्य वेगं
बहिणाबाईंनी ज्याच वर्णन

"मन वढाय वढाय
उभ्या पिकातल ढोर
किती हाकलं हाकलं
फिरी येते पिकावर

मन पाखरू पाखरू
त्याची काय सांगू मात
आता व्हत भुइवर
गेल गेल आभायात

मन लहरी लहरी
त्याले हाती धरे कोन
उंडारल उंडारल
जस वारा वाहादन

मन जह्यरी जह्यरी
याच न्यार रे तन्तर
आरे इचू साप बरा
त्याले उतारे मन्तर

मन एव्हड एव्हड
जस खसखसच दान
मन केवढ केवढ
आभायतबि मावेन

देवा आस कस मन
आस कस रे घडल
कुठे जागेपनी तुले
अस सपन पडल"

तर आस हे मन वर्तमानात बंदिस्त होतच नाही

प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

अजय भागवत's picture

28 Mar 2009 - 2:22 pm | अजय भागवत

बहिणाबाईंच्या आणखी अशा बोधकविता टंकल्या असतील तर पोष्टहाफिसात पाठवुन देण्याची विनंती.