वर्षपूर्ती

आपला अभिजित's picture
आपला अभिजित in जनातलं, मनातलं
28 Jan 2009 - 1:07 am

`मिपा'च्या चरणाशी आल्याला आज एक वर्ष पूर्ण झालं. एवढा प्रदीर्घ काळ मिपानं, मिपाकरांनी, संपादकांनी आणि मुख्य म्हणजे तात्यांनी या पामराला सहन केल्याबद्दल हार्दिक आभार! :D
परवाच खरडवहीतून नंदनने वर्षपूर्तीच्या (आगाऊ) शुभेच्छा दिल्या, तेव्हा माझ्याही ते लक्षात आलं. नाहीतर अशी वर्षंबिर्षं लक्षात ठेवणं, अवघडच जातं. हल्ली तिशी उलटल्यानंतर तर स्वतःचा वाढदिवसही लक्षात राहू नये, असंच वाटतं मला! :$ तर ते असो.
28 जानेवारी 2008 ला पहिला लेख टाकला इथे. त्याआधी सहा-सात महिने ब्लॉगवर लिहीत होतो. तिथेही मजा येत होती. पण विहिरीत पोहणं आणि समुद्रात पोहण्यात जो फरक असतो, तो इथे जाणवला. विहिरीत या टोकापासून त्या टोकापर्यंत तुम्ही शंभर वेळा गेलात, तरी कुणी विचारत नाही आणि समुद्रात चार लाटा पार केल्यात, तरी सगळ्यांचं लक्ष जातं. दुसऱ्याच लेखाला 21 प्रतिक्रिया मिळाल्या. धन्य धन्य जाहल्यासारखंच वाटलं!
ब्लॉग आणि मिपा वरचं लेखन, यात एक तत्त्व मात्र कटाक्षानं पाळलं. ब्लॉगवर हटकून वैयक्तिक अनुभव लिहायचे आणि "मिपा'वर अतिव्यक्तिगत व्हायचं नाही, हा नियम ठेवला. अगदी अलीकडच्या काळात मी "मिपा'वर काही प्रमाणात व्यक्तिगत लिहिल्याचं आढळेल. पण तो अपवाद.
ऑफिस, बायको, मुलगी आणि घरची भांडीधुणी सांभाळून फावल्या वेळेत मिपा, ब्लॉग वगैरे "उकिरडे' फुंकण्याचे उद्योग करावे लागले, लागतात. त्यासाठीही बायकोच्या शिव्या खाव्या लागतातच. पण त्याला (आणि तिलाही!) सध्या तरी पर्याय नाही. (|: (मिळाला, की पाहू!) त्यामुळे इतर सगळे विषय वाचणं, त्यावर प्रतिक्रिया देणं, प्रति-प्रतिक्रिया देणं, दरवेळी शक्‍य होत नाही. काही काही लोक दिवसातून दहा दहा तास "मिपा'वर पडीक असतात, असं आजच एका धाग्यातून कळलं. माझा हा हिशेब एका आठवड्याचा असेल.
काही वेळा केवळ सूचना आणि आक्षेप नोंदविल्याबद्दल तात्यांच्या शिव्याही खाल्ल्या. पण लगेच पायाबिया पडून टाकलं त्यांच्या. "मिपा'चा बाप, तो आपलाही "बाप'च की! त्याच्या पाया पडायला काय लाजायचं? तात्यांच्या लेखणीवर, दिलखुलास व्यक्तिमत्त्वावर आपलं मनापासून प्रेम आहे बुवा! >:D<
"मिपा'ची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढते आहे आणि नवनवे सदस्यही येत आहेत. मात्र त्यांनी आणि जुन्या सभासदांनीही एक कटाक्ष पाळायला हवा, असं वाटतं. "मिपा'नं आपल्याला उपलब्ध करून दिलेल्या या व्यासपीठाचा योग्य उपयोग व्हायला हवा. आपल्याला जे काही अनुभवायला मिळतं, ते सगळंच दुसऱ्याला सांगण्यासारखं नसतं, सांगण्याची गरज नसते, दुसऱ्याला एवढं सगळं ऐकायला वेळ नसतो, याचाही विचार आपल्या लेखनात हवा. नाहीतर उगाच भारंभार विषय वाढत जातात. एका सदस्याने एकदा एक विषय टाकल्यानंतर पुन्हा किमान पाच दिवस नवा कोणताही विषय न टाकण्याचं स्वयंबंधनही पाळायला हवं. "वाचायचं नसेल, तर वाचू नका' हा पर्याय आहे हे कबूल, पण असे विषय वाढण्यामुळं वाचकावर, तसंच चांगलं लेखन करणाऱ्यांवरही कळत-नकळत अन्याय होतो, याबाबत कुणाचं दुमत नसावं. कुणी काही (मी नव्हे!) सूचना केली, तरी वास्सकन अंगावर धावून न जाता, :T त्यामागची भूमिकाही समजून घेण्याची परिपक्वता हवी. "मिपा'वरची अनेक भांडणं त्यामुळं मिटू शकतील.
आणखी एक.
`मिपा' तात्या स्वतःच्या खर्चानं चालवतात. त्याबाबत एका नव्या सदस्यानंही आज काही उपाय सुचविलेले वाचले. आपल्याला याबाबत काही आर्थिक मदत करता येईल का? म्हणजे, नियमितपणे जे सदस्य येतात, अशा काही लोकांनी दरवर्षी प्रत्येकी शंभर रुपये दिले, तरी पुरेसं होईल, असं मला वाटतं. अर्थात, तात्यांचं याबाबत काय मत आहे, याची कल्पना नाही मला. पण एक प्रस्ताव म्हणून आपल्याला विचार करता येईल?
असो. बरंच प्रवचन दिलं.
आणखी काही काळ (असंच) पिडण्याचा विचार आहे. सांभाळून घ्या! >:)

मुक्तकप्रकटन

प्रतिक्रिया

संदीप चित्रे's picture

28 Jan 2009 - 3:52 am | संदीप चित्रे

सहमत :)

प्राजु's picture

28 Jan 2009 - 5:08 am | प्राजु

काही धागे आणि कौल असे असतात की, नक्की काय साधायचे त्यातून तेच समजत नाही. कधी कधी कलादालनच्या नावाखाली फोटोशॉपच्या किळसवाण्या करामती डकवल्या जातात. लेखन करण्यासाठी मिपासारखे फुक्कट व्यासपीठ मिळाले याचा गैरफायदा कोणी घेऊ नये हीच इच्छा मिपाच्या संपादक मंडळा पैकी एक म्हणून व्यक्त करावी वाटते.
वर्षपूर्तीसाठी अभिनंदन ..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

smita gogate's picture

28 Jan 2009 - 2:41 pm | smita gogate

वर्षपूर्तीसाठी अभिनन्दन

मधु मलुष्टे ज्यु. बी. ए.'s picture

28 Jan 2009 - 2:45 pm | मधु मलुष्टे ज्य...

वर्षपूर्तीच्या शुभेच्छा ! :)

बाकी खर्चाबद्दल तात्यांकडुन ऎकायला आवडेल.

--मधु मलुष्टे ज्यु.बी.ए.

अवलिया's picture

28 Jan 2009 - 3:29 pm | अवलिया

अभिनंदन..... :)

--अवलिया

काय? तुम्ही अजुन तुमची खव साफ नाही केली‍? मिपाच्या इतिहासाला गुढ बनवायला हातभार नाही लावला?
मिपाकर कसे म्हणवते तुम्हाला !!!

नीलकांत's picture

28 Jan 2009 - 3:33 pm | नीलकांत

अभिजित,

वर्षपुर्तीसाठी अभिनंदन !

:)

नीलकांत

स्वत:ची टिमकी वाजवून घेणे हा या धाग्यामागील उद्देश नव्हता, तर मिपा संबंधी काही विषयांवर चर्चा घडवणे, हा होता.

पण तो प्रयत्न वाया गेला, असे वाटते.

असो.

पुन्हा कधीतरी.

नितिन थत्ते's picture

29 Jan 2009 - 7:40 pm | नितिन थत्ते

आजच काही प्रश्न मनात उभे राहिले होते.

  1. तात्या हे 'स्थळ' स्वखर्चाने चालवितात. तो खर्च किती असतो?
  2. आपण तात्यांच्या खर्चाने एकमेकाला का झोडपावे? पण म्हणून झोडपायचे थांबावे का? तर अजिबात नाही. तर आपल्या पैशांनी ही हाणामारी करावी. म्हणून आपण सर्वांनी वर्गणी द्यायला हवी असे मला वाटते. नीलकांतना व्य. नि. पाठवला तर त्यांनी तूर्तास नको असे म्हटले.
  3. अगदी सदस्य होण्याबद्दल वर्गणी घ्यायची नसेल तरी ऐच्छिक वर्गणी जमा करायला काय हरकत आहे. जास्त पैसे उरले तर समाजिक कार्याला दान करता येईल (दान हा शब्द मला आवडत नाही पण दुसरा शब्द सुचला नाही).

मिपाकरांचे मत जाणून घ्यायला आवडेल.

खराटा
(येथे उत्तम काथ्या बारीक कुटून मिळेल)

विसोबा खेचर's picture

30 Jan 2009 - 7:42 pm | विसोबा खेचर

अभिनंदन अभिजितराव!

अगदी मनापासून लिहिले आहे. मिपा आपलेच आहे, आपल्या सर्वांचेच आहे. माझा मालकी हक्क फक्त मुखपृष्ठावरील कोटेशन बदलण्यापुरता आणि आजची खादाडीचे चित्र बदलण्यापुरता!

अगदीच कुणी विनाकारण गरळ ओकू लागला तरच मला मालकी हक्कांचा वापर करावा लागतो. आणि हो, शुद्धलेखनासंबंधी रटाळ चर्चादेखील मला मालक म्हणून धाडकन उडवून टाकायला आवडतात! :)

असो. आपल्या सर्व मायबाप मिपाकरांचा मी कृतज्ञ आहे...

तात्या.