" गजरा "

sanjubaba's picture
sanjubaba in जे न देखे रवी...
10 Jan 2009 - 3:42 pm

स्वप्नात येऊन माझ्या रंगतो
आणि पापण्यावर भिरभिरतो " गजरा "
माझे गीत घेऊनी ओठात
तुझ्या केसात शिरतो " गजरा "

तुझ्या भावना, तुझे दु:ख
न विचारता मज सांगतो " गजरा "
तुझेच स्वप्न या जीवनात
मला सखे, देतो हा " गजरा "

आकाशातल्या चांदण्यासम
तुझ्या केसात वाटतो " गजरा "
पूजा करावी जशी रतीची
तसा तुज मी वाहतो " गजरा "

आरत प्रीतीची हाक त्यात
म्हणून कसा फुलतो " गजरा "
प्रेमाखातर तुझीयासाठी
म्हणून मी आणतो " गजरा "

तू कळि मोहक जशी फुलाफुला त
तसा तसा, तो खुलतो " गजरा "
तुझाच सुगंध घेऊन सखे,
आसंम ती दरवळतो " गजरा "

पाहती तेव्हा सारेजन तुलाच
माझ्या मनी तव मोहर तो " गजरा "
माझी प्रीत घेऊन कुशीत
केसात तुझ्या शोभतो " गजरा "

जेव्हा पासून तू या मनात
खरच, मज आवडतो "गजरा"
मी दिलेल्या पाकळ्याचा
सांग तुला का कळतो "गजरा"

नजर लागता दुसरा-या कुणाची
अ चानक को मजतो " गजरा "
निखा-यासम या मनात
सखे, माझ्या मग जळतो " गजरा "

प्रेमकाव्यप्रकटन