ऑक्सिटॉसिन अलिंगनौषधी

मृदुला's picture
मृदुला in जनातलं, मनातलं
30 Jan 2009 - 2:27 am

नेहमीच्या उत्क्रांतीच्या बातम्या चाळताचाळता ऑक्सिटॉसिनविषयी वाचले.

शास्त्राज्ञांनी असे शोधले आहे की माणसाला जेव्हा दुसर्‍या माणसाविषयी प्रेम, ममत्व वाटते तेव्हा पियुषिका ग्रंथीद्वारे ऑक्सिटॉसिन शरिरात सोडले जाते. या द्रव्यामुळे भावनिक धागे घट्ट होण्यास मदत होते. प्रयोगातून असेही सिद्ध झाले आहे की काही जातीच्या उंदरांत नर-मादी एकमेकांशी एकनिष्ठ राहतात ते ह्याच द्रव्याच्या प्रभावाने. माणसातील मर्यादित एकनिष्ठाही याच द्रव्यामुळे असावी असा कयास आहे. ऑक्सिटॉसिनच्या प्रभावाखाली माणूस दुसर्‍या माणसावर चटकन विश्वास टाकतो असेही एक संशोधन प्रसिद्ध झाले आहे

प्रेम व एकनिष्ठा वाढवण्यासाठी अलिंगनौषधी म्हणून ऑक्सिटॉसिन थेट बाजारात देखील येऊ घातले आहे. ते कितपत यशस्वी होईल?

ऑक्सिटॉसिन विकी

औषधोपचारविज्ञानमाहिती

प्रतिक्रिया

फटाकडी's picture

30 Jan 2009 - 4:05 am | फटाकडी

ऑक्सिटॉसिन वाचल आणि माझा कॉलेज मधला निबंध आठवला. खरतर, ऑक्सिटॉसिन हे गरोदर बायांना देतात, बाळंतपण सुरळीत होण्याकरता. आणि त्याचे वाईट परीणाम पण झालेले आहे. त्यामुळे जरा आश्चर्य वाटल.
पण तसा विचार केला तर त्याचे उपयोग पण होऊ शकातात, जास्त करुन Autistic मुलांकरता, त्यांना भावना कळायला कठीण जात. असो, बाजारात आलकीच कळेल कशाकरता येत आहे ते. :)

धनंजय's picture

30 Jan 2009 - 4:50 am | धनंजय

ऑक्सिटोसिनबद्दल हे संशोधन (ममत्ववर्धक) बरोबर असले, तरी सध्या तरी मेंदूच्या आतील मज्जासंस्थेपर्यंत पोचू शकेल अशा प्रकारचे ऑक्सिटोसिन-प्रिपरेशन उपलब्ध नाही. (सध्या ते तिथे पोचवण्यासाठी आडदांड सुईने पाठीच्या कण्यात टोचावे लागते.)

पण ते मेंदूपर्यंत पोचलेच पाहिजे असा नियम नाही. ते मेंदूपर्यंत पोचले असे वापरणार्‍यास ठामपणे वाटले, तरी पुरे असते.

अनेक पदार्थ असे असतात, की "रतिसुखवर्धक आहेत" असे कोणी म्हटल्यास रतिसुखवर्धन करतात. त्या अर्थी असे पदार्थ नि:संशय कार्यक्षम असतात.

अशा वेळी कार्यक्षमतेचे आणि किमतीचे विचित्र त्रैराशिक असते. असे औषध खूपच स्वस्त असले, तर ते कार्यक्षम असल्याबद्दल विश्वास बसत नाही. पण खूपच महाग असले तर अपेक्षाभंग होऊ शकतो. त्यामुळे अशा प्रकारच्या औषधांच्या विक्रेत्याला औषधाची किंमत फारच विचारपूर्वक ठरवावी लागते.

योग्य किमतीला ऑक्सिटोसिनचा स्प्रे विकला, आणि फक्त ज्यांना मनापासून असे काही हवे, त्यांनाच विकला, तर विक्रेत्याचा आणि ग्राहकाला दोघांना चांगला फायदा होऊ शकेल.

पिवळा डांबिस's picture

30 Jan 2009 - 9:53 am | पिवळा डांबिस

योग्य किमतीला ऑक्सिटोसिनचा स्प्रे विकला, आणि फक्त ज्यांना मनापासून असे काही हवे, त्यांनाच विकला, तर विक्रेत्याचा आणि ग्राहकाला दोघांना चांगला फायदा होऊ शकेल.
आयडियल प्लसिबो!!!!!

अवलिया's picture

30 Jan 2009 - 9:34 am | अवलिया

माणसातील मर्यादित एकनिष्ठाही याच द्रव्यामुळे असावी असा कयास आहे

हे द्रव्य काढून टाकायला काय करता येईल...

--अवलिया

काय तुम्ही संपर्कासाठी व्यनी वापरता? खव नाही? अरेरे!!! मग मिपाच्या गुढ इतिहासात कशी भर टाकणार?
व्यनी सोडा खव वापरा.

भडकमकर मास्तर's picture

30 Jan 2009 - 3:26 pm | भडकमकर मास्तर

काय ही संशोधक वृत्ती :)
______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

लिखाळ's picture

30 Jan 2009 - 3:58 pm | लिखाळ

आपला स्वभाव-पिंड मेंदुतील जैवरासायनिक बदलांमुळेच असतो/घडतो असे वैज्ञानिक गृहितक दिसते. ते सप्रमाण सिद्ध करता येण्याजोगे असावे. मला हा विषय रसपूर्ण वाटतो आहे.

ईश्वरदर्शन होताना मेंदूमध्ये काय क्रिया होतात ते पाहून ती रसायने स्त्रावणारी संप्रेरके कुणी काढील आणि समाधी-ईश्वरदर्शन-मनवाप्रति करुणा-प्रेम-वात्सल्य औषधानेच निर्माण होईल की काय! म्हणजे समाजसेवक व्हायचे आहे का? योगी व्हायचे आहे का? एक औषधी कोर्स दिला की समाजसेवक/योगी तयार :)
-- लिखाळ.

वाटाड्या...'s picture

30 Jan 2009 - 11:06 pm | वाटाड्या...

१ नंबर प्रतिसाद....

धनंजय's picture

31 Jan 2009 - 2:21 am | धनंजय

गांजाचा उपयोग करून समाधिस्थ अनुभव येण्यास काही मदत होते, असे काही सत्पुरुष सांगतात. असे काही अप्रसिद्ध साधू/साधक मला भेटलेले आहेत, पण गजानन महाराजांसारखे प्रसिद्ध पोचलेले लोकही त्यात आहेत.

सोमरसाबाबतही अनुभवक्षमता वाढवणारा पदार्थ म्हणून वापर असावा - काही ऋचांचा असा अर्थ लावता यावा.

अनेक जमातीतले लोक (उदाहरणार्थ अमेरिकेतील आदिवास्यांपैकी शामन-जाणते) औषधी वनस्पती वापरून समाधिस्थ अवस्थेत जाणे काही प्रमाणात सुकर करतात.

(वरील प्रतिसाद मुद्दामून विनोदी किंवा व्यंग्यात्मक नाही.)

आपला स्वभाव-पिंड मेंदुतील जैवरासायनिक बदलांमुळेच असतो/घडतो असे वैज्ञानिक गृहितक दिसते. ते सप्रमाण सिद्ध करता येण्याजोगे असावे.

हे गृहीतक लिखाळ यांना वरील लेखात कुठे दिसते, ते समजले नाही. अशा प्रकारचा व्यत्यास अयोग्य आहे. जर कोणी म्हटले "दारू पिऊन झिंग येते" तर "काहीतरी पिऊनच झिंग येते असे तुझे गृहीतक आहे" असा विचार माझ्या मनात सहसा येत नाही. (लिखाळ म्हणतात तसे गृहीतक मानणारे लोक कुठेतरी असतीलही म्हणा, माझी ना नाही. [मला भेटलेले नाहीत, पण माझ्या ओळखी थोड्याच आहेत.] फक्त या चर्चाविषयाशी त्या लोकांचा काय संबध आहे, ते समजले नाही.)

सर्किट's picture

31 Jan 2009 - 6:12 am | सर्किट (not verified)

पण गजानन महाराजांसारखे प्रसिद्ध पोचलेले लोकही त्यात आहेत.

झालं. आता चर्चेची वाट लागायला काही हरकत नाही !

गण गण गणात बोते !

-- सर्किट

लिखाळ's picture

31 Jan 2009 - 8:35 pm | लिखाळ

धनंजय,
प्रतिसादाबद्दल आभार.
अध्यात्मिक अनुभव घेण्यात काही रसायनांच्या सेवनाची मदत होते याबद्दल आपण चांगले लिहिले.

हे गृहीतक लिखाळ यांना वरील लेखात कुठे दिसते, ते समजले नाही. अशा प्रकारचा व्यत्यास अयोग्य आहे.

हे गृहितक वरील लेखात नाही. आणि मी व्यत्यास केला असेल आणि तो चूक असेल तर ते सुद्धा मान्यच.

याबद्दल जास्त खव मध्ये लिहितो. ते विषयांतर होईल.
-- लिखाळ.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

30 Jan 2009 - 5:51 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माहितीच नवीन आहे, तेव्हा त्याच्या उपयोगाबद्दल काय बोलावे बॉ आता !
ऑक्सिटॉसिन भारीच औषध दिसते !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विसोबा खेचर's picture

30 Jan 2009 - 6:36 pm | विसोबा खेचर

आयला! ऐकावं ते नवलंच!

प्रेम व एकनिष्ठा वाढवण्यासाठी अलिंगनौषधी म्हणून ऑक्सिटॉसिन थेट बाजारात देखील येऊ घातले आहे. ते कितपत यशस्वी होईल?

हम्म! यशस्वी झालं तर काही लोकांची ( की आमची? ;) ) अंमळ पंचाईतच होऊ शकेल!

आपला,
(चालू अविवाहीत!) तात्या.

नाटक्या's picture

31 Jan 2009 - 4:04 am | नाटक्या

>आपला,
>(चालू अविवाहीत!) तात्या.
वा तात्या,

आता हे वाचायचं कसं?

(चालू आणी अविवाहीत!) तात्या

कि

(अविवाहीत चालू!) तात्या.

तात्या ह. घ्या.

नाटक्या..

विनायक प्रभू's picture

30 Jan 2009 - 6:41 pm | विनायक प्रभू

काय पंचाईत होत नाही तात्या. ऑक्सीटोसीन चा बाप माणसात असते.
त्याचे नाव ऑक्स ची टोचीन. ह्या वर काहीही उपाय नाही.

वाटाड्या...'s picture

30 Jan 2009 - 11:08 pm | वाटाड्या...

हसुन हसुन पार लोळलो....सलाम विप्र तुम्हाला...

चित्रा's picture

30 Jan 2009 - 10:00 pm | चित्रा

प्रेम आणि एकनिष्ठा वाढवण्याची गरज ज्यांना वाटते त्यांना नक्कीच उपयोगाला येईल असे वाटते!
माहिती विचारप्रवर्तक आहे, पण मृदुला यांनी आपलेही मत मांडले असते तर चर्चेत अजून रंगत आली असती.

अवांतर - औषधाचे परिणाम हे डोसावर अवलंबून असावेत. बाळंतपणात मला ऑक्झिटॉसिन द्यावे लागले होते, पण (सर्वच स्त्रियांना होते त्याप्रमाणे) मूल जन्माला आल्यानंतर फक्त थकवा जाणवत होता. मुलीबद्दल प्रेमही जरा स्थिर झाल्यावर जाणवू लागले, असे आठवते. बहुदा तोवर बाहेरून दिलेल्या ऑक्झिटॉसिनच्या मोठ्या डोसाचा परिणाम ओसरला असावा.

नसेत सुईने घातलेले ऑक्सिटोसिन हे मेंदूत शिरत नाही (रक्तातून मेंदूच्या मज्जासंस्थेत मोठे रेणू शिरू शकत नाहीत).

परंतु बाळाला अंगाशी धरले (विशेषतः अंगावर पाजले) तर मेंदूच्या मज्जासंस्थेत ऑक्सिटोसिन तयार होते (आणि विशिष्ट ग्रंथीतून रक्तात सोडले जाते). त्याचा अर्थातच मेंदूवर परिणाम होऊ शकतो.

बाळाला अंगावर पाजताना बाळाबद्दल ममत्व उचंबळून येते, हा मातृत्वामधला एक मोठा हृद्य अनुभव आहे, असे अनेक स्त्रिया सांगतात.

चित्रा's picture

31 Jan 2009 - 3:33 am | चित्रा

मग माझ्या अवांतरमधील अध्याहृत असलेल्या प्रश्नाचे उत्तर मिळाले. धन्यवाद.

सर्किट's picture

31 Jan 2009 - 6:11 am | सर्किट (not verified)

आता कळले, की द्रौपदीला पाच पती का होते ते. कारण तिच्या मज्जासंस्थेत कधी ऑक्सिटोसिन तयारच झाले नाही. आपल्या पुरातन ग्रंथात सगळं साइंटिफिक आहे, हा समज दृढ झाला.

-- सर्किट

विसोबा खेचर's picture

31 Jan 2009 - 8:41 am | विसोबा खेचर

हा हा हा! छान प्रतिसाद! :)

आपला,
(बाकीच्या नवर्‍यांना धाकधपटशा दाखवून रोज स्वत:च चान्स मारणारा) तात्याभीम.:)

विनायक प्रभू's picture

31 Jan 2009 - 11:17 am | विनायक प्रभू

माझ्या इंगर्जी प्रतिसादाचे मराठी भाषांतर केल्याबद्दल शास्त्रींचे आभार.

फुस्स's picture

30 Jan 2009 - 11:04 pm | फुस्स

शब्द समजायला खूप त्रास झाला

अ-लिंगनौषधी असे एकदा वाटलं
...न-औषधी असे एकदा वाटले.
शेवटी मजकूर वाचल्यावर ते आलिंगन्-औषधी आहे असे कळले.

मस्करी समजून सोडून देणे.

महेंद्र's picture

31 Jan 2009 - 10:12 pm | महेंद्र

घाउक माल खरेदि करुन वापरला जातो असं म्हणतात.आचार्यांच्या आश्र्मात सं++++. संमाधी कडे जातांना....
तसेच सगळे ढोंगी बाबा, आपल्या भक्तांना कह्यात ठेवायला वापरतिल हे जे काय आहे ते..