फ्रॉस्ट्/निक्सन

शब्देय's picture
शब्देय in जनातलं, मनातलं
12 Mar 2009 - 1:13 am

फ्रॉस्ट्/निक्सन हा यंदाच्या ऑस्करसाठी नामांकन मिळवलेल्या चित्रपटांपैकी एक. यावेळी अगदी ठरवून सगळे ऑस्कर नामांकीत चित्रपट एक एक करुन पाहिले. ( अर्थात चित्रपट एक एक करुनच पाहतात...एकदम सगळे कुणी नाही पाहतं कारण ठसका लागतो.. जमल्यास ह.घ्या. न जमल्यास असो.)

फ्रॉस्ट्/निक्सन बद्द्ल मी बरेच गैरसमज करुन घेतले होते. प्रोमो पाहून ही कोण्या एका फ्रॉस्ट् ने निक्सनच्या घेतलेल्या मुलाखतीची एक डॉक्युमेंटरी असावी असा आपला मी एक पूर्वग्रह करुन घेतला होता. निक्सनच्या वॉटरगेट प्रकरणाबाबतचे माझे (अ)ज्ञानही राजकारणी लोकांनी केलेला एक झोलझाल इतपतच मर्यादित होते. कदाचित यामुळेच हा चित्रपट मी चालढकल करत सर्वात शेवटी पाहिला. पण माझे अनुमान सपशेल चुकले.

फ्रॉस्ट् सारख्या एका नवख्या पण जिद्दी पत्रकाराची धडपड व विजीगिषु वृत्ती , त्याच्या मित्रांची मुत्सद्देगिरी, निक्सनच्या पी.ए. चा कावेबाजपणा, खुद्द निक्सनची " सुंभ जळाला पण पीळ नाही गेला" वृत्ती , निक्सनला बेनकाब करण्यासाठी त्या काळात मिडियाच्या केला गेलेला पुरेपुर वापर, सत्यशोधक पत्रकारिता , मुलाखतीं दरम्यान एकदा फ्रॉस्ट् कडे तर एकदा निक्सनकडे झुकणारे पारडे ...आणि हे सगळे सत्य आहे , घडून गेले आहे या जाणिवेमुळे चित्रपट पाहताना मिळणारी एक वेगळीच अनुभूती ..मस्तच!

मिपाकरांनी हा चित्रपट जरुर पाहावा असे वाटले म्हणून हा ले़खप्रपंच!!! ज्यांनी पाहिला आहे, त्यांना काय वाटले हे पण जाणून घ्यावेसे वाटते.

चित्रपटआस्वादसमीक्षा

प्रतिक्रिया

दशानन's picture

12 Mar 2009 - 9:08 am | दशानन

ह्म्म्म,
वाटरगेट प्रकरणावर आहे तर :)
नक्कीच पहायला आवडेल !

कवटी's picture

12 Mar 2009 - 12:01 pm | कवटी

हे वाटरगेट प्रकरण काय आहे?
शब्देयाचे लिखाण वाचताना राहुन राहुन हा चित्रपट अनिल कपूरच्या "नायक" वर (किंवा नायक ज्या तमिळ्/तेलगू चित्रपटावरुन घेतलाय त्या चित्रपटावर) बेतला गेलाय असे वाटते....

कवटी