आजचे राशी भविष्य

(मिपाकरांचे भविष्य कथन करण्याचा हा तोकडा प्रयत्न आहे. चू भू द्या घ्या)

मेष आज आठवड्याचा पहिला दिवस. आज तूम्हाला महत्वाची कामे पूर्णत्वास न्यायची आहेत. आज कधी नाही ते बॉस ची बोलणी खावी लागणार नाहीत. कारण तो आज सुट्टीवर आहे.

वृषभ दिवसाची सूरूवात छान होईल. (त्याचा कालच्या भांगेशी काही संबंध नाही). मन प्रसन्न ठेवा. जमल्यास काम करण्याचा प्रयत्न करा. महिलांना आजचा दिवस चांगला जाइल. पाकक्रियेत नवीन दृष्टांत लाभेल. त्याचा प्रयोग जोडीदारावर करण्यास कचरू नका.

मिथून आजचा दिवस खर्चाचा. आप्तस्वकीय आणि नातेवाइक यांना आत्तापर्यंत टाळलेली ट्रीट द्यावी लागेल. आज नेहेमीचे यशस्वी 'बहाणे' अयशस्वी ठरतील. खर्च टाळण्यासाठी क्रूपया घरी लपून राहू नका. जोडीदारापासून अधिक खर्च योग संभवतो.

कर्क आज निव्वळ योगा योगाच्या गोष्टी घडतील. आज तूमच्या कामाची कदर होईल. सहकार्‍यांशी खेळी मेळीचे संबंध ठेवा. हित शत्रूंपासून सावध रहा. आज मिपा तूमच्या खर्‍या आय डी ने लिहा. यश तूमचेच आहे.

सिंह आज तूम्हाला पूर्ण दिवस मिपा वर बागडता येइल. सर्वत्र मूक्त संचार करा. स्वतःचे अस्तीत्व/ आय डी जाणवू द्या.

कन्या आजचा दिवस शुभ आहे. आज एखाद्या शुभ कार्याला जाणे होईल. राहीलेले भेटीगाठी उरकून टाका. टांगारूंना क्षमा करा. ते तूमच्या राशीचे (शब्दशः घेऊ नका) असतील कश्यावरून.

तूळ आज तूमच्या आयुष्यात गमतीशीर घटना घडतील. आज तूमचा त्रैमासिक पास संपलेला असेल. तरीही तीकीट तपासनिस तूम्हाला पकडणार नाही. (परतीच्या प्रवासात तिकीट अवश्य काढा) कोणीतरी सहप्रवासी तूम्हाला आपणहून जागा देईल (बसण्यास . रहाण्यास नव्हे). ऑफीस मधली फटाकडी पोरगी आज तूमच्या कडे बघून स्मीत हास्य करेल. कॉलेज कूमारांसाठी आज प्रेम योग संभवतो. पण त्यासाठी कॉलेजला अवश्य जा.

वृश्चिक आज तूमच्या हातून मोठे कार्य घडेल. आज तूमच्या हातून काहीतरी विशेष लिखाण संभवते. तूमच्या मिपा सहकार्‍यांना त्यापासून वंचित ठेवू नका. पूढल्या विवंचने पासून परमेश्वर त्यांच रक्षण करो. आमेन

धनू आज धनयोग संभवतो. आज कँटीन मधल्या चहा चे पैसे तूमचे सहकारी भरतील. लक्षात ठेवा 'पैसे वाचवणे म्हणजेच पैसे कमावणे' पान विडी, सिनेमा आणी हॉटेल सोडून इतर वायफळ खर्च टाळा.स्वतः आराम करा.इतरांनाही करू द्या.

मकर आजचा दिवस छान असेल. आज हाती घेतलेले काम पूर्णत्वास जाइल. पण त्यासाठी मुद्दाम काम करण्याची गरज नाही. वरीष्ठांची मर्जी सांभाळा. कनिष्ठांना सांभाळून घ्या. थोडक्यात रोजच्या सारखेच वागा.

कुंभ आज तब्येतीच्या क्षूल्लक तक्रारी जाणवतील. पण त्याने घाबरून जाऊ नका. अभक्ष भक्षण आणि अपेय पान टाळा.केल्यास परीणामांची तमा बाळगू नका. येणार्‍या 'बूधवार' ची आतूरतेने वाट पहा.

मीन आज वाद विवाद टाळू नका. दिव्यांचा वापर सढळ हस्ताने करा. शक्यतो गूंतागूंतीची मते मांडा म्हणजे त्यातून पळवाट काढणे सोप्पे जाइल. तूम्ही कूशल राजकारणी आहातच. त्याची अनूभूती घ्या.

लेखनविषय:: 
लेखनप्रकार: 

प्रतिक्रिया

असेच संपुर्ण वर्षाचे भविष्य येऊ द्या.

(तुमची कोठली रास आहे?)

खादाडमाऊ
(खादाडविंचू)

सर्व मनुष्यजातीला लागू पडतील असे विचार या ना त्या राशीच्या लोकांना सांगत राहणे हा उत्तम मार्ग आहे. त्याच्या बरोबरीने शनी, मंगळ, राहू, केतू , दशा, महादशा वगैरे शब्द पेरत गेलात तर ते लोकांना ऑथेंटिकही वाटेल.
आनंद घारे
मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात.
http://360.yahoo.com/abghare
http://anandghan.blogspot.com/

हाहाहा! घारे काकांनी जनरल फॉर्म्युला दिलेला आहेच, आता पुढच्या आठवड्याचं भविष्य कोण लिहिणार?

अदिती
आमच्यात दारू पिण्यासाठी नवीन वर्षाची, नवीन कपडे खरेदी करण्यासाठी दिवाळीची, मोदकांसाठी चतुर्थीची, आणि शुभेच्छा देण्यासाठी वाढदिवसाची वाट बघत नाहीत.

धन्यवाद सर्वांचे :)