माझा बाप, डोक्याला ताप!

आपला अभिजित's picture
आपला अभिजित in जनातलं, मनातलं
8 Jan 2009 - 2:15 pm

आमच्या बापाला अखेर आमची आवड कळली म्हणायची!
च्यायला! गेले एक-दीड वर्षं नुसता छळवाद मांडला होता मेल्यानं! याची हौस नि मला निष्कारण सजा!! आताशा कुठे रुळावर आलाय.

कशाबद्दल बोलतेय, कळलं नाही का? अर्थात आमचा बाप नि त्याचं पिक्चरचं वेड! कळायला लागल्यापासून याव्यतिरिक्त कुठलंही काम निष्ठेनं केलं नसेल त्यानं. पिक्चर म्हणजे जीव की प्राण! कुठल्याही मळ्यात असो वा एखाद्या मित्राच्या खुराड्यात...पंचरंगी महालात असो वा शेणा-मुताच्या वासात...पिक्चर बघणं सोडलं नाही. अगदी शिरीष कणेकर चावले होते म्हणा ना! अर्थात, अजूनही सोडत नाही, पण माझ्या जन्मापासून आणि मला सांभाळण्याची जबाबदारी उरावर पडल्यापासून जरासा आटोक्यात आला बिचारा. लगामच बसला म्हणा ना, आमच्या उधळलेल्या घोड्याला! मला कळायला लागल्यापासून मग मलाच सिनेमाला घेऊन जायला लागला.

मी थेटरात जाऊन पाहिलेला पहिला सिनेमा `जबरदस्त.' म्हणजे, तसं नाव होतं सिनेमाचं . सिनेमा जबरदस्त नव्हता. आई-बाबा दोघंही बरोबर होते. बर्‍यापैकी गप्प राहिले होते मी. मी आणि बाबा, दोघांनी एकत्र पाहिलेला पहिला सिनेमा म्हणजे माझ्या आवडत्या शाहरुख खानचा `चक दे इंडिया'. बरा होता. स्टोरी बिरी कळायचं माझं वय नव्हतं. अवघी अडीच वर्षांची असेन मी तेव्हा. पण आमच्या परमपूज्य पिताश्रींची हौस! राहवेना त्यांना. मग मी सुद्धा ३ तास गप्प बसण्यासाठी आइस्क्रीम नि आणखी काय काय च्याऊ माऊ पदरात पाडून घेतलं.

मग बाप सोकावलाच आमचा! मी राहतेय म्हटल्यावर मला घेऊन कुठेही, कधीही सिनेमाला जायला लागला. अर्थात, त्याचाही नाइलाजच होता म्हणा! परीक्षण हे त्याचं कामच ना! मग अलका, लक्ष्मीनारायण, विजय, प्रभात, नीलायम, सिटीप्राईड, कुठे कुठे दौरे केले आम्ही. तसे, फक्त माझ्या आवडीसाठी फारच कमी सिनेमे बघितले आम्ही. अगदी रिटर्न ऑफ हनुमान, वगैरे. एक नाटकही दाखवलं त्यानं मला. पण मला काहीच झेपेना. गलगले निघाले, चल गंमत करू, पटलं तर घ्या, कसले कसले सिनेमे दाखवले आमच्या जन्मदात्यानं मला! एक तर भीषणच होता! सुखी संसाराची सूत्रे का काय तरी! बापही वैतागला होता या छळाला. मग माझी काय अवस्था झाली असेल बघा!

`रिटर्न ऑफ हनुमान' फार हिंसक होता. मला तोही नाही आवडला. शिवाय मला कधी नव्हे ते कोल्ड्रिंक पाजायची दुर्बुद्धी झाली आणि उलटीच झाली मला. सगळा फियास्को! मग आलो घरी. दे धक्का, उलाढाल मध्येही फार रमले नाही. `उलाढाल'च्या वेळी सिद्धार्थ जाधवला भेटले आणि मकरंद अनासपुरेला पाहिलं, तेवढाच आनंद! नाही म्हणायला `सही रे सही'च्या वेळी बापानं भरत जाधवशीही भेट घालून दिली आणि एकदा सुबोध भावेच्या घरी त्याच्याशीही!! आता शाहरूखला भेटवण्याची गळ घातलेय मी त्याला!

परवा तर गम्मतच झाली. शाहरुख खानचा पिक्चर बघायचा, मकरंद अनासपुरेचा की हत्ती नि अक्षयकुमारचा, असं बाबानं विचारलं. त्याला पक्की खात्री होती, मी शाहरुख खानचं नाव घेइन. कारण त्यालाही तोच (रब ने बना दी जोडी) बघायचा होता. पण मी त्याचा पोपट केला. हत्तीच्या पिक्चरची (जंबो) निवड करून त्याला पार उलटाच पाडला! मग नाइलाजानं त्यानं `जंबो'ला नेलं. मजा आली, पण त्यातलं युद्ध आणि जंबोची नि त्याच्या आईची ताटातूट नाही आवडली मला. रडलेच मी! नक्की कसा पिक्चर आवडतो हिला?' अशा प्रश्नांचं जंजाळ पाहिलं मी बाबाच्या चेहर्‍यावर.

माझी आवड नक्की आहे तरी कशी, यावर बाबाची पीएचडी सुरू होती. वाढदिवसापासून मला खोकला झाला. सध्या त्याचा यशस्वी तिसरा आठवडा सुरू आहे. (बाबाचा आवडता पिक्चरही एवढे आठवडे टिकत नाही!) माझ्या परमप्रिय आईनंच मग माझं नाचणं, पळणं बंद करून देण्यासाठी कुठला तरी माकडाचा पिक्चर लावून देण्याचं फर्मान सोडलं. बापाला काय्...गुनान ऐकण्यावाचून पर्याय नव्हता. लावला बिचार्‍यानं! मला तो प्रचंडच आवडला. एकदा, दोनदा, तीनदा, सात-आठ वेळा बघून झाला आत्तापर्यंत. एवढा आवडला, की आता सीडी लपवून ठेवायचा विचार करतायंत आई-बाबा!

तर, त्या महान सिनेमाचं नाव म्हणे `डंस्टन चेक्स इन'! असो. नावात काय आहे? तरीही, पहिल्यांदा बघून झाल्यावर `बाबा, मला नाही आवडला पिक्चर. यात सगळीकडे नाहीये माकड!' अशी लटकी तक्रार केलीच मी. पण मनातून आवडला होता. अजूनही आवडतोय. आता तरी बाप वेगवेगळे प्रयोग करून माझा छळ मांडणार नाही, अशी आशा!

- मनस्वी (आपला) अभिजित.

मुक्तकप्रकटनविरंगुळा

प्रतिक्रिया

दिपक's picture

8 Jan 2009 - 2:52 pm | दिपक

छान !

मनस्वी बाळ असे काय मेल्या वगैरे बोलतेस बापाला... कसे ही असले तरी बाबा आहेत तुझे ते... :)

आपला अभिजित's picture

9 Jan 2009 - 11:38 am | आपला अभिजित

ते इतरांना बोलतात तेव्हा?

त्यांना तुम्ही नाही बोलणार! मी लहान म्हणून माझ्यावर डोळे वटारणार होय?

आणि कसेही काय? सांगतेच त्यांना!

योगी९००'s picture

8 Jan 2009 - 3:37 pm | योगी९००

आपल्या मुलीचे मनोगत आवडले आम्हाला...

ती सुद्धा तुमच्याप्रमाणेच समिक्षक होणार असे वाटते. बाळकडूच छान मिळत आहे.

खादाडमाऊ

श्रावण मोडक's picture

8 Jan 2009 - 3:45 pm | श्रावण मोडक

पाय पाळण्यात दिसले...

लिखाळ's picture

8 Jan 2009 - 3:46 pm | लिखाळ

अरे वा ! मस्तंच आहे लेख.
वाढदिवसापासून मला खोकला झाला. सध्या त्याचा यशस्वी तिसरा आठवडा सुरू आहे.
हा हा .. हे मस्त.

तुमच्या मुलीला अनेक चित्रपट आवडत नाहीत आणि कोणाला काय आवडेल हे पक्के समजते यवरुन ती चांगली समिक्षक होऊ शकते असे वाटते. :)
-- लिखाळ.
'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी पडतात.

सुहास.'s picture

8 Jan 2009 - 7:04 pm | सुहास.

आपले तीर्थेस्वरूप किमान चित्रपट बघायला परवानगी तरी देतात,आम्ही लहानपणी मागीतली तर आमच्या पाठीवर व गालावर बरेच "चिञ"पट काढले आहेत.

आपला अभिजित's picture

9 Jan 2009 - 11:40 am | आपला अभिजित

आम्ही लहानपणी मागीतली तर आमच्या पाठीवर व गालावर बरेच "चिञ"पट काढले आहेत.

झकास!
माझ्या बाबांनाही आजीने बरेच पिक्चर पाहू दिले नाहीत, त्याचा सूड ते आत्ता उगवताहेत!
असो.

परिकथेतील राजकुमार's picture

8 Jan 2009 - 7:27 pm | परिकथेतील राजकुमार

मस्त्तच लिहिले आहे आपल्या कन्येने. पण तिच्या परवानगीने छापला आहात ना हा लेख ? उगाच घरातल्या घरात कॉपीराइट वरुन फाइट नकोत ;)

|!¤*'~` प्रसाद `~'*¤!|
"समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।"
आमचे राज्य

आपला अभिजित's picture

9 Jan 2009 - 11:42 am | आपला अभिजित

आमच्या घरी कोणत्याही गोष्टी तिच्याच परवानगीने कराव्या लागतात हल्ली!

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

8 Jan 2009 - 7:34 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

आवडली आपल्या कन्येची मतं.

पण ती मिपाची सभासद आहे का? नाहीतर मिपाच्या धोरणात बसणार नाही ते! ;-)

अदिती
आमच्यात दारू पिण्यासाठी नवीन वर्षाची, नवीन कपडे खरेदी करण्यासाठी दिवाळीची, मोदकांसाठी चतुर्थीची, आणि शुभेच्छा देण्यासाठी वाढदिवसाची वाट बघत नाहीत.

आपला अभिजित's picture

9 Jan 2009 - 11:43 am | आपला अभिजित

ची सभासद नाहीये ती, पण होईल लवकरच!

बाप आपल्याबद्दल काय काय लिहितो, याचा सुगावा तिला लागण्यास वेळ नाही लागणार!

प्राजु's picture

8 Jan 2009 - 7:44 pm | प्राजु

लेकी आधी ल्यावे आणि सुने आधी खावे... अशी काहीशी म्हण आहे. तुझ्या बाबतीत, लेकी आधी (सिनेमे) पहावे असेच म्हणावे वाटले.
बाकी, मनस्वीचं मनोगत अगदी मस्त लिहिलं आहेस.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

अनामिक's picture

8 Jan 2009 - 7:49 pm | अनामिक

अभिजीत भौ, मनस्वीचे मनोगत छान लिहलं आहे. तुमचे सगळेच ब्लॉग वाचायला मजा येते!!

अनामिक

आपला अभिजित's picture

9 Jan 2009 - 5:51 pm | आपला अभिजित

तुमचे सगळेच ब्लॉग वाचायला मजा येते!!

धागे (पोस्ट) म्हणायचेय का तुला?

माझ्या ब्लॉगवर अजून बरेच काही आहे!

- अभिजित
- (आपण मुलांना शिकवणं म्हणजे संस्कार. त्यांनी आपल्याला शिकवणं, म्हणजे उर्मटपणा!)
- (मुलं आपल्या आईवडीलांवरच जातात...
कितीही चांगले संस्कार केले, तरी!)

बिपिन कार्यकर्ते's picture

9 Jan 2009 - 2:51 pm | बिपिन कार्यकर्ते

ए १.... मस्त मजा आली.

बिपिन कार्यकर्ते

अनिल हटेला's picture

9 Jan 2009 - 3:01 pm | अनिल हटेला

आवडले मनस्वीचे मनोगत !! :-)

बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..