खराखुरा पीजे !! ऐकावं ते नवलचं !!!

सुनील's picture
सुनील in जनातलं, मनातलं
24 Jan 2008 - 11:25 pm

झारखंडच्या एका न्यायाधिशाने राम आणि हनुमान यांच्या विरुद्ध समन्स काढले. अपूर्ण पत्यामुळे ते परत आले तेव्हा त्यांनी स्थनिक वृत्तपत्रात जाहिरात देऊन राम आणि हनुमान यांना कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले!!!

हा पहा दुवा -

बातमी

विनोदविरंगुळा

प्रतिक्रिया

प्राजु's picture

24 Jan 2008 - 11:45 pm | प्राजु

मज्जा आहे देवांची हि आणि त्या न्यायाधिश महराजांची ही...

- प्राजु

पिवळा डांबिस's picture

25 Jan 2008 - 12:25 am | पिवळा डांबिस

समन्स परत आले, आता वॉरंट काढून अटक करा म्हणावे!

ऋषिकेश's picture

25 Jan 2008 - 12:28 am | ऋषिकेश

या बातमीत हे अगदी सार्थ आहे. भरपूर हसु आलं आनि कीवही कराविशी वाटली.

असो.
अवांतरः ऐकावं ते नवलच! अश्य नावाचं एक सदर एका मासिकात असायचं ... 'ठक् ठक् ' का?

-(जुना 'ठक् ठक्' प्रेमी)ऋषिकेश

चतुरंग's picture

25 Jan 2008 - 12:39 am | चतुरंग

"अमृत" असावं
त्यात इतरही सदरं असायची, जसे उ.सं.डु. (उप संपादकाच्या डुलक्या) ...

चतुरंग

बिपिन कार्यकर्ते's picture

25 Jan 2008 - 1:39 pm | बिपिन कार्यकर्ते

अमृत मासिकातच असायचे ते सदर.... अजून एक आठवते आहे.... मु.रा.वि. = मुद्रा राक्षसाचे विनोद

बिपिन.

सुनील's picture

25 Jan 2008 - 12:58 am | सुनील

मलाही निश्चित आठवत नाही पण ते कुठल्याशा वृत्तपत्राचे व्यंगचित्राचे शीर्षक होते असे वाटते. जसे - कसं बोललात (मटा). कदाचित जुन्या लोकसताचे?

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

वरदा's picture

25 Jan 2008 - 12:31 am | वरदा

काय वाट्टेल ते करतात ही लोकं..... ह. ह. पु. वा.

सुनील's picture

25 Jan 2008 - 1:05 am | सुनील

राम आणि हनुमानाचा पत्ता आम्हाला ठाऊक नाही हे खरेच!

परंतु, सांता क्लॉजला हा प्रश्न पडणार नाही, त्याचा पत्ता आहे -

सांता क्लॉज
नॉर्थ पोल
कॅनडा
H0H 0H0

टीप - या पत्त्यावर दरवर्षी हजारो पत्रे कॅनडाच्या पोस्ट कचेरीत येतात!!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

इनोबा म्हणे's picture

25 Jan 2008 - 1:14 am | इनोबा म्हणे

आजकालच्या न्यायव्यवस्थेत 'राम' राहिलेला नाही. कोण कोणाच्या नावाने समन्स काढेल काही सांगता येत नाही. साधारणपणे एक वर्षभरापुर्वी कोणा एका जॉर्ज बुश नामक पामराने आमच्या नावाचे समन्स काढले होते.

(दाम करी काम,झोपा काढी राम) -इनोबा

धनंजय's picture

25 Jan 2008 - 1:21 am | धनंजय

हा अतिरेक झाला, पण कायद्याच्या बाबतीत हा गंभीर मुद्दा आहे. अनेक वेळा इतका मूर्खासारखा समन्स न काढता हाच विचार कायद्याला करावा लागतो.

पुरातन श्रद्धास्थानाच्या स्थावर (आणि जंगम) मालमत्तेची मालकी कोणापाशी असावी? कोणा व्यक्तीची असू नये असे काही लोक म्हणतात - म्हणजे काशीविश्वेश्वरासारखे अति-पुरातन मंदिर त्याच्या हल्लीच्या पुजार्‍यांच्या मालकीचे नसावे. त्यासाठी ट्रस्ट केले तर? पण ट्रस्ट हे आताच तयार झालेले आहे, त्या मालमत्तेची मालकी असलेले कुठलेतरी एकक आधीपासून आहे असे मानावे लागेल. ट्रस्ट त्या खर्‍या मालकाचे केवळ विश्वस्त आहे - मालक नव्हे. ते एकक म्हणजे भक्तगण तर नाहीतच. प्रत्येक देवळाच्या महत्त्वाच्या निर्णयांबाबत मते घेण्यासाठी त्याच्या भक्तांची जनगणना घ्यावी लागेल! विठोबाच्या देवस्थानावर वारकर्‍यांची आणि विठोबाचे नावही माहीत नसलेल्या झुमरीतलैयामधील कोण्या ऐर्‍यागैर्‍याची समसमान मालकी असावी काय? मग महत्त्वाच्या निर्णयासाठी झुमरीतलैयात मतपत्रांचा गठ्ठा का पाठवू नये - नाही पाठवल्यास ती हक्कांची पायमल्ली होईल - छे छे - भक्तांची देवस्थानाच्या स्थावर-जंगम मालमत्तेवर मालकी अव्यवहार्य आहे. अर्थातच खरा मालक म्हणजे ते-ते विशिष्ट दैवत हेच आहे.

अमेरिकेत "एपिस्कोपल" नामक ख्रिस्ती पंथ फुटण्याची लक्षणे दिसू लागली आहेत. आज या पंथात फार लोक नसले, तरी पूर्वी खूप होते. त्यामुळे या पंथाकडे बरीच मालमत्ता आहे, प्रार्थनास्थळे समृद्ध आहेत. ही मालमत्ता कित्येक पिढ्यांची आहे - म्हणजे आजच्या भक्तांची नाही. ट्रस्ट फुटत असल्यामुळे कायदेशीर प्रश्न उपस्थित होत आहेत. ती मालमत्ता आपली नसून देवाची/पंथाची आहे, आपण केवळ विश्वस्त आहोत, असे दोन्ही गट मानतात. पण प्रत्येक फुटीर गट स्वतःला खरा, आणि दुसर्‍या गटा "चुकलेला" मानतो. म्हणजे "देवाचे प्रतिनिधित्व करण्यास दुसर्‍या गटातील विश्वस्त योग्य नाहीत" असे प्रत्येक गट मनापासून मानतो. ही फूट खरीच पडली तर "खर्‍या देवाच्या" मालकीहक्काच्या प्रश्नात कोर्टाला शिरावे लागेल.

पंथ फुटू नये असे वाटणारे भक्त (ज्यांना धर्मगुरूंचा तंटा बाष्कळ वाद वाटतो) गमतीने म्हणतात की या कायदेशीर दलदलीच्या भीतीने तरी फुटीर गटांनी समेट करून घ्यावी.

तात्पर्य हे उदाहरण हास्यास्पद असले तरी कमीअधीक अशीच उदाहरणे अनेक देवस्थानांबाबत वादग्रस्त आहेत. काहीच्या बाबतीत (भारतातही) हास्याच्याच नव्हे तर रक्ताच्याही चिळकांड्या उडालेल्या आहेत.

सुधीर कांदळकर's picture

27 Jan 2008 - 4:44 pm | सुधीर कांदळकर

दिसते. कितपत सत्य आहे कोण जाणे. पत्रकारांना पुरावा देण्याचे बंधन नाही. जर खोटी असेल तर कोर्टाची बीबीसी वर बदनामीचा खटला घालण्याची हिंमत आहे का? कोर्टे तर सामान्यांना शिक्षा करण्यात व गुन्हेगारांना मोकळे सोडण्यात पटाईत आहे असे ऐकून आहे. म्हणून तर अशा बातम्या छापून येतात.