मराठी दिन 2021

मराठी दिन 2021

 

शेराला सव्वाशेर

Primary tabs

ब्रिटिश's picture
ब्रिटिश in जनातलं, मनातलं
5 Feb 2009 - 12:50 pm

आर शित्याला पोलीसांनी धरलाय. जाम मारतान बग. बारक्या बातमी झेउन आला.
शित्या. सिताराम म्हात्रे. यकदम झोलर मानुस. आखोंशे सुरमा नीकालनेवाला. तो न्हेमी म्हानायचा ' ऊधारी ने वलखी वाडतात'.
गणा पाटलाची दोन येकर जमीन त्यान सात जनांना ईकलीवती. दुनीयेची ऊधारी आंगावर.

यकदा माजे घरी दोगा जनांना झेउन आला. माज घर तस रोडटच हाय. वटीवर बसवल न घरात आला .
आयला म्हनला 'लांबन आल्यात पावनं. गुळपानी दे. पाच मिन्ट बसतील न जातील.' गेला मागल्या दारानं.
धा मीन्ट जाली पंदरा मीन्ट, पावनं ऊटाया मागनात.
आय म्हनली 'बाबांनो क काम हाय क तुमच ?' तर म्हनल क 'शित्याला पाटवा. त्याला पंचवीस हजार दिल्त ते आनाला आत गेलाय.'
आय नी कपालावर हात मारला. 'आवो तो त कवाचा गेला हिथन. तूमाला टोपी घातली बगा.'

आश्या मान्साला पोलीसांनी धरला म्हनल्यावर त्यान कईतरी मोटाच हात मारला आसल ह्याची खात्रीच व्हती. पन गावचा मानुस जेल मदी हाय बोल्ल्यावर सगलीजन धावली. सरपंचान जामीन दिला न यकदाचा सोरवून आनला शित्याला.
आक्ख गाव ईचारत व्हत क केलस म्हुन पन भाद्दर तोंडातन यक शबुत दिकील काडीना.
शेवटी शेट्टीआन्नाच्या बार मदे बसवला मी न सूर्‍यान. तवा येक क्वार्टर पोटान गेल्यावर त्यान तोंड ऊंगडल न श्टोरी सांगतली.

'पून्याला गेल्तो कामासाटी. काम जाल्यावर सांजचा सारगेटला आलु यस्टी पकराला. वाटला जरा चा प्यावा म्हुन स्टालवर गेलो.
चा झेतला. मागुन हाक आयली 'क पाटील कस काय? '
माग बगतो त यक चालीसचा चश्मेवाला उबा वता. 'मी पाटील नाय मी म्हात्रे.' मी बोल्लो .' आवो तेच ते म्हात्रे. मना नायव वलीकल? मी पाटील, तूकाराम पाटील. आता वलखलाव?
'नाय क आटवत नाय बगा.'
'क बोलाच आता. कूट मूंबयला नीगालाय?'
' नाय पनवेल खारपाडा.' मी
आर तिज्या मी बी पनवेलाच चाललुय ना. चला माजेबरोबर. माजी क्वालिस हाय. डायवर बी. क बोल्ता?'
माज्या डोक्यान चक्रा फिरली. टिकटीच पैस वाचल. पनवेल पावत क्वालीस नी. वलख दाकवालाच पायजे. मी बी प्लान केला.
'तुमी माज्या लग्नाला आला वता क?'
'तर क वो? आता वलखलाव बगा. तूमाला आयरात स्टीलची टाकी नवती क दिल्ली ?'
'हां हां बरोबर, जरा ईसरलूच होतू बगा. ' मी ईसरल्याच नाटक केल. आपल्याला क हाय. फुकट जावाला त मीलल.
'मंग, आता कस? चला चला जाऊया आता. '
गाडीन जाउन बसलू. डायवर न गाडी चालू केली. एसी लावला. यकदम थनगार तीच्याआयला.
ईकडच्या तीकडच्या गप्पा मारता मारता पनवेल कदी आल कल्लच नाय. रात झालती.

पाटलान गाडी डायरेक थांबवली मीलन बार समोर.
' पावन्यांनु चला जरा दोन घोट झेव. रातची पोटान गेलेली बरी आसते.'
पून्यापासन गाडीतून फुकाट आनी वर दारू ? बेवडा मागतो बॅगपायपर देव देतो शीग्नेचर ? क्या बात हय !
गटागट यक क्वार्टर मारली. पाटलाचा यकच पेग झाल्ता. कंपनी म्हुन चवता मारला.
पाटील परत आग्रव कराला लागला. त्याला म्हनल आज नको. आज तब्येत नरम हाय माजी.

पाटलान बील दिल्ल न फुड नींगालो. मोबाईल च दूकान आल. पाटील म्हनला 'जरा येल हाय ना. नविन मोबाईल घ्यायचाय. येता कं?'
आपन नाय कस म्हन्नार. गेलो त्याचेसोबत. त्यान यक म्हागाचा मोबाईल काडला. मला दाकवला.' दादुस कसा हाय मोबाईल? आवरला क?'
मी म्हनल ' न आवराला क झाल ? मस्त हाय. झेऊन टाका.'
'कती रूपये रं ?' त्यान दुकान्दाराला ईचारल.
'पस्तीस हजार.'
माजे डोल्यासमोर अंदार. तोच पाटील बोल्ला आनकी यक काडा यातला.

दोन मोबाईल झेतल यका फटक्यात. कार्ड टाकली. मला म्हनला 'दादुस तू थांब जरा हीतच. मी रेंज हाय क बगून झेत भायेर.' आनी भायेर गेला.
पाच मिन्ट झाली , धा मिन्ट झाली पाटलाचा पत्ता नाय.
'वो तूम्हारा भाई कीधर गया?'
'वो मेरा भाई नाय. मय उसके गाडीमे आया हाय.उसको नई जानता.'
फाडकन कानाचे खाली जाल नींगाला. ए पकडके रख मा**** को. पूलीस को बूलाव मारो सालेको.
फुडच कय आयकायला मी सूदीवर नव्हतो.

आन काय सांगू तूमाला. तुजा साथीदार कूट हाय ? हे ईचारत पोलीस दोन दीवस मारत व्हते.

आमची ह ह पू वा झाल्ती. आख्रेरीस शेराला सव्वाशेर भेटलावता.

मिथून काशिनाथ भोईर
(जल्ला सगला काय नावानच हाय)

संस्कृतीविरंगुळा

प्रतिक्रिया

शेखर's picture

5 Feb 2009 - 12:56 pm | शेखर

दादुस क लिवताय ..

एकदम फर्मास ...

शेखर

अनंता's picture

24 May 2009 - 12:39 pm | अनंता

लय भारी!!
www.raaga.com/channels/hindi/movie/H000608.html

फुकटात वजन कमी करायचा सल्ला हवाय तुम्हाला? - चालते व्हा!!

सहज's picture

5 Feb 2009 - 1:01 pm | सहज

मिथुनभाय नेहमीसारखेच लै भारी.

:-)

दशानन's picture

5 Feb 2009 - 1:01 pm | दशानन

=))

जबरा !!!

*******


शब्दांच्या पलिकडे सुध्दा जग असतं,
काही गोष्टी नजरेने बोलल्या जातात !
फक्त होकार च नाही तर,
प्रेमाला नकारांची सुध्दा झालर असते !

विजुभाऊ's picture

5 Feb 2009 - 9:23 pm | विजुभाऊ

बेवडा मागतो बॅगपायपर देव देतो शीग्नेचर ;) :)
मस्त रे
प्रेमाला नकारांची सुध्दा झालर असते !
विषेषतः तो नकार झालरीचा झग्याकडून मिळाला असेल तर ;)

विंजिनेर's picture

5 Feb 2009 - 1:01 pm | विंजिनेर

मस्त हो कांबळे. उच्चार, ष्टोरी सगळं मस्त जमलंय..

'नाय क आटवत नाय बगा.'
'क बोलाच आता. कूट मूंबयला नीगालाय?'
' नाय पनवेल खारपाडा.' मी

पण कुणीकडची मराठी म्हणायची ही?
झकास!

ब्रिटिश's picture

9 Feb 2009 - 11:42 am | ब्रिटिश

पण कुणीकडची मराठी म्हणायची ही?

पनवेल खारपाडा

मिथुन काशिनाथ भोईर
(जल्ला सगला काय नावानच हाय)

चामट्या's picture

5 Feb 2009 - 1:06 pm | चामट्या

जल्ला लय भारी लिवलास
दादुस क लिवताय ..
मग चान्गला चोपला आसलन त्याला
माजे डोल्यासमोर अंदार
मायला मारयच्या आगुदरच अंदार

अवलिया's picture

5 Feb 2009 - 1:03 pm | अवलिया

क लिवलय क लिवलय

--अवलिया

अवलियाची अनुदिनी

घाटावरचे भट's picture

5 Feb 2009 - 1:05 pm | घाटावरचे भट

असच म्हनतय....क लिवलय क लिवलय

अनिल हटेला's picture

5 Feb 2009 - 1:08 pm | अनिल हटेला

असंच म्हणतय !!

बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

5 Feb 2009 - 2:07 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

दादूस, कुडं रं लपून राह्यला व्हतास एवडे दिवस? क लिवलंय, कं लिवलय.

अदिती
आमच्यात बौद्धीक संपदेचा कॉपीराईट घेण्याची पद्धत नाही आणि मी त्याला अपवादही नाही.

नंदन's picture

5 Feb 2009 - 3:49 pm | नंदन
बिपिन कार्यकर्ते's picture

5 Feb 2009 - 3:50 pm | बिपिन कार्यकर्ते

खतरनाक!!!

लय भारी बाला...

बिपिन कार्यकर्ते

धमाल मुलगा's picture

9 Feb 2009 - 12:09 pm | धमाल मुलगा

दादूस.... जल्ला, येक डाव तुला भेटायचा हय रं, आसलं भारी लिवनारा तुजा भेजाच पलवून नेनार, बोल!!! :)

>>बेवडा मागतो ब्यागपायपर..... =)) जल्लां, शिग्नेचरमदी मिथेन नाय तं मजा नाय येत ना, बोल ;)
मिथेन नाय तं डोल्यातून रगत नाय, मंग काय मज्जाच नाय.

दादूस, हा शित्या दिसतू कसा येकदा दाव रं, मलापण येकानं आशीच टोपी टाकलेली, त्योच हाय कं तो बगतो!

::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता? ::::

बिपिन कार्यकर्ते's picture

5 Feb 2009 - 3:52 pm | बिपिन कार्यकर्ते

प्रकाटाआ

बिपिन कार्यकर्ते

परिकथेतील राजकुमार's picture

5 Feb 2009 - 1:06 pm | परिकथेतील राजकुमार

वाचुन आमची पण ह ह पु वा झाली. एकदम खुसखुशीत लेखन केले आहेत :)

|!¤*'~` प्रसाद `~'*¤!|
"समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।"
आमचे राज्य

चामट्या's picture

5 Feb 2009 - 1:10 pm | चामट्या

शित्या. सिताराम घरत. यकदम झोलर मानुस

आनि आता हे बघा राव

मागुन हाक आयली 'क पाटील कस काय? '
माग बगतो त यक चालीसचा चश्मेवाला उबा वता. 'मी पाटील नाय मी म्हात्रे.' मी बोल्लो .' आवो तेच ते म्हात्रे.

आता
सिताराम घरत कि सिताराम म्हात्रे
तुम्ही ठरवा
जल्ला तुमच्या हिरोचा नाव चेंज झाला नं.

ब्रिटिश's picture

5 Feb 2009 - 1:12 pm | ब्रिटिश

म्हात्रेच. चुक जालीवती

मिथुन काशिनाथ भोईर
(जल्ला सगला काय नावानच हाय)

चामट्या's picture

5 Feb 2009 - 1:21 pm | चामट्या

बर आहे लिहिताना लक्ष द्या बाकि मस्त लिहिता गाव कोनता?
उरण कि पनवेल

मधु मलुष्टे ज्यु. बी. ए.'s picture

5 Feb 2009 - 1:10 pm | मधु मलुष्टे ज्य...

=)) =)) =)) =))

झक मारलं आन्‌ जेवताना वाचलाव सगला. सगला बाह्यर आला तोंडातला हसताना.

बाला जबरा !

--मधु मलुष्टे ज्यु.बी.ए.

प्रभाकर पेठकर's picture

5 Feb 2009 - 1:16 pm | प्रभाकर पेठकर

मस्त लिहीली आहे. खरोखरच शेरास सव्वाशेर भेटला म्हणायचा.

निष्कर्ष म्हणजे मेंदू थकल्याचे लक्षण!

विसोबा खेचर's picture

5 Feb 2009 - 2:18 pm | विसोबा खेचर

मनाला निखळ, निर्मळ, निर्विष आनंद देणारे लेखन... जियो मेरे लाले..!

बाला, आपण साला जाम मानतो तुज्या लेखनीला! :)

बेवडा मागतो बॅगपायपर देव देतो शीग्नेचर ? क्या बात हय !

संपलो, वारलो, खल्लास जालो...! :)

तात्या अहिरे,
दिवा गाव.

इनोबा म्हणे's picture

5 Feb 2009 - 2:18 pm | इनोबा म्हणे

कं लिवलास रे! मज्जा आली.

कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

नवनाथ's picture

5 Feb 2009 - 2:22 pm | नवनाथ

मस्त लिवलस रे बाल्या.
नवनाथ
मास्तरचा विद्यार्थी
अवांतरः मास्तर आता १५ दीस भाकरी भाजण्यात बिजि

सुनील's picture

5 Feb 2009 - 2:24 pm | सुनील

मस्त कथा.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

सुमीत भातखंडे's picture

5 Feb 2009 - 2:58 pm | सुमीत भातखंडे

गणा पाटलाची दोन येकर जमीन त्यान सात जनांना ईकलीवती
=))
भारीच.
पून्यापासन गाडीतून फुकाट आनी वर दारू ? बेवडा मागतो बॅगपायपर देव देतो शीग्नेचर ? क्या बात हय !

=))
लय भारी. जियो.

श्रावण मोडक's picture

5 Feb 2009 - 3:14 pm | श्रावण मोडक

पोतडीतून असेच अधूनमधून काढत रहा. आम्ही वाचून हसत राहू.

शंकरराव's picture

5 Feb 2009 - 4:04 pm | शंकरराव

धामाल केलीस बाला, जाम हसलो ..

प्राजु's picture

5 Feb 2009 - 8:16 pm | प्राजु

मस्तच.. खूप दिसांनी लिवलं कारं बाला??
लय झ्याक लिवलयं.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

सर्वसाक्षी's picture

5 Feb 2009 - 8:22 pm | सर्वसाक्षी

जबरदस्त!

गावकरी, आता भेटायला पायजे पुना

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

5 Feb 2009 - 8:30 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>बेवडा मागतो बॅगपायपर देव देतो शीग्नेचर
>>' ऊधारी ने वलखी वाडतात'
>>'वो मेरा भाई नाय. मय उसके गाडीमे आया हाय.उसको नई जानता.'

शेराला सव्वाशेर...!
च्यायला बाला ! हसुन हसुन पुरेवाट झाली.
काय जब्रा लिवतंय रे ! :)

टुकुल's picture

6 Feb 2009 - 1:58 am | टुकुल

लै भारी दादुस...

धनंजय's picture

5 Feb 2009 - 9:17 pm | धनंजय

नैतिक बोध अशा खुसखुशीत चटपटीत करून द्यावा तो ब्रिटिश यांनीच!

खतरनाक!

संजय अभ्यंकर's picture

5 Feb 2009 - 9:30 pm | संजय अभ्यंकर

संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/

llपुण्याचे पेशवेll's picture

6 Feb 2009 - 3:12 am | llपुण्याचे पेशवेll

छान १ लंबर. आवडले.

पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984

मदनबाण's picture

6 Feb 2009 - 5:03 am | मदनबाण

बाल्या लयं भारी लिवलयं रं तु... :)

मदनबाण.....

:) ...रत तेये ताचवा ही टेलउ लाम्हातु व्वा.

मुक्तसुनीत's picture

6 Feb 2009 - 5:10 am | मुक्तसुनीत

हेच म्हण्तो !! लई भारी !

चतुरंग's picture

6 Feb 2009 - 9:23 am | चतुरंग

दादुस, काय टांग मारली म्हनायची का काय जनु! एकदमच निपचित करुन टाकला म्हन की!

तो न्हेमी म्हानायचा ' ऊधारी ने वलखी वाडतात'.
गणा पाटलाची दोन येकर जमीन त्यान सात जनांना ईकलीवती.

आहाहा, काय लिवलंय, काय लिवलंय! चाबू़क!!

चतुरंग

नरेश_'s picture

8 Feb 2009 - 5:20 pm | नरेश_

आमचेकरं सुदा डिट्टो पाच्पन्नास सिताराम म्हात्रे हायेत. तेंची कथा कोन लिवनार?

वेताळ's picture

8 Feb 2009 - 5:42 pm | वेताळ

जाम आवडल बग.
वेताळ

विसुनाना's picture

9 Feb 2009 - 11:54 am | विसुनाना

कथा आवडली. आगरी भाषेमुळे जास्त खुलून आली आहे.

भास्कर केन्डे's picture

17 Feb 2009 - 7:43 pm | भास्कर केन्डे

शित्या सारके लयी भारी आयटम आमच्या गावात बी हायेत बगा... लयी हासलोन वाचुन.

दादुस फक्कड लिव्हता तुमी.

आपला,
(पंखा) भास्कर

मस्त कलंदर's picture

23 May 2009 - 11:10 pm | मस्त कलंदर

अशा आणखी खुमासदार कथा येऊ द्यात!!!

मस्त कलंदर..

नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

अनामिका's picture

24 May 2009 - 11:12 pm | अनामिका

आमचे "गुलजारभौ कोरतकर" आटवले तुमची इस्टोरी वाचुन..........
गाव कोनता तुमचा?
"अनामिका"
जो करी कर्म अहेतु,वेद तयास कळो न कळो रे।
ओळख पटली ज्यास स्वतःची,देव तयास मिळो न मिळो रे।

क्या बात हय ! :)