तीन चारोळ्या

दत्ता काळे's picture
दत्ता काळे in जे न देखे रवी...
14 Mar 2009 - 3:12 pm

१. पाण्यात पाय टाकून
हसली तू लोभसवाणे
कातळवेडे पक्षी
दिसतात किती जीवघेणे . .

२. डोळ्यात तुझ्या आभाळ
किती रंगबावरे झाले
जल भरुन संध्याकाळी
पापण्यात थेंबही आले . .

३. पाण्यात लव्हाळे न्हाती
थरथरते काया ओली
हातात हात घालून
हळूवार फुलेही भिजली . .

चारोळ्याशब्दक्रीडा

प्रतिक्रिया

निखिलराव's picture

14 Mar 2009 - 3:29 pm | निखिलराव

१ नंबर, ३, ४ ओळ्या

मनीषा's picture

14 Mar 2009 - 3:59 pm | मनीषा

डोळ्यात तुझ्या आभाळ
---
छान आहेत चारोळ्या !

विसोबा खेचर's picture

14 Mar 2009 - 5:20 pm | विसोबा खेचर

अतिशय सुरेख..!

आपला,
(फ्यॅन) तात्या.

हेरंब's picture

15 Mar 2009 - 10:25 am | हेरंब

सुरेख, नाजुक भावना, उत्कट!

क्रान्ति's picture

14 Mar 2009 - 6:17 pm | क्रान्ति

अप्रतिम चारोळ्या!
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}

प्राजु's picture

14 Mar 2009 - 10:43 pm | प्राजु

खूपच सुंदर..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

चन्द्रशेखर गोखले's picture

14 Mar 2009 - 10:56 pm | चन्द्रशेखर गोखले

लाजवाब !!

शितल's picture

15 Mar 2009 - 12:50 am | शितल

चारोळ्या आवडल्या. :)

नाना बेरके's picture

15 Mar 2009 - 12:06 pm | नाना बेरके

ती, ते, प्रेम इ. मध्ये बसणारं. बरं लिहिलंय, पण इतर विषयावरचंसुध्दा लिहा. राग वाटून घेऊ नका.

पालीवर लिहिलेली कविता वाचली होती कांय ?