लेखकांचे मानधन (लेखाचा दुवा)

लिखाळ's picture
लिखाळ in जनातलं, मनातलं
9 Jan 2009 - 6:33 pm

नमस्कार मंडळी,
आजच साप्ताहिक सकाळ मध्ये एक लेख वाचला. श्री सुनील कर्णिक यांनी लिहिलेल्या लेखकाचं मानधन ४४ लाख रुपये या लेखात भारतीय लेखकांसाठी काही उत्साहवर्धक बातमी आहे.

आंतरजालावर अनेक मराठी लेखक त्यांच्या कसदार आणि बहारदार लेखणीने लेखन करताना आपण पाहतो. त्यांना ही बातमी वाचून उत्साह यावा अश्या सदिच्छेने त्या लेखाचा दुवा दिला आहे.

पुढेमागे आपल्या माहितीतल्या कुणाला असे लाखो रुपये लेखनासाठी मिळाले तर आपल्याला आनंदच होईल नाही का ? :)

या लेखात लिटररी एजंट असा जो उल्लेख आहे, त्या बद्दल कुणाला माहिती आहे का? लिटररी एजंट्स म्हणजे काय?

--लिखाळ.

वावरबातमीप्रतिक्रिया

प्रतिक्रिया

सुनील's picture

9 Jan 2009 - 7:11 pm | सुनील

उत्साहवर्धक बातमी!!

मराठीत आजवर केवळ लेखन-कौशल्यावर उपजिवीका करणारे पुल सोडले तर कोणीही नाही. त्यामुळे इंग्लीशसाठीचे भरमसाठ आकडे पाहून बरे वाटले, तरी मराठीच्या वाट्याला किती दमड्या येतील, हा प्रश्नच आहे!

लिटररी एजंट म्हणजे लेखक आणि प्रकाशक यांच्यातील दलाल असावा असे वाटते. मराठीसाठीतरी हा प्रकार नवीनच!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

श्रावण मोडक's picture

9 Jan 2009 - 7:42 pm | श्रावण मोडक

असाच लेख आठवतो. काही दिवसांपूर्वी एका इंग्रजी नियतकालिकाने भारतीय (इंग्रजी) लेखकांना लाखाच्या घरात कसे मानधन मिळते आहे याची स्टोरी केली होती. हे सगळे मराठीत? बापरे!!! लाख सोडा, पाच आकड्यात तरी? अवघडच काम.

लिखाळ's picture

9 Jan 2009 - 7:48 pm | लिखाळ

बापरे!!! लाख सोडा, पाच आकड्यात तरी? अवघडच काम.
पाच आकड्यांत :) हा हा.

लेखात त्यांनी शेवटी एका शिक्षकाचे उदाहरण देऊन आठ लाख वगैरे आकडे दिले आहेत.
रामदास भटकळांचे काही प्रयत्न सुद्धा लिहिले आहेत.
परवा एका बातमीत असे होते की लोक हल्ली मोठ्या प्रमाणावर पुस्तके विकत घेऊन वाचणे पसंत करतात वगैरे :)
पाहु लेखकांना चांगले दिवस येतील अशी आशा. नाहितर मराठी लोकांनी इंग्रजीवर प्रभूत्व मिळवावे आणि पैसा कमवावा :)
-- लिखाळ.
माझी अनुदिनी
'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी पडतात.

श्रावण मोडक's picture

9 Jan 2009 - 9:33 pm | श्रावण मोडक

कर्णीक यांचा लेख पूर्ण वाचला आहे. मराठीसंदर्भात केवळ भाबडेपणा यापलीकडे त्याला काहीही अर्थ नाही. या मुद्याचे अर्थशास्त्रीय, व्यावसायीक विश्लेषण आवश्यक आहे. पॉप्युलरचे आयुर्मान, गेल्या वर्षीचा दिल्लीतला अनुभव वगैरे व्यवसाय म्हणून विचार करावयाचा झाला तर अंगभूतच विरोधाभासी आहे. इतकी वर्षे मराठी पुस्तक व्यवसाय सुरू आहे आणि आज इंग्रजीतून मराठी पुस्तकांचा परिचय करून देण्याच्या 'कल्पकते'त जातोय आपण. हसावे की रडावे? हजाराच्या आवृत्तीपलीकडे मराठीची उडी गेल्याचे दाखले सांगा. मोजून-काजून चार-दोन लेखक आणि विरळा लेखकांच्या अपवादात्मक साहित्यकृतीच्या पलीकडे जातात ते दाखले? इकॉनॉमीज ऑफ स्केल, उत्पादन वाढले की खर्चात कपात वगैरे मुद्दे न आणलेलेच बरे. वर्षानुवर्षे पुस्तकांचा व्यवसाय परवडत नाही हा ओरडाच विरोधाभासी आहे हे ध्यानी घ्यावे लागेल. व्यावसायिक मंडळी केवळ नफाच फुगवण्याचा सत्यावादीपणा करीत नसतात, तर तोटाही फुगवत असतातच. आणि तरीही वर्षानुवर्षे व्यवसाय करीतच असतात, हेच एक अर्थशास्त्रीय व्यावसायीक सत्य. व्यवसाय करण्याची रीतच अशी असेल तर बाकी काय बोलावे? आणि मग मानधनाचे आकडे वगैरे हाहाहाहाहाहा असेच राहतात. लेकीन आशा अमर आहे, नाही तर वाघिणीचे दूध प्यावे माणसाने हे बरे!!!
(हा सगळा प्रतिसाद वैयक्तिक रोख ठेवून लिहिलेला नाही. या प्रश्नाच्या बाजू मांडण्यासाठी लिहिला आहे. केवळ तुमच्या प्रतिसादावरचा प्रतिसाद असा तो मानू नये ही विनंती).

लिखाळ's picture

9 Jan 2009 - 9:40 pm | लिखाळ

प्रतिसादाबद्दल आभार.
या व्यवसाया बद्दल मला काहिच माहिती नाही. तुमच्या प्रतिसादाटतुन आणि कर्णिकांच्या लेखातून थोडे फार कळाले.

विरंगुळा - तो लेख वाचल्यावर गेल्या चार तासात बरेच स्वप्नरंजन केले. मघाशी तर मर्सिडीज सुद्धा खरेदी केली. आता विकून टाकावी म्हणतो :) वाघिणीचे दूधच प्यावे.
-- लिखाळ.
माझी अनुदिनी
'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी पडतात.

श्रावण मोडक's picture

9 Jan 2009 - 9:50 pm | श्रावण मोडक

स्वप्नरंजन बाकी फर्मास आवडले. ती मर्सिडीज विकू नका. स्वप्नात मी तुम्हाला भेटतो, दोघे मिळून थोडे फिरून येऊ त्या गाडीतून. लाखाचा आकडा माझ्याही डोळ्यासमोर चमकतो आहेच. थोडी मौज करता येईल. शँपेन पिऊन खूप दिवस झालेत. आधी शँपेन आणि मग थोडे इतर काही (ते ग्लेन मोरांजी वगैरे). आपल्या लाखमोलाच्या मानधनाचा आनंद (स्वप्नात का होईना) साजरा करूया की? कसे?

लिखाळ's picture

11 Jan 2009 - 8:12 pm | लिखाळ

जरूर ! :)
-- लिखाळ.

विकास's picture

11 Jan 2009 - 8:18 pm | विकास

>>>आधी शँपेन आणि मग थोडे इतर काही (ते ग्लेन मोरांजी वगैरे)

मी चुकून मोरांजी ऐवजी मोरारजी वाचले आणि थोडासा गोंधळून गेलो... :?

लिखाळ's picture

11 Jan 2009 - 8:24 pm | लिखाळ

हा हा हा.. :)
-- लिखाळ.
माझी अनुदिनी
'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी पडतात.

श्रावण मोडक's picture

11 Jan 2009 - 10:22 pm | श्रावण मोडक

ठिकाणी भलतेच आठवणे ही 'मोरारजी'ची कृपा!!! मोरांजी असती तर असे झाले नसते...
(आता हे ह.घ्या.सां.ला.न.)

विकास's picture

9 Jan 2009 - 10:08 pm | विकास

बातमी नक्कीच उत्साहवर्धक आहे. पुस्तकाची, विशेष करून अमेरिकेतील अभ्यासाच्या पुस्तकांची किंमत हा एक वेगळा चर्चेचा विषय होऊ शकेल. प्रचंड महाग (विशेष करून विद्यार्थीदशेत). त्यावरून आमच्या विद्यापिठातील पुस्तकाच्या दुकानात वैतागलेल्या विद्यार्थ्यांसाठी माहीतीपत्रक लावल्याचे आठवते. त्याप्रमाणे प्रकाशकाला जवळपास ५०% पैसे मिळतात तर लेखकाला साधार ५-६% असे काहीसे भाव होते...

बाकी मला आधी लेखाचे शिर्षक वाचून वाटले, तात्याच मिपावरील लेखकाला मानधन देणार आहेत म्हणून ;)

विसोबा खेचर's picture

10 Jan 2009 - 12:06 am | विसोबा खेचर

त्यांना ही बातमी वाचून उत्साह यावा अश्या सदिच्छेने त्या लेखाचा दुवा दिला आहे.

हा हा हा! नुसता उत्साह येऊन उपयोग काय? आमच्या लेखनाकरता जळ्ळं कोण दमड्या मोजणार आहे? :)

पुढेमागे आपल्या माहितीतल्या कुणाला असे लाखो रुपये लेखनासाठी मिळाले तर आपल्याला आनंदच होईल नाही का ?

हो, नक्कीच होईल..

त्या आनंदाची वाट बघतो..!

काय रे लिखाळा, लेका तू अशी स्वप्न केव्हापासून बघायला लागलास? माझं ऐक. ही स्वप्न आहेत छान पण ती बघणं सोडून दे आणि वास्तवात ये बाबा!

अजून तरूण आहेस, अनुभवाने लहान आहेस म्हणून हा सल्ला! :)

स्वगत : छ्या ..! म्हणे लाख्खो रुपये मिळणार! लागले लगेच धावायला..! :)

तात्या.

रेझर रेमॉन's picture

10 Jan 2009 - 12:45 am | रेझर रेमॉन

मराठी लेखनाला ला़खात मानधन मिळतं.
वि.पा..निपतकारांना विचारून पहा.
मर्स नको... फेरारी तून फेर्‍या मारूया.
निदान एका मराठी माणसाकडे ती आहे.
हजार प्रतिंची एडीशन काढून एकंदर छान चाललंय.
जे.के.रॉलिंग होईल का कोणी?
- रेझर

लिखाळ's picture

11 Jan 2009 - 8:14 pm | लिखाळ

प्रतिक्रियांबद्दल सर्वांचे आभार मानतो.
-- लिखाळ.
माझी अनुदिनी
'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी पडतात.

सखाराम_गटणे™'s picture

11 Jan 2009 - 10:27 pm | सखाराम_गटणे™

मराठीमध्ये वाचणारी सधन लोक किती आहेत??
जवळपास शहरात राहणारी ९०% मडंळी आपली मुले इंग्रजी पुस्तके वाचावीत म्हणुन प्रयत्न करतात.
फास्टर फेणे, भारा भागवत, चिवी जोशी, समर्थ याच्या सारखी चांगले साहीत्य इग्रजीत जात नाही. साहीत्य हे जास्त करुन माउअथ पब्लीसीटीवर चालते,
जर मराठीतील चांगले साहीत्य इतर भांषात अनुवादीत झाले तर नक्की मोबदला वाढु शकेल.

----
सखाराम गटणे
© २००९,
लेखकाच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय ही प्रतिक्रिया वापरता येणार नाही.

लिखाळ's picture

13 Jan 2009 - 4:15 pm | लिखाळ

ग्राहकांछी संख्या आणि क्रयशक्ती लक्षांत घेता इंग्रजी पुस्तकांचा खप जास्त असणार हे स्वाभाविक आहे.
पण
मराठीत उत्तम साहित्य निर्माण होते आणि लोक ते वाचत राहतील असे मला वाटते.
पुस्तकांच्या किंमती आणि खपवण्याची तर्‍हा यावर सुद्धा अनेक गोष्टी अवलंबून असतील.

प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे.
-- लिखाळ.
माझी अनुदिनी
'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी पडतात.

श्रावण मोडक's picture

13 Jan 2009 - 7:45 pm | श्रावण मोडक

एकच वाक्य हा विषय गुंडाळायला पुरेसे आहे -
पुस्तकांच्या किंमती आणि खपवण्याची तर्‍हा यावर सुद्धा अनेक गोष्टी अवलंबून असतील.
खुलासा एकच, अनेक नव्हेत तर सार्‍याच. कारण तशी मातीही विकता येतेच की!!!