ए-दिले-नादान

दशानन's picture
दशानन in जनातलं, मनातलं
16 Mar 2009 - 10:02 am

कोई ये कसे बताएं की ओ तन्हा क्यु हैं
वह जो अपना था वही ओर किसी का क्युं है
यही दुनिया है तो फिर ऎसी ये दुनिया क्युं है
यही होता है तो आखिंर यही होता क्युं है !

असंच कुठल्यातरी वळणावर मी उभा आहे तुझीच वाट पाहत जसं वाळत चाललेले ते आपलंच चिंचेचे झाडं, आठवतं तुला तु मला फोन केला होतास की राज ते झाड पडलं रे, खुप वाळलं होतं, तसाच कधी तरी मी पण पडेन पण ह्यावेळी तुला सांगणारं कोणीच नसणार आहे, मला ह्याचं दुख: नाही आहे की तुला सांगणार कोण, तुला कळणारं कसे पण तरी ही माझं मन उगाच उदास होतं, त्या झाडचं आपलं कोण होतं ज्यांना त्याच्या पडण्याचं दुख: झालं ? नाही गं तु वेडी व मी वेडा त्यामुळे आपण त्याची काळजी केली कारण तोच एक होता जो आपल्या सुख: दुख: चा साथी होता तो माझ्यापेक्षा जास्त तुझ्याजवळ होता, हजारो किलोमिटर दुरवर त्याच्या पासून मी तर तु काहीच पावलावर होतीस, पण जेवढे दुख: तुला झालं तेवढंच मला ही झालं, ते झाड नष्ट झालं, पण त्या बरोबरच आपल्या ही काही आठवणी ..तु त्याच्या पाठीमागेच विसावली होतीस कधी झाडाच्या माझ्या छातीवर डोकं ठेऊन... विसावली होतीस कधी आपल्या जगापासून अलिप्त राहून.. आपल्या प्रेमाचा अंकुर देखील तेथेच उमलला होता कधी, आज ते झाड आठवायचं तसं काहीच कारण नाही पण माझा नाईलाज. जुन्या आठवणी आल्या की ते झाड आपसूकच डोळ्यासमोर येतं व कळत न कळत अश्रु कधी गालावरुन ओघाळतात कळत ही नाही.

ए-दिले-नादान आरजु क्या है जुस्तजु क्या है ।
क्या कयामत है क्या मुसिबत है,
कह नही सकते किस का अरमां है
जिंदगी जैसे खोई खोई है, हैरा हैरा है ।

किती तर गोष्टी आपल्या जिवनाचे अविभाज्य अंग होत्या पण अचानक एक एक करुन सर्व गायब झाल्या जश्या वळवाचा पाऊस कधी आला व कधी गेला कळालंच नाही, नाही तुझ्या बद्दल मनात जराही किंतू परंतू नाही आहे पण तरी ही आज असचं सर्व आठवलं, वळवाच्या पावसावरुन आठवलं, तुला आठवतं का एकदा असाच मार्च मध्ये वळवाचा जोरदार पाऊस पडत होता व तु बाहेर मनसोक्तपणे भिजत आपल्या मैत्रिणी बरोबर पावसाचा आनंद घेत होतीस त्या चिंचेच्याच झाडाखाली मी उभा राहून तुला निहाळत होतो, तुझ्या डोळ्यातून तो मिश्कलीपणा मला अजून ही आठवतो, प्रत्येक सरी बरोबर तुझं ते गिरक्या घेणं व तुझ्या केसांच्या बटातून ते ठेंब ठेंब पाणी तुझ्या गालावरुन ओघाळणं, काहीच पावलांवर तर उभा होतो मी तुझ्या पासून, आज ही दिसतं आहे मला माझ्या डोळ्यासमोर तो क्षण, अरे हो तुझ्यासाठी ती काही मिनिटे होती माझ्या साठी तर ते क्षणच नाही का जे मी जपून ठेवले आहेत, माझ्यासाठी असे अनंत क्षण आहेत माझ्याकडे पण आजकाल ते क्षण देखील अपूरे पडता आहेत, असं नाही की काही कमी आहे पण मी पुर्ण नाही आहे हे मला जाणवतं आहे फक्त तुझ्यामुळे, असं का व्हावे, मी तुला का नेहमी आठवावे, कधी कधी वाटतं तु आपल्या जिवनामध्ये किती आनंदी आहेस का मी नजर लावावी, त्यामुळेच तर मी त्या दिशेला पाहणं सोडलं आहे कधीच.

कभी किसी को मुकमील जहां नही मिलता
कही जमीं यो कहीं आसमां नहीं मिलता ।

माझ्या समोर पर्याय नाही आहे मला कधी कधी जावसं वाटतं त्या शहरामध्ये, त्या गल्ली मध्ये त्या घरासमोर जेथे तु कधी राहत होतीस, आजकाल तुझी आई-वडील राहतात, तुझी आई मला ओळखत नाही कशी ओळखेल ती मला खुप वर्ष झाली मला भेटून पण तिला, पण मी वेडा जातो कधी कधी व त्या चिंचेच्या झाडाच्या जागेवर आजकाल छोटेखानी मंदिर आहे अगदी तुझ्या घरासमोरच, पण कधी काळी येथे बाग होती व समोर मोकळी जागा पण आज काल येथे उंच इमारती उभ्या आहेत एका कोप-यातून हलकचं तुझं घर दिसतं, ते गेत, तुझं अगंण दिसतं, तेथेच बाहेर बसतो वाटतं की तु अशीच धावत येणार व मला म्हणणार कुठे होतास तु ! पण त्याच वेळी मी भानावर येतो व मला आठवतं की आता तु येथे नाही आहेस. तुच काय तुझी ओळख दाखवणारं काहीच येथे नाही आहे, ना आजकाल कोणी तुझ्या घरासमोर पाणी शिंपडतं ना त्यावर रांगोळी काढतं.. ना कोणी त्या सुखलेल्या झाडांना पाणी घालतं, बिचारी ती झाडं... तुझ्या विना एकदम वाळली आहेत... माझ्यासारखी.

तुझं से नाराज नही जिंदगी हैराण हू मैं ।
तेरे मासूम सवालोंसे परेशान हूं मै ।

आयपॊड वर गाणं वाजतं आहे, कधी कधी वाटतं का मी एवढा परेशान आहे का मी कुणाच्या प्रश्नाचं उत्तर देणं लागतो पण मला माहीत आहे प्रश्न माझेच आहेत पण उत्तरे माझ्याकडे नाही आहेत, उत्तरे मलाच शोधायची आहेत पण प्रयत्न अपूरे पडत आहे, तुझ्या शिवाय राहणं एक वेगळी गोष्ट पण तू आपली होणारचं नाही हे माहीत असून पण जगणं ही एक वेगळी वेदना, कधी तुला माझी आठवण येते का नाही माहीत नाही पण मी मात्र नेहमी अश्वथाम्याप्रमाणे आपली भळभळती जख्म घेऊन फिरत आहे, उरावर काही प्रश्न व त्या प्रश्नांची न सापडलेली काही सापडलेली उत्तरे घेऊन. तुझ्या नंतर ही कोणीतरी आलं होतं माझ्या जिवनामध्ये, अशीच तुझ्या सारखी हसतं खेळतं, कधी माझ्या जवळ आली मला कळालंच नाही, मला ती तुझ्यासंगे आपलं म्हणत होती पण दैव माझं नेहमी प्रमाणेच निष्ठूर, मला जे हवं ते मिळायलाचं नको हे ते नेहमी पाहत आलं आहे, दुख: खुप झालं, तु माझ्यापासून दुर जाणं मला जेवढ्या जख्मा देऊन नाही गेलं त्या पेक्षा अगणीत जखमा मला तीचं अवेळी जाणं देऊन गेलं, कधी कधी वाटतं तीच्या जागी आपण का नाही गेलो, तेथेच होतो ना मी पण. दैवाला दुसरंच काहीतरी मंजूर होतं, मी एकटाचं होतो त्यामुळे त्यानं सोबतीला तुझ्या आठवणी बरोबर तीच्या आठवणी देखील कपाळी लिहल्या माझ्या जन्मभराच्या सोबतीला.

जिने के लिए सोचा ही नही, दर्द सभालने होंगे... ।
मुस्काराये तो मुस्कारानें के कर्ज उतारने होंगे ।

बरोबर, तेच करतो आहे, पण का ? ह्याच प्रश्नाचं उत्तर मिळत नाही आहे तुझ्याकडे आहे काय ? तु मला एकदा विचारलं होतसं की तु माझी जर झाली नाहीस तर, मी काय करेन. त्यावेळी ही माझ्याकडे उत्तर नव्हते व आज ही नाही आहे, तुझं स्वप्न आपलं म्हणून जगत आलो, सर्व विसरलो, शहरच्या शहरं बदलली, काय कमवले काय गमवले त्यांची तर किंमतच नाही पण ते स्वप्न पुर्ण झालं, पण त्या पुर्ण झालेल्या स्वप्नामध्ये कोण राहणार आहे, मी एकटाच. तुझ्याशीवाय जगणं शिकलो आहे पण तुझ्याशीवाय माझं अस्तित्वच नाही हे मी कसे विसरु. दिवस जातो गं कसातरी कामामध्ये, तक्रारी मध्ये, अडचणीमध्ये, हसतं, खेळत, लढत पण रात्र, जिवावर येतं कधी कधी जगणं देखील, मला माहीत आहे तु सप्तपदी घातली आहेस त्याच्या बरोबर्, प्रत्येक पावलावर एक जिवनाचं वचन, सात जन्माचं वचन तु दिलं आहेस, तुझ्या त्या वचनासाठी का होई ना पण मला तुझी सात जन्म वाट पाहावी लागेल त्याचं काय ? तु कधी विचार केला नसशील नाही, आस्तिक तर मी पण नाही एवढा पण फक्त तुझे शब्द पाळावेत म्हनुन जगतो आहे, नाही तर ह्या श्वासांची काय हिंमत तुझ्या विना एकक्षण देखील माझ्या बरोबर राहू शकतील. जीव देण्याचा भ्याडपणा मी कधीच करणार नाही हे तुला देखील माहीत आहे मला लढणं आवडतं पण समोर आलेल्या मृत्यला पण मी तेवढ्याच प्रेमाणे आलिंगन देईन हे नक्की.

हम भुल गये रे सारी बात पर तेरा प्यार नही भुले
क्या क्या हुवा दिल के साथ मगर तेरा प्यार नही भुले ।

मोठी माणसं म्हणतात मला, मी अडाणी आहे, मला भाषा कळत नाही, लिहता येत नाही, मी गांवढळ आहे, ना धड मराठी येत नाही ना धड कन्नड, हिंन्दी अथवा इग्रजी, काही शब्द माझे पण चुकतात, कोणी म्हणतं मी खुप वेगानं बोलतो, तर काही ना मी बोललेलेच कळत नाही , काही ना माझे शब्द कळत नाही तर काही ना माझी भावना, काही ना मी उथळ वाटतो तर कुणाला वाहतं पाणी, काही मला मित्र समजतात काही शत्रु तर काही मला ग्रहितच धरत नाहीत.. पण मला आता ह्या बद्दल काहीच वाटत नाही, कोण काय म्हणतो आहे, मी आहे तो असाच आहे, मी म्हणतो ती लोक वेड्याला शहाणं का समजता, माझ्यातला मी तर तेव्हाच गेला, जेव्हा ती गेली आता तर बस हा देह, ओझे वाहतो आहे वाहतो आहे कधी तरी मी पण मुक्त होईन, जेव्हा मी मुक्त होईन ना तेव्हा नक्कीच तुझ्या घरासमोरुन एक चक्कर मारेन, चुकून तु पुन्हा दिसशील, सकाळ सकाळी पाण्याचा सडा अंगणात घालताना, रांगोळी घालताना व चुकून तु बाहेर गेटकडे पाहशील तर तेथेच मी कुठे तरी कोप-यात उभा असेन तुला निहाळत , तेव्हा ना बंध असतील ना दैव. अशीच एक झुळुक तुझ्या गालाला स्पर्श करुन जाईल विश्वास ठेव तो स्पर्श माझाच असेल तुझ्या गालावर शेवटचा.

***

मी येथे हे सर्व का लिहतो ? हाच प्रश्न माझ्या काही मित्रांना पडला आहे तसाच मला देखील पण असं म्हणतात की दुखः मित्रानाच सांगावे व तुम्ही माझे सगळे मित्रच जिवाभावाचे, त्या मुळे आपलं मन तुमच्या समोर उघड करत आहे.

जीवनमानप्रकटन

प्रतिक्रिया

निखिल देशपांडे's picture

16 Mar 2009 - 10:59 am | निखिल देशपांडे

मी येथे हे सर्व का लिहतो ? हाच प्रश्न माझ्या काही मित्रांना पडला आहे तसाच मला देखील पण असं म्हणतात की दुखः मित्रानाच सांगावे व तुम्ही माझे सगळे मित्रच जिवाभावाचे, त्या मुळे आपलं मन तुमच्या समोर उघड करत आहे.

राजे करा तुम्हि आपले मन मोकळे.... आम्हि वाचतो आहे.....

अनिल हटेला's picture

16 Mar 2009 - 1:53 pm | अनिल हटेला

>>>>मन तुमच्या समोर उघड करत आहे.

तुमचं मन मोकळ झालं ते ठिक आहे,
पण इकडे आभाळ दाटून आलये त्याचं काय !!!

"आम्ही दोघेही अतीशय आतुरतेने तीची वाट बघत होतो,
जेव्हा ती आली ,तो डोळे भरुन पहात होता...आणी मी..
भरल्या डोळ्यानी तीला पाहत होतो ...."

बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

अवलिया's picture

16 Mar 2009 - 11:28 am | अवलिया

निशब्द.....!!
सुरेख... येवु दे अजुन असेच लेखन !!!
जियो राजे !!! जियो...!

--अवलिया

सहज's picture

16 Mar 2009 - 11:38 am | सहज

सुंदर लेख. आवडला.

हीच मनोमन इच्छा की आता तुमचे दु:ख हलके झाले असावे व मिळणारे प्रतिसाद पाहून तुम्हाला लवकरच असा लेख पुन्हा लिहायची इच्छा न होवो.

दशानन's picture

16 Mar 2009 - 4:18 pm | दशानन

>>मिळणारे प्रतिसाद पाहून तुम्हाला लवकरच असा लेख पुन्हा लिहायची इच्छा न होवो.

=))

खरं आहे !

इच्छा ना होवो तेच चांगले !

परिकथेतील राजकुमार's picture

16 Mar 2009 - 11:41 am | परिकथेतील राजकुमार

तुझसे नाराज नही जिंदगी हैरान हू मैं ।
तेरे मासूम सवालोंसे परेशान हूं मै ।

क्या बात है राजे.. हळवे केलेत बॉ !

जाता जात २ ओळी तुमच्यासाठी, अर्थातच उधार घेतलेल्या...

एक नाम क्या लिखा तेरा साहील की रेत पर
फिर उम्र भर हवासे मेरी दुष्मनी रही....

©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी
एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

अवलिया's picture

16 Mar 2009 - 11:47 am | अवलिया

एक नाम क्या लिखा तेरा साहील की रेत पर
फिर उम्र भर हवासे मेरी दुष्मनी रही....

क्या बात है !!
पराजी आजकल बडे शायराना अंदाज मे... क्युं कही इश्क विश्क का चक्कर तो नही ना? भैया... कदम फुंक फुंक कर रखना वरना शादी की जेल मे जाकर उमरभर पछताओगे!

--अवलिया

धमाल मुलगा's picture

17 Mar 2009 - 11:10 am | धमाल मुलगा

नाना, काय बोल्लांत राव. मुंह की बात छिन ली आपने.

बाकी राजे, काय होतंय काय नक्की? हल्ली हे असं एकदम हळवं हळवं का लिहायला लागला आहात?

'हिमालय यात्रा' कुठवर आली?

----------------------------------------------------------------------------------------
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::

विनायक प्रभू's picture

16 Mar 2009 - 1:45 pm | विनायक प्रभू

हा लेख नीट वाचायला लागणारा हिंदी फाँट आतातरी डोक्यात नाही.

दशानन's picture

16 Mar 2009 - 4:23 pm | दशानन

काय सर तुम्हाला फॉन्टची गरज कधी पासून :?

कुणाच्या ईतक्याही जवळ जावू नये,
की आपल्याला त्याची सवय व्हावी !
तडकलेच जर ह्रदय कधी ,
जोडताना असह्य यातना व्हावी !

डायरीत कुणावे नाव ईतकेही येवू नये ,
की पानांना ते जड व्हावे !
अन एक दिवस अचानक त्या नावाचे ,
डायरीत येणे बंद व्हावे !

स्वपनात कुणाला असंही बघु नये ,
की आधाराला त्याचे हात असावे !
तुट्लेच जर स्वपन अचानक ,
हातात आपल्या काहीच नसावे !

कुणाला ईतकाही वेळ देवू नये ,
की आपल्या षणाषणावर त्याचा अधिकार व्हावा !
एक दिवस आरशा समोर आपणास ,
आपलाच चेहरा परका व्हावा !

कुणाची ईतकी ही ओढ नसावी ,
की पदोपदी त्याचीच वाट बघावी !
त्याची वाट बघता बघता ,
आपलीच वाट दिशाहीन व्हावी !

कुणाचे ईतकेही ऐकू नये ,
की कानात त्याचाच शब्दांचा घुमजाव व्हावा !
अन आपल्या ओठातून ही मग ,
त्याच्याच शब्दांचा उच्चार व्हावा !

कुणाची अशीही सोबत असू नये ,
की प्रत्येक स्पंदनात ती जाणवावी !
ती साथ गमावण्याच्या भीतीने ,
डोळ्यात खळकन अश्रू जमावी !

कोणाला ईतकाही माझा म्हणू नये ,
की त्याचे 'मी पण' आपण विसरून जावे !
त्या संभ्रमातून त्यानेच आपल्याला ,
ठेच लागून जागे करावे !

पण .. पण ..
कोणाच्या ईतक्याही दूर जावू नये ,
की आपल्या सावली शिवाय सोबत काहीच नसावे !
दूर दूर आवाज दिला तरीही ,
आपली शब्द जागीच घुमावे !!
~ वाहीदा

रामदास's picture

16 Mar 2009 - 5:07 pm | रामदास

सवयीनुसार लगेच विडंबन करू नका.

दशानन's picture

16 Mar 2009 - 5:15 pm | दशानन

=))

टायबेरीअस's picture

17 Mar 2009 - 1:05 am | टायबेरीअस

आयुष्याला इतके सिरिअस्ली घेऊ नका.. कोणी जिवंत सुटलेला नाही.. जीवनाकडे इतके वैष्ण्य (माझा शब्द) पुर्वक बघणे सोडा बा!