गुलबचा सण

पुष्कराज's picture
पुष्कराज in जे न देखे रवी...
25 Jan 2009 - 9:12 am

वर्ष एक झाल सखे
गुलाबाचा सण होता
दोन मने जोड्णारा
एक वेडा क्षण होता

फुललेल्या गुलाबाला
एक फुल दिल होत
लाजुनिया फुल वेड
बावरुन गेल होत

मनामध्ये होती भीती
काटे त्याचे बोचतिल
नकाराचे शब्द तिचे
कायमचे टोचतील

पण माझ्या गुलाबाला
नव्हतेच मुळी काटे
डोळ्यांनीच बोलणारे
होते वेडे फुल माझे

वर्ष एक गेल कस
कळलच नाही काही
गुलाबाच्या गंधातच
गुंतुनिया मन राही

कविताआस्वाद

प्रतिक्रिया

सहज's picture

25 Jan 2009 - 9:41 am | सहज

हॅपी एनिव्हर्सरी हा!

अवलिया's picture

26 Jan 2009 - 9:34 am | अवलिया

असेच बोल्तो

--अवलिया

अवलियाची अनुदिनी

आचरट कार्टा's picture

26 Jan 2009 - 1:52 am | आचरट कार्टा

अरे वा! वर्ष झालं म्हणायचं... आमच्या सुद्धा शुभेच्छा.
वहिनीलाही कळवा आमच्यातर्फे.

अवांतर : काना काय झाला? अर्थात, अश्या वेळी असली गडबड क्षम्य :D
--------------------------------------
अपन को क्या...? दिल बोले, तो डन !

धनंजय's picture

26 Jan 2009 - 2:01 am | धनंजय

प्रस्ताव स्वीकार व्हायच्या पहिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!

प्राजु's picture

26 Jan 2009 - 2:34 am | प्राजु

कविताही छान आहे हो.

पण माझ्या गुलाबाला
नव्हतेच मुळी काटे
डोळ्यांनीच बोलणारे
होते वेडे फुल माझे

हे मात्र अगदी... हळूवार.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

प्रभाकर पेठकर's picture

26 Jan 2009 - 10:52 am | प्रभाकर पेठकर

कविच्या भावना व्यक्त करणारी एक चांगली कविता असेच वर्णन करावे लागेल.
मिपावर सक्ती नसली तरी व्याकरणाकडे लक्ष द्यायला हवे होते. अर्थ बदलतात.
उदा. दिल (हिंन्दी: हृदय) इथे दिले किंवा दिलं असे हवे.
तसेच 'होत' आणि 'होतं' (किंवा 'होते') ह्यात फरक आहे. 'वेड' आणि 'वेडं ('वेडे') ह्यातही फरक आहे.
'होते वेडे फुल माझे'
ही ओळ कशी योग्य वाटते. एकाच कवितेच्या एका ओळीत 'होत' आणि 'वेड' असे अयोग्य शब्द योजिले आहेत आणि दुसर्‍या ओळीत 'होते' 'वेडे' अशा योग्य शब्दांची योजना आहे. (ह्याचे आश्चर्य वाटले.)
तुमच्या जवळ काव्य प्रतिभा आहेच. पहा, पुढच्या वेळी जमल्यास व्याकरणशुद्ध कविता वाचण्यात आली तर स्वादिष्ट शिर्‍यात दाताखाली कचकच आल्याची भावना होणार नाही.

धन्यवाद आणि अभिनंदन.

निष्कर्ष म्हणजे मेंदू थकल्याचे लक्षण!