कृष्णमय--

पुष्कराज's picture
पुष्कराज in जे न देखे रवी...
23 Mar 2009 - 6:33 pm

गोरी राधा हरी सावळा
अव्दैताचा रम्य सोहळा
सगुण होउनी सखा श्रीहरी
सहज छेडतो मुग्ध बासरी

राधा तोचि तोच बासरी
मनात तोचि तोच अधरी
स्वरातूंन तो तोच सुरांतून
हरी खेळतो कणाकणातून

गोप्-गोपिका तोच र्निमितो
वेड लावुनी रास खेळतो
होउन यमुना धुंद वाहतो
हरी सावळा हरी रहतो

त्रिगुणात्मक तो तोच गुणातीत
विश्वात्मक तो तोच कणातीत
तोच लिहीतसे माझे हे गीत
श्रीहरी चरणी नित्य समर्पित

कविताआस्वाद

प्रतिक्रिया

क्रान्ति's picture

23 Mar 2009 - 7:15 pm | क्रान्ति

खूपच खास!
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}

प्राजु's picture

23 Mar 2009 - 7:39 pm | प्राजु

सुरेख सुरेख..

त्रिगुणात्मक तो तोच गुणातीत
विश्वात्मक तो तोच कणातीत
तोच लिहीतसे माझे हे गीत
श्रीहरी चरणी नित्य समर्पित

सुंदर!!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

विसोबा खेचर's picture

24 Mar 2009 - 9:54 am | विसोबा खेचर

अप्रतीम..!

llपुण्याचे पेशवेll's picture

24 Mar 2009 - 10:21 am | llपुण्याचे पेशवेll

वाह रे! फारच सुंदर..

पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984

मृगनयनी's picture

24 Mar 2009 - 10:27 am | मृगनयनी

अ प्र ति म ! ! !

:)

राधा तोचि तोच बासरी
मनात तोचि तोच अधरी
स्वरातूंन तो तोच सुरांतून
हरी खेळतो कणाकणातून

हे रुपक "परफेक्ट!"

द्वैताचे अद्वैतात रूपांतर होण्याचे एक उत्तम उदाहरण!

:)

अजून येऊ देत! :)

-----
कृष्णभक्त,
मृगनयनी.

युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |
मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित ||
|| इति अनिरुद्ध महावाक्यम् ||