विश्वजाल आणि कर्बवायूचे उत्सर्जन

लिखाळ's picture
लिखाळ in जनातलं, मनातलं
12 Jan 2009 - 5:11 pm

नमस्कार मंडळी,

आजच सकाळी पेपरात वाचले की गुगल मुळे कर्बवायुच्या उत्सर्जनात भर पडते आणि एकदम अश्चर्य वाटले. ती बातमी बीबीसीच्या स्थळावर वाचता येईल. एका अमेरिकन शास्त्रज्ञाने केलेल्या पाहणीनुसार आपण एकदा गुगलवापरुन शोध घेतला की ७ग्रॅ कर्बवायूची भर वातावरणात पडते. गुगलच्या प्रवक्त्यांच्या म्हणण्यानुसार सांगीतला गेलेला हा आकडा फार मोठा असून तो वास्तवात केवळ ०.२ग्रॅम इतकाच आहे. बातमीमध्ये, अमेरिकन संशोधकांच्या मते सध्या आयटीचा जागतिक कर्बवायू उत्पादनात २ टक्क्याचा वाटा आहे.

तो आकडा वास्तविक काहिही असो. पण आपल्या इंटरनेच्या वापरामुळे जगात इतर ठिकाणी चालू असलेल्या सर्वर मधून आपण माहिती घेतो आणि त्या सर्व कारभारात वीज वापर होतो. या कारभारामुळे प्रदुषणामध्ये भर पडते असे माझ्या कधीच लक्षात आले नव्हते ते आज या बातमीने अचानक लक्षात आले.

वास्तविक संगणकाच्या वाढत्या वापरामुळे कागदाचा वापर कमी झाला आहे आणि त्याचा चांगला परिणाम निसर्गचक्रावर होत असणार असे मला वाटत होते. पण संगणक वापर आणि इंटरनेट वापराचे हे वेगळे आयाम माहितीत भर घालणारे आहेत.

मागे कधीतरी बीबीसीवर ब्लॅकल या योजनेबद्दल ऐकले होते. ती बातमी सुद्धा वाचण्यासारखी आहे. पांढर्‍या पिक्सेल्स जास्त वीज वापरतात तर काळ्या पिक्सेल्स कमी वीज खर्च करतात. या गृहितकावर ब्लॅकल ही योजना आधारलेली आहे. त्यांनी गुगलला जोडणी देणारे काळे वेब-पान तयार केले आहे. गुगलने आपले स्वागतपृष्ठ पांढरे बनवले आहे ते जास्त वीज खर्च करते म्हणून ब्लॅकलने काळे पान बनवून तो खर्च टाळायचा प्रयत्न केला आहे. थेंबे थेंबे तळे साचे या उक्तीवर भरंवसा ठेऊन वेळीच प्रदुषणाला आवर घालण्याचा त्यांचा मानस आहे.

मला वृत्तपत्रांत मिळालेली ही माहिती तुम्हाला द्यावी या हेतूने हा लेख प्रपंच.
आपलाच,
--लिखाळ.

वावरतंत्रविज्ञानमाध्यमवेध

प्रतिक्रिया

मदनबाण's picture

12 Jan 2009 - 5:19 pm | मदनबाण

हम्म..गुगलच पांढर्‍या पेजच्या जास्त वीज खर्च करण्याबद्दल माहित होते...
गुगलचा एक प्रयत्नः-- http://www.google.com/corporate/green/energy/

मदनबाण.....

"Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations
It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God."

- Indian Armed Forces -

लिखाळ's picture

13 Jan 2009 - 4:12 pm | लिखाळ

बाणा,
प्रतिसादाबद्दल आभारी आहे.
-- लिखाळ.

प्रियाली's picture

13 Jan 2009 - 4:18 pm | प्रियाली

प्रत्येक संगणकाशेजारी एखादे शोभेचे (खरे) झाड ठेवा. वरील प्रश्न सुटेल, संगणकाची शोभा वाढेल, मन प्रसन्न राहिल आणि बाकीचे फायदे खाली वाचा.

अधिक माहिती: http://www.houseofplants.co.uk/healthbenefits.html

सहज's picture

13 Jan 2009 - 5:46 pm | सहज

चांगली माहिती लिखाळ.