सुख पुढे वाटे....

संध्यानंदन's picture
संध्यानंदन in जे न देखे रवी...
10 Feb 2009 - 4:45 pm

फुले चिखलात कमळ नाजुक सुंदर,
काटेरी फणसात गरे रसाळ मधुर,
दगडधोंडयातून वाहे ठंडगार झरा,
ऊस असे कठीन पण रस वाटे बरा,
झाड उभे उन्हात पण सावली का गार ?
प्रकाशमय सूर्यास जन्म देई अंधार,
घाव घातल्यावर दगडावर देव प्रगटतो,
भाजल्यावर माठ गार पाणी देतो
कोळसाच्या खाणीत मीळतात हीरे,
कोशातली अळी फुलपाखरु बनून फिरे,
गुलबासंगे असतात काटे,
काट्यातून चालल्यास हिरवळ पुढे भेटे,
दु:खातून गेल्यास सुख पुढे वाटे!

कविताविचार